Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




तिरस्कारयुक्त परंतू मनोहर!

DESPISED BUT LOVELY!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लिहलेला
आणि रेव्ह. जॉन सॅमुएल कागॅन यांच्याद्वारा
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 13 मे, 2018 रोजी
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Rev. John Samuel Cagan
at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord's Day Morning, May 13, 2018

“तो सर्वस्वी मनोहर आहे” (गीतरत्न 5:16).


मी गीतरत्नातून कधीहि उपदेश दिला नाही. स्पर्जनच्या संपूर्ण उपदेशाची सुची पाहिली तर, उपदेशाच्या राजकुमाराने त्याच्या लंडन येथील सेवेच्या दरम्यान गीतरत्नातून 63 उपदेश दिलेले मला आढळले. त्यामुळे मी आज ह्या उता-याकडे वळलो.

“तो सर्वस्वी मनोहर आहे.”
“तो सर्वस्वी मनोहर आहे.”
“तो सर्वस्वी मनोहर आहे.”

डॉ. मॅक् गी म्हणाले, “यहुदी लोक गीतरत्नास परम पवित्र शास्त्रलेख संबोधतात. त्यामुळे, सर्वांस त्याच्या पवित्र गाभ्यात जाण्याची मुभा नाही. येथे तुम्ही सर्वोच्च स्थानाच्या गुप्त स्थळी वसता आहांत...तुम्हांला प्रभू येशू संबंधी आस्था आहे आणि त्याच्यावर तुमचे प्रेम आहे तर, ह्या पुस्तकाच्या शिर्षकाचे तुम्हांस मोठे महत्व आहे. गीतरत्न हे काव्यात्मक व व्यावहारिक पुस्तक आहे. येथे परमेश्वर आपल्या लोकांशी काव्यात्मक गीतातून बोलत आहे जी एक उलघडलेली कथा आहे. ह्या पुस्तकाकडे जाताना आपल्या आध्यात्मिक पादुका काढून ठेवल्या पाहिजेत. आपण पवित्र मैदानावर आहोत. गीतरत्न हे एका नाजूक फुलासारखे आहे ज्यांस हळूवारपणे हाताळले पाहिजे. ह्या पुस्तकात चार वेगवेगळे व महत्वाचे अर्थ सापडतात” (जे. वरनॉन मॅक् गी, टीएच.डी., थ्रु द बायबल, थॉमस नेल्सन पब्लिशर्स, 1982, आवृत्ति III, पृष्ठ 143).

प्रथम, गीतरत्न हे पति व पत्नी यांच्यातील प्रेमाचे चित्रण आहे. दुसरे, हे देवाचे इस्त्राएलाकरिता असलेल्या प्रेमाचे चित्रण आहे. प्राचीन गुरुनी हे दोन अनुवाद दिले आहेत. पण त्याचे ख्रिस्ती लोकांसाठी आणखी दोन उपयोग आहेत. तिसरे, ख्रिस्त व त्याची मंडळी यांच्यातील प्रेमाचे चित्रण आहे. चौथे, हे ख्रिस्ताचे प्रत्येक व्यक्तीसाठी असलेले प्रेम, आणि आत्म्याची ख्रिस्ताबरोबर असलेली सहभागिता याचे चित्रण आहे. देवाच्या अनेक महान संतानी ती अनुभवली आहे. गीतरत्न हे रॉबर्ट मुरे मॅक्चेनी, स्कॉटिश प्रचारक ज्यांनी त्यांच्या सेवेत संजीवनाच्या मोठ्या लाटा पाहिल्या. हे मॅक्चेनीनी म्हटले आहे की, “त्याच्या कपाळावरील सार्वकालिक शिक्क्यासहित त्यांने प्रचार केला,” तरीहि तो मेला तेव्हां 29 वर्षे वयाचा होता. त्याचे गीतरत्न हे पवित्रशास्त्रातील आवडते पुस्तक आहे. रॉबर्ट मॅक्चेनीनी गीतरत्नातून प्रचार केला तेव्हां कठोर माणसे रडून गुडघ्यावर आलीत, आणि कठोर पाप्यांनी आपली अंत:करणे ख्रिस्ताला दिलीत. महान स्कॉटिश प्रचारक सॅमुएल रुदरफोर्ड (1600-1661), डी. एल. मुडी (1837-1899) आणि हॅरी आयर्नसाईड (1876-1951), यांचे सुद्धा गीतरत्न हे पवित्रशास्त्रातील आवडते पुस्तक होते, तसेच मी म्हणालो तसे स्पर्जन यांनी गीतरत्नातून 63 उपदेश दिलेले आहेत. डंकन कॅम्पबेल यांनी गीतरत्नातून उपदेश दिला तेव्हां लेविस बेटावर संजीवन आले.

आता, मग, आम्ही ह्या उता-याकडे येतो. वधूने आपल्या पतीस म्हटले, “तो सर्वस्वी मनोहर आहे.” अशाप्रकारे, खरे ख्रिस्ती संत सुद्धा, येशूला म्हणतात, “तो सर्वस्वी मनोहर आहे.” जसे की मी ह्या वचनांवर प्रचार करण्याचे ठरविल्याने मला वाटते, जसे स्पर्जननी केले, “ते इतके वरच्या स्तरचे आहे की, मी तेथे पोहंचू शकत नाही.” अशाप्रकारचे सखोल उतारा मला भारुन टाकतो. पण मी त्याचा संपूर्ण अर्थ बाहेर काढू शकत नाही तर, ह्या सकाळी त्यातून किमान कांहीतर अर्थ काढण्याचा प्रयत्न करीन. पूर्ण आयुष्यभर जगाचे वैभव पाहण्या ऐवजी थोडा वेळ तरी येशूकडे पाहिले तरी बरे होईल, कारण केवळ तोच “तो सर्वस्वी मनोहर आहे.” कांही वेळात मला येशू संबंधीचे दोन भिन्न अर्थ — तो म्हणजे जगाचा आणि ख-या ख्रिस्ती लोकांचा सांगू द्या.

I. प्रथम, पापात हरविलेले जग येशू सर्वस्वी मनोहर आहे असा विचार करत नाही.

सध्या जग त्याला कसे बांधून ठेवते ते तुमच्या लक्षात आले का? असे वाटते की ते त्याचे नाव सुद्धा ऐकू इच्छित नाहीत. माझ्या असे ऐकण्यात आले आहे की अमेरिकेत एअर फोर्सच्या चॅपलेन्सला येशूच्या नावात प्रार्थना करण्यास मुभा नाही. सार्वजनिक कार्यक्रमात पाळकांना प्रार्थना करण्यास सांगितले जाते, तेव्हां येशूच्या नावात प्रार्थनेची समाप्ति करु नका असे विशेषकरुन सांगितले जाते. ही येशूच्या नावासंबंधी नावड नवी नाही, पण ती दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फार वर्षापूर्वी चलचित्राच्या आरंभीच्या काळात, जेव्हां केव्हां ख्रिस्ती लोकांना प्रार्थना करताना दाखवायचे, तेव्हां त्या स्टुडिओतील मुख्याधिकारी “येशूच्या नावांत, आमेन” असे म्हणू देत नसे. मला वाटते येशूचे नाव काढून टाकण्यात आले हे आपल्या लक्षात येणार नाही असा त्यांने विचार केला असेल. पण आपण नेहमी “येशूच्या नावांत, आमेन” असा प्रार्थनेचा शेवट करत असल्याने आमच्या हे लक्षात आले, आणि ती माणसे येशूचा किती तिरस्कार करतात हे त्यातून आम्हांला कळाले.

तारणा-या प्रति त्यांचा तिरस्कार अधिक दिसून आला जेव्हां त्यांनी “लास्ट टेम्पटेशन ऑफ ख्राईस्ट” हा बदनामी करणारा चित्रपट काढला, त्यात त्यांनी तारणा-यांस लिंग-पिसाट मुर्ख असे चित्रित केले आहे. हा चित्रपट बाहेर येणार असे आपले पाळक डॉ. हायमर्स यांना वाचले तेव्हां ते त्यांच्या खोलीतील खुर्चीत बसले आणि त्या चित्रपटाविषयी विचार करु लागले. आणि परमेश्वर त्यांना म्हणाला, “तूं त्यांना हे घेऊन येऊ देणार काय?” डॉ. हायमर्स म्हणाले, “बापा, मी कांही करु शकत नाही.” आणि परमेश्वर म्हणाला, “जर तू करणार नाहीस, तर कोणीहि करणार नाही.” आणि म्हणून आम्ही गेलो व येशूची बाजू घेतली. संध्याकाळच्या बातम्यात आम्ही केलेले विरोध प्रदर्शन सर्व चॅनेलवर दाखविण्यात आले. त्यांनी ही बातमी न्यू यार्क टाईम्स व द वॉल स्ट्रीट जर्नल ह्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर दिली. त्यांनी नाईटलाईन, टूनाईट शो, क्रॉसफायरवर ही बातमी टाकली, आणि त्याची छायाचित्रेहि टाकली, आणि त्याची कथा टीव्ही गाईडवर प्रदर्शित करण्यात आली! त्याचे इंग्लंड, फ्रान्स, इटली, ग्रीस, ऑस्ट्रेलिया आणि इस्त्राएल असे आंतरराष्ट्रीय वार्तांकन करण्यात आले, तेथून एका मित्राने डॉ. हायमर्स यांना फोन केला व म्हणाले की ही यरुशलेम पोस्टच्या पहिल्या पानावर आली होती. थॉमस आर. लिंडलोफ (2008, द युनिव्हर्सिटी प्रेस ऑफ केंटकी) यांच्याद्वारा लिखीत “हॉलिवुड अंडर सिज” ह्या शिर्षकाचे एक पुस्तक होते. त्याच्या मुखपृष्ठावर माझे वडिल, डॉ. कागॅन, व आमच्या मंडळीतील 125 लोक घाणेरड्या बदनामी करणा-या चित्रपटाचा, विरोध प्रदर्शन करणारे बॅनर घेतलेली रंगीत छायाचित्रे होती. मुख्य बॅनर, जे अंदाजे तीस फूट लांबीचे त्यात, म्हटले, “वासेरमॅन — येशू सिनेमा बंद करा!” ल्यू वासेरमॅन ज्याने ह्या चित्रपटाची निर्मिती केली होती. डॉ. हायमर्स यांना त्या पुस्तकात वेगवेगळ्या तेरा ठिकाणी नमुद करण्यात आले होते. तारणा-याचा बचाव करतांना, त्यांनी केवळ येशूचा तिरस्कार केला नाही तर, डॉ. हायमर्स आणि माझे वडिल, आणि आमच्या मंडळीचा सुद्धा केला! त्या पुस्तकास “हॉलिवुड अंडर सिज” म्हटले जाते. विचार करा, 125 छोटे बॅप्टिस्ट सर्व हॉलिवुड “अंडर सिज” मध्ये होते! महान व पराक्रमी चित्रपट नगरातील मंडळीतील कांही डझन छोट्या बॅप्टिस्टच्या “वेढ्यात घेरले” होते! पण हॉलिवुड, बेव्हरली हिल्स येथे राहणारे चित्रपट तारे, न्यू यार्क व वॉशिंग्टन प्रभू येशू ख्रिस्ताचा किती तिरस्कार करतात डॉ. हायमर्स जाणतात. बिल महेर पासून ते जॉर्ज क्लूनि, अँडरसन कुपर पासून ते वोल्फ ब्लिझर पर्यंत — ते देवाच्या पुत्राचा तिरस्कार व नकार करतात. आणि मला वाटत नाही की मंडळीचा खुलेपणे जोवर छळ होत नाही तोवर हे संपणार नाही, आणि ते तुम्ही तुमच्या जीवनकाळात पाहणार ह्याचा मला विश्वास आहे.

सर्वात वाईट हे की, सध्याच्या आपल्या अनेक मंडळीत येशूला मागच्या दारात ठेवले आहे. त्याचे त्याच्या मित्राच्या घरात स्वागत केले जात नाही! डॉ. मायकल हर्टन यांनी त्याविषयी त्यांचे सामर्थ्यशाली व भिडणारे पुस्तक, ख्राईस्टलेस ख्रिस्टीयानिटी (बेकर बुक, 2008) मध्ये लिहले आहे. ते जॅकेटवर म्हणते, “हॉर्टन म्हणतात की आपण अद्यापहि ख्रिस्तविरहीत ख्रिस्तीपणात आलो नाही, पण आपण त्या मार्गावर आहोत. आपण ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करीत असलो, तरी आपण ब-याचदा ख्रिस्त व ख्रिस्त केंद्रीत सुवार्ता दूर लोटली आहे.” पण सध्या येशूला खूप वाईट वागणूक दिली जाते याचे आश्चर्य करु नका. पवित्रशास्त्र म्हणते,

“त्याला रुप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याजकडे पाहिले तर त्याजवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत, व त्याला तुच्छ लेखीत; आम्ही त्याला मानिले नाही” (यशया 53:2-3).

स्वाभाविक वृत्तीचा माणूस, तारण न झालेल्या स्थितीत, येशूला असे पाहतो. “त्याजवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते” आणि त्यामुळे त्याला त्यांनी “तुच्छ लेखीले व नाकारले.” असाच प्रकार डॉ. हायमर्सच्या बाबतीत घडला. ते लहान असतांना जवळजवळ दररोज कॅथलिक मंडळीत भटकंती करायचे. मागे 1940 साली सर्व वेळ ते दरवाजे उघडे ठेवायचे. आणि ते त्यातून जायचे कारण तेथे शांतता व स्तब्धता होती. त्या मंडळीत वधस्तंभ वाहणारा, चेह-या वरुन रक्त वाहत असलेले, असा सजीव वाटणारा, येशूचा पूर्णाकृती पुतळा तेथे होता. शहिद झालेला, जो आपल्या शत्रूंसाठी कांही कारण नसतांना मरण पावला, अशी दु:खद आकृति डॉ. हायमर्स यांनी पाहिली. त्यांचे तो येशूसंबंधीचे चित्र त्यांचे परिवर्तन व्हायच्या कांही दिवस अगोदर 28 सप्टेंबर, 1961 रोजी, म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत होते. तो पर्यंत डॉ. हायमर्सच्या मनात येशूसंबंधी भयंकर गैरसमज होता, तसेच त्याची प्रतिमा ही दु:खद आकृति, जो कोणत्याहि विशेष कारणाशिवाय वधस्तंभावर खिळून मरण पावला अशी होती. परंतू ज्या दिवशी त्यांचे परिवर्तन झाले त्या दिवशी जिवंत, पुनरुत्थित तारणारा ज्याने मरणावर विजय मिळविला आहे, आणि स्वर्गात देवाच्या उजवीकडे बसलेला, जो त्यांना त्यांच्या पापापासून तारु शकतो आणि त्यांचे जीवन बदलू शकतो असे त्यांस पहिल्यांदा पाहिले. त्या सकाळी येशूला पहिल्यांदा त्यांनी पाहिले तेव्हां, ख्रिस्त सर्वस्वी मनोहर होता!

II. दुसरे, खरे ख्रिस्ती त्याला पाहतात की तो सर्वस्वी मनोहर आहे.

मला ठाऊक आहे येशूचे नाव सर्वात मधूर आहे,
   आणि तो त्याच्या नावाप्रमाणेच मनोहर आहे,
आणि का मी त्याच्यावर खूप प्रेम करतो त्याचे हेच एक कारण आहे;
अहो, मला ठाऊक आहे येशूचे नाव सर्वात मधूर आहे.
(“मला ठाऊक आहे येशूचे नाव सर्वात मधूर आहे” लिला लाँग यांच्याद्वारा, 1924).

जसे आपल्या पाळकाकडे आले, तसे ते तुमच्याकडे अचानक येईल. किंवा हळूहळू तुम्हांला दिसेल की तो किती मनोहर आहे, तुम्ही त्याला नमन करणार नाही आणि तुमचा तारणारा व देव म्हणून विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत हे घडणार नाही. ज्या क्षणी डॉ. हायमर्सनी येशूवर विश्वास ठेवला तेव्हां त्यांनी चार्ल्स वेस्ली बरोबर हे गायले असेल,

माझे साखळदंड तुटून पडले, अंत:करण मुक्त झाले;
   मी उठलो, पुढे गेलो, आणि त्याच्या मागे गेलो.
अद्भूत प्रेम! कसे असू शकेल
   तो तूं, माझा देव, माझ्याकरिता मरशील काय?
(“अँड कॅन इट बी?” चार्ल्स वेस्ली यांच्याद्वारा, 1707-1788).

खरे तर, डॉ. हायमर्स यांचे येशूने ज्या सकाळी तारण केले त्यावेळी त्यांनी गीत गायले!

बराच काळ माझा आत्मा बंदिवासात होता,
   पापाने व निसर्गाच्या रात्रीने घट्ट बांधलेलो असा;
तुझ्या डोळ्यातून निघालेल्या जोरदार किरणाने,
   मी जागा झालो, तो अंधारकोठडी ज्वाळेच्या प्रकाशाने उजळून गेली;
माझे साखळदंड तुटून पडले, अंत:करण मुक्त झाले;
   मी उठलो, पुढे गेलो, आणि त्याच्या मागे गेलो.
अद्भूत प्रेम! कसे असू शकेल
   तो तूं, माझा देव, माझ्याकरिता मरशील काय?

त्या वेळी आपले पाळक मॅकचेयन किंवा स्पर्जन सारखे, “तो सर्वस्वी मनोहर आहे” असे ओरडले असतील! त्यांनी अगदी बेंबीच्या देठापासून जर्मन गीत गायले असेल,

न्यायी प्रभू येशू, सर्व निसर्गाच्या अधिपति,
   ओहो तूं देवाचा व मनुष्याचा पुत्र!
मी तुला देईन, मी तुला सन्मान देईन,
   तूं माझ्या जीवाचे वैभव, हर्ष, आणि मुगुट आहेस!

मनोहर तारका! राष्ट्रांचा प्रभू तूं!
   तूं देवाचा पुत्र व मनुष्याचा पुत्र!
महिमा व आदर, स्तुती, आराधना,
   येथून पुढे सदासर्वकाळ तुझी असोत!
(“फेअरेस्ट ल़ॉर्ड जीजस,” 17 व्या शतकातील जर्मन उपासना गीत, जोसेफ ए. सीस यांनी अनुवादित केलेले,1823-1904).

“तो सर्वस्वी मनोहर आहे.”

हा येशू आहे,

“तो अदृष्य देवाचे प्रतिरुप आहे; सर्व उत्पत्तीत जेष्ठ आहे; कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृष्य व अदृष्य असलेले, राजे, अधिपति, सत्ताधिश किंवा अधिकारी असलेले, जे कांही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्व कांही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले; तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व कांही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे; तो आदि, मृतातून प्रथम जन्मलेला आहे; अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे; कारण त्याच्यामध्ये सर्व पूर्णत: असावी, आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांति करुन त्याच्याद्वारे जे सर्व कांही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वत:बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्यांने स्वत:च्या रक्तमांसाच्या देहात मरमाच्या द्वारे समेट केला आहे, ह्यासाठी की त्यांने तुम्हांस पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणांबरोबर उभे करावे” (कलस्सै 1:15-22).

हालेलुया! तो येशू आहे! “होय, तो सर्वस्वी मनोहर आहे!” त्याचा तिरस्कार करणे व नाकारणे पासून वळून त्याची स्तुति आराधना त्याच्या पायाशी करु लागलो — कारण तो आपणांस तारण देण्यासाठी वधस्तंभावर मेला व जीवन देण्यासाठी मरणांतून उठला! हालेलुया! “तो सर्वस्वी मनोहर आहे!” “होय, तो सर्वस्वी मनोहर आहे!”

मला ठाऊक आहे येशूचे नाव सर्वात मधूर आहे,
   आणि तो त्याच्या नावाप्रमाणेच मनोहर आहे,
आणि का मी त्याच्यावर खूप प्रेम करतो त्याचे हेच एक कारण आहे;
   अहो, मला ठाऊक आहे येशूचे नाव सर्वात मधूर आहे.

त्या दुष्ट स्त्री सारखे या जिने “त्याच्या पायाचे चुंबन घेतले” (लुक 7:38). आणि येशू तिला म्हणाला, “तुझ्या पापाची क्षमा झाली आहे” (लुक 7: 48). “पुत्राचे चुंबन घ्या.” असे करण्यास पवित्रशास्त्र सांगते! “पुत्राचे चुंबन घ्या...त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत” (स्तोत्र 2:12). आज सकाळी तुम्ही देवाच्या पुत्राचे चुंबन घ्याल, आणि त्याला शरण जाल काय? “देवाच्या पुत्राचे चुंबन घ्याल?” तुम्ही म्हणता, होय! होय! विश्वासाने त्याचे चुंबन घ्या आणि त्याला शरण जा, कारण तो सर्वस्वी मनोहर आहे! स्पर्जन म्हणाले,

     येशूकडे येण्यास तुम्हांला भीण्याची गरज नाही, कारण “तो सर्वस्वी मनोहर आहे.” ते असे म्हणत नाही की तो सर्वस्वी भयंकर आहे — हा तुमचा त्याच्याबद्दल गैरसमज आहे; ते असे म्हणत नाही की तो कांहीसा मनोहर आहे, आणि कधीकधी कांही पाप्यांचा स्विकार करु वाटते; परंतू “तो सर्वस्वी मनोहर आहे,” आणि त्यामुळे तो दुष्टांचा [पाप्यांचा] स्विकार करण्यास नेहमी तयार असतो. त्याच्या नावाचा विचार करा. तो येशू आहे, तारणारा. हे मनोहर नाव नाही का? त्याच्या कार्याचा विचार करा. तो हरविलेल्यास शोधावयास व तारावयास येतो. हे त्याचे काम आहे. हे मनोहर नाही का? त्यांने जे केले त्याचा विचार करा. त्याच्या रक्ताने आमच्या जीवाला मुक्त केले आहे. हे मनोहर नाही का? तो काय करतो त्याचा विचार करा. तो पाप्याकरिता देवाच्या सिहांसनासमोर [प्रार्थना करीत] आहे...हे मनोहर नाही का? [तरी त्याच्याकडे पाहा] येशू ज्या पाप्यांस गरज आहे त्यांना मोहक वाटतो. या, मग, या व त्याचे स्वागत करा, त्याच्यापासून लपवून ठेवण्यासारखे कांही नाही, तेथे सर्व कांही आहे जे यावयास [तुम्हांला सांगत] आहे. हाच तो शब्बाथ ज्यात मी ख्रिस्ताचा प्रचार केला व त्याला उंच केले, तो दिवस तुम्हांला त्याच्याकडे आकर्षित करण्याचा ठरो, त्याला पुन्हा कधीहि सोडू नये, तर सदासर्वकाळ त्याचे होऊन तुम्ही राहावे. आमेन. (सी.एच. स्पर्जन, “अलटुगेदर लव्हली,” द मेट्रोपोलीटीन टॅबरनिकल पुलपीट, पिलग्रीम पब्लिकेशन्स, 1977 पुनर्मुद्रित, आवृत्ती 17, पृष्ठ 407-408).

“होय, तो सर्वस्वी मनोहर आहे!” आणि तो तुम्हांस त्याच्याकडे येण्यास व त्याला शरण जाण्यास, आणि सर्वकाळ, व सदा सर्वकाळ पापापासून वाचण्यासाठी बोलावितोय — कारण तो तुम्हांवर खूप प्रेम करतोय! कारण तो तुम्हांवर खूप प्रेम करतोय! कारण तो तुम्हांवर खूप प्रेम करतोय! त्याच्याकडे या — कारण तो तुम्हांवर खूप प्रेम करतोय! तो तुम्हांला मुळीच घालवून देणार नाही — कारण तो तुम्हांवर खूप प्रेम करतोय!

माझे जोखड, दु:ख, आणि रात्र यातून,
   येशू, मी येतो, येशू, मी येतो;
तुझे स्वातंत्र्य, आनंद, आणि प्रकाशात,
   येशू, तुझ्याकडे मी येतो;
माझ्या आजारपणातून तुझ्या आरोग्यात,
   माझ्या अपेक्षेतून तुझ्या ऐश्वर्यात,
माझ्या पापातून आणि तुझ्या स्वत:त,
      येशू, तुझ्याकडे मी येतो.

आता ह्या गीताचे दुसरे वचन ऐका,

कबरेची भीति व भिषणता यातून,
   येशू, मी येतो, येशू, मी येतो;
तुझ्या आनंदात व तुझ्या घराच्या प्रकाशात,
   येशू, तुझ्याकडे मी येतो;
न सांगितलेल्या माझ्या नाशाच्या दरीतून,
   तुझ्या शांतीच्या छताखाली,
तुझ्या गौरवी मुख प्रकाशात,
येशू, तुझ्याकडे मी येतो.
(“जीजस, आय कम” विलियम टी. स्लीपर यांच्याद्वारा, 1819-1904).

येशू तुझ्यावर प्रेम करितो. या सकाळी येशूकडे या. त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुम्हांस “सर्वस्वी मनोहर” दिसेल. त्याचे रक्त नेहमी तुमचे पाप धुऊन शुद्ध करील. येशूवर विश्वास ठेवण्यासंबंधी तुम्हांला बोलावयाचे असल्यास, बाकी सगळे जेवणासाठी वर जातील तेव्हां, तुम्ही येऊन पहिल्या दोन रांगेत बसा. आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले: “फेअरेस्ट लॉर्ड जीजस”
     (जर्मनमधून अनुवादित जोसेफ ए. सीस यांच्याद्वारा, 1823-1904).
     “Fairest Lord Jesus” (translated from German by Joseph A. Seiss, 1823-1904).


रुपरेषा

तिरस्कारयुक्त परंतू मनोहर!

DESPISED BUT LOVELY!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लिहलेला
आणि रेव्ह. जॉन सॅमुएल कागॅन यांच्याद्वारा दिलेला

A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Rev. John Samuel Cagan

“तो सर्वस्वी मनोहर आहे” (गीतरत्न 5:16).

I.   प्रथम, पापात हरविलेले जग येशू सर्वस्वी मनोहर आहे असा विचार
करत नाही, यशया 53:2-3.

II.  दुसरे, खरे ख्रिस्ती त्याला पाहतात की तो सर्वस्वी मनोहर आहे,
कलस्सै 1:15-22; लुक 7:38, 48; स्तोत्र 2:12.