संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
लढाऊ ख्रिस्ती होण्याचे धाडस करणे!DARE TO BE A FIGHTING CHRISTIAN! डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लॉस एंजिल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश |
मी जागतिक मासिकामध्ये नुकताच एक मजेशीर लेख वाचला. एक चीनी विद्यार्थी जो अमेरिकेत शिकतांना ख्रिस्ती बनला, आणि त्यांच्यातील कित्येक चीनला परत जातात तेव्हां ते गृह मंडळ्यांत कसे मावत नाहीत त्यासंबंधी. एक मुलगी जी ख्रिस्ती बनली व आपल्या देशात परत गेली तिला तेथे जी समस्या भेडसावत होती ती सांगितली. ती म्हणाली, “मी एका गृह मंडळीस भेट द्यावयास गेले. परंतू त्यांना माझा अनुभव सांगणे खूप कठीण होते. त्याच्याशी त्यांना संबंध नव्हता. मला खूप एकाकी व डोईजड झाले.” तो लेख तिचा अनुभव हा वैशिष्टपूर्ण होता असे सांगत होता. पुष्कळ जे अमेरिकेत ख्रिस्ती झाले त्यांना जे आढळले ते म्हणजे — कौटुंबिक ताण, कामाचे वेळापत्रक, आणि वेगळी वैशिष्ठपूर्ण संस्कृती त्यासाठी ते अपरिपक्व होते. “दोन वर्षानंतर 80% विद्यार्थी ख्रिस्ती झाले ते मंडळीस येत नव्हते” (वर्ल्ड, मॅगेजिन, 30 सप्टेंबर, 2017, पृष्ठ 48). “त्यांच्या अपेक्षांचा चुराडा झाला जेव्हां ते चीनी मंडळ्यात गेले — कांहीजण वातानुकुल किंवा मंडळीची इमारती शिवाय — जेथे कुणीहि त्यांची गरज भागविली नाही.”
त्याचवेळी चीनमधील पाळकांना असे आढळले की ह्या परतलेल्या तरुणांनी मंडळीच्या अधिका-यांच्या विरुद्ध तक्रार केली व त्यांना आव्हान दिले आहे. ते अमेरिकेत जशाप्रकारच्या मंडळीत जायचे तशा चीनी गृहमंडळ्या असाव्यात असे त्यांना वाटायचे.
हे मला खूप मजेशीर वाटले कारण आम्ही आमच्या मंडळीत चीनी गृहमंडळ्या ह्या खूप वरच्या आहेत असे आम्हांला वाटते. हे चीनी ख्रिस्ती कमुनिष्टांच्या पुष्कळ वर्षाच्या छळातून वाचले आहेत. तसेच ब-याच चीनी गृहमंडळ्यांमध्ये संजीवन आलेले आहेत. अमेरिकेतील मंडळ्यातील मुले चीनी गृहमंडळ्यांतील मुलांप्रमाणे गंभीर-वृत्ती व संजीवन –वृत्तीवर प्रेम करणारे असले पाहिजेत असे आमच्या मंडळीस वाटते! परंतू नाही, अमेरिकन नवे ख्रिस्ती चीनी गृहमंडळ्यातील मुलांच्या आवेशास “जुळवून घेऊ शकत” नाहीत! “दोन वर्षानंतर 80% हे अमेरिकन नवे ख्रिस्ती मंडळीत राहत नाहीत!”
का? वातानुकुलीत नाही! बिचारा बाळ! चांगली इमारत नाही! कोणीहि त्यांच्या गरजा भागवित नाहीत! अरे मी! अरे मी! बिचारी बाळें! राष्ट्र संघातील नव्या ख्रिस्ती कडे जे असते — ते सर्व मिळावे असे वाटते! आम्ही तक्रार करतो! राष्ट्र संघातील बिघडलेल्या नव्या ख्रिस्ती प्रमाणे — आम्ही मंडळीच्या अधिकारी पुढ्या-यांना आव्हान देतो! आपणाला गंभीर प्रार्थना सभेत रस नसतो! त्यांनी एवढी प्रार्थना — आणि एवढ्या मोठ्यांने का करावी! त्यांनी एवढा कठीण, — आणि एवढ्या मोठ्यांने प्रचार का करावा? अमेरिकेत जसे छान छोटे पवित्रशास्त्र दिले जाते तसे ते का देत नाहीत?
अमेरिकेत-प्रशिक्षित-झालेल्या चीनी नव्या ख्रिस्तीजणांना काय झाले? अमेरिकेतून चीनला परतलेल्या नव्या ख्रिस्तीजणांना काय झाले येथे जागतिक मासिकामध्ये काय सांगितले ते पाहा—त्यातील 10 पैकी 8 जणांना स्पष्टपणे सुवार्ता सांगितलेली नाही! 10 पैकी 8 जणांना सुवार्ता माहित नाही! ते अमेरिकी ख्रिस्तीप्रमाणे परिवर्तित झालेले नव्हते! ही मुख्य गोष्ट आहे जी अमेरिकी नव्या ख्रिस्तीजणांबरोबर घडली आहे. 10 पैकी 8 जण खरे ख्रिस्ती नाहीत! चीनी गृहमंडळ्यांत खरा ख्रिस्तीपणा आवडत नाही याचे आश्चर्य नाही! दुसरे, त्यांचा देवाशी वैयक्तिक नातेसंबंध नाही, केवळ मंडळीच्या दुस-या सभासदाबरोबर आहे. केवळ मित्रत्वासाठी तुम्ही मंडळीस जात असाल तर, तुमचा जास्त काळ निभाव नाही! तुमचा ख्रिस्ताबरोबर वैयक्तिक नातेसंबंध नाही तर, तुम्ही लवकर किंवा थोड्याच दिवसात मंडळी सोडणार! तिसरे, त्यांना मंडळीत देवाची सेवा करण्यास शिकविले नाही. दुस-या लोकांची सेवा व ख्रिस्ताकरिता इतरांना जिंकणे याच्याशिवाय त्यांना काळजी घ्यावेसे वाटते!
हे सर्व काय दर्शविते तर उद्देशाचे अपयश, अमेरिकी नव्या ख्रिस्तीजणांचे तरुणांचे खरे परिवर्तन करणे व ख्रिस्ताकरिता कार्य करण्याची आवड यासंबंधीचे, अगदी निव्वळ अपयश! आपणास हे अगोदरच ठाऊक होते, नाही का? अमेरिकी नवे ख्रिस्ती म्हणतात, “मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे, मला कांही उणे नाही असे तूं म्हणतोस; पण तूं कष्टी, दीन, दरिद्री, आधंळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही...पण तूं तसा नाहीस, कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे” (प्रकटीकरण 3:17, 16). ख्रिस्त ह्या गर्विष्ट व अमेरिकी झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणतो, “मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे!” (अगदी). आणि ते आपणास दानिएलच्या पुस्तकातील चार तरुणांकडे नेते. दानिएल, शद्रख, मेशख व अबीद्नेगो हे घरापासून 1,500 मैल दूर होते. हे तरुण केवळ किशोरवयीन होते, घरापासून दूर, बाबेलच्या मूर्तीपूजक नगरात. ते चीनला परतलेल्या अशक्त तरुणासारखे होते का?
हे चार तरुण केवळ पकडून नेलेले इब्री मुले नव्हती. दानिएल 1:3 पाहा. स्कोफिल्ड स्टडी बायबलमध्ये ते पृष्ठ 898 वर आहे. मी ती वचनें वाचतांना कृपया उभे रहा.
“राजाने आपल्या खोजांचा नायक अश्पनज यांस आज्ञा केली की इस्त्राएली राजकुलापैकी व सरदार घराण्यापैकी तरुण पुरुष [तेथे इतर पुष्कळ होते] घेऊन यावे” (दानिएल 1:3).
आता 6 व्या वचनाकडे पहा.
“ह्या तरुण मंडळीत यहुदा वंशातले दानिएल, हनन्या, मीशाएल व अज-या हे होते” (दानिएल 1: 6).
तुम्ही खाली बसू शकता. बाबेलात बंदिवान म्हणून नेलेले इतरिह पुष्कळ तरुण होते हे वचनें दर्शवितात. परंतू हे तरुण पुरुष सर्वात चांगले होते. बाबेलचा राजा, नबुखद्नेसर याचा सल्लागार होण्यास ते तीन वर्षाचे प्रशिक्षण घेण्यास जाणार होते. दानिएल हा त्यापैकी होता व इतर तीन शद्रख, मेशख व अबीद्नेगो हे होते. ते सर्व खूप हुशार पुरुष होते, जे ज्ञानात, शास्त्रात, व भाषेत अग्रेसर होते.
परंतू ह्या चार मुलांविषयी आणखी कांही होते जे वेगळे होते. त्यांना राजाचे अन्न खाणे व त्याचा द्राक्षारस पिणे आवडत नव्हते. खाणे व पिणे यासंबंधाने त्यांना मोशेचा नियम पाळायचा आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी सुट घेतली असती. ह्या विधर्मी न्यायालयात ते देवासाठी कठीण अशी भूमिका घेत आहेत. 8 व्या वचनाकडे पहा. ते म्हणते, “राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस याचा आपणास होऊ देऊ नये असा दानिएलाने मनाचा निश्चय केला.” इतर तिघानेहि तसेच केले. त्यांनी देवासाठी कठीण भूमिका घेतली. तुम्ही पाहता की, त्यांना प्रशिक्षण देणारे हे केवळ राजाचे नोकर नव्हते. देव त्याच्यासाठी उभे राहण्यास व त्याच्यासाठी लाजू नये म्हणून स्वत: त्यांना प्रशिक्षण देत होता. प्रत्येक वेळी तुम्ही अन्न खाता त्यासाठी तुम्ही माथा टेकवता आणि धन्यवाद देता काय? जे ख्रिस्ती नाहीत अशांबरोबर असतांनाहि असे करता का? रेस्टारंट मध्ये गर्दीबरोबर असतांनाहि करता काय? मेजवाणी असतांना, तुम्ही नाताळच्या संध्येला मंडळीत असणार काय? का पापाच्या ठिकाणी जाण्यास मंडळी चुकविणार काय? नवीन वर्षाच्या संध्येला तुम्ही आमच्याबरोबर मंडळीत असणार काय? का तुम्ही मूर्तिपूजकांमध्ये मेजवाणीत असणार? त्या चार तरुणांनी केले तसे करण्यास विश्वास व धैर्य आवश्यक आहे! गीतामध्ये मी एक शब्द बदलेला आहे.
दानिएलासारखे होण्याचे धाडस करणे,
एकटेच उभे राहण्याचे धाडस!
एक निश्चय हेतू असण्याचे धाडस!
माहिती करुऩ घेण्याचे धाडस!
उभे राहा व गा!
दानिएलासारखे होण्याचे धाडस करणे,
एकटेच उभे राहण्याचे धाडस!
एक निश्चय हेतू असण्याचे धाडस!
माहिती करुऩ घेण्याचे धाडस!
तुम्ही खाली बसू शकता.
ती चार मुले अमेरिकेहून परतलेल्या त्या चीनी मुलांसारखे ज्यांना चीनमध्ये चांगल्या मंडळ्या हव्या असून अमेरिकेतील नवे ख्रिस्ती जसे मवाळ व तडजोडीचे ख्रिस्ती जीवन जगतात तसे त्यांना हवे वाटते तशी नाहीत. नाही! नाही! ती मुले कुणाला आवडो वा न आवडो देवाच्या आज्ञा पाळतात! तशा प्रकारच्या मुलांचा देव सन्मान करितो! त्यांने त्यांचा सन्मान केला व तो तुमचाहि सन्मान करील जर तुम्ही ह्या मुलांप्रमाणे गंभीर असाल!
आता ह्या मुलांनी आणखी एक परिक्षा दिली. त्यांनी अशुद्ध अन्न न खाऊन पहिली परिक्षा ते उत्तीर्ण झाले. म्हणून देवाने त्यांना आणकी एक परिक्षा दिली — प्रार्थनेची परिक्षा. राजाला एक स्वप्न पडले आणि त्याचा अर्थ त्याला जाणून घ्यावयाचा होता. परंतू त्याने त्याच्या ज्ञानी लोकांना स्वप्न काय होते ते सांगितले नाही. त्याचा अर्थ काय हे सांगण्यापूर्वी त्याने स्वप्न काय ते सांगावे अशी राजाने मागणी केली. त्यांनी जर ते सांगितले नाही तर त्यांचे तुकडे करण्यात येईल. राजा म्हणाला, “यास्तव स्वप्न व त्याचा अर्थ काय मला सांगा” (2:6). त्याने जी मागणी केली आहे ती कोणताहि मनुष्य पुरी करणार नाही. त्यामुळे राजा क्रोधाविष्ट झाला व त्यांने बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांचा नाश करण्याचा हुकुम सोडला. ही राजाज्ञा बाहेर पसरली आणि ती दानिएल व त्याच्या मित्रांना समजली जे इतर ज्ञानी लोकांच्यासह वधली जाणार होती. दानिएल राजाकडे गेला आणि त्याने आणखी थोडा वेळ देण्याची मागणी केली आणि मग त्यानंतर तो उत्तर सांगणार. दानिएलने काय केले? तो गेला आणि त्याला त्याचे तीन मित्र, शद्रख, मेशख व अबीद्नेगो मिळाले. आणि ह्या चार मित्रांनी प्रार्थना सभा घेतली. ह्याने जॉन, जॅक, नोहा व आरोन हे मला प्रार्थनेसाठी भेटले याची आठवण करुन दिली. स्वर्गीय देवाकडून त्यांनी दया मागितली. त्या गुप्त स्वप्न काय आहे हे सांगावे म्हणून प्रार्थना केली. दानिएल 2:19 पहा, “मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानिएलास प्रकट झाले; त्यावरुन दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला.” दानिएल 2: 23 पहा. दानिएल म्हणाला, “हे माझ्या पूर्वजाच्या देवा, मी तुझे उपकार मानितो व तुझे स्तवन करितो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत आणि ज्यासाठी आम्ही तुला विनविले ते तूं मला आता कळविले आहे; तूं आम्हांस राजाची गोष्ट कळविली आहे.” पहा. राजा म्हणाला, “मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगावयास तूं समर्थ आहेस काय?” दानिएल म्हणाला, “जे रहस्य तुम्हांला अपेक्षित आहे ते ज्ञानी यांस राजाला सांगता येणार नाही. ‘परंतू रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गात आहे आणि पुढचे रहस्य त्याने प्रकट केले आहे’...तुम्हांला पडलेले स्वप्न हे आहे व त्याचा अर्थ असा आहे.” मग दानिएल व त्याच्या तीन मित्रांनी राजाचे स्वप्न व त्याचा अर्थ काय हे सांगितले. आता वचन 47 पहा, “राजाने दानिएलास म्हटले, तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजाराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रगट करणारा देव आहे.” आता पहा. मग राजाने दानिएलास थोर पदास चढविले, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्यांस बाबेलच्या सर्व ज्ञान्याच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले. शद्रख, मेशख व अबीद्नेगो यांना सुद्धा मोठी पदे दिली, परंतू ह्या तरुण दानिएलास संपूर्ण बाबेल राज्याचा पंतप्रधान केले!
ती मुले देवाच्या राजाचे अशुद्ध अन्न व द्राक्षरस नाकारण्याच्या पहिल्या परिक्षेत पास झालीत. त्यांनी देवाला प्रथम स्थान दिले आणि उडत्या रंगानी पहिली परिक्षा पास झाली!
आता मुलांनी दुसरी परिक्षा पास केली. ते एकत्र आले व राजाचे स्वप्न प्रकट व्हावे म्हणून प्रार्थना केली. प्रार्थनेत ते देवावर अवलंबून राहिले व दुसरी परिक्षा सुद्धा उडत्या रंगानी पहिली परिक्षा पास झाले!
मी हे तुम्हांला दाखविण्यासाठी वेळ घेतला कारण हे खूप महत्वाचे आहे. कांही वेळा आपण असा विचार करतो की ख्रिस्ती म्हणून मोठ्या सामर्थ्यात उडी मारु शकतो. परंतू तुम्ही देवाबरोबर मोठ्या सामर्थ्यात “उडी” मारत नाही. तुम्ही त्यात वाढता. तुमचे तारण होते आणि मग तुम्ही वाढता! येशू म्हणाला,
“जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीहि विश्वासू आहे; आणि अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळांविषयीहि अन्यायी आहे” (लुक 16:10).
तुम्ही मंडळीतील नाताळ संध्या किंवा नवीन वर्षाची संध्यासारख्या लहानशा गोष्टीविषयी विश्वासू असाल, तर मग, तुम्ही पुष्कळांविषयी विश्वासू आहे!
ही मुले जे ते खात होते त्यात विश्वासू होते. ते त्यांची परिक्षा पास झाले. ते प्रार्थनेत देखील विश्वासू होते. त्यांनी ती परिक्षा सुद्धा पास केली.
त्यानंतर त्यांची मोठी परिक्षा होती. त्यांनी राजाच्या सुवर्ण मुर्तीला नमन व आरधना करावी काय, किवा नमन न करुन जिवंतपणी अग्नीच्या भट्टीत जळण्याचा धोका पत्करावा काय? ते छोटीशी परिक्षा पास झाले. त्यानंतर ते धैर्याने म्हणू शकले,
“ज्या देवाची आम्ही उपासना करितो तो आम्हांस धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवावयला समर्थ आहे, महाराज, तो आम्हांस आपल्या हातातून सोडवील” (दानिएल 3:17).
ते छोटीशी परिक्षा पास होऊन देव त्यांना अग्नीच्या भट्टीच्या मोठ्या परिक्षेतून सोडवितो हे शिकले!
तसेच ते गंभीरपणे केलेल्या प्रार्थनेमुळे राजाच्या मरणदंडापासून वाचले. नंतर, राजाने दानिएलास गर्जना करणा-या सिंहाच्या गुहेत टाकले तेव्हां, देवाने देवदूत पाठविले व सिंहांची तोंडे बंद केल्याने, दानिएल हा सुरक्षित होता! येशू हा अग्नीच्या भट्टीत होता व त्यांने त्यांना वाचविले. येशू तो देवदूत होता. दानिएलाला जेव्हां सिंहांच्या गुहेत टाकले तेव्हां येशू तेथे होता. सैतानाच्या विरुद्ध उभे राहण्यास त्याच्याकडे विश्वास होता. पवित्रशास्त्र म्हणते, “देवाला भेटण्याची तयारी करा.” तुमची तयारी नसेल तर, तुम्ही सैतानाच्या हाती पडाल आणि परमेश्वराला नाकाराल!
आता तुम्हांला उभे राहण्याचे व मोजण्यास सक्षम होण्याचे प्रशिक्षण द्यायला हवे. जसे दानिएलाने केले तसे. अग्नीतून सुटका व्हावी असे वाटते, तर तुम्ही तसे व्हायला हवे!
त्यामुळे तुम्ही आताप्रशिक्षणास सुरुवात केली पाहिजे! नंतर नाही, परंतू आता! तुम्ही अचानकपणे विश्वासाचा महान व्यक्ति होणार नाही! नाही, त्याला सराव हवा! माझी पत्नी, मिसेस हायमर्स विषयी डॉ. चान काय म्हणाले ते ऐका. डॉ. चान म्हणाले, “मिसेस हायमर्स ह्या एका रात्रीत महान ख्रिस्ती झाल्या नाहीत. देवाप्रती केलेल्या पुष्कळ वर्षाच्या सेवेद्वारा त्या प्रौढ झाल्या. त्यांनी तरुण असतांनाच मंडळीच्या सेवेकरिता झोकून दिले आणि मागे कांहीच राखून ठेवले नाही. त्यामुळे देवाने त्यांचा महानरित्या उपयोग करुन घेतला.” मंडळीकरिता सर्वोत्तम करण्याची सुरुवात वयाच्या 16 वर्षापासून केली. आता, खूप वर्षानंतर, त्या विश्वास महान अशा आहेत. तुमच्याकडे जे थोडे आहे त्याविषयी, आता जर तुम्ही गंभीर व विश्वासू नसाल तर, तुम्ही भविष्यात अचानकपणे आत्मे जिंकणारे व प्रार्थना योद्धे होणार नाही.
दानिएल आणि त्याच्या तीन मित्रांना जवळचा मार्ग नव्हता — आणि तुम्हांलाहि नाही. ख्रिस्तात प्रवेश करण्यासाठी आता तुम्हांला गंभीरपणे व आवेशाने प्रयत्न करण्यास आरंभ करा. आरंभीच आळशी राहाल तर, नंतर तुम्ही महान ख्रिस्ती होणार नाही. आताच ख्रिस्तात प्रवेश करण्यासाठी तुमच्या संपूर्ण शक्तीने प्रयत्न करा. कोणीतरी म्हटले आहे, “चांगली सुरुवात ही अर्धे काम झाल्यात जमा आहे.”. मिसेस हायमर्स यांनी अगदी पहिल्यांदा शुभवर्तमान ऐकले आणि त्या आपल्या पापापासून परावृत्त झाल्या व त्यांनी येशूवर विश्वास ठेवला! म्हणून डॉ. जुडीत कागॅननी ठेवला. म्हणून डॉ. क्रिघटन चाननी ठेवला. म्हणून मिसेस मेलीसी सॅंडरनी ठेवला. म्हणून मि. बेन रिफ्फिथनी ठेवला. ते आता खंबीर ख्रिस्ती आहेत यात आश्चर्य नाही! त्यांचे लगोलग तारण झाले म्हणून एक स्त्री माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली. ती स्वत:च पुष्कळ वर्षे हरविलेली आहे. “ते इतक्या लवकर कसे काय तारण पावले?” असे ती विचारी. ते गंभीर होते आणि तुम्ही गंभीर नव्हता. ते असे आहे! सुरुवातीलाच तुम्ही मुर्ख बनविता आणि देवराज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत नाही, त्या चीनी मुलांप्रमाणे जे दबलेल्या, दुर्बळ नव-ख्रिस्ती मंडळ्यात जायचे, तसे तुम्ही नेहमी अशक्त नव-ख्रिस्ती राहता. पवित्रशास्त्र म्हणते, “ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दु:ख सोस” (II तिमथी 2:3). दानिएलासारखे बनण्याचे धाडस करणे! हे गा!
दानिएलासारखे होण्याचे धाडस करणे,
एकटेच उभे राहण्याचे धाडस करणे!
एक निश्चय हेतू असण्याचे धाडस करणे!
माहिती करुऩ घेण्याचे धाडस करणे!
मी राज्य करतो तर, खात्रीने मला लढले पाहिजे;
माझे धैर्य वाढव, हे प्रभू!
मला कष्ट सहन, वेदना सहन केल्या पाहिजेत,
तुझ्या वचनाच्या साहाय्याने.
(“एम आय अ सोल्जर ऑफ द क्रॉस?” डॉ. इस्साक वॅट्स यांच्याद्वारा, 1674-1748).
“विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानयुगाच्या जीवनाला बळकट धर!” (I तिमथी 6:12).
आळशी नव-ख्रिस्ती कधीहि मंडळीचे चांगले सभासद होऊ शकत नाहीत! त्यांचे दुर्बळ नव-ख्रिस्तीपण चुकीचे आहे हे ते मानत नाहीत! त्यामुळेच नव-ख्रिस्ती क्वचितच तारण पावतात. आणि त्यांनी पहिल्यांदा सुवार्ता ऐकल्यानंतर त्यांचे कधीहि तारण होत नाही. त्यांनी त्यांचा धर्म चुकीचा आहे हे कबूल करण्यापूर्वी तुम्हांला त्यांच्याशी बराच संघर्ष करावा लागेल. त्यामुळेच ते कधीहि मंडळीचे चांगले सभासद होऊ शकत नाहीत! कधीहि नाही! कधीहि नाही! कधीहि नाही! ख्रिस्तासाठीचा तुमचा संघर्ष करण्यास आळशीपणा कराल तर, तुम्ही ख्रिस्ती जीवनात कोणत्याहि मुल्यांसाठी संघर्ष करु शकणार नाही! कर्माने मिळणा-या तारणाविषयी तर मी बोलत नाही ना? नाही, मी बोलत नाही. मी कृपेने मिळणा-या तारणाविषयी बोलत आहे, कृपा जी तुमच्या मार्गातील भूतकाळातील शंका व भीति यांच्याशी लढण्यास आकर्षित करते. मी विश्वासाविषयी बोलत आहे जो ख्रिस्तासाठी संघर्ष करतो, आणि मग ख्रिस्ताच्या मंडळीच्या भल्यासाठी सतत संघर्ष करतो. “संघर्ष करणारे ख्रिस्ती हवे आहेत!” — ह्या शिर्षकाचा डॉ. आर.ए. टॉरी यांचा उपदेश होता. सुरुवातीपासून एक असा! तुम्ही ख्रिस्ती होण्यास आळस कराल तर तुम्ही तुमच्या पूर्ण जीवनात आळशीच राहाल! “संघर्ष करणारे ख्रिस्ती —हवे आहेत!” तो एकच प्रकार आपल्या येथे बॅप्टिस्ट टॅबरनिकल मध्ये आहोत. तुम्हांला आळशी ख्रिस्तीपणा हवा असेल तर, दुस-या मंडळीत जा! पुष्कळ अशा नव-ख्रिस्ती मंडळ्या आहेत! एकाकडे जा! एकाकडे जा! एकाकडे जा! एकाकडे जा! बाहेर पडा आणि त्या एकाकडे जा!
परंतू थांबा! मी याच्याकडून नाही! तुम्ही जावे असे मला वाटत नाही. तुम्ही थांबावे व तारण पावावे असे मला वाटते! आता माझे काळजीपूर्वक ऐका. तुमचे तारण झाले नाहीतर हा उपदेशातील सर्वात महत्वाचा भाग आहे. तुम्हांला मी काय सांगत आहे याच्याकडे आता लक्ष द्या. तुम्ही पूर्वी कधीहि ऐकले नाही ते ऐका!
राजाने त्या तिघा मुलांना अग्नीच्या, तप्त भट्टीत टाकले. भूतकाळात त्यांच्या सर्व आशा होत्या. तुम्हांला जे वाटते ते नव्हे का? तुम्ही आशाहिन स्थितीत आहांत. तुम्ही स्वत:चे तारण करु शकत नाही. खरे तर तुम्ही, तारण मिळण्याच्या सर्व आशा तुम्ही सोडून दिल्या आहेत. “मी डॉ. चान, किंवा मि. ग्रिफ्फिथ किंवा जुडी कागॅन किंवा मिसेस हायमर्स यांच्यासारखे होऊ शकत नाही.” तुम्हांला आशाहिन वाटते. तुम्हांला माहित आहे की तुम्ही नरकात जळणार आहांत आणि तुम्ही वाचण्यासाठी कांही करु शकणार नाही! परंतू, वाट पहा! जेव्हां राजाने तप्त अग्नीच्या भट्टीत पाहिले तेव्हां त्याला केवळ तीन मुले दिसली नाहीत. त्याने भट्टीत चार पुरुष पाहिले, “चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसले; त्यांस कांहीएक इजा पोहंचली नाही; चौथ्याचे स्वरुप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे” (दानिएल 3:25). स्पर्जन बरोबर होते. चौथै पुरुष है येशू होता — देवाच्या पुत्राचे पूर्वावतार आहे. येशू त्यांच्याबरोबर अग्नीत होता. येशू त्या मुलांना अग्नीपासून वाचविण्यासाठी तेथे होता! पवित्रशास्त्र म्हणते, त्यांना जाळण्यासाठी “त्या अग्नीत सामर्थ्य नव्हते” (दानिएल 3:27). येशू त्यांच्याबरोबर होता आणि येशूने त्यांना अग्नी व नरकापासून वाचविले.
माझ्या मित्रानो, येशू तुम्हांला सुद्धा वाचवू शकतो. त्याला तुमच्याविषयी कळवळा आहे. तो तुम्हांवर प्रेम करितो. तुमचा विश्वास किती आहे या महत्व नाही, येशू सर्व-सामर्थी आहे. आणि येशू तुमच्या बाजूने आहे! म्हणून पवित्रशास्त्र म्हणते! पवित्रशास्त्र म्हणते, “ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगांत आला” (I तिमथी 1:15).
आता तुम्ही किती निराशावादी आहांत मला त्याची फिकीर नाही. खरे तर, जास्त निराशावादी अधिक चांगले वाटेल! का? कारण याचा अर्थ येशूने सर्वकांही वाचविण्यास तुम्ही तयार असावे. तुम्ही स्वत:ला वाचवू शकत नाही. तुम्हांला माहित आहे की तुम्ही करु शकत नाही. तुम्हांला माहित आहे की तुम्ही पुरेशे चांगले अथवा सामर्थी नाही. चांगले! आता तुमच्या भट्टीत येशूला चौथा मनुष्य होऊ द्या. त्याला तुमचे तारण करु द्या.
तुम्ही म्हणता, “माझा पुरेसा विश्वास नाही.” मला माहित आहे. परंतू तरीहि येशू तुम्हांला वाचविल. मी तारणाची सर्व आशा गमावली होती तेव्हां येशू मला वाचविले. तो माझ्याकडे आला व त्यांने माझ्या शंका व भीतीच्या भट्टीतून वाचविले. तो तुम्हांस वाचविण्यास वधस्तंभावर मरण पावला. तो तुम्हांस वाचविण्यास मरणातून पुन्हा उठला. आज रात्री तो तुमच्यासाठी येथे आहे. तो तुमच्यासाठी तुम्हांला शंका व भीतीच्या भट्टीतून वाचविण्यासाठी खाली येईल. तो तुम्हांस शांति व आशा देईल. मला माहित आहे तुम्ही विश्वास ठेवीत नाही. परंतू त्याच्याजवळ तुम्ही जा आणि तो तुम्हांकरिता येथे आहे. तुमच्या स्वत:कडे पाहू नका. त्याच्याकडे पहा. थोड्या विश्वासाने त्याच्यावर भरवंसा ठेवा, जवळजवळ शुन्य. त्यांने कांही परक पडत नाही! केवळ थोडासा भरवंसा. तो तुमच्यासाठी येथे भट्टीत आहे. थोडासा विश्वास ठेवा आणि सर्वकांही ठिक होईल. तुम्हांला त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. केवळ माझ्यावर विश्वास ठेवा. मला माहित आहे तो तुम्हांला वाचविल. माझ्या विश्वासाने तुम्हांला मदत होवो. येशूवर विश्वास ठेवण्यास मला मदत करु द्या आणि सर्वकांही ठिक होईल. “डॉ. हायमर्स विश्वास ठेवतात येशू मला वाचवू शकतो, म्हणून मी पाळकांवर व येशूवर सुद्धा विश्वास ठेवतो!” “केवळ त्याच्यावर विश्वास ठेवा, केवळ त्याच्यावर विश्वास ठेवा, आता केवळ त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुमचे तारण करितो, तो तुमचे तारण करितो, आता तो तुमचे तारण करितो.” “परंतू”, तुम्ही म्हणता, “मला त्यांने पूर्वी तारले नाही.” कदाचित असे असेल, परंतू आता तो तुमचे तारण करील.
पापाने, दबलेल्या प्रत्येक तूं ये, तेथे परमेश्वराबरोबर दया आहे,
आणि त्याच्या वचनांवरील विश्वासाने तो तुला निश्चित विसावा दईल.
केवळ त्यावर विश्वास ठेव, त्यावर विश्वास ठेव, आता केवळ त्यावर विश्वास ठेव.
(“ओनली ट्रस्ट हिम” जॉन एच. स्टॉकटन यांच्याद्वारा, 1813-1877).
तुमच्या दुर्बळ नव-ख्रिस्ती धर्मापासून मागे फिरा. आता त्यापासून मागे फिरा! आणि येशूवर विश्वास ठेवा व पापापासून त्याच्याद्वारे — त्याने वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताद्वारे तारण मिळवा!
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यांनी गायले: “डेअर टु बी लाईक
डॅनिएल” (फिलीप्प पी. ब्लीस यांच्या द्वारा, 1838-1876; डॉ.
हायमर्स द्वारा बदल केलेले).
“Dare to Be Like Daniel” (by Philip P. Bliss, 1838-1876; altered by Dr. Hymers).