Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




प्रार्थनेत गाळलेले अश्रू

TEARS IN PRAYER
(Marathi)

डॉ. ख्रिस्टोफर एल. कागॅन यांच्याद्वारा
by Dr. Christopher L. Cagan

\लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 2 जून, 2019 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, June 2, 2019

“आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली” (इब्री 5:7).


आपला हा उतारा येशूला वधस्तंभावर देण्याच्या आदल्या दिवशी, त्याने गेथशेमाने बागेत केलेल्या प्रार्थनेच्या संबंधाने सांगतो आहे. तेथे त्याच्यावर आपले पाप लादले गेले असल्याने तो खूप त्रासात होता, ज्याला दुस-या दिवशी ते पाप वधस्तंभावर वाहवयाचे होते. लुकाचे शुभवर्तमान आम्हांला सांगते,

“मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता” (लुक 22:44).

त्या रात्री ख्रिस्ताने “अत्यंत विव्हळ होऊन” प्रार्थना केली. आपला उतारा म्हणतो “त्याने मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली.” येशूची प्रार्थना ही भावना व संवेदनेने भरलेली, मोठा आक्रोश व अश्रू गाळून केलेली होती. आज रात्री मी प्रार्थनेतील भावना व संवेदना याविषयी बोलणार आहे.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

पुष्कळ जे पेंटाकॉस्टल व करस्मटिक लोक आहेत ते असा विचार करतात की ओरडणे व आक्रोश करणे, भावना व संवेदना, ह्या गोष्टी प्रार्थनेतील महत्वाचे भाग आहेत. त्यांचा असा समज आहे की आरडाओरड करणे व रडणे म्हणजे पवित्र आत्मा प्रार्थनेत असणे होय, आणि जर तेथे थरथर कापणे व आवाज करणे नसेल तर तेथे पवित्र आत्मा नाही. ते असे म्हणतात की हे केवळ प्रार्थने संबंधानेच नव्हे,तर लोक गीत गातानां, उपदेश ऐकतांना, आणि जे सर्व चर्चमध्ये होते त्या सर्वाच्या संबंधाने हे आहे. परंतू ते साफ चुकीचे आहे. भावना ज्या स्वतःकरिता त्या कांही कामाच्या नाहीत. त्या तुम्हांला प्रार्थनेपासून दूर नेऊ शकतात. ते ह्याहूनही सैतानी असू शकते.

प्रार्थनेतील चुकीच्या संदर्भाने विचार करताना पवित्रशास्त्रातून मला एक उदाहरण देऊ द्या. एलियाने बआलाच्या संदेष्ट्यांचा विरोध केला. तो त्यांना म्हणाला की तुम्ही संपूर्ण एक दिवस बआलाजवळ आक्रोश करा, तोवर तो इस्त्राएलाच्या देवाकडे प्रार्थना करतो. ज्या देवाने अग्नीच्या द्वारे उत्तर दिले तोच खरा देव आहे हे तो दाखविल. बाआलाचे संदेष्टें त्यांच्या प्रार्थनेत रानटी व भावनावश झाले. सध्याच्या पुष्कळ चर्चेसमधून असे चित्र दिसू शकते! त्यांनी “सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत बआलाचे नाव घेत, हे बआला, आमचे ऐक, असे म्हणत राहिले; पण वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही. “जी वेदी त्यांनी केली होती तिच्याभोवती ते नाचूबागडू लागले” (I राजे 18:26). दुपारच्या प्रहरी “ते मोछमोठ्याने हाक मारु लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सु-यांनी व भाल्यांनी आपल्याला घाव करु लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले” (I राजे 18: 28). पण “कांही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही” (I राजे 18:29). मग एलियाने परमेश्वराकडे एक साधी प्रार्थना केली आणि परमेश्वराने स्वर्गातून खाली अग्नि पाठविला. सैतानी भावना,वर खाली उड्या मारणे, मोठ्याने ओरडणे व रडणे आणि बाकीच्या सर्व गोष्टी, खोट्या संदेष्ट्यांनी केले, पण चांगले कांही केले नाही. केवळ भावनावश होऊन कांही एक उपयोग नाही.

अशा प्रकारच्या स्वतःकरिता असलेल्या भावना मी पुष्कळ वेळा पहिल्या आहेत. त्यामुळे कधी चांगले झालेले नाही. मी एकदा माझ्या चौकशी खोलीमध्ये एका मुलीचे समुपदेशन करण्याचा, व तिला ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न करीत होतो. ती सतत रडत व थरथरत होती. मी जेव्हां विचारले तेव्हांही ती थांबली नाही. ती मला म्हणाली ती तिच्या पापाबद्दल रडत आहे, पण ती त्या रडण्याच्या द्वारा येशूकडे आली नाही. ती तीचे लक्ष ख्रिस्तावर केंद्रीत करु शकली नाही. तीचे कधीच तारण झाले नाही. नंतर कांही दिवसाने तीने चर्चही सोडले व आकंतपणे पापांत बुडाली.

कांही लोकं तर खूप भावनावश होतात. त्यांचा बांध तुटतो व कशामुळेही रडायला सुरुवात करतात. मला आणखी एक मुलगी आठवते जी असे करते. केवळ उपदेश संपल्यावरच नव्हे, तर जेव्हां येशूवर विश्वास ठेवावा म्हणून तिचे समुदेशन केले तेव्हांसुद्धा. तसे सर्वथा कधीही होते. ती अश्रू गाळून रडायला सुरुवात करते. तिचे मन ख्रिस्तावर, किंवा मंडळीवर, किंवा पवित्रशास्त्रावरही नसते. एके दिवशी तिला वाईट वाटले. आणि तिच्या भावनासह ती चर्चमधून निघून गेली. मी तिला पुन्हां कधीही पाहिले नाही.

रडारडी व आरडाओरड करण्याने “वास्तवात” कांही साध्य होत नाही. त्यामुळे खरी प्रार्थना होत नाही. तुम्ही रडणे व ओरड्याचा प्रयत्न करण्याने कांही होत नाही. जेव्हां तुम्ही प्रार्थना करता, तेव्हां ती कशासाठी करता त्याचा विचार करा. तुम्ही प्रार्थना अश्रू न गाळता किंवा अश्रू गाळून कराल. येशूने त्याची भावना गेथशेमाने बागेत प्रकट केली. त्याने “अत्यंत विव्हळ होऊन व अश्रू गाळून प्रार्थना” केली. पण तो स्वतःसाठी रडत नव्हता. त्याच्या अश्रू मुळे प्रार्थना चांगली झाली नाही. त्याचे अश्रू त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे बाहेर आले. ते त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे प्रकट झाले. सर्व मानव जातीचे पाप त्याच्यावर लादले गेल्याने, त्याची निराशा, त्याचा ताणतणाव आणि त्याची वेदना यातून त्याने देवाला आरोळी मारली. त्याची गंभीरता, त्याची काळजी, त्याची गरज, त्याचे ओझे, त्याचे दुःख यामुळे त्याने आरोळी मारली. आणि ते तुमच्या बाबतीत सुद्धा घडू शकते. रडण्याचा प्रयत्न करु नका. रडण्याची योजना किंवा रडण्याची तयारीही करु नका. केवळ प्रार्थना करा. देव कदाचित तुम्हांला रडू आणील, किंवा आणणार नाही, पण दोन्ही प्रकारे केलेली प्रार्थना खरी आहे.

II. दुसरे, भावनेशिवाय खोटी प्रार्थना.

ज्याला सध्या “प्रार्थना” म्हटले जाते ती खरी प्रार्थनाच नाही. हे कांहीतरी कोणी व्यक्ति बोलतोय असे आहे, देवा कडे सादर कलेली खरी प्रार्थना नव्हे. हे शब्द चांगले वाटतात, धार्मिक वाटतात, पण ते केवळ औपचारिकता, निरर्थक असे असते, देवा कडे न वळता व त्याला कांहीतरी मागणी करणे असे ते होय.

मी पुष्कळ पदवीदान समारंभास हजर राहिलो आहे. समारंभाच्या आरंभी ज्याला “आमंत्रण” म्हणतात ते असते. ती प्रार्थना असायला हवी, परंतू ती नसते. ती व्यक्ति पदवीदान समारंभ चांगला व्हावा, आणि विद्यार्थ्यांचे जीवन चांगले व्हावे असे कांही दोन वाक्ये बोलतो. परंतू कोणी अशी अपेक्षा करीत नाही की, देवाने उत्तर द्यावे व खरेतर कांही तरी करावे किंवा कांही बदल करावा – तसेच सर्वात म्हणजे जो “प्रार्थना” करतो त्यालाही असे वाटत नाही. अशा प्रकारच्या समारंभामध्ये कसलीही अंतःकरणातून भावना किंवा भाव नसतात.

एकदा मी आमच्या देशाची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी., येथे भेट दिली. तेथे मी राष्ट्रीय कॅथड्रलमध्ये गेलो. राष्ट्रपति रेगन नुकतेच वारले होते, आणि तेथील लोक त्यांचा अंतविधी करण्याच्या तयारीत होते. तेथे मी एक बिशप “प्रार्थना” करताना ऐकले. परंतू तो बिल्कुल प्रार्थना करीत नव्हता. तर तो पुस्तकातून शब्द वाचत होता. असे सर्व होते. देवाने कांहीतरी करावे म्हणून तो देवाकडे मागत नव्हता. तो उत्तराची अपेक्षा करीत नव्हता. तो केवळ शब्द बोलत होता कारण त्याला हे असे करायचे होते. त्याच्या अंतःकरणात कसलीच तशी भावना नव्हती.

मंदिरात प्रार्थना करावयास गेलेल्या परुश्याला येशू म्हणाला. तो मनुष्य म्हणाला, “हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो” (लुक 18:11, 12). तो बिल्कुल प्रार्थना करीत नव्हता. तो देवाजवळ काहीही मागत नव्हता. तर तो इतरांपेक्षा किती चांगला आहे हे सांगत होता. ख्रिस्त म्हणाला त्याने केवळ “स्वतःबरोबर” प्रार्थना केली (लुक 18:11). त्याने भावना प्रकट केली नाही. तो त्याच्या अंतःकरणातून प्रार्थना करीत नव्हता.

अशा ह्या चुकीच्या प्रार्थनेबद्दल येशूने त्या परुश्याला धिक्कारले. तो म्हणाला, “अहो शास्त्र्यांनो व परुश्यांनो, ढोंग्यांनो! तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करता” (मत्तय 23:14). ते पवित्र असल्याचा बनाव करण्यासाठी लांबलांब प्रार्थना करीत. परंतू ते वास्तवात विधवांची घरे व पैसा घेत होते. एवढे ते सोपे होते. ज्या कांही भावना प्रकट करीत ते चांगले असल्याचा बनाव करण्यासाठी होते. ते त्यांच्या अंतःकरणापासून प्रार्थना करीत नव्हते. ते चांगल्या अंतःकरणाचे नव्हते.

तुम्ही म्हणाल, “मी तसा नाही.” पण तुम्ही खोटी प्रार्थना करता, तुम्हीही फक्त शब्द बोलता काय? मी हे बोलतो. तुमच्या वैयक्तिक प्रार्थना समयी, तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करावयाची आहे, त्यांच्याविषयी विचार न करता, व देवाकडून उत्तराची अपेक्षा न करता, केवळ त्या व्यक्तींची नावें व गोष्टींची यादी बोलता काय? चर्चमधील प्रार्थनासभेत तुम्ही हे केले काय? मी हे केलेले आहे. कारण तुमची प्रार्थना करण्याची पाळी आली तेव्हां — कशासाठी तरी प्रार्थना करणे गरजेचे होते म्हणून तुम्ही ती केली काय? सभा संपली तेव्हां तुम्हांला आनंद झाला कारण तुम्हांला आता प्रार्थना करावी लागणार नव्हती. ती खरी प्रार्थना नव्हती. ते केवळ तुम्ही असेच केलेले होते. कोणाला तरी प्रभावित करण्यासाठी तुम्ही कधी “चांगली प्रार्थना” केली काय? मला एक व्यक्ति ठाऊक आहे त्याची पाळी येण्यापूर्वी त्याने प्रार्थना ठरवून केली. ती त्याची खरी प्रार्थना नव्हती, ती एक केवळ याचना होती, ते एक यादीवजा, भाषण होते. मी म्हणतो, “ठरवून प्रार्थना करु नका, त्यांच्यासाठी खरी प्रार्थना करा!” प्रार्थनासभेपूर्वी, प्रार्थना करण्यास देवाने साहाय्य करावे म्हणून, कांही मिनिटे व्यतित करा. आणि जेव्हां प्रार्थनासभेत किंवा वैयक्तिक प्रार्थना करता तेव्हां तुम्ही काय प्रार्थना करता याचा विचार करा. परमेश्वर साहाय्य करणार नाही तर केवढी दुर्दशा होणार याचा विचार करा. तुम्हांला प्रार्थनेचे उत्तर किती आवश्यक आहे याचा विचार करा. प्रार्थनेसाठी तुम्हांला उपवासाची मदत होईल, तुमचे संपूर्ण लक्ष केंद्रित करा व तुम्ही गंभीर आहांत हे देवाला दाखवा. देवाकडे वळा व जे तुम्हांला हवे ते देण्याची देवाकडे विनंती करा. भावनांसह तुम्ही चांगले रडू शकता. स्वतःला तुम्ही थांबवू नका. त्याकरिता तुम्हांला देवाने प्रेरित केले. पण कधीकधी तुम्ही रडत नाही. मुद्दाम रडण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही रडता म्हणून प्रार्थना चांगली — आणि तुम्ही रडला नाही म्हणून प्रार्थना चांगली नाही असे होत नाही. प्रार्थना तेव्हांच चांगली आहे जेव्हां त्यात देव आहे!

III. तिसरे, भावनेसह व भावनेशिवाय खरी प्रार्थना.

आपला उतारा म्हणतो की ख्रिस्ताने गेथशेमाने बागेत “अत्यंत विव्हळ होऊन अश्रू गाळून प्रार्थना केली.” परंतू ख-या प्रार्थनेने थोड्याशा किंवा भावना नसतांना सुद्धा उत्तरे मिळतात. बआलच्या संदेष्ट्यांनी त्यांच्या खोट्या देवाजवळ कशी प्रार्थना केली ते मी तुम्हांला सांगितले आहे. एलियाने कशी प्रार्थना केली ते आता मला सांगू द्या. तो म्हणाला,

“हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व इस्त्राएल ह्यांच्या देवा, इस्त्राएलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे. हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, तूच देव आहेस, ह्याची ह्या लोकांना जाणीव होऊ दे” (I राजे 18:36, 37).

एलिया रडल्याची कुठेही नोंद नाही. तसेच त्याने उड्या मारल्याचीही नोंद नाही. त्याने निश्चितपणे स्वतःला जखमी केले नसणार! त्याने केवळ गंभीरपणे प्रार्थना केली. त्याने देवाला विनंती केली की तोच खरा देव आहे हे त्याने लोकांना दाखवावे. आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली व स्वर्गातून अग्नि पाठवून एलियाचे अर्पण भस्म केले. लोक म्हणाले, “परमेश्वर हाच देव! परमेश्वर हाच देव!” (I राजे 18:39). एलियाने केलेली खरी प्रार्थना, भावनांची नोंद नसलेली, बआलाच्या संदेष्ट्यांच्या जंगली प्रार्थनेच्या अगदी विरुद्ध अशी आहे. ख-या प्रार्थनेस भावनांची गरज नाही. त्याला देवाची गरज असते!

परंतू ब-याच वेळा ख-या प्रार्थनेत भावना, अश्रू सुद्धा असतात. तुम्हांला तुमची गरज समजली की, मग भावनां असणे स्वाभाविक आहे. तेव्हां तुम्ही देवाला आवेश, गरज, व रडून आरोळी मारणार. तुम्ही भग्न व्हाल व अश्रूपूर्ण नयनांनी देवाला प्रार्थना कराल. वेळो वेळी पवित्रशास्त्र अश्रूंना प्रार्थनेशी जोडते. स्तोत्रकर्त्याने प्रार्थना केली, “हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या प्रार्थनेकडे कान लाव; माझे अश्रू पाहून उगा राहू नको” (स्तोत्र 39:12).

हिज्किया राजा मरणासन्न असा आजारी होता. हिज्कियाने देवाला प्रार्थना केली. त्याने कशी प्रार्थना केली? पवित्रशास्त्र म्हणते, “आणि हिज्किया मनस्वी रडला” (II राजे 20:3). खरोखर तो रडला. तो मरणासन्न होता. तो मनस्वी रडला. तो त्याच्या प्रार्थनेत रडला. मग यशया संदेष्ट्यास देवाचे वचन प्राप्त झाले. यशया म्हणाला, “परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्किया यास सांग, तुझा पूर्वज दाविद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मी तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करितो” (II राजे 20:5). “मी तुझे अश्रू पाहिले आहेत.” देवाने पाहिले व त्याला कळाले की हिज्कियाचे अश्रू आशाहीन, प्रार्थनेत विनंती करीत आहे. आणि देवाने प्रार्थनेचे उत्तर दिले व राजाचा जीव वाचविला.

नवीन करारात, एक मनुष्य येशूकडे आला. त्याच्या मुलाला भूत लागले होते. ख्रिस्ते त्याला विचारले की तुझा मुलगा बरा झाला असा तू विश्वास ठेवतोस. आणि “मुलाचा बाप डोळ्यात आसवे आणून मोठ्याने म्हणाला, प्रभूजी माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका” (मार्क 9:24). येशूने त्या मुलातून भूत घालविले. ब-याचदा हा उतारा मनुष्य विश्वासात दुबळा असला तरी त्याला उत्तर मिळते हे दाखविण्यासाठी वापरले जाते. “माझा अविश्वास घालवून टाका.” पण हा उतारा आणखी म्हणतो की बाप “रडला” आणि “आसवे गाळून” ख्रिस्ताशी बोलला. तो शिष्यांपैकी एक नव्हता. तो पालट झालेल्यांपैकी सुद्धा नव्हता. तो “समुदायामधील एक” होता, गर्दीतील एक असा होता (मार्क 9:17). परंतू त्याने त्याच्या मुलाला येशूकडे आणले व अश्रू गाऴून त्याने त्याला आरोळी मारली.

त्या माणसाने अश्रू गाळून येशूकडे प्रार्थना का केली? तो कांही प्रार्थना योद्धा नव्हता. त्याचे तारणही झाले नव्हते. त्याचे अशाप्रकारे येशूशी बोलणे हे स्वाभाविक होते, कारण त्याची जिकरीची गरज होती. त्याच्या मुलाला भूत लागले होते व येशूशिवाय सुटकेचा दुसरा मार्ग नव्हता. तो मुद्दामहून रडला नाही. त्याची गरज, त्याची हताशता, यामुळे त्याला अश्रू आले. गरजेची जाणीव, हताशता व आशाहीनता याची जाणीव, यामुळे ब-याचदा रडू येऊन अश्रू येतात. भावनावश होऊन, त्याने खरी प्रार्थना केली.

आणि हे आपणास पुन्हा आपल्या उता-याकडे नेते. ख्रिस्ताने गेथशेमाने बागेत “अत्यंत विव्हळ होऊन व अश्रू गाळून प्रार्थना” केली. तो रडणारे बाळ नव्हते. तो भावनिक मुलगी नव्हती जी कशासाठीही रडते. तो तीस वर्षाहून, अधिक वयाचा मनुष्य होता. तो का रडला? कारण तो अंतःकरणातून भग्न झाला. त्याला कळून आले की सर्व पुरुष व स्त्रीचे पाप त्याच्यावर लादले गेले आहे. तसेच दुस-या दिवशी त्याला भयंकर दुःख सहन करावे लागणार होते, नाहीतर कोणाचेही तारण होणार नव्हते या विचारामुळे. तरीही मनुष्याच्या पापाच्या ओझ्याने तो मारला गेला. त्या रात्री देवाच्या अनुग्रहाशिवाय तो गेथशेमाने बागेतच मेला असता व वधस्तंभावर गेला नसता. ख्रिस्ताला दाटून आले. आणि त्याने “अत्यंत विव्हळ होऊन व अश्रू गाळून प्रार्थना” केली. त्या परिस्थितीत ते अगदी स्वाभाविक होते. त्याने जर भावनावश होऊन प्रार्थना केली नसती तर ते आश्चर्यकारक ठरले असते. येशूने “अत्यंत विव्हळ होऊन व अश्रू गाळून प्रार्थना” केली. आणि आपला उतारा सांगतो की त्याचे “ऐकण्यात आले.” देवाने त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले व त्याला दुस-या दिवशी वधस्तंभावर जाण्यास जिवंत ठेवले. देवाने त्याची “अत्यंत विव्हळ होऊन व अश्रू गाळून” केलेली प्रार्थना ऐकली.

ख्रिस्ती लोकहो मी तुम्हांला विचारतो, “तुम्ही विव्हळ होऊन व अश्रू गाळून प्रार्थना करता काय?” तुम्ही जी प्रत्येक प्रार्थना करता त्याबद्दल मी बोलत नाही. पण मी पुन्हा विचारतो, “तुम्ही कधी विव्हळ होऊन व अश्रू गाळून प्रार्थना करता काय?” मला जेव्हां केव्हां शक्य तेव्हां, मी करतो. तुम्ही कधी गरजेच्या ओझ्याने, उत्तराची अपेक्षा करुन − विव्हळ होऊन व अश्रू गाळून प्रार्थना करता काय? तुम्ही करीत नसाल, तर तुमचे प्रार्थनेचे जीवन चांगले नाही. तुम्ही तशी प्रार्थना करीत असाल, तर ती करण्याचे थांबवू नका आणि तुमची प्रार्थना अधिक चांगली होण्याची वाट पाहा. देवाला जे हवे ते हे नव्हे. परंतू देवाला अशी प्रार्थना करा की देव तुम्हांला गरजेची जाणीव करुन देईल, आणि तुम्ही भावनावश होऊन प्रार्थना कराल. जर तुम्ही उपवास करता,तेव्हां भूक लागते, तर तुम्ही कशासाठी प्रार्थना करीत आहां याचा विचार करा. देवाकडे वळा व प्रार्थना करा.

तुमच्यातील कांहीजण हरविले आहेत. तुम्ही येशूवर विश्वास ठेवला नाही. मी तुम्हांल विचारतो, “विव्हळ होऊन व अश्रू गाळून प्रार्थना करता तेव्हां तुम्हांला तुमच्या पापाची जाणीव होते काय – किमान कधीतरी?” तुम्हांला तुमच्या पापाची जाणीव झाली आहे का? रडणे हा उद्देश नाही – येशू हा आपले उद्देश आहे. तुम्ही रडा किंवा रडू नका पण त्याच्यावर विश्वास ठेवा. पण मी म्हणतो, “तुमच्या पापाबद्दल तुमच्या अंतःकरणात कधी तुम्हांला खेद वाटला का?” तुम्हांला वाटला पाहिजे, कारण ह्दय “सर्वात कपटी आहे” (यिर्मया 17:9). तुमच्या अंतःकरणातील पाप देवाने तुम्हांला दाखवावे म्हणून प्रार्थना करा. तसेच तुम्ही प्रार्थना करा की देवाने तुम्हांला ख्रिस्ताकडे ओढावे.

तुमच्या सर्व गरजांचे उत्तर येशू आहे. तोच तुमच्या पापावर इलाज व खंडणी असा आहे. तो तुमच्या सर्व पापांची, तुमच्या अंतःकरणातील पापाची सुद्धा खंडणी देण्यासाठी वधस्तंभावर मेला. तुमचे पाप झाकण्यासाठी व ते सर्वकाळाकरिता नाहिसे करण्यासाठी त्याने आपले रक्त सांडले. जीवनाने मरणास जिंकावे म्हणून तो मरणातून उठला, केवळ त्याच्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी सुद्धा. तुम्ही येशूवर विश्वास ठेवाल तर सर्वकाळाकरिता तुमचे तारण होईल. येशूवर विश्वास ठेवण्यासंबंधाने तुम्हांला आमच्याशी बोलावयाचे असेल, तर तुम्ही पुढील पहिल्या दोन रांगेत येऊन बसा. आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

एकेरी गीत गायले: मि. जॅक नगान
“टिच मी टू प्रे” (अल्बर्ट एस. रिट्झ, यांच्याद्वारा, 1879-1966).
“Teach Me to Pray” (Albert S. Reitz, 1879-1966).


रुपरेषा

प्रार्थनेत गाळलेले अश्रू

TEARS IN PRAYER
(Marathi)

डॉ. ख्रिस्टोफर एल. कागॅन यांच्याद्वारा
by Dr. Christopher L. Cagan

“आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली” (इब्री 5:7).

(लुक 22:44)

I.    प्रथम, भावनांयुक्त खोटी प्रार्थना I राजे 18:26, 28, 29.

II.   दुसरे, भावनेशिवाय खोटी प्रार्थना, लुक 18:11, 12; मत्तय 23:14.

III.  तिसरे, भावनेसह व भावनेशिवाय खरी प्रार्थना, I राजे 18:36, 37, 39; स्तोत्र 39:12;
II रोजे 20:3, 5; मार्क 9:24, 17; यिर्मया 17:9.