Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




विजेता कसे व्हावे!

HOW TO BE AN OVERCOMER!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा,
पास्टर एमिरीट्स
तिमथी लिन, पीएच.डी., माझे 24 वर्षे पाळक असलेले,
यांच्याकडून घेतलेला जीवन-बदलणारा उपदेश.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे प्रभूवारी दुपारी,
26 जुलै, 2020 रोजी दिलेला उपदेश

by Dr. R. L. Hymers, Jr.,
Pastor Emeritus
Adapted from a life-changing sermon
by Timothy Lin, Ph.D., my pastor for 24 years.

A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Afternoon, July 26, 2020

उपदेशापूर्वी गायलेले उपासनागीतः
     “काय वधस्तंभाचा मी सैनिक आहे?” (इस्साक वॅट यांच्याद्वारा, 1674-1748).

“उत्तरवायू जागृत हो; दक्षिणवायू, तूही ये; माझ्या बागेवरुन वाहा, तिचा परिमल पसर. माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीचे फळे सेवन करो” (गीतरत्न 4:16).


मी माझ्या आयुष्यात कलेला सर्वात महत्वाचा उपदेश आहे. तुम्ही माझे आत्मचरित्र वाचाल तर तुम्हांला कळेल की ह्या उपदेशाने माझे जीवन का बदलले. डॉ. रॉबर्ट एल. समनर म्हणाले, “सर्व परिस्थीती विपरीत व विरुद्ध असतांनाही — जो सत्याच्या बाजूने उभे राहतो मी त्याचे कौतुक व सन्मान करतो. आर.एल. हायमर्स, ज्युनि. हे अशाप्रकारचे ख्रिस्ती आहेत” (हा सर्व सन्मान माझा होताः विश्वासाचा हा मोठेपणा ज्याच्या मार्गाने मला पार केले आहे, बिबलीकल इव्हांग्लिझम प्रेस, 2015, पृष्ठे 103-105). इंडोशियातील आमचा एक सुवार्तिक म्हणाला, “डॉ. हायमर्स हे एक नायक आहेत जे पुष्कळ घातक हल्ल्यामधून वाचले आहेत.” हाच तो उपदेश आहे ज्याने मला विजेता होण्यास स्फूर्ति मिळाली. मला आशा आहे की हा उपदेश तुमचे देखील जीवन बदलेल.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +
आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

डॉ. तिमथी लिन म्हणाले, “मानवाला उगाचच बनविले नाही; तर देवाने जी निर्मिती केली त्यावर अधिकार गाजविण्यास विशेषरित्या बनविले आहे...योसेफाचे जीवन हे पुढील अधिकाराची तयारी दरशविते [ख्रिस्ताच्या येणा-या राज्यातील].”

संपूर्ण मिसरावर अधिकारी होण्यापूर्वी, देवाने त्याला विजयी होण्यास व त्याच्या वचनाचे [त्याच्या] जीवनाच्या अंतापर्यंत आज्ञापालन करावे म्हणून तयारी करण्यासाठी कठीण प्रसंगातून जाण्यास भाग पाडले. महान गोष्टी ज्या योसेफाने केल्या त्या केवळ मिसरासंबंधाने, नव्हे तर इस्त्राएलासंबंधाने सुद्धा केलेल्या होत्या, तसेच सर्व युगातील मंडळ्यासंबंधाने सुद्धा होत्या. योसेफाने राज्य केले नसते, तर नुसते इजिप्तच नव्हे, परंतू संपूर्ण इस्त्राएल राष्ट्राचाही नाश झाला असता, आणि उत्पत्तीतील देवाच्या सुटकेचे प्रकटीकरण पूर्ण होऊ शकले नसते.

योसेफाचे आत्मिक जीवन उभारण्यासाठी देवाने ज्या पाय-या केल्या त्या गीतरत्न 4:16 च्या प्रकाशात कदाचित असू शकतात.

“उत्तरवायू जागृत हो; दक्षिणवायू, तूही ये; माझ्या बागेवरुन वाहा, तिचा परिमल पसर. माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीचे फळे सेवन करो” ( गीतरत्न 4:16).

आपण काळजीपूर्वक योसेफाचे जीवन अभ्यासले तर, लक्षात येते की कशाप्रकारे देवाने एकदा उत्तरेचे वारे व एकदा दक्षिणेचे वारे त्याच्यावरुन वाहविला जोवर त्याच्या चारित्र्याद्वारे मसाल्याप्रमाणे सुगंध बाहेर पडत नाही. देवाने दुःखसहनातून त्याचे चारित्र्य, शरीराला कष्ट देऊन, त्याला अपमान व अवहेलना सोसायला लावून त्याची तयारी करवून घेतली आणि त्याला अन्यायग्रस्त व कृतघ्न बनवून निराश केले, यासाठी की त्याच्या मनाची मशागत व्हावी, त्याचा जाणीवपणा स्थापित व्हावा, त्याचा संकल्प, त्याचा विश्वास दृढ व्हावा आणि त्याचे चारित्र्य विकसीत, व त्याचा परमेश्वरावरील विश्वास वृद्धिंगत व्हावा. योसेफाच्या जीवनातील उत्तरेचे वारे व दक्षिणेचे वारे यांचे कार्य आपण स्पष्ट पाहू शकतो.

दक्षिण वारे – आईवडीलांची प्रेम उपभोगतोय

उत्पत्ती 37:1-4 कडे वळा.

“योसेफ कनान देशात वस्ती करुन राहिला: तेथेच त्याचा बापही उपरा म्हणून राहिला होता. याकोब वंशाचा वृत्तांत हा योसेफ सतरा वर्षाचा असताना आपल्या भावांबरोबर कळप चारत असे; तो आपल्या बापाच्या स्त्रीया बिल्हा व जिल्पा ह्यांच्या मुलांबरोबर असे; तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयी खबर आपल्या बापाला दिली. एस्त्राएल आपल्या स्रव मुलांपेक्षा योसेफावरफार प्रीति करत असे. कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता; त्याने त्याच्यासाठी पायघोळ झगा केला होता. आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीति करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करु लागलेव त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले” (उत्पत्ती 37:1-4).

डॉ. लिन म्हणाले, “लेकराच्या भविष्यातील गुणवैशिष्यांसाठी पालकाचे प्रेम याला खूप महत्व आहे...”

“प्राति व दुष्टता यातील फरक योसेफाला ठाऊक होता...प्रीति व सत्य ह्या दोन संवादाच्या कला आहेत, परंतू हे खरी प्रीति व दुष्टता नाही, जे की वेगवेगळ्या वर्गात मोडतात. दुष्टता दिसू नये म्हणून प्रयत्न करणे म्हणजे प्रीति नव्हे, तर तो भ्याडपणा होय...जोवर व्यक्तीचा उद्देश निस्वार्थी आहे, दुष्टता दर्शविणे हे चांगले कार्य आहे आणि त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे....योसेफाच्या दोन्ही स्वप्नातील चित्रण पाहून त्याच्या भावांच्या गर्वास इजा पोहचली आणि त्यांच्यातील द्वेष उफाळून आला; तरीही योसेफ त्याच्या भावांवर प्रीति करी व तो आपल्या बापाचे आज्ञापालन करी.”

मला स्वतःला बापाचे प्रेम मिळाले नाही पण माझ्या आईचे प्रेम व स्विकारहर्ता यामुळे बापाप्रती कटुता निर्माण झाली नाही. माझी आई ही परिपूर्णतेपासून खूप दूर होती, पण “मी माझ्या जीवनात ओळखणा-यांमध्ये ती सर्वात दयाळू, प्रेमळ, हुशार व्यक्ति होती. तिने मला पुस्तकांवर प्रेम करायला, कार चालवायला, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उभे राहायला व काय सांगायचे ते सांगण्यास शिकविले जरी मी एकटा असलो तरी.” (माझ्या आत्मचरित्रातील पृष्ठ 16). अशाप्रकारे माझी आई ही माझी रक्षणकर्ती व मध्यस्ती होती. आईचे माझ्यासाठी शेवटचे शब्द होते, “रॉबर्ट बाळा, माझे तुझ्यावर प्रेम आहे” (पृष्ठ 181). सर्वात शेवटी वयाच्या 80 वर्षी माझ्या आईचे तारण झाले, ती माझ्या जीवनात घडलेली सर्वात मोठी गोष्ट होती.

उत्तर वारे – गुलामगीरीत विकले जाणे –
उत्पत्ती 37:18-36

कृपया उत्पत्ती 37:23-28 आणि उभे राहा व वाचा.

“योसेफ आपल्या भावांजवळ पोहंचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला. आणि त्याला धरुन खड्ड्यात टाकून दिले; तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. मग ते शिदोरी खायला बसले असता, त्यांनी वर नजर करुन पाहिले तेव्हा इश्माएली लोकांचा एक काफला उंटावरुन मसाला, उद व गंधरस लादून गिलादाहून मिसरास जात आहे असे त्यांना दिसले. तेव्हा यहुदा आपल्या भावांना म्हणाला, आपण आपल्या भवाला ठार मारुन त्याचा खून लपविला तर काय लाभ? चला, आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू; आपण त्याच्यावर हात टाकू नये; कारण तो आपला भाऊ हे, आपल्या हाडामांसाचा आहे. हे त्याच्या भावांना पंसत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांना वीस रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला मिसर देशात घेऊन गेले” (उत्पत्ती 37:23-28).

आपण खाली बसू शकता.

डॉ. लिन म्हणाले, “गांभिर्य, आज्ञाधारकपणा, सहनशीलता, विश्वासूपणा, व्यासंगता, विवेकीपणा, आणि ज्ञान हे जीवनात सहजासहजी मिळविता येत नाही, पण कठोर परिश्रम व अडथळ्यांवर मात करुन मिळविता येते. योसेफ हा घरी असता तर तो कधीच [विजेत्या] गोष्टीने भरला नसता. त्याचे अस्तित्व रुप्याच्या 20 नाण्यांना विकल्याने ते पुष्कळांच्या भयंकर आजारास कारणीभूत ठरला. पण योसेफाने आपल्या भावांना दोष अथवा शाप दिला नाही, तरी परंतू कशाप्रकारे देवाने विपरीत परिस्थीतीत त्याची दोन्ही स्वप्ने पूर्ण केली म्हणून तो आश्चर्यचकीत झाला असेल.”

दक्षिण वारे – विश्वास व आदर मिळविणे –
उत्पत्ती 39:1-6

मी वाचत असताना कृपया उत्पत्ती 39:1-6 काढा.

“इकडे योसेफाला मिसरात नेले तेव्हा ज्या इस्माएली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटीफर नावाच्या एका मिस-याने विकत घेतले; तो फारोचा एक अंमलदार असून गरद्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो य़शश्वी पुरुष झाला; तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याच्याबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली; योसेफ त्याची सेवा करु लागला; आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्वकाही त्याच्या ताब्यात दिले. आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्वकाही केले; तेव्हांपासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिस-याच्या घरादाराचे कल्याण केले; त्याचे घरदाराचे कल्याण केले; त्याचे घरदार व शेतीवाडी ह्या सर्वास परमेश्वराने आशिर्वाद दिला. त्याने आपले सर्वकांही योसेफच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई त्यापलीक़डे आपले काय आहे ह्याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसुद व देखणा होता. (उत्पत्ती 39:1-6).

हे पाहा.

फारोचा पोटीफर नावाच्या अधिका-यास योसेफाला विकले होते. योसेफ तक्रार करीत बसण्याऐवजी कामाला लागला व जे त्याला काम गेले ते पूर्ण केले. त्याने आपला धनी, पोटीफराचा विश्वास संपादन केला आणि तो एक यशश्वी व्यक्ति झाला. पण योसेफाला आणखी प्रशिक्षणाची गरज होती. म्हणून देवाने त्याला नम्र होऊ दिले.

उत्तर वारे – मोह व अन्यायाचा सामना करणे –
उत्पत्ती 39:7-20

आता उभे राहून व उत्पत्ती 39:1-18 वाचूया. डॉ. लिन म्हणाले, “त्यांच्या जीवनात जेव्हां उत्तरेचा वारा वाहिला, पुष्कळ तरुण लोकांना वाटते दुःखद गोष्ट वाटते...परंतू अशा प्रकारचा ६स हा देवाच्या कृपेचा साक्षातकार आहे. यिर्मया म्हणाला, ‘मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे’ (विलापगीत 3:27). टक्के टोणपे खाल्याशिवाय तरुण मुलांचे आयुष्य व्यर्थ आहे. पण तरुणपणी वाहिलेला जू हा वरच्या स्तरावर जाण्यासाठी तो पायरी ठरतो.”

“त्यानंतर असे झाले की, योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली, ‘माझ्यापाशी नीज.’ पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला,‘हे पाहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे ह्याचे माझ्या धन्याला भान सुद्धा नाही; आपले सर्वकांही त्याने माझ्या हाती दिले आहे. ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठे वाईट करुन मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करु?’ तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजायला किंवा तिच्याजवळ जायला तो तिचे ऐकेना. एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करायला घरात गेला, त्या वेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही माणूस तेथे घरात नव्हता. तेव्हां तिने त्याचे वस्त्र धरुन म्हटले, ‘माझ्यापाशी नीज.’ पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळआला असे तिने पाहिले, तेव्हां तिने घरातल्या माणसांना बोलावून सांगितले, ‘पाहा, आमची अब्रु घेण्यासाठी त्यांनी हा इब्री मनुष्य घरात आणला आहे; तो माझ्यापाशी निजण्याच्या हेतूने माझ्याजवळ आला तेव्हां मी मोठ्याने ओरडले. मी मोठ्याने ओरडले हे पाहून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून पळून गेला.’ त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने ते वस्त्र आपल्याजवळ राखून ठेवले. तो आल्यावर तिने त्याला असे सांगितले की, ‘जो इब्री दास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझी अब्रु घेण्यास माझ्याकडे आला होता. मी मोठ्याने ओरडले तेव्हां तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.’ (उत्पत्ती 39:1-18).

आपण खाली बसू शकता.

एके दिवशी योसेफ पोटीफराच्या घरी काम करीत होता, त्याच्या पत्नीने त्याला पकडले व तिच्यासोबत निजण्याचा आग्रह केला. पण योसेफ तिच्यापासून सूटून जाण्यासाठी, त्याचे वस्त्र तिच्या हातात टाकले, व तो पळून गेला.

अशाप्रकारच्या मोहापासून पळून जाणे इतर तरुणांना अशक्य आहे, पण योसेफ मात्र त्यावर विजयी झाला. तो तिच्यापासून लगोलग दूर पळून गेला व तो विजयी झाला. काही मोह असे आहेत की ज्याचा सामना केल्यास त्यावर आपण मात करु शकतो, परंतू कांही मोहजसे की लैगिंकता व वासनेच्या केवळ दूर पळून जाऊनच आपण मात करु शकतो (II तिमथी 2:22 म्हणते, “तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ”). योसेफाचा विजय — देवाशी व पोटीफराशी — त्याचा विश्वासूपणा, त्यामुळे त्याच्याकडे आत्मविश्वास होता, व तो स्वतः, इतका निर्मळ असल्याने तो अपवित्र होण्यापासून वाचू शकला. त्या दुष्ट स्त्रीचा पापाचा जू वाहण्यापेक्षा देवाच्या खातर तुरुंगात जाणे त्याने पसंत केले. पोटीफराच्या खातर त्याने स्वतःचा बचाव केला नाही, यासाठी की त्याच्या धन्याच्या पत्नीची बदनामी होऊ नये. त्यामुळे तो शांत राहिला. पोटीफर घरी आला तेव्हां, त्याने त्याच्या पत्नीचा आरोप स्विकारला, आणि योसेफाला त्यामुळे तुरुंगात टाकले.

दक्षिण वारे – बढती व मित्रत्वाचे नाते –
उत्पत्ती 39:21-40:22

उत्पत्ती 39:19-22 काढा. मी वाचत असतांना उभे राहा.

“‘आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले,’ हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हां त्याच्या धन्याने ऐकले तेव्हां त्याचा राग भडकला. योसेफाच्या धन्याने त्याला धरले, आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदिशाळेत त्याला टाकले; तो त्या बंदिशाळेत राहिला. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली, आणि त्या बंदिशाळेच्या अधिका-याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. बंदिशाळेच्या अधिका-याने त्या बंदिखान्यात असलेले सर्व बंदिवान योसेफाच्या स्वाधीन केले; आणि जेथे जे कांही ते करत, ते करवून घेणारा तो असे” (उत्पत्ती 39:19-22).

आपण खाली बसू शकता.

योसेफची शाररित स्थिती अत्यंत खराब झाली होती, तरी त्याची आध्यात्मिक स्थिती मात्र चांगली होती. आणि तुरुंगामध्येही देवाची उपस्थिती त्याला आशिर्वाद देण्यासाठी सतत त्याच्याबरोबर होती.

तुरुंगामध्ये योसेफने निखळ वातावरण तयार केले. फारोचा प्यालेबदार व आचारी, जे दोघेही तुरुंगात होते, ते त्यांना पडलेल्या स्वप्नामुळे त्रस्त होते. त्यांच्या स्वप्नांचा अर्थ त्यांना कोमीही सांगू शकले नाही. योसेफच्या मनांत देव कांही करु शकला. त्याने प्यालेबदार व आचा-याच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला. तीन दिवसांनंतर त्या दोघाच्या स्वप्नाप्रमाणे घडले. त्या प्यालेबदाराला कामावर पुन्हा रुजू झाला, व अचा-याने गळफास लावून घेतला. आणि हे योसेफाचे दक्षिण वारे होय, व जो तुरुंगात सुद्धा होता.

दक्षिण वारे – कृतघ्नता व कंटाळपणा भोगणे –
उत्पत्ती 40:23

उत्पत्ती 40:23 कडे पाहा.

“तथापि प्यालेबदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही; ते त्याला विसरला” (उत्पत्ती 40:23).

योसेफाचा हा दोन वर्षाचा दिर्घकालीन तुरुंगवास हा त्याच्यासाठी भयंकर होता. “तथापि प्यालेबदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही; ते त्याला विसरुन गेला (उत्पत्ती 40:23). प्यालेबदाराची ही वृत्ती त्याची कृतघ्नता दर्शविते. अशी परिस्थिती माणसाला जगाचा द्वेष करण्यास भाग पाडते, परंतू योसेफने तसे केले नाही. कामासाठी देवाची वाट पाहणेचा सद्गुण तो शिकला. योसेफाचा संयम वाढून देवाने कार्य करावे आणि त्याचा देवाशी असलेला विश्वासूपणा अधिक दृढ व्हावा म्हणून देवाने त्याचा तुरुंगवास वाढविला. देवाचा दिरंघाईपणा त्याच्या विजेत्यावर त्याने दर्शविलेली त्याचा अतिरिक्त कृपेचा पुरावा आहे. नंतर दाविद म्हणतो, “परमेश्वराची प्रतिक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतिक्षा कर” (स्तोत्र 27:14).

दक्षिण वारे – राजा म्हणून राज्य करणे –
उत्पत्ती 47:12-31

मी उत्पत्ती 47:12-17 वाचत असतांना आपण उभे राहावे.

“योसेफाने आपला बाप, आपले भाऊ आणि आपल्या बापाच्या घरची माणसे ह्यांना त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे अन्नसामग्री पुरवून त्यांचे संगोपन केले. त्या समयी सर्व देशात अन्न राहिले नाही, कारण दुष्काळ एवढा भारी झाला की त्यामुळे मिसर देश व कनान देश हैरान झाले. मिसर देशातील व कनान देशातील लोकांना विकत घेतलेल्या धान्याच्या मोबदल्यात जेवढा पैसा मला मिळला तेवढा पैसा योसेफाने जमा केला व तो फारोच्या घरी पोहंचता केला. मिसर देशात व कनान देशात कांही पैसा उरला नाही, तेव्हां सर्व मिसरी लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, ‘आम्हांला अन्न द्या, आपल्या देखत आम्ही उपाशी का मरावे? आमचा सर्व सा संपला.’ योसेफ म्हणाला, “तुमचा पैसा संपला तर तुमची गुरे द्या म्हणजे त्यांच्या मोबदल्यात तुम्हांला अन्न देईन.” तेव्हां त्यांनी आपली गुरे योसेफाकडे आणली, त्यांचे घोडे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे व गाढवे घेऊन त्यांच्या मोबदल्यात त्यांना तो अन्न पुरवू लागला; त्यांची सगळी गुरे घेऊन त्याने त्यांना अन्न देऊन त्यांचे पोषण केले” (उत्पत्ती 47:12-17).

आपण खाली बसू शकता.

डॉ. लिन म्हणाले, “कोणतीही शिक्षा जेव्हां ती मिळते तेव्हां ती आनंददायक नसते; ती नेहमी वेदनादायी व दुःखद असते. परंतू जे लोक त्याद्वारे प्रशिक्षित केले आहेत ते नीतिमत्वाचे फळ देतात.” इब्री. 12:11 काढा,

“कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते” (इब्री 12:11).

हे पाहा.

ती दीर्घ दोन वर्षे संपल्यानंतर, देवाने फारोला स्वप्न पाडले ज्यामध्ये आचा-याच्या स्वप्नाचा योसेफने अर्थ सांगितला ते त्याला आठवले. त्या आचा-याने फारोच्या स्वप्नाचा अर्थ फारोस त्याला सांगण्यास सांगितले! सात वर्षे सुकाळ होऊन सात वर्षाचा दुष्काळ पडणार स्वप्नाचा अर्थ असा होता. येणा-या सात वर्षाच्या दुष्काळासाठी फारोने, योसेफाला योजना आखण्यासाठी व ती राबविण्यासाठी नेमले. फारोने पाहिले की हे काम करण्यासाठी योसेफाकडे अलौकीक वरदान आहे. अशाप्रकारे योसेफाला अवघ्या मिसर देशावर राज्य करण्यास नेमले (41:38-43). योसेफने विद्वत्तापूर्ण व दयाळूपणे मिसरावर राज्य केले — आणि आपल्या भावांवर शिस्तीने व प्रेमाने राज्य केले. शेवटी देवाने योसेफचा त्याच्या भावांपेक्षा अधिक सन्मान केला (49:26).

डॉ. लिन म्हणाले, “जसे देवाने योसेफला जगीक राज्य चालविण्यासाठी प्रशिक्षित केले, तसेच देव त्याच्या विजेत्यांना त्याच्या आगामी राज्यात अधिकार चालविण्यासाठी प्रशिक्षित करतो. तारण हे विनाअट असते, तो कोणत्याही कर्माने येत नाही. परंतू त्याच्या आगामी राज्यात ख्रिस्ताबरोबर राज्य करण्यासाठीची ही अट आहे.” पवित्रशास्त्र म्हणते,

“जर आपण धीराने सोसतो [भोगतो], तर त्याच्याबरोबर राज्यही करु” (II तिमथी 2:12).

पास्टर रिचर्ड वुरब्रँड यांनी 14 वर्षे कमुनिष्टांचा तुरुंगवास सहन केला. पास्टर वुरब्रँड म्हणाले, “माझ्या ओळखीचा असा एकही ख्रिस्ती नाही जो विपरीत परिस्थितीत विश्वासू राहिला आहे आणि जो आंतरिक संघर्षातून सहीसलामत बाहेर पडला आहे” (प्रस्तावना “जर तुरुंगाची भिंत बोलू लागली”).

पुन्हा, पास्टर वुरब्रँड आज म्हणाले, “माझ्या प्रिय बंधू भगिनानो, तुमचे जीवन हे देवाच्या हातातील चिखलाप्रमाणे आहे असा विश्वास ठेवा. तो कधीच चूक करीत नाही. तो एखाद्या वेळेस तुमच्याशी कठोर वागला तरी...विश्वास ठेवा. असा उपदेश शोधा जो तुम्हांस घडवितो. आमेन.” (पृष्ठ 16).

तुम्ही योसेफाप्रमाणे विजयी झाला, तर तुम्हांसाठी देवाचे हे अभिवचन आहे. प्रकटीकरण 2:26 काढा.

“जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करत राहतो त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन” (प्रकटीकरण 2:26).

आपले आभार, डॉ. तिमथी लिन, आम्ही उपदेशात जे काही ऐकले, ते आम्हांस शिकविल्याबद्दल. प्रिय पास्टर, त्याने माझे जीवन बदलले. या शिक्षणाप्रमाणे मी माझे जीवन देऊन टाकतो!

कृपया उभे राहा व आज हे गीत गा, “काय मी वधस्तंभाचा सैनिक आहे?”

काय मी वधस्तंभाचा सैनिक, कोक-याचे अनुसरण करणारा आहे;
आणि त्याच्या स्वतःच्या करिता मी भिऊ काय, किंवा नाव ला.ला लाजू काय?

सोप्या फुलाच्या बिछान्यावर बसून मी आकासात भरारी घ्यावी काय,
जेव्हां दुसरे जिंकण्यासाठी लढत, व रक्तबंबाळ समुद्रातून नाव वल्हवत असतील?

मला सामना करण्यास शत्रू नाहीत काय? मी रक्ताचा घटक असू नये काय?
ह्या दुष्ट जगात कृपेचा कोण मित्र आहे, देवासाठी मला मदत करणारा कोणी आहे?

खरोखर मला लढले पाहिजे, मला राज्य करावयचे आहे; तर माझे धैर्य वाढव, प्रभू!
मी परिश्रम करीन. वेदना सहन करीन, ह्या जगाने मदत केली.
   (“काय मी वधस्तंभाचा सैनिक आहे?” डॉ. इस्साक यांच्या द्वारा, 1674-1748).

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

जर तुमचे तारण झाले नाही, मला वाटते मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेऊ इच्छितो. तो स्वर्गातून खाली तुमच्या आमच्या पापाची किंमत मोजावयास आला. ज्या क्षणी तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवाल, त्या क्षणी त्याचे रक्त तुमचे सर्व पाप शुद्ध करील. तुम्ही येशूवर विश्वास ठेवावा म्हणून प्रार्थना करतो.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.