संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
ते त्याला सोडून पळून गेलेTHEY FORSOOK HIM AND FLED डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश “पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे तेव्हां सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले” (मत्तय 26:56). |
येशूने आपला प्रार्थनेतील एकांतवासाचा काळ गेथशेमाने बागेत संपविला. त्याने झोपलेल्या शिष्यांना जागे केले. तो म्हणाला, “ऊठा, आपण जाऊ; पाहा मला धरुन देणारा जवळ आला आहे” (मत्तय 26:46). त्यानंतर पाहा, बारातील एक जो यहुदा “तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांच्याकडून तरवारी व [सोटे] घेऊन आलेला मोठा समुदाय होता” (मत्तय 26:47).
गेथशेमानेतील अंधारात सगळे शिष्य एकसारखे दिसले असणार. मंदिराच्या सुरक्षारक्षकांना यहुदाने सांगून ठेवले होते की, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा” (मत्तय 26: 48). यहुदाने येशूच्या गालाचे चुंबन घेतले. “तेव्हां त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली” (मत्तय 26: 50). “शिमोन पेत्राजवळ तरवार होती; ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला; त्या दासाचे नाव मल्ख होते” (योहान 18:10). येशूने “त्याच्या कानाला स्पर्श करुन त्याला बरे केले” (लुक 22:51). मग येशूने पेत्राला तरवार दूर करण्यास सांगितले. येशू त्याला म्हणाला, “तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही; आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या सैन्यांच्या बारा पलटणीपेक्षा [72,000 देवदूत!] अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे?” (मत्तय 26:53-54). मग येशू त्याला अटक करण्यास आले होते त्यांच्याकडे वळून त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारुला धरावे तसे मला धरावयास तुम्ही तरवारी व [सोटे] घेऊन बाहेर आला आहां काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हां तुम्ही मला धरले नाही” (मत्तय 26:55). हे आपणांस आपल्या उता-याकडे आणते,
“पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे तेव्हां सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले” (मत्तय 26:56).
ह्या घटनांचे वर्णन संदेष्ट्यांनी शेकडो वर्षे पूर्वी केले आहे. डॉ. आर. सी. एच. लेन्सकी म्हणाले, “ह्या सर्व गोष्टी एका आणि केवळ एका कारणांसाठी घडल्या: ‘संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे...म्हणून हे सर्व झाले.’ येथे खरी शक्ती कार्य करीत होती तिने त्या रात्री जागा घेतली होती: देव आपली संदेष्ट्यांनी सांगितलेली योजना पूर्ण करीत होता, येशू आपल्या स्वत:स धरणा-याच्या हाती देत होता...आता वचन 56 पूर्ण झाले होते. येशूला घेऊन जात [होते], तेव्हां सर्व शिष्य पळून गेले” (आर. सी. एच. लेन्सकी, पीएच.डी., द इंटरप्रिटेशन ऑफ सेंट. मॅथ्यूज गॉल्पल, ऑग्जबर्ग पब्लिशिंग हाऊस, 1964 आवृत्ती, पृष्ठ 1055; मॅथ्यू 26:56 वरील टिप्पणी).
“पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे तेव्हां सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले” (मत्तय 26:56).
ह्या उपदेशात, मी ह्या वचनाचा सखोल विचार करणार आहे, त्याचे शिष्य “त्याला सोडून पळून गेले” याची कांही कारणे शोधून काढणार. डॉ. जॉर्ज रिकर बेरी यांच्या मते, केजीवीमध्ये ग्रीक शब्द “सोडले” म्हणजे “त्याग केला” (ग्रीक-इंग्रजी शब्दकोष आणि नवीन करार समानार्थी). शिष्य येशूला सोडून पळून गेले, म्हणजे त्याचा त्याग करुन पळून गेले याची पुष्कळ कारणे आहेत.
I. पहिले, संदेष्ट्यांचे शास्त्रलेख पूर्ण व्हावेत म्हणून ते येशूला सोडून पळून गेले.
आपला उतारा म्हणतो, “संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे...” शिष्य त्याला सोडून पळून जातील ह्या भविष्यवाणीचा यात समावेश आहे. जख-या 13:6-7 म्हणते,
“जर कोणी त्यास विचारले की तुझ्या बाहूंच्यामध्ये ह्या जखमा कसल्या? तर तो म्हणेल, माझ्या इष्टमित्राच्या घरी लागलेल्या घावांचे हे व्रण आहेत...मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील” (जख-या 13:6-7).
“मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील” या शब्दांच्या बाबतीत, डॉ. हेनरी एम. मॉरिस म्हणाले,
हे वचन मत्तय 26:31 व मार्क 14:27 मध्ये स्वत: ख्रिस्ताच्या द्वारे आहे. तो, चांगला मेंढपाळ. आपल्या मेंढरांकरिता आपला प्राण देतो (योहान 10:11), परंतू ह्या जग-बदलणा-या घटनेमध्ये, थोड्या वेळाकरिता त्याची मेंढरे विखुरली जातील (हेनरी एम, मॉरिस, पी.एचडी., द डिफेंडर्स स्टडी बायबल, वर्ल्ड पब्लिशिंग, 1995 आवृत्ती, पृष्ठ 993; जख-या 13:7 वरची टिप्पणी).
त्याचे शिष्य त्याला सोडून पळून जातील ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वत: जख-या 13:7 केली आहे. मत्तय 26:31 मध्ये ख्रिस्त म्हणाला,
“तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल’” (मत्तय 26:31).
पुन्हां, मार्क 14:27 मध्ये,
“नंतर येशू त्यांना म्हणाला, तुम्ही सर्व जण अडखलून पडाल; कारण असे लिहले आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल’” (मार्क 14:27).
शिष्य त्याला सोडून पळून जाणे हे जख-या 13:7 मधील भविष्यवाणीची परिपूर्तता आहे.
“पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे तेव्हां सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले” (मत्तय 26:56).
II. दुसरे, ते येशूला सोडून पळून गेले कारण ते पतन पावलेल्या वंशातून होते.
मानवी वंश ही पतित वंशावळ आहे. आम्ही हे विसरता कामा नये. तुम्ही पापी आहांत — तुम्ही पतित वंश — आदामाचे मुलं आहांत. पवित्रशास्त्र म्हणते,
“एका माणसाच्या द्वारे पाप जगांत शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले” (रोम 5:12).
त्यामुळे आपण सर्व “पापांत मृत” असे जन्मलो आहोत. (इफिस 2:4). त्यामुळे आपण सर्व “स्वभावत: क्रोधाची प्रजा” आहोत (इफिस 2:3). अशाप्रकारे तुम्ही स्वभावत:च पापी आहांत. प्रत्येक गोष्टीबाबत सैतानाला दोष देऊ नये! आपण स्वभावत:च पापी नसतो तर सैतान आपणांस गुलाम बनवू शकत नाही. आदामाचे सर्व वंशज स्वभावत:च पापी आहेत. तुम्ही स्वभावत:च पापी आहांत. होय, तुम्ही!
शिष्य सुद्धा इतरांपेक्षा अधिक चांगले नव्हते. ते, सुद्धा, “स्वभावत:च क्रोधाची प्रजा” होते. ते, सुद्धा, “पापात मृत” झालेले होते. ते, सुद्धा, “आदामाचे वंशज” होते. जये की ओल्ड न्यू इंग्लंड लहान मुलांचे पुस्तक म्हणाले,
“आदामाच्या पतनात
आपण सर्वांनी पाप केले,”
शिष्य दैहिक स्वभावाचे होते जे “देवाबरोबर वैर” होते (रोम 8:7). अशा प्रकारे त्यांनी त्यांस ख्रिस्ताने सांगितलेले शुभवर्तमान नाकारले. त्याच प्रकारे तुम्ही शुभवर्तमान नाकारता! डॉ. जे वरनॉन मॅक् गी म्हणाले,
[ख्रिस्ताने] हे सत्य पाच वेळा सांगितले की तो मरवयास यरुशलेमेस जात आहे (मत्तय [16:21]; 17:12; 17:22-23; 20:18-19; 20:28). अशाप्रकारची स्पष्ट चेतावणी दिल्यानंतर सुद्धा त्याचे पुनरुत्थान होई पर्यंत ते [शुभवर्तमान] स्विकारण्यास अपयशी ठरले (जे. वरनॉन मॅक् गी, टीएच.डी., थ्रु द बायबल, थॉमस नेल्सन पब्लिशर्स, 1983, आवृत्ती IV, पृष्ठ 93; मत्तय 16:21 वरील टिप्पणी).
शिष्य शुभवर्तमानाचे “महत्व का ओळखू” शकले नाहीत? त्याचे उत्तर सोपे आहे,
“परंतू आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे” (II करिंथ 4:3).
त्यांच्या योहान 20:22 वरील टिप्पणीवर, डॉ. मॅक् गी म्हणाले की, जोवर शिष्यांचा सामना पुनरुत्थित ख्रिस्ताबरोबर झाला नाही तोवर ते नव्याने जन्मले (पुनर्जन्मले) नव्हते, आणि त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला, व म्हणाला, “पवित्र आत्म्याचा स्विकार करा” (जे वरनॉन मॅक् गी, टीएच. डी., ibid., पृष्ठ 498; योहान 20:22 वरील टिप्पणी). (माझे — “शिष्यांची भीति” —“त्यांच्यापासून हे म्हणणे लपलेले होते,” “पेत्राचे परिवर्तन,” “पेत्राला जाणीव होणे,” आणि “यहदाचा खोटा पश्चाताप,” ह्या विषयांवरील उपदेश वाचण्यास येथे क्लिक करा).
“हे सर्व झाले आहे तेव्हां सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले” (मत्तय 26:56).
त्यांना त्यातून जावे लागले कारण ते पापी होते. ते नाश पावलेले पापी असे जॉन कागॅन व झबलगा यांना पाहावे लागले. जसे तुम्ही हरविलेले पापी आहांत तसे तुम्ही पाहण्यास भाग पडले!
कोणीतरी तुम्हांस म्हणेल की ख्रिस्ताचे पुनरुत्थान होईस्तवर शिष्य नव्याने जन्मले किंवा पालट झालेले नव्हते असे म्हणायला आम्ही खूप दूर गेलो आहोत. तुमच्यापेक्षा शिष्य वेगळे होते असे तुम्हांला वाटते का? मला ठाऊक आहे की ते माझ्यापेक्षा वेगळे नव्हते! आज रात्रौ मी येशूच्या रक्ताशिवाय तुमच्या समोर उभा राहणार नाही! येशूच्या रक्ताशिवाय मी अजूनहि हरविलेला नरकात जाणारा पापी आहे!
मी अनोळखी असतांना येशूने मला शोधले,
देवाच्या कळपातून दूर भटकतांना;
तो, मला संकटातून सोडवितो,
त्याच्या मौल्यवान रक्ताने रदबदली करितो.
(“कम, दाऊ फाँट” रॉबर्ट रॉबिनसन, 1735-1790).
मी इआन एच. मुरे यांच्या, द ओल्ड इवांजिलीजम पुस्तकाचे कौतुक करितो (द बॅनर ऑफ ट्रुथ ट्रस्ट, 2005). सर्वसाधारणपणे परिवर्तनासंबंधी बोलतांना, इआन एच. मुरे म्हणाले, “परिवर्तनासंबंधीच्या सत्याची पुनर्प्राप्ती करण्याटी सध्या खूप निकड आहे. ह्या विषयांबसंबंधाने एक सर्वत्र असलेला वाद हा हजारो कमी गोष्टीवरुन वाहणा-या निरोगी वा-यासारखा असू शकतो” (पृष्ठ 68). या विषयी मला लिहा. मला तुमच्याकडून हच ऐकायचे आहे, आणि प्रत्येक व्यक्तीस मी व्यक्तीश: उत्तर देईन! माझा इ मेल आहे rlhymersjr@sbcglobal.net.
“हे सर्व झाले आहे तेव्हां सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले” (मत्तय 26:56).
त्यांचे पाप अजूनहि येशूच्या रक्ताने धुतले गेले नव्हते! तुम्ही येशूच्या रक्ताने धुतले काय? धुतले काय? धुतले काय? जोवर तुम्ही येशूच्या रक्ताने धुतले जात नाही तोवर तुम्हांला आशा नाही!
III. तिसरे, त्यांनी येशूला सोडले व पळाले कारण त्या वेळेच्या पूर्वी त्यांचा ख-या अर्थाने पालट झालेला नव्हता.
त्यांना त्यांच्या क्षमतेवर पूर्ण भरवंसा होता. ख्रिस्ताचे मरणातून उठणे आणि त्यांना दिसणे आणि त्यांच्यावर फुंकर घालण्यापूर्वी आपण ते पुन्हां पुन्हां पाहातो. उदाहरणत:, येशूने पेत्राला म्हणाले की या रात्री तू मला तीन वेळा नाकारशील. पवित्र आत्म्याचे कोमेजून टाकण्याच्या कार्यातून अजून ते गेले नव्हते — त्यांचे पाप त्यांना समजण्यासाठी!
“पेत्र त्याला म्हणाला, आपणांबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणांस नाकारणार नाही; सर्व शिष्यांनीहि तसेच म्हटले” (मत्तय 26:35).
अजून एकाहि शिष्याचे परिवर्तन झालेले नव्हते! आणि तुमचेहि नाही! तुमच्या पापाची जाणीव होण्यासाठी — तुम्हांला पवित्र आत्म्याचे कोमेजून टाकण्याच्या कार्यातून जावे लागणार! डॉ. मार्टिन लॉईड-जोन्स म्हणाले,
पापाचा सिद्धांत, व पाप काय आहे हे समजल्याशिवाय खरे सुवार्ता कार्य नव्हे...देवाच्या पवित्रतेसह सुवार्ता कार्य सुरु झाले पाहिजे, मनुष्याचा पापीपणा आणि दुष्टता व अनाचार याचा अनंतकालीन परिणाम. तो केवळ मनुष्यच आहे जो याप्रकारे त्याचे दोष पाहण्यास आणले आहे तो मुक्ती व सुटकेसाठी ख्रिस्ताकडे पळतो [डॉ. हायमर्स यांची टिप्पणी: इस्टरमध्ये नाटकात यहुदाची भूमिका करतांना माझ्या स्वत:च्या खोलवर पापाची जाणीव झाली!] (डॉ. मार्टिन लॉईड-जोन्स, एम.डी., स्टडीज इन द सरमन ऑन द माऊंट, इंटर वरसिटी, 1959, आवृत्ती 1, पृष्ठ 235; मी जोर दिला).
जोवर शिष्य त्याला “सोडून पळून गेले” नाहीत तोवर त्यांना ख-या अर्थाने पापाची जाणीव झाली नाही. थोड्या वेळापूर्वी शिष्य त्याला म्हणाले होते की, “तुम्ही देवापासून आला आहांत असा आम्ही विश्वास ठेवतो,”
“येशूने त्यांना उत्तर दिले, आता तुम्ही विश्वास धरतां काय? पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी जाल आणि मला एकटे सोडाल...” (योहान 16:30-32).
पेत्राने नाकारल्यानंतर, त्याचा खेद व पश्चाताप, हा इतर शिष्यांनाहि खात्रीने जाणवला होता. “मग तो बाहेर जाऊन मोठ्या दु:खाने रडला” (लुक 22:62). डॉ. डबल्यू.जी.टी. शेड प्रतिक्रिया देतात, “मनुष्यास पापाची जाणीव होत नाही तर पवित्र आत्मा सामान्य मनुष्यास नव्याने जन्म देत नाही” (शेड, डॉगमॅटिक थिऑलॉजी, आवृत्ती 2, पृष्ठ 514). जोवर शिष्यांनी येशूला धरुन दिले नाही तोवर त्यांना त्यांच्या पापाची जाणीव झाली नाही. त्या नंतर कळले की त्याच्या पवित्र रक्ताने त्यांचे पाप धुतले जाणे गरजेचे आहे! तुमच्यापैकी कांही जणांना वाटेल की पापाची जाणीव होण्यापूर्वी त्यांचे परिवर्तन होऊ शकते! तुम्हांला तुमच्या पापाची जाणीव होत नाही तोवर तुमचे परिवर्तन होणार नाही! पेत्र बाहेर जाऊन मोठ्या दु:खाने रडला. बरेच लोक परिवर्तन होण्यापूर्वी पेत्रासारखे रडतात. तुम्ही खेदाने अश्रू ढाळून रडला काय?
उपयोजन
मी मागे जाईन आणि ज्यांचा अजून पालट झाला नाही अशांसाठी मी त्याचा वापर करीन. तुम्ही नाश पावलेले पापी आहांत व ज्या तुमचे अंत:करण “कपटी...तसेच असाध्य रोगाने भरलेले” असे तुम्हांस वाटते का? (यिर्मया 17:9). “किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडविल?” असे तुम्हांस वाटते का? (रोम 7:24). तुम्ही तुमचा सगऴा आत्मविश्वास गमाविला काय? तुम्ही तुमच्या पापासाठी रडला किवा अश्रू ढाळले काय? तुमच्या पापासंबंधी जोवर तुम्ही रडत किवा अश्रू ढाळत नाही तोवर कोणतीच आशा नाही! तोवर तुम्ही म्हणा, “देवा मज पाप्यावर दया कर!” जसे डॉ. लॉईड-जोन्स म्हणाले, “तो केवळ मनुष्यच आहे जो याप्रकारे त्याचे दोष पाहण्यास आणले आहे तो मुक्ती व सुटकेसाठी ख्रिस्ताकडे पळतो” (ibid.).
येशूच्या नावात, एका चित्ताने, पवित्र गीते उंच करा,
आणि वाहणा-या प्रत्येक अंगातून आरोग्याचा प्रवाह वाहतो याचा विचार करा.
अरेरे, कोण सांगेल की, त्याने दु:ख भोगिले तेव्हां शुद्ध रक्त दुभंगले होते,
जेव्हां आपल्या पापाने भरला किती त्या वेदना त्याची छाती फाटली?
तुच्छतेचा अपमानित आवाज जो त्या अंतकरणात खोलवर घुमतो;
ठोकलेले खिळे, रुतलेले काटे, त्यानी त्यास भयंकर दु:ख दिले.
परंतू प्रत्येक त्याच्या उसाशाने मला घेरले भयंकर अशा दु:खात,
त्याच्या दबलेल्या जीवावर आपल्या सर्वांचे पाप कसे लादले.
(“द लॉर्ड हॅथ लेड ऑन” विलीएम हिली बाथरस्ट, 1796-1877; “अमेझिंग ग्रेसची” चाल)
तेथे चीनमध्ये संजीवनात जसे लोक अश्रू ढाळून रडले तसे तुम्हांस पापाची जाणीव होऊन रडायला हवे.
कांही वेळांत मी तुम्हांला आमच्याशी पापासंबधी बोलण्यास पहिल्या दोन रांगांत येऊन बसण्यास सांगणार आहे. तुमच्यातील पुष्कळ येतील, परंतू त्यामुळे कांहीतरी चांगले होईल असे नाही. तुम्ही येथून पापी म्हणून घरी जाणार. येथे येण्याने तुम्हांला का मदत होणार नाही? कारण तुम्ही पापात आहांत याची जाणीव नाही. तुम्ही शिष्यांसारखे आहांत. तुम्हांला तुमच्यावर खूप विश्वास आहे. तुम्ही जसे जगत आहांत ते ख्रिस्ती जीवन आहे असे तुम्हांला वाटते. पण तुम्ही चुकीचे आहां. थोड्या वेळाने किंवा कांही काळा नंतर सैतान येऊन तुम्हांस परिक्षेत पाडणार. जसे शिष्यांनी केले तसेच तुम्ही करणार. तुम्ही ख्रिस्ताला सोडणार. तुम्ही या मंडळीत राहणार. तुम्ही पापी जीवन जगणार. मला ते कसे कळते? कारण मी गेली 60 वर्षे प्रचार करतोय. तुमच्यासारखे शेकडो लोक मी पाहिलेत. त्यामुळे मला माहित आहे की त्या रात्री जसे शिष्यांनी ख्रिस्ताला सोडले तसे तुम्ही सोडणार. थोड्या वेळाने किंवा कांही काळा नंतर तुम्ही जसे त्यांनी केले तसे करणार. तुम्ही करणार असा विचार करु नका. पण तुम्ही चुकीचे आहांत! तुम्ही स्वत:शी प्रामाणिक असा. तुम्ही मंडळी सोडण्याचा अगोदर विचार केला असणार, नाही का? नाही का? नाही का? तुम्हांला माहित आहे तुम्ही सोडणार.
तुम्ही तुमच्या अंत:करणाकडे पाहा. तुम्हांला तुमचे पाप जाणवेल. तुम्हांला तुमचा ख्रिस्तावरील विश्वासाची कमतरता जाणवेल. तुम्हांला जाणवेल की तुम्ही पापात हरविलेले आहां! तुम्हांला अपराधी वाटेल — ख्रिस्तावर विश्वास न ठेवण्याचा अपराधी. ते सर्वात मोठे पाप — ख्रिस्तावर विश्वास न ठेवण्याचे पाप. येशू म्हणाला, “जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे” (योहान 3:18). तुम्ही नरकात जाईपर्यंत वाट पाहू नका. तुमचा न्याय होऊन चुकला आहे! डॉ. लॉईड-जोन्स म्हणाले, “ते तेव्हांच [जेव्हां तुम्ही] तुमचा अपराध पाहाण्यास व [तुम्हाला जाणवण्यास] आणले जाईल आणि अशाप्रकारे सुटका व तारण होण्यासाठी ख्रिस्ताकडे [तुम्ही याल].” तुमचे पाप तुम्हांला जाणवते काय? तुम्हांला तुमच्या पापाची जाणीव होते, आणि ते तुम्हांला खटकते तर, तुम्ही येशूकडे याल, व त्याच्यावर विश्वास ठेवाल, आणि त्याच्याकडून तारण होईल व तुमच्या पापाकरिता सांडलेल्या रक्ताने तुमचे पाप धुवून शुद्ध केले जाईल. ख-या अर्थाने तारण होण्यास दुसरा कोणताच मार्ग नाही. मी अशी प्रार्थना करितो की असा कोणताच रविवार नसणार जेव्हां मी येशूच्या रक्ताविषयी प्रचार करणार नाही. यापेक्षा वेगळे शुभवर्तमान मला ठाऊक नाही — येशूवर विश्वास ठेवा व तुम्ही शुद्ध व्हाल. कालवरील वधस्तंभावर सांडलेले येशूचे रक्तच केवळ तुमची आशा आहे! तरीहि तुम्ही येशू व त्याचे रक्त याची आठवण करीत नाही! का नाही? कारण तुम्हांला तुमचे पाप जाणवत नाही — त्याचमुळे! त्याचमुळे! तुम्ही योग्य शब्द शिकण्याचा प्रयत्न करीत आहां. अरे, किती मुर्ख आहांत तुम्ही! ऑगस्टीन म्हणाले, “जोवर स्वस्थता लाभत नाही तोवर आपण अस्वस्थ असतो.” तेथे रक्ताने भरलेला झरा आहे, जो तारकाच्या धमण्यातून निघतो. आणि पापी, त्या पुराखाली न्हाले, त्यांचे पापांचे डाग निघून गेले. आताच येशूकडे या. आणि त्याच्या पवित्र रक्ताने आपल्या प्रत्येक पापापासून शुद्ध व्हा! आमेन.
जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.
ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.
एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले: “अलोन” (बेन एच. प्राईस, 1914).
“Alone” (Ben H. Price, 1914).
रुपरेषा ते ख्रिस्ताला सोडून पळून गेले THEY FORSOOK HIM AND FLED डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे तेव्हां सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले” (मत्तय 26:56). (मत्तय 26:46, 47, 48, 50; योहान 18:10; लुक 22:51; I. पहिले, संदेष्ट्यांचे शास्त्रलेख पूर्ण व्हावेत म्हणून ते येशूला सोडून पळून गेले,
II. दुसरे, ते येशूला सोडून पळून गेले कारण ते पतन पावलेल्या वंशातून होते,
III. तिसरे, त्यांनी येशूला सोडले व पळाले कारण त्या वेळेच्या पूर्वी त्यांचा ख-या
|