संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
मंगळवारच्या आपल्या उपवास-दिनावरील टिपण्णीNOTES ON OUR FAST-DAY ON TUESDAY डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “तू तर उपास करितोस तेव्हां आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू; अशा हेतूने की, तूं उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल” (मत्तय 6:17, 18). |
लक्षात घ्या येशू असा म्हणाला नाही की, “तुम्ही जर उपास कराल.” नाही, तो म्हणाला, “जेव्हां तूं उपास करतोस तेव्हां.” धर्मनिरपेक्षवाद्यांसाठी उपास ही संकल्पना विचित्र वाटते. कधीकधी अति-उत्साही आई विचार करते की तुम्ही एक दिवस अन्नाविना राहिला तर उपासमारीने मराल. तुमच्या आईशी खोटे बोलू नका. फक्त तिला सांगा की ते जेवण तुम्ही करणार नाही.
सगळ्यांनी उपास करु नये. तुम्हांस कांही शाररिक समस्या असेल तर एक दिवसाचा उपास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या मंडळीत, तुम्ही डॉ. जुडीथ कागॅन, किंवा डॉ. क्रिगटन एल. चान यांना पाहू शकतो. किंवा तुम्ही त्यांना फोनवर कॉल करु शकता. डॉ. जुडीथ कागॅनचा सेल नंबर आहे (213)324-3231. डॉ. चानचा सेल नंबर आहे (323)819-5153. तुम्हांला मधुमेह, किंवा उच्चरक्तदाब, किंवा आणखी दुसरा कशाचा त्रास असेल तर डॉ. जुडीथ कागॅन, किंवा डॉ. चान यांना कॉल करा, किंवा या उपासनेनंतर त्यांच्यापैकी एकाशी बोला. तुम्ही उपास करु नये असे ते सांगतात, तर मंगळवारी आपण उपास करु तेव्हां तुम्ही प्रार्थनेत अधिक वेळ व्यतित करा. त्या दिवशी उपास न करताहि तुम्ही प्रार्थनेत सामील होऊ शकता.
मंगळवारी, 14 ऑगष्ट रोजी, आपल्या मंडळीत उपासाचा दिवस असेल. कोणासहि उपास करण्याची जबरदस्ती नाही. तुम्ही उपास करणार की नाही हे कोणीहि तपासणार नाही. तुम्ही आमच्याबरोबर उपास करता आहांत तर तो सर्वस्वी स्वयंस्फुर्तीने करा. तुम्हांला करावासा वाटला तर करा. तुम्हांला करावासा वाटत नाही तर करु नका.
कित्येक महिन्यातून हा आपला पहिला उपासाचा दिवस आहे. लिबर्ट युनिव्हर्सिटीचे सह-संस्थापक डॉ. एल्मर एल. टाऊन्स यांनी उपास व प्रार्थनेच्या आवश्यकतेची मला आठवण करुन दिली. ह्या उपदेशात मी जो विचार व प्रतिक्रिया देणार आहे त्या डॉ. टाऊन्सचे पुस्तक, द बिगिनर्स गाईड टू फास्टिंग, बेथानी हाऊस पब्लिशर्स, 2001 यातून घेतलेले आहेत. हे खूप चांगले पुस्तक आहे. त्याची तुम्हांला प्रत हवी असेल तर, ते तुम्ही Amazon.com वरुन त्याची मागणी करु शकता.
डॉ. टाऊन्सच्या पुस्तकात पुष्कळ सत्य आहेत. पण आपण एक-दिवसाचा उपास करणार आहोत, ज्यांस ते “योम किप्पुर उपास” असे संबोधतात. हा एक-दिवसाचा उपास होता जो यहुदी विश्वासणा-यांना करावा लागत असे (लेवी 16:29).
आज, ख्रिस्ती लोकांना उपास करण्याची गरज नाही — परंतू आपणांस उपास करण्यास मुभा आहे. येशू म्हणाला, “जेव्हां तुम्ही उपास करता” (मत्तय 6:16) कारण उपास हा आपले व्यक्तित्व व विश्वास उभारण्यासाठीची शिस्त आहे.
तुम्ही कधीच उपास केला नसेल तर पूर्ण दिवस अन्नाविना राहणे ह्या विचाराने घाबराल. वजन कमी करण्यासाठी उपास करतात त्यापेक्षा कांही इजा तुम्हांस होणार नाही. एक-दिवसाचा उपास साधारण माणसाला ज्यांस डॉ. जुडीथ कागॅन, किंवा डॉ. चान अशा डॉक्टरानी — “ठिक आहे” असा शेरा दिला आहे त्यांस कांही इजा नाही.
एक-दिवसाचा “योम किप्पुर उपास” तुम्हांस मंगळवारी तुमचा पहिला उपास करण्याचा उत्तम मार्ग आहे. तुम्हांला उपास करण्याची आवश्यकता नाही. एक आध्यात्मिक शिस्त म्हणून तो तुम्ही स्वत:हून करावयाचा आहे. दुसरे काय विचार करतात याची काळजी करु नका, कारण तुमचा हा उपास तुम्ही व देव यांच्यामधील व्यक्तिगत कटिबद्धता आहे. देवाकरिता प्रार्थना योद्धा होण्यास तुम्हांस उपासाची मदत होईल.
मंगळवारी जेव्हां तुम्ही उपास कराल, तेव्हां विरोधाची अपेक्षा करा. सैतान तुम्हांला अडवेल. तुम्ही इतरांच्या तारणासाठी किंवा मंडळीसाठी, प्रार्थना करता तेव्हां सैतान तुम्हांला अडवेल. उपास करणे सोपे नाही. त्यामुळे जेव्हां तुम्ही उपास करण्याचे धाडस करता तेव्हां तो समजून उमजून करा म्हणजेच जो कठीण असतो. परंतू त्याचे पारितोषिक मुल्यवान असेल!
पवित्रशास्त्रात एक-दिवसाचा “योम किप्पुर उपास” हा सूर्यास्ता पासून तो सूर्यास्ता पर्यंत होता. तुम्ही आमच्यासह उपास करणार आहांत तर सूर्यास्तापूर्वी नाश्ता करु शकता (रात्रौ 8:30 वा. दरम्यान) एक केळी किंवा एक वाटी पेज खा. दुस-या दिवशी नाश्ता किंवा जेवण करु नका. जेव्हां मंगळवारी सूर्यास्त होईल तेव्हां आपणांस मंडळीत रात्रौभोज असेल. मंगळवारी 7:00 वा. मंडळीत येण्यापूर्वी, आणखी एक केळी सारखा नाश्ता करु शकता. तुम्ही येथे याल तेव्हां तुम्हांस लापशी व सॅँडविच खाण्यास उपलब्ध असेल. त्यानंतर आणखी प्रार्थना होतील, आणि तुमच्या दिवसभरातील उपास व प्रार्थनेसंबंधीची साक्ष देण्याची संधी असेल, आणि मी छोटासा उपदेश दईन.
मंगळवारी जेव्हां तुम्ही उपास व प्रार्थना कराल, तेव्हां त्यास एक उद्देश असला पाहिजे. शनीवारच्या संध्याकाळचे जे प्रयोजन ज्यात माणसांकरिता खेळ ठेवला आहे त्याद्वारे आपल्या मंडळीत इतर आणखी लोक आणण्यासाठी या योजनेचा उपयोग व्हावा अशी देवाला प्रार्थना करावी हा ह्या एक दिवसाच्या उपासाचा उद्देश आहे. देव जर ह्या खेळास आशिर्वाद देणार नाही तर आपल्या मंडळीत कोणीहि येणार नाही, आणि हे खेळ म्हणजे आणखीन एक कार्यक्रम असे होईल, “मशीनरी” मंडळीचा एक भाग, आणखीन एक कार्यक्रम ज्याचे फलित कांही नाही. आपल्या महिला मंडळाच्या नवीन कार्यक्रमासाठी प्रार्थना करण्यास कांही दिवसात आपण आणखी एक उपासाचा दिवस घेणार आहोत. परंतू सर्व, महिला व पुरुष ह्या दोघांना, मी सांगत आहे की मंगळवारी उपास व प्रार्थना अशी करा की शनीवारच्या संध्याकाळचे जे प्रयोजन ज्यात माणसांकरिता खेळ ठेवला आहे त्याद्वारे आपल्या मंडळीत इतर आणखी लोक आणण्यासाठी देवाने उपयोग करावा. तुम्ही आणखीनहि कांही गोष्टींसाठी प्रार्थना करा — परंतू ह्या एक दिवसाच्या उपासाचा उद्देश हा आहे की शनीवारच्या संध्याकाळच्या प्रयोजनावर लक्ष केंद्रित करणे ज्यात माणसांकरिता खेळ ठेवला आहे त्याद्वारे आपल्या मंडळीत आणखी तरुण लोक आणण्याठी या योजनेचा उपयोग व्हावा. त्यावर लक्ष केंद्रित करणे हा तुमच्या प्रार्थनेचा मुख्य उद्देश असावा — यासाठी की ह्या खेळात लोकांनी माणसांना आणावे व तद्नंतर आपल्या रविवारच्या उपासनेस भेट देण्यास देवाने त्यांना साहाय्य करावे. ह्या उद्देशासाठी उपास व प्रार्थना करा. ह्या उद्देशासाठी आपणांबरोबर उपास करण्यासाठी आपणांस महिलांचीहि गरज आहे.
थोडासा नाश्ता करुन सोमवारी संध्याकाळी उपासाची सुरुवात करा, मंगळवारी त्यानंतर नाश्ता व दुपारचे जेवन न करता उपास करा. संध्याकाळी आणखी थोडा नाश्ता करुन, मंगळवारी संध्याकाळी 7:00 वा. मंडळीत या, आणि मग थोडी पेज व सॅंडविच घेऊन एकत्रित उपास सोडूया.
“जेव्हां तुम्ही उपास करता”...याचा अर्थ येशूने उपासाला मान्यता दिली आहे. पवित्र आत्म्याकडून सामर्थ्य व मार्गदर्शन मिळावे म्हणून ख्रिस्ती लोकांनी उपास करावा. डॉ. जॉन आर. राईस म्हणाले, “खरा उपास मला ठाऊक आहे...देवाला आपणांस जो आशिर्वाद द्यायचा असतो ते तो देणार.” स्पर्जन म्हणाले, “आपण मंडळीत उपास सोडून दिल्यामुळे मोठा आशिर्वाद गमाविला आहोत.” डॉ. आर. ए. टोरी म्हणाले, “आपण सामर्थ्याने प्रार्थना करणार तर, उपास धरुन प्रार्थना करावी.” महान सुवार्तिक जॉन वेस्ली म्हणाले, “तुम्ही कधी दिवसभरासाठी उपास व प्रार्थना केली? कृपेचे सिंहासन हादरवा...आणि दया खाली उतरेल.” माझे चिनी पाळक, डॉ. तिमथी लीन म्हणाले, “जसे आपण उपास व प्रार्थना करु तसे आपली आध्यात्मिक सजगता खुली होते...हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून बोलत आहे.”
आज रात्रौ ह्या उपदेशाची प्रत घरी घेऊन जा. उद्या संध्याकाळी नाश्ता घेऊन उपासाची सुरुवात करणार तेव्हां हा उपदेश वाचा. सोमवार संध्याकाळ पासून मंगळवार संध्याकाळ पर्यंत तुम्ही उपास करणार तेव्हां ह्या कांही सुचना आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा:
1. तुमचा उपास गुप्त ठेवा (शक्य तेवढा). तुम्ही उपास करीत आहांत हे इकडे तिकडे सांगू नका.
2. मंगळवारच्या उपासा दरम्यान यशया 58:6 पाठ करा.
“दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दो-या सोडाव्या, जाचलेल्यांस मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?” (यशया 58:6).
3. मंगळवारच्या उपास करतांना मत्तय 7:7-11 काळजीपूर्वक पुन्हां पुन्हा वाचा.
“मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल; कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असतांना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरुन चांगल्या देणग्या देईल?” (मत्तय 7:7-11).
4. 18 ऑगस्ट, शनीवारच्या बास्केटबॉल खेळासाठी माणसांनी पुष्कळ तरुण लोकांना आणावेत म्हणून प्रार्थना करा.
5. भरपूर पाणी प्या, दर दोन तासाला एक प्याला तरी प्या. तुम्हांला काळी कॉफी किंवा चहा प्यायची सवय असेल तर ते तुम्ही (दुध मलई किंवा साखरे शिवाय) पिऊ शकता. तुम्हांला “हलके-डोके” वाटत असेल तर स्प्राईट किंवा सेव्हन-अप ही शीतपेये (एक किंवा दोन प्याला) पिऊ शकता. शक्तीवर्धक पेय पिऊ नका!
6. तुमची तब्बेत, उच्च रक्त दाब किंवा मधुमेह ह्या सारख्या त्रासासंबंधी कांही प्रश्न असतील तर, तुम्ही डॉ. जुडीथ कागॅन किंवा डॉ. क्रिगटन चान यांच्याशी उपास सुरु करण्यापूर्वी बोला. ह्या उपदेशात अगोदरच त्यांचे सेल नंबर दिले आहेत.
7. सोमवार संध्याकाळी नाश्ता करुन उपासाला सुरुवात करा. मंगळवारी संध्याकाळी हलका नाश्ता घेऊन उपासाची समाप्ती करा — त्यानंतर मंगळवारी 7:00 वा. हलके रात्रौभोज घेण्यास मंडळीत या.
8. पुढच्या शनीवारी आपल्या माणसांनी बास्केटबॉल खेळासाठी अधिक तरुणांना आणावे या यशासाठी तुमच्या मंगळवारच्या प्रार्थनेवर लक्ष केंद्रित करायचे लक्षात ठेवा.
तुम्हांला कांही समस्या किंवा प्रश्न असतील तर, डॉ. हायमर्स (818)352-0452 यावर, तुम्ही मला फोन करु शकता किंवा मिसेस हायमर्स (818)645-7356 यावरहि तिला फोन करु शकता किंवा मला भेटायचे हे तिला सांगा.
तुमच्या उपास व प्रार्थनेचा समय यशश्वी होवो अशी मी प्रार्थना करतो! आणखी एक गोष्ट: तुम्ही मंगळवारी कामात किंवा शाळेत असाल तर, ह्या विनंत्यासाठी वेळोवेळी शांततेत प्रार्थना करा. ह्या उपदेशाची प्रत मंगळवारी आपल्या जवळ ठेवा यासाठी की तुम्ही (वरील) हे 8 मुद्दे पुन्हा पुन्हा वाचू शकाल. देव तुम्हां सर्वांना आशिर्वादित करो!
डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि.
फिलिप्पै 4:13
कृपया उभे राहा व गीत क्रं 4 गा, “मला प्रार्थना करण्यास शिकीव.”
मला प्रार्थना करण्यास शिकीव, प्रभू, मला प्रार्थना करण्यास शिकीव; दिवसेंदिवस;
मी तुझी इच्छा व तुझा मार्ग जाणून आहे; मला प्रार्थना करण्यास शिकीव, प्रभू,
मला प्रार्थना करण्यास शिकीव.
प्रार्थनेत सामर्थ्य, प्रभू, प्रार्थनेत सामर्थ्य, येथे पृथ्वीचे पाप व दु:ख व काळजी मध्ये;
हरविलेली व मरणासन्न माणसे, निराशेतील आत्मे; हो मला सामर्थ्य दे, प्रार्थनेत सामर्थ्य!
मला प्रार्थना करण्यास शिकीव, प्रभू, मला प्रार्थना करण्यास शिकीव; तूं माझा आदर्श आहेस, दिवसेंदिवस;
तूं माझी खात्री आहेस, आता व सदासर्वकाळ; मला प्रार्थना करण्यास शिकीव, प्रभू, मला प्रार्थना करण्यास शिकीव.
(“टिच मी टू प्रेअर” अल्बर्ट एस. रिट्झ, 1879-1966).
जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.
ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.
उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकेड ग्रिफ्फित यांनी गायले:
“टिच मी टू प्रेअर” अल्बर्ट एस. रिट्झ, यांच्याद्वारा,1879-1966).
“Teach Me to Pray” (Albert S. Reitz, 1879-1966).