Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




“पण जर नाही” – बाबेलमध्ये देवाची माणसे

“BUT IF NOT” – GOD’S MEN IN BABYLON
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 3 डिसेंबर, 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, December 3, 2017

“शद्रख मेशख व अबेद्नगो यांनी राजास उत्तर दिले की, महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करितो तो आम्हांस धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवावयास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांस आपल्या हातातून सोडवील. ते कसेहि असो, पण महाराज, हे आपणास पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आपण स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही” (दानिएल 3:16-18).


ते घरापासून 1,500 मैल दूर होते. आणि ते केवळ किशोरवयीन असे होते. खोटा धर्म, दारुबाजी व पापाने नगर भरले होते. त्यांच्या आईवडीलांना माहित न होता ते कांहीहि करु शकले असते! परंतू देव पाहत आहे हे त्यांना माहित होते.

नबुखद्नेस्सरने यरुशलेम जिंकले होते तेव्हां त्यांना त्यांच्या घरातून नेण्यात आले होते. ते चारजण होते. ते इतर मुलांसारखे नव्हते. ते बलवान आणि चतुर होते. ते दुधावरच्या सायी प्रमाणे−सर्वोत्तम असे होते. ते चपळ होते. तरीहि ते “अ” श्रेणीतील विद्यार्थी होते. विद्वान माणसे होण्यास प्रशिक्षण देण्यास त्यांची राजाने निवड केली होती. जेव्हां पदवी संपादतील तेव्हां ते राजाचे खास सल्लागार होतील.

ते तरुण होते. अभ्यासक असे म्हणतात की ते सर्व किशोरवयीन होते — ते सर्व 17 ते 18 वर्ष वयाचे होते. घरापासून 1,500 मैल दूर, मूर्तीपूजक देशात, राजाच्या विद्यापीठात होते.

सध्याच्या त्यांच्या वयाच्या तरुणाप्रमाणे जगू ते शकले असते! ते पिणे करु शकले असते. जंगली मेजवाण्यांना जाऊ शकले असते. ते जे विद्यापीठात शिकले ते घेतले असते आणि देवाचे अस्तित्व नाकारण्यासाठी कारण म्हणून वापरले असते. लोटाच्या दिवसातील लोकांप्रमाणे, ते मेजवाणीतील—प्राणी बनले असते. जसे स्वत: लोटाने सदोमातील मेजवाणीत केले तसे, त्यांनी त्यांच्या जीवनातून देवालाच काढून टाकले असते. उधळ्या पुत्राने घालविले तसे, “दंगेखोर जगण्यासह” — त्यांनी त्यांचे जीवन वाया घालविले असते. त्यांनी हरविलेले मित्र बनविले असते आणि भौतिक जीवनात अडकले असते आणि ऊरच्या शल्दीस येथे अब्राहामाने केले तसे, ते आपला मार्ग हरवून बसले असते. ते देवापासून मागे फिरले असते आणि पौलाचा मित्र देमासाने केले तसे, त्यांनी आपल्या आत्मे गमाविले असते, “कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनिकास गेला” (II तिमथी 4:10).

परंतू ही यहुदी मुले, घरापासून खूप दूर होते, बाबेलच्या विद्यापीठात, कधीहि झटकून टाकले किंवा नापास झाले नाहीत! ते मोशेच्या नियमशास्त्राधीन होते, म्हणून त्यांनी कोशर पाळला. त्यांनी स्वत:स राजाच्या दारु किंवा अन्नाने विटाळले नाहीत. ते देवाशी आणि घरामध्ये जे धार्मिक शिक्षण शिकले त्याच्याशी एकनिष्ठ राहिले. चीनमधील आईवडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी घरापासून दूर पाठवितात, त्यांची मुले जहाजात पोहंचे पर्यंत अगदी ताजेतवाने असतात, त्याप्रमाणे ते होते. देवाचे आभार त्यातील कांहीजण मंडळीत आले व त्यांचे तारण झाले. त्यानंतर तुम्ही बाबेलच्या बंदिवासातील ह्या यहुदी मुलांप्रमाणे व्हाल.

दानिएल हा त्या मलांचा पुढारी होता. कदाचित तो या सर्वांपेक्षा वयाने लहान होता. परंतू तो अभिजात पुढारी होता. त्यांने त्या तिघाचे नेतृत्व केले. जॉन कागॅन सारखी त्याच्याकडे नेतृत्व क्षमता होती. त्यामुळे मला वाटते की जॉन पाळक होऊ शकले. जॉनपेक्षा वयाने जास्त असलेले त्याचे अनुकरण करतील कारण तो पुढारी आहे. दानिएल हा प्रार्थनाशील माणूस होता. दानिएल हा देवातील हेतू व विश्वास असलेला तरुण माणूस होता. दानिएल हा संदेष्टा होता. त्यांने नबुखदनेस्सर राजाला सुवार्ता सांगितली आणि दरबरात जे होते त्या सर्वांना त्यांने साक्ष दिली. दानिएलावर राजा मोठा भरवंसा होता. दानिएल वीस वर्ष वयाचा असतांना राजाने त्याला महान मनुष्य बनविले. परंतू तो आपल्या तीन मित्रांना विसरला नाही. शद्रख, मेशख व अबीद्नेगो अशी त्यांची नावे होती. बाबेलच्या राज्यात त्याच्या तीन इब्री मित्रांना सुद्धा चांगली पदे मिळावीत म्हणून त्यांने विनंती केली.

त्या तीन तरुणांनी देवाच्या विश्वासार्हते संबंधीच्या सर्व चाचण्या पास केल्या होत्या. आणि आता त्यांच्या विश्वासार्हतेमुळे त्यांना उच्च पदांचे पारितोषिक मिळाले. तुम्ही त्याला प्रथम स्थान दिले आहे ह जेव्हां देव जाणतो तेव्हां, देव मोठी कामगिरी देतो. मला नोहा, जॅक व अहरोनची आठवण झाली. ते अजूनहि तरुण आहेत, परंतू त्यांची डिकन म्हणून दिक्षा करण्यात आली कारण ते देवाच्या गोष्टी हाताळू शकतात. आणि देव जाणतो की तो त्यांची कठीण परिक्षा घेऊ शकतो.

नबुखद्नेस्सर राजा खूप सामर्थ्यशाली व अहंकारी झाला. त्याच्या ह्या अहंकारामुळे त्यांने आपला मोठा पुतळा बनविला. तो नव्वद फूट उंच, आणि तो सोन्याचा, किंवा सोन्याने मढविलेला असा होता. नबुखद्नेस्सरने आपला भलामोठा पुतळा “दुरा नामक मैदानात” बसविला (दानिएल 3:1). आता दानिएल 3:4-6 ऐका.

“मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की, अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणा-यां लोकांनो, तुम्हांस आज्ञा होत आहे की, शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा पंगी वगैरे वाद्यांचा ध्वनि तुमच्या कानी पडताच नबुखद्नेस्सर राजाने जी सुवर्णमूर्ति स्थापिली आहे तिच्यापुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावे; जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील” (दानिएल 3:4-6).

ह्या अनुभवाचा मुख्य भावार्थ असा की बाबेलच्या बंदिवासात देव कराराचे लोक इस्त्राएल यांची काळजी घेणार. हा त्याचा अर्थ व उपयोग आहे. तसेच त्याचा आणखी एक उपयोग आहे. II तिमथी 3:16-17 आपणास असे सांगते की “प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आहेत, आणि सध्याच्या लोकांसाठी फायदेशीर” आहेत. ख्रिस्ती म्हणून दानिएल मधील हा उतारा कोणता उपयोग सांगतो आहे. ह्या तीन इब्री तरुणांना बाबेलमधील इतरांसह त्या सोन्याच्या मूर्तीची आराधना करण्यास सांगितले होते. “राजाने जी सुवर्णमूर्ति स्थापिली होती [त्या] मूर्तीसमोर साष्टांग दंडवत घालण्यास”, जमावाबरोबर जाण्यासाठी, ते खात्रीने दबावाखाली होते (दानिएल 3:5).

नबुखद्नेस्सर राजा हा सैतानाचे प्रतिक किंवा उदाहरण आहे. नवीन करार सैतानास “ह्या जगाचे दैवत” असे संबोधिते (II करिंथ 4:4). सैतान आपणांस त्याला नमन व त्याची उपासना करण्यास सांगतो. परंतू ख्रिस्त आपणांस वेगळे करण्यास बोलावितो. ख्रिस्त म्हणाला,

“कोणीहि दोन धन्याची चाकरी करु शकत नाही...तुम्ही देव आणि धनाची (भौतिक गोष्टीची) सेवा करु शकत नाही” (मत्तय 6:24).

तुम्हांला निवड करायची आहे. सैतान तुम्हांस धनासाठी नमन करावयास बोलावितो. देव तुम्हांस केवळ त्याला नमन करण्यास बोलावितो. देव म्हणतो, “माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत” (निर्गम 20:3). ही दहा आज्ञातील एक आहे.

हे तीन इब्री तरुण, शद्रख, मेशख व अबीद्नेगो, यांना निवड करायची होती. त्यांनी त्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालावा? किंवा त्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालण्याचे नाकारावे? त्या तरुणांना पुष्कळ पर्याय होते. ते असे म्हटले असते, “एक नागरिक म्हणून नमन करणे व राजाची आज्ञा पाळणे हे आमचे कर्तव्य आहे.” किंवा ते म्हणू शकले असते, “हा केवळ आकाराची बाब आहे. आम्ही मूर्तीला नमन केले तरी, देवाला आमचे अंत:करण माहित आहे.” ते त्या मूर्तीच्या पाया पडले असते आणि संकटात सापडले नसते. पवित्रशास्त्र म्हणते, “तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा” (यहोशवा 24:15).

ज्याला जग “सुट्टी” असे म्हणते त्याच्याकडे जातांना, तुम्हां सर्वांना निवड करायची आहे. तुम्ही सैतानाला नमन करणार, की देवाशी एकनिष्ठ राहणार? नाताळात मंडळीत असणार, की लास वेगासला पळून जाणार? नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या उपासनेत हजर असणार, की मेजवाणीला जाणार? अमेरिकन भौतिकवादाच्या सोन्याच्या मूर्तीला नमन करणार, की तुम्ही देवाच्या लोकांबरोबर मंडळी असणार? अशाप्रकारे म्हणणा-या दुर्बळ नवीन-विश्वासाणा-यास मी मोठी टिका केली. ते म्हणाले मी खूप कडक आहे. ते म्हणाले देव आणि संपत्ती यामधून निवड करणे हे कायदेशीर आहे. परंतू ते विसरले की मी दोन भाग केले नाहीत. मी ते दोन्ही वेगळे केले नाही ख्रिस्ताने केले. तो प्रभू येशू ख्रिस्त होता जो म्हणाला, “कोणीहि दोन धन्याची चाकरी करु शकत नाही.” तो ख्रिस्त होता जो म्हणाला, “तुम्ही देव आणि धनाची सेवा करु शकत नाही” (मत्तय 6:24). तो ख्रिस्त होता ज्याने आपणास सांगितले,

“तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा” (मत्तय 6:33).

द रिफॉर्मेशन स्टडी बायबल मत्तय 6:33 विषयी म्हणते, “आपल्या जीवनातील सर्वोच्च प्राथमिकता देवाचे सार्वभौम नियम व त्याच्यासह योग्य नातेसंबंध बनविण्यासाठी आपण आहोत...जे त्याच्यासाठी सगळे धोके पत्करतात त्यांच्या सर्व गरजा देव पुरविल” (मत्तय 6:33 वरील टिप्पणी).

नाताळ व नवीन वर्षाच्या उपासनेतून दूर ठेवण्यासाठी तुमचे कुटुंब व मित्रमंडळी मोठा प्रयत्न करतील. तुम्ही त्या वेळेस लॉस वेगास, सॅन फ्रॅन्सिस्को किंवा इतर कुठे गेला नाही तर ते तुम्हांस “विचित्र” किंवा “धर्मवेडा” असे संबोधतील! तुम्हांला त्यांच्या मूर्तीला नमन करावयाचे आहे का — मंडळीत देवाची सेवा करायची आहे ते ठरवा! तुम्हांला ते ठरवाचंय आहे!

नवीन वर्षाची संध्याकाळ मी भाऊ बहिनीसोबत चीनच्या मंडळीत वेळ घालवायचो तेव्हां माझे स्वत:चे वडील नेहमी मला वेडे ठरवायचे व खूप चिडायचे. “तू नवीन वर्षाची संध्याकाळ कुटुंबासमवेत घालविण्या ऐवजी ह्या चीनी लोकांसमवेत का घालवितो?” म्हणून ते माझ्यावर चिडायचे. मी त्यांच्याशी वाद घालत नसे. मी केवळ नाताळ व नवीन वर्षाच्या उपासनेत असायचो. माझ्याबरोबर मंडळीत येण्यास आमंत्रण दिले. त्यांनी नकार दिला तेव्हां मी स्वत:शीच म्हणालो, “तूच एक आहेस कुटुंब दुभागणारा! तूच एक आहेस माझ्यासह मंडळीत येण्यास नकार देणारा!”

तुम्ही पाहता की, हा जो स्वभाव आहे तो एका नामधारी ख्रिस्ती व ख-या ख्रिस्तीमधला वेगळेपण दर्शवितो! तुमचा संबंध एका हलक्या नवीन-सुवार्तेसंबंधी व्यक्तीशी आला असेल तर, त्यांचा धर्म एक तडजोड — सैतानाशी तडजोड केलेली घटना तुमच्या जीवनात देव तुम्हांला दाखविल! आमच्या एका गंभीर ख्रिस्ती तरुणांशी विवाह करण्यास तुम्हांला ते अशक्य असे करील. त्यांनी तडजोड करावी आणि त्यांचा गंभीरपणा सोडून द्यावा — किंवा तुम्ही नामधारी (नावापुरते) ख्रिस्ती होण्याऐवजी — तडजोडपणा सोडावा आणि खरे ख्रिस्ती बनावे! आपण तडजोड करणार नाही! त्यामुळे, तुम्ही त्याची सवय पाडून घ्या — किंवा, त्याऐवजी दुस-या मंडळीस गेलेले बरे! सी.एस. लेवीस चांगले म्हणाले, “मी एक परिवर्तित मूर्तीपूजक, धार्मिकाने निष्ठा सोडलेल्यांध्ये राहत आहे.” किप्लींग म्हणतात, “पूर्व ही पूर्व आहे आणि पश्चिम ही पश्चिम आहे, व त्या दोन्ही कधीहि मिळत नाहीत.” सुवार्तिकता ही सुवार्तिकता आहे, आणि मूलतत्वपणा हा मूलतत्वपणा आहे, व ते दोन्ही कधीहि मिळत नाहीत. आमच्या बरोबर या व खरे ख्रिस्ती बना! तुमचे नवीन सुवार्तिकतेची मृतवत व शुन्यवत धार्मिकता सोडून द्या! ते सोडून द्या! आमच्या बरोबर या व खरे ख्रिस्ती बना.

तुम्हाला ठाऊक आहे, एखाद्या माणसाचा नाश करण्यास नवीन सुवार्तिकतेचा जास्त संबंध यावा लागत नाही. त्यांच्या शाळेत किंवा त्यांच्या मंडळीत — त्यांच्याबरोबर कांही महिने जा — आणि तुम्ही आमच्या बरोबर येण्याचा देवाचा चमत्कार तुमच्यासाठी घडून येईल! आमच्या सारखा विचार करण्यास परिवर्तनाचा चमत्कार तुमच्यासाठी घडून येईल! जॉर्ज बरनार्ड शॉ म्हणाले की लोक ज्यांच्यावर लहान मुलांसारखा थोडासा ख्रिस्तीपणा बिंबवण्याने क्वचितच ख-या गोष्टी घडतात. डॉ. कर्टीस हटसन यांनी एक लहान पुस्तक लिहले त्याला म्हणतात, “नवीन सुवार्तिकता, मूलतत्वपणाचा शत्रू आहे.” ते बरोबर होते. ते आपले शत्रू आहेत. त्यांच्यासाठी आपण जितके शक्य तितके चांगले असांवे — परंतू ते आपल्यावर सदैव हल्ला करतील! का? कारण गंभीर ख्रिस्ती असणे आवडत नाही, त्यामुळे! मी एक परिवर्तित मूर्तीपूजक, नवीन सुवार्तिकतेची निष्ठा सोडलेल्या लोकांमध्ये राहत आहे! गेलेल्या वर्षात, मी शिकलो की, त्यांच्याकडून विश्वासाचा धिक्कार करावा आणि माझ्या विरुद्ध बोलावे एवढीच अपेक्षा बाळगणे! तुम्हांला तेहि शिकणे गरजेचे आहे — तुम्हांला ख-या परिवर्तनाचा, आणि खरे ख्रिस्ती होण्याचा अनुभव घेऊ इच्छिता तर!

तुम्हांला ठाऊक आहे की, नवी सुवार्तिकता ख-या रितीने पवित्रशास्त्रावर विश्वास ठेवत नाही. ते विश्वास ठेवीत नाहीत की त्यांचे अंत:करण हे “फसवणूक करणारे व खरोखर दुष्ट आहे” — याचा अर्थ ते यिर्मया 17:9 वर विश्वास ठेवीत नाही. ते असा विचार करतात की दुस-या एवढे दुष्ट नाहीत, म्हणून ते स्वर्गात घेतले जातील कारण ते दुस-या लोकांएवढे दुष्ट नाहीत. याचा अर्थ ते पवित्रशास्त्रावर विश्वास ठेवीत नाहीत, “कारण जो कोणी आपल्याला उंच करितो तो नमविला जाईल” (लुक 18:14); “हे देवा, माझी झडती घेऊन माझे ह्दय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे कांही असेल तर पाहा” (स्तोत्र 139:23, 24). नवी सुवार्तिकता पापाची खातरी होण्याच्या अधीन नाही, कारण ते पवित्रशास्त्र गंभीरपणे घेत नाहीत. ते स्वत:लाच कारणे देतात; त्यामुळे त्यांचे परिवर्तन होत नाही. ते केवळ धार्मिक निष्ठा सोडणारे असतात. डॉ. ए. डब्लू. टोझर म्हणाले, “सर्वात वास्तववादी पुस्तक म्हणजे पवित्रशास्त्र आहे. देव वास्तव आहे, आणि तसेच मरण व नरक आहे, पापाकडे पर्यायाने नेते” (बॉर्न अफ्टर मिडनाईट).

हे तीन तरुण नवशिके-विश्वासू नव्हते. ते चुकीची शिकवण, देवाची खोटी जीणीव आणि पापाकरिता न्याय विषबाधीत झालेले नव्हते. शद्रख, मेशख व अबीद्नेगो हे विश्वासाचे पक्के, पवित्रशास्त्राच्या-सिद्धांतावर विश्वास ठेवणारे होते. ते देवाच्या भयाने भयभीत झाले. देवाची अवज्ञा करणे व राजाच्या मूर्तीला नमन करणे यापेक्षा ते देवाला एवढे भीत होते की त्यासाठी जिवंत जाळले जायला तयार झाले. पवित्रशास्त्र म्हणते, “परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय” (नीतिसुत्रे 1:7). परंतू नव्या-विश्वासणा-यांस देवाचे भय नाही. पवित्रशास्त्र म्हणते, “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही” (रोम 3:18). स्वत:ची परिक्षा करा. ह्या तरुणांप्रमाणे तुम्हीहि देवाला भीता काय? का “तुमच्याहि डोळ्यांपुढे देवाचे भय नाही”? तुम्हांजवळ देवाचे भय नाही तर, तुम्ही नवे-विश्वासू आहांत. तुम्ही देवाला भ्यायला हवे आहे! पवित्रशास्त्रातून तुम्हांस सांगितले की तुम्ही हरविलेले आहांत! तुम्हांला ह्याचे कांही वाटते का? तुम्हांला नरकाची भीती वाटून, रात्रीचा निद्रानाश होतो काय? होत नाही तर तुम्ही नव्या-विश्वासणा-यांने विषबाधीत झाला आहां. हे विष आहे! हे विष आहे! हे विष आहे! तुम्ही देवाच्या क्रोधाला भ्यायला हवे!

राजा त्यांना म्हणाला, “मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांस धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातातून तुम्हांस सोडवील असा कोणता देव आहे?” (दानिएल 3:15).

ह्या तीन तरुणांचे परिवर्तन झालेले होते. ते परमेश्वराला भीत होते. त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. बाबेलच्या लोकांच्या पापाशी समरुप होऊ नये हे ते शिकले होते. देवासमोर खंबीरपणे उभे राहण्यास शिकले होते!

दानिएल व्हायला धाडस हवे,
   खंबीर उभे राहायला धाडस हवे!
पक्का उद्देश असायला धाडस हवे!
   ते जाणून घ्यायला धाडस हवे!
(“डेअर टू बी अ डॅनिएल” फिलीप्प पी. ब्लीस, 1838-1876).

उभे राहून ते गाऊया!

दानिएल व्हायला धाडस हवे,
   खंबीर उभे राहायला धाडस हवे!
पक्का उद्देश असायला धाडस हवे!
   ते जाणून घ्यायला धाडस हवे!

मी तरुण होतो. मी एकाकी होतो! माझ्याकडे पैसा नव्हता! मला कोणाचे पाठबळ नव्हते! डॉ. ग्रीन ह्यांनी माझ्याकडे पाहिले व म्हणाले, “पवित्रशास्त्राचा-नकार करणा-या प्राध्यापकांस उत्तर देण्याचे थांबविणार नाही, तर पाळक म्हणून सदर्न बॅप्टिस्ट मंडळी कधीहि मिळणार नाही!” मी देवासाठी खंबीरपणे उभे राहण्यास शिकलो. मी माझ्या पद्धतीने महाविद्यालयात काम केले. महाविद्यालय व सेमीनरीमध्ये फी भागविण्यासाठी — मी दिवसातील 16 तास, आठवड्यातील सात दिवस काम केले. मी मनुष्यापेक्षा, देवाची भीती बाळगण्यास शिकलो. डॉ. ग्रीन म्हणाले, “प्राध्यापकांस उत्तर देण्याचे थांबविणार नाही, तर पाळक म्हणून सदर्न बॅप्टिस्ट मंडळी कधीहि मिळणार नाही.”

मी त्यांच्या डोळ्यात थेट पाहत मी म्हणालो, “ती किंमत ती जर असेल ते मला नको आहे!” मला त्याची गरज नाही, जर ती ही किंमत असेल! मला नको आहे!

दानिएल व्हायला धाडस हवे,
   खंबीर उभे राहायला धाडस हवे!
पक्का उद्देश असायला धाडस हवे!
   ते जाणून घ्यायला धाडस हवे!

माझ्याकडे सुरक्षीत जाळी नव्हती! मला वाटले हे माझ्या व्यवसायाचा अंत आहे. महाविद्यालयातील चार वर्षे आणि सेमीनरीतील तीन वर्षे वाया गेली असे वाटले. पण मी त्याची पर्वा केली नाही. पवित्रशास्त्राकरिता मला खंबीरपणे उभे राहायला हवे होते! मी खंबीर उभा राहिलो नसतो तर मला पाळक म्हणून मंडळी मिळाली नसती! मला धगधगीत, अग्नीच्या, भट्टीत सुद्धा टाकले असते! मला एखादी मंडळी सुद्धा मिळाली नसती!

ती किंमत ती जर असेल ते मला नको आहे! मी भ्यायलो होतो? अर्थात मी भ्यायलो होतो. परंतू मा माझी जीवन गाथा लिहण्याचे गेल्याच आठवडी संपविले. हे माझ्या पुस्तकाचे शिर्षक आहे — सर्व भीतीच्या विरुद्ध!

ब-याच महान व प्रसिद्ध प्रचारकांनी माझे पुस्तक पृष्ठांकीत केले आहे. त्यांचे बोल पृष्ठ पानावर आहे! बॅप्टिस्ट बायबल फेलोशिपचे माजी अध्यक्ष, डॉ. बिल मोनरो म्हणाले, “हायमर्स हे आधुनिक बाबेल — लॉस एंजिल्सचा सखल भागातील दानिएल आहेत. मी जशी त्यांची कथा वाचली तशी, तुम्हीहि वाचा व आशिर्वादित व्हा!”

डॉ. नील विवर, लुसियाना युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष, लिहतात — हायमर्स हे “[त्यांच्या] विश्वासाकरिता सर्व विपरीत गोष्टीशी निडरपणे सामना करणारे आहेत. डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. हे मनुष्य माझे चांगले मित्र आहेत.”

डॉ. हरबर्ट एम. रॉलिंग्ज, डॉ. जॉन रॉलिंग्ज यांचे सुपुत्र, आणि रॉलिंग्ज फौंडेशनचे मुख्य, म्हणाले “एक मूळ अमेरिकन! दृष्टांत असणारे! ख्रिस्ताकरिता इतरांना प्रोत्साहित करणारे त्यांचे जीवन आहे.”

डॉ. डॅन डेविडसन, सँटा अना, कॅलिफोर्नियातील पाळक, म्हणाले, “डॉ. हायमर्स ह्यांच्या मार्गात अडथळ्यांचे...काटे बघून दुसरा कोणीतर सेवा सोडून गेला असता — परंतू डॉ. हायमर्स यांनी त्या सर्वावर मात केली!”

रेव्ह. रॉजर हॉपमॅन लिहतात, “मी ह्या पुस्तकाची जोरदार शिफारस करितो. तुम्ही प्रचारक असा अथवा नसा, ते तुम्हांला प्रोत्साहित करील व तुमचा विश्वास वृद्धिंगत करील.”

डॉ. रॉबर्ट एल. समनर म्हणाले, “सर्व परिस्थीती त्यांच्या विरोधात असताना, सत्यासाठी उभ्या राहणा-या माणसाचा मी सन्मान करितो. रॉबर्ट लेस्ली हायमर्स, ज्युनि. हे एक अशाप्रकारचे ख्रिस्ती आहेत.”

डॉ. पेग पॅटरसन, महान व ऑगष्ट अध्यक्ष, साउथवेस्टर्न [सदर्न] बॅप्टिस्ट सेमीनरी, लिहतात, “रॉबर्ट आर. हायमर्स, ज्युनि. यांची सर्व भीती विरुद्ध ची असंभव व अद्भूत कथा आहे, सुवार्तेचे विश्वासू प्रचारक. तुम्ही हे पुस्तक वाचा व आशिर्वादित व्हा.”

डॉ. बॉब जोन्स III, बॉब जोन्स विद्यापीठाचे कुलगुरु, लिहतात, “त्यांचे आत्मचरित्र...हे जुन्या करारातील संदेष्ट्याप्रमाणे त्यांना प्रकट करतात...मी आणि माझे वडील माझ्यापूर्वी, अभिमानाने डॉ. आर. एल. हायमर्स यांचे आमचा मित्र म्हणवतो.”

डॉ. क्रेगनाईट एल. चान लिहतात, “तुम्हा हे पुस्त वाचा व तुमच्या अपयशाची भीती खिडकीतून घालवा! तुम्ही डॉ. हायमर्स यांच्या जीवनातून सामर्थ्य मिळवाल. हे पुस्तक जरुर वाचा! ते तुम्हांला प्रोत्साहित करील.”

इंडोनिशियाचे डॉ. एडी. पुरवान्टो लिहतात, “जेव्हां देव मनुष्यांबरोबर असतो तेव्हां तो अपयशी होऊ शकत नाही. डॉ. हायमर्स हे एक नायक आहेत जे भयंकर संघर्षातून निभावले आहेत.”

मी पुढे जाऊन अधिक वाचू शकतो, परंतू एवढे पुरेसे आहे. मी स्वत: नायक वगैरे मानत नाही. शद्रख, मेशख अबीद्नेगो सारखा साधा माणूस आहे, साधा माणूस आहे. पवित्रशास्त्र-नाकारणा-या उदारमतवादीस नमन करणा-यांसारखा, येशूवर हल्ला करतात तेव्हां नमन करणा-यांसारखा, नसून देवाचे भय बाळगणारा आहे, साधा माणूस आहे रिचर्ड ऑलिवस, किंवा एंजल्स टाईम्स, किंवा अमेरिकेतील टीव्ही कार्यक्रमाला नमन करणा-यांसारखा नाही. शद्रख, मेशख अबीद्नेगो सारखा साधा माणूस आहे!

ह्या बाबतीत काळजीपूर्वक उत्तर् देणारे आम्ही नाही. आम्ही जर असे असू, तर ज्या देवाची आम्ही उपासना करितो तो आम्हांस धगधगत्या भट्टीतील अग्नीतून वाचविण्यास समर्थ आहे, आणि हे राजा, तो आम्हांस त्याच्या हातातून सोडविण्यास समर्थ आहे. परंतू नाही तर (हा! हा! – केवळ एवढेच). “परंतू नाही तर, त्याला जाणून घे, हे राजा, आम्ही तुमच्या दैवतांची सेवा करणार नाही, तूं स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीची उपासना करणार नाही.” मि. मॅनुएल मेन्सीया यांनी मला डेस्कवर, बसणारी एक पाठी दिली आहे जी मी माझ्या मंडळीच्या कार्यालयात ठेवली आहे. त्या पाठीवर मि. मेन्सीयानी बाबेलच्या नायकांतून पुढील शब्द लिहले आहेत, आणि जर नाही! देव आम्हांला सोडवितो. आणि जर नाही — आम्ही जळून मेलो तरी, “त्यांच्या दैवतांची सेवा करणार नाही, किंवा त्यांनी स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीची उपासना करणार नाही.”

माझ्या तरुण मित्रांनो, मी पुष्कळ वेळा प्रचार करतांना तुम्ही ऐकला आहे. मला तुमचा अभिमान आहे! मी जेथे कोठे गेलो तेथे तुम्ही सेवा केली त्याबद्दल मी बढाई मारतो. पण अजूनहि तुमच्यापैकी कांहीजणांचे तारण झाले नाही. तुम्ही नवीन-विश्वासणा-यांचे बांध व साखळ्या तोडून फेकल्या पाहिजेत! तुम्ही येशूकडे यायला हवे. जो तुमच्यासाठी मेला त्याच्यासाठी तुम्ही स्वत:ला झोकून दिले पाहिजे. येशूसाठी तुम्ही स्वत:ला झोकून द्या. तो तुम्हांला तारु शकतो. तो तुमच्या पापाची क्षमा करुन तुम्हांला सार्वकालिक जीवन देऊ शकतो. तुम्ही म्हणता, “तो मला कदाचित तारणार नाही.” मी आमच्या इब्री नायकाच्या शब्दाने उत्तर देतो, “परंतू जर नाही, जाणून घ्या, सैतान, त्या दैवतांची सेवा करणार नाही, भुरळ घालण्यासाठी जी भौतिकवादाची सुवर्ण मूर्ती उभारली आहे त्याची सेवा करणार नाही!”

अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्याकडे कसा असेल? जर त्यांचा स्वत:वर भरवंसा असेल सैतान त्यांना ते तसे दुर्बळ आहेत याची आठवण करुन देतो. परंतू ते त्यांच्या बळावर किंवा क्षमतेवर भरवंसा ठेवीत नाहीत. त्यांनी ख्रिस्तावर भरवंसा ठेवला (कारण तो त्यांच्याबरोबर त्या भट्टीत होता). “ख्रिस्तावर भरवंसा ठेवा,” तुम्ही म्हणता, “मला ह्या सर्वांची गरज आहे का?” होय, त्या सर्वांची तुम्हांला गरज आहे. मला माहित आहे, पुष्कळ वेळा जेव्हां विश्वास ठेवण्यास कांहीएक नव्हते! मला खूप अशक्त व असाहाय्य वाटत होते. परंतू ख्रिस्ताने मला माझ्या अशक्तपणातहि, नेहमीच वाचविले आहे. प्रत्येक अशक्तपणा व मोहापासून मला ख्रिस्ताने सुरक्षित ठेवले आहे. महान स्पर्जन म्हणाले, “ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, तर शापित आहात, मी तुम्हांबरोबर शापित असेन. तारणासाठी माझी आशा केवळ ख्रिस्तावर आहे. मी येशूवर विश्वास ठेवतो आणि तो माझे सामर्थ्य आणि तारण आहे.” तुम्ही म्हणता, “तो कदाचित माझे तारण करणार नाही.” तो सैतान आहे. त्याचे ऐकू नका! त्याच्यावर विश्वास ठेवलेल्या एकाचाहि नाश येशूने केला नाही. येशूवर विश्वास ठेवमारी एकहि हरविली नाही! आणि अशी त्याची इच्छा नाही.

त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे काय? रात्री अंथरुण मिळविण्यासारखे आहे. मला धरुन ठेवण्यास मी अंथरुणावर विश्वास ठेवतो. मी त्याच्यावर पडतो व विसावा घेतो. येशूवर विश्वास ठेवण्याचा तो एक मार्ग आहे. ख्रिस्तावर अवलंबून राहा. “भयंकर व मोठ्या वादळात” त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. “तुमच्या आत्म्याभोवती मार्ग देतात” तेव्हां त्याच्यावर विश्वास ठेवा. “गोड चौकटीवर विश्वास ठेवण्याचे धाडस मी करीत नाही, तर मी संपूर्णत: येशूच्या नावावर अवलंबून राहतो.” येशूवर अवलंबून राहा. जसे तुम्ही रात्री अंथरुणावर झोकून देता तसे त्याच्यावर झोकून द्या. ते अंथरुण तुम्हांला पाडणार नाही. येशू तुम्हांला पाडणार नाही. रात्री जसे तुम्ही अंथरुणावर झोकून देता, तसे तुम्ही त्याच्यावर झोकून द्या. अगदी भयंकर अशा प्रसंगी सुद्धा, तो तुम्हांस पाठिंबा देईल. मला अनुभवाने ठाऊक आहे की. “पण जर नाही, त्याला जाणून घ्या, हे राजा, ते तुमच्या दैवतांची सेवा करणार नाही, जी सुवर्ण मूर्ती स्थापिलेली आहे त्याची आराधना करणार नाही.” ख्रिस्तावर विश्वास ठेवा! ख्रिस्तावर विश्वास ठेवा! तुमचे तारण करण्यासाठी त्याने तुमच्या बदली दु:ख सहन केले व मरण पावला. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जीवनाच्या “प्रत्येक मोठ्या व भयंकर वादळात” तो तुम्हांला पाठिंबा देईल! प्रत्येक मोह व भीतीमध्ये. प्रत्येक परिस्थितीत, प्रत्यक्ष मृत्यूसमयी सुद्धा, येशू तुम्हाला अपयशी करणार नाही!


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यांनी गायले: “डेअर टु बी अ डॅनिएल”
(फिलीप्प पी. ब्लीस यांच्या द्वारा, 1838-1876).
“Dare to be a Daniel” (by Philip P. Bliss, 1838-1876).