Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.



उपदेशापूर्वी उपासना गीत गायलेः “काय मी वधस्तंभाचा सैनिक आहे?” (डॉ. आयजक वॅट्स यांच्याद्वारा, 1674-1748).


ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला!

CRUCIFIED WITH CHRIST!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा,
पास्टर एमिरीट्स
by Dr. R. L. Hymers, Jr.,
Pastor Emeritus

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे प्रभूवारी दुपारी,
17 मे, 2020 रोजी दिलेला उपदेश
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Afternoon, May 17, 2020

“मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जिवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरिता दिले” (गलती. 2:20).


“खिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेले” असणे म्हणजे काय? याचा अर्थ असा की आम्ही त्या भयंकर अंधा-या रात्रीच्या जीवातून जायला हवे असे मला वाटते. आम्हांला आमच्या पापाची, नियमशास्त्राच्या फटक्याची, खिळ्यांची जाणीव झाली पाहिजे, ख्रिस्ताबरोबर मेलेले−ख्रिस्ताच्या मरणाबरोबर, तसेच पुनरुत्थानाबरोबर जोडलेले असण्याची जाणीव झाली पाहिजे.

पास्टर रिचर्ड वुरब्रँड यांनी दोन वर्षे निर्जनस्थळी स्थानबद्धतेत कारावासाची शिक्षा भोगली तेव्हां त्यांनी ख्रिस्ताबरोबर खिळले जाण्याचा अनुभव घेतला. त्यांचे पुस्तक, इन गॉड्स अंडरग्राऊंड मध्ये, ते कशाप्रकारे ख्रिस्ताबरोबर खिळले हे स्पष्ट केले आहे. वुरब्रँड म्हणाले,

     ह्या विभागात मला दोन वर्षे निर्जनस्थळी स्थानबद्धतेत ठेवले होते. माझ्याकडे वाचण्यास व लिहण्यास काहीच साहित्य नव्हते; माझ्याबरोबर केवळ माझे विचार सोबतीला होते, आणि मी ध्यानस्त मनुष्य नव्हतो, परंतू माझा जीव शांत बसण्यास कधीच नव्हता.
     काय माझा देवावर विश्वास आहे? आता परिक्षेचा काळ होता. मी एकाकी होतो. कमाईसाठी पगार नव्हता, समजून घेण्यास सुवर्ण मते नव्हती. देवाने मला केवळ दुःख भोगायला दिले−तरीहि मी त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे होते का?
     हळूहळू मी शिकलो की त्या शांततेच्या झाडावर शांतीच्या फळाला लटकविले होते...मला कळून चुकले की येथे [निर्जनस्थळी स्थानबद्धतेत] सुद्धा माझे विचार व भावना ह्या देवाकडे वळल्या, आणि त्यानंतर मात्र मी रात्री मागून रात्र प्रार्थनेत, आध्यात्मिक कसरतीत, आणि स्तवनात व्यतित करु लागलो. आता मला ठाऊक होते की मी अभिनय−करीत नव्हतो. मी विश्वास ठेवला! (इन गॉड्स अंडर ग्राऊंड, पृष्ठ 120).

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

“खिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेले” असणे म्हणजे काय? याचा अर्थ असा की आम्ही त्या भयंकर अंधा-या रात्रीच्या जीवातून जायला हवे असे मला वाटते. आम्हांला आमच्या पापाची, नियमशास्त्राच्या फटक्याची, खिळ्यांची जाणीव झाली पाहिजे, ख्रिस्ताबरोबर मेलेले−ख्रिस्ताच्या मरणाबरोबर, तसेच पुनरुत्थानाबरोबर जोडलेले असण्याची जाणीव झाली पाहिजे.

ब-याचदा माझासारखा मनाचा कठीण माणसाने पूर्णतः समर्पण व “खिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेले” असण्यापूर्वी पुष्कळदा यातून जायलाच हवे. मी माझ्या वयाच्या ऐंशीव्या वर्षात असलो तरी, हे सत्य समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करीत आहे.

प्रथम मी हे सत्य ह्या चीनी मंडळीत राहून शिकायला सुरुवात केली, जेथे कित्येक दशके एक “बहिस्त” असा होतो. मी सोडून जावेसे वाटे, परंतू देवाने मला सोडून जाऊ दिले नाही. त्याने मला अगदी स्पष्टपणे सांगितले की इब्री 10:25 व पवित्रशास्त्रातील कांहीही सोडू नको. अशाप्रकारे मी “खिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेले” राहण्यास सुरुवात केली.

पुढच्या वेळी माझी मरीन कौंटी येथील सदर्न बाप्टिस्ट सेमीनरीमध्ये परिक्षा झाली होती. लोक माझा तिरस्कार करीत कारण जवळजवळ सर्व प्राध्यापक पालट न झालेले मुक्तवादी होते ज्यांनी जवळजवळ सगळ्या वर्गातील पवित्रशास्त्र फाडून टाकले होते. माझा तेथे तिरस्कार केला जात असे, पण पुन्हां, देवाने मला सांगितले की, मला कांही वाटो तेथेच राहा. मध्यरात्रीच्या नंतर, सेमीनरीतील माझ्या खोलीत, देवाने मला त्या रात्री हाक मारली. एका “स्थिर, हलक्या आवाजात” देव मला म्हणाला, “आज पासून पुढे पुष्कळ वर्षे तू ह्या रात्रीचा विचार करशील व लक्षात ठेवशील की तू म्हतारा होशील तेव्हां तुझे मुख्य कार्य सुरु होईल...भ्यायचं नाही हे तू आता शिकशील...मी तुझ्याबरोबर असेन...तू हे सांगणार नाही तर कोणीही सांगणार नाही, आणि हे अगदी कळकळीने सांगितले पाहिजे – आणि दुसरे ते सांगण्यास घाबरले पाहिजेत, म्हणून तू हे सांगणार नाहीस दुसरे तर कोणीही हे सांगणार नाही, किंवा किमान ते चांगल्याप्रकारे सांगणार नाहीत.”

त्यानंतर तेते माझे उपदेश शास्त्राचे प्राध्यापक डॉ. गॉर्डन ग्रीन होते, ते मला म्हणाले, “हायमर्स तूं एक चांगला, एक सर्वोत्तम उपदेशक आहेस. पण...तू त्रास देण्याचे थांबविले नाही तर तूं कधीही सदर्न बॅप्टिस्ट मंडळीचा पाळक होणार नाहीस.” मी त्यांच्या डोळ्यात पाहिले व म्हणालो, “त्याला एवढी किंमत मोजावी लागत असेल तर ते मला नको आहे.” आता मला गमाविण्यासारखे कांही नाही (अगेन्स्ट ऑल फिअर, पृष्ठ 86).

त्यानंतर मी खाली लॉस एंजिल्स येथे आलो व मंडळीची सुरुवात केली. त्यानंतर क्रिगटनने ह्या मंडळीत फूट पाडली कारण तो माझ्याशी “सहमत नव्हता.” काय तो माझ्याशी सहमत नव्हता ना? वेगवेगळ्या मुद्द्यांवरच्या माझ्या बेधडक मतांशी तो सहमत नव्हता, त्या मुळे तो माझ्याशी सहमत नव्हता! तो एका “उंदरा सारखा” छोटा मनुष्य आहे, देवाच्या सत्यासमोर उभे राहण्यास घाबरणारा होता! लहानशा उंदरा, निरोप घेतो!

आता, माझ्या 80 व्या वर्षी, मला कळून चुकले की एका संदेष्ट्यात्मक आवाजात त्याच्याकरिता ह्या विश्वास त्यागाच्या शेवटच्या-काळात देव माझी तयारी करीत आहे. (II थेस्सल. 2:3).

तुम्ही वर उचलले जाल असे जेव्हां इतर लोक मला म्हणतील, तेव्हां मी त्यांना म्हणेन की तुम्हांला बहुतांशी महासंकटातून जावे लागणार, जसे की मार्विन जे. रोसेंथल त्यांच्या द प्रि-व्रॅथ राप्चर ऑफ द चर्च ह्या पुस्तकात म्हणतात. त्याचवेळी इतर, जसे की क्रिगटन, तुम्हांला नव्या-सुवार्तिकवादात ओढू पाहतील, मी म्हणेन, “ख्रिस्ताकरिता दृढ उभे राहा – कांही झाले तरी हरकत नाही.”

मी जॉन सॅमुएलचा द्वेष करीत नाही. मला कळून आले की ह्या शेवटच्या काळात तो भविष्यात्मक वाणी सांगण्याएवढा समर्थ नाही. माझ्याबरोबर राहिला असता तर तो “कोसळण्याची व जळण्याची” त्याला भीति होती. हे अशामुळे की जॉन सॅमुएल हा अजूनही “ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला” नाही. मी स्वतः कित्येक वेळा “कोसळलो व जळलो” आहे पण त्यामुळे मी घाबरलो नाही!

मी ह्या शेवटच्या काळात खंबीर असायला हवे यासंबंधाने जो उपदेश देतो तो डॉ. कागन यांना आवडते असे ते मला नेहमी सांगतात. माझ्यासाठी हे प्रोत्साहन अधिक पुरेसे आहे! ह्या विश्वास त्याग होण्याच्या काळात तुम्ही “ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला” असाल तर माझ्याशी व डॉ. कागन यांच्याशी सहमत होणार (II थेस्सल. 2:3), आणि पास्टर वुरब्रँड यांच्याप्रमाणे, तुम्ही गौरवी रक्तसाक्षी – किमान गौरवी पाप कबुली देणारे व्हाल!

“मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जिवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरिता दिले” (गलती. 2:20).

डॉ. तिमथी लिन, त्यांच्या द किंगडम ऑफ गॉड या पुस्तकात ते म्हणतात, “सध्या पुष्कळ मंडळी सदस्य देवाची वाणी ऐकू इच्छित नाहीत कारण सर्वांपेक्षा ते स्वतःवर प्रेम करतात...त्यांचे ह्दय कठीण झालेले आहे, आणि अशाप्रकारे ते जेवढे शिकतात तेवढे ते ऐकीत नाहीत. पुष्कळांना वाटते त्यांना सगळे माहित आहे, त्यामुळे ते पुष्कळ मूल सत्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यातील पुष्कळांना आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे हेही सांगू शकत नाहीत!” डॉ. ए.डब्लू. टोझर हे उदाहरण देतात.

   एखाद्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला विचारा, “बॉब, तूं येथे का आहेस?”
   “मला लग्न करायंचय; मला पैसा कमवायचाय; आणि मला पर्यटन करायला आवडते.”
   “परंतू, बॉब, ह्या सगळ्या क्षणभंगूर गोष्टी आहेत. त्या तू मिळविणार आणि म्हातारा होऊन तुझे निर्वाण होणार. तुझ्या जीवनाच्या मुख्य उद्देश काय आहे?”
   मग बॉब कदाचित म्हणेल, “मला ठाऊक नाही की माझ्या जीवनात आणखी काय उद्देश आहे.”
   पुष्कळ लोकांना त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देशच ठाऊक नाही (“मनुष्याचा उद्देश,” पृष्ठ 27).

ख्रिस्ती लोक म्हणतील स्वर्गात जाणे हे त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे. परंतू, डॉ. लिन यांनी वारंवार सांगितलेले आहे की पवित्रशास्त्रात असे कोणतेच वचन नाही जे स्वर्गात जाणे हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे असे आपणांस सांगते!

तुम्हांला तुमच्या जीवनाचा उद्देश काय असायला हवा हे दाखविण्यासाठी, II तिमथी. 2:12 पाहा. 12 व्या वचनातील पहिला अर्धा भाग वाचा,

“जर आपण धीराने सोसतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करु...”

“सोसणे” म्हणजे “दुःख सोसून टिकून राहणे.” प्रकटीकरण 20:6 म्हणते, “ते दवाचे व ख्रिस्ताचे ‘याजक’ होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.” “सोसणे” ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे “दुःख सोसून टिकून राहणे.” II तिमथी. 2:12 चा संदर्भ हा II तिमथी. 2:1-11 मध्ये दिलेला आहे. स्कोफिल्ड मध्ये वचन 1 बरोबर सांगते, “विश्वास त्यागाच्या काळात ‘चांगल्या सैनिकाचा’ मार्ग.” लुक 19:11-27 मधील दहा मोहरांच्या दाखल्या मध्ये ख्रिस्ताबरोबर राज्य करण्यांसबंधाने स्पष्ट सांगितले आहे. जे ख्रिस्ताबरोबर राज्य करण्याची तयारी करतात त्यांना “दहा नगरांवर अधिकार” (वचन 17) किंवा “पाच नगरांवर अधिकार” दिला जाईल (वचन 19). डॉ. लिन म्हणतात हे अगदी असेच घडणार. जे ह्या जीवनात दुःख सोसतील ते ख्रिस्ताबरोबर त्याच्या येणा-या राज्यात राज्य करतील! शब्द “सोसणे” म्हणजे “दुःख सोसून टिकून राहणे.”

मग आम्हांला काय सोसावे लागणार? जगावर न प्रेम करता आम्हांला हे सोसायचे आहे,

“जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीति करु नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही. कारण जगात जे सर्व आहे तो, म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, जगापासून आहेत; आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो” (I योहान 2:15-17).

फूट पडलेली मंडळी न सोडून जाता आपण तग धरतो,

“आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते, ते आपले असते तर ते आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून निघाले” (I योहान 2:19).

खोट्या शिक्षकांच्या मागे न जाता आपण तग धरतो,

“प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरु नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परिक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगांत उठले आहेत” (I योहान 4:1).

देवाला आवडणा-या गोष्टी करुन आपण तग धरु शकतो,

“आणि आपण जे कांही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करितो” (I योहान 3:22).

देवाच्या आज्ञा पाळून आपण तग धरतो,

“आणि आपण जे कांही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करितो. त्याची आज्ञा ही आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावांवर आपण विश्वास ठेवावा; आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीति करावी” (I योहान 3:22, 23).

आपल्या शिक्षकांच्या अधीन राहून आपण तग धरतो,

“जे तुमचे अधिकारी होते ज्यानी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्याची आठवण करा; त्यांच्या वर्तुणूकीचा परिमाण लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. आपल्या अधिका-याच्या आज्ञेत राहा त्यांच्या आज्ञेत राहा व त्याच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवाची राखण करितात, ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही” (इब्री.13:7, 17).

“प्रभूच्या कार्यात सतत व्यस्त” − अढळ राहून आपण तग धरतो!

“म्हणून माझ्या प्रिय बंधूनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहां; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा” (I करिंथ. 15:58).

अशाप्रकारच्या गोष्टी सोसल्याने, शिष्य होण्यास देव आम्हांस प्रशिक्षित करतो, जो ख्रिस्ताबरोबर त्याच्या येणा-या राज्यात राज्य करील.

“जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन... आत्मा मंडळ्यास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको” (प्रकटीकरण 3:21, 22).

पास्टर वँग मिंग डाओ (1900-1991) यांनी त्याच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे, 22 वर्षे कमुनिष्ट चीनच्या तुरुंगात व्यतित केली. ते म्हणतात,

“कांहीनी मला विचारले सध्या कोणत्या मार्गाने मंडळीने मार्गक्रमन करावे. मी प्रश्नविना उत्तर दिले, प्रेषितांचा मार्ग...मरेपर्यंत विश्वासू राहण्याचा.” त्यानी डॉ. जॉन संग यांच्या प्रेतक्रियेच्या उपासनेत उपदेश दिला. कारावासात त्यांनी त्यांचे सर्व दात, त्यांची श्रवणशक्ति आणि त्यांची दृष्टि सुद्धा गमाविली. नंतर कारावासातून सुटल्यावर, 1991 मध्ये म्हणजे मरेपर्यंत त्यांनी व त्यांच्या पत्नीने ख्रिस्ती गटांना शिक्षण दिले.

कृपया उभे राहा व आपले उपासना गीत गा,

मी वधस्तंभाचा सैनिक, कोक-याला अनुसरणारा आहे का;
आणि मला परमेश्वराची भीति, किवा त्याचे नाव सांगण्यास लाज वाटते का?

इतर बक्षिसे जिंकण्यास लढले, आणि रक्तरंजित समुद्रातून पार गेले,
तेव्हां मला सहज फुलांच्या बेडवर असलेल्या आकाशाकडे नेणे आवश्यक आहे का?

मला मुकाबल्यासाठी तेथे शत्रू नाही का? मी पूर थांबवू नये का?
देवाच्या वतीने मदत करण्यास, हे वाईट जग कृपा करणारा मित्र आहे का?

मी राज्य करतो तर, मी खात्रीने लढले पाहिजे; प्रभू, माझे धैर्य वाढीव!
तुझ्या वचनाच्या मदतीने, हे कष्ट सहन करीन, वेदना सहन करीन.
   (“एम आय अ सोल्जर ऑफ द क्रॉस? डॉ. आयझॅक वॅट्स यांच्याद्वारा, 1674-1748).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.