संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
ख्रिस्ताचे पुनरुत्थान झालेचे तीन पुरावेTHREE PROOFS OF CHRIST’S RESURRECTION डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश “ह्या गोष्टी राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत; त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो ह्यांतले त्यांच्यापासून कांही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे कानाकोप-यांत घडलेले नाही” (प्रे. कृ. 26:26). |
लुक प्रेषितांच्या कृत्यांच्या 26 व्या अध्यायात पौलाच्या परिवर्तनाची साक्ष तिस-यांदा सांगतोय. लुक ही तीनदा देतोय हे समजणे सोपे आहे. ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान ह्या व्यतिरिक्त, प्रेषित पौलाचे परिवर्तन यापेक्षा दुसरी महत्वाची घटना ख्रिस्ती इतिहासामध्ये नाही.
पौलाने सुवार्ता प्रचार केला त्यामुळे त्याला अटक झाली होती,
“जो जिवंत आहे असे पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी...” (प्रे. कृ. 25:19).
आणि आता पौल, त्याचे हात साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत, राजा अग्रिप्पापुढे उभा राहिला. अग्रिप्पा स्वत: एक यहुदी होता. त्यामुळे पौलाने जो प्रचार केला त्याचे समर्थन त्याने जुन्या करारातील ख्रिस्ताच्या पुनरुत्थानासंबंधीच्या शास्त्रलेखाच्या आधारे केले. राजा अग्रिप्पाला ख्रिस्ताचे वधस्तंभावर खिळणे व पुनरुत्थान ह्याविषयी पूर्वीच ठाऊक होते ह्या पौलाच्या म्हणण्याचे सुद्धा त्याने समर्थन केले. वधस्तंभावर खिळणे व पुनरुत्थान हे तीस वर्षापूर्वी घडले होते. राजा अग्रिप्पा यासह, प्रत्येक यहुद्यांस ते ठाऊक होते. म्हणून पौल म्हणतो,
“...राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत; त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो ह्यांतले त्यांच्यापासून कांही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे कानाकोप-यांत घडलेले नाही” (प्रे. कृ. 26:26).
“हे कानाकोप-यांत केले नव्हते.” त्याकाळच्या ग्रीक लोकांचा सामान्य भाव होता. डॉ. गएबेलीनचा भाष्यग्रंथ म्हणतो,
पॅलेस्टाईनमध्ये सर्वत्र येशूचे सेवाकार्य माहित आहे, आणि अग्रिप्पाने हे ऐकले असणार. येशूचे मरण व पुनरुत्थान मोठ्या प्रमाणात जगजाहिर होते आणि ख्रिस्ती शुभवर्तमान हे तीस वर्षे जाहिर केले जात होते. खात्रीने राजाला ह्या गोष्टी ठाऊक असणार, कारण “हे कानाकोप-यात घडलेले नव्हते” (द इक्स्पोझीटर्स बायबल कॉमेंट्री, फ्रॅंक इ. गएबेलीन, डी.डी., सर्वसाधारण संपादक, झोन्डेरवॅन पब्लीशिंग हाऊस, 1981, आवृत्ती 9, पृष्ठ 554, प्रे. कृ. 26:25-27 वरील टिप्पणी).
पुष्कळ लोक सध्या असा विचार करतात की येशूचे मरण व पुनरुत्थान ह्या घटना अप्रसिद्ध होत्या केवळ कांही किरकोळ मासे धरणा-यानांच माहित होते. परंतू पुष्कळ जणांना सत्य माहित नव्हतेच! प्रत्येक इस्त्राएल लोकांमध्ये ख्रिस्ताचे पुनरुत्थान ठाऊक होते, आणि ते जवळजवळ तीस वर्षे संपूर्ण रोममध्ये बोलले जात होते! ख्रिस्ताचे पुनरुत्थान ते गुपित ठेऊ शकले नाहीत!
कारण “हे कानाकोप-यांत घडलेले नाही”( प्रे. कृ. 26:26).
डॉ. लेन्स्की म्हणाले,
येशू संबंधी जे कांही सांगण्यात आले होते ते देशाच्या राजधानीत पसरले होते, आणि न्यायाधिश व [रोमी सुभेदार] पिलात ह्यांचा त्यात समावेश होता, आणि येशू हा एक राष्ट्रीय प्रतिक होता, ज्याचा आजूबाजूच्या प्रांतात नाव झाले होते. “केवळ एका कोप-यात नव्हे”...ही कांही छोटीशी घटना नव्हती ज्याविषयी कोणालाच माहित नव्हते, पण एक मोठी व महत्वाची घटना होती, इतकी लोकांत व सर्व-दूर पसरली होती, की राजा अग्रिप्पाला आपले राजकीय लक्ष द्यावे लागले (आर.सी.एच. लेन्स्की, डी.डी., द इंटरप्रिटेशन ऑफ द ॲक्ट्स ऑफ द अपोस्टल्स, ऑक्सबर्ग पब्लिशिंग हाऊस, 1961 आवृत्ती, पृष्ठ 1053; प्रे. कृ. 26:26 वरील टिप्पणी).
“कारण हे कानाकोप-यांत घडलेले नव्हते”( प्रे. कृ. 26:26).
ख्रिस्ताच्या शत्रूला तो मेलेल्यांतून उठला नाही हे सिद्ध करण्यास त्यांच्याकडे तीन वर्षे होती. आणि तरीहि ते त्यात अपयशी ठरले. त्यांनी किती प्रयत्न केले ते महत्वाचे नाही, पण ते त्याला वधस्तंभावर खिळून मारल्यावरहि येशू मृतच राहिला हे सिद्ध करण्यास अपयशी ठरले. दरम्यानच्या काळात “ख्रिस्त मरणातून पुन्हां उठला आहे” अशी घोषणा करीत, पौल राजा अग्रिप्पा, हजारो यहुदी, दहा हजार परराष्ट्रीय, यांच्याशी बोलला.
ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे ख्रिस्तीत्वाचा पाया आहे. येशूचे शरीर कबरेतून जिवंत बाहेर आले नसते, तर ख्रिस्ती विश्वासाला पायाच नसता. प्रेषित पौल स्वत: म्हणाला,
“आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासहि व्यर्थ [निरर्थक]” (I करिंथ 15:14).
ख्रिस्ताच्या शत्रूंनी त्याचे पुनरुत्थान नाकारण्याचा सर्वोतपरि प्रयत्न केला याचे आश्चर्य नाही! आणि तरीहि ते अपयशी ठरले. मी ग्रेग लॉरी यांच्या ब-याच विषयांशी सहमत नाही, तरी परंतू ख्रिस्ताचे पुनरुत्थान या विषयावर सहमत आहे. ख्रिस्ताचे शत्रू का अपयशी झाले याची तीन कारणें — मरणातून पुनरुत्थान झाल्याचे तीन पुरावे ग्रेग लॉरी यांनी दिली आहेत (ग्रेग लॉरी, पुनरुत्थान का झाले? टायंडेल हाऊस पब्लिसर्स, 2004, पृष्ठ 13-24). मी ते भिन्न शब्दात मांडतोय.
“कारण हे कानाकोप-यांत घडलेले नव्हते”( प्रे. कृ. 26:26).
I. प्रथम, रिकामी कबर.
येशूच्या पुनरुत्थाना पहिला पुरावा त्याची रिकामी कबर होय. सत्य हे आहे की त्याच्या मरणानंतर तीन दिवसाने येशूची कबर रिकामी कबर होती हा सर्वात मोठ पुरावा आहे. त्याच्या मरणानंतर तीन दिवसाने येशूची कबर रिकामी कबर होती याच्याशी चारी शुभवर्तमानाचे लेखक अगदी सहमत आहेत. इतर पुष्कळ पुराव्या द्वारे कबर रिकामी कबर होती हे सत्य पडताळून पाहिले.
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरील सर्वात जुना हल्ला म्हणजो त्याचा मृतदेह कोणीतरी पळवून नेल्याचा आरोप. प्रमुख याजक
“...शिपायांस पुष्कळ पैसे देऊन सांगितले की, आम्ही झोपेत असतांना त्याच्या शिपायांनी रात्री येऊन त्याला चोरुन नेले असे म्हणा...मग त्यांनी पैसे घेऊन शिकविल्याप्रमाणे केले; आणि ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत चालू आहे” (मत्तय 28:12-15).
परंतू अशाप्रकारचा विवाद लोकांना पटला नाही. त्याच्या शिष्यांनी त्याचा मृतदेह चोरला नाही व तो पुन्हां उठल्याचा कांगावा केला नाही हे साधा माणूसहि सांगेल. तीन दिवसापूर्वी ख्रिस्ताला अटक केली व वधस्तंभावर दिले त्यावेळी शिष्य जीवाच्या भीतीने पळून गेले होते. ह्या भित्र्या लोकांनी येशूचा मृतदेह चोरण्याचे — आणि तो मेलेल्यांतून पुन्हा उठल्याचे उघडपणे सांगण्याचे धाडस — जीव धोक्यात घालून केले असावे हे जवळजवळ अशक्य आहे! नाही, हा अगदी अशक्य गोष्टीची विवाद आहे! सत्य ह्याच्याशी जुळत नाही. “यहुद्यांच्या भीतीमुळे” शिष्यांनी, दार बंद असलेल्या घरात बंद करुन घेतले होते (योहान 20:19). तेच मोठ्या धक्क्यात होते. तो मरणातून उठणार ह्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. ते रोमी सरकारला आव्हांन देतील व येशूचा मृतदेह चोरतील एवढा विश्वास किंवा धैर्य त्याच्या कोणत्याहि शिष्यांकडे नव्हते. हे मानसिक सत्य आहे जे दुर्लक्षित करु शकत नाही.
केवळ दुसरी एक शक्यता, जी ख्रिस्ताचा मृतदेह चोरुन नेऊ शकते ती होती, त्याचे विरोधक. ह्या सिद्धांताची समस्या ही आहे की त्याचा मृतदेह चोरुन नेण्याचे सबळ कारण विरोध- काकडे नव्हते. प्रमुख याजक व धार्मिक पुढा-यांनी त्याला ठार मारले कारण त्याने त्यांच्या धार्मिक व्यवस्थेला व जीवन जगण्याच्या पद्धतीला धोका होता. तो पुन्हा जिंवत होता असा लोकांनी विचार करावा ही शेवटची गोष्ट ह्यांना हवी होती. त्यामुळे ह्या धार्मिक पुढा-यांनी त्याच्या पुनरुत्थानाचे दर्शन काढून टाकण्याचा प्रयत्न केला. मत्तयचे शुभवर्तमान आपणांस सांगते की ते रोमी सुभेदार, पंतय पिलाताकडे गेले,
महाराज, तो ठक जिवंत असतां तीन दिवसानंतर मी उटेन असे म्हणाला होता, ह्याची आम्हांस आम्हांस आठवण आहे; म्हणून तिस-या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरुन नेतील व तो मेलेल्यांतून उठला आहे असे लोकांस सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल” (मत्तय 27:63-64).
पिलाताने शिपायांना पहारा ठेवण्यास व “शक्य तितकी कबरेची सुरक्षा” करण्यास सांगितले — तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा (मत्तय 27:65). मग पहारा बरोबर घेऊन गेले आणि त्यांनी धोंडीवर शिक्कामोर्तब करुन कबरेचा बंदोबस्त केला (मत्तय 27: 66). आश्चर्य, त्याच्या स्वत:च्या शिष्यांपेक्षाहि प्रमुख याजक व धार्मिक पुढा-यांचा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास होता!
सत्य हे आहे की ख्रिस्ताचा मृतदेह चोरीला जाऊ नये म्हणून धार्मिक पुढा-यांनी सर्वोतपरी कबरेचा बंदोबस्त केला होता. ख्रिस्ताचा मरणातून पुन्हा उठण्याचा दावा खोटा ठरविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला आहे ही बातमी लोकांमध्ये पसरु नये याची सर्व ती दक्षता धार्मिक पुढा-यांनी घेतली. मृतदेह चोरणे ही त्याच्या शत्रूचा शेवटचा प्रयत्न ठरला असता. परंतू त्यांनी त्याचा मृतदेह चोरला असता, तर निसंशयपणे जेव्हां शिष्यांनी त्याच्या पुनरुत्थानाचा प्रचार करण्यास सुरुवात केली असती तेव्हां त्यांनी त्याला बाहेर काढले असते. पण ख्रिस्ताच्या शत्रूला त्याचा मृतदेह बाहेर काढता आला नाही. का? सरळ आहे त्यांच्याकडे बाहेर काढण्यास त्याचा मृतदेह नव्हता! कबर रिकामी होती! ख्रिस्त मरणांतून पुन्हां उठला आहे!
“कारण हे कानाकोप-यांत घडलेले नव्हते”( प्रे. कृ. 26:26).
रिकामी कबर हे ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हां उठण्याचा पहिला पुरावा आहे, पण तेथे अजूनहि कांही आहे!
II. दुसरे, प्रत्यक्षदर्शींच्या नोंदी.
ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हां, त्याचे शिष्यांकडे कोणतीच आशा नव्हती. त्यांचा विश्वास संपलेला होता. त्याला पुन्हां जिवंत पाहण्याची त्यांना कोणतीच आशा नव्हती. मग येशू आला,
“येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हांस शांति असो” (योहान 20:19).
शिष्यांनी त्यांस जिवंत पुन्हां पुन्हा पाहिले.
“मरण सोसल्यानंकरहि त्याने त्यांना पुश्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहों हे दाखविले, चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे” (प्रे.कृ. 1:3).
प्रेषित पौल म्हणाला की पुनरुत्थित ख्रिस्त हा होता,
“आणि तो केफाला [पेत्र], मग बारा जणांना दिसला; त्यानंतर तो एकदम पाचशेंपेक्षा अधिक बंधूना दिसला; त्यांतील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला; आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी त्या मलाहि सर्वांच्या शेवटी दिसला” (I करिंथ 15:5-8).
डॉ. जॉन आर. राईस म्हणाले,
शेकडो लोकांनी येशूला त्याच्या पुनरुत्थानानंतर पाहिले होते ह्याचा मोठा आवाका लक्षात घेता, त्या चाळीस दिवसांत कांहीनी पुन्हां पुन्हां या अनुभवातून गेले! [प्रे.कृ. 1:3]. पवित्रशास्त्राचा नियम “दोघा किंवा तीघांच्या प्रत्यक्ष साक्षीने” प्रमाणित होते. येथे तर शेकडो साक्षीदार आहेत. एका किंवा दोघांच्या साक्षीने पुष्कळ लोक एखाद्यास मरण दंडाची शिक्षा देत असत.
एखाद्या महत्वाच्या बाबतीत केवळ बारा तोंडे सहमत होण्याची आवश्यकता असायची. येथे तर खरोखर शेकडोने सहमत होते की येशू मरणातून पुन्हां उठला आहे. असा एकहि मनुष्य दिसला नाही ज्याने तीन दिवसानंतर त्याचा मृतदेह पाहिला होता, किवा इतर कुठल्या साक्षीच्या विरोधी पुरावा त्याच्याकडे होता.
त्या साक्षीदारांची – प्रत्यक्षदर्शींची, ज्यांनी तारणा-यास हाताळले, त्याला स्पर्श केला, त्याच्या हाता पायात खिळ्यांची खूण पाहिली, त्याला जेवतांना पाहिले, चाळीस दिवस त्यांच्याबरोबर संवाद साधला त्यांची साक्ष – ह्या त्यांच्या साक्षी अमेरिकेतील किंवा जगातील इतर कुठल्याहि देशातील सर्वोच्च न्यायालयास लागणा-या साक्षीं पेक्षा मोठ्या साक्षी होत्या...पुरावे एवढे प्रचंड होते की केवळ विश्वास न ठेवणारा आणि ज्यास तपासायला नको तोच पुरावे नाकारतो. येशूने “त्याच्या मृत्यूनंतर पुष्कळ अचूक पुराव्यानी स्वत:स जिवंत असे प्रदर्शित केले” असे पवित्रशास्त्र जाहिर करते ह्याचे आश्चर्य नाही, प्रे.कृ. 1:3 (जॉन आर. राईस, डी.डी., द रिजरंक्शन ऑफ जीजस क्राईस्ट, स्वोअर्ड ऑफ द लॉर्ड पब्लिशर्स, 1953, पृष्ठ 49-50).
“कारण हे कानाकोप-यांत घडलेले नव्हते”( प्रे. कृ. 26:26).
रिकामी कबर, व शेकडो साक्षीदार, हे येशू मरणातून पुन्हां उठला याचे ठोस पुरावे आहेत. परंतू आणखी कांही आहेत.
III. तिसरे, प्रेषितांचे हौतात्म्य.
पुनरुत्थान जर खोटे होते तर प्रेषितांतील प्रत्येक जण त्याची घोषणा करण्यास एवढ्या दु:खातूनहि का गेले? प्रेषितानी पुनरुत्थानाची केवळ घोषणा केली नाही तर, त्यांनी नाकारण्याऐवजी मरण पत्करले! आपण मंडळीचा इतिहास वाचतो तेव्हां कळते की प्रेषितांतील प्रत्येकांने [योहान सोडून – ज्याचा छळ केला व हाकलून दिले] भयंकर मरण पत्करले कारण त्यांनी पुनरुत्थित खिस्त गाजविला होता. डॉ. डी. जेम्स केनडी म्हणाले,
मनोविज्ञानाच्या इतिहासामध्ये एखादी तो किंवा ती व्यक्ति ज्याला ठाऊक आहे की हे खोटे आहे त्यासाठी तो आपला प्राण कधीच देत नाही. हे सत्य खूप महत्वाचे आहे. मला आश्चर्य याचे वाटते की प्रेषितांना व आऱंभीच्या ख्रिस्ती लोकांना भयंकर अशा दु:खातून, अशा भयंकर, अविश्वसनीय छळांतून, देवाने का नेले...आपण विश्वासू, व्यक्तीमत्व, दु:खसहन, आणि साक्षीसाठी मरण पत्करले, त्यातील कित्येकांनी आपल्या रक्ताने साक्षी शिक्कामोर्तब केल्या...पौल थोडक्यात म्हणाला, “ज्या सत्यावर ते विश्वास ठेवतात त्यासाठी मनुष्य मरण पत्करतो...जे असत्य त्यांना ठाऊक आहे, त्यासाठी, ते मरण पत्करत नाहीत” (डी. जेम्स केनडी, पीएच.डी., व्हाय आय बिलिव्ह, थॉमस नेल्सन पब्लिशर्स, 2005 आवृत्ती, पृष्ठ 47).
ही माणसे मेली कारण ते म्हणाले की त्यांनी मृतांतून पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताची साक्ष दिली:
पेत्र – भयंकर फटके मारले व त्यानंतर वधस्तंभावर उलटे लटकाविले.
आन्द्रे – X- आकाराच्या वधस्तंभावर त्याला लटकाविले होते.
याकोब, जब्दीचा मुलगा – त्याचा शिरच्छेद केला.
योहान – त्याला कढईतील उकळत्या तेलात टाकले होते, आणि
नंतर त्याला पात्मोस बेटावर घालवून दिले.
फिलीप्प – फटके मारले व त्यानंतर वधस्तंभावर लटकाविले.
बार्थलमय – जीवंतपणी चामडी सोलली [कातडी काढली] व वधस्तंभावर लटकाविले.
मत्तय – शिरच्छेद केला.
याकोब, प्रभूचा भाऊ – मंदिराच्या शिखरावरुन खाली टाकले, व मरेपर्यंत मारले.
थद्दायुस – बाण मारुन ठार केले.
मार्क – फरपटत नेऊन मारले.
पौल – शिरच्छेद केला.
लुक – जैतूनाच्या झाडावर फाशी दिली.
थोमा – भाले मारुन पळविले व भट्टीच्या अग्नीत टाकले.
(द न्यू फॉक्सेस बुक ऑफ मारटीर्स, ब्रिज-लोगोस पब्लिशर्स, 1997, पृष्ठ 5-10; ग्रेग लॉरी,
पुनरुत्थान का? टायंडेल हाऊस पब्लिशर्स, 2004, पृष्ठ 19-20).
ही माणसे भयंकर अशा त्रासांतून गेले, आणि भयंकर मरण पत्करले, कारण ते म्हणाले की ख्रिस्त मरणातून उठला. जे पाहिलेच नाही त्यासाठी सहसा माणसे मरत नाहीत! ख्रिस्त कबरेतून उठला हे ह्या माणसांनी पाहिले होते! त्यामुळे छळ व मरण सुद्धा त्यांना “ख्रिस्त मरणातून उठला आहे” हे गाजविण्यापासून थोपवू शकले नाही!
पेत्राने त्याला समुद्र किनारी पाहिले,
तेथे समुद्राजवळ त्याच्यासह जेवला;
एकदा मेलेला येशू, त्याच्याशी बोलला,
जो मेलेला होता तो पुन्हां जिवंत आहे!
जो मेलेला होता तो पुन्हां जिवंत आहे!
मरणाच्या दणकट, बर्फाच्छादीत बेड्या तोडल्या —
जो मेलेला होता तो पुन्हां जिवंत आहे!
ह्या माणसांनी अविश्वासू जमावास निडर हौतात्म्यामध्ये बदलले — कारण त्यांनी ख्रिस्ताला कबरेतून उठलेला पाहिला होता!
थोमाने त्याला घरी पाहिले,
त्याला त्याचा धनी व प्रभू म्हणून बोलाविले,
खिळ्यांनी व तलवारीने हाता पायात पडलेली
छिद्रे हाताची बोटे घालून तपासले.
जो मेलेला होता तो पुन्हां जिवंत आहे!
जो मेलेला होता तो पुन्हां जिवंत आहे!
मरणाच्या दणकट, बर्फाच्छादीत बेड्या तोडल्या —
जो मेलेला होता तो पुन्हां जिवंत आहे!
(पौल राडर, ibid.).
पौल राडर यांचे महान गीत पुन्हा गाण्यास आपल्या मंडळ्या शिकव्यात असे मला वाटते! तुम्ही मला लिहता आहांत व विनंती करता आहांत तर मी तुम्हांला ते गीत पाठवून देईन. लिहा प्रति डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि., पो.ऑ. बॉक्स 15308, लॉस एंजिल्स, सीए 90015 — आणि “अलाईव्ह अगेन” ह्या पौल राडर यांच्या गीताची मागणी करा.
आम्ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे पुरावे यापेक्षा जास्त गोळा करु शकतो, पण ते तुम्हांला पटणार नाही. कांही लोकांनी ख्रिस्त मेलेल्यातून उठल्यानंतर पाहिले तरीहि ते “सांशक” आहेत (मत्तय 28:17). तुम्ही विश्वासाने ख्रिस्ताकडे यायला हवे. देहधारणेच्या पूर्वी ख्रिस्त म्हणाला,
“तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हां मी तुम्हांस पावेन” (यिर्मया 29:13).
“कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो” (रोम 10:10).
बिओला महाविद्यालयाच्या (सध्या विद्यापीठ) सभागृहात डॉ. चार्ल्स जे. वुडब्रिज, ज्यांनी 1957 मध्ये आरंभीच्या उदारमतवाद्यांमुळे फुलर थिऑलॉजीकल सेमीनरी सोडली, यांचा उपदेश ऐकल्यानंतर 28 सप्टेंबर, 1961 रोजी सकाळी 10:30 वाजता, माझा पुनरुत्थित ख्रिस्ताशी सामना झाला (पाहा हारोल्ड लिंडसेल, पीएच.डी., द बॅटल फॉर द बायबल, झोंडरवॅन पब्लिशिंग हाऊस, 1978 आवृत्ती, पृष्ठ 111). आणि तुम्ही सुद्धा पुनरुत्थित ख्रिस्ताला जाणू शकता — त्याला तुम्हांला अधिक जाणून घ्यायचे असेल तर “अरुंद दरवाजाने आंत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा” (लुक 13:24). जेव्हां तुम्ही ख्रिस्ताकडे येता तेव्हां तुमच्या पापाचा पश्चाताप होतो व त्याच्या रक्ताने शुद्ध होते — आणि तो मरणातून पुनरुत्थित झालेने तुम्ही नव्याने जन्म पावता. तुम्ही लवकरात लवकर ख्रिस्ताकडे यावे अशी माझी प्रार्थना आहे! आमेन.
जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.
ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.
एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले: “इन क्राईस्ट अलोन”
(किथ गेट्टी आणि स्टुअर्ट टाऊनएंड यांच्या द्वारा, 2001).
“In Christ Alone” (by Keith Getty and Stuart Townend, 2001).
रुपरेषा ख्रिस्ताचे पुनरुत्थान झालेचे तीन पुरावे THREE PROOFS OF CHRIST’S RESURRECTION डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “ह्या गोष्टी राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत; त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो ह्यांतले त्यांच्यापासून कांही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे कानाकोप-यांत घडलेले नाही” (प्रे. कृ. 26:26). (प्रे.कृ. 25:19; I करिंथ 15:14) I. प्रथम, रिकामी कबर, मत्तय 28:12-15; योहान 20:19; मत्तय 27:63-64, 65, 66. II. दुसरे, प्रत्यक्षदर्शींच्या नोंदी, योहान 20:19; प्रे.कृ. 1:3; I करिंथ 15:5-8. III. तिसरे, प्रेषितांचे हौतात्म्य, मत्तय 28:17; यिर्मया 29:13; रोम 10:10; लुक 13:24. |