संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
रक्तासारखा घामTHE BLOODY SWEAT डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लॉस एंजिल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश “मग अत्यंत विव्हळ होऊन त्यांने आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हां रक्ताचे मोठेमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता” (लुक 22:44). |
हा उपदेश सी. एच. स्पर्जन यांच्या दोन उपदेशांवर आधारीत आहे, “बागेतील क्लेश” (18 ऑक्टोबर, 1874) आणि “गेथशेमाने” (8 फेब्रुवारी, 1863). प्रचारकाचा राजकुमार यांच्या ह्या दोन धर्मोपदेशांचा सारांश मी तुम्हांला देणार आहे. येथे मुळचे कांही नाही. आजच्या आधुनिक जगतातील कमी साहित्यिक समज असणा-या लोकांसाठी मी हे उपदेश सोप्या रितीने मांडले आहेत. हे जे विचार आहेत ते मी महान प्रचारकाच्या उपदेशातून घेतले आहेत, आणि तुमच्या अंत:करणाचा ठाव घ्यावा व तुमचे सार्वकालीक इच्छित स्थल बदलावे या आशेने स्पर्जन यांनी सादर केलेला गेथशेमाने बागेतील ख्रिस्त ते मी तुम्हांस प्रदर्शित करीत आहे.
येशूने आपल्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे रात्रीभोज केले आणि प्रभोजन साजरे केले. आणि मग तो त्यांच्याबरोबर गेथशेमाने बागेत गेला. दु:खाची सुरुवात होण्यास गेथशेमानेच का निवडली? कारण आदामाच्या पापाने आपणांस बागेतच, एदेन बागेत नष्ट केले होते; म्हणून शेवटल्या आदामासहि वाटले की त्यांस पुन:स्थापित दुस-या बागेत करावे, गेथशेमाने बागेत केले हे त्याचे कारण होते का?
ख्रिस्त वारंवार प्रार्थनेसाठी गेथशेमाने बागेत यायचा. हे असे ठिकाण होते की पूर्वी तो तेथे पुष्कळवेळा गेला होता. आपल्या पापाने त्याचे सर्वस्व दु:खात बदलून गेले याची आपणांस येशू जाणीव करुन देतो. ज्या ठिकाणी त्याने मनमुराद आनंद घेतला त्याच ठिकाणी त्याला मोठ्या दु:खसहनास बोलाविले.
किंवा त्यांने गेथशेमानेची निवड यासाठी केली असावी की त्यांस मागील प्रार्थनेचा समय आठवला जावा. हे असे ठिकाण होते की जेथे देवाने पुष्कळदा प्रार्थनेची उत्तर दिली होती. आता तो मोठ्या दु:खसहनात जातांना, कदाचित त्याला देवाने पुष्कळदा प्रार्थनेची उत्तर दिली होती त्या आठवणीची त्याला गरज वाटली असावी.
गेथशेमाने बागेत तो गेला याचे मुख्य कारण कदाचित तो तेथे प्रार्थनेस जाण्याची सवय, आणि हे सर्वांना ठाऊक होते हे असावे. योहान आपणांस सांगतो, “ही जागा त्याला धरुन देणा-या यहुदालाहि ठाऊक होती; कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे” (योहान 18:2). येशू मुद्दामहून तेथे गेला कारण त्याठिकाणी त्याला अटक होणार होती हे त्याला ठाऊक होते. त्याला फसविण्याची वेळ आली तेव्हां तो “वधावयास नेत असलेल्या कोकरांप्रमाणे गेला” (यशया 53:7). तो मुख्य याजकाच्या सैनिकांपासून लपला नाही. त्याला चोर, किंवा गुप्तहेर यांसारखे शोधण्याची गरज नव्हती. तो देशद्रोह्यांना सहज सापडावा व शत्रूने त्याला अटक करावी म्हणून तो स्वच्छेने त्या ठिकाणी गेला.
आता आपण गेथशेमाने बागेत प्रवेश करीत आहोत. किती अंधकारमय व भयंकर अशी ही रात्र आहे. याकोबाप्रमाणे आपणणहि म्हणू की, “हे किती भयप्रद स्थल आहे!” (उत्पत्ती 28:17). गेथशेमानेवर मनन करतांना, आपण ख्रिस्ताच्या दु:खाचा विचार करु, आणि बागेतील त्याच्या दु:खासंबंधी तीन प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करु.
I. प्रथम, गेथशेमानेतील ख्रिस्ताच्या वेदनेचे व दु:खाचे कारण काय होते?
शास्त्रलेख आपणांस सांगतो की “क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित” येशू होता (यशया 53:3), परंतू तो निराशाग्रस्त व्यक्ति नव्हता. त्याच्याजवळ अशी मोठी शांति होती त्यामुळे तो म्हणतो, “मी आपली शांति तुम्हांस देतो” (योहान 14:27). येशू शांती असलेला, सुखी मनुष्य होता असे मी म्हटल्यास वावगे ठरु नये.
परंतू गेथशेमानेत सर्वकांही बदलेले. त्याची शांति गेली. त्याचा आनंद दु:खात बदलला. उंच डोंगराळ प्रदेश खाली, किद्रोन ओहळाच्या पलीकडे यरुशलेमेपासून, बेथशेमानेकडे जातो, जेथे तारकाने प्रार्थना केली व आनंदाने संभाषण केले (योहान 15-17).
“हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला; तेथे बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले” (योहान 18:1).
येशू त्याच्या संपूर्णजीवनात आपले दु:ख व निराशा याविषयी क्वचितच बोलला असेल. परंतू आता, गेथशेमानेत प्रवेश केल्यावर, सर्वकांही बदलेले. त्यांने प्रार्थना केली, “होईल तर हा प्याला माझ्यावरुन टळून जावो” (मत्तय 26:39). त्याच्या संपूर्णजीवनात, येशूने आपले दु:ख व निराशा याविषयी क्वचितच ब्र शब्द काढला असेल, तरीहि येथे तो उसासा टाकतोय, रक्तासारखा घाम गाळतोय, आणि म्हणतोय, “माझा जीव मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे’” (मत्तय 26:38). प्रभू येशू, तुला काय झाले, की इतके तूं खिन्न व्हावेस?
हे स्पष्ट आहे की त्याचे दु:ख व निराश याचे कारण शाररिक वेदना हे नव्हते. येशूने पूर्वी कधीहि कुठल्याहि शाररिक समस्येसंबंधी तक्रार केली नव्हती. त्याचा मित्र लाजारस मेला तेव्हां त्याला दु:ख झाले होते. त्यांने नशा केली आहे, व तो भूताच्या साहाय्याने भूत काढतो असा आरोप त्याच्या विरोधकांनी केला तेव्हां त्याला निश्चितच दु:ख झाले असणार. परंतू ह्या सर्वात तो धाडसाने सामोरा गेला व त्यातून पारहि गेला. त्याच्या पाठीमागे ते होते. तेथे वेदनेहून तीक्ष्ण, निर्भत्सनेहून कापणारे, शोकाहून भयंकर असे कांहीतरी होते, ज्याने आता तारणा-यांस पकडले होते, आणि त्यांस “अति खिन्न, व कष्टी केले” (मत्तय 26:37).
तुम्हांला असे वाटते का ती मरणाची भीति, आणि वधस्तंभावर खिळण्याची भीति होती? पुष्कळ शहिदानी आपल्या विश्वासाखातर धैर्याने मरण पत्करले. त्यांच्यापेक्षा ख्रिस्ताकडे धाडस कमी होते असा विचार करणे हा त्याचा अपमान ठरेल. त्याच्या ज्या शहिद शिष्यांनी मरण पत्करले त्यांच्यापेक्षा आपल्या प्रभूने नक्कीच कमी विचार केला नसेल! तसेच, पवित्रशास्त्र म्हणते, “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्यांने लज्जा तुच्छ मानून...” (इब्री 12:2). येशूपेक्षा इतर कोणीहि मरणाच्या अधिक समजू शकत नाही. बागेतील त्याच्या दु:खाचे हे कारण असू शकत नव्हते.
तसेच, गेथशेमानेतील दु:ख हे सैतानाकडून अनैसर्गिक होते असे मला वाटत नाही. त्याच्या सेवेच्या आरंभी, ख्रिस्त अरण्यात असतांना त्यांने सैतानाशी मोठा संघर्ष केला. तरीहि आपण येशू अरण्यात “दु:खात होता” असे वाचीत नाही. त्या अरण्यातील परिक्षेत गेथशेमानेतील रक्तासारख्या थेंबासारखे कांही नव्हते. देवदूतांचा प्रभू सैतानाच्या समोर उभा राहिला तेव्हां, तो ओरडला व रडला नाही, किंवा जमीनीवर पालथे पडून पित्याकडे विनवणी केली नाही. ह्याच्याशी तुलना करता, ख्रिस्ताचा सैतानाशी संघर्ष सोपा होता. परंतू गेथशेमानेतील ह्या दु:खाने त्याच्या आत्म्याला घायाळ केले व जवळजवळ त्याला ठार मारले.
मग, त्याच्या दु:खाचे कारण काय होते? जेव्हां देवाने त्यांस आम्हांकरिता दु:खात लोटले. आता येशूला पित्याच्या हातून विशिष्ठ प्याला घ्यायचा होता. तो त्याला घाबरला. ते दु:ख शारसरिक वेदनेपेक्षा अधिक भयानक होते हे निश्चित समजा, तेव्हांपासून तो घाबरला नाही. तोक त्याच्यार रागावणे यापेक्षा ते वाईट होते — ज्यांच्यापासून तो माघारी हटला नाही. हे सैतानाच्या परिक्षेपेक्षा अधिक भयंकर होते — ज्याच्यावर त्यांने विजय मिळविला. ते खचितच भयंकर, अगदी भयावह असे होते — जे त्याच्यावर देवपित्यापासून आले होते.
हे त्या दु:खाचे कारण होते अशा सर्व शंका हे काढून टाकते:
“आम्हां सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादले” (यशया 53:6).
आता तो पाप्यांवर आलेला शाप सहनकरीत होता. तो पाप्यांच्या जागी उभा राहिला व दु:खसहन केले. त्या दु: खाचे गुपित हे होते जे पूर्णपणे मला स्पष्ट करता येत नाही. कोणतेही मानवी मन हे त्याचे दु:ख पूर्णपणे समजू शकत नाही.
हे देवाला, आणि केवळ देवाला,
त्याचे हे दु:ख पूर्ण माहित आहे.
(“दाय अननोन सफरिंग्ज” जोसेफ हार्ट, 1712-1768).
देवाचा कोकरां त्याच्या देहात मनुष्यजातीचे पाप सहन करतो, तसेच आपल्या पापाचे ओझे त्याच्या जीवावर लादले आहे.
“त्यांने स्वत: तुमची आमची पापें स्वदेही वाहून खांबावर ‘नेली’; ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे, त्याला बसलेल्या मारांने तुम्ही निरोगी झाला आहां” (I पेत्र 2:24).
गेथशेमाने येथे आपली सर्व पापे “त्याच्या स्वत:च्या देहांत” लादली, आणि दुस-या दिवशी वधस्तंभावर आपली पापे सहन केली असा माझा विश्वास आहे.
त्या बागेत ख्रिस्ताला पूर्ण कळले होते की त्या पाप-सहन करणारा व्हायचे होते. तो बलीदानाचा कोकरां झाला, आपल्या मस्तकावर इस्त्राएलचे पाप घेऊन, सहन करुन आणि पापार्पण करुन, तंबूबाहेर नेले आणि अगदी देवाच्या क्रोधाचा अग्नी त्यांने सहन केला. आता तुम्ही पाहता की ख्रिस्त ह्यापासून मागे का हटला? आपल्या सारख्या पाप्यांच्या जागी देवासमोर उभे राहणे हे अगदी धोकादायक होते — ल्युथरने असे म्हणायला हवे होते, जगातील सर्व पाप्यांच्या जागी तो असलेला देवाने त्याला पाहावे. आता तो देवाचा सर्व द्वेष व राग याचे केंद्र झाले होते. जो न्याय मनुष्यजातीवर येणार होता तो स्वत: त्यांने सहन केला. अशा प्रसंगातून जाणे ख्रिस्ताला खूप भयंकर त्रासदायक झाले असणार.
तसेच, आणखी, त्या बागेत पापाचा दंड सुद्धा त्याच्यावर येण्यास सुरुवात झाली. प्रथम, त्याच्यावर पाप लादले, आणि मग त्या पापाचा दंड. मनुष्याच्या पापाकरिता जो देवाचा न्याय दिला त्याचे दु:ख साधेसुदे नव्हते. आपल्या प्रभूने जे भयंकर दु:ख सहन केले त्यास मी कधीच घाबरलो नाही. त्यांने जो प्याला प्यायला त्यात संपूर्ण नरक ओतला होता.
तारकाच्या अत:करणावर जे दु:ख आले होते, अर्पणाच्या मृत्यूत यातनेचा न सांगता येणारा अगाध सागर जो त्याच्या अत:करणावर आदळला, तो इतका न पटणारा आहे की मला दूर जाता कामा नये, किंवा न सांगता येणारी गोष्ट मी सांगतोय असा कोणीतरी माझ्यावर आरोप करतील. परंतू मी असे म्हणेन, मानवी पापाचा खोल वादळी फवारा, जो ख्रिस्तावर पडला, त्याने रक्तासारख्या घामाने त्यांस बाप्तिस्मा केला. त्यांने कधीहि पाप केले नाही तरी, त्याला पाप्यासारखे वागविले, पाप्यासारखे दंडीत केले — हे ते दु:खाचे कारण होते ज्याविषयी आपला हा उतारा बोलतो.
“मग अत्यंत विव्हळ होऊन त्यांने आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हां रक्ताचे मोठेमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता” (लुक 22:44).
आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया.
II. दुसरे, ख्रिस्ताच्या रक्तासारख्या घामाचा अर्थ काय होता?
एलिकोट आपणास सांगतात की रक्तासारख्या घामाचे सत्य हे “सर्वसाधारण मिळालेला दृष्टीकोन” आहे (चार्लस जॉन एलिकोट, संपूर्ण पवित्रशास्त्रावर समालोचन, आवृत्ती VI, पृष्ठ 351). “‘रक्तासारखा घाम’ अगदी ह्या संज्ञेकडेनिर्देशित करतात जे अरिस्टोटल मध्ये खूप मोठे श्रम झाल्याचे नमुद केले [होते]” (ibid). ऑगस्टीन पासून सध्याच्या पुष्कळ समालोचक “जसा तो होता” तसा दर्शवितात की ते खरंच रक्त होते. आपणहि असाच विश्वास ठेवतो की ख्रिस्ताला रक्तासारखा घाम आला. जरी हे असामान्य असले तरी, इतिहासात त्याचा इतर लोकांनाहि वेगवेगळ्या कालखंडात अनुभव आला आहे. गलेनच्या जुन्या वैद्यकीय पुस्तकांत, आणि कांही सध्याच्या तारखेला, अशा नोंदी आढळल्या आहेत की खूप मोठ्या अशक्तपणामध्ये रक्तासारखा घाम येतो.
पंरतू ख्रिस्ताला रक्तासारखा घाम येणे हे मात्र अद्वितीय आहे. त्याला केवळ रक्तासारखा आला नाही, तर रक्ताचे मोठे थेंब किंवा “गाठ,” मोठा, जाडसर थेंब. हे कुठल्याहि बाबतीत पाहायला मिळत नाही. आजारी व्यक्तीच्या घामामध्ये थोड्याप्माणात रक्त आढळते, परंतू मोठे थेंब कधीहि आढळत नाहीत. मग आपणांस सांगितले जाते की त्याचे हे रक्ताचे थेंब त्याच्या कपड्यात मुरले नाहीत, तर ते “खाली जमीनीवर पडले.” वैद्यकीय इतिहासात असा केवळ ख्रिस्तच आहे. त्याची प्रकृती चांगली होती, तेहतीस वर्षाचा मनुष्य होता. परंतू अखिल मानवाच्या पापाच्या ओझ्याचा दबाव त्याच्या मानसिकतेवर आल्याने, त्याची सर्व शक्ती पिळवटून एक मोठी अनैसर्गिक भावना निर्माण होऊन छिद्रे उघडली व मोठे रक्ताचे थेंब जमीनीवर पडले. त्याच्या पापाचे ओझे किती मोठे होते हे ते दर्शविते. त्याच्या शरीरातून रक्त बाहेर येईपर्यंत तारणा-यांस पिळून काढले.
ख्रिस्ताच्या दु:खसहनाचा स्वयंसिद्ध स्वभाव सिद्ध होतो, कुठल्याहि चाकूविना रक्त वाहू लागले. वैद्यकीय तज्ञ सांगतात की व्यक्ति जेव्हां भयंकर घाबरलेला असतो तेव्हां, रक्त ह्दयाकडे जोराने पळते. गाल फिके पडतात; चेहरा निस्तेज होतो; रक्त आतल्या दिशेने वाहू लागते. पण आपला तारणारा किती दु:खात आहे पाहा. तो स्वत:ला इतका विसरला की, पोषणासाठी रक्त आतल्या दिशेने जाण्याऐवजी, बाहेर येऊन खाली जमीनीवर पडू लागले. त्याचे रक्त जमीनीवर पडणे हे दर्शविते की तारणाचे पूर्णत्व तुम्हांस मोफत देऊ केले आहे. त्याच्या शरीरातून रक्त वाहिले यासाठी की, तुम्ही जेव्हां येशूवर विश्वास ठेवता तेव्हां तुमची पापे मोफत धुतली जावीत.
“मग अत्यंत विव्हळ होऊन त्यांने आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हां रक्ताचे मोठेमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता” (लुक 22:44).
त्याच्या अंत:करणातील विव्हळपणामुळे रक्तासारखा घाम आला. अंत:करणातील वेदना ह्या खूप वाईट असतात. दु:ख व निराशा हे सर्वात अंधकारलेले दु:ख होय. ज्यांनी खोल निराशेचा अनुभव घेतला आहे ते खरे सांगतील. मत्तयमध्ये आपण वाचते की तो “खिन्न व अति कष्टी झाला” (मत्तय 26:37). “अति कष्टी” – यात सर्वकांही अर्थ आहे. हे मन पूर्णत: दु:खाने भरले आहे हे दर्शविते, तेथे दुसरा कोणताहि विचार नसतो. आपले पाप सहन करतांना त्याचे मन खिन्न झाले आहे. तो मानसिक जाचाच्या समुद्रावर वर खाली केला जात होता. “तरी त्यांस ताडण केलेले; देवाने त्यावर प्रहार केलेले, त्याला पीडिलेले असे आम्ही त्याला लेखिले” (यशया 53:4). “त्याच्या जिवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल” (यशया 53: 11). त्याचे ह्दय त्यांस अपयशी ठरले. तो भीतीने व दहशतीने भरला होता. तो “अति कष्टी” झाला होता. शिक्षीत प्युरिटन थॉमस गुडविन म्हणाले, “हा शब्द अपयश, कमतरता, आणि आत्म्याचे बुडणे दर्शवितो, जसे की आजारी व अत्यंत भावनाग्रस्त स्थितीत होते.” भयंकर आजार जो माणसाला मृत्यूच्या जवळ आणतो, त्याला त्याच शब्दाने संबोधतात. त्यामुळे, आपण पाहतो की ख्रिस्ताचा जीव आजारी व निस्तेज झाला होता. अति श्रमामुळे घाम आला होता. माणसाला मारणारा थंड, शांत घाम त्याच्या अशक्त शरीरातून येतो. परंतू येशूचा रक्तासारखा घाम हा आपल्या पापाच्या भारामुळे, त्याच्या जिवाच्या आंतरिक मरणातून आला होता. त्याला भयंकर जिवास—मुर्च्छा आली होती आणि त्याचे संपूर्ण शरीर रक्ताश्रू गाळीत, आंतरिक मरणातून गेली. तो “अति कष्टी” झाला.
मार्ककृत शुभवर्तमान आपणाला सांगते की, तो “व्याकुळ व अस्वस्थ” झाला (मार्क 14:33). ग्रीक शब्द ज्याचा अर्थ असा की त्याच्या अस्वस्थपणाने कमालीची भीति आली, जसे जेव्हां भीतीने मनुष्याचे केस उभे राहतात व शरीर थरथरु लागते. मोशेने दिलेले नियमशास्त्र सांगते भीत व थरथर कापत त्याच्याकडे जा, त्यामुळे त्याजवर लादलेल्या पापाने परमेश्वराने त्यांस हादरविले.
तारणारा प्रथम दु:खी, मग निराश, आणि शेवटी तो “व्याकुळ व अस्वस्थ” झाला. तो दु:खी व अस्वस्थ झाला. जेव्हां खरेच तो आपले पाप सहन करीत होता, तेव्हां तो आश्चर्यचकीत झाला व त्याला देवासमोर पापी लोकांच्या बदली उभे करण्यात आले. तो एक पाप्यांचा प्रतिनिधी म्हणून देव त्याला पाहतोय तेव्हां त्याला आश्चर्य वाटले. देवाने त्याला सोडण्याच्या विचाराने त्याला आश्चर्य वाटले. त्याचा पवित्र, ताजेतवाणा, प्रेमळ स्वभाव, त्याने अडखळविला आणि तो “दु:खी व अस्वस्थ” आणि “अति कष्टी” झाला.
आपणांस आणखी सांगितले की तो म्हणाला, “माझा जीव मरणप्राय, अति खिन्न झाला आहे” (मत्तय 26:38). ग्रीक शब्द “पेरिलुपोस” म्हणजे चारी बाजूने दु:खाने वेढलेला. साधारण दु:खात सुटण्याची संधी असते, थोडासा श्वास घेण्यास जागा असते. आपण साधारणपणे ज्यांची जाचाची स्थिती भयावह आहे अशांबद्दल बोलतो. परंतू येथे येशूच्या बाबतीत भयावह स्थितीची सुद्धा कल्पना करु शकत नाही, तारण तो दाविदाला म्हणे, मला अधोलोकाच्या यातना झाल्या” (स्तोत्र 116:3). देवाचा सर्व क्रोध व शाप त्याच्यावर आला. त्याच्या वर, त्याच्या आत, त्याच्या भोवती, त्याच्या बाहेर, त्याच्या अंतर्गत, सर्व, सर्व यातना होत्या आणि त्याच्या ह्या दु:खातून व यातनेतून सुटण्याची शक्यता नाही. ख्रिस्ताच्या दु:खापेक्षा दुसरे कोणतेहि दु:ख मोठे नाही, व तो म्हणाला, “माझा जीव दु:खाने भरला आहे,” दु:खाने वेष्टिले आहे, “मरणप्राय झाले” — मृत्यूच्या दाराशी आला आहे!
तो गेथशेमाने बागेत मेला नाही, परंतू तो मेला असता एवढे दु:ख त्यांने भोगले. त्याचे कष्ट व यातना मृत्यूच्या दाराशी घऊन गेले — आणि मग थांबला.
अशा आंतरिक दबावाने आपल्या प्रभूचे मोठे रक्ताचे थेंब पडले याचे मला नवल वाटले नाही. मानवी समज बुद्धीच्या दृष्टिने मला जेवढे शक्य तेवढे मी स्पष्ट केले आहे.
हे देवाला, आणि केवळ देवाला,
त्याचे हे दु:ख पूर्ण माहित आहे.
“मग अत्यंत विव्हळ होऊन त्यांने आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हां रक्ताचे मोठेमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता” (लुक 22:44).
III. तिसरे, ख्रिस्त ह्या सर्वातून का गेला?
मला खातरी आहे की पुष्कळांना प्रश्न पडला असेल की का ख्रिस्त इतक्या क्लेशातून गेला व असे रक्ताचे थेंब का पडले. ते म्हणतील, “मला माहित आहे की तो ह्या सर्वांतून गेला, परंतू तो ह्या सर्वांतून त्याला का जावे लागले हे मला समजले नाही.” गेथशेमाने बागेत येशूला ह्या सर्वांतून जावे लागले याची पाच कारणे मी देईन.
1. पहिले, आपणांस खरी मानवता दाखविण्यासाठी. तो निश्चितपणे देव होता, तरी त्यांस केवळ देव समजू नका, परंतू त्यांस तुमच्या जवळचा, तुमच्या हाडातले हाड, तुमच्या मांसातले मांस समजा. तो तुम्हांला सहानभूती कशी दाखवू शकतो! तो तुमचे सर्व ओझ्यानी वाकला आहे आणि तुमच्या दु:खानी कष्टी झाला आहे. तुमच्याशी असे कांहीहि घडत नाही जे येशूला समजत नाही. त्याचमुळे तो तुम्हांला सर्व परिक्षेतून तारुन नेतो. येशूला आपला एक मित्र म्हणून धरा. तो तुम्हांला सांत्वना देईल की तो तुम्हांला तुमच्या सर्व त्रासातून पार नेईल.
2. दुसरे, त्याचा बागेतील अनुभव पापाची दुष्टता दर्शवितो. तुमच्याप्रमाणे, येशू कधीहि पापी नव्हता. अहो पाप्यांनो, तुमचे पाप भीषण असणार कारण त्यामुळे ख्रिस्ताला यातना भोगाव्या लागल्या. आपल्या मूलत:च्या पापामुळे त्याला रक्तासारखा घाम आला.
3. तिसरे, बागेतील त्याच्या परिक्षेचा काळ त्याचे आपल्यावरील प्रेम दर्शविते. आपल्या जागी त्याने पापी बनून भयंकर दु:ख भोगले. आपल्या ऐवजी त्याला दु:ख भोगण्यासाठी, आपल्या पापाचा दंड भरण्यासाठी आपण त्याला आपलेसे केले. आपल्यावर एवढे प्रेम करण्यासाठी आपणहि त्याच्यावर भरपूर प्रेम केले पाहिजे.
4. चौथे, बागेतील येशूकडे पाहा व त्याच्या प्राय:श्चिताचा मोठेपणा समजून घ्या. मी किती काळा आहे, देवाच्या दृष्टीत मी किती ओंगळ आहे. मी केवळ नरकात टाकण्यास पात्र आहे असे मला वाटते. देवाने मला तेथे टाकले नाही याचे मला आश्चर्य वाटले. परंतू मी गेथशेमानेत जातो, आणि त्या जैतूनाच्या खाली पाहतो, आणि माझ्या तारकास पाहतो. होय, मी त्याला जाचामुळे जमीनीवर लोळतानां पाहतोय, आणि मी त्याला विव्हळतांना ऐकतोय. मी भोवतालच्या जमीनीवर पाहतो आणि मला त्याचे लाल रक्त दिसते, तसेच त्याचा चेहरा भयानक घामाने सुस्त झालेला दिसतो. मी त्याला म्हणतो, “तारका, तुला काय झाले?” मी त्याचे उत्तर ऐकतो, “मी हे तुझ्या पापासाठी दु:खसहन करतोय.” आणि मला कळून आले की केवळ माझ्याकरिता केलेल्या बलिदानाद्वारे द्व मला पापक्षमा देऊ शकतो. येशूकडे या व त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्या रक्ताने तुमच्या पापाची क्षमा होते.
5. पाचवे, जे त्याच्या प्राय:श्चिताच्या रक्ताला नाकारतील त्यांच्यावर दंडाचे संकट येईल याचा विचार करा. विचार करा की तुम्ही त्याला नाकाराल तर एके दिवशी तुम्हांला पवित्र देवासमोर उभे राहावे लागेल व तुमच्या पापाबद्दल तुमचा न्याय करण्याच येईल. मी तुम्हांला सांगतो, माझ्या अंत:करणातील वेदनेसह मी सांगतो की, तारणा-या, येशू ख्रिस्तास तुम्ही नाकाराल तर तुमचे काय होईल. बागेत नव्हे, तर अंथरुणात, तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल आणि मृत्यू विजय मिळवेल. तुम्ही मराल आणि तुमचा आत्मा न्यायासाठी नेला जाईल व नरकात पाठवला जाईल. गेथशेमाने तुम्हांला चेतावणी देवो. त्याचे विव्हळणे व अश्रू आणि रक्तासारखा घाम तुम्हांस तुमच्या पापासाठी पश्चाताप करण्यास लावो आणि येशूवर विश्वास ठेवण्यास भाग पाडो. त्याच्याकडे या. त्याच्यावर विश्वास ठेवा. तो मरणातून उठला आहे व जीवंत आहे, स्वर्गात देवाच्या उजवीकडे बसला आहे. खूप उशीर होण्यापूर्वी, आताच त्याच्याकडे या आणि क्षमा मिळवा. आमेन.
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यांनी गायले: “दाय अननोन सफरिंग्ज” (जोसेफ हार्ट, यांच्या द्वारा, 1712-1768).
“Thine Unknown Sufferings” (by Joseph Hart, 1712-1768).
रुपरेषा रक्तासारखा घाम THE BLOODY SWEAT डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “मग अत्यंत विव्हळ होऊन त्यांने आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हां रक्ताचे मोठेमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता” (लुक 22:44). (योहान 18:2; यशया 53:7; उत्पत्ती 28:17)
I. प्रथम, गेथशेमानेतील ख्रिस्ताच्या वेदनेचे व दु:खाचे कारण काय होते? यशया 53:3;
II. दुसरे, ख्रिस्ताच्या रक्तासारख्या घामाचा अर्थ काय होता? लुक 22:44; मत्तय 26:37;
III. तिसरे, ह्या सर्वांतून ख्रिस्त का गेला? I पेत्र 2:21; II तिमथी 3:12; 2:3;
|