Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




शिष्यत्वासाठी पाचारण

THE CALL TO DISCIPLESHIP
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 1 जुलै, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord's Day Evening, July 1, 2018

“त्यांने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येवू पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वत:चा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवूं पाहतो तो त्याला मुकेल; परंतू जो कोणी माझ्याकरितां आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचवील” (लुक 9:23-24).


ख्रिस्ताने हे कोणास म्हटले? त्याने हे आपल्या सगळ्या 12 शिष्यांना म्हटले. परंतू त्याने अशाच प्रकारचा समांतर संदेश सर्व लोकांना मार्क 8:34 मध्ये दिला आहे,

“मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाहि बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरावे” (मार्क 8:34).

त्यामुळे हे स्पष्ट आहे की त्याच्या शिष्यांना धरुन − त्याचे अनुयायी होऊ पाहणा-यांना येशूने हे म्हटले. येशूचे अनुयायी होऊ पाहणा-यांनी आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचवून घ्यावा, आणि त्याला अनुसरावे. तुम्ही हे करीत नाही तर, तुम्ही खरे ख्रिस्ती होऊ शकत नाही — केवळ नवीन दुर्बळ सुवार्तिकस केवळ नामधारी ख्रिस्ती राहाल! येशू म्हणतो, “तुम्ही माझे अनुयायी होऊ पाहता काय? मग तुम्ही आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचवून घ्यावा, आणि मला अनुसरावे.”

तुम्ही हे करण्यास नकारता तेव्हां काय घडते? हा उतारा अगदी स्पष्ट करील. वचन 24, वाचा,

“जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतू जो कोणी माझ्याकरिता आपला जीवास मुकेल तो त्याला वाचवील” (लुक 9:24).

आपल्या मंडळीस येणा-या लोकांचे दोन प्रकार आहेत. मी त्यांना “घेणारे” व “देणारे” म्हणतो. “घेणारे” ते आहेत जे मंडळीत कांहीतरी “मिळावे म्हणून येतात. “देणारे” ते आहेत जे ख्रिस्ताचे शिष्य म्हणून स्वत:ला देतात. स्वार्थी लोकांनी तुम्ही शेकडोने खुर्च्या भरु शकता. त्याचा काय उपयोग? अशाप्रकारचे लोक असतील तर ते ह्या मंडळीला खल्लास करतील! ते रविवारच्या संध्याकाळच्या उपासनेसहि येणार नाहीत! ते सुवार्तिक “घेणारे” आहेत. आणि हे लोक केवळ अन केवळ मंडळी लुटण्याचे काम करतात — ते कधीहि मंडळीला कधीहि सहाय्य करीत नाहीत. ते कधीहि ख्रिस्ताचे शिष्य बनत नाहीत! ते मंडळीचा नाश करतात! अशाप्रकारचे स्वार्थी लोक आणण्याचे धआड, करणार नाहीत का! “अधिकापेक्षा थोडके बरे.”

““जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतू जो कोणी माझ्याकरिता आपला जीवास मुकेल तो त्याला वाचवील” (लुक 9:24).

कोणीतरी म्हणते, “सोडून देण्यास भरपूर खूप आहेत — गमाविण्यास भरपूर आहे.” त्यामुळे, तो सर्वस्व गमावितो, तसेच तो नरकात जातो! येशूवर विश्वास ठेवण्यास तुम्ही दुसरे कशावर विश्वास ठेऊ शकत नाहीत. येशू ख्रिस्ताला सोडून तुम्ही इतर कशावरहि विश्वास ठेवणार!

“जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतू जो कोणी माझ्याकरिता आपला जीवास मुकेल तो त्याला वाचवील” (लुक 9:24).

मी सतरा वर्षाचा असतांना, मी स्वत:ला “प्रचारक म्हणून समर्पित” केले. मला ती “प्रचारक म्हणून समर्पित,” जुनाट-पद्धत आवडली. ते मला अधिक ऐकावेसे वाटत नाही. पण तितकच खरे सुद्धा आहे. ख-या प्रचारकाने प्रचारासाठी स्वत:ला “समर्पित” केले पाहिजे. त्याला ठाऊक आहे ते इतके सोपे नाही. त्याला ठाऊक आहे तो अधिक पैसे कमावित नाही. त्याला ठाऊक आहे त्याला जगाची प्रशसा आवडत नाही. त्याला ठाऊक आहे थोड्याशा कठीणाईतून व दु:खातून त्याला जावे लागणार आहे. सर्वोत्कृष्ट प्रचारकास ह्या गोष्टी ठाऊक असतात. त्यांना हे सुद्धा ठाऊक असते की जी नोकरी त्यांना अधिक पैसा देणार नाही – ज्या नोकरीस पापी जग निरुपयोगी समजते – नोकरी त्यास मुर्ख बनविते आणि जगातील पुष्कळ लोकांबरोबर भांडायला लावते अशा नोकरीसाठी शाळेत पुष्कळ वर्षाच्या खस्ता खाव्या लागतात.

अशा पुष्कळ गोष्टी मी 17 वर्षाचा झाल्यानंतर मला समजले. मला महाविद्यालयाची पदवी प्राप्त करण्यासाठी रात्र महाविद्यालयाची (दिवसा आठ तास काम करायचे व रात्री महाविद्यालयात जायचे) आठ वर्षे लागली. शुल्क भरण्यासाठी रात्र महाविद्यालयाच्या माध्यमातून मी दिवसाचे 16 तास, आठवड्याचे सात दिवस काम करायचो. त्यामुळे मला मास्टर पदवी मिळविण्यास, ज्याचा मी तिरस्कार करी त्या सेमीनरीत आणखी तीन वर्षे घालवावी लागली. ह्या सारखी मंडळी होण्यासाठी मला चाळीस वर्षाहून अधिक काळ घालवावा लागला. मी हे सर्व पुन्हा करीन? हो, नक्की! त्यात तिळमात्र शंका नाही!

मी त्यात का गेलो? मी प्रचारासाठी माझे समर्पण केले होते. हे असं अगदी सोपे आहे. 17 वर्षाचा असतांना मी पुन्हा एकदा हे करीन? हो, नक्की! निश्चितच! त्याविषयी प्रश्नच नाही! प्रचारक म्हणून देवाने-पाचारण केलेल्या ह्या विश्वास त्यागाच्या दिवसात — मला एक मोठे समाधान मिळाले! अमेरिकेच्या अध्यक्षापासून ते ॲकेडमी ॲवार्ड जिंकणा-या नटापर्यंत — सर्व जगातून असा दुसरा कोणताहि व्यवसाय निवडण्याची एक संधी असती तर, मी निसंकोचपणे ह्या मंडळीचा पाळक होणे निवडले असते. देवाला ठाऊक आहे मी सत्य बोलत आहे! तसेच माझा मुलगा, रॉबर्टहि करतोय.

आमची मंडळी कोसळत होती, तेव्हां जे येथे राहिले त्या महान ख्रिस्तीजणांकडे पाहा. त्यांनी मंडळी वाचविली. आम्ही त्यांना “एकोण-चाळीस” म्हणतो. त्यांचे सर्व मित्र सोडून गेले. मंडळीच्या फाळणीमध्ये — त्यांनी त्यांच्या सगळ्या मित्रांना गमाविले! हे सोपे होते असे तुम्हांला वाटते का? मला ठाऊक असलेल्या कोणत्याहि ख्रिस्तीजणांपेक्षा त्यांनी — तुम्हां तरुणांसह खूप श्रम घेतले आहेत. त्यांनी दान व दशांशापेक्षा कितीतरी अधिक — हजारो हजारो डॉलर्स दिले आहेत. ही मंडळी वाचविण्यासाठी — ते प्रत्येक सभेला आले आणि रात्रीची कामे करत राहिले. त्यांच्यातील कित्येकांची मुले सोडून, पुन्हा परत जगात गेली. ख्रिस्ताकरिता ही मंडळी वाचविण्यासाठी त्यांनी खूप मोठे कष्ट सहन केले आहे.

ख्रिस्ताकरिता सर्वस्व दिल्याचा त्यांना खेद वाटतो का ते त्यांना विचारा! त्यांना विचारा! त्यांना विचारा! ख्रिस्ताकरिता ही मंडळी वाचविण्यासाठी त्यातील कित्येकांनी आपले जीवन झोकून दिले होते. चूक केली वाटते ते त्यांना विचारा. असंच पुन्हां कराल काय ते त्यांना विचारा! जा जा, त्यांना विचारा!

मि. प्रुढोम यांना विचारा. त्यांनी पोहण्याच्या तलावासह आपले घर गमाविले आहे. तिने ते घेतले. संपूर्ण रात्र त्या त्यांच्यावर ओरडत होत्या. आपण नरकात आहोत असे त्यांना वाटले. त्यांनी त्यांचे जीवन कवडीमोल केले! तुम्हांला माहित आहे का ते कोण होते. मि. प्रुढोम यांनी चूक केली का? सर्वस्व गमाविल्याचा त्यांना खेद आहे का? आत्मत्याग करुन आपला वधस्तंभ घेऊन येशूला अनुसरल्याचा मागे वळून पाहतांना त्यांना दु:ख वाटते का? नाही, त्यांना खेद वाटत नाही! मी हे सांगणार आहे हे त्यांना सांगितले नाही. आणि मला हे त्यांना सांगण्याची गरज नाही. त्यांच्या खोल अंत:करणात, त्यांना माहित आहे, की “जो कोणी त्याच्याकरिता आपल्या जीवास मुकेल, तो आपल्या जीवाला वाचविल” (लुक 9:24). मिसेस सालाझर यांना विचारा! जा पुढे, त्यांना विचारा. त्यांचे पति वारले आहेत. त्यांची मुले त्यांना सोडून गेली आहेत. त्यांनी आपला वधस्तंभ घेऊन येशूला नुसरल्याचे दु:ख होते का विचारा. मी हो सांगू का म्हणून त्यांना विचारले नाही. मला माहित आहे की त्या पुढेहि असेच पुन्हा करणार. त्यांना ठाऊक आहे की “जो कोणी त्याच्याकरिता आपल्या जीवास मुकेल, तो आपल्या जीवाला वाचविल.” मिसेस हायमर्स यांना विचारा. माझ्या विवाह करुन त्यांना कांहीच मिळाले नाही! आमच्याकडे कांहीहि नाही. आम्ही एक खोली असलेल्या अपार्टमेंट मध्ये राहतो. आमच्याकडे फर्निचर नाही. आमच्याकडे टी.व्ही. नाही. आम्ही जमिनीवर बसतो व आम्हांस कोणीतरी दिलेल्या पिंज-यातील लहान पोपटाकडे पाहत राहतो. मला खूप कमी मानधन मिळते. सर्वांनी आमच्यावर हल्ले केले. तिला माझ्याबरोबर ठेवलेच पाहिजे – आणि एका मागून एक अशा मंडळ्या तुटल्या जातांना पुष्कळदा मी भग्न होत असे. आज रात्री ही जी मंडळी आहे ती असण्यासाठी जे कष्ट माझ्या लहानशा पत्नीने घेतले ते कोणत्याहि मुलीला घ्यावयास लागू नये. तिने चूक केली का हे तिला विचारा. ती पुन्हा असे करणार का हेहि विचारा. मी हे सांगू का हे मी तिला विचारले नाही. मला हे तिला विचारण्याची सुद्धा गरज नाही! आणि मला ठाऊक आहे की हे ती पुन्हा येशूकरिता करणार! मि. ली यांना विचारा! येशूला अनुसरण्यासाठी त्यांनी आपला वधस्तंभ घेतल्याने त्यांचे आईवडिल कायमचे त्यांच्यापासून दूर गेले. येशूला अनुसरण्यासाठी आपले जीवन कवडीमोल केले ही चूक आहे का ते त्यांना विचारा. मला माहित आहे की कोणतीहि तक्रार किंवा कुरकुर न करता असे ते पुन्हा करणार. मि. मस्तुसका यांना विचारा. ते पोलीस दलात गेले असते. त्यांना त्यांची गरज होती. त्यामुळे ते त्यांच्या कामात व्यस्त झाल्याने ह्या मंडळीस मदत करु शकले नसते. ह्या मंडळीस वाचविण्यासाऑ त्यांनी जेव्हां पोलीस दलातील चांगली नोकरी सोडली ते मला आठवते. त्यांनी आपला वधस्तंभ घेऊन व आत्मत्याग करुन कसे ते “एकोण-चाळीस” पैकी एक कसे झाले हे मला आठवते. देव आपमासं आशिर्वाद देवो, प्रिय बंधू! तुम्ही जे केले ते मी कधीच विसरणार नाही – देवहि विसरणार नाही! तुमच्या उदाहरणामुळे जॉन सॅमुएल कागॅन यांचे तारण झाले. तुम्ही पुष्कळ दिले आहे पण तुम्ही आपल्या मंडळीस एक पुढचा पाळक दिला आहे. आणि ख्रिस्त परत येईल तेव्हां तुम्हांस “घेण्यात” नव्हे तर “देण्यात” किती मोठा आनंद आहे हे कळून येईल! तुम्ही त्याच्या राज्यात सदासर्वकाळ राज्य कराल! नास्तिक मनुष्य जातीत शुभवर्तमान आणण्यासाठी, जीम एलिऑट रक्तसाक्षी म्हणून मारले गेले. आणि तेच जीम एलिऑट म्हणाले,

“जे गमावू शकत नाही ते मिळविण्यासाठी जे राखू शकत नाही ते जो देतो तो मुर्ख नाही.”

आमेन.

डॉ. कागॅन यांना आपल्या मंडळीतील एक तरुण म्हणाला, “मी आता व्यावसायिक बनलो आहे. मी दोन तासापेक्षा अधिक मंडळीत काम करु शकत नाही.” डॉ. कागॅन म्हणाले, “मग डॉ. चान यांच्याविषयी काय? ते एक डॉक्टर आहेत. तेहि एक व्यावसायिक आहेत! ते मंडळीत अगणित तास काम करतात – आणि महाविद्यालयात सुवार्तेचे काम अगणित तास करतात, ते काय ते कोणीहि करते.” होय, डॉ. चान यांच्याकडे पाहा! त्यांना ठाऊक होते येशू बरोबर होता − “जर कोणी माझ्या मागे येवू पाहतो तर त्यांने आत्मत्याग करावा व स्वत:चा वधस्तंभ उचलून मला अनुसरावे” (लुक 9:23). नंतर डॉ. कागॅन यांच्याकडे पाहा. त्यांनी मोठ्या पगाराची, सुरक्षा व मोठे फायदे असलेली नोकरीवर पाणी सोडले – एकदा नव्हे तर चारदा. त्यांनी त्यांना पायदळी तुडविले. का? कारण त्यांना लॉस एंजिल्स सोडून न्यूयार्क किंवा वाशिंग्टन डी.सी. येथे जायचे होते. मंडळीत राहण्यासाठी व फूटीपासून वाचविण्यासाठी − त्यांनी त्या सर्वांस पायदळी तुडविले – शेकडोच्या शेकडो डॉलर. काय ते मुर्ख होते? ज्यांनी आपले जीवन रक्तसाक्षी म्हणून दिले, त्या जीम एलिऑट यांचे ऐका. ते जे म्हणाले ते पवित्रशास्त्राच्या समोर लिहा.

“जे गमावू शकत नाही ते मिळविण्यासाठी जे राखू शकत नाही ते जो देतो तो मुर्ख नाही.” (जीम एलिऑट, ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी)

मी पुढे आणखीन सांगू शकतो, आणि “एकोण-चाळीस” मधील ज्यांनी वधस्तंभ सहन केला व स्वत:चे-बलिदान दिले त्यांचा उल्लेख करतो – मि. साँग, मि. मेन्सिया, मि. ग्रिफ्फिथ –जे कर्करोगाची शल्यक्रिया झाल्यावर बाहेर नळी लावून ते स्वत:ला मंडळीत घेऊन आले. हे पुळपीठ भयानतकेपासून वाचविण्यासाठी, त्याचा चेहरा सफेद झालेला व कपाळावरुन घाम आलेला मी पाहू शकतो – गीत गात

रुपे किंवा सान्यापेक्षा मला येशू हवा असतो,
   श्रीमंताचा असण्यापेक्षा मला त्याचे असणे चांगले असते;
इतर कशाहिपेक्षा मला येशू हवा असतो
   सध्या हे जग देते.

मि. ग्रिफ्फिथ मुर्ख होते का?

“जे गमावू शकत नाही ते मिळविण्यासाठी जे राखू शकत नाही ते जो देतो तो मुर्ख नाही.”

ज्यांनी ख्रिस्ताला अनुसरण्यासाठी आत्मत्याग केला आणि आपला वधस्तंभ रोज स्वत: उचलला, आणि प्रभू येशू करिता जिवंत मंडळी असे झाले – त्या “एकोण-चाळीस,” मधील स्त्रीया, व पुरुष ह्या प्रत्येक नावाविषयी मी सांगू शकतो.

आपण या इमारतीवरील गहाणपणा जेव्हां जाळला तेव्हां तरुणानो थांबा व विचार करा असे मी सांगितले. आपण लवकरच गेलो. ह्या ऑरगनवर मिसेस रुपची जागा कोण जागा घेणार? दरवाज्याचे रक्षण करण्याची रुपची जागा कोण जागा घेणार? दिवसा मागून दिवस व रात्री मागून रात्र, यासाठी तुमच्यातील कोण जागा घेणार – तुमच्यातील कोण आत्मत्याग करुन, रिचर्ड व रोनाल्ड ब्लँडिन यांची जागा घेणार? ते जातील तेव्हां तासा मागून तास, दिवसा मागून दिवस, जगाच्या कोणत्याहि बक्षिसा शिवाय, त्यांची जागा घेण्यास कोण आपला जीव गमाविल? – जसे की आपण सर्व “एकोण-चाळीस” लवकरच जाणार आहोत – विचार करण्याच्या अगोदर लवकर तरुणांनी यावर विचार करावा. स्वयपांक घरात मिसेस. कुक यांची जागा कोण घेणार? विली डिक्सन यांची जागा कोण घेणार? तुम्ही तेथे जेवता. पण विली डिक्सन, जे आता ऐंशी वर्षाचे आहेत त्यांची जागा तुमच्यापैकी कोण घेणार याविषयी मी विचारच करु शकत नाही. त्या प्रिय वृद्धाची जागा कोण घेणार हे मला दिसत नाही! ते काय करतात हे तर तुम्हांला ठाऊक आहे का? तुम्हांला खाऊ घालण्यासाठी त्यांनी कित्येक दिवस, कित्येक रात्री, कित्येक आठवडे घालवायला काय ते मुर्ख आहेत? ते मुर्ख आहेत?

“जे गमावू शकत नाही ते मिळविण्यासाठी जे राखू शकत नाही ते जो देतो तो मुर्ख नाही.”

तुम्हां तरुणातील कोण आहे जो मंडळी सशक्त बनविण्यासाठी आणखी तीस किंवा चाळीस वर्षे आपल्या सर्वस्वाचा त्याग करील? डॉ. कागॅन जातील. त्यांची जागा कोण घेणार? डॉ. चान जातील. त्यांची जागा कोण घेणार? तुमच्यातील कोणीहि मि. डिक्सन किंवा रिक आणि रॉन ब्लॅँडिन यांची जागा घेऊ शकणार नाहीत! ते महत्वाचे नाहीत असा तुम्ही विचार करता, पण तुम्ही त्यांची जागा घेऊ शकत नाही! त्यांची स्व-बलिदान घेईल. वधस्तंभ वाहणे घेऊ शकेल. येशू म्हणाला,

“त्यांने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येवू पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वत:चा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवूं पाहतो तो त्याला मुकेल; परंतू जो कोणी माझ्याकरितां आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचवील” (लुक 9:23, 24)

डॉ. कागॅन यांना जेव्हां देव पाचारण करीत होता तेव्हां ते पास्टर वुरंब्रँड यांचे टॉरचर्ड फॉर ख्राईस्ट हे वाचत होते. पास्टर वुरंब्रँड त्यांना आवडणे हे नैसर्गिक आहे कारण ते पास्टर वुरंब्रँड प्रमाणे यहुदी होते. आणि जेव्हां त्यानी “टॉरचर्ड फॉर ख्राईस्ट,” वाचले तेव्हां डॉ. कागॅन यांनी विचार केला की जी त्यागमय मुल्यें वुरंब्रँड यांनी शिकविली त्याप्रमाणेच मंडळी शोधायची. युसीएलसी जवळील रस्त्यावर मी प्रचार करतांना डॉ. कागॅन यांनी मला पाहिले. त्यांनी पाहिले की लोक मला ओरताहेत व माझ्यावर वस्तूंचा मारा करताहेत. डॉ. कागॅन यांना वाटले की, “हाच तो मनुष्य आहे ज्याचा प्रचार मला ऐकायचा आहे.” म्हणून त्यांनी आमची मंडळी शएधली व ते तेथे आले. त्या दुस-या रात्री मला डॉ. कागॅन यांनी सांगितले की त्यांनी मी असे म्हणतांना ऐकले की, “तुम्ही कशासाठी तरी जळणार आहांत. तर मग ख्रिस्तासाठी का जळू नये?”

डॉ. कागॅन हे एक तरुण, विशी पार केलेले असे होते. तरुणांसाठी हा विचार किती चांगला आहे! “तुम्ही कशासाठी तरी जळणार आहांत.” खरंच आहे! प्रत्येकजण कोणी लवकर किंवा नंतर असे “जळणार आहेत!” तुमचे केस गळताहेत. तुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या आहेत. उत्तम जीवन हे कठीण आहे. पुढची गोष्ट तुम्हांला ठाऊक हे की तुम्ही म्हातारे होत आहांत. मग तुम्ही खंगून मरणार. “तुम्ही कशासाठी तरी जळणार आहांत.” होय, खरोखर, हे सर्व तुमच्या बाबतीत घडणार आहे. तुम्ही जळणार आहांत!

पण त्याच्याहून खोल विचार − “तर मग ख्रिस्तासाठी का जळू नये?” सर्व महान ख्रिस्तीजणांनी ह्या युगात अशाप्रकारचा विचार दिला आहे − “तुम्ही कशासाठी तरी जळणार आहांत. तर मग ख्रिस्तासाठी का जळू नये?” हेन्री मार्टिन (1781-1812) यांच्याविषयी तुम्ही वाचले का नाही हे मला माहित नाही आणि ते जसे वयाच्या 31 “जळले” तसे तुम्ही जळू नये. रॉबर्ट मॅक चेनी यांचे जीवन कसे वाचाल हे मला माहित नाही (1813-1843) आणि वयाच्या 29 व्या वर्षी ख्रिस्ताने केले तसे तुम्ही का “जळत” नाही. तुमच्या कांही इतके घाबरतात की ते त्यांचा विकीपिडिया सुद्धा पाहत नाहीत. त्यांचा प्रभाव पडेल म्हणून घाबरता का? हेन्री मार्टिन व रॉबर्ट मॅक चेनी सारखी माणसे कोठे आहेत? ग्लॅडीज आयलवार्ड सारखी तरुण स्त्री कोठे आहे? जोवर तुम्ही त्यांना मार्ग दाखवणारे शिष्य होत नाही, तोवर तुमची तरुणांना शिष्य बनण्यास प्रोत्साहन देणारी मंडळी होऊ शकत नाही!

आपल्या मिसेस. कुक ह्या एक वृद्ध जे त्यांच्या जन्माच्या वीस वर्षापूर्वी वारले त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. ते एका सधन कुटुंबात जन्मले होते व वारसाने त्यांच्याकडे संपत्ती होती. ते एक जगप्रसिद्ध धावपटू होते. त्यानंतर ते येशूचे शिष्य झाले. त्यांनी त्यांचा पैसा खूप काळजीपूर्वक व मुद्दामहून देऊन टाकला. मग ते मिशनरी म्हणून चीनला गेले, चीनच्या आतील भागात. नास्तिकानां सुवार्ता प्रचार करण्यास पाचारण झाल्याने ते चौदा वर्षे आपली पत्नी व मुले यांच्यापासून दूर होते. नंतर ते आफ्रिकेच्या केंद्रस्थानी गेले, व त्यांना आणखी एक सेवाक्षेत्र मिळाले. सरते शेवटी, आफ्रिकेत दूर अंतर्भागात मरण पावले. ख्रिस्ताकरिता – त्यांचे आयुष्य व त्यांचे भविष्य गेले. त्यांचे घर व त्यांचे कौटुंबिक जीवनहि गेले. त्यांच्या जीवनाच्या शेवटी, हे अद्भूत वृद्ध म्हणाले, “प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी इतर कांही अर्पण देऊ शकतो का नाही हे मला माहित नाही.” आपल्या मिसेस कुक तो वृद्ध जो त्यांच्या जन्माच्या वीस वर्षे पूर्वी मेला त्याच्या प्रेमात पडल्या. तिने जे केले त्याविषयी मी आनंदी आहे. तिने जर त्याच्यावर प्रेम केले नसते व त्यांच्यामुळे प्रभावित झाली नसती तर ती एक साधारण स्वार्थी, मध्यम-वयस्क गोरी, कुप्रसिद्ध कुत्र्यांना सॅन फरनॅंडो येथे फिरवणारी स्त्री असते. ती सी. टी स्टड यांच्याद्वारा ती प्रभावित झाल्याने तुम्हां तरुणांना खाऊ घालण्यात व काळजी घेण्यात व्यतित केला, ह्या लॉस एंजिल्सच्या मध्यवर्ति भागात. कांही वर्षापूर्वी मिसेस कुकनी माझ्यासाठी एक पट्टी बनविली, ज्यावर त्यांचे आदर्श, चार्ल्स स्टड यांचे शब्द होते. माझ्या अभ्यासाच्या वेळा मी दर दिवशी ते मी पाहतो. त्यात म्हटले आहे,

“केवळ एकच जीवन,
   ते निघून जाईल जलद;
केवळ ख्रिस्तासाठी जे काय केले
   तेवढेच राहील टिकून.”
      – सी. टी. स्टड.

आणि आपणां सर्वाना येशू म्हणाला,

“त्यांने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येवू पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वत:चा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवूं पाहतो तो त्याला मुकेल; परंतू जो कोणी माझ्याकरितां आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचवील” (लुक 9:23, 24)

कांही तरुणांना आपणांस वाचवायचे असेल व त्यांना येशूकरिता शिष्य होण्यास प्रशिक्षण द्यायचे असेल तर आपली मंडळी ही ख्रिस्ताच्या तरुण शिष्यांनी भरलेली असली पाहिजे! कृपया उभे राहा व गीत क्रं. 2, “मोअर लव्ह टू दी” हे गाऊया.

तुला अधिक प्रेम, ओ ख्रिस्ता, तुला अधिक प्रेम!
   गुडघ्यावर येऊन केलेल्या आमच्या प्रार्थना तूं ऐक;
ही माझी कळकळीची विनंती: अधिक प्रेम, ओ ख्रिस्ता, तुला,
   तुला अधिक प्रेम, तुला अधिक प्रेम!

पूर्वी मी जगीक आनंद इच्छिला, शांति व विसावा शोधिला;
   आता केवळ शोधितो तुला, जे उत्तम ते देतो;
या सर्व माझ्या प्रार्थनेने: तुला अधिक प्रेम, ओ ख्रिस्ता,
   तुला अधिक प्रेम, तुला अधिक प्रेम!

मग माझा ताजा श्वास तुझी स्तुति करो;
   माझे ह्दय उन्नत कर ही माझी आर्तव आरोळी;
ही अजूनहि प्रार्थना असेल: तुला अधिक प्रेम, ओ ख्रिस्ता,
   तुला अधिक प्रेम, तुला अधिक प्रेम!
(“मोअर लव्ह टू दी” एलिझाबेथ पी. प्रेंटिस यांच्याद्वारा, 1818-1878).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. नोहा साँग यांनी गायले: “मोअर लव्ह टू दी”
(एलिझाबेथ पी. प्रेंटिस, यांच्याद्वारा, 1818-1878).
“More Love to Thee” (Elizabeth P. Prentiss, 1818-1878).