संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
ख्रिस्ताला धरुन देणे व अटक करणेTHE BETRAYAL AND ARREST OF CHRIST डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश “तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?” (मत्तय 26:53). |
येशूने गेथशेमानेत तिस-यांदा प्रार्थना केली तेव्हां, तो आपल्या झोपलेल्या शिष्यांकडे आला व म्हणाला,
“उठा, आपण जाऊं; पाहा, मला धरुन देणारा जवळ आला आहे” (मत्तय 26:46).
मग, अंधारातून, 300 सैनिकांची मोठी तुकडी तेथे आली,
“...सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परुशी ह्यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रें घेऊन तेथे आला” (योहान 18:3).
यहुदा त्यांना तेथे घेऊन आला कारण
“ही जागा त्याला धरुन देणा-या यहुदालाहि ठाऊक होती; कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे” (योहान 18:2).
यहुदा येशूजवळ आला व त्याचे चुंबन घेतले, अशाप्रकारे येशू कोण आहे हे सैनिकांना दर्शविले. चुंबन घेऊन ख्रिस्ताला त्यांने धरुन दिले.
येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधिता?” जेव्हां त्याने हे म्हटले, ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.” येशू म्हणाला, “मीच तो आहे.” असे तो म्हणताच ते मागे हटून “जमिनीवर पडले.” त्यांने देवाचा पुत्र म्हणून आपले सामर्थ्य दाखविले. येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे असे मी तुम्हांला सांगितले; तुम्ही मला शोधीत असाल तर ह्यांना जाऊ द्या” (योहान 18:8).
तेव्हां पेत्राला उठला, व आपली तरवार उपसून, ती चालविली. त्यांने तरवार अंधरात चालविल्यांने, मुख्य याजकाच्या दासाचा कान कापला गेला. येशूने “त्याच्या कानाला स्पर्श केला, व त्याला बरे केले” (लुक 22:51). मग येशू पेत्राला म्हणाला.
“तुझी तरवार परत जागच्या जागी घाल; कारण तरवार धरणारे सर्व तरवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आतांच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यापेक्षा अधिक पाठवून देणार नाही?” (मत्तय 26:52-53).
ह्या उता-यातून मी तुम्हांला दोन शिकवणीकडे लक्ष वेधितो.
I. प्रथम, ख्रिस्त स्वत: ला वाचविण्यास हजारो देवदूतांना बोलावू शकला असता.
एक रोमन सैनिकाची तुकडी 6,000 सैनिकांनी बनलेली असते. येशू म्हणाला त्यांने देव पित्याला मागितले तर, आतांच्या आता तो बारा सैन्यांच्या तुकड्या पाठविल. त्याला ह्या सैन्यांच्या हातून वाचायचे असते तर, त्यांने देवाला मागितले असते, व 72,000 देवदूत आले असते. डॉ. जॉन गील निर्देशित करतात की “एका रात्रीत एका देवदूताने एक लक्ष पंच्याऐंशी हजार पुरुषांना ठार केले, 2 राजे 19:35. त्यामुळे ख्रिस्ताने समोर असलेल्या कोणत्याहि धोक्यातून आपली सुटका करुन धेतली असती, त्याला पेत्राच्या तरवारीच्या आड येण्याची गरज नसती” (डॉ. जॉन गील, अँन एक्स्पोजिशन ऑफ द न्यू टेस्टामेंट, द बॅप्टिस्ट स्टँडर्ड बेरर, 1989 पुनर्मुद्रण, आवृत्ती I, पृष्ठ 340).
ख्रिस्ताचे शब्द व कृति हे दर्शविते की त्याचे सर्व परिस्थितीवर पूर्णत: नियंत्रण होते. जेव्हां तो म्हणाला, “मीच तो आहे” तेव्हां त्याच्या सामर्थ्याने सैनिक मागे हटून जमिनीवर पडले. जेव्हां पेत्राने मुख्य याजकाचा दास मल्खाचा कान कापला, तेव्हां ख्रिस्ताने दयाळूपणे त्याच्या कानाला स्पर्श केला व तो बरा केला. आणि येशू पेत्रास शांतपणे म्हणाला त्यांने देवाकडे प्रार्थना केली असती कर हजारो देवदूत पाठवून मला सोडविल. परंतू त्यांने सुटकेसाठी प्रार्थना केली नाही.
जेथे बागेत येशूने प्रार्थना केली तेथे त्याचे हात बांधले गेले,
त्यांनी त्याला रस्त्यातून लज्जास्पदरित्या नेले.
निष्कलंक व पाप विरहित असतांना, ते तारकावर थुंकले,
ते म्हणाले, “तो अपराधी आहे; त्याला वधस्तंभी खिळा.”
जगाचा नाश व स्वत:ची सुटका करण्यास
त्याने दहा हजार देवदूतांना बोलाविले असते.
त्याने दहा हजार देवदूतांना बोलाविले असते,
परंतू तो एकटा मरण पावला, तुमच्या व माझ्यासाठी.
(“टेन थावजंड एंजल्स” रे ओव्हरहॉल्ट यांच्याद्वारा, 1959).
II. दुसरे, ख्रिस्त स्वच्छेने वधस्तंभावर गेला.
ख्रिस्ताला बागेत अनपेक्षितपणे अटक केली असा आपण कधीहि विचार करता कामा नये. त्या रात्री त्याला अटक होण्याच्या फार पूर्वी काय होणार हे त्याला ठाऊक होते.
त्याच्या आदल्या दिवशी तो शिष्यांना घेऊन येरुशलेमेस गेला, काय घडणार हे त्याने सांगितले. अटक होण्याच्या आदल्या दिवशी येशू काय म्हणाला, याची लुकने नोंद केली आहे,
“तेव्हां त्यांने बारा जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, पाहा, आपण वर येरुशलेमेस चाललो आहो, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांच्या द्वारे लिहण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत; म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याच्या जीव घेतील, आणि तो तिस-या दिवशी पुन्हां उठेल” (लुक 18:31-33).
ते यरुशलेमेत गेल्यानंतर त्याच्या बाबतीत काय घडणार हे सर्व त्याला ठाऊक होते. तरीहि तो गेला. विशिष्ठ उद्देशाने त्याने दु:ख व वधस्तंभ सहन केला, मुक्तपणे व स्वच्छेने.
येशूने दोनदा सांगितले की तो ही घटका, व उद्देश यासाठी आला आहे. त्याने शिष्यांस सांगितले,
“आता माझा जीव व्याकुळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे” (योहान 12:27).
पुन्हां, तो जेव्हां रोमी सुभेदार, पंत पिलातासमोर उभा राहिला, तेव्हां तो म्हणाला, “मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे” (योहान 18:37).
ख्रिस्त स्वच्छेने वधस्तंभावर जाण्यास सैनिकांबरोबर गेला कारण त्याला ठाऊक होते की ह्या उद्देशासाठी तो जन्मला आहे — मनुष्याच्या पापासाठी दंड भरण्यास तो वधस्तंभावर मरण पावला. त्याची अटक ही अपघात किंवा चूकून झालेली घटना नव्हती. त्याला ठाऊक होते की हे सर्व त्याच्या जीवनात येणार आहे. “ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे” (योहान 12:27). “मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे” (योहान 18:37).
फटके खाण्यास व वधस्तंभावर जाण्यास, त्याच्या जीवनाकरिता देवाची योजनेच्या आज्ञापालनास्तव, ख्रिस्त स्वच्छेने सैनिकांबरोबर गेला. ख्रिस्त
“तर त्याने स्वत:ला रिक्त केले; म्हणजे मनुष्याच्या प्रतिरुपाचे होऊन दासाचे स्वरुप धारण केले; आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभाचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करुन त्याने स्वत:ला लीन केले” (फिलिप्पै 2:7-8).
“तो पुत्र असूनहि त्याने जे दु:ख सोसले तेणेकरुन तो आज्ञाधारकपणा शिकला; आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणा-या सर्वांचा युगानयुगीच्या तारणाचा कर्ता झाला” (इब्री. 5:8-9).
गेथशेमाने बागेत सैनिकांनी त्याला अटक केली तेव्हां, देव त्याचा पिता याच्या आज्ञेखातर, तो त्यांच्याबरोबर शांतपणे व कोणताहि विरोध न करता गेला.
“त्याचे हालहाल केले तरी ते त्यांने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडिले नाही; वधावयास नेत असलेल्या कोकरांप्रमाणे, लोकर कातरणा-यांपुढे गप्प राहणा-यां मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला; त्यांने आपले तोंड सुद्धा उघडिले नाही” (यशया 53:7).
त्यांनी त्याच्या मोलवान मस्तकावर काट्यांचा मुकुट घातला,
ते त्याच्यावर हसून म्हणाले, “हा पाहा राजा.”
त्यांनी त्याला मारिले व त्याला शिव्याशाप दिला,
त्याच्या पवित्र नावाची चेष्टा केली.
त्याने एकट्याने हे सर्वकांही दु:ख सहन केले.
जगाचा नाश व स्वत:ची सुटका करण्यास
त्याने दहा हजार देवदूतांना बोलाविले असते.
त्याने दहा हजार देवदूतांना बोलाविले असते,
परंतू तो एकटा मरण पावला, तुमच्या व माझ्यासाठी.
देव त्याचा पिता याच्या आज्ञेखातर, ख्रिस्त वधस्तंभावरील ह्या दु:खातून स्वच्छेने गेला. “वधावयास नेत असलेल्या कोकरांप्रमाणे” (यशया 53:7).
त्या रात्री “वधावयास नेत असलेल्या कोकरांप्रमाणे” ख्रिस्त त्या सैनिकांबरोबर गेला नसता तर काय झाले असते याचा विचार करा. त्याने भयंकर असा देवदूतांचा समुह बोलावून, वधस्तंभापासून आपली सुटका करुन घेतली असती तर? तुमचे अन् माझे काय झाले असते?
पहिले, आपल्या पापासाठी किंमत मोजावयासाठी वधस्तंभावर जाण्यास कोणीहि नसते. आपल्या पापाकरिता आपल्या बदली, मरण्यास कोणताच पर्याय नसता. त्यामुळे आपण भयंकर अशा परिस्थितीत सापडलो असतो. अनंत काळासाठी नरकाच्या घनदाट काळोखातील अगाध कुपात आपणांस स्वत: किंमत मोजावी लागली असती.
दुसरे, त्या रात्री “वधावयास नेत असलेल्या कोकरांप्रमाणे” ख्रिस्त त्या सैनिकांबरोबर गेला नसता, तर आपणांस आपण व आपला पवित्र व न्यायी देव यांच्यामध्ये मध्यस्ती करण्यास कोणी नसता. आपणांस न्याय समयी देवाला सामोरे जावे लागले असते व देवाकडे आपल्यासाठी कोणीहि मध्यस्त नसता,
“कारण एकच देव आहे आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्त आहे” (I तिमथी 2:5).
वधावयास नेत असलेल्या कोकरांप्रमाणे ख्रिस्त त्या सैनिकांबरोबर गेला नसता, तर आपणांस कोणीहि मध्यस्त नसता. दोन पक्षकारांमध्ये वाद मिटविण्यासाठी कोणीतरी मध्यस्ती करतो ते हे दर्शविते. येशू ख्रिस्त हा एकच मध्यस्ती आहे जो, देव व पाप्यांमध्ये शांति प्रस्थापित करितो. केवळ देव जो पुत्र देव जो बाप व पापी मनुष्य यांना एकत्र आणू शकतो. येशू त्या सैनिकांबरोबर वधस्तंभावर खिळण्यास गेला नसता, तर आपणांस पवित्र देवाच्या शांतीपूर्ण नातेसंबंधात आणण्यासाठी कोणीहि नसते.
तिसरे, “वधावयास नेत असलेल्या कोकरांप्रमाणे” ख्रिस्त त्या सैनिकांबरोबर गेला नसता तर आपण सार्वकालिक जीवनात प्रवेश करु शकलो नसतो. पवित्रशास्त्रातील सर्व परिचित वचन म्हणते,
“देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” (योहान 3:16).
ख्रिस्ताला अटक केली तेव्हां तो त्या सैनिकांबरोबर गेला नसता, तर योहान 3:16 खरे ठरले नसते, सार्वकालिक जीवन मिळण्याची आशा आपणांस नसते.
चौथे, “वधावयास नेत असलेल्या कोकरांप्रमाणे,” ख्रिस्त त्या सैनिकांबरोबर गेला नसता, तर वधस्तंभावर त्यांने जे रक्त सांडले ते दुस-या दिवशी तुम्हांसाठी उपलब्ध झाले नसते — तुम्हांस तुमच्या पापापासून शुद्ध करण्यास. त्याने देवाची अवज्ञा केली असती, आणि वधस्तंभापासबन सुटका करुन घेतली असती, तर तुमचे पाप धुण्यासाठी तुम्हांस वधस्तंभावरील रक्त नसते. परंतू त्या रात्री तुमची पातकें वधस्तंभावर खिळण्यासाठी, ख्रिस्त त्यांच्याबरोबर गेला. आणि प्रेषित पौल धैर्याने म्हणतो,
“ख्रिस्त येशूच्या, रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले” (रोमन 3:24-25).
तेथे एक रक्ताने भरलेला झरा आहे
इम्मानुएलच्या धमन्यातून काढलेले;
आणि त्या रक्ताच्या खाली पापी भिजले,
त्यांचे अपराधीपणाचे सर्व डाग निघाले.
(“देअर ज अ फौंटेन” विलियम काऊपर, 1731-1800).
तुम्ही ख्रिस्ताकडे येऊन त्याच्यावर विश्वास ठेवता काय? तो तुमच्या पापाबद्दल मोबदला देईल. देवाची कृपा तुमच्यावर करीत, तो तुमचा मध्यस्त होईल. तुम्हांला सार्वकालिक जीवन मिळेल. तुमची पापे देवाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात, ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने अनंतकाळासाठी धुऊन शुद्ध करण्यात येतील.
गेथशेमाने बागेत ज्या त्याला अटक करण्यात आली तेव्हां तो त्या सैनिकांबरोबर गेला व देव जो बाप याची आज्ञा येशूने पाळली म्हणून मी आनंदी आहे. तो अपमानीत होण्यास, तो दु:खसहनासाठी, आणि वधस्तंभावर जाण्यास त्यांच्याबरोबर गेला नसता, तर त्या मौल्यवान गोष्टीपैकी कांहीहि तुम्हांस मी देऊ शकलो नसतो.
दया येऊन त्याच्याकरिता रडण्यास नव्हे, तर कर्कश आवाज करणारी गर्दी जमविली.
अपमानाचा तो वधस्तंभ एकट्याने वाहिला.
“पूर्ण झाले आहे,” अशी आरोळी त्याने मारिली तेव्हा,
त्याने आपला प्राण त्यागला;
तारणाची अदभूत योजना पूर्ण केली.
जगाचा नाश व स्वत:ची सुटका करण्यास
त्याने दहा हजार देवदूतांना बोलाविले असते.
त्याने दहा हजार देवदूतांना बोलाविले असते,
परंतू तो एकटा मरण पावला, तुमच्या व माझ्यासाठी.
आता मी तुम्हांस विचारतो, ज्याने जगाचो पाप हरण केले त्या देवाच्या कोक-यांवर विश्वास ठेवता काय? बराच काळ तुम्ही त्यांस विरोध केला. पुष्कळ वेळा तुम्ही तारकाच्या विरुद्ध आपले अंत:करण कठीण केले. आजरात्री, तुम्ही त्यांस जन्म द्याल काय?
अहो, ज्यांनी त्याची थट्टा केली त्या क्रुर सैनिकांसारखे तुम्ही होऊ नका! ज्यांनी त्यांस नाकारले त्या मुख्य याजक, आणि जे त्याच्या तोंडावर थुंकले व त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे नाकारले त्या परुश्यांसारखे तुम्ही होऊ नका! मी कळकळीची विनंती करतो की अधिक काळ त्यांच्यासारखे राहू नका! तुम्ही त्यांच्यासारखे पुरेसा काळ, अगदी पुरेसा काळ होता! साध्या विश्वासाने तुमचे अंत:करण येशूला द्या. तुम्ही येशू, “देवाचा कोकरा, जो जगाचे पाप हरण करतो” त्यावर विश्वास ठेवता काय? (योहान 1:29).
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले: “टेन थावजंड एंजल्स”
(रे ओव्हरहॉल्ट, 1959).
“Ten Thousand Angels” (Ray Overholt, 1959).
रुपरेषा ख्रिस्ताला धरुन देणे व अटक करणे THE BETRAYAL AND ARREST OF CHRIST डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?” (मत्तय 26:53). (मत्तय 26:46; योहान 18:3, 2, 8; लुक 22:51) I. प्रथम, ख्रिस्त स्वत:ला वाचविण्यास हजारो देवदूतांना बोलावू शकला असता,
II. दुसरे, ख्रिस्त स्वच्छेने वधस्तंभावर गेला, लुक 18:31-33; योहान 12:27; 18:37; |