Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




संकटकाळासंबधी उत्तेजना व चेतावणी —
आता व भविष्यात

ENCOURAGEMENT AND WARNING IN TRIBULATION –
NOW AND IN THE FUTURE
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. लिखीत
डॉ. ख्रिस्टोफर कागॅन यांच्याद्वारा
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे प्रभूवारी संध्याकाळी,
19 मे, 2019 रोजी दिलेल्या उपदेशाचे साहित्य वापरुन
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
with material by Dr. Christopher L. Cagan
preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord's Day Evening, May 19, 2019

“माझ्या ठायी तुम्हांला शांति मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहे. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे” (योहान 16:33).


येशू म्हणाला, “जगात तुहांला क्लेश होतील.” “क्लेश” हा शब्द थ्लीपसीस पासून अनुवादित करण्यात आला आहे. तो “दबाव” असा देखील अनुवादित झाला असता. आपल्या सर्वांच्या जीवनात दबाव आहे. परंतू दबावाचा सर्वात वाईट काळ अजून यायचा आहे. येशू ख्रिस्त नीतिमत्वेचे राज्य करण्यासाठी जैतूनाच्या डोंगरावर उतरणार त्यापूर्वी सात-वर्षे हा संकटाचा काळ असणार आहे. ह्या संकटाचा सर्वास भयानक काळ हा शेवटची साडे तीन वर्षे असतील. ह्या पृथ्वीवर ख्रिस्त पुन्हां येण्याच्या पूर्वी, सात वर्षे ख्रिस्त विरोधक या जगावर राज्य करणार आहे. या सात वर्षाच्या काळात सर्व जे ख्रिस्ती होतील त्यांना जिवे मारले जाईल असे पवित्रशास्त्र निर्देशित करते.

प्रेषित योहानाने या संकटाच्या काळातील ख्रिस्ती आत्म्यांसंबंधाने एक दृष्टांत पाहिला. तो म्हणाला,

“तेव्हां मी वेदीखाली आत्में पाहिले; ते आत्में देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे होते” (प्रकटीकरण 6:9)

त्यानंतर तो लिहतो,

“मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; ह्यांनी ‘आपले झगे’ कोक-याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत” (प्रकटीकरण 7:14).

इतिहासातील कोणत्याही कालखंडापेक्षा हा सात वर्षाचा कालखंड ख्रिस्ती लोकांसाठी महाभयंकर असा असणार आहे. येशू म्हणाला,

“कारण ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट’ त्या काळी येईल” (मत्तय 24:21).

होय, आपले वर उचलले जाणे होणार आहे. पवित्रशास्त्र म्हणते,

“कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातील उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारुढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू” (I थेस्सल 4:16-17).

तरीही तुम्ही असा विचार करु नका की ह्या अभिवचनामुळे सध्या जो छळ होत आहे त्यापासून सुटका मिळेल, परंतू ह्यापेक्षा भयंकर छळ होणार. आपल्या उता-यात, येशू म्हणाला की संपूर्ण पीढ्यांना ह्या संकटास सामोरे जावे लागणार आहे.

“माझ्या ठायी तुम्हांला शांति मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहे. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे” (योहान 16:33).

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

येशू काय म्हणाला हे काळजीपूर्वक समजून घेऊया. प्रथम मी वचनाच्या दुस-या भागावर बोलतो, मग पहिल्या भागावर आणि मग शेवटच्या भागावर बोलतो.

I. प्रथम, “जगात तुम्हांला क्लेश होतील.”

येशूने हे शिष्यांना सांगितले, आणि हे सर्व पीढ्यांतील ख्रिस्ती लोकांना लागू आहे. ख्रिस्ती लोकांचा शाररिक छळ होणार आहे. प्रेषित पौल लिहतो,

“प्रकटीकरणांच्या विपुलतेमुले मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा... ठेवण्यात आला आहे” (II करिंथ 12:7).

पौलाला त्याच्या दृष्टीने जी समस्या त्याला होती त्याकडे तो निर्देशन करतो आहे. ते हे दर्शविते की ख्रिस्ती लोकांना शाररिक आजार, पिडा, आणि दैहिक मरण सोसावे लागणार. जेव्हां आपण ख्रिस्ती होतो तेव्हां आपल्याला शाररिक आजार व पिडा यापासून आपली सुटका नाही.

आपल्या ह्या पतन पावलेल्या पापी जगात ख्रिस्ती लोकांना इतर छळ व क्लेश सुद्धा भोगाने लागणार आहेत. ख्रिस्ती अनुभवाच्या संबंधाने प्रेषित पौल म्हणतो,

“...क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहल्याप्रमाणे, ‘तुझ्यामुळे आमचा वध होत आहे,’ कापायच्या मेंढरासारखे आम्हांला गणिले आहे” (रोम 8:35-36).

परंतू तो हे निर्देशित करतो की यातील कोणताही क्लेश “ख्रिस्ताच्या प्रीति पासून आपणांस विभक्त करु शकत नाही” (रोम 8:35).

“या जगात तुम्हांला क्लेश होतील” (योहान 16:33).

योहान — ज्यास उकळत्या तेलात बुडविले, व नंतर तो जीवनभर अधू झाला — त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे सर्व शिष्य त्यांच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे त्यांना ठार मारण्यात आले. सर्व पीढ्यांमध्ये ख्रिस्ती लोकांना त्यांच्या विश्वासामुळे छळ सोसावा लागला आहे. फॉक्सेस बुक ऑफ मार्टिर्स हे सर्व काळाकरिता ख्रिस्ती विश्वासामुळे मरण पत्करलेल्यांचे नोंदी असलेले एक उत्कृष्ट पुस्तक आहे. डॉ. पौल मार्शल म्हणाले,

मध्य अमेरिकेच्या जगंलात...चीनच्या कष्टकरी शिबीरात, पाकिस्तानी तुरुंगात, भारतीय दंगलीत आणि सुदानच्या खेड्यांमधून असंख्य विश्वासमा-यांनी त्यांच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे यापूर्वीच किंमत चुकवावी लागली आहे (ibid., पृष्ठ 160).

सुदानमध्ये ख्रिस्ती लोकांना गुलाम केले गेले. इराणमध्ये त्यांचा वध करण्यात आला. क्युबामध्ये त्यांना तुरंगात टाकले गेले. चीनमध्ये त्यांना मरेपर्यंत मारण्यात आले. 60 हून अधिक देशांत ख्रिस्ती लोकांचा त्यांच्या विश्वासामुळे जाच, शोषण, छळ केला गेला किंवा ठार मारण्यात आले. संपूर्ण जगात 200,000,000 ख्रिस्ती लोक रोज पोलीस, पाळत ठेवणारे, किंवा दडपशाही करणारे व सापत्न वागणूक देणारे या सर्वांच्या भीतीमध्ये जगत आहेत... कोट्यावधी ख्रिस्ती लोक केवळ त्यांच्या विश्वासामुळे दुःख भोगीत आहेत (पौल मार्शल, पीएच. डी., देअर ब्लड क्राईज आऊट, वर्ड, 1997, बॅक जॅकेट).

येथे पश्चिमेमध्ये सुद्धा, समाजात धर्मनिरपेक्षता वाढीस लागल्यामुळे, ख-या ख्रिस्ती लोकांना वेगळे व अपमानित केले जात आहे, किंवा त्यांचा जाच केला जातो. महाविद्यालयाच्या वर्गातून ख्रिस्तीत्व व पवित्रशास्त्र याविषयी टिंगलटवाळी केली जाते. कित्येक ख्रिस्ती लोक प्रभूवारी चर्चमध्ये उपासना करण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे त्यांना प्रगतीपासून वंचित ठेवले जाते आणि बाकीच्यांना नोकरीवरुन काढून टाकले जाते. तसेच अ-ख्रिस्ती कुटुंबातील सदस्य व दुबळे, हळवे नवे-सुवार्तिकवादी समर्पित ख्रिस्ती जणांचा तिरस्कार करतात. जसे की येशूने म्हटले आहे,

“या जगात तुम्हांला क्लेश होतील” (योहान 16:33).

II. दुसरे, “माझ्या ठायी तुम्हांला शांति मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहे.”

“ख्रिस्तामध्ये” जे आहेत त्यांना हे अभिवचन दिलेले आहे. “माझ्या मध्ये.” तो आंतरिक शांतीचा स्त्रोत आहे. येशू म्हणाला,

“मी तुम्हांला शांति देऊन ठेवतो; मी आपली शांति तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही...” (योहान 14:27).

जेव्हां एखादा व्यक्ति ख्रिस्ताला ओळखळतो, तेव्हां त्याच्या जवळ स्थायी, आंतरिक शांती असते जी जगातील इतर लोकांकडे नसते.

व्यक्ति जी ख्रिस्ता “मध्ये” असते, आणि जो आपल्या सर्व समस्या प्रार्थनेत देवाला समर्पित करतो, त्याच्याकडे विशेष शांति असते, ज्याला पवित्रशास्त्र म्हणते की “देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील” (फिलिप्पै 4:7). आज रात्री संपूर्ण जगभर पुष्कळ देशांतून ते राहतांना — हे ख्रिस्ती लोक का अटकेत जातात, का छळ सहन करतात, का तुरुंवास भोगतात, आणि का मरण पत्करतात हे जगाला अजून समजलेले नाही.

ख्रिस्ती लोकांमध्ये ही शांति आहे म्हणजे त्यांच्यामध्ये आंतरिक संघर्ष, भावनिक समस्या, किंवा शाररिक व्याधी नाही असे नाही. अमेरिकेतील पुष्कळ सुवार्तिक यश, समृद्धी, शांतता, सुख, आणि स्वयं प्रगतीने भरलेले आहेत. येशूवरील विश्वासामुळे चीनमध्ये ख्रिस्ती लोकांना उलटे वधस्तंभावर लटकविले जाते, किंवा क्युबातील ख्रिस्ती लोक पाच वर्षे सक्त तुरुंगवास भोगतात किंवा इराणमधील ख्रिस्ती लोक मृत्यूदंडास सामोरे जातात त्यांच्यासाठी हा विषय कदाचित मुर्खपणाचा वाटेल.

येशू जे बोलला, “माझ्या ठायी तुम्हांला शांति मिळावी म्हणून या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या आहेत” (योहान 16:33). हे समजण्याच्या खूप जवळ ह्या तिस-या जगतातील छळणूक झालेले ख्रिस्ती लोक आले आहेत. मला वाटते की ही शांति आंतरिक शांतता आहे जी आपल्याला पापांची क्षमा झाली आहे, आणि देव आपली काळजी घेतो या जाणीवेमुळे येते.

मी II करिंथ 11:24-28 वाचणार आहे. प्रेषित पौलासंबंधाने काय घडले ते ऐका. तो म्हणाला,

“पाच वेळा मी यहुद्यांच्या हातून एकोणचाळीस फटके खाल्ले. तीन वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला; तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली; मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, माझ्या देशबांधवानी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रावरची संकटे, खोट्या बंधूनी आणलेली संकटे; श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपासतापास, थंडी व उघडेवाघडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय ह्या अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता ही आहे” (II करिंथ 11:24-28).

अशा परिस्थितीमध्ये शांति आहे असे पौल कसे काय म्हणू शकतो? तरीही त्याने हे केले. पौलाने फिलिप्पै 4:6, 7 मध्ये त्याचे उत्तर दिलेले आहे.

“कशाविषयीहि चिंताक्रात होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करुन आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील” (फिलिपै 4:6-7).

पौल खूप मोठ्या संकटातून व क्लेशातून गेला, तरीही तो येथे म्हणतो, “बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांति.”

III. तिसरे, “तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”

तुम्ही तुमच्या जीवनात संकट व क्लेशातून जाल किंवा जाणार नाही म्हणून कदाचित तुम्हांला आश्चर्य वाटेल. धर्मनिरपेक्ष महाविद्यालयात एका तासामागून दुस-या तासाला बसता, परंतू पवित्रशास्त्र व ख्रिस्तीत्वावर वाईटरित्या हल्ला केला जातो, कमी महत्व दिले जाते, आणि मुर्खपणा समजला जातो. “मी हे करु शकतो का, आणि ख्रिस्ती होऊ शकतो का?”, अशाप्रकारे महाविद्यालयीन विद्यार्थी विचार करतात. “सध्याच्या संकटातून मी जाऊ शकतो का? लोक माझ्या विरोधात जातील तेव्हां मी हे करु शकेन? भीतीच्या वेळी मी हा विश्वास धरु शकेन का — आणि माझा विश्वासही बळकट नाही?”

सध्या जे खरे ख्रिस्ती आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात थट्टा केली जाते. तुम्ही येशूसाठी खूप कांही करता असे लोक म्हणतील. तुम्ही रविवारी एक तासाचा धर्म पाळता, किंवा बाकीच्या वेळी चर्च नसते लोक असे तुम्हांला म्हणतील. ते तुम्हांला म्हणतील तुम्ही ख्रिस्ताला अनुसरण्याचे सोडाल तर तुम्ही सुखी व्हाल. ते म्हणतात, “वधस्तंभ सहन करण्याची कांही एक गरज नाही, दुःखसहन किंवा क्लेश सहन करण्याची गरज नाही.” “सर्व विसरुन जा. सर्व सोडून द्या व आम्ही जसे आहोत तसे तुम्हीही राहा.” ते तुमच्यावर दबाव टाकतील. जसे की येशूने सांगितले, “जगात तुम्हांला क्लेश होतील.”

परंतू ख्रिस्त म्हणतो, “तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे.” मी रोम 8:35-39 वाचतो ते ऐका.

“ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहल्याप्रमाणे, ‘तुझ्यामुळे आमचा वध होत आहे,’ कापायच्या मेंढरासारखे आम्हांला गणिले आहे. उलटपक्षी ज्याने आपल्यावर प्रीति केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही” (रोम 8: 35-39).

जेव्हां तुम्ही ख्रिस्ताकडे येता, तेव्हां तो तुमचा ताबा घेतो. तो तुम्हांला सावरुन धरतो व तुम्हांला खाली पडू देत नाही. जेव्हां तुम्हांला ख्रिस्ताकडे यायचे असते, तेव्हां तुम्हांला त्याला धरण्याची गरज नाही. तो तुम्हांला सावरुन धरतो! ज्या क्षणी तुमचा पालट होतो, त्या क्षणापासून तुम्ही ख्रिस्तामध्ये अनंतकाळाकरिता सुरक्षित असता. हे सत्य आहे की तिस-या जगतात 200 दसलक्ष लोक असे आहेत की ते ख्रिस्ती विश्वासासाठी क्लेश भोगावयास तयार आहेत ते हे सिद्ध करते की ख्रिस्त आपल्या अनुयायांना सावरुन धरतो, आणि त्यांना स्वर्गाच्या आशेशिवाय त्यांचा नाश होऊ देत नाही. ख्रिस्ताकडे या, आणि तो तुमचे सर्व तारण, आणि सर्व संरक्षण करतो! उपदेशापूर्वी जसे की मि. नगानने गीत गायले,

विश्रांतीसाठी आत्मा येशूवर टेकला आहे,
   मी नाही, मी त्याच्या शत्रूला दुष्पणाने सोडणार नाही;
तो आत्मा, सगळया नरकाने त्याला हलविण्याचा प्रयत्न केला तरी,
   कधीही नाही, कधीही नाही, कधीही मी त्याला सोडणार नाही.
(“हाऊ फर्म अ फाऊंडेशन,” ‘के’ रिपॉन्स ‘सिलेक्शन ऑफ हायम्स,’ 1787).

“संकटकाळासंबंधी उत्तेजना व चेतावणी — आता व भविष्यात” हे ह्या उपदेशाचे शिर्षक आहे. आजरात्री मी तुम्हांला उत्तेजना दिली आहे. पण मला तुम्हांला चेतावणी वजा वचन सुद्धा दिले पाहिजे. आपण सध्या ज्या कांही क्लेशातून जात आहोत ते इतर ठिकाणी लोक जे क्लेश भोगीत आहे त्या मानाने अगदी शुल्लक आहे. तिस-या जगतात येशूवरील विश्वासामुळे लोकांना मारणे, तुरुंगात टाकणे, छळ करणे, व ठार मारणे असे जुलूम केले जात आहे. तेथील लोकांच्या मानाने अमेरिकेतील आपले जीवन हे एखाद्या विश्रांतीसाठी सुट्टीवर गेल्यासारखे आहे. ख्रिस्ती म्हणून भविष्यात येथील जीवन फार कष्टमय असणार आहे. आपणांवर भयंकर दबाव असणार आहे. खरे ख्रिस्ती असल्यामुळे तुम्हांला कदाचित तुमची नोकरी, तुमचे घर, तुमचा पैसा सुद्धा गमवावा लागणार. हे सध्या इतर देशांमधून घडत आहे. तुमचे मित्र व नातेवाईक सुद्धा तुमच्या विरुद्ध जातील. क्लेशासंबंधी बोलतांना, येशू म्हणाला, “तेव्हां भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारविण्याकरिता धरुन देईल आणि मुले आपल्या आईबापावर उठतील व त्यांचा प्राणघात करवितील; आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील परंतू जो शेवटपर्यंत टिकाव धरुन राहील तोच तारला जाईल” (मार्क 13:12, 13). सध्या हे इतर देशांमधून घडत आहे. त्या सात वर्षापूर्वीच लोक तुम्हांला नाकारतील याचे आश्चर्य मानू नका.

यिर्मया संदेष्टा म्हणाला, “तूं पायी चालणा-यांबरोबर धावतांना थकलास तर घोडेस्वारांबरोबर कसा टिकशील? शांततेच्या देशात तूं निर्भय आहेस पण यार्देनेच्या घोर अरण्यांत तूं काय करशील?” (यिर्मया 12:5). होय, तुम्ही सध्या कांही अंशी क्लेशातून जात आहांत. पण, तुम्ही हा सध्याचा छोठासा दबाव पेलू शकत नाही तर, मग भयंकर असा होईल तेव्हां काय करणार? तुम्ही सध्याच्या सुट्टी सारखे ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही, तर मग जेव्हां वादळ येईल तेव्हां काय करणार? मी विनंती करितो की आता तुम्ही खंबीर ख्रिस्ती बना. तुम्ही आता कराल तर नंतर तुम्ही एक खंबीर ख्रिस्ती व्हाल. मी पास्टर रिचर्ड वुर्मब्रँड यांचे पुस्तक, टॉर्चर्ड फॉर ख्राईस्ट हे पुस्तक जेव्हां मी वाचले तेव्हां मला नवीन ख्रिस्ती लोकांसारखे वाटले. केवळ वाचण्यासाठी हे पुस्तक नाही. त्यांने माझे संपूर्ण जीवन बदलले आहे. ख्रिस्ती असणे म्हणजे सुट्टीवर जाण्यासारखे नाही. ते कठीण असू शकते. ते कठीण आहे. होय, “तरी धीर धरा” (योहान 16:33). तसेच तुम्ही किंमत देखील चुकवा (लुक 14:28). ते सर्वदा खूप महत्वपूर्ण आहे, कारण सदासर्वदा येशूबरोबर राहणार आहांत.

आणि आता येथे जे पापात हरविलेले आहेत त्यांच्याशी मला बोलावयाचे आहे. येशू तुम्हांवर प्रीति करितो. तो तुमच्या पापाबद्दल खंडणी भरण्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. तुमचे पाप धुण्यासाठी त्याने त्याचे रक्त सांडले. तुम्हांला जीवन देण्यासाठी तो मरणातून पुन्हां उठला. जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल तर तुम्हांला सदासर्वकाळासाठी तारण मिळेल. येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे कांही शब्द बोलणे नव्हे. येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे त्याच्यावर भरवंसा ठेवणे होय, तुम्हांला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागणार. होय, तुम्हांला दुःखसहन करावे लागणार. पण ते खूप मोलवान आहे. तुम्ही येशूला ओळखाल. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल तर सदासर्वकाळासाठी तुम्ही त्याच्याबरोबर जीवंत राहाल. येशूवर विश्वास ठेवण्यासंबंधाने तुम्हांला माझ्याशी बोलायचे असेल तर, कृपया पहिल्या व दुस-या रांगेत येऊन बसा. आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. जॅक नगान यांनी गायलेः “हाऊ फर्म फाऊंडेशन”
(‘के’ इन क्रिपॉन्स ‘सिलेक्शन ऑफ हायम्स,’ 1787).
“How Firm a Foundation” (‘K’ in Rippon’s ‘Selection of Hymns,’ 1787).


रुपरेषा

संकटकाळासंबंधी उत्तेजना व चेतावणी —
आता व भविष्यात

ENCOURAGEMENT AND WARNING IN TRIBULATION –
NOW AND IN THE FUTURE

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. लिखीत
डॉ. ख्रिस्टोफर कागॅन यांच्याद्वारा

“माझ्या ठायी तुम्हांला शांति मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहे. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे” (योहान 16:33).

(प्रकटीकरण 6:9; 7:14; मत्तय 24:21; I थेस्सल 4:16-17)

I.   प्रथम, “जगात तुम्हांला क्लेश होतील,” II करिंथ 12:7; रोम 8:35-36.

II.  दुसरे, “माझ्या ठायी तुम्हांला शांति मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहे,” योहान 14:27; II करिंथ 11:24-28; फिलिप्पै 4:6-7.

III. तिसरे, “तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे,” रोम 8:35-39; मार्क 13:12, 13; यिर्मया 12:5; लुक 14:28.