Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




ख्रिस्ताकडे एखादा आत्मा कसा न्यावा —
परिवर्तनासाठी समुपदेशन!

HOW TO LEAD A SOUL TO CHRIST –
COUNSELING FOR CONVERSIONS!
(Marathi)

ख्रिस्टोफर एल. कागॅन, पीएच. डी. (UCLA), एम.डीव्ह. (टालबोट सेमीनरी),
पीएच. डी. (द क्लारमाऊंट ग्रॅज्युएट स्कूल) यांच्याद्वारा लिखीत
आणि रेव्ह. जॉन सॅम्युएल कागॅन यांनी
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 26 ऑगस्ट, 2018 रोजी
A sermon written by Christopher L. Cagan, Ph.D. (UCLA),
M.Div. (Talbot Seminary), Ph.D. (the Claremont Graduate School),
and preached by Rev. John Samuel Cagan
at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, August 26, 2018

“तुमचा पालट होऊन...स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही” (मत्तय 18:3).


येशू एका व्यक्तीला म्हणाला पालट झाला पाहिजे – पालट कर – नाहीतर तूं स्वर्गात जाणार नाहीस. ग्रीक शब्द “इफिस्ट्रीफो” यापासून “पालट” हा शब्द आहे. त्याचा अर्थ “माघारी फिरणे” आहे. ही पाप अंगिकाराची प्रार्थना नाही किंवा हात उंचावणे नाही. नवीन जन्माच्या वेळी देव पाप्याला परिवर्तन झालेले ह्दय देतो. येशू निकोदेमास म्हणाला, “नव्याने जन्मल्यावाचून कोणालाहि देवाचे राज्य पाहाता येत नाही”(योहान 3:3). पुन्हा, ख्रिस्त म्हणाला, “तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे” (योहान 3:7). हे ह्दयाचे मूलभूत परिवर्तन होय. पवित्रशास्त्र म्हणते, “म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी [उत्पत्ति] आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे” (करिंथ 5:17). ही केवळ पाप अंगिकाराची प्रार्थना नाही. तर हे परिवर्तन आहे! मी ह्या सकाळी पाप्यांना ख्रिस्तातील परिवर्तनात आणण्यासाठी जे समुपदेशन आहे त्याविषयी बोलू इच्छितो.

परिवर्तन म्हणजे काय? हे होण्याकरिता आपण काय केले पाहिजे? पाप्यांना परिवर्तनाची गरज आहे, निर्णयाची नाही. संपूर्ण जगभरातील मंडळ्यांमध्ये चार्ल्स फिने (1792-1875) यांच्यापासून “निर्णायकता” ने परिवर्तनाची जागा घेतली आहे, परंतू परिवर्तन झालेले नाही.

“निर्णायकता” म्हणजे काय? परिवर्तन म्हणजे काय? डॉ. हायमर्स व माझे बाबा, डॉ. कागॅन यांच्याद्वारा,

     निर्णायकता म्हणजे तो विश्वास ज्याद्वारा तारणासाठी ती व्यक्ती पुढे येते, हात उंचाविते, प्रार्थना म्हणते, सिद्धांतावर विश्वास ठेवते, प्रभूत्वास बांधील होते, किंवा इतर बाह्य, मानवी कृति, जो आंतरिक परिवर्तनाचा चमत्कार, त्या बरोबरीने घेते, आणि सिद्ध करते; की केवळ बाह्य निर्णयामुळे त्या व्यक्तीचे तारण झाले असा ती विश्वास ठेवते; तो विश्वास ज्याद्वारा व्यक्ति वरीलपैकी एखादी मानवी कृति करुन हे दर्शविते की त्याचे तारण झाले आहे.
     परिवर्तन म्हणजे पवित्र आत्म्याच्या कार्याचा परिणाम आहे जो पाप्यास नीतिमत्व व नव्या उत्पत्तिसाठी ख्रिस्ताच्या जवळ ओढते, व देवापुढे उभ्या असलेल्या पाप्यास हरविण्यापासून तारणात बदलविते, भ्रष्ट जीवांत दैवी जीवन घालते, अशाप्रकारे परिवर्तन झालेल्याच्या जीवनाला नवी दिशा देते. तारणाच्या विषयाची बाजू ही नीतिमत्व आहे. तारणाची व्यक्तीनिष्ट बाजू ही पुनर्निर्मिती आहे. परिणाम हा परिवर्तन आहे. (टुडेज अपोस्टे; पृष्ठ 17, 18).

निर्णय घेणे ही एक मानवी कृति आहे की जी कोणीहि, कोठेहि करु शकतो. परिवर्तन ही अलौकिक कृति आहे जी व्यक्तीचे जीवन व सार्वकालीक फज्जा कायमचा बदलून टाकते.

आत्म्यात परिवर्तन आणणे हे निर्णय घेण्या पेक्षा खूप सोपे आहे. प्रचारकास मोजण्यास मोठ्या संख्येने “निर्णय घेणारे” मिळतील. तुम्ही कोठेहि, केव्हांहि निर्णय घेऊ शकता. तुम्ही पुढच्या दरवाजा जवळ, विमानात, किंवा कोठेहि पाप अंगिकाराची प्रार्थना लोकांबरोबर म्हणू शकता. तुम्ही ते मोजू शखता, पण शक्यतो नंतर ते तुम्ही पाहणार नाही. त्यांनी निर्णय घेतला आहे, पण परिवर्तनाचा अनुभव घेतला नाही.

परिवर्तनाकरिता, पुष्कळ लोकांना मंडळीत यावे लागेल आणि शुभवर्तमान समजणे व ख्रिस्तावर विश्वास ठेवणे याच्यापूर्वी पुष्कळदा ते ऐकले पाहिजे. कांही लोक परिवर्तन होण्यापूर्वी कांही महिने आणि कांही वर्षे सुद्धा मंडळीत येतात.

लोकांनी तुमच्या आमंत्रणास प्रतिसाद दिल्यानंतर तुम्ही त्यांना ख्रिस्ताकडे नेण्यास व्यक्तीगत, स्वत:हून बोलले पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी बोलाल अशा वेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जा. त्यांना जलद प्रार्थनेत सहजासहजी नेऊ नका. पाप अंगिकाराची प्रार्थना म्हणणे म्हणजे येशूवर विश्वास ठेवण्यासारखे नाही. हात उंचावणे, पुढे येणे, किंवा बाप्तिस्मा घेणे म्हणजे येशूवर विश्वास ठेवण्यासारखे नाही. व्यक्ती ह्या गोष्टी करुन येशूवर विश्वास ठेवला हे सिद्ध करु शकत नाही. येशूवर विश्वास ठेवणे हे स्वत:हून कांहीतरी वेगळे, अद्वितीय आणि विशेष असे आहे. येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे येशूवर विश्वास ठेवणे.

ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास व ख-या परिवर्तनाचा अनुभव घेण्यास वेळ, प्रयत्न, अंतर्दृष्टी, प्रार्थना आणि देवाच्या कृपेची आवश्यकता असते. डॉ. हायमर्स व डॉ. कागॅन हे लोकांना परिवर्तनासाठी तीस वर्षाहून अधिक काळ समुपदेशन करतायत. त्यांनी शिकलेल्या ह्या कांही गोष्टी आहेत.

1. प्रथम, पाळकांनी पाप्याचे ऐकून घेतले पाहिजे.

जसे सर्व सुवार्तिक प्रचारक आभासीपणे – समजतात की पाप्यांना शुभवर्तमान अगोदरच ठाऊक असते – असे समजू नका. तुम्ही त्यांचे ऐकून घ्या व तो काय ठेवतो हे जाणून घ्या. त्यांची धार्मिक पार्श्वभूमी काय आहे? येशूविषयी त्याचा काय विश्वास आहे? ख्रिस्त हा आत्मा आहे असा तो विश्वास ठेवतो काय? अगोदरच ख्रिस्त त्याच्या ह्दयात राहतो असे त्याला वाटते काय? येशू त्याच्यावर रागावलेला आहे असे त्याला वाटते काय? तो स्वर्गात जाणार, किंवा नाही असे त्याला वाटते काय? त्याला काय वाटते हे जाणून घ्या. मग त्याला सत्य दाखवा व ख-या ख्रिस्ताकडे न्या.

पापी कसे राहतात? असे कांही तरी म्हणजे – अश्लिलता, व्यभिचार, किवा कुटुंबातील सदस्यांचा विरोध आहे का जे त्यांना ख्रिस्ती जीवन जगण्यापासून मागे खेचते? पाप्यांना तारणासाठी स्वत: परिपूर्ण होण्याची गरज नाही – ते होऊ शकत नाहीत. तो स्वत:वर विश्वास ठेवण्या, ऐवजी. परंतू कोणीतरी जो ख्रिस्तावर विश्वास ठेऊ नये म्हणून हेतूपुरस्कर आणि सक्तीने मोठे पाप धरुन ठेवतो.

तुम्ही पाप्यांचे ऐकणार नाही तर, तुम्ही त्यांना साहाय्य करु शकत नाही. पापी तुमच्याशी बोलावयास का आला हे शोधा. येशूने त्याच्यासाठी काय करावे असे त्याला वाटते? तो का आला आहे? एक व्यक्ती म्हणाला येशूने मला नोकरी द्यावी असे वाटते. पण ते तारण नव्हे! येशूने त्याला नोकरी दिली तरी, तो पापात राहणार. येशूच्या रक्ताने त्याच्या पापांची क्षमा व्हावी असे त्या व्यक्तीला वाटले पाहिजे.

2. दुसरे, पापी येशू ख्रिस्तासंबंधाने चूक करतात.

येशूविषयी पापी काय विचार करतात? त्याला विचारा, “आता येशू कोठे आहे?” पवित्रशास्त्र सांगते की येशू स्वर्गात “देव जो बाप त्याच्या उजवीकडे” आहे (रोम 8:34). परंतू पापात हरविलेले बरेचसे बाप्टिस्ट विचार करतात की येशू अगोदरच त्यांच्या ह्दयात आहे, किंवा तो आत्म्यात हवेत तरंगतोय. येशू कोठे आहे हे तुम्हांला ठाऊक नाही तर तुम्ही त्याच्याकडे येऊ शकत नाही.

पाप्यास विचारा, “येशू कोण आहे?” पुष्कळ लोकांना वाटते की तो एक साधारण मनुष्य, इतिहासातील एक महान शिक्षक आहे. पण तो “येशू” कोणाचेहि तारण करीत नाही. कांही लोकांना वाटते की तो आत्मा आहे, किंवा येशू पवित्र आत्मा आहे. पण ख्रिस्त आत्मा नाही. येशू मरणातून पुन्हा उठल्यानंतर, पवित्रशास्त्र म्हणते,

“पण ते घाबरुन भयभीत झाले आपण भुत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला, व तुमच्या मनांत तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पाहा; मी तोच आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते. असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखविले. मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यांना म्हटले, येथे तुम्हांजवळ खाण्यास कांही आहे काय? मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखत खाल्ला” (लुक 24:37-43).

तो मरणातून पुन्हा उठल्यानंतर, येशू जेवला. आत्मा जेवीत नाही. ख्रिस्ताला जसे हाडमांस होते तसे आत्म्याला नसते. आणि आत्मा – पवित्र आत्म्यासहि – पाप धुण्यासाठी रक्त नसते!

पाप्यास विचारा, “येशू तुम्हांवर रागाविलेला आहे का”? पुष्कळ कॅथलिक किंवा इतरांना वाटते की तो आहे. ते रागाविलेल्या “ख्रिस्ता” वर विश्वास ठेवतात – जो नव्या कराराचा येशू नाही. पवित्रशास्त्र म्हणते की येशू पाप्यांवर प्रेम करितो. त्याने वधस्तंभावरील चोरास व व्यभिचार करणा-या स्त्रीला क्षमा केली. पाप्यावर रागावणा-यावर कसा काय एखादा विश्वास ठेऊ शकतो? ह्या चुका सुधारा व ख-या येशूबाबतचे मुद्दे त्यांच्या निदर्शनात आणा.

3. तिसरे, पापी तारणासंबंधी चुका करतात.

तारणासंबंधीच्या मुख्य तीन चुका आहेत. ब-याच पाप्यांना वाटते की ह्यापैकी एक गोष्ट करु तर, त्यांचे तारण होते – किंवा ह्यापैकी एक गोष्ट केली तर, त्यांचे तारण झाले हे सिद्ध होते. ह्या त्या तीन गोष्टी आहेत ते ख्रिस्ताऐवजी त्यावर विश्वास ठेवतात.

शाररिक कृति: बाप्तिस्मा, पुढे येणे, हात उंचाविणे, प्रभूत्वास बांधील होणे, कांही पातके सोडून देणे (हा पवित्रशास्त्रीय पश्चाताप, जो मन परिवर्तन करतो तो नव्हे), किंवा पाप अंगिकाराची प्रार्थना म्हणणे. ह्या सगळ्या मानवी कृति आहेत ज्याने कोणाचेहि तारण होऊ शकत नाही. पवित्रशास्त्र म्हणते, “तेव्हां आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे, तर त्याने आपल्या दयेनुसार आपणांस तारिले” (तीतास 3:5).

माणसिक कृति: योग्य विचार, किंवा येशू वा तारणासंबंधीच्या पवित्रशास्त्रातील सत्यावर विश्वास ठेऊन. पापी नेहमी म्हणतो, “मी विश्वास ठेवतो की येशू माझ्याकरिता वधस्तंभावर मेला.” पण हजारो लोक या सत्यावर विश्वास ठेवतात. सैतान सुद्धा विश्वास ठेवतो की येशू देवाचा पुत्र आहे जो वधस्तंभावर मेला व पुन्हां उठला. त्याने ते पाहिले. पवित्रशास्त्र म्हणते, “सैतान [भुते] हि असा विश्वास धरतात व थरथर कापतात” (याकोब 2:19). पाप्यांनी त्याच्यासंबंधीच्या सत्यावर नव्हे तर, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे.

भावनिक कृति: भावना व अनुभव, ख्रिस्ता ऐवजी “खातरी” ची शोध घेणे, किंवा जीवनात चांगले वाटणे. कधी बरे आणि वाईट वाटणे. प्रत्येकाकडे चांगले विचार व भावना आहेत. प्रत्येकाकडे वाईट विचार व भावना आहेत. पाप्यांना हे ठाऊक आहे. ह्या भावना त्याच्याकडेहि होत्या. तुम्ही जर तुमच्या भावनावर विश्वास ठेवता तर, तुम्हांला वाटते तुमचे तारण झाले आहे आणि पापात हरविता, पापात हरविता व मग तारण होते, तुमच्या संपूर्ण जीवनभर. तारण फक्त ख्रिस्तात आहे, भावनेत नाही. एक जुने महान गीत म्हणते,

माझी आशा ही दुस-या कशावर नसून
   केवळ येशूचे रक्त आणि नीतिमत्वावर आहे.
मी गोड चौकट [मन, भावनेची चौकट] यावर नव्हे
   तर संपूर्णत: येशूच्या नामावर लीन होतो.
ख्रिस्त, मजबूत खडक यावर, मी उभा,
   बाकी सगळ्या जमीन हलणारी वाळू;
बाकी सगळ्या जमीन हलणारी वाळू.
   (“द सॉलीड रॉक” एडव्रड मोट यांच्याद्वारा, 1797-1874).

ह्या चुका सुधारा व येशूच्या रक्ताद्वारे पापाची क्षमा मिळण्यासाठी, थेट येशूकडे पाप्यास निर्देशित करा.

पुष्कळ चुकीच्या कल्पना येशूला दर्शवितात, पण ते “त्याला कमी लेखतात” किंवा इतर कशाच्या तरी “त्याला समान लेखतात.” कांही लोकांना वाटते की तुम्ही बाप्तिस्मा घेतला की, ख्रिस्तातील तारण प्राप्त होते. हे ख्रिस्ताला “कमी” लेखतात आणि पाण्याने बाप्तिस्माच्या “द्वारे” लेखतात. पुष्कळजणांना वाटते की पापांगिकाराची प्रार्थना म्हटल्यावर तुमचे तारण होते, आणि प्रार्थना म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यासारखे आहे. त्यामुळे ते लोकांना प्रार्थना म्हणावयास लावतात व त्या मोजतात, जेव्हां त्यातील अगदी कमी लोक येशूवर विश्वास ठेवतात व त्यांचे परिवर्तन होते. म्हणजे ख्रिस्ताला “कमी” लेखतात आणि प्रार्थनेच्या शब्दाच्या “द्वारे.” पवित्रशास्त्र म्हणते की “येशू ख्रिस्त स्वत:” पापांगिकाराच्या प्रार्थनेचे शब्द नसून, तर तो कोनशिला आहे (इफिस 2:20).

एका चुकेमागून दुस-या चुकीकडे पळतांना लोकांना मी पाहिले आहे. ते भावनेच्या शोध करुन सुरु करु शकता. पुढच्यावेळी ते म्हणतात, “मला भावना नाहीत. मी केवळ विश्वास ठेवतो की ख्रिस्त माझ्यासाठी मेला आहे.” भावनेच्या शोध घेण्याद्वारे ख्रिस्तासंबंधी सत्यावर विश्वास ठेवणे पासून पापी दूर गेले. खोट्यापणाच्या आश्रयातून पाप्यास घ्या व त्यांना येशूला प्रदर्शित करा.

4. चौथे, पाप्यांना त्यांच्या ह्दयात पापाची जाणीव होणे गरजेचे आहे.

पाप्याला त्याच्या ह्दयात पापाची जाणीव व्हायला पाहिजे. कोणत्या तरी मार्गात प्रत्येकजण कबूल करतो की ते पापी आहेत. प्रत्येकजण कबूल करतो की ते परिपूर्ण नाहीत, त्यांनी कांहीतरी चुका केल्या आहेत. मी त्याविषयी बोलत नाही.

वास्तविक किंवा विशिष्ठ पापाच्या जागृतीसंबंधी मी बोलत नाही. होय, पाप्यानी पुष्कळ पातके केली आहेत. पण केवळ त्या पापांचा विचार करुन तो तुमचे तारण करणार नाही. विशिष्ट पापाची यादी नजरेतून घातली तर, पाप्यांना वाटेल की, “मी ह्या गोष्टी करीत नाही, त्यामुळे माझे तारण व्हायला हवे.” किंवा त्याला वाटेल, “मी ह्या करण्याच्या बंद करीन आणि माझे तारण झाले आहे हे मला दाखवील.”

त्याहून अधिक खोल पाप जाते. आंतरिक सर्वजण पापी आहोत, आदामापासून पापी स्वभाव आलेला आहे. सर्वांकडे पापी ह्दय आहे. पवित्रशास्त्र म्हणते, “ह्दय सर्वात कपटी आहे, आणि ते असाध्य रोगानी ग्रस्त आहे” (यिर्मया 17:9). प्रत्येक पापी आंतरिक स्वार्थी आहे. प्रत्येक पापी त्याच्या ह्दयातून देवाच्या विरुद्ध आहे. हे विशिष्ट पाप जे त्या व्यक्तीने केले आहे त्यापेक्षा अधिक खोलवर आहे. ते ज्यात आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी ते काय करतात. जे कांही पापी करतो, त्याचे ह्दय, त्याचे सर्वस्व, पापीपणा व चुकीचे आहे ह्यापेक्षा ते खूप खोल आहे. पाप्याला त्याच्या ह्दयातील पापाची जाणीव झाली पाहिजे. तुमच्या उपदेशात व उपदेशानंतर त्याच्याशी बोलतांना, त्याच्या ह्दयातील पापाविषयी सांगा.

जशी एखादी शेळी स्वत:ला मेंढीत रुपांतर करु शकत नाही, तसे पापी स्वत:चे ह्दय बदलू शकत नाही. त्याचा अर्थ जो पापात हरविलेला आहे तो स्वत:ला तारु शकत नाही. तो स्वत:हून ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकत नाही. केवळ देव त्याला येशूकडे आणू शकतो. ख्रिस्त म्हणाला, “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्शिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही” (योहान 6:44). यास “शुभवर्तमाना प्रमाणे” म्हणतात – पापी ख्रिस्ताकडे यायला पाहिजे, पण ते तो करु शकत नाही. स्वत:ला तारण्यासाठी तो कांहीएक करु शकत नाही. जसे की पवित्रशास्त्र म्हणते, “तारण परमेश्वरापासून होते” (योना 2:9). पापी यशयाप्रमाणे असले पाहिजेत जो म्हणाला, “मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठाच्या लोकांत राहतो” (यशया 6:5). त्याच्या ह्दयातील पा दाखवा. तो स्वत:ला तारु शकत नाही हे त्याला दाखवा. त्याला कृपेची गरज आहे हे त्याला दाखवा. त्यानंतर तो ख्रिस्ताकडे येईल.

5. पाचवे, पाप्याला त्याच्या ह्दयातील पापाची जाणीव झाली तर, त्याला ख्रिस्ताकडे नेण्याचा प्रयत्न करा.

माझ्याशी बोलावयास येतात त्या सर्वांना मी ख्रिस्ताकडे नेत नाही! कांही लोक केवळ चौकस असतात. त्यांच्या पापाची क्षमा व्हावी असे त्यांना वाटत नाही. कांही लोक येतात कारण इतरहि लोक आलेले ते पाहतात. कांही लोकांना त्यांच्या पापाची जाणीव नसते आणि देवान-दिलेली जागृती नसते. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास लोकांना प्रार्थनेत नेतात जे मुर्खपणे त्यांना खोट्या परिवर्तनात आणणार. व्यक्ति ख्रिस्तावर विश्वास ठेवणार असे केव्हां वाटते?

पाप्यास “स्वत:ची घृणा” वाटली पाहिजे, असे आमच्या मंडळीत एक मुलगी म्हणाली. त्याने “स्वत:वर अवलंबून राहण्याचे सोडले” पाहिजे. त्याने “स्वत:च्या शेवटी यायला” पाहिजे. यशया त्याच्या शेवटी आला जेव्हां तो म्हणाला, “मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठाच्या लोकांत राहतो” (यशया 6:5). त्यानंतर ख्रिस्तावर विश्वास ठेवणे सोपे आहे. तो इतर कांही शिकण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याला तारणासाठी ख्रिस्ताची गरज भासते.

पाप्याने केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. स्वत: येशू ख्रिस्त व त्याच्या रक्ताद्वारे मिळणारी क्षमा याकडे पाप्यांना न्या. “येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्या रक्ताने माझे पाप धू.” या साध्या प्रार्थनेत तुम्ही त्या व्यक्तीला घेऊन जाल. किंवा प्रार्थनाच नसेल, केवळ त्याच्या रक्ताच्या द्वारे मिळणा-या क्षमेसाठी ख्रिस्ताकडे त्याला वळविणे. पाप्यास प्रार्थना म्हणण्याची गरज नाही. पाप्यास त्याच्या मनात ख्रिस्ताची प्रतिमा तयार करण्याची गरज नाही. शब्द “बरोबर” असण्याची गरज नाही. कांही लोक “बरोबर” शब्द पाठ करतात – व पुन्हा म्हणतात – पण ख्रिस्तावर विश्वास ठेवीत नाहीत. वधस्तंभावरील चोराने परिपूर्ण शब्द म्हटला नाही. तो म्हणाला, “येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हां माझी आठवण करा” (लुक 23:42). त्याला ठाऊक होते की तो आशाहीन पापी होता व तो ख्रिस्ताकडे वळला. ते इतके सोपे होते! प्रभू त्याला म्हणाला, “तूं आज माझ्याबरोबर सुखलोकांत असशील” (लुक 23:43). शब्द म्हणण्यापेक्षा स्वत: ख्रिस्तावर विश्वास ठेवणे अधिक महत्वाचे आहे!

6. सहावे, तुम्ही पाप्यांशी बोलल्यानंतर, त्याला कांही साधे प्रश्न विचारा.

त्याला विचारा, “तूं येशूवर विश्वास ठेवलास काय?” जर तो म्हणतो “नाही,” तर त्याच्याशी पुन्हा बोला. जर तो म्हणतो “होय,” तर त्याला विचारा तूं कधी येशूवर विश्वास ठेवला. जर तो म्हणतो, “मी त्याच्यावर जीवनभर विश्वास ठेवला आहे” किंवा “मी खूप अगोदर त्याच्यावर विश्वास ठेवला आहे,” तर त्याचा पालट झालेला नाही.

जर तो म्हणतो, “मी त्याच्यावर आता विश्वास ठेवतो,” तर त्याला विचारा तूं काय केले. विश्वासाची कृती जी त्याने केली ती त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. लोक “मंडळीचे शब्द” एकून पाठ करु शकतात आणि त्यांचा पालट झाला नसला तरी तेच पुन्हा म्हणतात. विश्वास ठेवणे म्हणून पाप्याने काय केले? त्याने येशू संबंधाने विश्वास ठेवला नाही ना? त्याने भावनावश होऊन विश्वास ठेवला नाही ना? किंवा त्याने थेट येशूवर विश्वास ठेवला आहे?

त्याला विचारा, “येशू ख्रिस्ताने तुझ्यासाठी काय केले?” जर तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे मिळणा-या पापक्षमेविषयी बोलत नाही, पण तो त्याच्या स्वत:चे विचार किंवा भावना किंवा चांगुलपणा याविषयी बोलतो तर, त्याचे तारण झाले नाही!

त्याला विचारा, “तूं आज मेला, तर तूं स्वर्गात का नरकात जाणार?” जर तो म्हणतो, “स्वर्ग,” त्याला विचारा का. तूं स्वर्गात जावे असे तुला का वाटते असे त्याला देवाने विचारले तर देवाला तो काय उत्तर देतो? तो जर ख्रिस्त व त्याचे रक्त सोडून इतराविषयी बोलत असेल तर, त्याचे तारण झाले नाही! मग त्याला विचारा, “येथून एक वर्ष, तुला वाईट विचार आला व तूं मेला त, तूं कोठे जाशील?” जर तो म्हणतो, “नरक,” तर तो ख्रिस्तावर नव्हे त्याच्या स्वत:वर अवलंबून आहे. मग त्याला विचारा, “येथून एक वर्ष, तूं मंडळी सोडली व माघारी आला नाही, आणि एका स्त्रीबरोबर (किंवा पुरुष), शाररिक संबंध ठेऊन, लग्न न करता राहू लागला, आणि तुम्ही दररोज मादक द्रव्य घेता तर, तुम्ही ख्रिस्ता आहांत की नाही? जर तो म्हणतो, “होय” तर त्याने पापाची समस्या कधी हाताळली नाही, आणि तो अजूनहि पापात हरविलेला आहे.

केवळ, “मी येशूवर विश्वास ठेवला” असे म्हणून उपयोग नाही हे त्याला सांगा, पण ज्या क्षाणाला विश्वास ठेवला तेव्हा येशूबरोबर काय केले ते सांगा. त्याच्या विश्वासाची वेळ हवी आहे, त्याची संपूर्ण जीवनगाथा किंवा त्या दिवशी काय घडले ते नको. विशिष्ठ विचार किंवा भावना हे मला नको आहे. पण त्याच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्याला मिळणारी त्याच्या पापाची क्षमा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. विस्तारीत अनुभव हा व्यक्तीगणिक वेगळा असू शकतो. वास्तवात ती व्यक्ती काय म्हणते, यासंबंधी मला प्रामाणिकपणा हवा.

ती व्यक्ती चुक करतेय तर, ती सुधारा व पुन्हा त्याच्याशी बोला. पण ती व्यक्ती पुन्हा पुन्हा तीच चुक करतेय तर, ती व्यक्ती परिवर्तनासंबंधी गंभीर नाही. ज्याला देवाने तारणासाठी आकर्षित केले आहे त्याने तुमचा उपदेश व सल्ला ऐकायला हवा. तर जो ऐकत नाही त्याचा पालट होत नाही.

तुम्ही त्याच्याशी बोलल्यानंतरहि जर तो तारण होऊ नये म्हणून बाजूला जातो तर तुम्ही निराश होऊ नका. कांही लोकांचा पहिल्यांदा शुभवर्तमान ऐकल्यावर पालट होतो, पुष्कळांचा होत नाही. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यापूर्वी बरेचसे लोक पुन्हा पुन्हा येतात.

पाहा प्रत्येक व्यक्ती एकाहून जास्तवेळ येते. लगोलग लोकांना बाप्तिस्मा देऊ नका. किमान एक वर्षे त्यांना वाट पाहायला सांगा, सध्याच्या घडीला मंडळ्यातील विश्वास त्यागाची स्थिती पाहता शक्यतो दोन वर्षे बरे. शक्यतो दोन किंवा तीन वर्षे बरे. त्याचा विश्वास अस्सल आहे का हे तुम्हाला पाहता येईल. त्या दरम्यान त्या व्यक्तीला विविध प्रकारे तपासता येईल. तुम्ही त्याची साक्ष विचारु शकता – मंडळीच्या उपासनेच्या बाहेर. तुम्ही ता एका आठवड्याने किवा महिन्याने विचारु शकता. ज्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही त्याने बनविलेली “साक्ष” तो विसरुन जाईल आणि तो एक किवा दोन वर्षाने चुक करणार. त्यांना फक्त “पुढे द्यायचे” असते व मान्यता मिळवायची असते, पण त्यांना ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा नसतो. कांहीजण कांही वचने पाठ करतात व तेच पुन्हा म्हणतात, पण जेव्हां तुम्ही वेगळ्या प्रकारे व वेगळ्या वेळी विचारता मग त्यांना काय सांगावे कळत नाही, कारण त्यांना येशूवर विश्वास ठेवल्याचा वैयक्तिक अनुभव नसतो.

त्याच्या वागण्या बोलण्याकडे लक्ष द्या. व्यक्ती जी तुमची मंडळी सोडून गेली आहे व तुमचे ऐकत नाही जी त्याच्या पापासंबंधाने गंभीर नाही आणि ती ख्रिस्तावर विश्वास ठेवीत नाही. मंडळी व ख्रिस्ती जीवन यासंबंधाने त्या व्यक्तीचा नेहमीच वाईट भावना आहे तो त्याच्या पापासंबंधाने गंभीर नाही आणि तो ख्रिस्तावर विश्वास ठेवीत नाही.

7. सातवे, ख-या समुपदेशनाच्या सेवेची कसोटी आहे हे लक्षात ठेवा.

ख-या समुपदेशनाच्या सेवेची कसोटी अशी आहे: तूं ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाहीस व त्या दिवशी तुझा पालट झाला नाही हे त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकाल काय? त्याने परत तुमच्याकडे येऊन त्याच्या तारणासंबंधी सांगितले पाहिजे हे त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकाल काय? कोणता पाळक असा करतो हे मला ठाऊक नाही. त्यामुळेच आपल्या मंडळ्यात पापात हरविलेल्या लोकांचा भरणा आहे, त्यात शब्बाथ शाळा शिक्षक, डिकन, पाळकाची पत्नी, आणि स्वत: पाळक सुद्धा आहे. पाळक त्यांच्या आमंत्रणास प्रतिसाद देणा-या प्रत्येकांनी पापांगिकाराची प्रार्थना करावी ह्यावर भर देतात. ते असे करतात कारण त्यांना बाप्तिस्मा झालेल्यांची संख्या मोजायची असते. त्यांनी बाप्तिस्मा केलेल्यामध्ये एकाचेहि तारण झाले नसते. ते मंडळीशी विश्वासू राहत नाहीत कारण त्यांचा नव्याने जन्म झालेला नसतो. हे लोक “माघारी फिरलेले” नसतात. ते पापात हरविलेले असतात कारण प्रचारकाने त्यांचा पालट झाला आहे किंवा नाही याची खातरी केलेली नसते. तुम्ही त्याला तूं अजून पापात हरविलेला आहेस व तुला पुन्हा यावे लागेल हे सांगू शकता ही तुमच्या सेवेतील कसोटी आहे. तुम्ही “देवापेक्षा अधिक माणसांची स्तुती करणे आवडणारे” नाहीत ना? (योहान 12:43). किंवा लोकांना सत्य आवडो अगर न आवडो ते तुम्ही सांगणार?

हा तो सांगण्याचा मार्ग: तुम्ही ख-या परिवर्तावर विश्वास ठेवता काय? – ख्रिस्तावरील खरा विश्वास हा खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास भाग पाडते काय? तुम्ही केवळ पापांगिकाराची प्रार्थना, किंवा हात उंचाविणे, किंवा कार्डचे चिन्ह दाखविणे, की तुम्ही “निर्णय” घेतला आहे यावरच भर देतायत तर. तुम्ही देवाने पाठविलेल्या जीवाची फक्त काळजी घेताय.

मला आशा आहे की तुमच्यापैकी कांहीजण ख-या परिवर्तनावर विश्वास ठेवतात. मला आशा आहे की तुमच्यापैकी कांहीजणांना वाटते की त्या व्यक्तीबरोबर वेळ द्यावा, आणि तो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो व पालट झाला की नाही हे पाहणे गरजेचे आहे. हा तो विश्वासू पाळक करतो. विश्वासू मेंढपाळ मेंढपाळाची काळजी घेतो. लोकांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला व पालट झाला की नाही ह्याची तुम्ही खातरी कराल अशी मला आशा आहे.

तुम्हांला वाटेल मी या विषयात खूप विस्तृत गेलो आहे, हा पालट अगदी सोपा आहे त्याला जास्त विचाराची गरज नाही. पण जर बाळ कसे होते ह्याची विस्तृत माहिती जाणून घेण्यास वैद्यकीय प्रसुतिशास्त्राची गरज भासली नाही तर? जर त्यांनी त्याच गोष्टी केल्या, किंवा त्यांना आपले हात धुतले नाही, किंवा जन्म देण्यास खालच्या भागाची माहिती नसेल तर, इ.? जर आपण बाळांना आत्म्यांना जन्म देतो तसे हाताळले तर, हजारो बाळके विनाकारण ठरतील – कारण आता हजारो आत्मे विनाकारण मरतायत आणि नरकात जातायत कारण त्यांचा पालट झाला की नाही याची खातरी करण्यास वेळ देत नाही, किंवा हे पवित्रशास्त्र शाळा व सेमीनरीत कसे करावे हे लोकांना शिकवितो – जेथे हे अजिबात शिकविले जात नाही!!!

मी “देन जीजस कम” हे ओस्वाल्ड जे. स्मिथ यांनी लिहलेले व होमर रोडहिवर यांनी संगीत दिलेल्या गीताचे शब्द वाचणार आहे. जेव्हां येशू तुमच्या जीवनात येतो, त्याचे रक्त तुमची सर्व पापे शुद्ध करतो; त्याने वधस्तंभावर सांडलेले रक्त अजूनहि तुमच्या पाप शुद्धीसाठी उपलब्ध आहे. आणि तुम्हांस सार्वकालीक जीवन देण्यास येशू मरणातून उठला. केवळ येशूवर विश्वास ठेवा आणि तो तुमच्या पापाची क्षमा करील आणि तो तुम्हांस सार्वकालीक जीवन देईल. मला आशा आहे की तुम्ही परत याल व आमच्याबरोबर रात्रौ 6:15 वाजता जेवायला या. डॉ. हायमर्स हे “अ ब्लाईंड मॅन हिल्ड बाय जीजस” या शिर्षकाचा सुवार्तिक उपदेश देणार आहेत. रात्रौ 6:15 वाजता येण्याची खातरी करा आणि डॉ. हायमर्स यांच्या संदेशानंतर जेवणास थांबा.

एकजण हम रस्त्याच्या बाजूला भीक मागत बसला होता,
तो डोळ्याने अंध होता, तो प्रकाश पाहू शकत नव्हता.
त्याने त्याची कांबळ घट्ट पकडली व अंधारात थरथर लागला
मग येशू आला आणि त्याने त्याचा अंधकार घालविला.
जेव्हां येशू आला, तेव्हां सैतानाची सामर्थ्य तुटले गेले;
जेव्हां येशू आला, डोळ्याचे अश्रू पुसले गेले,
त्याने खिन्नता घालविली व गौरवाने जीवन भरले,
जेव्हां येशू राहायला आला तेव्हा सर्वकांही बदलून गेले.

घर व मित्र यातून तो दुष्टात्म्याला घालवून देतो,
तो कबरांत दु:खात वसति करतो;
सैतानाने पछाडलेल्यासारखे तो स्वत:ला घाव करतो,
मग येशू आला आणि त्याला बंधमुक्त केले.
जेव्हां येशू आला, तेव्हां सैतानाची सामर्थ्य तुटले गेले;
जेव्हां येशू आला, डोळ्याचे अश्रू पुसले गेले,
त्याने खिन्नता घालविली व गौरवाने जीवन भरले,
जेव्हां येशू राहायला आला तेव्हा सर्वकांही बदलून गेले.

म्हणून आज समर्थ तारक माणसांना सापडला,
ते आवेश, वासना व पाप यावर विजय मिळवू शकले नाहीत;
त्यांचे भग्न अंत:करण दु:खी व एकाकी पडले होते,
मग येशू आला आणि स्वत:, त्याने त्यांच्यात, वसति केली.
जेव्हां येशू आला, तेव्हां सैतानाची सामर्थ्य तुटले गेले;
जेव्हां येशू आला, डोळ्याचे अश्रू पुसले गेले,
त्याने खिन्नता घालविली व गौरवाने जीवन भरले,
जेव्हां येशू राहायला आला तेव्हा सर्वकांही बदलून गेले.
   (“मग येशू आला” डॉ. ओस्वाल्ड जे. स्मिथ यांच्याद्वारा, 1889-1986;
      होमर रोडहिवर यांच्याद्वारा संगीत, 1880-1955).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकेड ग्रिफ्फित यांनी गायले: “देन जीजस कम”
(डॉ. ओस्वाल्ड जे. स्मिथ यांच्याद्वारा, 1889-1986;
संगीत होमर रोडहिवर यांच्याद्वारा, 1880-1955).
“Then Jesus Came” (by Dr. Oswald J. Smith, 1889-1986;
music by Homer Rodeheaver, 1880-1955).


रुपरेषा

ख्रिस्ताकडे एखादा आत्मा कसा न्यावा —
परिवर्तनासाठी समुपदेशन!

HOW TO LEAD A SOUL TO CHRIST –
COUNSELING FOR CONVERSIONS!

डॉ. सी. एल. यांच्याद्वारा लिखीत
आणि रेव्ह. जॉन सॅम्युएल कागॅन यांनी दिलेला उपदेश
A sermon written by Dr. C. L. Cagan
and preached by Rev. John Samuel Cagan

“तुमचा पालट होऊन...स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही” (मत्तय 18:3).

(योहान 3:3, 7; II करिंथ 5:17)

1. प्रथम, पाळकांनी पाप्याचे ऐकून घेतले पाहिजे.

2. दुसरे, पापी येशू ख्रिस्तासंबंधाने चूक करतात, रोम 8:34; लुक 24:37-43.

3. तिसरे, पापी तारणासंबंधी चुका करतात, तीतास 3:5; याकोब 2:19; इफिस 2:20.

4. चौथे, पाप्यांना त्यांच्या ह्दयात पापाची जाणीव होणे गरजेचे आहे,
यिर्मया 17:9; योहान 6:44; योना 2:9; यशया 6:5.

5. पाचवे, पाप्याला त्याच्या ह्दयातील पापाची जाणीव झाली तर, त्याला ख्रिस्ताकडे नेण्याचा प्रयत्न करा, यशया 6:5; लुक 23:42, 43.

6. सहावे, तुम्ही पाप्यांशी बोलल्यानंतर, त्याला कांही साधे प्रश्न विचारा.

7. सातवे, ख-या समुपदेशनाच्या सेवेची कसोटी आहे हे लक्षात ठेवा, योहान 12:43.