Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




भविष्यकाळच्या गोष्टी — नवीन वर्षाचा उपदेश

THINGS TO COME –A NEW YEAR’S SERMON
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे प्रभूवारी सकाळी,
5 सप्टेंबर, 2020 रोजी दिलेला उपदेश
by Dr. R. L. Hymers, Jr.
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, January 5, 2020

“भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे; आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे” (I करिंथ. 3:22-23).


“भविष्यकाळच्या गोष्टी.” ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही त्यांच्यासाठी हे घाबरंवणारे शब्द आहेत! “भविष्यकाळच्या गोष्टी.”आपल्या सभोवतालचे लोक भीत व थरथर कापत भविष्याला सामोरे जातात! त्यांना खूप दुःख व आशाहीनता होते.

टेलीविजन, व इंटरनेट उदय झाल्यामुळे, जग-भरातील दुःखद घटना, युद्ध, आतंकवाद, मरण आणि विनाशाच्या घटना दररोज घरबसल्या पाहायला मिळतात. आपण खून खराबा पाहातो. आपण बाँब वर्षाव पाहातो. आपण आतंकवाद्यांनी केलेला रक्तपात पाहातो. बलात्कार, हल्ला, लुटालुट, उपासमार, छळ लगोलग आपल्या डोळ्यासमोर येतो. या जगामध्ये एवढी सोपी माहिती कधीही मिळाली नाही. आपण पाहातो की त्यांनी हे फक्त वाचले. आपण जग-भरातील आपत्ती बातम्यांमध्ये दररोज पाहातो त्यामुळे आपला ताणतणाव, चिंता व भीति वाढते. मला वाटते या आधुनिक अणुकीय दूरसंचार यासंबंधी ख्रिस्ताला आगाऊच ठाऊक आहे. तो जगा-तील “दुःख” व “गोंधळ” याविषयी बोललेला आहे (लुक 21:25) यासह,

विमाने पळविली जातात. इमारती उडवून दिल्या जातात. माथेफिरुंच्या हाती बाँब आले आहेत ते त्याचा वापर कधीही करु शकतात. विख्यात शास्त्रज्ञ, व मोठे राजकीय पुढारी, आपल्या पुढे पडलेल्या वैश्विक तापमान वाढ याच्या धोक्यासंबंधी इशारा देतायत. हसू नका! होय, “भविष्यातील गोष्टीं” विषयीच्या वचनांनी हजारोनां भयभीत केलेले आहे. जसे की ख्रिस्ताने सांगितले, “भयाने व जगावर कोसळणा-या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसें मरणोन्मुख झाली [आहेत].”

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

दूरदर्शनवरील ह्या भयंकर चित्राहून सर्वात भयंकर स्थितीला वॉशिंग्टन सामोरे जातेय जी मी कधीही पाहिली नव्हती! पुष्कळ राजकीय लोकांनी आपली मानसिक स्थिती हरपलेली आहे! विशेषतः लोकशाहीने!

यात आणखी भर म्हणून हे सत्य आहे की आमची कुटुंबे दुभंगलेली आहेत, सर्रास घटस्फोट होतायत, आणि ढासळलेल्या समाज व्यवस्थेमुळे आमची मुले विखुरलेली, गोंधळलेली व वाम मार्गाकडे वळलेली आहेत. या पीढीतील एक तृतियांश—60 लाखाहून अधिक बालकांची गर्भातच हत्या होतेय! अमेरिकेतील विघातक रक्तपात आणि “कायदेशीर” गर्भपाताचा नरसंहार यामुळे अमेरिकन आफ्रिकी सात मुलांपैकी चार मुलांचे आयुष्य संपतेय. अशाप्रकारे, लाखो स्त्रीयांच्या गर्भावर आतंकवाद्यांच्या चमुचा हल्ला होत आहे. कोणतीही जागा सुरक्षित राहिलेली नाही! लपायला जागा राहिली नाही! प्रसिद्ध आयरिश कवी विलियम बटलर यीट्सने आपली कविता “दुसरे आगमन” यात हे सर्व कथन केले आहे:

गोष्टी खाली पडतात; केंद्र धरु शकत नाही;
जगावर केवळ अनागोंदी माजलेली आहे,
रक्ताचा-अंधकारमय पूर आलेला, आणि सर्वत्र आलेला आहे
निष्पापांचा सोहळा बुडविला गेला आहे;
सर्वत्र चांगल्याचा खात्रीने अभाव, सर्वात वाईटपणा असतांना
उत्कट तीव्रतेने पूर्ण भरलेले आहेत...

वॉशिंग्टनमध्ये मंडळीसंबंधाने सुवर्ण पदक मिळाल्यानंतर, बिली ग्रॅहम म्हणाले, “आपला हा समाज स्व-नाशाच्या टोकावर बसलेला आहे” (लॉस एंजिल्स टाईम, 3 मे, 1996, पृष्ठ A-10). लोकांना कोणतीही जागा सुरक्षित वाटत नाही! आम्ही दररोज दूरदर्शन व इंटरनेटवर जे भयंकर विनाश पाहातो त्यापासून लपण्यासाठी जागा नाही हे त्यांना समजले आहे. “भविष्यात होणा-या गोष्टीं” मुळे भीतीने व धास्तीने त्यांची अंतःकरणे भरुन जातील!

परंतू आपला उतारा जे पापात हरविलेले आहेत त्यांच्यासाठी नाही. ज्यांचे अगोदरच परिवर्तन झालेले आहे त्यांच्यासाठी लिहले आहे. 21 व्या वचनात, पौल म्हणतो, “सर्वकांही तुमचे आहे.” 22 व्या वचनांत ख-या ख्रिस्ती जणांविषयीच्या गोष्टींची यादी दिली आहे. त्या यादीच्या शेवटी, तो म्हणतो, “भविष्यकाळच्या गोष्टी; त्या सर्व तुमच्या आहेत” (I करिंथ. 3:22). तुम्ही खरे ख्रिस्ती असाल तर, भविष्य तुमचेच आहे!

“भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकांही तुमचे आहे” (I करिंथ.3:22).

I. पहिले, ख्रिस्तीत्वाचा विजय हा तुमचा आहे!

येशू म्हणाला,

“ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही” (मत्तय 16:18).

सुवार्तिकाचे राजकुमार सी. एच. स्पर्जन म्हणाले,

जसे आपण पाहातो...राजकीय परिस्थिती, अंधकारमय व भयावह आहे असे वाटते. ढग इकडे तिकडे जमले आहेत; स्वतः मंडळीच्या देवासंबंधाने आपण धास्ती घेतो, संकटात, दगड चुरा होऊन पडण्यामध्ये, सुरक्षितता वाटू लागते तेव्हां. परंतू मंडळीचा विनाशावर बदललेल्या कोणत्याही राजघराण्याचा परिणाम होत नाही. प्रत्येक संकटाचा इतिहास, प्रत्येक क्षोभाची स्थिती, प्रत्येक आपत्ती जी जगावर आली, त्या प्रत्येकात मंडळी विजयी झालेली आहे...राष्ट्रीय दिवाखोरीत, [ख्रिस्ताच्या] मंडळीने संपत्ती जमा केली. (सी. एच. स्पर्जन, “भविष्यातील गोष्टी! संताचे वतन,” स्पर्जनच्या उपदेशाच्या पुढे आवृत्ती 63, डे वन प्रकाशन, 2009, पृष्ठ 341-342).

ब्रिटीश साम्राज्य डळमळीत झाले व खाली पडले, पण ख्रिस्तीत्व मात्र तेथील जुन्या वसाहतीमध्ये फळलं फुललं. देवाने-पाठविलेल्या संजीवनाच्या भरतीने लाखो लोक मंडळ्यांत सामील झाले! जसे की अमेरिकी “साम्राज्य” डळमळीत होऊन पडण्याच्या टोकावर आहे, देवाच्या सार्वभौम सामर्थ्याने तिस-या जगातील दहा हजार लोक ख्रिस्ताच्या कवेत आले! आणि, आज रात्री मी बोलतो की, येशूची भविष्यवाणी अथकपणे त्याच्या पूर्णतेकडे नेत आहे,

“सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हां शेवट होईल...” (मत्तय 24:14).

“मुकुट व काटें नष्ट होतील.” हे गीत गाऊया!

मुकुट व काटे नष्ट होतील, राज्य उदय पावेल व नष्ट होईल,
   पण येशूची मंडळी मात्र कायम राहील;
अधोलोकाच्या द्वारांचे त्याच्यापुढे काहीएक चालणार नाही;
   स्वतः ख्रिस्ताचे अभिवचन; व ते कधीही निष्फळ होणार नाही.
ख्रिस्ती सैनिक, पुढेपुढे चालले, चालले युद्धभूमीकडे,
   येशूच्या वधस्तंभासह त्याला सामोरे जाऊ!
(“ख्रिस्ती सैनिक पुढेपुढे चालले” सविन बारींग-गुल्ड यांच्याद्वारा, 1834-1924).

मंडळी, आता लढाऊ आहे, लवकरच मंडळीचा विजय होईल! लवकरच देवदूतांचा नाद मोठ्याने होईल,

“जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील’” (प्रकटीकरण 11:15).

“भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकांही तुमचे आहे” (I करिंथ.3:22).

II. दुसरे, येणारे ख्रिस्ताचे राज्य हे तुमचे आहे!

येशू म्हणाला,

“जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील” (मत्तय 5:5).

पुन्हां येशू म्हणाला,

“हे लहान कळपा,, भिऊ नकोस; तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे” (लुक 12:32).

अमेरिकेत व संपूर्ण जगात ख्रिस्ती लोकांची थट्टा केली जाते व त्यांना कमी लेखले जाते. तिस-या जगतात तर ख्रिस्ती लोकांचा त्यांच्या विश्वासामुळे छळ केला जातो, तुरुंगात टाकले जाते व कित्येकदा त्यांची हत्या केली जाते. आपले पतन होईल असा आपल्या काळातील संशयवादी व मानवतावादी विचार करतात. पण ते अगदीच चुकीचे आहेत! पवित्रशास्त्र म्हणते,

”जर आपण धीराने सोसतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करु” (II तिमथी 2:12).

जेव्हां त्याचे राज्य या पृथ्वीवर येईल! मग आपण ख्रिस्तासाठी गीत गाऊ,

“...कारण तूं वधला गेला होतास आणि आफल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यांना राज्य व याजक केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील” (प्रकटीकरण 5:9-10).

तुमच्या गीत पत्रिकेतील, गीत क्रंमांक 2 गाऊया, “अधारी रात्र होती.” ते गाऊया!

अंधारी रात्र होती, पाप आमच्याशी लढले आहे;
   दुःखाचा मोठा भार आम्ही वाहिला आहे;
परंतू आता तो पुन्हां येण्याची चिन्हे आम्ही पाहात आहो;
   आमचे अंतःकरण आतून उल्हासले आहे,
आनंदाचे पात्र भरुन वाहत आहे!
   तो पुन्हा येत आहे, तो पुन्हा येत आहे,
तोच तो येशू, ज्याला मनुष्यांनी नाकारले;
   तो पुन्हा येत आहे, तो पुन्हा येत आहे;
मोठ्या सामर्थ्याने व गौरवाने, तो पुन्हा येत आहे!
(“तो पुन्हा येत आहे” माबेल जॉन्सन कॅँप यांच्याद्वारा, 1871-1937).

पुन्हा एकदा गा!

अंधारी रात्र होती, पाप आमच्याशी लढले आहे;
   दुःखाचा मोठा भार आम्ही वाहिला आहे;
परंतू आता तो पुन्हां येण्याची चिन्हे आम्ही पाहात आहो;
   आमचे अंतःकरण आतून उल्हासले आहे,
आनंदाचे पात्र भरुन वाहत आहे!
   तो पुन्हा येत आहे, तो पुन्हा येत आहे,
तोच तो येशू, ज्याला मनुष्यांनी नाकारले;
   तो पुन्हा येत आहे, तो पुन्हा येत आहे;
मोठ्या सामर्थ्याने व गौरवाने, तो पुन्हा येत आहे!

तुमचे परिवर्तन झाले आहे, तर येणारे ख्रिस्ताचे राज्य तुमचे आहे!

“भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकांही तुमचे आहे” (I करिंथ.3:22).

III. तिसरे. नवे आकाश व नवी पृथ्वी ही तुमची आहेत!

हे जुने जग नाहिसे होणार आहे! ख्रिस्त या जगावर एक हजार वर्षे राज्य करणार त्यावेळी, सैतानाला कैदेतून बंधमुक्त केले जाणार व तो अविश्वासणा-यांस त्याच्याविरुद्ध बंड करायला भाग पाडणार. (प्रकटीकरण 20:7-9). मग देवाच्या कोपाचा अग्नी स्वर्गातून खाली येणार. (प्रकटीकरण 20:9).

“... त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टीतत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील....त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीतत्त्वे तप्त होऊन वितळतील” (II पेत्र 3:10, 12).

परंतू कधीही निराश होऊ नका, कारण प्रेषित योहान आपल्या दृष्टांतात म्हणाला,

“नंतर मी ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हां मी ‘पवित्र नगरी, नवी येरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरतांना पाहिली” (प्रकटीकरण 21:1-2).

जेव्हां देव नवे आकाश व नवी पृथ्वी तयार करील, तुम्ही तेथे नव्या यरुशलेमेमध्ये असणार – जर तुम्ही खरे ख्रिस्ती असाल! होय तुम्ही तेथे देवाच्या बागेत, नवीन पृथ्वी, आणि नव्या यरुशलेमेमध्ये सर्वकाळासाठी राहणार!

भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकांही तुमचे आहे” (I करिंथ. 3:22).

“भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकांही तुमचे आहे” (I करिंथ. 3:22).

परंतू मला पुन्हा या संपूर्ण उता-याकडे येऊन समाप्त करायचे आहे, जो आपण सुरुवातीला वाचला होता,

“...भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकांही तुमचे आहे; आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे” (I करिंथ. 3:22-23).

आपण ज्या ख्रिस्ताच्या आहेत त्या अद्भूत “भविष्यकाळाच्या गोष्टी” पाहिल्या. पण काय तुम्ही त्यांच्या पैकी एक आहात? काय तुम्ही खात्रीने “ख्रिस्ताचे आहात” म्हणून सांगू शकता? तुम्ही सांगू शकत नाही, तर मग आनंदी होण्याचे कोणतेही अभिवचन तुम्हांस नाही! स्पर्जन म्हणाले, “तुमचा विश्वास नसेल, तर भविष्यात तुमच्यासाठी भीतीवाचून कांही नाही...तुम्ही ख्रिस्ताचे नसाल, तर आनंदी व्हावे असे तुमच्याकडे कांही नाही” (ibid., पृष्ठ 347).

जीवनात पुष्कळ पैसा, चांगली मौजमजा व आनंद, जे सरतेशेवटी नाश होते, तुम्ही ते गमाविता आणि ख्रिस्ताविना मरुन जाता असे मिळविण्यासाठी तुम्हांला काय करावे लागते? “भविष्यकाळातील गोष्टी” तुम्ही ख्रिस्ताशी अजूनही खरे नसाल तर तुम्हांला भयंकर दुःखाला सामोरे जावे लागणार. तुमच्या आत्म्याच्या तारणाचा मोठा विचार करण्याची तुम्हांला मी विनंती करतो. तुमचे पाप व तुमचे पातकी अंतःकरण याविषयी विचार करा. तुमचे पाप तुमची आशा, संपुष्टात आणणार, आणि तुम्हांला ते अग्नीच्या सरोवरात निश्चितपणे टाकणार, या वास्तवाचा तुम्ही जरुर विचार करावा अशी मी तुम्हांला विनंती करतो. तुम्ही या जगाचा अंधकार व पाप यापासून माघारी वळावे अशी मी प्रार्थना करतो. तुम्ही थेट व ताबडतोब ख्रिस्ताकडे यावे अशी मी प्रार्थना करतो. तुम्ही त्याला विश्वासाने बघावे व तुमचे पाप त्याच्या सार्वकालीक रक्ताने धुतले जावे अशी मी प्रार्थना करतो! त्याच्याकडे या. एकदा वधस्तंभी गेलेला, आता गौरविलेला देवाच्या पुत्रावर तुम्ही स्वतःला सोपवून द्या. तो तुमचे तारण करील! तो तुमचे तारण करील! त्यानंतर मग आनंदी व आशादायक “भविष्यातील गोष्टी” होतील, ज्यासंबंधी मी तुम्हांला सांगितले, त्या तुमच्या तसेच आमच्याही होतील!

तुम्हांला खरे ख्रिस्ती होण्यासंबंधी आमच्या पाळकाशी बोलायचे असेल, तर कृपया तुम्ही तुमची जागा सोडा व मागे जी खोली आहे तेथे या म्हणजे ते तुमचे पाप, व ख्रिस्त येशूमधील तारण यासंबंधाने तुमच्याशी बोलतील.

आता तुमच्यासाठी आणखी एक शब्द. आपण ख्रिस्तामध्ये जी आशा आहे याची सुवार्ता दूरवर व सर्वत्र पसरावी हे आपल्यासाठी चांगले नाही का? या नवीन वर्षात पुन्हा एकदा नव्याने ख्रिस्ताने दिलेल्या महान आज्ञेच्या (मत्तय 28:19-20) प्रति समर्पित व्हावे हे चागंले नाही का?

आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व जीवाने चला म्हणूया की, वैयक्तिक सुवार्ता सांगणे; आणि आपल्या मंडळीचे सुवार्ता प्रचाराचा कार्यक्रमाला हजर राहणे; आणि वेगवेगळी कुटुंबे व मित्र यांना ख्रिस्तामधील तारणाची सुवार्ता सांगणे ह्यासंबंधीची येशूची आज्ञा पाळू. 2020 मधील प्रत्येक संधी त्यात सुवार्ता प्रचार करुन ख्रिस्ताची आज्ञा पाळण्यास देव तुम्हांला साहाय्य करो! कृपया उभे राहा व तुमच्या गीत पत्रिकेतील शेवटचे गीत गा.

काळासाठी आम्हांला एक घोषणा दे, रोमांचित शब्द, सामर्थ्याचा शब्द,
रडण्याची लढाई, ज्वलंत श्वास, जो जिंकण्यास किवा मरण्यास बोलावितो.
विसाव्यातून जागे होण्याचा शब्द, गुरुची महान आज्ञा मनावर घेण्यास.
बोलाविणे आले आहे, अहो यजमानहो, उठा, आमची घोषणा आहे, सुवार्ता सांगा!

येशूच्या नावात, आनंदी सुवार्तिक आता घोषणा करतात, संपूर्ण जगात;
आकाशात हा शब्द दुमदुमतोयः सुवार्ता सांगा! सुवार्ता सांगा!
मरणा-या मनुष्यांस, पतीत जातीसमुहांस, सुवार्तेच्या दानाची कृपा सांगा;
शब्द अंधकारात सुद्धा, सुवार्ता सांगा! सुवार्ता सांगा!
   (“सुवार्ता सांगा! सुवार्ता सांगा!” डॉ. ओसवाल्ड जे. स्मिथ यांच्याद्वारा, 1889-1986;
      डॉ. हायमर्स द्वारा सुधारीत; “अँड कॅन इट बी?” या चालीवर चार्ल्स वेस्ली
      यांच्याद्वारा, 1707-1788).

आमेन!


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.


रुपरेषा

भविष्यकाळच्या गोष्टी — नवीन वर्षाचा उपदेश

THINGS TO COME – A NEW YEAR’S SERMON

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे; आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे” (I करिंथ. 3:22-23).

(लुक 21:25, 26; I करिंथ 3:21, 22).

I.   पहिले, ख्रिस्तीत्वाचा विजय तुमचा आहे! मत्तय 16:18;
मत्तय 24:14; प्रकटीकरण 11:15.

II.  दुसरे, येणारे ख्रिस्ताचे राज्य तुमचे आहे! मत्तय 5:5;
लुक 12:32; II तिमथी 2:12; प्रकटीकरण 5:9-10.

III. तिसरे, नवे आकाश व नवी पृथ्वी ही तुमची आहेत!
प्रकटीकरण 20:7-9; II पेत्र 3:10, 12; प्रकटीकरण 21:1-2;
मत्तय 28:19-20.