Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




गिदोनाची सेना!

GIDEON’S ARMY!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 24 जून, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord's Day Evening, June 24, 2018

“परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्या बरोबर असलेले लोक फारच आहेत; इतक्या लोकांच्या हाती मिद्यान्याना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळविला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्त्राएल मारील” (शास्ते 7:2).


ही एक साधारण गोष्ट आहे. परंतू ती खूप महत्वाची गोष्ट आहे. गिदोन हा तरुण होता जो सर्वत्र विश्वास त्याग होत होता अशा काळात तो होता. त्याकडे मी तुमचे सक्ष वेधून घेतोय कारणा आपण सध्या विश्वास त्यागाच्या शेवटल्या-काळात राहत आहोत.

I. प्रथम, विश्वास त्याग.

देवाच्या दृष्टिने वाईट ते सर्व इस्त्राएल लोकांनी केले. आणि त्यांना मिद्यानी लोकांचे दास करुन देवाने त्यांना दंडीत केले. ते इस्त्राएल लोकांचे शत्रू होते. ह्या क्रुर मिद्यान्यांपासून माघार घेतली. ह्या दुष्ट मिद्यानांपासून ते गुहेत लपून बसले. मिद्यानी इतके सामर्थ्यशाली होते की त्यांनी इस्त्राएलींचे तळ उध्वस्त केले. त्यांनी त्यांची मेंढरे, बैल व गाढवे पळवून नेली. इस्त्राएल दबले होते व त्यांना कांही आशा नव्हती. मग त्यांनी परमेश्वराचा धावा केला.

मग देव गिदोनाकडे आला. मिद्यानांपासून तो लपून बसला असतांना देव त्याच्याकडे आला. आणि परमेश्वर गिदोनास म्हणाला, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे” (शास्ते 6:12).

जेव्हां मी दक्षिण सॅन फ्रॅन्सिस्कोच्या पवित्रशास्त्र-नाकारणा-या, मुक्तवादी सेमीनरीत जात होतो तेव्हां मी बलवान वीर नव्हतो. मी एक नम्र व शांत बॅप्टिष्ट प्रचारक मुलगा होतो. पण मी जे कांही सेमीनरीत पाहिले त्यामुळे मला आधुनिक सुवार्तिक पद्धतीवर क्रोध आला. ते पवित्रशास्त्राच्या देवावर विश्वास ठेवत नव्हते. जे मिद्यानांच्या ताब्यात होते — ज्यांना वाटते की देवाला एका वस्त्रात ठेवायचेय — ज्यांना वाटते की देवाने त्यांचे विचार व जीवन यावर नियंत्रण ठेऊ नये.

डॉ. डेव्हिड एफ. वेल्स यांनी आपल्या काळातील सुवार्तिक पद्धतीतील भ्रष्टता यावर एक महत्वाचे पुस्तक लिहले आहे. त्याला, नो प्लेस फॉर ट्रुथ: किंवा सुवार्तिक थिऑलॉजीचे जे कांही झाले? (एर्डमन्स, 1993). डॉ. वेल्स हे क्रोधी व्यक्ति होते. ते म्हणतात, “सुवार्तिक जगताने आपली मूलगामिता हरवून बसले आहे” (पृष्ठ 295). मूलगामी ख्रिस्ती होण्यास सुवार्तिक मंडळ्या तरुण लोकांना प्रोत्साहित करीत नाहीत. ते मृदू, अशक्त, आणि स्वार्थी आहेत — त्यांच्या विषयी लोक काय विचार करतील ह्या भीतीने बोलत नाही. मंडळ्यांचे पुनरुज्जीवन व सध्या जिवंत राहाव्या असे ज्यास वाटते त्यांच्याशी हे प्रस्थापित सुवार्तिकवादी लढतात. डॉ. वेल्स म्हणाले, “सुवार्तिक जगतात जुळवून घेणे ही एक मोठी ताकद आहे, आणि लगेचच एकमेव असंतुष्टांस गुदमरुन टाकते” (295).

सेमीनरीत मी त्यांच्याशी सहमत व्हावे म्हणून त्यांनी सर्वोतपरी प्रयत्न केले. ते मला म्हणाले, मी सतत पवित्रशास्त्राचा बचाव करु लागलो तर मला सदर्न बॅप्टिस्ट मंडळी मिळणार नाही. मी त्यांना म्हणालो, “जर त्याची ही किमंत द्यावी लागणार असेल, तर मला हे नको.”

मी हा पवित्रा घेतल्याने मी सर्वकांही गमाविले. मला गमावण्यासारखे काय होते? मला जे गरजेचे होते ते सर्व मी अगोदरच गमाविले होते. मला जे हवे असायचे त्यातील कांहीहि सदर्न बॅप्टिस्टमध्ये नव्हते. मी पंथाचा तिरस्कार केला. मी सेमीनरीचा तिरस्कार केला. मला पाठिंबा दिला नाही म्हणून मी मंडळीचा तिरस्कार केला. मी माझ्या जीवनाचा तिरस्कार केला. मी येशू व पवित्रशास्त्र सोडून सर्वाचा तिरस्कार केला. मी रात्रीचा एकटा चालत राही. मला चालत राहावे लागे नाहीतर मला माझा विचार सोडावा लागणार होता.

एके रात्री मी विश्रामगृहात शेवटी झोपायला गेलो. देवाने स्वत: मला उठविले. विश्रामगृहात शांतता होती. कोणताहि आवाज नव्हता. रात्रीचा मी चालत बाहेर आलो. जसा मी सेमीनरीच्या बाजूला असलेल्या टेकडीवर उभा राहिलो तसे मला सॅन फ्रॅन्सिस्कोचे सगळे दिवे समुद्राच्या पाण्यात दिसू लागले. हवा माझ्या केसातून व कपड्यातून वाहू लागली. मी थंडीने गारठून गेलो होतो. आणि हवेतून देव माझ्याशी बोलला, “तूं ही रात्र कधीहि विसरणार नाहीस. आतपासून केवळ मला संतोष होईल असा प्रचार कर. आता घाबरायच नाही हे तूं शिकणार. आता तूं केवळ माझ्याविषयी बोलणार. मी तुझ्याबरोबर आहे.”

आता मला कळाले की मला सुवार्ता प्रचाराचे पाचारण होते. त्याच्यापूर्वी मी एक स्वयंसेवक होतो. आता मी एक देवाने-पाचारण केलेला प्रचारक होतो. माझा विश्वास आहे की सत्य बोलणारा असा देव त्याच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी प्रत्येक धाडसी प्रचारकांस अशा संकटातून जावे लागते. तेथे भावना नव्हत्या. केवळ हे, “हे तुम्ही म्हणणार नाही तर, कोणीहि म्हणणार नाही, आणि ते म्हणणे अत्यंत गरजेचे आहे — आणि दुसरे ते म्हणण्यास घाबरतात, तर मग तुम्ही ते म्हणणार नाही तर, ते कोणीहि म्हणणार नाही, किंवा किमान ते फारसे चांगले म्हणणार नाहीत.” माझ्या मनावर जो ठसा उमटला त्याच विचाराने नेहमी मी पुढे जात आहे. डॉ. डब्लू. ए. टोझर, “द गिफ्ट ऑफ प्रॉफेटिक इनसाईट,” म्हटलेल्या निबंधात ते म्हणाले: “तो देवाच्या नावात विरोध करील, दोष देईल, निषेध करील आणि तो मोठ्या ख्रिस्ती समुदायातून द्वेष व विरोध मिळवील... पण तो श्वास जो मर्त्य श्वास देण्यास घाबरत नाही.” कदाचित त्यामुळे डॉ. बॉब जोन्स III म्हणाले, मी “जुन्या करारातील संदेष्ट्याच्या पद्धत व आत्म्या प्रमाणे आहे.” अधिक माहितीसाठी, माझे आत्मचरित्र, “अगेन्स्ट ऑल फिअर्स” वाचा.

मध्यरात्रीच्या देवाबरोबरच्या अनुभवाने मला गिदोनासारखी समज मला आली. देवाने त्याला सांगितले, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” मी गिदोन नसलो तरी, निदान त्याला समजू तरी शकलो. गिदोन म्हणाला, “परमेश्वराने आता आम्हांला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे” (शास्ते 6:13).

गिदोनाला वाटले हे करण्यास तो अपात्र व असमर्थ आहे. मोशे प्रमाणे त्याने सबब सांगितली. येथे आपण, माझ्या मित्रानों, मोठ्या विश्वास त्यागाच्या दिवसांत आहोत. नवीन-सुवार्तिक मिद्यानी शिकवणी विरुद्ध लढण्यास आपण स्वत:ला अपात्र व असमर्थ समजतो. विश्वास त्याग हा खोलवर रुजला आहे. सुवार्तिक मिद्यान्यांचे ताकद खूप मोठी आहे. पवित्रशास्त्र व पवित्रशास्त्राचा देव यांस विश्वास त्यागापासून वाचविण्यास आपण कांहीएक करु शकत नाही.

II. दुसरे, पवित्रशास्त्राचा देव अजूनहि जिवंत आहे!

परमेश्वर म्हणाला, “मी परमेश्वर बदलणारा नव्हे”! (मलाखी 3:6). मग देवाचा आत्मा गिदोनावर आला. त्याने संदेशवाहक पाठविला, ज्याने मिद्यान्यांशी लढण्यास इस्त्राएल लोकांना एकत्र केले.

“मग यरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सर्व लोक ह्यांनी पहाटेस उठून एन-हेरोद येथे तळ दिला; त्याच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खो-यात मिद्यांनाची छावणी होती. परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत; इतक्या लोकांच्या हाती मिद्यान्याना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळविला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्त्राएल मारील. म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहिर कर की, ज्याला भीति वाटत असेल किंवा जो घाबरुन गेला असेल त्याने गिलाद डोंगरावर परत जावे तेव्हां त्यांच्यातून बावीस हजार लोक परत गेले आणि दहा हजार राहिले” (शास्ते 7:1-3).

देव गिदोनाला म्हणाला, “तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत.” जा व त्यांना सांग “ज्याला भीति वाटत असेल किंवा घाबरला असेल त्याने परत निघून जावे” (शास्ते 7:3).

बावीस हजार लोक परत गेले. गिदोनाबरोबर दहा हजार राहिले. तेच आपणाबरोबर घडते. ली काँटे ज्युनियर हायस्कूल येथे भेटलो तेव्हांपासून आपली मंडळी 1,100 लोकसंख्या झाली. पण त्यातील ब-याच जणांना येशूसाठी जीवन धोक्यात घालण्यास भीति वाटली. इतर “मौजमजा” — किंवा व्यभिचार — किंवा मादक द्रव्य याच्या मागे लागून मंडळी सोडून गेले. जे सोडून गेले त्यांचे वर्णन पेरणा-याच्या दाखल्यात येशूने केले आहे. लुक 8:10-15 मध्ये त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पहिल्या प्रकारचे लोक ते होत जे वचन ऐकतात, आणि सैतान येतो व त्यांच्या अंत:करणातून वचन चोरुन नेतो “यासाठी की त्यांनी विश्वास ठेऊ नये व त्यांचे तारण होऊ नये” (लुक 8:12). दर आठवडी आपण पाहातो. ते येतात व उपदेश ऐकण्याऐवजी आयपॅड मध्ये पाहत बसतात. किंवा ते आपले डोळे बंद करुन भलताच विचार करीत असतात. देवाचे वचन त्यांच्यासाठी बिल्कुल चांगले नसते, कारण सैतान त्यांच्या अंत:करणातून वचन चोरतो.

दुस-या प्रकारचे लोक ते आहेत जे आनंदाने वचन ग्रहण करतात. पण त्यांना ख्रिस्तातील मूळ नसते. म्हणून ते कांहीकाळासाठी विश्वास ठेवल्यासारखे वाटतात. पण ते मोहात पडतात व पतन पावतात.

तिस-या प्रकारचे लोक ते आहेत जे वचन ऐकतात व त्यांच्या मार्गाने जातात. मग ते काळजी व श्रीमंती व जीवनाच्या सुखात अडकून बसतात, “आणि पूर्णत्वाचे फळ ते देत नाहीत.” या तिन्ही प्रकारच्या लोकांचे परिवर्तन झाले नव्हते असे जेव्हां डॉ. जे. वरनॉन मॅके गी म्हणतात तेंव्हा बरोबर आहे. भूतकाळात ज्या सर्वांनी मंडळी सोडली त्यांचे हे चित्रण आहे. त्यांचे जीवन हे दर्शविते की त्यांच्यापैकी कोणाचाहि ख-या अर्थाने पालट झाला नव्हता. ते केवळ मंडळीत मिळणारी सहभागीता व मजा यासाठी येत होते. पण त्यांची परिक्षा झाली तेव्हां त्यांनी मंडळी सोडली कारण त्यांनी कधीहि खरा पश्चाताप केला नव्हता व त्यांचा नवा जन्म झाला नव्हता. जे बावीस हजार लोक गिदोनाला मदत करावयास आले पण देवाचे सैनिक बनून राहण्यास घाबरले होते त्यांचे हे चित्रण आहे! तसेच वधस्तंभाचे सैनिक!

“परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत; इतक्या लोकांच्या हाती मिद्यान्याना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळविला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्त्राएल मारील” (Judges 7:2).

तरीदेखील तेथए पुष्कळ लोक होते. मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनहि लोक फार आहेत; त्यांना पाणवठ्यावर घेऊन चल, म्हणजे तेथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन” (शास्ते 7:4). “मोरे टेकडीजवळील खो-यात” खूप उष्णता होती (शास्ते 7: 1). इस्त्राएल लोक तहानलेले होते. गिदोनाची पुष्कळ माणसे पाणवठ्याकडे पळत गेली, ते खाली वाकले व पाण्यात ओंजळ घातली, ते वाकलेले असतांना, “जे तोंडाशी हात नेऊन पाणी चाटून प्याले ते तीनशे भरले” (शास्ते 7: 6). त्यातील पुष्कळांनी आपले हात पाण्यात टेकवले कारण ते खूप तहानलेले होते. पण केवळ तीनशे लोकच पाणी ओंजळीत घेऊन प्याले. त्यांना ठाऊक होते की मिद्यांकडे लक्ष देण्यासाठी, आपल्या माना सरळ सरळ ठेवायच्या होत्या.

“तेव्हां परमेश्वर गिदोनाला म्हणाला, चाटून पाणी पिणा-या ह्या तीनशे लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन आणि मिद्यांनाला तुझ्या हाती देईन, बाकीच्या लोकांनी आपल्या ठिकाणी जावे” (शास्ते 7:7).

अशाप्राकरे गिदोनाच्या तीनशे लोकांचा लेखाजोखा आज रात्री आपण पाहणार आहोत. त्या खो-यात मिद्यांनी, “लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते त्यांचे उंट समुद्रकिना-यावरील वाळूप्रमाणे अगणित होते” (शास्ते 7: 12). त्यारात्री देवाने गिदोनाच्या त्या तीनशे लोकांकरवी बलाढ्य मिद्यांनी सैन्यापासून सुटका केली. मिद्यांनी जीव मुठीत घेऊन पळाले. आणि इस्त्राएल लोकांनी मिद्यांनी, ओरेब, आणि जेब, ह्यांची मुंडकी कापली व ती मुंडकी गिदोनाकडे आणली (पाहा शास्ते 7:25). केवळ तीनशे सैनिकाच्या लहान गट घेऊन देवाने विजय मिळविला!

आज रात्री आपल्यासाठी हा धडा आहे. सध्याच्या पुष्कळशा मंडळ्या ह्या अशी चालवितात जे फक्त सभासद बनविण्यास रस घेतात. हे सुवार्तिक मिद्यांनी होत. त्यांना वाटतं की शेकडो लोकांची उपस्थिची आवश्यक आहे. आणि तरीहि ते दुर्बळ आहे. अशा प्रकारच्या प्रचारकांस गिदोन त्याचे विश्वासू सैनिक ह्यांच्याविषयी विचार केल्यास खूप चांगले होईल.

द ग्रेट इव्हांजिलीकल रिसेसेशन शिर्षकाचे पुस्तक जोनाथन एस. डिकर्सन यांनी लिहले (बेकर बुक्स). त्यांनी आकडेवारी दिली. सध्या केवळ 7% आपले तरुण इव्हांजिलीकल ख्रिस्तीपणा होण्याचा दावा करतात. येत्या वीस वर्षात पंचे-चाळीस टक्के इव्हांजिलीकल ख्रिस्ती नामशेष होतील. याचा अर्थ इव्हांजिलीकल ख्रिस्ती तरुणांची संख्या 7% हून कमी म्हणजे अंदाजे “4 टक्के किंवा त्याहून कमी होणार — जर नवीन शिष्य केले नाहीत तर” (ibid., पृष्ठ 144).

मंडळ्यामधून ह्या तरुणांची संख्या का कमी होतेय? मला खातरी पटली कारण त्यांना ख्रिस्तीपणा जगण्याचे आवाहन दिले जात नाही. आपले उद्दिष्ट काय आहे? ख्रिस्तात सर्वोच्य क्षमतेमध्ये पोहंचण्यास ह्या मंडळीत तरुणांना सहाय्य करणे हे आपले उद्दिष्ट आहे. गिदोनाच्या सैन्याप्रमाणे तरुणांच्या समुहास येथे उभे करण्यास आपण आहोत. आपल्या मंडळीत आलेले तरुण यांना मदत करणे आणि येशू ख्रिस्ताचा शिष्य बऩविणे. ख्रिस्ताच्या सैन्यात ज्या व्यक्तींची नोंदणी करु इच्छितो ते तरुण असले पाहिजेत. असे तरुण जे कांहीतर नवीन व आव्हानात्मक करु इच्छितो . येशू म्हणाला

“जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे” (मार्क 8: 34).

ज्याला येशूचे अनुयायी व्हायचे नाही, कांही हरकत नाही, त्याने बाहेर पडले पाहिजे. ज्यांना लहान मुलांसारखी काळजी घ्यायची आहे त्याला मी “काळजी घेणारा” म्हणतो. जे “काळजी घेणारा” आहे तो स्वनाकार करीत नाही. येशूला कांहीहि देण्याची त्यांची इच्छा नसते. सदासर्वकाळ तुम्ही काळजी घेणार असाल तर, तुमच्याकरिता ही मंडळी नाही.

माझी पत्नी एलिना ही सोळा वर्षाची असतांना आली होती. तीन आठवड्यातच ती मंडळीत स्वत:हून येऊ लागली. फक्त तीन आठवड्यातच तिला “घेऊन येण्याची” गरज भासली नाही. तसेच ती आपल्या मंडळीत कार्यकर्ती बनली. ती वयाच्या 17 वर्षी फोन घेणारी झाली. ती केवळ 19 वर्षाची असतांना तिचा माझ्याशी विवाह झाला. आमच्या जुळ्या बाळांचा जन्म झाला तेव्हां तिने त्यांना लगेच येणा-या पहिल्या रविवारी मंडळीत आणले. जन्मल्या दिवसापासून माझा मुलगा लेस्लीने कधीहि रविवारची मंडळी चुकविली नाही. वेस्ली तिच्या संपूर्ण जीवनात केवळ एकदाच आजारपणामुळे मंडळीला येऊ शकली नाही. इतर कित्येक स्त्रीया म्हणतात की हे अति आहे. जेव्हां केव्हां त्यांना थोडीशी उसंत मिळे तेव्हां त्या त्यांच्या लेकरांना घरी ठेवीत. पण माझी पत्नी बरोबर आहे आणि इतर चुकीच्या आहेत. स्वार्थी जीवन जगण्यास जवळजवळ सर्वांच्या मुलांनी मंडळी सोडली आहे. या दिवसापर्यंत माझी दोन्ही मुले इथे प्रत्येक उपासनेत आहेत. ती येथे आहेत कारण माझी पत्नी ख्रिस्ताची शिष्या आहे. डॉ. क्रिगटन एल. चान, ज्यांचा थोड्याच वेळात त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त सन्मान केला जाईल, मिसेस हायमर्सना म्हणाले, “ती पहिल्यांदा मंडळीत आली तेव्हांपासून मी तिला ओळखतो. तेव्हांपासून आतापर्यंत, ख्रिस्ताबद्दल खूप प्रेम व हरविलेले आत्मे जिंकण्यासंबंधी आवेश, तिच्याकडे होता. तिने एक [तरुणी] म्हणून तिने आपले सर्वस्व मंडळीच्या सेवेत झोकून दिले आणि कांहीच शिल्लक ठेवले नाही...तरुणानो, मिसेस हायमर्स ह्या तुमच्या आदर्श बनू द्या. तुम्ही तिचे अनुकरण केले तर, आपल्या मंडळीचे भविष्य उज्ज्वल व वैभवी असेल”.

तसेच आपण डॉ. चान यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत तेहि एक ख्रिस्ताच्या शिष्याचे चमकदार उदाहरण आहेत. ते आपल्या मंडळीतील दिक्षीत पाळक आहेत. ते लहान मुल असतांना खूप आजारी होते. ते इतके आजारी होते की ते बाळ असतांना काच पेटीत ठेवले होते. वैद्यकीय पेशात शिकत असतांना ते आपल्या किशोरवयात आपल्या मंडळीत आले. इतर डॉक्टर म्हणाले की ते तीस वर्षापर्यंत सुद्धा जगणार नाहीत. मंडळीने काळजी घ्यावी असा एक लहान कमकुवत मनुष्य ते बनू शकले असते. परंतू नाही! त्यांनी स्वत:ला मंडळीच्या कार्यात झोकून दिले आणि एक ख्रिस्ताचा शिष्य झाले. त्यांनी जास्त श्रम करु नये असे सांगितले होते नाही तर तीस वर्षाच्या आत ते मरतील. परंतू ख्रिस्ताच्या कार्याने डॉ. चान यांना सामर्थ्यशाली केले. ते अपेक्षे पेक्षा अधिक तीस वर्षे चांगले, सामर्थ्यशाली जीवन जगले. त्यांनी आपला वधस्तंभ घेतला व ख्रिस्ताच्या मागे गेले. आणि आता ते वयाच्या साठाव्या वर्षी एक देवाचे सामर्थ्यशाली मनुष्य म्हणून येथे बसले आहेत!

मी मि. मेनसिया, व मिसेस सलाझर, आणि आणि मि. बेन ग्रिफ्फिथ, जे आपल्या पत्नी बरोबर सुट्टीला गेले आहेत. मि. व मिसेस वर्जिल निकेल यांच्याविषयी सांगतो, ज्यांनी ही इमारत खरेदीसाठी बराचसा पैसा दिला आहे. मि. निकेल हे 75 वर्षाचे असून त्यांना मधूमेह आहे – तरी ते दर बुधवारी रात्री, दर रविवारी सकाळी, आणि दर रविवारी रात्री एक तासभर वाहन चालवित मंडळीत उपस्थित राहण्यासाठी येतात. किंवा मी एक अद्भूत तरुण मनुष्य, रेव्ह. सॅम्युएल कागॅन यांच्याबद्दल बोलतो जे माझ्यानंतर मंडळीचा पाळक म्हणून धुरा वाहणार आहेत. ह्या व्यक्ती येशूचे शिष्य, व वधस्तंभाचे सैनिक झाले.

माझे पाळक डॉ. तिमथी लीन म्हणाले, “अधिकापेक्षा थोडके बरे आहे...रविवारी प्रत्येक बाक भरले जावोत, पण वास्तव हे आहे की प्रार्थना सभामध्ये केवळ थोडके लोक असतात...आपण त्याला सदृढता म्हणू शकत नाही” (द सिक्रेट ऑफ चर्च ग्रोथ, पृष्ठ 39).

पवित्रशास्त्रातून पाहा. तुम्ही पुन्हां पुन्हां पाहाल की “अधिकापेक्षा थोडके बरे आहे.” येशूने 11 माणसे घेतली व सारे जग बदलले कारण ते त्याच्यासाठी व त्याच्या कार्यासाठी मरायला तयार होते. मंडळीच्या इतिहासात आपण तोच धडा पाहतो. पेंटॅकॉस्टच्या दिवशी केवळ 120 लोक हजर होते. केवळ थोडकेच मोरानियन ख्रिस्तीजण आधुनिक सेवेच्या चळवळीने पेटून उठले. केवळ थोडके मेथडिस्ट, अगदी थोडे, महान जागृती त्यांनी केली. चीनच्या अंतर्गत भागात सुवार्ता सांगण्यास खूप थोड्या लोकांनी जेम्स हडसन टेलर यांचे अनुकरण केले.

ज्यांना ख्रिस्तासाठी उत्तम ते देता येत नाही त्यांनी बाहेर पडले तरी चालेल. ज्यांना त्यांची लहान बाळासारखी काळजी घ्यावी वाटते त्यांनी बाहेर पडले तरी चालेल. ज्यांना आपल्या आरामदायी कक्षेतून बाहेर पडू नये असे वाटते त्यांनी बाहेर पडले तरी चालेल. ते एकसारखे “घेणारे” आहेत जे ख्रिस्तासाठी कांही देत नाहीत. आपल्या मंडळीत शिष्य असावे असे वाटते तर “घेणारे” आहेत त्यांना जाऊं द्या, यासाठी की आपले तरुण जे आहेत ते मवाळ नवीन-सुवार्तावाद्यांचे आवाहन स्विकारतील, व त्यांना आवाहन देतील. जे येशूकरिता आपले आयुष्य गणतात त्यांना उत्तेजन द्या. आणि ज्यांना वाटते की त्यांची बाळासारखी काळजी वाहावी व जे वाढत नाहीत त्यांना उत्तेजन देऊ नये! जो ख्रिस्ताचा शिष्य होऊ पाहतो त्यांना उत्तेजन द्या, व बाकीच्यांना गिदोनाने जे केले ते करण्यास घरी जाऊ द्या!

गीत पत्रिकेवरील गीत क्रं. 1 उभे राहून गाऊया, “ऑनवर्ड, ख्रिश्चन सोल्जर्स.” हे गा!

ख्रिस्ती सैनिकानो चला हो चला, जसे युद्धास चालतो,
   पाहा येशूचा वधस्तंभ हा झेंडा पुढे चालतो:
शत्रूच्या विरुद्ध ख्रिस्त हा सरदार नेतृत्व करितो;
   युद्धात पुढे चला, पाहा त्याचा झेंडा पुढे चालतो!
ख्रिस्ती सैनिकानो चला हो चला, जसे युद्धास चालतो,
   पाहा येशूचा वधस्तंभ हा झेंडा पुढे चालतो.

थोर फौजरुपी मंडळीचा देव पुढे पुढे चालतो;
   बंधूनो, जेथे संतगण आहेत तेथे आपण जात आहोत;
आपण विभागलेलो नाही, तर एक शरीर असे एक आहोत,
   आशा व सिद्धांत यामध्ये एक, औदार्यात एक आहोत,
ख्रिस्ती सैनिकानो चला हो चला, जसे युद्धास चालतो,
   पाहा येशूचा वधस्तंभ हा झेंडा पुढे चालतो.

मग चला हो चला, तुम्ही लोक, आनंदी जमावाबरोबर सामील व्हा,
   आमच्या विजयी गीतात आपला आवाज मिळवा;
ख्रिस्त हा राजा, त्याला गौरव, स्तुति व सन्मान असो;
   मनुष्य व देवदूतांच्या अनंत पिढ्यांपिढ्या त्याला गीत गावो.
ख्रिस्ती सैनिकानो चला हो चला, जसे युद्धास चालतो,
   पाहा येशूचा वधस्तंभ हा झेंडा पुढे चालतो.
(“ऑनवर्ड, ख्रिश्चन सोल्जर्स” सबीन बेअरिंग-गोल्ड यांच्याद्वारा, 1834-1924).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. नोहा साँग यांनी गायले: “ऑनवर्ड, ख्रिश्चन सोल्जर्स”
(सबीन बेअरिंग-गोल्ड, यांच्याद्वारा, 1834-1924).
“Onward, Christian Soldiers” (by Sabine Baring-Gould, 1834-1924).


रुपरेषा

गिदोनाची सेना!

GIDEON’S ARMY!

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्या बरोबर असलेले लोक फारच आहेत; इतक्या लोकांच्या हाती मिद्यान्याना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळविला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्त्राएल मारील” (शास्ते 7:2).

I.    प्रथम, विश्वास त्याग, शास्ते 6:12, 13.

II.   दुसरे, पवित्रशास्त्राचा देव अजूनहि जिवंत आहे! मलाखी 3:6;
शास्ते 7:1-3; लुक 8:12; शास्ते 7:4, 1, 6, 7, 12; मार्क 8:34.