Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




तुम्ही पाठीमागे राहणार काय?

WILL YOU BE LEFT BEHIND? (Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 16 सप्टेंबर, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, September 16, 2018

“म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांस ठाऊक नाही” (मत्तय 24:42).


जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांमधून पवित्रशास्त्रातील भविष्यवाणी, आणि जगाचा शेवट ज्याच्याविषयी आपणांस ठाऊक आहे त्यासंबंधी मी वाचतो. जगाचा शेवट होण्यापूर्वी अगदी कमी वेळ शिल्लक राहिला आहे हे आपणांस दर्शविण्यासाठी देवाने ही चिन्हें दिली आहेत.

लॉस एंजिल्स येथील डेली न्यूज मधील ही मुख्य बातमी ऐका.

पुल पडून नष्ट होत आहेत. देशातील एक चतर्थांशापेक्षा जास्त पुल अगदी कमकुवत होऊन, मोडकळीस आलेले किवा संघिय नोंदी नुसार त्यांचा सध्याचा वाहतुकीचा वाजवी पेक्षा जास्त भार त्यावर झालेला आहे जो अमेरिकन रस्ते प्रणालीने तो वेग राखला नाही.

अमेरिका हे जगातील सर्वात महान राष्ट्र आहे, पण आपण आपले रस्ते व पुल सुद्धा वाहतुकीस चालू स्थितीत ठेऊ शकलो नाही!

औषधाच्या तुटवड्याचा फटका रुग्णालयांना बसला. महत्वाच्या लसीच्या मोठ्या प्रमाणातील तुटवड्यामुळे...संपूर्ण देशातील रुग्णालये प्रौढांचे टिटॅनस शॉट्स वितरीत करीत आहेत. रुग्णालयांसाठी हा वर्षातील सर्वात भयंकर अशा तुटवड्यास सामोरे जावे लागत आहे – आणि त्याच्या शेवटाची अपेक्षा करु नका. रुग्णालयांसाठी लागणारी दैनंदिन औषधांचा तुटवडा [सध्या] नेहमीचाच, व दयनीय झाला, कांही चांगल्या पर्यायासह ते उत्पादनाचा समावेश करुन घेतात...[त्याने] रुग्णालये व औषध कंपन्या बाधीत होऊन लढा देण्यास झगडत आहेत...रुग्णालयांना कधीहि नाही असा तुटवडा भासू लागला आहे कारण, गैरवाजवी वैद्यकीय दराचा सामना करावा लागला, पुष्कळांकडे कांही दिवसांपुरताच साठा शिल्लक आहे.

किलीमांजरो बर्फ प्रदेश वितळू लागला. आफ्रिकेतील किलीमांजरो पर्वताच्या शिखरावरील शुभ्र बर्फ नष्ट होत [आहे], आकसाच्या या प्रक्रियेचा साक्षी म्हणजे सर्वत्र हिमनदी आहे. “वातावरणातील बदलांमुळे” बर्फाचा वरचा थर वितळत आहे जो आज रात्रौ संपूर्ण जगास धोका आहे!

मोठ्या भूमिकंपाने पुष्कळ लोक भयकर भयभीत झालेत!

येरुशलेमेत कारमध्ये बाँबचा स्फोट. यरुशलेम जवळील पारंपारिक यहुद्यांच्या शेजारील भागात एक कार बॉम्बचा स्फोट झाला, त्यामुळे इमारती हादरल्या व धातू पडून हवेत धुराचे लोट जातायत.

ह्या सहजपणे घडलेल्या घटना असतीलहि. पण ज्यांना पवित्रशास्त्रातील भविष्यवाण्यां विषयी माहिती आहे त्यांना कळेल की हीच ती चिन्हे होत ज्यामुळे कळते की आपण शेवटच्या काळात राहात आहोत. ज्यांना पवित्रशास्त्रातील भविष्यवाण्यां समजल्या आहेत अशा आपणांस कळते की जगाचा शेवट जवळ आला आहे.

येशू म्हणाला:

“म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांस ठाऊक नाही”
      (मत्तय 24:42).

येशू तारीख ठरविण्याविषयी इशारा देतो (मत्तय 24:36; प्रेषित 1:7). परंतू त्यांने सांगितले की शेवटच्या काळासंबंधीचे चिन्हें पाहा. माझा विश्वास आहे की सध्या आपण सर्व त्याच काळात राहात आहोत. पवित्रशास्त्र शिकविते की शेवट जवळ आला आहे.

पवित्रशास्त्र शिकविते की ख्रिस्त अंतराळात येत आहे. जिवंत व मेलेले, जे खरे पालट झालेले ख्रिस्ती आहेत, ते सर्व अंतराळात त्याला भेटण्यासाठी वर उचलले जातील (संदर्भ I थेस्सल. 4:14-18). कांहीजण जे पवित्रशास्त्रावर विश्वास ठेवीत नाहीत ते पवित्रशास्त्रातील ह्या भविष्यवाण्यांची थट्टा करतात. ते हसतात व म्हणतात की असे कधीच कांही घडणार नाही. पण ते चुकीचे आहेत. लवकरच एके दिवशी अंतराळात वर उचलले जाणे होणार. आणि तुम्ही पाठीमागे राहणार!

अंतराळात वर उचलले जाण्यासंबंधीच्या तीन गोष्टींविषयी थोडक्यात विचार करुया.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

I. प्रथम, अंतराळात वर उचलले जाण्यापूर्वीची परिस्थिती.

अंतराळात वर उचलले जाण्याच्यापूर्वी जग अगदी कसे असणार हे पवित्रशास्त्र आपणांस स्पष्ट सांगते. येशू म्हणाला:

“नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हां जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत ‘नोहा तारवांत गेला’ त्या दिवसांपर्यंत लोक खातपीत होते, लग्न करुन घेत होते, लग्न करुन देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचे होईल” (मत्तय 24:37-39).

नोहा हा धार्मिकतेचा प्रचार करणारा होता (II पेत्र 2:5). न्याय येणार हे त्यांने त्या पीढीला बजाविले होते.पण लोक त्याच्यावर हसले व त्याच्या संदेशाची थट्टा केली. त्यानी त्याचे ऐकले नाही. ते त्यांच्या भौतिकवाद व पापमय जीवनातच गेले.

सध्या तोच प्रकार चालू आहे. कोणीतरी तुम्हांला मंडळीत आणते. तुम्ही उपदेश ऐकता. नंतर तुम्ही तुमच्या जुन्या जीवनपद्धतीकडे परत वळता. तुम्ही पश्चाताप करीत नाही. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवीत नाहीत. आम्ही तुम्हांला फोन करितो, तेव्हां तुम्ही मंडळीत येत नाही.

तुम्हांला मौजमजा करावयाची असते. तुम्ही डॉ. ए. डब्लू. टोजर यांची परिचित म्हणीचा उपयोग करुन म्हणता, जग हे एक “रणभूमी नव्हे तर खेळाचे मैदान आहे.” डिजनी लॅँडसारखे जीवन आहे असे तुम्हांला वाटते. तुमच्या संपूर्ण जीवनाचा उद्धेश हा “मौजमजा” आहे असे तुम्हांला वाटते. दर रविवारी मंडळीत देवासाठी वेळ देण्यास तुम्ही मना करता. कोणतेहि एखादे लहानसे काम आले तरहि, तुम्ही मंडळीत येत नाही. तुमचा ख-यारितीने पालट झालेला नाही. तुम्ही खरे ख्रिस्ती नव्हेत. जेव्हां तुमचा मृत्यू येईल, तेव्हां तुम्ही तयार नसणार. जेव्हां वर अंतराळात उचलले जाणे होईल, तेव्हां तुम्ही पाठीमागे राहणार! जसे की मि. ग्रिफ्फिथने कांही वेळापूर्वी “पुत्र आला, आणि तुम्ही मागे राहिलात” हे गीत गायले.

येशू म्हणाला:

“म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांस ठाऊक नाही”
     (मत्तय 24:42).

II. मग, दुसरे, वर उचलले जाण्यास तयारी केलेली नसणे हे धोकादायक आहे याचा विचार करा.

कृपया मत्तय, अध्याय 25 उघडा. ते स्कोफिल्ड बायबलमध्ये पृष्ठ 1035 वर आहे. जुने प्रचारक म्हणाले की उता-यात उल्लेखलेल्या मुर्ख कुमारिका ह्या ख्रिस्ताला भेटण्यास तयारी केली नसलेल्या लोकांचे प्रतिनिधीत्व करतात. आणि मला पटले की ते बरोबर होते.

ह्या उता-यात, येशूने एक दाखला दिला आहे, गोष्ट जी महान आध्यात्मिक सत्य दर्शविते. कोणत्या महान सत्याविषयी तो बोलतो आहे? मत्तय 25:13 कडे वळा. येशू म्हणाला:

“म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांस मनुष्याचा पुत्र येणार तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही” (मत्तय 25:13).

म्हणून, हा उतारा तुम्हांस इशारा देतोय!

त्यातील पाच कुमारिका तयार होत्या. त्या येशूच्या आगमनासाठी तयार होत्या. पण इतर पाच जेव्हां तो आला तेव्हां त्या तयार नव्हत्या. अधिक खोलवर हा दाखला समजून घेणे घातक आहे. ह्या उता-याचा साधा संदेश हा आहे की: वर उचलले जाण्याच्या वेळी येशू येणार तेव्हां पुष्कळ लोक तयार नसणार.

आता वचन दहाकडे पाहा:

“त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला; तेव्हां त्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले” (मत्तय 25:10).

खरे ख्रिस्ती वर उचलले गेल्या नंतर, दार बंद होणार, जसे नोहाच्या नौकेचे दार बंद केले होते. त्याहून अधिक लोक आत जाणार नाहीत. “आणि दार बंद झाले.”

वचन 11 कडे पाहा,

“त्यानंतर दुस-याहि कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी, आम्हांसाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हांस खचित सांगतो, मी तुम्हांस ओळखित नाही” (मत्तय 25:11-12).

आणि मग, 13 व्या वचनात, येशू तुम्हांस निवेदन करीत आहे:

“म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांस मनुष्याचा पुत्र येणार तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही” (मत्तय 25:13).

आपणांस सर्वसाधारण काळ माहित आहे, पण अचूक दिवस व घटका ठाऊक नाही.

आणि जेव्हां दिवस व घटका येईल, त्यानंतर तुम्हांला खूप उशीर झालेला असेल. उपदेशापूर्वी मि. ग्रिफ्फिथने “पुत्र आला, आणि तुम्ही मागे राहिलात” हे गीत गायले.

III. मग, तिसरे, वर उचलले जाण्याच्या वेळी जे मागे राहतील देव त्यांना सोडून देणार. त्यांना दोषी ठरविण्यात येईल, व त्यांचे तारण होणार नाही.

प्रकटीकरण, अध्याय सोळा ऐका. या उता-या आपण देवाच्या क्रोधाविषयी शिकतो, जो क्रोध ख्रिस्ताला-नाकारणा-यांवर वर उचलले जाणे झाल्या नंतर ओतला जाईल. वचन दोन सांगते की त्यांच्या अंगावर वेदनादायी गळवे येतील. वचन चौथे आपणांस सांगते की जगातील पाणीसाठे विषारी होतील. वचन आठ आपणांस सांगते की माणसे अग्नीने करपतील. वचन दहा सांगते की तेथे मोठा काळोख पडेल व लोक वेदनेने आपल्या जिभा चावतील. वचन अठरा सांगते तेथे मोठा धरणीकंप होईल. वचन एक-वीस सांगते की तेथे “मोठ्या गारा” आकाशातून माणसांवर पडतील.

हे सर्व घडत असतांना काय लोक ख्रिस्ताकडे वळतील? नाही! शेवटचे वचन नऊ ऐका:

“देवाचे गौरव करण्यासाठी त्यांनी पश्चाताप केला नाही” (प्रकटी. 16:9).

आणि वचन अकरावे:

“आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाच्यी निंदा केली आणि कृत्यांबद्दल पश्चाताप केला नाही” (प्रकटी. 16:11).

आणि एक-वीसाव्या वचनाच्या शेवटी:

“[त्यांनी] गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा अतिभयंकर होती” (प्रकटी. 16:21).

तुम्ही पाहाता की, देवानेच त्यांना स्वाधीन केले असणार. तारण होण्यासाठी खूप उशीरा झालेला असणार. त्यांनी अक्षम्य असे पाप केलेले असणार.

“देवानेच त्यांना स्वाधीन केले” (रोम 1:24).

“देवानेच त्यांना स्वाधीन केले” (रोम 1:26).

“देवानेच त्यांना अनुचित कर्मे करणा-याच्या स्वाधीन केले (रोम 1:28).

तसेच मि ग्रिफ्फिथने गायले की, “पुत्र आलेला आहे, आणि तुम्ही पाठीमागे राहिलात.”

तुम्हांस वर अंतराळा उचलले जावे, तुमचे तारण व्हावे असे वाटते, जर तुमच्याशी अजूनहि देव बोलत आहेत, तर आता तुमचे तारण व्हायलाच हवे. तुम्ही आणखी वाट पाहत बसणार तर, तो अधिकच उशीरा झालेला असेल.

मागच्या आठवड्यात उत्तर कारोलिना व दक्षिण कारोलिनाला हुरिकन फ्लॉरेन्स ह्या वादळाचा तडाखा बसला. बाहेर लोकांनी निघावे म्हणून इशारा देण्यात आला होता. राष्ट्राध्यक्षानी त्यांना इशारा दिला होता. राज्यपालानी त्यांना इशारा दिला होता. पोलिस व अग्निशमन दलातील माणसांनी ध्वनीक्षेपातून सोडून देण्याचा इशारा देण्यात आला होता. लोकांना पुन्हां पुन्हां इशारा देण्यात येत होता. पण कांही मुर्ख लोक तेथे थांबले – आणि ते पुरातून वाहून गेले. तुम्हांलाहि ख्रिस्ताच्या आगमना संबंधी इशारा देण्यात आला होता. तुम्ही तो ऐकलेला नसेल तर, वर अंतराळात उचललेच्या वेळी तुम्ही पाठीमागेच राहाल. तुम्ही आणखी वाट पाहत बसणार तर, तुम्हांस अधिकच उशीरा झालेला असेल.

तुमच्या पापांचा दंड देण्यासाठी ख्रिस्त मरण पावला. तो मरणांतून पुन्हा उठला व स्वर्गात देवाच्या उजवीकडे बसला आहे. आताच त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचे रक्त तुमच्या पापाची शुद्धि करील, आणि तुम्ही वर उचलले जाण्याच्या वेली तयार असाल. तुम्ही वाट पाहाल तर, तुम्हालां सांगितले असेल की, “पुत्र आला आहे, आणि तुम्ही पाठीमागे राहणार.” जे मि. ग्रिफ्फिथने गायले, “पुत्र आला आहे, आणि तुम्ही पाठीमागे राहणार.” ते तुमच्या गीत पत्रिकेत 3 क्रमांकावर आहे. उभे राहा व ते गा. भरभर म्हणू नका. शब्दांचा विचार करा!

बंदूकीने व युद्धाने जीवन भरले होते,
   आणि प्रत्येकजण जमीनीवर तुडविला गेला,
मला आशा आहे आपण सर्व तयार आहोत.
   लेकरे मेलीत, दिवस ओलटून गेले,
भाकरीचा एक तुकडा पिशवीभर सोन्याने विकत घ्याव लागला,
   मला आशा आहे आपण सर्व तयार आहोत.
तुमचे मन बदलण्यास वेळ नाही,
   तुम्ही एवढे कसे अंध होऊ शकता?
तारकाने बोलाविले, पण तुम्ही नाकारले,
   पुत्र आला आहे, आणि तुम्ही पाठीमागे राहणार,
तुम्ही पाठीमागे राहणार,
   तुम्ही पाठीमागे राहणार.

पती व पत्नी एकत्र अंथरुणावर झोपले,
   ती आवाज ऐकते व आपली मान वळविते – ती निघून जाते.
मला आशा आहे आपण सर्व तयार आहोत.
   दोन माणसे डोंगरावर चढत असतात,
एक गायब होतो व दुसरा तेथेच उभा राहतो,
   मला आशा आहे आपण सर्व तयार आहोत.
तुमचे मन बदलण्यास वेळ नाही,
   तुम्ही एवढे कसे अंध होऊ शकता?
तारकाने बोलाविले, पण तुम्ही नाकारले,
   पुत्र आला आहे, आणि तुम्ही पाठीमागे राहणार,
तुम्ही पाठीमागे राहणार,
   तुम्ही पाठीमागे राहणार.
(“आय विश वुई वुड ऑल बीन रेडी” लॅरी नॉर्मन यांच्याद्वारा, 1947-2008;
          कोरस पाळकांनी बदलले आहे).

मागे राहू नका. आजरात्रौ, आताच येशूवर विश्वास ठेवा व तारण मिळवा!


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी शास्त्रभाव वाचण्यात आला: मत्तय 24:37-42.
उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकेड ग्रिफ्फित यांनी गायले:
“आय विश वुई वुड ऑल बीन रेडी” (लॅरी नॉर्मन, यांच्याद्वारा, 1947-2008).
“I Wish We’d All Been Ready” (by Larry Norman, 1947-2008).


रुपरेषा

तुम्ही पाठीमागे राहणार काय?

WILL YOU BE LEFT BEHIND?

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांस ठाऊक नाही” (मत्तय 24:42).

I.   प्रथम, अंतराळात वर उचलले जाण्यापूर्वीची परिस्थिती, मत्तय 24:37-41.

II.  मग, दुसरे, वर उचलले जाण्यास तयारी केलेली नसणे हे धोकादायक आहे
याचा विचार करा, मत्तय 25:1-13.

III. मग, तिसरे, वर उचलले जाण्याच्या वेळी जे मागे राहतील देव त्यांना सोडून
देणार, प्रकटी. 16:9, 11, 21.