Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




यहुदाचा खोटा पश्चाताप

THE FALSE REPENTANCE OF JUDAS
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सायंकाळी, दि. 2 एप्रिल. 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, April 2, 2017

“तेव्हां तो शिक्षापात्र ठरविण्यात आला असे पाहून, त्याला धरुन देणारा यहुदा पस्तावला, आणि ते तीस रुपये मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला, मी निर्दोष जिवाला धरुन देऊन पाप केले आहे ते म्हणाले, त्याचे आम्हांस काय? तुझे तुच पाहून घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला”
(मत्तय 27:3-5).


गेथशेमाने बागेत येशूला धरुन दिल्यानंतर, मत्तय 27 ची सुरुवात पहाटेस होते, त्यानंतर त्यास मुख्य याजक व न्यायसभेच्या समोर आणले, त्यानंतर त्याच्या विरोधात खोटे साक्षीदार देण्यात आले, त्यानंतर त्याच्या गोलावर चपडाका मारल्या व त्याची चेष्टा केली, त्यानंतर पेत्राने त्याला नाकारले.

“प्रात:काळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यानी येशूला जिवे मारण्यासाठी त्याच्याविरुध्द मसलत केली; आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले (मत्तय 27:1-2).

मुख्य याजकाच्या महलातून येशूला घेऊन गेले. यहुदा आत आला आणि येशू जवळ उभा राहीला. परंतू यहुदा येशूकडे वळला नाही आणि क्षमा मागितली नाही. शेवटच्या क्षणी सुध्दा, तो येशूकडे वळला असता, तर त्याचे तारण झाले असते. वधस्तंभावरील येशूच्या बाजूचा चोराने अगदी शेवटी मरण्यापूर्वी त्याचे तारण झाले. यहुदा येशूकडे वळण्यापूर्वी क्षमेसाठी मुख्य याजकाकडे का वळला? मला वाटते ह्याची दोन कारणे आहेत.

I. प्रथम, अगोदरच यहुदाने अक्षम्य पाप केलेले होते.

येशू म्हणाला,

“ह्यास्तव मी तुम्हांस सांगतो की, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्याची माणसांना क्षमा होईल, परंतू पवित्र आत्म्याविरुध्द जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार ऩाही; मनुष्याच्या पुत्राविरुध्द कोणी कांही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतू जो कोणी पवित्र आत्म्याविरुध्द बोलेल त्याची त्याला क्षमा होणार ऩाही; ह्या युगी नाही व येणा-या युगीहि नाही” (मत्तय 12:31-32).

डॉ.जॉन आर. राईस म्हणाले की, यहुदाने “अक्षम्य पाप केलेले असावे असे मला वाटते,”तेच त्याने, अशाप्रकारची तीव्र नापंसती दर्शविली होती. डॉ.जॉन आर. राईस म्हणाले,

अक्षम्य पाप ज्यामुळे ख्रिस्त निश्चितपणे संपूर्ण आणि अंतिम नाकार करतो... तो अपमान आणि कायमस्वरुपी पवित्र आत्मा काढून घेतो. त्यानंतर [पवित्र आत्मा] ह्दय काम करायचे थांबते, खात्री पटते किंवा तारणाची इच्छा निर्माण होते... ज्याच्या मधून [जो अक्षम्य पाप करतो] पवित्र आत्मा काढून घेतल्याने तो निष्काळजी बनतो. जे सर्व देवाकडे खरेपणाने वळतात त्यांच्या ह्दयात पवित्र आत्मा कार्य केल्यामुळे वळत असावेत. जर [पवित्र आत्मा] काढून घेतला तर, दुसरे कोणतेहि माध्यम नाही ज्यामुळे देव पाप्यास खात्री पटवून तारण करील. (डॉ. जॉन आर. राईस, डी.डी.,अ वर्स-बाय-वर्स कॉमेंट्री अकॉर्डींग टू मॅथ्यू, स्वोर्ड ऑफ द लॉर्ड प्रकाशन, 1980 आवृत्ती, पृष्ठ 183; कमेंट ऑन मॅथ्यू 12:31-32).

डॉ. राईस यांचे गीत, “इफ यू लींगर टू लाँग,” यहुदाचे वर्णन करते!

तू थांबला व रेंगाळला तरीहि तारणा-याला नाकारीत होतास,
   त्याचा इशारा खूप सहनशील, त्याची सर्व आर्जव खूप प्रेमळ,
असे तू मना केलेले फळ खाल्ले, तू सैतानाच्या अभिवचनावर विश्वास ठेवलास,
   असे तू ह्दय कठीण केलेस; पापाने तुझे मन अंधकारमय केलेस.
नंतर किती भयंकर न्यायाला सामोरा जाणार, पुन्हा दया तुला मिळणार नाही
   कारण तू आत्मा जाई पर्यंत थांबलास आणि खोळंबलास आणि वाट पाहिलीस;
पस्तावा आणि खेद काय कामाचा, जेव्हां तुला मरणाने आशाहीन केले,
   आत्मा जाई पर्यंत तू थांबलास आणि खोळंबलास आणि वाट पाहिलीस!
(“इफ यू लींगर टू लाँग,” डॉ.जॉन आर. राईस द्वारा, 1895-1980).

यहुदा “आत्मा जाई पर्यंत खोळंबला.” त्याने अक्षम्य पाप केले. त्या सकाळी तो येशूकडे गेला नाही. तो वाचण्यासाठी खूप उशीर झाला. खूप उशीर! खूप उशीर! सार्वकालीक उशीर झाला!

नकार देणा-या प्रभूने एक रेषा आखलेली आहे,
   जेथे त्याच्या आत्म्याचे पाचारण नाहिसे होते;
आणि तुला वेड्या गर्दीचा आनंद- घेण्याची घाई झालीय−
   तू मोजलीस काय, तू किंमत मोजलीस कायॽ
तुझ्यासाठी तू सारे जग मिळविले पण, तुझा आत्मा गमाविलास,
   तेव्हां,तू किंमत मोजलीस कायॽ
आतहि ती आखलेली रेषा तुझ्याकडून ओलांडली तेव्हां,
   तू मोजलीस काय, तू किंमत मोजलीस कायॽ
(“हॅव यू काऊंटेड कॉस्टॽ” ए.जे.हॉज, द्वारा,1923).

मी तुम्हांस विनंती करितो की, सार्वकालीकपणे पवित्र आत्मा सोडून जाई पर्यंत वाट पाहू नका! जेव्हां तो तुम्हांस पापाबद्दल खात्री करुन देतो− तेव्हां येशूकडे या. तुम्हां दुसरी संधी कदाचित मिळणार नाही! मी तुम्हांस विनंती करितो की, कायमचा खूप उशीर व्हायच्या अगोदर येशूकडे या!

II. दुसरे, यहुदाचा “पश्चाताप” हे केवळ “ऎहिक दु:ख” होते.

वचन म्हणते,

“तेव्हां तो शिक्षापात्र ठरविण्यात आला असे पाहून, त्याला धरुन देणारा यहुदा पस्तावला...” (मत्तय 27:3).

“पस्तावा” हा शब्द ग्रीक शब्द “मेटामेलोमै” ह्यापासून अनुवादीत केला आहे ज्याचा अर्थ “खेद वाटणे” (अति), “त्यासाठी दु:ख वाटणे” (जॉर्ज रिकर बेरी). परंतू “मेटामेलोमै” हा शब्द तारणाकडे घेऊन जात नाही. हा फक्त “खेद,” पवित्र आत्म्याद्वारे पापाची खात्री होणे नव्हे. हा फक्त पाप करताना पकडल्यावर होणारा खेद होय. अशाप्रकारचे दु:ख व खेद निराशा, स्वत:चा राग आणि आशाहीनतेमध्ये घेऊन जाते. प्रेषित पौल म्हणतो,

“कारण ईश्वरप्रेरित दु:ख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऎहिक दु:ख मरणास कारणीभूत होते” (II करिंथ 7:10).

ईश्वरप्रेरित दु:ख खरा पश्चाताप निर्माण करते, जे ख्रिस्तामधील तारणाकडे घेऊन जाते. II करिंथ 7:10 मध्ये अनुवादीत केलेला “पश्चाताप” हा शब्द मत्तय 27:3 मध्ये अनुवादीत केलेल्या “पस्तावा” हा शब्दापेक्षा अगदी वेगळा आहे, जेथे यहुदाने “पस्तावा” केला. II करिंथ 7:10 मध्ये ग्रीक शब्द “मेटानोइआ” या रुपात आहे — ज्याचा अर्थ “मनाचे परिवर्तन” (द्राक्षवेल). माझे चीनचे पाळक डॉ.तिमोथी लीन (1911-2009) हे एक ईब्री व ग्रीक भाषेचे पंडीत होते. डॉ. लीन म्हणाले, “ही एक 'अलौकीक बुध्दीमत्ता,' एक नवीन मन.” हे एक ह्दय व मनाचे संपूर्णत: परिवर्तन होय जे फक्त देवच घडवितो. डॉ. जॉर्ज रिकर बेरी (1865-1045) म्हणाले की, “मेटानोइआ” हा शब्द [मेटामेलोमै पेक्षा थोडा] उदात्त, संपूर्णत: पश्चातापासाठी नियमीत हावभाव आहे” (ग्रीक-इंग्रजी नवीन करार शब्दकोश). धर्मनिष्ट लेखक रिचर्ड बॅक्स्टर (1615-1691) त्याला “प्रेमाचे परिवर्तन” असे म्हणतात — देव आणि पाप या संबंधाने मनाचे परिवर्तन, प्रेम व द्वेष या संबंधाने परिवर्तन.

“कारण ईश्वरप्रेरित दु:ख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऎहिक दु:ख मरणास कारणीभूत होते” (II करिंथ 7:10).

ईश्वरप्रेरित दु:ख पवित्र आत्म्याद्वारे होते. त्यानंतर पवित्र आत्मा पश्चाताप, मनाचे नूतनीकरण करतो, जे ख्रिस्तामधील तारणाकडे घेऊन जातो.

यहुदाने पकडून दिल्याबद्दल खेद वाटल्याचा खोटा पश्चाताप केला. “तेव्हां तो शिक्षापात्र ठरविण्यात आला असे पाहून, त्याला धरुन देणारा यहुदा [तो] पस्तावला.” किंग जेम्स पवित्रशास्त्र याची जाणीव करते. त्याने “स्वत: पस्तावा केला.” देवाने तो करविला नाही. ते फक्त मानवी दु:ख होते. “ईश्वरप्रेरित दु:ख [जे] पश्चातापास कारणीभूत होते” ते नव्हते. “ईश्वरप्रेरित दु:ख” जे ख-या मन परिवर्तनास कारणीभूत होते ते नव्हते. ते केवळ स्वत:वरची-कीव होती! केवळ “ऎहिक दु:ख मरणास [कारणीभूत] होते.” त्यामुळे यहुदा “निघून गेला, आणि गळफास घेतला”(मत्तय 27:5).

काईन हा यहुदाच्या प्रकारातील (किंवा चित्र) होते. ख्रिस्ताने यहुदास “नाशाचा पुत्र” म्हटले (योहान 17:12). यहुदा मानवीयरित्या ख्रिस्ताच्या मरणास कारणीभूत होता. “काईन आपला भाऊ हाबेलच्या विरोधात ऊभा राहिला, आणि त्याला मारुन टाकले” (उत्पत्ती 4:8). काईनावरील स्कोफिल्ड टिप्पणी म्हणते, “काईन हा...दैहिक माणसासारखाच... पापाच्या जाणीवेपासून अनभिज्ञ होता, किंवा प्रायश्चिताची गरज असणारा” (द स्कोफिल्ड स्टडी बायबल; उत्पत्ती 4:1 वरील टिप्पणी). काईनाने “ईश्वरप्रेरित दु:ख” कधीहि झाले नाही. काईनाने “तारणासाठी पश्चाताप” कधीहि केला नाही. त्याला फक्त खेद वाटला. काईन म्हणाला, “हा माझा दंड मला सोसवणार नाही इतका भारी आहे” (उत्पत्ती 4:13). स्वत:ची किव! हेच त्याला वाटले. त्याला फक्त “दैहिक दु:ख” झाले. पकडले जाण्याने जे दु:ख झाले त्यापेक्षा अधिक कांही नव्हते. त्याने फक्त स्वत:ची किव येते, यापेक्षा अधिक नाही. त्यामुळे काईन आशाहीन स्थीतीत राहिला. तुम्हापैकी कांहीजन विचार करतील तुम्ही पापाची खात्री पटलेले असे आहात, पण तुम्ही तसे नाही आहात. काईनाप्रमाणे, तुम्हाला फक्त खेद वाटत आहे. स्वत:ची किव येणे म्हणजे पापाची जाणीव होणे नाही! “ऎहिक दु:ख मरणास कारणीभूत होते.”

एसाव हा यहुदाच्या प्रकारातील (किंवा चित्र) होता. यहुदाने तीस रुप्यांच्या नाण्यांसाठी येशू ख्रिस्ताला धरुन दिले, तसे एसावाने एक भाकरी व एक वाटी वरणासाठी आपला जेष्टत्वाचा अधिकार विकला. स्कोफिल्ड टिप्पणी म्हणते, “एसाव दैहिक माणसाचेच प्रतिक दर्शवितो” (ibid, उत्पत्ती 25:25 वरील टिप्पणी). आपण आशिर्वाद गमावला आहे हे जेव्हां एसावला समजले तेव्हा, “तो अति दु:खाने हंबरडा फोडून आपल्या बापास म्हणाला, बाबा, मलाहि आशिर्वाद द्या” (उत्पत्ती 27:34) काईन व यहुदा प्रमाणे, एसाव सुध्दा, “दैहिक दु:खाने” भरला. त्याला “ईश्वरप्रेरित दु:ख कधीहि झाले नाही [ज्यामुळे] तो तारणासाठी पश्चाताप करु शकेल.” त्याला यहुदा प्रमाणे, स्वत:ची किव आणि बोचणी लागली. तसेच यहुदा प्रमाणे, एसाव म्हणाला, “त्यानंतर मी आपला भाऊ याकोब यांस जिवे मारीन” (उत्पत्ती 27:41). इब्रीकरांचे पुस्तक एसावास “ऎहिक वृत्तीचा मनुष्य” म्हणते, “ज्याने एका जेवणासाठी 'आपले जेष्ठपण विकले' त्या एसावासारखे कोणी ऎहिक बुध्दीचे होऊ नये म्हणून ह्याकडे लक्ष द्या. तुम्हांला माहीत आहे की, त्यानंतर तो वारशाने आशिर्वाद मिळविण्याची इच्छा असताहि त्याचा नाकार झाला; त्याने जरी अश्रु ढाळून प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही” (इब्री 12:16-17). त्याने जरी “अश्रु ढाळून मागणी केली तरी, त्याच्यामध्ये खरा पश्चाताप आढळला नाही.” होय, एसावाने अश्रु ढाळले. परंतू ते अश्रु पापाची जाणीव करुन देणारे नव्हते. ते अश्रु स्वत:ची किव येणारे होते. फक्त तुम्ही स्वत:ची किव कराल तर, तुम्हांस पापाची जाणीव होणार नाही. तुम्ही तेच कराल जे “दैहिक दु:ख मरणास करणीभूत ठरते.” आणि तुमचे कधीहि तारण होणार नाही!

माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही कधीहि काईन, एसाव आणि यहुदा सारखे असू नये. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हांस पापाची जाणीव व्हावी. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही कधीहि काईनासारखे असू नये, दैहिक माणसासारखाच... पापाच्या जाणीवेपासून अनभिज्ञ होता, किंवा प्रायश्चिताची गरज असणारा.” माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही कधीहि एसावासारखे असू नये, ऎहिक वृत्तीचा मनुष्य. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही तुमचा जीव दैहिक गोष्टीच्या मागे लागू नये. अशी अपेक्षा आहे की तुम्ही कधीहि यहुदासारखे असू नये, ज्याने कांही चांदीच्या नाण्यांकरिता ख्रिस्ताला धरुन दिले!

दैहिकतेच्या जीवनांतून बाहेर पडा. त्या पापमय व खोट्या धनसंपत्तीमधून बाहेर पडा! पापातून बाहेर पडा, आणि ख्रिस्ताकडे या. जेव्हां देवाचा आत्मा तुम्हांस बोलावितो, आणि तुमच्या अंत:करणावर दबाव व पापाचे ओझे येते, तेव्हां येशूकडे या आणि त्याच्या रक्ताने धुवून शुद्ध व्हा! कायमचा खूप उशीर होण्यापूर्वी, आताच येशूकडे या!

नंतर किती भयंकर न्यायाला सामोरा जाणार, पुन्हा दया तुला मिळणार नाही
   कारण तू आत्मा जाई पर्यंत थांबलास आणि खोळंबलास आणि वाट पाहिलीस;
पस्तावा आणि खेद काय कामाचा, जेव्हां तुला मरणाने आशाहीन केले,
   आत्मा जाई पर्यंत तू थांबलास आणि खोळंबलास आणि वाट पाहिलीस!
(“इफ यू लींगर टू लाँग,” डॉ.जॉन आर. राईस द्वारा, 1895-1980).

माझे सहकारी, डॉ. कागन यांना एक तरुण मनुष्य म्हणाला, “या वेगाने मी कधीहि ख्रिस्ती होणार नाही.” तो बरोबर होता! जोवर तुम्हांस पापाची जाणीव होत नाही तोवर, तुमचे सर्व शिक्षण व प्रार्थना तुम्हांस कांहीच मदत करु शकत नाहीत. त्यानंतरच तुम्ही येशूकडे वळू शकता. एक स्त्री म्हणाली, “मला स्वत:बद्दल पूर्णत: तिटकारा वाटू लागला आहे.” हे तेच “ईश्वर प्रेरित दु:ख होय [जे] तारणास कारणीभूत ठरते.” तिला तिच्या पापी अंत:करणाचा “तिटकारा” वाटू लागल्यानंतर लगेचच, ती स्त्री येशूकडे आली आणि तिला तिच्या पापाची जाणीव झाली. देवाच्या आत्म्याने तुम्हांस तुमच्या पापाचा “पूर्णत: तिटकारा” वाटू द्यावा, आणि तुमचे “तोंड बंद करावे, आणि [तुम्हांस] देवासमोर शिक्षेस पात्र ठरवावे” (रोम 3:19). देवाच्या आत्मा तुम्हांस तुमच्या पापापासून दूर करुन येशूच्या प्राय:श्चिताच्या रक्ताच्याद्वारे तारणाकरिता त्याच्याकडे घेऊन येवो. आमेन.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी पवित्रशास्त्र वाचन मि. नोआ साँग यांनी केले : मत्तय 27:3-5.
उपदेशापूर्वी एकेरी गीत गायन मि. बेंजामिन किनकैड ग्रीफ्फीथ साँग यांनी केले :
“इफ यू लींगर टू लाँग” (डॉ. जॉन आर. राईस द्वारा, 1895-1980).
“If You Linger Too Long” (by Dr. John R. Rice, 1895-1980).


रुपरेषा

यहुदाचा खोटा पश्चाताप

THE FALSE REPENTANCE OF JUDAS

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“तेव्हां तो शिक्षापात्र ठरविण्यात आला असे पाहून, त्याला धरुन देणारा यहुदा पस्तावला, आणि ते तीस रुपये मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला, मी निर्दोष जिवाला धरुन देऊन पाप केले आहे ते म्हणाले, त्याचे आम्हांस काय? तुझे तुच पाहून घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला”
(मत्तय 27:3-5).

(मत्तय 27:1-2)

I.   प्रथम, अगोदरच यहुदाने अक्षम्य पाप केलेले होते. मत्तय 12:31-32.

II.  दुसरे, यहुदाचा “पश्चाताप” हे केवळ “ऎहिक दु:ख” होते.
II करिंथ 7:10; मत्तय 27:5; योहान 17:12; उत्पत्ती 4:8, 13;
उत्पत्ती 27:34, 41; इब्री 12:16-17; रोम 3:19.