Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




शेवटच्या काळातील चिन्हें

SIGNS OF THE LAST DAYS
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 9 सप्टेंबर, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, September 9, 2018


जगाचा शेवट कधी होणार हे शिष्यांना जाणून घ्यायचे होते. ते म्हणाले, “आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” (मत्तय 24:3). त्यांनी ख्रिस्ताकडे चिन्हाची मागणी केली. त्याने त्यांना पुष्कळ चिन्हें दिली, ती मत्तय 24 मध्ये, तसेच लुक 21 ह्या समांतर अध्यायात नमुद आहेत. मत्तय 24 पुष्कळ चिन्हें देते. आणि लुक 21 त्याहून अधिक देते. जास्तीत जास्त लुक 21 मधील आज रात्रौ ऐकणार आहोत. “आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” ख्रिस्ताने त्यातील पुष्कळ लुक 21 मध्ये दिली आहेत, परंतू प्रथम II पेत्र याकडे वळूया.

II पेत्र, अध्याय तीन, वचन 3 कडे वळूया. ते स्कोफिल्ड स्टडी बायबल मध्ये पृष्ठ 1319 वर आहे. ते म्हणते,

“प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वत:च्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करीत येऊन म्हणतील” (II पेत्र 3: 3).

आज रात्रौ मी: “शेवटल्या काळातील चिहें” या विषयावर बोलणार. कारण सध्या आपण शेवटल्या काळात राहत आहोत. वेळ खूप कमी आहे.

II पेत्र 3:3 मधील भावना लक्षात घ्या, “शेवटल्या काळात येतील.” “शेवटल्या काळात” हा शब्द लक्षात घ्या. पवित्रशास्त्रात हा भाव व कल्पना पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल.

पवित्रशास्त्र शिकविते की इतिहासात असा एक बिंदू आहे तो शेवटले दिवस म्हणून ओळखला जातो. पुष्कळ पवित्रशास्त्राचे शिक्षक सध्या आपण त्या काळात आहोत असे म्हणतात. मला वाटते ते बरोबर आहेत. तारीख निश्चिती करण्यास पवित्रशास्त्र इशारा देते. पण असा ए कालखंड आहे जो “शेवटले दिवस” म्हणून ओळखला जातो. प्रत्येक चिन्हे हे दर्शविते की साधारणपणे सध्या आपण त्या काळात आहोत. लिओनार्ड रेवनहिल म्हणाले, “हे शेवटले दिवस आहेत.”

II पेत्र 3:3 मधील दुसरा शब्द “थट्टेखोर” आहे. हे लोक ख्रिस्ताचे दुसे येणे व जगात शेवट या कल्पनेची थट्टा करतात. ते उपहास आणि थट्टा व हसे करतात. ते शास्त्रीय व अविश्वासू आहेत. ते म्हणतात, “आपणाला देव कुठेहि भेटत नाही. आम्हांला वाटत नाही की देव ह्या जगाचा अंत करणार आहे. आम्हांला खात्रीहि नाही की देव खंरच आहे.” भविष्यातील न्यायासंबंधीची कल्पनेवर ते थट्टा व हास्य करतात, वेगळ्या रुपात, येशू ख्रिस्त स्वर्गातून परत पृथ्वीवर येणार ह्या कल्पनेची थट्टा करतात. शेवटल्या काळात देवाचा क्रोध ओढावणार या संपूर्ण कल्पनेवर ते हसतात.

“प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वत:च्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करीत येऊन म्हणतील” (II पेत्र 3:3).

ते का थट्टा करतात व हसतात? पुढील कांही शब्द आपणांस सांगतात की, “स्वत:च्याच वासनांप्रमाणे चालणारे” किंवा “स्वत:च्याच वासनांच्या मागे जाणारे.” ते पापांत जगत होते. त्यामुळे खिस्त येऊन त्यांच्या पापी जीवनात हस्तक्षेप करु नये असे वाटते. ते त्यांच्या वासनांवर प्रेम करतात, ते त्यांच्या पापावर प्रेम करतात कारण त्यांना ख्रिस्त येऊ नये असे वाटते, आणि म्हणून ते देवाच्या न्यायासंबंधी पवित्रशास्त्र जे कांही शिकविते ते नाकारतात! ते प्रीतीचा देव आहे, पण तो क्रोध व न्यायाचाहि देव आहे. पाप व दुष्टता याविरुद्ध क्रोध करणारा देव आहे. हे थट्टेखोर ढोंगी पुरावे तपासत नाहीत. ते पवित्रशास्त्र वाचीत नाहीत. त्यांना सत्य जाणून घ्यायचे नाही – कारण ते ढोंगी आहेत. ते थट्टेखोर, स्वत:च्याच वासनांप्रमाणे चालणारे आहेत!

त्यानंतर, पुढचे वचन म्हणते, “कारण ते हे बुद्धिपुरस्कर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून...” (वचन 7 पाहा). “पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत” (II पेत्र 3:3-7).

आता वचन दहा पाहा:

“तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहिसे होईल. सृष्टितत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.”

शास्त्रलेखाचा हा उतारा सांगतो की न्यायाचा दिवस येणार आहे. संपूर्ण पापी जग हे एकेदिवशी देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहे. तुमचा पालट झाला नसेल तर तुम्हांस त्या दिवशी देवासमोर उभे राहावे लागणार. तुमचे तारण झाले नसेल तर तुमच्या पापाबद्दल न्याया होणार.

आणि शिष्य येणा-या दिवसाविषयी विचारतायत. ते म्हणाले, “आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” (मत्तय 24:3).

आता ख्रिस्ताने त्यांना पुष्कळ चिन्हें दिली, आणि त्यातील कांही मी यादी सांगणार आहे.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

I. प्रथम, पर्यावरणीय चिन्हे जे दर्शविते की शेवट जवळ आला आहे.

येशू म्हणाला तेथे असणार

“मोठेमोठे भूमिकंप होतील...दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील...आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील. भयाने व जगावर कोसळणा-या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. आकाशातील बळे डळमळतील” (लुक 21:11, 25-26).

त्याचा विचार करा! येशू म्हणाला “पृथ्वीवर” काय घडत आहे हे पाहून लोकाची ह्दये घाबरी होऊन पेचात पडतील. तो म्हणाला की भयाने व “जगावर कोसळणा-या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे” माणसे मरणोन्मुख होतील.

कांही वर्षापूर्वी शास्त्रज्ञांना उत्तर ध्रुवावर ओझानमध्ये एक पोकळी सापडली जी माईन देशाएवढी मोठी आहे. टाईम मॅगेझीनमध्ये एक कथा आहे – मुख पृष्ठावर आहे – “द बिग मेल्टडाऊन. आर्टिकवर जसे तापमान वाढते, ते संपूर्ण जगभरातील मुले आहेत.” (टाईम मॅगेझीन 4 सप्टेंबर, 2000, पृष्ठ 52-56). टाईम म्हणते, “अंशत: वितळण्याने सुद्धा उत्तर गोलार्धावरील वातावरणाचा विध्वंस होऊ शकतो.” आपण नवीन बर्फ युगात जाऊ की काय अशी ब-याच शास्त्रज्ञांना भीती वाटते. टाईमच्या लेखात, डॉ. रिचर्ड एली, पेन स्टेट विद्यापिठाचे भूभौतिक शास्त्रज्ञ, म्हणाले की “बदलामुळे जो मानवी नमुद इतिहासात परिणाम झाला तो तापमानात कमी होण्यापेक्षा फार (मोठा) आहे.” हा मानवाचा अंत तर नव्हे ना? डॉ. एली म्हणतात, “नाही, पण मानवाकरिता हा कठीण काळ आहे. खूप कठीण”

बंदूकीने व युद्धाने जीवन भरले होते,
   आणि प्रत्येकजण जमीनीवर तुडविला गेला.
मला आशा आहे आपण सर्व तयार आहोत.
   (“आय विश वुई वुड ऑल बीन रेडी” लॅरी नॉर्मन यांच्याद्वारा, 1947-2008).

तुम्ही तयार आहांत का?

डॉ. एली सारखे शास्त्रज्ञ सुद्धा भीतीने पिडलेले आहेत

“भयाने व जगावर कोसळणा-या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील” (लुक 21:26).

उत्तर गोलार्धावरील विध्वंस ह्या आणि अचानक बर्फ-युगाचे संकट याकडे पाहतो, पुढील 25 वर्षे, तेव्हां हे भयावह आहे. आफ्रिकेतील एडस् ही महामारी भयानक अशी वाटली, कोणताही अंत दृष्टीक्षेपात नव्हता तेव्हां – हे भयावह आहे. क्षयरोगास प्रतिबंध करणारे प्रतिजैवकाची समस्या पुन्हा उद्भवली आणि असा “भयानक” रोग जे कसल्याच औषधाला प्रतिसाद देत नव्हता तेव्हां – हे भयावह आहे.

भविष्यासंदर्भात पुष्कळ तरुण धास्तावलेले आहेत यात कांही आश्चर्य नाही. अलिकडचे सर्व्हेक्षण एक दर्शविते की 80 टक्के युवकांना वाटते की त्यांना चांगले भविष्य नाही. हे सर्व्हेक्षण दर्शविते की हे युवक वारंवार पर्यावरणीय समस्या, उत्तर गोलार्धावरील विध्वंस आणि बर्फ युग किंवा पाणी जगताने उद्भवलेली समस्या यामुळे त्रस्त आहेत.

आपले हे जग विध्वंसाकडे जात आहे हे सहज तरुणांना जाणविते. त्यामुळे ते भयभीत झालेत. दक्षिण कॅलिफोर्निया संपूर्ण वर्ष जर गोठलेले असेल तर तुम्ही काय कराल?

“भयाने व जगावर कोसळणा-या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील” (लुक 21:26).

मानव ह्या ग्रहाचा नाश करीत आहेत त्यामुळे तरुण अगदी घाबरलेले आहेत. आणि त्यांची काळजी मी सांगतो – पूर्णत:!

माझी पत्नी व मी आमच्या अंगणात उभे होतो. मी तिला विचारले, “शेवटी तूं कधी राजा फुलपाखरु पाहिले? शेवटी तूं कधी तिरस्करणीय किंवा बेडूक पाहिले? ते निघून गेलेत – किंवा खूप जवळ आहे.” ती मला म्हणाली, “होय, आपण पर्यावरणामुळे गोंधळलेलो आहोत.” एक माणूस मला म्हणाला, “आंम्ही आमचे घरटे घाणेरडे केले आहे व या जगाचा विध्वंस करीत आहोत.” खेदाची बाब, मी सहमत झालो. तो अगदी मृतवत होता.

आणि भीतीदायक समस्या वर्तमानपत्रात दररोज येणा-या पर्यावरणासंबंधीच्या बातम्या पाहतो, त्या जगाच्या शेवटाच्या व येशू ख्रिस्ताच्या दुस-या येणे जवळ आले आहे याची चिन्हे आहेत. पवित्रशास्त्र म्हणते, “तुमच्या देवाला भेटण्यास तयार असा.” तुम्हांला तयारीसाठी जास्त वेळ राहिला नाही! लॅरी नॉर्मन म्हणाले,

बंदूकीने व युद्धाने जीवन भरले होते,
   आणि प्रत्येकजण जमीनीवर तुडविला गेला.
मला आशा आहे आपण सर्व तयार आहोत.

तुम्ही तयार आहांत का?

त्यामुळे आता तुम्ही मंडळीत जाणे व ख्रिस्ताला शोधणे गरजेचे आहे! आपला जगातील वेळ निघून जात आहे. शेवटचा न्याय येण्यापूर्वी ख्रिस्ताला शोधण्यास, परिवर्तन होण्यास, आणि मंडळीत असण्यास तुम्ही घाई करण्याची गरज आहे. जेव्हां तुम्ही ख्रिस्तात असता तेव्हां, तुम्हांस सांभाळण्याचे आणि सर्व संकटापासून सुरक्षित ठेवण्याचे देवाचे अभिवचन आहे.

लपीव, हे माझ्या तारका, मला लपीव,
   स्वर्गात सुरक्षित नेईपर्यंत;
जीवनातील वादळ शमवून,
   शेवटी माझ्या जीवाचा स्विकार कर!
(“जीजस, लव्हर ऑफ माय सौल” चार्ल्स वेस्ली यांच्याद्वारा, 1707-1788).

II. परंतू दुसरे, तेथे वंशासंबंधी चिन्हे आहेत जी दर्शवितात की शेवट जवळ आला आहे.

लुक 21:20 बोलते की,

“मग त्याने म्हटले, ‘राष्ट्रावर (ग्रीकमध्ये इथनोज किंवा वांशिक समुह) राष्ट्र (वांशिक समुह) व राज्यावर (बसिलिन = राष्ट्रीय समुह) राज्य (राष्ट्रीय समुह) उठेल” (लुक 21:10).

त्यामुळे आज आम्ही ते पाहात आहोत. आपले तंत्रज्ञान व शास्त्र सुद्धा वांशिक संघर्ष व राष्ट्रां राष्ट्रांतील युद्ध थोपविण्यास असमर्थ ठरले आहे. प्रत्येक राष्ट्राध्यक्ष अरब व यहुद्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. पण आपले सगळे राष्ट्राध्यक्ष अपयशी ठरतात! केवळ येशू परत येईल तेव्हां सर्व जाती समुहांत शांतता प्रस्थापित होईल! केवळ येशू परत येईल तेव्हां सर्व राष्ट्रें व जाती समुहांत तो शांतता आणील. हे दुसरे कोणीहि करु शकणार नाही – येणारा ख्रिस्तविरोधक सुद्धा पूर्णत: शांतता आणू शकणार नाही. केवळ येशू ख्रिस्तच विविध जातीसमुह व लोकममुह आणि राष्ट्रां राष्ट्रांत शांतता आणू शकतो – जेव्हां तो पृथ्वीवर परत येईल तेव्हांच (आणि केवळ मगच) पृथ्वीवर खरी शांति आणि सर्व मानवांत सद्भभावना असेल!

बंदूकीने व युद्धाने जीवन भरले होते,
   आणि प्रत्येकजण जमीनीवर तुडविला गेला.
मला आशा आहे आपण सर्व तयार आहोत.

आज रात्री तुम्ही तयार आहांत का?

III. मग, तिसरे, मग, तिसरे, आपल्या सभोवती असलेले ख्रिस्ती विरोधी चिन्हें आहेत, ती हे दर्शवितात की शेवट जवळ आला आहे.

यहुदी, पृथ्वीवरील देवाचे निवडलेले लोक यांचा द्वेष पुष्कळ मुर्ख लोक करतात. लुक 21 मधील उतारा म्हणतो:

“परंतू येरुशलेमेला सैन्यांचा वेढा (किंवा चौबाजूने घेरले) पडत आहे असे पाहाल तेव्हां ती ओसाड पडण्याची वेळ जवळ (ते जवळ आहे) आली आहे असे समजा” (लुक 21:20).

यहुदी विरोधी वाद, यहुद्यांचा द्वेष करणारे, शेवटी बळकट होतील, येरुशलेमेत यहुदी लोकांविरोधी महान पररांष्ट्रीयांचे सैन्य येईल व त्यांना मारण्याची संधी मिळेल, जसे II महायुद्धात हिटलरने केले तसे. परंतू यहुदी हे पृथ्वीवरील निवडलेले लोक आहेत. पवित्रशास्त्रानुसार, पवित्रशास्त्र म्हणते,

“निवडीच्या दृष्टीने पाहाता पूर्वजांमुळे प्रियजण आहेत” (रोम 11:28).

जर हे आब्राहाम, मोशे व संदेष्यांकरिता नसते तर आज रात्रौ तुम्ही येथे नसता. त्यामुळे पवित्रशास्त्रावर-विश्वास ठेवणारे बाप्टिस्ट हे इस्त्राएलचे महान समर्थक आहेत.

परंतू पवित्रशास्त्र शिकविते की शेवटल्या काळात हे पापी जग यहुद्यांच्या विरुद्ध होईल. देव म्हणतो:

“सर्व राष्ट्रांना भारी पाषाणासारखे असे मी यरुशलेमेस करीन” (जख-या 12:3).

हे आता घडत आहे. आपण शेवटल्या काळात राहत आहोत हे त्याचे चिन्ह आहे.

बंदूकीने व युद्धाने जीवन भरले होते,
   आणि प्रत्येकजण जमीनीवर तुडविला गेला.
मला आशा आहे आपण सर्व तयार आहोत.

तुम्ही तयार आहांत का?

IV. आणि मग, चौथे, धार्मिक चिन्हे — खोट्या धर्मातील फसवणूक, जे दर्शविते की शेवट जवळ आला आहे.

“तो म्हणाला, तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा;कारण माझ्या नावाने पुष्कळ येऊन मीच तो आहे...त्यांच्या नादी लागू नका” (लुक 21:8).

पुन्हा ख्रिस्त म्हणाला:

“कारण खोटे...खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भूते दाखवितील” (मत्तय 24:24).

TBN वर पुष्कळ तुम्ही काय जे पाहाता – चॅनेल 17 वर या भागात काय पाहाता – ती फसवणूक आहे. बेन्नी हिन हे फसवे आहेत. जोएल ऑस्टीन हे फसवे आहेत. बहुतांश रेडिओ व टेलीव्हिजनवरील सुवार्तिकवादी हे फसवे आहेत. त्यामुळे मी केवळ डॉ. मॅक् गी यांची शिफारस करतो, व दुसरे कोणाला नाही! माझा मवाळ-सुवार्तिकवाद्यांवर विश्वास नाही!

“कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकाची गर्जी जमवितील” (II तिमथी 4:3).

ही चिन्हे सध्या घडत आहे! शेवट जवळ आला आहे!

V. पाचवे, धार्मिक छळाची चिन्हे आहेत, जी हे दर्शवितात की शेवट जवळ आला आहे.

संपूर्ण जगात ख्रिस्ती लोकांचा छळ हा मोठ्याप्रमाणात होत आहे. उदाहरणत:, कम्युनिस्टवाजी चीन मध्ये पुष्कळ ख्रिस्ती गुप्तपणे भेटतात. लॉस एंजिल्स टाईम्सच्या दिलेल्या अहवालाच्या मते तीन आत्मे-जिंकणा-यांना शुभवर्तमान सांगितल्याने चीनमधून बडतर्फ केले होते:

मध्ये चिनमध्ये भूमिगत प्रोटेस्टंट उपासना घेतल्याने ताब्यात घेऊन तीन अमेरिकी सुवार्तिकांना (आत्मे-जिंकणा-यांना) चीनने बडतर्फ केले, एका योग्य समुहाने अहवाल दिला. अहवाल असा...डझनभऱ चीनी उपासकांना ताब्यात घेऊन बडतर्फ केले व त्यांना तुरुंगात पाठविले. आणखी पन्नास... प्रोटेस्टंट उपासना करणा-यांना तीन भागातून ताब्यात घतले होते, हाँग काँग स्थित मानवी अधिकार व लोकशाहि चळवळ केंद्रातील महितीच्या द्वारे.

येशूने ख्रिस्ती लोकांच्या छळाविषयी सांगून ठेवले ते आपण सध्या पाहत आहोत. तो म्हणाला,

“ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील...तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील” (लुक 21:12).

मग तो म्हणाला तुम्ही खरे ख्रिस्ती व्हाल तर तुमचे आईवडील व नातेवाईक सुद्धा तुमचा छळ करतील. येथे लॉस एंजिल्स मध्ये असे वारंवार घडलेले आपण पाहिले आहे. ख्रिस्त म्हणाला:

“आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हांला धरुन देतील...आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील” (लुक 21:16-17).

ख्रिस्त म्हणाला की तुम्ही जर खरे ख्रिस्ती व्हाल तर तुमचे आईवडील व मित्र सुद्धा तुमचा छळ करतील. हसू नका. हे बहुतांश जगात खरे होत आहे. आज या रात्री बहुतांश जगात मुस्लिम आपला द्वेष करतायत, आपणांस ठार मारतायत व तुरुंगात टाकतायत.

प्रथम, ते तुम्ही मंडळीत परत येऊ नये व तुमचे तारण होऊ नये म्हणून तुम्हांला सर्वोतपरी थांबविण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही मंडळीत येत राहाल व तारण पावाल तर ते तुमच्याकडे वळतील व तुमचा द्वेष करतील. खरेतर ते कित्येक महिने तुमच्यावर राग पकडून आहेत, जेव्हां ते तुम्हांला थोपवू शकले नाहीत तेव्हांपासून.

पण किंमत मोजा! तुम्ही खरे ख्रिस्ती झालेले कोणालातरी आवडत नाही! कोणीतरी तुमच्या विरुद्ध उठेल! ह्या अंधकाराच्या दिवसांत खरे ख्रिस्ती होण्याची किंमत मोजावी लागणार. हेच ते चिन्ह आहे की आपण शेवटल्या काळात आहोत.

बंदूकीने व युद्धाने जीवन भरले होते,
   आणि प्रत्येकजण जमीनीवर तुडविला गेला.
मला आशा आहे आपण सर्व तयार आहोत.

तुम्ही तयार आहांत?

VI. आणि शेवटी, ख्रिस्ताने सहावे चिन्ह दिले जे दर्शविते की शेवट जवळ आला आहे. मी त्याला “मानसिक चिन्हें” म्हणतो.

ख्रिस्त म्हणाला:

“तुम्ही सांभाळा (लक्ष द्या) नाहीतर कदाचित अधाशीपणा (कमी वजन व अधिक वजन), दारुबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंत:करणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणा-या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल” (लुक 21:34-35).

कांही वेळा मंडळीत आलेला एक तरुण म्हणाला, “मी पुढच्या रविवारी येऊ शकत नाही. माझ्या चुलतीस हलण्यास मदत करायची आहे.” हे करण्यास तिच्याकडे सहा दिवस होते, परंतू ते रविवारीच सकाळी व्हायचे “होते.” तो जीवनाच्या समस्येने घेरला होता. सध्या लोक साध्या व शुल्लक कारणासाठी मंडळीत येत नाहीत. ह्या जीवनाची काळजी करीत कमी वजन झाले आहे. अचानक देवाच्या न्यायाचा दिवस त्यांच्यावर येणार – जेव्हां त्यांना हे अपेक्षित नसणार, तेव्हां शेवट होणार!

बंदूकीने व युद्धाने जीवन भरले होते,
   आणि प्रत्येकजण जमीनीवर तुडविला गेला.
मला आशा आहे आपण सर्व तयार आहोत.

तुम्ही तयार आहांत?

तुम्ही पूर्वी मादक द्रव्ये व लैगिक वासनेतून जात होता, पण तुमची पत कौटुंबिक समस्येने कमी झाली त्याने तुम्ही खालाविले गेला. संपूर्ण वर्षभर मी अशाप्रकारे पुष्कळ तरुण जोडप्यांबरोबर असे होताना पाहिले आहे.

आणि मग येशू म्हणाला:

“तुम्ही तर होणा-या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा” (लुक 21:36)

आणि त्यामुळे होणारा जगाचा शेवट व येणा-या न्यायासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. त्यासाठी तुम्हांस तीन गोष्टी करावयाच्या आहेत:

(1) ह्या मंडळीत या. तुम्ही जर येणार नाहीत तर कोणीहि तुम्हांला मदत करणार नाही.

(2) ख्रिस्ताकडे या. तो तुमच्या पापासाठी मेला. तो वास्तवात व दैहिकरित्या मरणातून पुन्हा उठला. तो आता जिवंत असून देवाच्या उजवीकडे बसला आहे. आता तो तेथे तुमच्यासाठी आहे. त्याच्याकडे या. येशूवर विश्वास ठेवा व तारण साधून घ्या!

(3) केवळ तुम्ही ह्या मंडळीत यावे, केवळ येशूकडे यावे याचीच गरज नसून, तुम्ही प्रार्थना सुद्धा करावी याचीहि गरज आहे. येशू म्हणाला की शेवटच्या काळात यशस्वीरित्या जगण्यास प्रार्थना हे मुख्य साधन आहे.


येणा-या न्यायापासून तुम्ही कसे बचणार आहांत? पवित्रशास्त्र म्हणते, “[ख्रिस्ताने] आपली पापे आपल्या स्वत:च्या देहात झाडावर वाहिली” – वधस्तंभावर. ख्रिस्त हा तुमचा बदली होऊ शकतो. वधस्तंभावर तुमच्या पापाचा दंड म्हणून, तो तुमच्या बदली दंडीत झाला! ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर त्याचे मौल्यवान रक्त सांडले. त्याचे रक्त तुमची सर्व पापे धुऊन शुद्ध करते – आणि शेवटल्या काळासाठी तुम्ही तयार राहाल! आज रात्रौ तुम्ही येशूवर विश्वास ठेवावा म्हणून मी सांगत आहे! चार्ल्स वेस्ली म्हणाले,

लपीव, हे माझ्या तारका, मला लपीव,
   स्वर्गात सुरक्षित नेईपर्यंत;
जीवनातील वादळ शमवून,
   शेवटी माझ्या जीवाचा स्विकार कर!

शुभवर्तमानाचे गीत म्हणते,

सध्याच्या जगाला केवळ येशू हेच उत्तर आहे,
त्याच्या शिवाय दुसरे कांही नाही, येशूच मार्ग आहे!

आज रात्रौ येशूवर विश्वास ठेवा व तो तुमचे तारण करील! आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकेड ग्रिफ्फित यांनी गायले: “आय विश वुई वुड
ऑल बीन रेडी” (लॅरी नॉर्मन, यांच्याद्वारा, 1947-2008).
“I Wish We’d All Been Ready” (by Larry Norman, 1947-2008).


रुपरेषा

शेवटल्या काळातील चिन्हें

SIGNS OF THE LAST DAYS

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वत:च्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करीत येऊन म्हणतील” (II पेत्र 3:3).

I.    प्रथम, पर्यावरणीय चिन्हे जे दर्शविते की शेवट जवळ आला आहे,
लुक 21:11, 25-26.

II.   परंतू दुसरे, तेथे वंशासंबंधीची चिन्हे आहेत जी दर्शवितात की शेवट जवळ आला आहे, लुक 21:10.

III.  मग, तिसरे, मग, तिसरे, आपल्या सभोवती असलेले यहुदी विरोधी चिन्हें आहेत, ती हे दर्शवितात की शेवट जवळ आला आहे, लुक 21:20; रोम 11:28; जख-या 12:3.

IV.  आणि मग, चौथे, धार्मिक चिन्हे — खोट्या धर्मातील फसवणूक, जे दर्शविते की शेवट जवळ आला आहे, लुक 21:8; मत्तय 24:24; II तिमथी 4:2-3.

V.   पाचवे, धार्मिक छळाची चिन्हे आहेत, जी हे दर्शवितात की शेवट जवळ आला आहे, लुक 21:12, 16-17.

VI.  सहावे, “मानसिक चिन्हें” आहेत जे दर्शविते की शेवट जवळ आला आहे,
लुक 21:34-36.