संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
चीनमधील यशाचे रहस्य(चीनी मध्य-शरद ऋतूतील उत्सवात दिलेला उपदेश) डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “तुझी कृत्यें, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, (करी तूं धनवान आहेस)...” (प्रकटी. 2:9). |
आरंभीच्या काळातील एक चीनी ख्रिस्ती आत्मचरित्र लेखक वॅंग मिंगदाऊ म्हणाले,
चीनी सरकारचे कोणतेही धोरण असो, येणा-या पीढीसाठी चीनमधील मंडळ्यांचा जगभरातील ख्रिस्तीत्वाच्या आकारावर खोलवर परिणाम होतो. [अंदाजे] सात कोटी आत्मे [आता 16 कोटी] व 7 टक्के वार्षिक वृद्धिदर आहे, चीनमधील ख्रिस्ती लोकांची संख्या ही पृथ्वीवरील पुष्कळ राष्ट्रांतील ख्रिस्ती संख्येच्या तुलनेने लहान आहे. संपूर्ण प्रगत जगतातील ख्रिस्ती लोकांसारखे, चीनी ख्रिस्ती हे एक-वीसाव्या शतकातील मंडळ्यातील ख्रिस्ती लोकांचे आघाडीच्या [वरच्या दर्जा] प्रतिनीधीत्व करतात (थॉमस ॲलन हार्वे, ॲक्वेंटेड वुईथ ग्रिफ, ब्रॅझोज मुद्रणालय, 2002, पृष्ठ 159)
डेव्हीड ऐकम, त्यांच्या जीजस इन बिजिंग, पुस्तकात म्हणाले,
केवळ संख्येने नव्हे, तर बौद्धिक केंद्राच्या शक्यतेचा विचार करता हे योग्य आहे की...चीनमध्ये ख्रिस्ती वाढत असतांना व चीन हे वैश्विक सामर्थ्यशाली होताना युरोप व दक्षिण अमेरिकेतून ख्रिस्तीत्व निर्णायकपणे दुसरीकडे जाऊ शकते...चीनच्या गृह मंडळ्यांच्या पुढा-यांच्या आशा व कार्यात कदाचित ती प्रक्रिया पूर्वीच सुरु झालेली असेल (डेव्हीड ऐकम, जीजस इन बिजिंग, रिजनरी पब्लिशिंग, 2003, पृष्ठ 291, 292).
स्मुर्णा येथील मंडळीतील ख्रिस्ताचे वर्णन हे सध्याच्या चीनमधील “गृह मंडळी” चळवळीत जे घडत आहे त्याचे चित्रण आहे,
“तुझी कृत्यें, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, (करी तूं धनवान आहेस)...” (प्रकटी. 2:9).
स्मुर्णा येथील मंडळीच्या संदर्भात, डॉ. जेम्स ओ. कोम्बस् म्हणाले,
स्मुर्णा, इफिसच्या दक्षिणकडे असलेली, एक मंडळी एक दशक पॉलीकार्प यांच्याद्वारा पाळकत्व केलेली आणि जे त्यांच्या 90 दीत इ.स. 155 मध्ये रक्तसाक्षी झाले...त्यांनी भयंकर क्लेश सहन केले व जगीक संपत्तीची जप्ती सहन केली, पण ते आध्यात्मिक श्रीमंत होते (जेम्स ओ. कोम्बस्, डी. मिनी., लिट.डी., रेनबोज फ्रॉम रिव्हलेशन, ट्रायब्युन पब्लिशर्स, 1994, पृष्ठ 33).
स्मुर्णा येथील मंडळी प्रमाणे, चीनच्या गृह मंडळ्यांतील विश्वासू ख्रिश्चन हे भयंकर दु:ख व “छळ” सहन करीत आहेत जरी ते आध्यात्मिक “श्रीमंत” असले तरी ते सुवार्तिक कार्य “वार्षिक 7 टक्के” वेगाने वाढत आहे (थॉमस ॲलन हार्वे, ibid.). अशाप्रकारे, चीन मधील ख्रिस्ती लोकांच्या संख्येच्या तुलनेत “जगभरातील ख्रिस्ती लोकांची संख्या खुजी वाटत आहे.” चीन मधील 16 कोटीहून अधिक ख्रिस्ती हे बहुतांशी खरे परिवर्तित झालेले आहेत, आणि ते अगोदरच अमेरिकेतील ख्रिस्ती लोकांपेक्षा अधिक खरे आहेत. हे आश्चर्यकारक आहे! आम्ही स्वत:लाच विचारायले हवे की, “त्यांच्या यशाचे कारण काय आहे? त्यांच्या सुवार्तेचे गमक काय आहे?” त्यांना हे का सांगू नये,
“तुझी कृत्यें, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, (करी तूं धनवान आहेस)...” (प्रकटी. 2:9).
सुवार्तिक ख्रिस्तीत्व अमेरिकेत अजिबात वाढत नाही हे सत्य ध्यानात घेऊन, आणि सत्य हे की सुवार्तिक ख्रिस्तीत्व हे संपुष्टात येत आहे असे पुष्कळ म्हणतात, आम्ही अमेरिकेत असा विचार केला पाहिजे की चीनमध्ये जे काय नाही ते अमेरिकेत आहे, आणि त्यांच्याकडे जे काय आहे ते आपल्याकडे नाही.
+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +
आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.
+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +
I. प्रथम, त्यांच्याकडे जे काय नाही ते आपल्याकडे आहे.
त्यांच्याकडे मंडळीची इमारत नाही! केवळ “तीन-स्वतंत्र” मंडळ्यानां इमारती आहे. “गृह मंडळ्या” ज्या वाढतायत, आणि त्यातील खूप कमी जनांकडे मंडळीची इमारती आहे. त्यातील ब-याच जनांकडे आपल्यासारख्या इमारती नाहीत!
त्यांना सरकारची मान्यता नाही. चीन सरकारकडून त्यांचा सातत्याने छळ केला जतोय. आपल्यासारखे त्यांना धार्निक स्वातंत्र्य नाही!
आपल्यासारखे पाळकांना प्रशिक्षण देण्यास सेमीनरीज नाहीत. चीनमध्ये केवळ कोणाच्यातरी घरात पाळकांना प्रशिक्षण देण्यात येते – आणि ते अगदी थोडके असते दिर्घ नसते. असे “चालू चालूच” जे कांही प्रशिक्षण त्यांना मिळते ते ते घेतात.
त्यांच्याकडे शब्बाथ शाळेसाठी इमारत नाही. “बस सेवेसाठी” त्यांच्याकडे बस नाही. त्यांच्याकडे “ख्रिस्ती टीव्ही” नाही. त्यांच्याकडे “ख्रिस्ती रेडिओ” नाही. त्यांच्याकडे ख्रिस्ती प्रकाशन निवास नाही. त्यांच्याकडे “पॉवर पॉईंट” साठी तसे साधन नाही. त्यांच्याकडे प्रचारकाला मोठ्या पडद्यावर दाखविण्यासाठी प्रोजेक्टकर्स नाहीत. त्यांच्याकडे “ख्रिस्ती रॉक बॅंड” नाही. त्यांच्याकडे ऑर्गन नाही, आणि त्यांच्याकडे पियानो सुद्धा नाही. त्यांच्याकडे शब्बाथ शाळेसाठी छापील साहित्य नाही. त्यांच्याकडे प्रत्येकांकडे पवित्रशास्त्र, किंवा उपासना संगीत नाही. नाही, जे आपल्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही! त्याऐवजी आपल्याकडे तुरळक आढळणारा सरकार करीत असलेला छळ व क्लेश आढळतो. केवळ ते ख्रिस्ती असल्याने त्यांना कधीकधी तुरुंगात जावे लागते. जे खरे ख्रिस्ती होतात त्यांना नेहमीच धोका असतो! www.persecution.com या संकेतस्थळावर जा व चीनमधील छळ याविषयी वाचा. आणि तरीहि चीनमधील ख्रिस्ती हरविलेल्या आत्म्यांना जिंकण्यात यशश्वी आहेत. संपूर्ण चीनमध्ये ख्रिस्ती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय, हे एक आधुनिक जगतातील महान संजीवन होय!
“तुझी कृत्यें, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, (करी तूं धनवान आहेस)...” (प्रकटी. 2:9).
मला भीति वाटते की येशूने लवादिकीया मंडळीचे जे वर्णन केले ते अमेरिकेतील मंडळ्यांच्या वर्णनापेक्षा अधिक चांगले आहे की काय,
“मी श्रीमंत आहे, मी धन मिळविलेले आहे, व मला कांही उणे नाही असे तूं म्हणतोस; पण तूं कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही” (प्रकटी. 3:17).
II. दुसरे, त्यांच्याकडे जे काय आहे ते आपल्याकडे नाही.
त्यांच्याकडे काय आहे जे आपल्याकडे नाही. आणि त्यांच्या यशाचे रहस्य – आणि आपल्या अपयशाचे कारण ते हे पाहा!
ते छळ सहन करतात – आणि अशाप्रकारे ते वधस्तंभ सहन करण्यास शिकतात! पुष्कळ अमेरिकी आठवड्यातील एका संध्याकाळचा त्याग करुन प्रार्थना सभेस देण्याचे दु:ख सहन करु इच्छित नाहीत. पुष्कळ अमेरिकी आठवड्यातील एका संध्याकाळचा त्याग करुन आत्मे जिंकण्यास देण्याचे दु:ख सहन करु इच्छित नाहीत. पुष्कळ अमेरिकी मंडळीत असण्यास रविवार संध्याकाळचा आराम त्यागू इच्छित नाहीत! अमेरिकेतील पुष्कळ पाळकांना वजन घटविण्याची गरज आहे. आपणांस कांही कॅलरीज गमाविणे गरजेचे आहे. पण चीनमध्ये प्रचारक हे सडपातळ आहेत. त्यामुळे ते जोमाने व सामर्थ्याने प्रचार करु शकतात. आपणांला वजन घटविण्याची गरज आहे, नाही तर आपण जोमाने प्रचार करु शकणार नाही. चीनमध्ये सडपातळ माणसे जेव्हां ते प्रचार करतात तेव्हां ते आत्म्याने भरुन जातात. चीनी “गृह मंडळ्यातील” पाळक हे जाडे झालेले मी कधीहि पाहिले नाहीत. चीनमध्ये महान संजीवन आहे याचे आश्चर्य नाही, पण त्याच वेळी अमेरिकेत, आणि पश्चिम जगतात ख्रिस्तीत्व हे शुष्क व रंगहीन झालेले आहे! हे करण्यासाठी कांहीतरी कष्ट घ्यावे लागणार. वजन कमी करण्यास संतुलीत आहार व कमी खाणे यास कष्ट लागतात! देवाला जशी आवड आहे तसे तुम्ही दयाळू मनुष्य होण्यास दु:ख सहन करावे लागेल! महान चीनी सुवार्तिक डॉ. जॉन संग म्हणाले,
मोठे दु:ख महान संजीवन आणते...जे आहे त्याकरिता देव महान उपयोगात...ज्याने सर्वात कठीण परिस्थिती झेलली...अधिक कष्ट अधिक फायदा...आणि शिष्यांच्या जीवनाची तुलना ही जैतुनाबरोबर केली जाते: त्याला अधिक दाबू तेवढे, अधिक त्याच्यातून तेल गळायला लागला. ज्यानी दु;ख भोगले आहे केवळ तेच इतरांना दया [प्रेम] व सांत्वना दाखवू शकतात (जॉन संग, पीएच.डी., द जर्नल वन्स लॉस्ट, उत्तप्ती पुस्तक, 2008, पृष्ठ 534).
येशू म्हणाला,
“माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वत:चा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे” (मत्तय 16:24).
पुन्हा, येशू म्हणाला,
“तुझी कृत्यें, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, (करी तूं धनवान आहेस)...” (प्रकटी. 2:9).
चीनमध्ये ते दु:ख भोगतायत! त्यामुळे ते संजीवनात देवाच्या आशिर्वादाने श्रीमंत झाले आहेत! चला येथे आपल्या मंडळीत आपला स्वनकार करुया, आणि ख्रिस्ताला अनुसरण्यास आपला वधस्तंभ उचलूया – कोणतीहि किंमत द्यायला लागली तरी!
दुसरे, जेव्हां ते हरविलेल्यांसाठी प्रार्थना करतात तेव्हां त्यांच्याकडे अश्रू असतात! एक बंधू, जो ओळखीचा, तो मला म्हणाला, “तेथे चीनमध्ये पुष्कळ अश्रू आहेत.” तो अगदी बरोबर आहे! जेव्हां ते हरविलेल्यांसाठी प्रार्थना करतात तेव्हां ते आश्रू ढाळून रडतात. यात आश्चर्य नाही की तेथे ख्रिस्तासाठी पुष्कळ परिवर्तन झालेले आहेत! पवित्रशास्त्र म्हणते,
“जे अश्रूपूर्ण नेत्रानी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतात” (स्तोत्र 126:5).
हरविलेल्यां आत्म्यांसाठी भग्न ह्दय मिळावे म्हणून प्रार्थना करा! (सर्व प्रार्थना करतात).
तिसरे, हरविलेल्यां आत्म्यांना “गृह मंडळ्यात” आणण्यास ते त्यांच्या सामर्थ्याने काम करतात. डी.एल. मुडी म्हणाले, “त्यांच्यावर प्रेम करा.” अशाप्रकारे चीनमध्ये लोकांना गृह मंडळ्यात आणले जाते – आणि आम्ही सुद्धा तसेच केले पाहिजे! “त्यांच्यावर प्रेम करा.” आत्मे जिंकणे म्हणजे प्राथमिक ख्रिस्तात लोकांवर प्रेम करणे होय – आणि स्थानिक मंडळ्यांत. “त्यांच्यावर प्रेम करा.” हा मुक्तवाद नव्हे! तो “जीवन-शैली” सुवार्तिवाद नव्हे! हे डी.एल. मुडी होय! मला वाटते ते अगदी बरोबर आहेत. ते चीनमध्ये कार्य करते – आणि ते येथे सुद्धा कार्य करील! “त्यांच्यावर प्रेम करा.”
आम्ही सेवेपासून पळून जाऊ तर आपण आत्में जिंकणार नाही. केवळ तोच जो थांबतो तोच आत्में जिंकू शकतो. जो उपासनेच्या पूर्वी व नंतर हरविलेल्यांबरोबर मित्रत्वाने वागतो तोच आत्में जिंकू शकतो. मंडळीत हरविलेल्यां आत्म्यांना आणण्याचा दुसरा मार्ग नाही! आपण “त्यांच्यावर प्रेम केले” पाहिजे – जसे की ते चीनमध्ये करतात! “मला आशिर्वादाचे माध्यम बनीव” हे गीत गा! ते तुमच्या गीतपत्रिकेवर 4 क्रमांकावर आहे.
आज मला आशिर्वादाचे माध्यम बनीव,
आज मला आशिर्वादाचे माध्यम बनीव,
अशी मी प्रार्थना करतो; माझे जीवन अधिकारात घेत आहे, माझी सेवा आशिर्वादित,
आज मला आशिर्वादाचे माध्यम बनीव.
(“मेक मी अ चॅनेल ऑफ ब्लेसिंग” हार्पर जी. स्मिथ यांच्याद्वारा, 1873-1945).
अजून ज्यांचे परिवर्तन झाले नाही अशांना कांही सांगितल्याशिवाय मी समाप्त करणार नाही. तुम्ही मंडळीत येता म्हणजे तुमचे परिवर्तन झाले आहे असे नाही. शास्त्राभ्यास करुन तुमचे परिवर्न होणार नाही. तुम्ही तुमच्या पापाबद्दल पश्चाताप केला पाहिजे. तुम्ही येशू ख्रिस्तीकडे वळला पाहिजे व त्याच्याकडे आला पाहिजे. तो तुमच्या जीवाचे तारण करण्यासाठी दु:खसहन करुन मेला व वधस्तंभावर रक्त सांडले. त्याच्या रक्ताने तुम्ही तुमचे पाप धुऊन शुद्ध केले पाहिजेत. येशूकडे या आणि तुमच्या पाप, मरण व नरक यापासून आपला बचाव करा. तसा अनुभव येवो, हा माझी प्रार्थना आहे. आमेन.
जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.
ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.
उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकेड ग्रिफ्फित यांनी गायले: “येशू माझ्यावर
प्रेम करितो” (अन्ना बी. वार्नर, यांच्याद्वारा, 1820-1915).
“Jesus Loves Me” (Anna B. Warner, 1820-1915).
रुपरेषा चीनमधील यशाचे रहस्य(चीनी मध्य-शरद ऋतूतील उत्सवात दिलेला उपदेश) डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “तुझी कृत्यें, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे,
I. प्रथम, त्यांच्याकडे जे काय नाही ते आपल्याकडे आहे, प्रकटी. 3:17.
II. दुसरे, त्यांच्याकडे जे काय आहे ते आपल्याकडे नाही, मत्तय 16:24; |