Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




वधस्तंभाविषयीचा संदेश

THE PREACHING OF THE CROSS
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
लिखीत व रेव्ह. जॉन सॅमुएल कागॅन यांच्याद्वारा
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 27 मे, 2018 रोजी
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Rev. John Samuel Cagan
at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, May 27, 2018

“कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मुर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे” (I करिंथ 1:18).


आपले पाळकसाहेब, डॉ. हायमर्स, गेली साठ वर्षे प्रचार करत आहेत. त्यांनी हजारो उपदेश दिले आहेत. त्यांनी लिहलेला उपदेश आता मी देत आहे. शेकडोनी त्यांची लिखीत उपदेश आपल्या वेबसाईटवर आहेत, शब्दासाठी शब्द. त्यांचे भाषांतर एकंदर 38 भाषांतून केले जाते. उपदेशाचे व्हिडीओ व लिखीत उपदेश जगातील 221 पोहंचलेले आहेत. जगभरात पाळक लोक त्यांचे उपदेश देत आहेत. डॉ. हायमर्स हे एक उत्कृष्ट प्रचारक आहेत! आणि तरीहि, त्यांच्या सर्व अनुभवानंतरहि, त्यांना काय प्रचार करावे हे कठीण जाते.

तुम्ही विचाराल “ते इतके कठीण का आहे?” ते का मी सांगतो. आमच्या मंडळीत असे पुष्कळ लोक आहेत जे रविवार सकाळी खरे ख्रिस्ती नाहीत. कांहीजन बौद्ध पार्श्वभूमीचे असतील. इतर लोक कॅथलिक किंवा सुवार्तिक, नामधारी ख्रिस्ती, केवळ नावाचे ख्रिस्ती असतील. कांहीजनांना खरी धार्मिक पार्श्वभूमी नसेल. इतर तारण न पावलेले असतील, ज्यांनी पवित्रशास्त्रात मोठे काम केले आहे, पण नवीन जन्माचा अनुभव कधीच आला नाही. त्या सर्वांत एक समान गोष्ट असेल. ते येशू ख्रिस्तात ख-या अर्थाने परिवर्तित झालेले नसतील.

रविवारी सकाळचा उपदेश हा एक तास किंवा त्याहून कमी असतो. त्या थोड्याशा वेळात, उपदेशाने असे कांही महटले पाहिजे की धर्माविषयी काय विचार करतो, तो संपूर्णत: बदलला पाहिजे, आणि खरे वाटणारे ख्रिस्तत्व, एखादे सत्य नव्हे, परंतू सत्य — केवळ सत्य. तुमच्या पर्यंत उपदेश आल्याने तुम्ही त्याच्याशी सहमत होता की आणि तुमची संपूर्णत: विचार करण्याची पद्धत बदलते, आणि तुम्हांस तुमच्या खोट्या कल्पना सोडण्यास मन वळविले जाते, पापाची खातरी करुन घ्या, आणि संपूर्ण जीवनभर येशूकडे वळा. ते खूप मोठे काम आहे! आणि ते करण्यास केवळ एक तास! काय मी साधा उपदेश करण्याच्या तयारीत आहे, परंतू मोठी विचारांची व प्रार्थनेची देवाण घेवाण घडली आहे.

आपला उतारा हा शास्त्रलेखातील साधे एक वचन आहे. आता मी प्रार्थना की त्यातून जे कांही वचन सांगतो त्याची तुम्हांला मदत होवो; किमान अशी मी प्रार्थना करितो की तुम्ही जेव्हां घरी जाल तेव्हां मी जे कांही सांगितले ते तुमच्या लक्षात राहावे, तसेच, किमान, मी जो विचार मांडला त्यांने तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त, आणि तुमच्या सार्वकालीक आत्म्याविषयी विचार तरी करावा. येथे, मग, I करिंथ 1:18 मध्ये, वचन आहे. मी ते वाचतो ते ऐका,

“कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मुर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे” (I करिंथ 1:18).

उपदेशाचे मुख्य तीन भाग आहेत: 1) वधस्तंभाविषयीचा संदेश; 2) ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मुर्खपणाचा आहे; आणि 3) सामर्थ्यशाली मंडळी बनण्यास केवळ वधस्तंभाविषयीचा संदेश पुरेसा नाही.

I. प्रथम, वधस्तंभाविषयीचा संदेश.

प्रेषित पौलाला त्या शब्दाचा अर्थ काय आहे, “वधस्तंभाविषयीचा संदेश”? “वधस्तंभाविषयीचा संदेश” ही संज्ञा, एक मुख्य विषय आहे . त्या वचनात केवळ एकच सत्य आहे. ते केवळ एक व एकच सत्य शुभवर्तमान संदर्भित करते. जसा देव आहे एकच शुभवर्तमान आहे. येशू ख्रिस्त — हा एकच तारणारा आहे. “वधस्तंभाविषयीचा संदेश” माझ्यासाठी सत्य असेल पण तुम्हांसाठी नसेल हा आधुनिकीकरणा-पश्चाताच्या कल्पनेवर आपण विश्वास ठेवत नाही. आधुनिकीकरणा-पश्चाताच्या कल्पना म्हणतील, “तेच तुमचे सत्य आहे. हेच ते सत्य जे तुमच्यासाठी आहे. पण हे माझे सत्य नाही.” मी म्हणेन की आधुनिकीकरणा-पश्चात दुतोंडे आहेत. जेव्हां पवित्रशास्त्र वधस्तंभाविषयी बोलते, तेव्हां ते उद्देशीत सत्याविषयी बोलते — ते सत्य जे प्रत्येकासंबंधी आहे. एक असे सत्य ज्यावर तुम्ही विश्वास ठेवा वा ठेऊ नका तरी ते सत्यच असते. कारण परमेश्वर त्याविषयी पवित्रशास्त्रात बोलला आहे, ते सत्य आहे किंवा नाही असा तुम्ही विचार केला तरी ते सत्य आहे. ते उद्देशीत सत्य आहे, म्हणजे त्याचे महत्व तुमच्या मनाने समजले नाही तरी ते सत्य आहे.

पुढे, “वधस्तंभाविषयीचा संदेश” हा केवळ पवित्रशास्त्र सांगतो, त्यावर नाही तर ऐतिहासिक सत्यावर सुद्धा सापडतो — ते सत्य जे येशू ख्रिस्ताने तुमच्या पापाकरिता भयंकर दु:ख सोसले, तो त्या गेथशेमाने बागेत मोठे दु:ख व वेदनेतून गेला, जेव्हां तुमचे पाप त्याच्या देहावर लादले गेले. पिलाताच्या दरबारात जेव्हां त्याला अर्ध मेले मारण्यात आले तेव्हां तो भयंकर अशा छळातून जावे लागले. मग त्याला कालवरीच्या टेकडीवर ओढत नेले, जेथे त्याला हातापायात खिळे मारण्यात आले, त्यांनी वधस्तंभ उभा करुन, त्यावर त्याला लटकविले, तुमच्या पापाचा मोबदला देण्यास रक्त सांडले व मरण पावला, यासाठी की तुमचे तारण व्हावे, केवळ पापाची क्षमा नव्हे, पण त्याच्या मरणाने नीतिमान ठरविले, म्हणजेच, त्याच्यावरील विश्वासाच्या एका साध्या कृतिने तुम्हांस पापविरहीत गणण्यात आले.

“वधस्तंभाविषयीचा संदेश” प्रचार हे दर्शवितो की तुम्ही

“तुम्ही पापात मेलेले आहांत” (कलस्सै 2:13).

आणि तुमच्या बदली केवळ ख्रिस्ताचे मरण तुमची जागा घेते, तुमच्या पापाकरिता कठोर दंड भरु शकतो, तुमचे पाप नाहीसे करते, आणि ख्रिस्त मरणातून पुन्हा उठण्याने तुम्हांला नवीन जीवन देतो.

“वधस्तंभाविषयीचा संदेश” हे दर्शवितो की तुम्ही सत्कर्माने किंवा कधीकधी मंडळीला येऊन तुम्हांल तारण मिळू शकत नाही. नाही! नाही! वधस्तंभाविषयीचा संदेश हे दर्शवितो की सत्य जे तुम्हांला आवडत नाही ते तुम्ही तुमच्या तारणासंबंधी जे कांही करता त्यांस कांहीहि करु शकते. “वधस्तंभाविषयीचा संदेश” तुम्ही जे कांही तथा-कथित “सत्कर्मे” म्हणता ती नाहीशी करतो — आणि म्हणतो तुमच्या भयंकर पापाचे प्रायश्चित करण्यासाठी येशून जे कांही वधस्तंभावर केले केवळ तेच तुम्हांला तारु शकते — एक मनुष्य, ख्रिस्त (देव - मानव) तुमच्या पापाविषयी, अधिक कोणतेहि सत्कर्म न करता, किंवा तुम्ही “निर्णय” केला तर मोबदला देऊ शकतो.

तुम्ही कांही सत्कर्मे केली असतील याविषयी माझ्या मनांत शंका नाही. मी म्हणतो की ही सत्कर्मे तुम्हांला तारण देणार नाही! तारण हे केवळ येशू, देवाचा एकुलता एक पुत्र, त्रैक्यातील दुसरा व्यक्ति, जेव्हां तो वधस्तंभावर खिळला गेला, तेव्हां ज्याने तुमचे पाप स्वत:वर घेतले आणि त्याचा मोबदला दिला त्याच्याद्वारे तारण येते. प्रेषित पौलाने स्पष्ट केले जेव्हां तो म्हणाला,

“परंतू देव आपणांवरच्या स्वत:च्या प्रीतीचे [प्रमाण] हे देतो की, आपण पापी असतांनाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यांत आल्यामुळे आपण विशेषेंकरुन त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहों” (रोम 5:8-9).

तुम्ही पापी असतांनाच देवाने तुमच्यावर प्रीति केली. तुम्ही पापी असतांनाच ख्रिस्त तुमच्या पापाचा दंड भरण्यास मरण पावला. आणि तुम्ही पापी असतांनाच, तुम्हांस त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविले.

प्रभू येशू, म्हणून मी तुला नम्रतेने विनविनी करितो की,
   मी वाट पाहातो, धन्य प्रभू, तुला खिळलेल्या वधस्तंभाच्या पायथ्याशी;
विश्वासाने, माझ्या शुद्धतेसाठी, मी तुझ्या रक्ताकडे पाहतो,
   आता मला धू, आणि मग मी बर्फाहून शुभ्र होईन.
बर्फाहून शुभ्र, होय, बर्फाहून शुभ्र होईन;
   आता मला धू, आणि मग मी बर्फाहून शुभ्र होईन.
(“व्हाईटर दॅन स्नो” जेम्स निकोल्सन यांच्याद्वारा, 1828-1896).

तुझा स्वागताचा आवाज मी ऐकतो,
   प्रभू, तो मला तुझ्याकडे, बोलावितो
तुझ्या मौल्यवान रक्तात शुद्ध होण्यासाठी
   जो कालवरीवरती वाहिला.
प्रभू! मी येत आहे, आताच तुझ्याकडे येत आहे!
   तुझ्या रक्तात मला, धू, व शुद्ध कर
जो कालवरीवरती वाहिला.
    (“आय एम कमिंग, लॉर्ड” लेविस हार्टसोग, 1828-1919).

तोच हा वधस्तंभाविषयीचा प्रचार होय!

“कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मुर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे” (I करिंथ 1:18).

पण आपल्या ह्या उता-या आणखी एक विचार आहे.

II. दुसरे, ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मुर्खपणाचा आहे.

ते शब्द ऐका,

“कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मुर्खपणाचा आहे.”

ते शब्द परत ऐका.

“कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मुर्खपणाचा आहे...” (I करिंथ 1:18).

शब्द “मुर्खपणा” म्हणजे “वायफळ बडबड,” “वेडेपणा.” केवळ ख्रिस्ताच्या मरणाने तुमच्या पापापासून तुमचे तारण झाले पाहिजे असा प्रचार ऐकणे हे ज्यांचे परिवर्तन झाले नाही त्यांना “वायफळ बडबड” होय.

ज्यांचा नाश होत आहे त्यांना त्यांच्या पापाचा दंड देण्यासाठी ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या संदेशाची कांही किंमत नाही. ते मुर्खपणाचा विचार करतात कारण त्यांना त्यात महत्व वाटत नाही. तेथेच पवित्र आत्मा आत येतो. येशू म्हणाला,

“तो येऊन पापाविषयी...जगाची खातरी करील” (योहान 16:8).

पवित्र आत्म्याने एखाद्या व्यक्तीला, पापाविषयी खातरी करुन दिली, पटवले पाहिजे, नाहीतर त्याला ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाचे महत्व कळणार नाही. व्यक्तीला पवित्र आत्म्याने पापाविषयी खातरी करुन देण्यापूर्वी, त्याला वधस्तंभाविषयीचा संदेश मुर्खपणाचा वाटेल. अनुवादित ग्रीक शब्द “मुर्खपणा” हा मूळ ग्रीक शब्द “मोरोस” ह्या शब्दातून आला आहे, ज्यातून इंग्रजी शब्द “मोरोन” आला आहे. पापात हरविलेले असतांना, पवित्र आत्म्याने, अंत:करणात पापाविषयी खातरी करुन देण्यापूर्वी, वधस्तंभाविषयीचा संदेश मुर्खपणाचे बोलणे, मुर्ख व्यक्ती असा आहे.

त्यामुळे तुम्ही खरे ख्रिस्ती कसे व्हावे हे “शिकू” शकला नाही. तारण मानवी ज्ञान शिकल्याने येत नाही. एकविसाव्या वचनांत प्रेषित पौल स्पष्ट करितो की, जेव्हां तो म्हणाला,

“जगाला आपल्या ज्ञानाच्या योगे देवाला ओळखता आले नाही” (I करिंथ 1:21).

कोणत्याहि प्रकारचे मानवी ज्ञान शिकून तारण मिळू शकत नाही. अंत:करणात प्रकाश पडला पाहिजे, हे दाखविण्यास की तुम्ही आशाहीन पापी आहांत. हे घडे पर्यंत, तुम्हांला सांगण्यात आलेली सुवार्ता तुमची समस्या ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळणे हे तुम्हांस वायफळ बडबड वाटते. जोवर तुम्हांस आतून वाटत नाही की तुमची समस्या ही तुमचे पाप आहे, तोवर तुम्हांला ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाचे महत्व समजणार नाही. पवित्रशास्त्र म्हणते,

“ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला” (I करिंथ 15:3).

आपल्या पापाचा दंड भरण्यास, तो आमच्या बदली मेला. पवित्रशास्त्र म्हणते,

“त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करिते” (I योहान 1:7).

पण, पापाच्या शापापासून सोडविण्यासाठी इतर दुसरा कोणता मार्ग नाही हे तुम्हांला देवाचा आत्मा दाखविणार नाही तोवर, ती तुम्हांला एक चांगली मजेदार कथा, आणि बाकी सर्व मुर्खपणाचे बोलणे वाटेल. तुमचे आशाहीन पापमय जीवन तुम्हांला कळणार तेव्हांच तुम्ही अंत:करणातून हे गीत गाऊ शकणार,

माझ्या जवळ चांगले कांही नाही
   ज्याच्यामुळे मी तुझी कृपा मागेन –
मी माझी वस्त्रे शुभ्र धुईन
   कालवरीवरच्या कोक-याच्या रक्तात.
येशूने माझे सर्व, देणे त्याला देऊन टाकले;
   पापाने किरमिजी रंगाचा डाग ठेवला,
बर्फासारखे शुभ्र मला धुऊन शुद्ध केले.
    (“जीजस पेड इट ऑल” एलविना एम. हॉल यांच्याद्वारा, 1820-1899).

केवळ वधस्तंभाविषयीचा संदेश देऊन आपल्या मंडळ्या सामर्थ्यशाली होणार नाहीत. ते मला शेवटी सांगावयाचे आहे.

III. तिसरे, सामर्थ्यशाली मंडळी होण्यास केवळ वधस्तंभाविषयीचा संदेश देऊन पुरेसे नाही.

तुमचे तारण व्हायचे असेल तर वधस्तंभाविषयीचा संदेश गरजेचा आहे. तुम्हांला तुमच्या पापापासून तारण मिळावे म्हणून ख्रिस्त वधस्तंभावर मेला व त्यांने त्याचे रक्त सांडले. परंतू केवळ वधस्तंभाविषयीचा संदेश देऊन आपल्या मंडळ्या सामर्थ्याशाली होणार नाहीत. त्यामुळे ख्रिस्ताने मंडळीस पाळक दिलेत. पवित्रशास्त्र सांगते ख्रिस्तानेच “कोणी पाळक...दिले” (इफिस 4:11).ग्रीक शब्द पोइमन पासून “पाळक” हा अनिवादुत केला आहे. त्याचा अर्थ “मेंढपाळ” आहे. येशूने कांहीजनांना त्यांच्या स्थानिक मंडळीचा पाळक, मेंढपाळ, होण्याचे दान दिले आहे. आणि पाळक हे मंडळी मिळालेले दान आहे. मंडळीतील लोक हे मेंढरे, कळप आहेत. पाळक हे त्या मंडळीचे मेंढपाळ असतात. ते मंढरांची काळजी घेतात. ते मेंढरांचे रक्षण करतात. ते अरण्यात भटकू नयेत म्हणून त्यांना ते मार्गदर्शन करतात व त्यांना राखतात. अशाप्रकारे मेंढपाळ काम करितो.

“पाळक” या शब्दासाठी आणखी एक ग्रीक शब्द इपिस्कोपोस हा आहे. त्या शब्दाचा अर्थ “अध्यक्ष” असा आहे. किंग जेम्सच्या पवित्रशास्त्रात तो “बिशप” असा अनुवादित केला आहे. पवित्रसास्त्र म्हणते, “कोणी अध्यक्षाचे [इपिस्कोपोस, अध्यक्ष, पाळक] काम करु पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो” (I तिमथी 3:1). पाळक मंडळीची देखरेख करितो. तो त्यांचा काळजी घेतो. ख-या अर्थाने तो त्यांची देखरेख करितो. तो मंडळीवर पहारा ठेवतो. तो मंडळीसाठी प्रार्थना करितो व त्याविषयी विचार करितो. काय समस्या आहेत ते तो पाहतो. दुसरे पाहत नाहीत तसे पाळक मंडळीकडे पाहतो. देवाच्या मार्गदर्शनाने काय करावे, ते तो पाहतो. पाळक मंडळीतील लोकांची काळजी − देखरेख करतो. ते काय करतात ते तो पाहतो. तो त्यांच्या अडखळण व समस्या पाहतो. देवाच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या ख्रिस्ती जीवनात यशश्वी होण्यास मदत करतो.

वरदानें असलेल्या पाळकाशिवाय, मंडळी यशश्वी होत नाही. तेथे सर्व प्रकारचे कार्यक्रम असतील. आपल्याकडे सभा असतील. रविवारी आपण पाहण्यांना बोलावू. आम्ही तुम्हाला गीतांची यादी व माहितीपत्र देऊ. आम्ही तुम्हांला जेवण देऊ. आपण चांगले बोलणारे वक्ते देऊ – वधस्तंभाविषयीचा संदेश – आणि आम्ही करु. परंतू केवळ वधस्तंभाविषयीचा संदेश देऊन आपण सामर्थ्यशाली मंडळी देणार नाही.

देवाने मंडळीस पाळक का दिला? आध्यात्मिक वरदानांमध्ये एक पाळकीय वरदान का दिले आहे? केवळ संदेश देऊन मंडळी सामर्थ्यशाली झाली तर, मग आप्लया प्रभूने सगळे पाळक न देता, “कांही सुवार्तिक” का दिले? ख्रिस्ताला ठाऊक होते की सामर्थ्यशाली मंडळी होण्यास केवळ वधस्तंभाविषयीचा संदेश देणे पुरेसे नाही. मंडळीस पाळकाची गरज आहे, आणि त्यामुळे त्यांने “कोणी पाळक...दिले.”

संदेश चांगला असला तरी, पाळकाशिवाय, मंडळी अपयशी होणार. ती अशक्त होत जाणार. ती संकटात सापडणार. शेवटी ती मृत होणार. पाळकाशिवाय, मंडळीतील विश्वासातून मागे वळणार. ते अधिक थंड होणार. ते त्यांच्या जीवनात मोठ्या चुका करणार. ते संकटात सापडणार. का?

प्रथम, तेथे सैतान असणार. पवित्रशास्त्र म्हणते, “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान [हा गर्जणा-या सिंहासारखा] कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो” (I पेत्र 5:8). तो कोणाला गिळणार? मेंढरांना! तुम्ही त्याच्या विचार करु नये असे सैतानाला वाटते. तो तुमच्यावर झडप घालून तुम्हांला खाऊ इच्छितो — आणि सैतानाने हे केले हे तुम्हांला कळू नये असे त्याला वाटते! सैतान व त्याचे दूत तेथे आहेत — तुम्ही लक्षात ठेवा अगर ठेऊ नका.

दुसरे, सर्व लोक पापी आहेत. कारण आदामाने देवाची अवज्ञा केली, त्यामुळे आपण सर्व पापी स्वभावाने जन्मलो. पवित्रशास्त्र म्हणते, “त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते” (रोम 5:19). प्रत्येकजण — ख्रिस्ती सुद्धा — तो पापी स्वभावाचा आहे. पाप करणे आपला स्वभाव आहे. चुक करणे हे स्वाभाविक आहे. मर्फिचा नियम म्हणतो, “कांही चुकीचे घडू शकते, ते चुकीचेच होईल.” गोष्टी आपोआप स्वत:हून सुधारत नाहीत. त्या चुकीच्या होऊ शकतात, त्या खाली पडू शकतात, अगदी सोप्याने. आणि ते करतात. लोक स्वभावत: स्वत:हून सामर्थ्यशाली ख्रिस्ती होऊ शकत नाहीत. ते पाठीमागे जाऊ शकतात. ते थंड होऊ शकतात. ते चुका करु शकतात. आणि ते करतात. ते घडून येण्यासाठी तुम्हांला फार मेहनत घ्यावी लागत नाही. ते आपोआप घडते. मंडळ्या स्वत:हून सामर्थ्यशाली होत नाहीत. ते अशक्त बनू शकतात. ते संकटात सापडू शकतात. ते अगदी सोपे आहे. ते घडून येण्यासाठी तुम्हांला फार मेहनत घ्यावी लागत नाही. ते आपोआप घडेल! आणि ते घडते. त्यामुळे मंडळीस पाळकाची आवश्यकता आहे. ख्रिस्ताने “कोणी पाळक...दिले.” त्यांने हे केले देवाला धन्यवाद!

आपल्या मंडळीचे पाळक डॉ. हायमर्स आहेत. ते सेवेमध्ये गेली साठ वर्षे आहेत. देवाने त्यांना ख्रिस्ताकडे शेकडो लोक आणण्यासाठी उपयोग केला. त्यांनी लोकांना पुष्कळ वर्षे मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लोकांची काळजी घेतली आहे. त्यांनी त्यांना मदत केली आहे. डॉ. हायमर्स यांनी दोन मंडळ्यांची स्थापना केली आहे. मंडळीच्या परिक्षेत व संकटात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. भयंकर अशा फूटीतून आपल्या मंडळीस बाहेर काढले आहे. आपली मंडळी उभारण्यास, त्याची काळजी घेण्यास, संरक्षण करण्यास, विश्वासात राखण्यास देवाने त्यांचा उपयोग केला आहे. डॉ. हायमर्स हे केवळ पाळक नाहीत. तर ते सर्वोत्कृष्ट पाळक आहेत! आपले पाळक डॉ. हायमर्स, यांच्याबद्दल मी देवाचे आभार मानतो!

तुमचे काय? तुम्ही पाळक नाही. पण तुम्ही त्यांना मदत करु शकता. कांही चुकीचे घडताना तुम्ही त्यांना सांगू शकता. आपल्या मंडळीतील डिकन व पुढा-यांसाठी हे अधिक सत्य आहे. येथे तुम्ही पाळकाला मदतनीस म्हणू आहांत. गोष्टी अशाच जाऊ देऊ नका. पाळकाला ठाऊक आहे असे समजू नका. जर कांही चकीचे होताना दिसते किंवा ऐकावयास येते तर, पाळकांना सांगा.

तुम्हांपैकी कांहीजण बिल्कुल ख्रिस्ती नाहीत. तुमचा येशूवर विश्वास नाही. त्याच्या रक्ताने तुमचे पाप धुऊन शुद्ध झाले नाही. तुमचे काय? ख्रिस्ताकडून तुचे तारण होणे आवश्यक आहे. तो तुमच्या पापाची खंडणी भरण्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. त्यांने तुमचे पाप शुद्ध होण्यासाठी रक्त सांडले. तुम्हांला जीवन देण्यासाठी तो मरणातून पुन्हा उठला. इतर लोक जेवणासाठी वर जात असतांना, तुम्हांला येशूवर विश्वास ठेवण्यासंबंधी आमच्याशी बोलावयाचे असेल, तर तुम्ही पुढे या व पहिल्या दोन रांगांमध्ये बसा. आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले: “सेव्हड् बाय द ब्लड ऑफ द
क्रुसिफईड वन” (एस. जे. हेंडर्सन यांच्याद्वारा, 1902).
“Saved by the Blood of the Crucified One” (by S. J. Henderson, 1902).


रुपरेषा

वधस्तंभाविषयीचा संदेश

THE PREACHING OF THE CROSS

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
लिखीत व रेव्ह. जॉन सॅमुएल कागॅन यांच्याद्वारा
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Rev. John Samuel Cagan

“कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मुर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे” (I करिंथ 1:18).

I.   प्रथम, वधस्तंभाविषयीचा संदेश, I करिंथ 1:18अ; कलस्सै 2:13; रोम 5:8-9.

II.  दुसरे, ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश
मुर्खपणाचा आहे, I करिंथ 1:18ब; योहान 16:8; I करिंथ 1:21; 15:3;
I योहान 1:7.

III. तिसरे, सामर्थ्यशाली मंडळी होण्यास केवळ वधस्तंभाविषयीचा संदेश देऊन पुरेसे नाही, इफिस 4:11; I तिमथी 3:1; I पेत्र 5:8; रोम 5:19.