संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
सुवार्तेमध्ये – जे आपण करतो ते आपण का करतोWHY WE DO WHAT WE DO – IN EVANGELISM डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लिखीत “सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करुन घेऊन ये” |
आपण सुवार्ताकार्य करतो ज्यामुळे लोक शुभवर्तमान ऐकून आपल्या मंडळीत येतात. इतर मंडळ्यांत, रस्त्यावर लोकांसह मंडळीचे सभासद “पाप्यांची प्रार्थना” म्हणतात आणि हा “निर्णय” घेतल्या नंतर मंडळीत येण्यास आमंत्रण देतात. परंतू पहिली गोष्ट जी आपण करतो ती आहे मंडळीत येण्यास लोकांना आमंत्रण देतो. त्यानंतर आपण त्यांना मंडळीत आणतो. ते मंडळीत येतात, तेव्हां ते मित्र बनवितात. प्रचार केलेले शुभवर्तमान ते ऐकतात. त्यातील कांही थांबतात व ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. ते अद्भूत ख्रिस्ती होतात. ही नवीन पद्धत आपले पाळक, डॉ. हायमर्स यांच्याकडून आली आहे. हे त्यानी शोधून काढले कारण हरविलेल्या लोकांना मंडळीत आणण्यास इतर सर्व पद्धती निष्फळ आहेत हे त्यांना समजले.
डॉ. हायमर्स यांची पद्धत काय आहे? सुवार्तेमध्ये आपण जे करतो ते काय आहे? आपण बुधवारी रात्री, गुरुवारी रात्री व इतर वेळी दोघे-दोघे लॉस एंजिल्सच्या भागातील महाविद्यालय, शॉपिंग मॉल व इतर सार्वजनिक ठिकाणी जातो. आपल्यातील पुष्कळजण हे आपल्या आपण करतात. ह्या ठिकाणी, आपण लोकांकडे जातो व त्यांच्याशी बोलतो. ताबडतोब ते ख्रिस्ताकडे यावेत म्हणून आपण प्रयत्न करीत नाही. आपण त्यांना “पाप्यांच्या प्रार्थनेत” चालवत नाही. त्याऐवजी, आपण मंडळीत काय आवडते ते त्यांना सांगतो. मंडळीत पुष्कळ माणसे व स्त्रीयां आहेत ज्यांना ते मित्र बनवितात. तेथे ऐकायला एक उपदेश असेल. तेथे दुपारचे जेवण असेल (जर ते सकाळी आले असतील तर) किंवा रात्रोभोज (संध्याकाळी). ते सिनेमा पाहतील. ते मेजवाणीत असतील – आपण मंडळीत प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करतो. त्यांना मोठ्या आनंदाचा दिवस असेल. त्यांच्यातील कित्येक जण येऊ पाहतील!
मग त्यांना आपण प्रथम त्यांचे नाव व त्यांचा मोबाईल क्रंमांक विचारतो. त्यानंतर, ही नावे व मोबाईल क्रंमांक आपल्या डिकन व इतर अनुभवी ख्रिस्ती कामक-याकडे देतो. मग ही कामकरी माणसे लोकांना फोन करतात, आपल्या मंडळी विषयी सांगतात, येण्याचे आमंत्रण देतात, आणि आपल्या एका सभासदांबरोबर रविवारी मंडळीत येण्यास एक सवारी आयोजित करतात. रविवारी, आपण त्यांना घेतो, मंडळीत आणतो, आणि परत घरी नेतो. पुष्कळ लोक पहिल्या रविवारी त्यानी फोन केल्यानंतर लोक मंडळीत येतात. त्या दिवशी इतर कामात व्यस्त असतात व नंतर येतात. जेव्हां ते मंडळीला येतात, प्रचार केलेला उपदेश ते ऐकतात आणि भोजनाच्या वेळी व त्यानंतर मित्र बनविण्याची संधी असते – आणि त्यातील पुष्कळ परत येतात!
ही पद्धत काम करते! शेवटच्या पाच आठवड्यात, शंभरच्या वर लोक पहिल्यांदा, दुस-यांदा किंवा तिस-यांदा आमच्या मंडळीत आले. आणि त्यातील कांही मंडळीत थांबले व ख्रिस्तावर विश्वास ठेवला. ही पद्धत खरेतर लोकांना आपल्या मंडळीत आणते. हे काम करते!
लुक 14:23 मध्ये ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे “सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करुन घेऊन ये” असे आपण शुभवर्तमान सांगताना डॉ. हायमर्सनी मार्ग तयार केला. प्रथम, आपण हरविलेल्या लोकांना मंडळीत आणतो. तेथे ते शुभवर्तमान ऐकतात व ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. आधुनिक अमेरिकी मंडळ्या ह्यास मागे खेचतात. ते लोकांना रस्त्यावरच लगेच “निर्णय” घेण्यास भाग पाडतात. पण त्यातील कोणीच मंडळीत येत नाही. त्यांच्या पद्धतीने निर्णय होतो, पण परिवर्तन नाही. त्यांच्यापेक्षा वेगळे शुभवर्तमान आपण का सांगतो ते मी आज स्पष्ट करतो.
नावे मिळावीत व मंडळीत येण्याचे लोकांना आमंत्रण देण्यास बाहेर का जावे, आणि जेव्हां लोकांशी बोलतो तेव्हां त्यांचे तारण होण्याचा प्रयत्न का करीत नाही?
प्रथम, आपला मार्ग हा पवित्रशास्त्रीय आहे. संपूर्ण नवीन करारात हे आहे. अंद्रिया हा बारा शिष्यापैकी होता. पवित्रशास्त्र म्हणते,
“योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला; तेव्हां तो त्याला म्हणाला, मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हांला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले” (योहान 1:40-42).
अंद्रियाला यातील कांहीच माहित नव्हते. पण त्याला ठाऊक नव्हते की येशू मशीहा होता. अंद्रिया लोकांसह पाप्यांची प्रार्थना करण्यास बाहेर गेला नाही. पण त्याने आपला भाऊ शिमोन पेत्रास येशूकडे आणले. पेत्र स्वत: शिष्य बनला. नतंर पेत्राचे परिवर्तन झाले व पेंटाकॉस्टच्या दिवशी त्याने प्रचार केला तेव्हां तीन हजार लोकांनी विश्वास ठेवला. पण ह्याची सुरुवात जेव्हां त्याने त्याच्या भावाचे अनुकरण केले व येशूला भेटला तेव्हां झाली होती.
फिलीप्प शिष्याने सुद्धा हीच गोष्ट नथनेलला सांगितली. तो नथनेलला म्हणाला. “येऊन पाहा” (योहान 1:46). फिलीप्पाला अधिक कांही माहित नव्हते. पण त्याने नथनेलला येशूकडे आणले, आणि त्याचा सर्वात मोठा बदल झाला.
एके दिवशी येशू शोमरोनातून येशू गेला आणि त्याने एका स्त्रीचे तारण झाले. तिला पवित्रशास्त्र माहित नव्हते. ती यहुदी नव्हती. पण तिने येशूवर विश्वास ठेवला. ती तिच्या नगरात गेली नाही आणि पाप्यांची प्रार्थना म्हणण्यास लोकांना सांगितले नाही. पण तिने त्यांनी येऊन येशूला पाहावे म्हणून त्यांना बोलाविले. पवित्रशास्त्र म्हणते,
“ती [शोमरोनी] स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरांत गेली व लोकांना म्हणाली चला, मी केलेले सर्व कांही ज्याने मला सांगितले; तो मनुष्य पाहा; तोच ख्रिस्त असेल काय? ” (योहान 4:28, 29).
+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +
आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.
+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +
प्रत्येक जण हे करु शकतो – त्याचे तारण झाले नसले तरी. तुम्हांला पवित्रशास्त्राचे सिद्धांत शिकण्यास वर्गात जाण्याची गरज नाही. तुम्ही लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यांचे रस्त्यावर तारण होण्यासाठी प्रयत्न करीत नाही. तुम्ही केवळ त्यांना मंडळीत येण्याचे आमंत्रण देता, मित्र बनविता आणि मौजमजा करता. ते सगळेच असे करतात – आणि आम्हीहि तेच करतो.
दुसरे, कारण आपली पद्धत काम करते. पुष्कळ मंडळ्या सुवार्तेचे काम बिल्कुल करीत नाहीत. पण जर ते करतात, लोकांना बोलण्यासाठी रस्त्यावर किंवा त्यांच्या दारी जातात. ते लगेच हरविलेल्या लोकांना “तारणाची योजना” देतात व त्यांना “पाप्यांची प्रार्थना” म्हणण्यास सांगतात. ही “निर्णायकता” होय. व्यक्ति जो निर्णय घेतो त्यास परिवर्तन असे समजतो. त्या व्यक्तीला “तारण पावला” असे गणतात. त्यानंतर, या लोकांचा “पाठपुरावा” करतात – पण त्यातील अगदी नगण्य मंडळीत येतात. माझे वडील, डॉ. कागॅन यांनी मूलभूत बाप्टिस्ट मंडळीस एकदा भेट दिली जेथे एका आठवड्यात – 900 वर लोकांबरोबर त्यांनी प्रार्थना केली – पण मंडळी केवळ 125 लोकांबरोबर राहिली. 900 जणांनी निर्णय केला, पण ते मंडळीत कधीहि आले नाहीत. त्यांनी एक प्रार्थना केली, पण ख्रिस्ताकडे येत नाही.
मंडळ्या ज्या ते करतात आम्ही ते का करीत नाही? ते काम करीत नाही. मंडळीचे सभासद शेकडो लोकांना पाप्यांची प्रार्थना करायला लावतात. पण त्यातील कोणीच मंडळीत येत नाही. ते ख्रिस्ती होत नाहीत. ते निर्णय करतात पण ते परिवर्तित होत नाहीत.
आपण जेथे त्यांना भेटतो तेथे पाप्यांना ख्रिस्ती करण्यास प्रयत्न का करीत नाहीत? कारण ते ख्रिस्ती झालेले नाहीत! त्याऐवजी, आम्ही बाहेर जाऊन मंडळीत लोकांना आमंत्रित का करीत नाहीत. आपण त्यांना त्यांचे प्रथम नाव व फोन नंबर विचारतो. रविवारी ते मंडळीत येण्यास व त्यांना घोडस्वार आयोजित करुन आपले डिकन व पुढारी त्यांना फोन करतात. त्यांना आपण आपल्या कारमध्ये घेतो व मंडळीत आणून सोडतो. आपण त्यांच्याशी मैत्री करतो. आम्ही नेहमी रविवार सकाळच्या उपासनेनंतर दुपारभोज देतो, आणि रविवार संध्याकाळच्या उपासनेनंतर रात्रभोज देतो. त्यांना आपण मंडळीत आनंदी ठेवतो. त्यानंतर आपले डिकन व सेवेकरी त्यांना फोन करुन पुन्हां येण्यास आमंत्रण देतात.
आपण जे करतो ते आपण का करतो? कारण ते काम करते. आपल्या पद्धतीने लोकांना मंडळीकडे, आणि मंडळीत आणतो. मंडळीत ते सुवार्ता प्रचार ऐकतात. कांही लोक लगोलग ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, पण कांहीना परिवर्तन होण्याच्या अगोदर कांही आठवडे किंवा कांही महिने सुवार्ता प्रचार ऐकावा लागतो. त्यानंतर ते मंडळीत संपूर्ण जीवन ख्रिस्ती म्हणून जगतात. दुसरी पद्धत ही फोनी चाल जी कोणसहि जिंकत नाही!
कांही महिन्यापूर्वी मी माझे वडील डॉ. कागॅन व नोहा साँग यांच्यासह आफ्रिकेला गेलो होतो. आम्ही युगांडा, केनिया व रवांडा येथील मंडळ्यात प्रचार केला. केनियामध्ये पाळकीय परिषदेत आम्ही बोललो. सभा दुपारी उशीरा संपली. डॉ. कागॅन पाळकांना म्हणाले, “बाहेर जा व नावे मिळवा.” आम्ही नैरोबी, केनियाच्या रस्त्यावर स्वाहिलीत भाषातंरासाठी पाळकांसह गेलो. आम्ही लोकांशी बोललो व त्यांचे फोन नंबर घेतले. आम्ही त्यांना मंडळीत बोलाविले. पाळकांनी त्यांना फोन केले व त्यांची येण्याची व्यवस्था केली. पुढच्या दिवशी पाच अभ्यागत होते! आम्ही रवांडाला गेल्यानंतर, पाळकानी तसेच पुन्हां केले व त्या रविवारी आणखी पाच अभ्यागत आले!
प्रचारक उत्साही होते. त्यांना कळाले की ही पद्धत काम करते! त्यांना आम्हांस सांगितले की त्यांनी पुष्कळ श्रम व पैसा या सभेसाठी घातला जेथे पुष्कळ लोकांनी निर्णय घेतला, पण त्यातील कोणीहि मंडळीत आले नाही. सुवार्तेसाठी केवळ हीच एक पद्धत आहे असे पाळकांना वाटत होते. आमची पद्धत ज्यामुळे लोक मंडळीत येतात, ती शिकून त्यांना आनंद झाला.
तिसरे, केवळ बोलाविलेल्यांसाठी नव्हे तर, तुम्हां करिता आमची पद्धत चांगली आहे. तुम्ही नियमीत सुवार्ताकार्य करीत असला तर ती तुम्हांला एक सामर्थ्यवान ख्रिस्ती बनविल. आणि तुम्ही बोलाविलेले लोक, मंडळीत थांबलेले, व ख्रिस्तावर विश्वास ठेवणा-यांना तुमचा विश्वास वाढलेला दिसून येईल. तुम्ही लाकांना मंडळीत येण्यास बोलाविताना कोणीतरी तुम्हांस पाहाते तेव्हां तो खूप मोठा आनंद आहे. त्यांचे तारण होताना पाहाणे हाहि मोठा आनंद आहे. मी आशा करतो की तो आनंद तुम्हाला मिळावा!
आपण हस्तपत्रिका का वाटत नाही? कांही लोक करतात. तुम्हांला कदाचित हस्तपत्रिका काय हेच तुम्हांला माहित नसेल. हस्तपत्रिका हा एक कागदाचा तुकडा असतो, तो घड्या घातलेला असतो, आणि तो मोठ्याप्रमाणात वाटला जातो. हस्तपत्रिकेतून कथा व तारणाची योजना सांगितली जाते. शेवटी हस्तपत्रिकेत दिलेली प्रार्थना किंवा त्याच्या नावाचे गीत म्हणावयास सांगून त्या व्यक्तीला ख्रिस्तावर विश्वास ठेवायला सांगितला जातो.
पुष्कळ मंडळ्यांचे लोक ह्या हस्तपत्रिका वाटतात. त्यांना वाटते ते लाकांना ख्रिस्ताकडे आणतायत. परंतू हस्तपत्रिका लोकांना आणत नाही. ते त्यांना मंडळीत आणीत नाहीत. ते लोक कुठे आहेत? हस्तपत्रिका ह्या वेळ व पैसा याचा अपव्यय आहे. त्यामुळे ते वापरु नका.
आपणांस कसे कळेल? आपण त्याचा प्रयत्न केला. आम्ही लाखो हस्तपत्रिका वाटल्या. लोक त्या वाचल्या. पण त्यातील कोणीहि मंडळीत आले नाही! तो कागद वाचून त्यांचे परिवर्तन झाले नाही. ती पद्धत पवित्रशास्त्रीय नाही. लोकांना हस्तपत्रिका वाटा म्हणून पवित्रशास्त्र कधीहि सांगत नाही. पण पवित्रशास्त्र सांगते की सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करुन घेऊन ये – स्थानिक मंडळीत! आणि त्यामुळे आम्ही ते करतो.
आमही बाहेर दोघे दोघे का जावे? कारण येशूने त्याच्या शिष्यांना तसे पाठविले. पवित्रशास्त्र म्हणते, “नंतर त्या बारा जणांस आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला” (मार्क 6:7). पुन्हा, पवित्रशास्त्र म्हणते, “ह्यानंतर बाहत्तर जणांस [नेमून] ज्या ज्या ठिकाणी तो स्वत: जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्याने आपणांपुढे पाठविले.” (लुक 10:1).
अर्थात, तुम्ही स्वत:देखील सुवार्तेस जाऊ शकता. पवित्रशास्त्र त्याला कधीहि प्रतिबंध करीत नाही. त्यात काय गैर कांही नाही. पण दोघे दोघे जाणे हे पवित्रशास्त्रीय आहे, आणि ते काम करते!
दोघे दोघे जाण्याने मंडळीत अधिक लोक येतात. लॉस एंजिल्स व इतर मोठ्या नगरात, लोक सांशक आहेत. ज्यांच्याशी ओळख नाही त्यांच्याशी ते बोलू इच्छित नाहीत. वृद्ध लोकांविषयी तरुण पीढी सांशक आहे. मुलीविषयी मुले सांशक आहेत. दोन लोक बाहेर जाण्याने त्यांची भीती जाते व अधिक लोकांची नावे आणतात.
दोघे दोघे जाणे हे तुमच्यासाठी चांगले आहे. अधिक अनुभवी ख्रिस्ती लोकांबरोबर जाऊन, लोकाना मंडळीत कसे बालवायचे आणि ते करताना स्वस्थ कसे असावे हे शिकणे. सुवारतीला, तुम्ही घाबरुन जाल. कायकरायचे ते तुम्हांला ठाऊक नाही. कोणाबरोबर जाण्याने तुम्ही ते कसे करायचे हे शिकता. लवकरच तुम्ही स्वत: माणसांची नावे घेऊन याल!
तुमची चांगली ख्रिस्ती सहभागिता होईल. तुम्ही येशूकरिता काम केल्याने तुमच्या ख्रिस्ती लाकांच्या जवळ असाल. “कामाची सहभागिता” ही सर्वात उत्कृष्ठ सहभागिता होय.
दुसरी पद्धत काम करीत नाही हे कसे ओळखावे? आम्ही गेले कित्येक वर्षे ती वापरतोय! बिली ग्रॅहमची हस्तपत्रिकेसह तारणाची योजना घेऊन आम्ही दारो दार गेलो. त्यांच्या दारात, किंवा रस्त्यावर त्यांच्यासह आम्ही पाप्यांची प्रार्थना म्हटली. आम्ही लाखो हस्तपत्रिका वटल्या. पण लोक कांही आले नाहीत. त्यांचे परिवर्तन झाले नाही. ह्या पद्धतीने काम झाले नाही.
पण आमची पद्धत काम करते! लॉस एंजिल्सच्या मध्यभागी आमची मंडळी आहे. लॉस एंजिल्स हे नगर देवहीन व दुष्ट आहे. सर्व प्रकारची पापे येथे होतात. लोक व्यवसाय व शाळा व कुटुंब व मित्र यांच्यात व्यस्त आहेत. तेथे मन विचलीत करणार असे, दूरदर्शन, इंटरनेट व आयफोन्स व सर्वकांही भरपूर आहे. खूप कमी लोक मंडळीत जातात. त्यातील खूप थोडे खरे ख्रिस्ती आहेत. आम्ही लोकांना रस्त्यात प्रार्थनेत चालविले. पण त्यामुले मंडळी उभारली नाही. त्यामुळे आम्ही आत्मे जिंकू शकलो नाही.
आम्ही अनुभवातून शिकलो. आम्ही बाहेर गेलो व लोकांना मंडळीत बोलाविले. मग त्यांना आम्ही मंडळीत आणले जेथे त्यांना मित्र भेटले व ते सुवार्ता ऐकू शकले. आमच्या मंडळीत हरविलेले लोक दर रविवारी असतात. ते दुस-या मंडळीतून येत नाहीत. ते ख्रिस्ती घरातून येत नाहीत. ते अशा जगातून येतात जेथे सर्व प्रकारचे पाप आहे. आणि त्यातील कांही सुंदर ख्रिस्ती बनलेत. त्यामुळे आमची ही मंडळी आत्मिक व जिवंत आहे. आमच्या पद्धतीने लोक खरे ख्रिस्ती बनतात, आणि त्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद देतो! आमेन.
जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.
ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.
उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. मॅक नॅन यानी गायले:
“त्यांना आत घेऊन या” (अलेक्सेनाह थॉमस यांच्याद्वारा, 19 वे शतक).
Solo Sung Before the Sermon by Mr. Jack Ngann:
“Bring Them In” (by Alexcenah Thomas, 19th century).