संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
एक ख्रिस्ती शिष्य होण्यास कोणती किंमत मोजावी लागतेWHAT IT COSTS TO BECOME A CHRISTIAN DISCIPLE डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “तुमच्या मध्ये असा कोण आहे त्यास बुरुज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करुन आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही” (लुक14:28). |
आता माझ्याबरोबर मत्तय, अध्याय 16, वचन 24 कडे वळा.
“माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्यांने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे” (मत्तय16:24).
पुष्कळ तरुणांना अनुकरण करण्यास कारणाची गरज आणि त्यांच्या जीवनाला उद्देशहि नाही. केवळ तुम्ही आज व त्याच्या पुढचा दिवस जगता. खरे तर, तरुणांना मिनिटा मागून मिनिट जगायचे असते. तुम्ही तुमचे जीवन चॅनेल बदलल्या सारखे जगता — जसे की ब-याचदा एखाद्या चॅनेलवरील संपूर्ण कार्यक्रम न पाहाताच पुढचे चॅनेल लावता.
आता तेथे त्याला एक धोका आहे. तुम्हांला संपूर्ण गोष्ट कधीच मिळणार नाही. अशाप्रकारे पुष्कळ तरुण मंडळीबरोबर वर्तुणूक करतात. तुम्ही “चॅनेल बदलत” – पुढे मागे करीत असता. एका रविवारी लासवेगासला जायचं आणि दुस-या रविवारी मंडळीत यायचं. परंतू तुम्हांला अशाप्रकारे संपूर्ण गोष्ट मात्र कधीच मिळत नाही. तुम्हांला फक्त तुकडे तुकडे मिळतात. उदाहरणतः, तुम्ही फक्त उत्क्रांतीसंबंधी ऐकता, आणि अतिंम न्याय, तारण, सैतान किंवा इतर विषयांसंबंधीचा जे सिद्धांत आहेत त्याविषयी ऐकलेले नसते.
तुम्हांला खरे ख्रिस्ती होण्यासाठी तुम्ही स्वतःला ख्रिस्तामध्ये झोकून दिले पाहिजे:
“माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्यांने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे” (मत्तय16:24).
आता, तारण हे कृपेने मिळते. येशूने जे म्हटले ते एखादा अपरिवर्तित कधीहि करु शकत नाही, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे.” परंतू देवाने तुम्हांला शुभवर्तमान ऐकण्यास या मंडळीत आणले. आणि प्युरिटन थॉमस वॅट्सन बरोबर म्हणाले, “जेव्हां देव आम्हांला आकर्षित करतो तेव्हां आम्ही त्याच्यामागे जातो.” किंवा तुम्हांला जायला हवे, असे तुमच्या खोल अंतःकरणात ठरवून देखील, तुम्ही जात नाही.
अपरिवर्तित व्यक्ति हा संभ्रमावस्थेने भरलेला असतो. तो मंडळीत येतो तरी देखील प्रचारक व पवित्रशास्त्र यासंबंधाने त्याच्या आत एक वाद सुरु असतो. तुम्ही तुमच्या अतःकरणात म्हणत असता, “माझा पवित्रशास्त्रावर विश्वास नाही.” पण नंतर तुम्हांला वाटते, “मी माझ्या जीवनात अपयशी असा आहे. मी ज्यात आहे त्यात मला कोणतीच आशा नाही.” तुम्ही अंतःकरणात हेलकावे खात असता. एक अंशी तुम्ही देवाशी बंड करता व एक अंशी तुम्ही विश्वास ठेवता की देवामध्ये आशा आहे. तो तुमच्या आतील संघर्ष आहे. आज या संध्याकाळी तुम्ही हजर असलेले प्रत्येकजण अशाप्रकारच्या संघर्षातून गेलेला आहांत.
आज या संध्याकाळी मी जेव्हां या रांगेतून मागे पुढे पाहतो आणि गोष्टी मागून गोष्टी येथे उपस्थित असलेल्या तरुणांना सांगतो. तेव्हां प्रत्येकजणांमध्ये असलेला आतील संघर्ष पाहतो. कदाचित अगदी तो तुमच्या संघर्षासारखा नसेल, पण त्यात सारखेपणा असतोच. कांही अंशी तुम्हांला वाटते मंडळीत परत यावे व तेथे देव व तारण आहे अशी आशा धरता आणि दुस-या कांही अंशी तुम्ही देव, पवित्रशास्त्र व प्रचारक यांच्या विरुद्ध बंड करता.
प्रथम, तुमच्या या आतील संघर्षाचे स्त्रोत काय आहेत? प्रथम, तेथे जग (आईवडिल, मित्र, मौजमजा) आहे. मग तेथे तुमची दैहिकता (तुम्हांला मंडळीला येऊ वाटत नाही, मुक्त लैंगिकता, तुमच्या स्वतःच्या गोष्टी करणे). त्यानंतर तेथे सैतान आहे. दुस-या बाजूला, पवित्र आत्मा आहे. तो एक हलकासा आवाज आहे जो तुमच्या सदसद्विवेक बुद्धीशी बोलत असतो. तो तुम्हांला येशूकडे या व स्थानिक मंडळीत या अशी साद घालतो. त्यामुळे, तुमच्या जीवसाठी संघर्ष सुरु होतो. एका बाजूला देव बोलावित असतो – आणि दुस-या बाजूला पाप व जगिक आनंद खुणावीत असतो.
पवित्रशास्त्र म्हणते, “परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा;...तुमच्या पूर्वजानी ज्या देवाची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहां त्या देशातल्या अमो-यांच्या [अमेरिकन] देवाची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार” (यहोशवा 24:15). तुम्हांला निवड करावी लागेल. दुर्दैवाने, तुमच्यापैकी पुष्कळ चुकीची निवड करणार. माझ्या 60 वर्षाच्या सेवेच्या अनुभवावरुन मी सांगतो की तुम्ही चुकीची निवड करणार. पवित्रशास्त्र म्हणते,
“ते जीवनाऐवजी मरण पसंत करतील” (यिर्मया 8:3).
तुमचे काय?
दुसरे, तुम्ही योग्य निवड का करता? तुमही या साथानिक मंडळीत का येता व दर रविवारी येथे का थांबता? तुम्ही येशूकडे का येता व का परिवर्तित झाला आहां?
1. कारण ते तुम्हांला जगण्यासाठी कारण देते.
2. कारण ते तुमचे अपयशीपणा दूर करते. ज्याला ख्रिस्त मिळत नाही तो अपयशी आहे.
3. कारण ते तुम्हांस तुमच्या भविष्यासाठी आशा देते.
4. कारण ते तुमचा अपराध नाहीसा करते व तुम्हांस विपुलतेच्या व शांतीच्या जीवनात घेऊन जाते.
+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +
आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.
+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +
सर्वप्रकारच्या जाचातून जाऊन सुद्धा सबीना वुर्मब्रँड ह्या एक तेजस्वी, हसणा-या आनंदी महिला होत्या कारण ती येशूला वैयक्तिकरित्या ओळखीत होती. आम्ही स्वतंत्र बाप्टिस्ट मंडळी म्हणून ओळख होण्यापूर्वी सबीना आमच्या मंडळीत होती. मला व माझ्या पत्नीला पाळक व मिसेस वुर्मब्रँड यांच्याबरोबर त्यांच्या घरी रात्रौभोज होते. ख्रिस्तासाठी तिने सर्वस्व त्यागले होते. परंतू मी ओळखतो अशांपैकी सर्वात आनंदी महिला ती होती.
जे कांही वर्षाहून अधिककाऴ येथे आहेत त्यांना विचारा! सबीना वुर्मब्रँड यांना विचारा, ज्या आता स्वर्गात आहेत! त्या तुम्हांला सांगतील की हे खरे आहे! तुम्ही स्थानिक मंडळीत असावे व परिवर्तित झालेले असावे म्हणून तुम्हांला वाटते कारण ती योग्य निवड आहे. त्यामुळे हलकासा आवाज तुमच्या अंतःकरणात येऊन म्हणतो, “तुम्हांला माहित आहे की तो बरोबर आहे.”
मग तिसरे, मला तुम्हांला सांगू द्या की तुम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन जगायचे असेल अशा कांही गोष्टी आहेत त्या तुम्ही सोडल्या पाहिजे आणि कांही गोष्टी तुम्ही करायला सुरुवात केली पाहिजे.
येशू म्हणाला:
“माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्यांने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे” (मत्तय16:24).
जेव्हां तुम्ही पवित्रशास्त्राकडे येता तेव्हां कळते की देव संपूर्ण समर्पणाची मागणी करतो.
पाहा आब्राहामाला देवाने काय मागणी केली. एके दिवशी परमेश्वर म्हणाला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यांस घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”
आब्राहामाने देवाचे आज्ञा पालन केले व गेला व आपल्या पुत्राला वेदीवर ठेवले आणि एक लांब धारदार सुरा घेतला व देवाच्या आज्ञनुसार आपल्या पुत्राच्या छातीत घुसविण्यास पुढे केला. पण देवाने हात वरच्यावर थांबविला. परमेश्वर म्हणाला, “ आब्राहामा, बस पुरे झाले. मला ठाऊक आहे की येथून पुढे सर्व मार्गात माझ्याबरोबर जाण्यास तूं तयार आहेस.”
किंवा मोशेला घ्या. मोशे हा फारोच्या मुलीचा दत्तक मुलगा होता. तो मिसरच्या राज सिंहासनाचा वारस होता. त्याकाळातील जगातल्या महान राज्याचा तो राजा होऊ शकला असता. माणसाला लागणारी सर्व श्रामंती व सर्व सामर्थ्य व सर्व वैभव त्याच्याकडे होते. पण देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करण्यासाठी त्याने त्याच्या सर्वस्वाकडे पाठ फिरविली. त्याचा उपयोग करण्यासाठी सर्वकांही सोडण्याची आज्ञा देवाने त्याला केली. आणि मग देवाने त्याला अरण्याच्या विरुद्ध बाजूला त्याने अभ्यास करावा, प्रार्थना करावी व शिकावे याचे नियोजन केले.
किंवा योसेफ. योसेफाला त्याच्या भावांनी गुलाम म्हणून विकले होते. पोटीफरासाठी काम करण्यासाठी त्याला मिसरला जावे लागले. तो त्याचे कुटुंब व मित्रांपासून खूप दूर होता. तो कोवळ्या वयाचा तरुण होता. त्याने तडजोड केली असती. तर देवाशिवाय, कोणालाच समजले नसते. पोटीफराची पत्नी खूप सुंदर होती. तिने त्याच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पोटीफराच्या पत्नीच्या मदतीने तो राज्यात वरच्या पदाला जाऊ शकला असता — पण त्याने नकार दिला. जेव्हां तिने त्याला पकडले तेव्हां त्याने त्याचे कपडे तेथेच टाकले. याचा अर्थ त्याला तुरुंगवास व मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली. या तरुणाची देव परिक्षा घेत होता यासाठी की तो खरा आहे. नंतर त्याला तुरुंगातून सोडले आणि त्या मिसराच्या भूमीत दुस-या क्रमांकाचे सर्वोच्य पद देऊन त्याला उंच केले.
“माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्यांने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे” (मत्तय16:24).
किंवा दानिएल घ्या. ते म्हणाले, “दानिएला, बाबेलोनमध्ये आता प्रार्थना नाही. जर तू प्रार्थना करशील तर, तुला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल.”
पण दानिएलाने खिडकी उघडी ठेऊन तीन वेळा प्रार्थना केली. तो देशाचा पंतप्रधान होता तरी, त्यांनी त्याला सिंहाच्या गुहेत टाकले. आणि देव सिंहाची तोंडे बंद करणार हे दानिएलास ठाऊक नव्हते. देव त्यास किंमत मोजण्यास बोलावित होता आणि तो हे करण्यास तयार होता.
आणि येशू या संध्याकाळी म्हणत आहे,
“माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्यांने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे” (मत्तय16:24).
याचा अर्थ असा की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे बनता. सध्याचे बरेच तरुण सारखाच पोषाख करतात. ते सारखे दिसतात. ते सारखेच वागतात. ते वेगळे बनण्यास घाबरतात. डोक्याचे केस भादरुन नाकात बाली घालणारा तुमचा मित्र असेल तर, डोक्याचे केस भादरावे व नाकात बाली घालावी असे तुम्हांला सुद्धा वाटते — त्यामुळे तुम्ही वेगळे दिसणार नाही — त्यामुळे त्यात फिट होणार. पण पवित्रशास्त्र तुम्हांला कांहीतरी वेगळे होण्यास बोलाविते — मोठ्या समुदायातून बाहेर यावे आणि मानसिक व आध्यात्मिक प्रस्थापितांशी सहमत नसणारा व्हावे.
देव नाही किंवा देवाशी मला देणे घेणे नाही असे इतर जेव्हां म्हणतात तेव्हां, तुम्ही उठून म्हणायला हवे की देव आहे व त्याने फरक पडतो आणि देव माझ्याशी संबंधीत आहे व देव माध्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे! दुस-या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान रोमानियातून यहुद्यांना चोरुन बाहेर काढल्याने त्यांचे दोन भाऊ व त्यांची बहिण, आणि त्यांचे आईवडिल यांना हिटलरच्या राजकीय गुन्हेगाराच्या कोठडीत घातले तरी, सबीना वुर्मब्रँड यांनी ते केले.
जेव्हां दुसरे म्हणतात, “बाप्टिस्ट मंडळीत परत जाऊ नकोस. माझ्याबरोबर ये. चल कुठे तरी जाऊ,” तुम्ही म्हणायला हवे की, “नाही. मी तिथे जातोय, मला देव पाहिजे. काहीही किंमत असो हरकत नाही मला येशू ख्रिस्त पाहिजे! मला त्या क्रांतीकारी प्रचारकाचे पुन्हां ऐकायचे आहे. बाप्टिस्ट टॅबरनिकल मध्ये जे लोक आहेत ते मला पाहिजेत!”
जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.
ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.
एकेरी गीत मि. जॅक नगान यांनी गायले: “द मास्टर हॅथ कम”
(सारा डाऊडनी, यांच्याद्वारा, 1841-1926).
“The Master Hath Come” (Sarah Doudney, 1841-1926).