संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
हेरोद आणि योहानHEROD AND JOHN डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लॉस एंजिल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश “कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष होता हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी तो त्याचे बोलणे ऐके तेव्हां फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई” (मार्क 6:20). |
राजा हेरोद व बाप्तिस्मा करणारा योहान यांची कथा पवित्रशास्त्र व इतिहासामध्ये खूप दु:खद अशी आहे. बाप्तिस्मा करणारा योहान हा उत्साही तरुण सुवार्तिक होता. तो विचित्र, दुर्बळ-इच्छाशक्तीचा असलेला राजा हेरोदाच्या — विरुद्ध बेधडक बोलणारा होता. योहानाचे म्हणणे तो ऐकून घेई. देवासह शांति असावी असे त्याला वाटे. परंतू त्याचा दुबळेपणा आणि निश्चयीपणाच्या अभावामुळे तो त्याच्या नाशाप्रत गेला – आणि बाप्तिस्मा करणा-या योहानाचा वधपर्यंत गेला, त्यामुळे शेवटी हेरोदाने योहानाचा शिरच्छेद केला!
हेरोद राजा विषयी जेव्हां मी वाचतो तेव्हां मला त्याच्याविषयी केद वाटतो. पण त्यानंतर त्याचा राग येतो. तो एक दु:खद मुर्खपणा होता. तो तारणाच्या अगदी जवळ आला होता. आणि तरीहि त्याला ते मिळाले नाही. तो परिवर्तनाच्या अगदी जवळ आला होता. आणि तरीहि तो नरकांत गेला. जेव्हां मी हेरोदाचा विचार करतो मि. ग्रिफिथ यांनी गायलेले गीत नेहमी मला सांत्वना देते,जवळजवळ विश्वास ठेवण्यास मन वळलेच होते;
जवळजवळ ख्रिस्ताला स्विकारण्यास मन वळलेच होते;
जवळजवळ लाभ घेतलाच नाही, जवळजवळ अपयशीच ठरला!
दु:खद, दु:खद कडवट विलाप, जवळजवळ आला पण हरला!
(“अलमोस्ट पर्सुएडेड” फिलीप्प पी. ब्लीस, 1838-1876).
जवळजवळ मन वळलेच होते! दु:खद, दु:खद कडवट विलाप −
जवळजवळ आला पण हरला!
हेरोद व बाप्तिस्मा करणा-या योहानाची कथा आपणास पुष्कळ ख्रिस्तीत्वाची सत्ये दर्शवितात.
पहिले, तारणाचा संदेश नहमी तुम्हांला निर्णय घेण्यास पाचारण करतो. आपणास “निर्णय” हा शब्द − “निर्णयकता” मधल्याप्रमाणे वाईट वाटतो. परंतू “निर्णयकता” वाईट होते कारण आपण चुकीचे निर्णय घेतो! हेरोद योग्य निर्णय घेऊ शकला असता. परंतू त्याऐवजी तो डळमळला – आणि बाप्तिस्मा करणा-या योहानाच्या उपदेशाच्या सत्यावर ठाम राहिला नाही. योहानाच्या घोषणेचा महत्वाचा मुद्दा निर्णय घेण्याचे आव्हान हे होते. त्याने पश्चाताप करण्यांबंधी घोषणा केली आणि ज्याने ते ऐकले त्याने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा केली. तो अगदी सामर्थ्याने घोषणा करी त्या योगे लोक आक्रोश करीत की, “मग आम्ही काय करावे?” (लुक 3:10). जेव्हां येशू आला तेव्हां त्याने सुद्धा अशीच घोषणा केली. त्याने लोकांना दोन पर्याय दिले. ते नरक किंवा स्वर्ग होता, रुंद मार्ग हा नाशाकडे किंवा अरुंद मार्ग हा जीवनाकडे जाणारा. वाळूववरील घर किंवा खडकांवरील घर. देव किंवा धन. लोक ख्रिस्ताची बाजूने, किंवा त्याच्या विरोधात जाऊ शकतात. लोकांनी त्याच्या बाजूने, किंवा त्याच्या विरोधात जाण्याचा निश्चय करावा असा ख्रिस्ताच्या प्रचाराचा हेतू होता. आणि अशाचप्रकारे पेंटॅकॉस्टच्या दिवशी पेत्राने प्रचार केला. पेत्राने अपेक्षा केली की लोकांनी निर्णय घ्यावा. आणि लोकांनी प्रतिसाद दिला, “आम्ही काय करावे?” (प्रे. कृ. 2:37). प्रेषितांची कृत्याच्या शेवटच्या अध्यायात पौलाच्या प्रचारानंतर लोकांमध्ये दोन गट पडले. “त्यांने जे सांगितले त्यावरुन कित्येकांची खातरी झाली तर कित्येक विश्वास ठेवितात” (प्रे. कृ. 28:24). त्यांना निर्णय घ्यावयाचा होता! आणि संपूर्ण ख्रिस्ती इतिहासात सर्व संजीवनामध्ये देवाच्या मनुष्यांनी असाच प्रचार केला. ज्यांनी ऐकले त्यांना निर्णय घ्यावा लागला!
आज आपण वेगळ्या प्रकारचा प्रचार ऐकतो. कोणतीहि अपेक्षा ठेवली जात नाही. कांही प्रचारक आरोग्यासाठी प्रमाणे बोलावितात. कांही प्रचारक त्यांना हलक्या व आवडेल अशा गोष्टी सांगतात. आणि इतर प्रचारक धुळी-सारखे-कोरडे प्रकटीकरण देतात त्यात रक्त पश्चाताप नसतो. अग्नि कुठे गेला? आव्हान कुठे गेले? आपल्या मंडळीतून तरुण निघून जात आहेत यात कांही आश्चर्य नाही! आजचा पुष्कळ प्रचार हा एखाद्या उबदार थुंकीच्या बादली एवढा सुद्धा नाही – एका वेगळ्या संदर्भाने उपाध्यक्ष जॉन नॅन्स गार्नर (1933-1941) यांचे हे विधान आहे. अशाप्रकारच्या प्रचाराने हेरोद व बाप्तिस्मा करणा-या योहानाची गोष्ट अगदी किंमतशुन्य दर्शविते. ख्रिस्त आपणास निर्णय घेण्यास सांगतो याची ही आठवण करुन देते. असो, तुम्ही निर्णय केला काय? त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम झाला काय? त्यामुळे तुमचा पालट झाला काय?
हेरोद “त्याचे आनंदाने ऐकी.” हेरोदास प्रचारक आवडत असे. त्याचा प्रचार ऐकून त्याला आनंद होई. परंतू त्याचा त्याच्यावर कांहीएक परिणाम झाला नाही. तुमचा उपदेश किती छान होता असे म्हणणारे लोक मला आवडत नाहीत. त्यातून मला कसलाच आनंद होत नाही. मला आनंद तेव्हांच होतो जेव्हां एखादा व्यक्ति आपल्या पापासाठी पश्चाताप करण्याचा निश्चय करितो व येशूच्या दयेत स्वत:ला सोपवून देतो. एखादा व्यक्ति ख-या परिवर्तनाने व जावनात बदल करुन येशूवर विश्वास ठेवण्याचा निश्चय करितो तेव्हां त्या गोष्टीने मला आनंद होतो. माझा उपदेश देवाने आशिर्वादित केला अथवा नाही याची ही प्रचिती होय! मग तुम्हांला आनंद व्हावा एवढेच नाही. तुम्ही त्यामुळे विचलीत व्हा, अथवा मी तुम्हांला आवडो व तुम्ही माझ्या उपदेशाने आनंदीत व्हावे एवढेच नाही. पडताळणी ही आहे की – तुम्हांस निश्चय करण्यास, अथवा पूर्ण अंत:करणाने व पूर्ण जीवनाने ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची कृति करण्यास प्रवृत्त केले का? एक व्यक्ति म्हणाली, “त्यांना आणखी काय हवे?” ख्रिस्ताला तुमचे संपूर्ण जीवन हवे – सर्व कांही!
परंतू हेरोदा सारख्या लोकांच्या बाबतीत कांहीतरी दु:खद आहे. त्यांने जवळजवळ निश्चय केला होता. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास जवळजवळ त्याचे मन वळले होते व खरा ख्रिस्ती होणार होता. हेरोदा सारखे लोक किती दु:खद व करुणास्पद आहेत. तुम्ही मंडळीत येता. तुम्ही आमचा प्रचार ऐकता. आणि तुम्ही भावनिक हलून जाता. तुम्हांला वाटते येशूवर विश्वास ठेवावा. तुम्ही म्हणता तुम्ही येशूवर विश्वास ठेवणार आहे. पण तुम्ही ते कधीहि करीत नाही. येशूवर विश्वास ठेवण्या ऐवजी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे हे सिद्ध करण्यास बघता. ते कधीहि घडत नाही! कधीहि नाही! कधीहि नाही! का नाही? तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या अगोदर त्याच्यावर विश्वास असल्याची ती तुमची “भावना“ कशी काय असू शकते? तो मुर्खपणा आहे! येशूवर विश्वास ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे केवळ त्याच्या वर विश्वास ठेवणे ना की भावना. येशूवर विश्वास ठेवण्यापासून तुम्ही एक पाऊल दूर आहांत. पण तुम्ही ते करु शकत नाही. किती तुम्ही विचित्र वृत्तीचे व्यक्ति आहांत. रविवार मागून रविवारी तुम्ही येता. परंतू तुम्ही तारणा-यावर विश्वास ठेवण्याचे नाकारता. उपासनेनंतर तुम्ही आम्हांला पाहायला सुद्धा येता — परंतू त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा कुठलाहि हेतू नसतो. मी तुम्हांला विचारतो, “तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला का?” तुम्ही म्हणता, “नाही.” तुम्ही अगदी ठामपणे “नाही” म्हणता — तुमचा विश्वास नसला तरी तुमची खूप खातरी असते. तुम्हांला इतकी खातरी का असते? हे असे असते कारण तुम्ही वेगळी भावना शोधता किंवा दुसरे कांही! ते कारण असायला हवे! परंतू तुमच्यासह मला प्रामाणिक वागू द्या. तुम्हांस जी “भावना” होते ते सैतानी आहे! सैतान तुमच्या मनासमोर घोटाळतो. “माझ्यात ते भावना असली पाहिजे! मला ती अगदीच पाहिजे! मी त्या सैतानी भावने शिवाय कधीहि संतुष्ट होत नाही!” जेव्हा सैतान तुम्हांला त्याच्या वर्तनाखाली ठेवतो, तेव्हां तुम्ही त्याच्या बंधनात जाता — तो तुम्हाला एक भावना देईल! त्यामुळे तुम्ही जादूमय व मोहीत झालेला असाल आणि तुमचे कधीहि तारण होणार नाही! ती सैतानी “भावना” ही तुमची प्रिय व्यक्ति, प्रियेशी, तुमची मूर्ति होईल. असे जेव्हा होईल तेव्हां तुम्ही अशा प्रकारच्या मजबूत, संमोहनाखाली जाल व तुम्ही कधीहि ख-या येशू, जो तुम्हांस तारण्यासाठी वधस्तंभावर मरण पावला त्याच्यावर विश्वास ठेऊ शकणार नाही! सैतानी “भावना” तुम्हांस खाली, बंधनात, गुलामीत, नरकाच्या खोल कुपात तो खेचून नेईल. सैतान तुम्हांवर हसत असल्याची “भावना” मला जवळजवळ ऐकू येते! तुम्हांला आता कळले का! तुम्हांला आता कळले का! आता तुम्ही नरकांत माझे अनंतकाळ गुलाम आहांत!” हसू नका. हजारो लोकांना वाटते त्यांच्या जवळ पवित्र आत्मा आहे — जेव्हां त्यांना कळते ते खरेच सैतान आहेत. ते आत्म्याने - भरण्या ऐवजी, ते सैतानाने काबीज केले जातात! जे तारण झाले आहे असे सिद्ध करु पाहातात अशा सर्वांना मी इशारा देतो − मी इशारा देतो! तुम्ही रहस्याशी खेळत आहांत! तुम्ही अग्निशी खेळत आहांत! सैतानी “भावनेतून” बाहेर पडा व येशू, देवाचा पुत्र याच्यावर स्वत:ला सोपवून द्या, ज्याने तुमच्या तारणासाठी रक्त सांडले व वधस्तंभावर मरण पावला!
असे कांही प्रचारक आहेत जे गुलामगीरीचा उगम आहेत. माझ्या ओळखीचे पाळक आहेत जे लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात, आणि तारणाते आश्वासन देतात, त्यावेळेस ते जे करतात ते सैतानी असते. ते विश्वासणा-यांना ख्रिस्ताऐवजी स्वत:मध्ये बांधतात. कोणत्याहि परिस्थितीमध्ये आपण बाप्तिस्मा करणा-या योहानाला मी या वर्गवारीत टाकू शकत नाही.
हेरोदाने योहानाला तुरुंगात टाकले, कारण योहान तिला व्यभिचारणी संबोधित असल्याने त्याची बायको हेरोदिया त्याचा द्वेष करी.पवित्रशास्त्र म्हणते, “कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष होता हे जाणून हेरोद त्याचे भय धरी.” त्याने पाहिले की योहान पवित्र पुरुष आहे. त्यामुळे तो योहानाला पाहण्यास पुन्हां व पुन्हा गेला. उतारा म्हणतो, त्याने “त्याला न्याहळले.” म्हणजे हेरोदाने “त्याला सुरक्षित ठेवले.” हेरोदाला ठाऊक होते की योहाना विषयी कांहीतरी पवित्र व वेगळे होते. तो “त्याचे [योहानाचे] आनंदाने ऐकी.” जे अनेक संताची उपासना करतात तसा तो होता. त्यांना ठाऊक असते की संतगण हे देवाचे लोक असतात, जसे की संत ऑगस्टिन. संताच्या वचन ते वाचतात व त्यावर मनन करतात, परंतू ते ख्रिस्तावर कधीहि विश्वास ठेवत नाहीत, ऑगस्टिन सारख्या लोकांनी तसे करण्यास सांगितले तरी. कॅथलिक संतांकडे पाहतात तसे हेरोद याहानाकडे पाहत होता. “त्यांने त्याचे आनंदाने ऐकले.” परंतू त्याची त्याला मदत झाली नाही!
योहानाला भेटण्यास हेरोद खाली तुरुंगात जात असे. त्याला ठाऊक होते की यामुळे त्याची बायको खिन्न होत असे. तरीहि तो नियमीत जाई. तो तिकडे ओढला जाई. तिकडे कोणीतरी त्याला ओढत आहे असे वाटे, कांहीतरी थोपता न येणारे होते. जेव्हां तो त्याचे ऐकण्यास जाई, “तो त्याचे आनंदाने ऐकी.” पवित्र आत्मा त्याला संदेष्ट्याचे ऐकण्यास ओढून नेई. याच कारणाने पुष्कळ लोक मंडळीस येतात. उपदेश त्यांना दोष लावीत असला तरी, मंडळीत असणे त्यांना आवडते. परंतू ते ख्रिस्ताला शरण जात नाहीत. हेरोद हा परिवर्तनाच्या अगदी जवळ आला होता. परंतू कधी बदललाच नाही. आणि त्यानंतर हेरोदाने बाप्तिस्मा करणा-या योहानाचा वध का केला? हेरोद, ह्या माणसाला आपण कसे समजू शकतो?
योहानाच्या प्रचारामध्ये हेरोदास देवाची समक्षता व सामर्थ्य जाणवी. योहान बरोबर होता हे त्याला ठाऊक होते. तरीहि तो ख्रिस्ताला शरण गेला नाही. त्याला योहान काय उपदेश करीत होता हे त्याला कळत होते. परंतू त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. तो शिकत आणि शिकत गेला, परंतू त्यांने येशूवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला नाही. त्याला त्याचे जीवन बदलायचे नव्हते. दुष्ट स्त्री हेरोदिया पासून त्याने विभक्त व्हायला हवे होते. त्यांने त्याच्या जीवनातील गोष्टी बदलायला हव्या होत्या. पुष्कळ पौर्वत्य तरुण त्याच्या सारखे आहेत. त्यांचे मातापिता त्यांना मंडळीस येऊ देतात, परंतू ते मंडळीत केलेल्या प्रचाराशी पूर्ण सहमत नसतात. आपण खूप कडक शिस्तीचे आहोत असे त्यांना वाटते. त्यांची मुले मंडळीला येतात – परंतू ते ओढले जातात. तुमच्या बाबतीत हे खरे आहे का? आम्ही खूप कडक शिस्तीचे आहोत असे तुमच्या मातापित्यांना वाटते का? त्यांना ते येऊ देतात, परंतू जेव्हां ते आमच्याशी बोलतात तेव्हां ते आमच्यावर टिका करतात. तुम्ही मंडळीत जास्त वेळ घालवू नये असे ते तुम्हांला सांगतील. ते असे म्हणतील, “आपण येथे एवढे असणे आवश्यक आहे का?” त्यामुळे तुम्ही तुमचे मातापिता व मंडळी यामध्ये फरपटले जाता. तुम्हांला माहित आहे की आम्गी बरोबर आहोत परंतू तुम्हांला तुमच्या मातपित्यास खुश करावयाचे असते. आमच्यासह एक ठाम भूमिका घेण्यास तुम्ही घाबरता, तुमच्या अ-ख्रिस्ती मातापित्याच्या विरोधात, आमच्यासह एक ठाम भूमिका घेण्यास तुम्ही घाबरता. येशू जे म्हणाला ते विसरले, “जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करितो तो मला योग्य नाही” (मत्तय 10:37). हेरोदाला ख्रिस्ती व्हावेसे वाटायचे, परंतू त्याच वेळेस तो हेरोदियाला सुद्दा खुश करायचे होते. पवित्रशास्त्र म्हणते, “द्विबुद्धीचा माणूस त्याच्या सर्व कार्यात चंचल असतो” (याकोब 1:8). डॉ. चार्ल्स सी. रेरी म्हणाले, “द्विबुद्धीचा माणूस हा निष्ठा दुभालेला [आहे]” (रेरी स्टडी बायबल). हेरोदा बरोबर हे चुकीचे घडले होते ना? त्याला ख्रिस्ती व्हायचे होते, तसेच त्याला हेरोदियाला सुद्धा खुश करायचे होते. तो द्विधा अवस्थेचा माणूस होता. त्यामुळे तो खरा ख्रिस्ती झाला नाही.
नुकतेच आमच्याकडे एक पौर्वत्य मुलगा होती. तिला तिच्या अ-ख्रिस्ती मातापित्यास खुश करावयाचे होते. परंतू तिला ख्रिस्ती सुद्धा व्हायचे होते. ती पूर्णत: येशूकडे येईस्तोवर शेवटी ती वैतागून गेली होती. तिने मातापित्याच्या विरोधात जायचे आणि पूर्णत: येशूकडे जाण्याचे ठरविले. ज्याक्षणी तिने हा निश्चय केला त्या वेळेपासून तिचे खरे परिवर्तन झाले. तिच्या जीवनाचा प्रभू तिने येशूला बनविण्याचे ठरविले. सर्व द्विधावस्था जाऊन ती एक सुंदर ख्रिस्ती झाली. परंतू हेरोदास बाप्तिस्मा करणारा योहान व हेरोदिया यांच्यातून निवड करणे जमले नाही. त्यामुळे तो खरा ख्रिस्ती बनला नाही. तो मेला व नरकात गेला. पवित्रशास्त्र म्हणते, “तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा” (यहोशवा 24:15). तुम्हांला तुमचे हरविलेले मातापिता व ख्रिस्त यातून निवड करावयाची आहे. तुम्हांला तुमचे हरविलेले मित्र व ख्रिस्त यातून निवड करावयाची आहे. तारणासाठी व ख्रिस्ताकरिता स्पष्ट साक्ष असण्यास दुसरा कोणताहि मार्ग नाही. हेरोदासारखे मागे पुढे जाऊ नका. ख्रिस्त व मंडळी निवडा. अगदी स्पष्ट निश्चय करा. “तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा.” “द्विबुद्धीचा माणूस त्याच्या सर्व कार्यात चंचल असतो” (याकोब 1:8). येशू म्हणाला, “जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करितो तो मला योग्य नाही” (मत्तय 10:37).
हेरोद योहानाचा उपदेश ऐकावयास गेला आणि “जेव्हां त्यांने ऐकले, तेव्हां त्याने पुष्कळ गोष्टी केल्या.” होय, त्यांने पुष्कळ गोष्टी केल्या. होय, प्रत्येक गोष्ट परंतू एक गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यांने कांही पापे करण्याचे सोडले होते यात शंका नाही. होय, “त्यांने पुष्कळ गोष्टी केल्या,” परंतू योहानाने सांगितलेली एक गोष्ट त्यांने केली नाही. त्यांने ख्रिस्तावर कधीच विश्वास ठेवला नाही! हेच कारण नव्हे का तुम्ही जवळजवळ एक ख्रिस्ती आहांत? जवळजवळ, परंतू अजूनहि हरविलेले! “पुष्कळ गोष्टी” पुरेशा नसतात. एक तरुण स्त्री म्हणाली, “त्यांनी आणखी काय करावे?” तिने असे म्हणायला हवे होते, “देवाला आणखी काय हवे?” हा मूळ उपदेश डॉ. मार्टिन लॉईड-जोन्स यांनी दिला आहे, जो मी घेतला आहे. डॉ. लॉईड-जोन्स म्हणाले, “तुम्ही मागे काय राखून ठेवत आहांत? आत्मपरिक्षण करा. शहाणे व्हा आणि ते जाऊ द्या! ‘पुष्कळ गोष्टी’ [पुरेशा] नाहीत. देवाला तुमचे संपूर्ण समर्पण हवे आहे, [केवळ] कांही पापे सोडून नव्हे तर तुमची संपूर्ण इच्छा समर्पण हवे,” संपूर्ण जीवन ख्रिस्ताला द्यायला हवे! (डॉ. मार्टिन लॉईड-जोन्स, एम.डी., “मिसींग द मार्क”).
मला केवळ एकच गोष्ट सांगावयाची आहे. वचन 24 मध्ये, हेरोदिया आपल्या मुलीला बाप्तिस्मा करणा-या योहानाचे शीर मागण्यास सांगितले. हेरोदास खूप दु:ख झाले, परंतू “त्याच्या समवेत बसलेल्या लोकांमुळे तो तिला नकार देऊ शकला नाही” (मार्क 6:26). अरे, येथेच — स्वत:च्या प्रतिष्ठा आणि इतरांचे चांगले मत यापोटी त्याने केले. त्याच्या अंत:करणात त्याला ठाऊक होते की हे लोक चुकीचे आहेत. दुस-या बाजूला, त्याने योहानाला नावाजले आणि तो बरोबर होता हे ठाऊक होते. तरीहि त्याने पाप्यानां दिले आणि योहानाचा उपदेश नाकारला. त्याने सार्वकालिक तारण नाकारले आणि नरकांत गेला कारण लोक काय म्हणतील याची त्याला भीति वाटली. अरेरे, सगळा तो मुर्खपणा! सगळे जग तुमच्यावर हसले आणि तुमची थट्टा केली, तुम्ही धार्मिक कट्टरवादी आहांत असे सगळ्या कुटुंबाने मान्य केले, सगळे तुम्हांला मुर्ख म्हणाले, तरी कांहीही फरक पडत नाही — जोवर तुमचा देवाने स्विकार केला आहे? केवळ तोच एक न्यायाधीश आहे!
देव जे सांगतो ते करा. त्याचा पुत्र येशूवर विश्वास ठेवा. तुम्ही ह्या घाणेरड्या जगापासून दूर गेला आहांत — आणि तुमचे संपूर्ण जीवन येशू ख्रिस्ताला दिले आहे हे तुमचे कुटुंब व मित्र, आणि सगळ्या जगास दाखवा!
एकदा का तुम्हांला समजले की ख्रिस्त बरोबर व खरा आहे त्यानंतर तुम्ही त्याला तुमचे संपूर्ण समर्पण करीत नाही तोवर तुम्हांला शांति लाभणार नाही. बिचारा हेरोद! योहानाचा शिरच्छेद केल्यानंतरचे त्याचे जीवन किती भयंकर झाले होते! योहानाने त्याचे जीवन पछाडून व त्रस्त करुन सोडले. जेव्हां येशूविषयी हेरोदाने ऐकले, त्याला वाटले तो मरणातून उठलेला, योहानच आहे. योहानाने रात्रीतल्या स्वप्नात त्याला पछाडून व त्रस्त करुन सोडले! तबकात योहानाचे शिर ठेवलेले असून ते त्याच्याकडे येत आहे असे त्याला स्वप्न पडले. तुम्ही जरी सत्य नाकारले तरी तुम्ही त्याच्याबरोबर नाही. ते नेहमी तुम्हांला पछाडील व सताविल. ते तुम्हाला विसावा व शांति देणार नाही. हेरोदाने योहानाविषयी भयंकर स्वप्न पडले — “अरे, योहान, मी तुझे का ऐकीत नाही? अरे, योहान, मी माझा जीव का फेकून दिला? अरे, योहान, ते माझ्याविषयी काय विचार करतील याविषयी मी का घाबरलो? अरे, योहान, मी किती मुर्ख होतो.”
योहानाचा शिरच्चेद केल्यानंतर हेरोदाच्या जीवनाचे चित्र. तुम्ही जगाला सोडण्याचे आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा, आणि स्वत:ला त्याला देण्याचा निश्चय करीत नाही तर, तुमचे जीवन सुद्धा, त्याहून भयंकर असेल. तुला घाबरतो अशा आरोपास मी भीत नाही. तुला घाबरण्याचा निश्चित प्रयत्न करीन. ख्रिस्ताचे अद्भूत प्रेम तुम्हांस आकर्षित करीत नाही तर मी ख्रिस्त विरहितच्या सार्वकालिक भयंकरपणास घाबरण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करीन. सार्वकालिक अपराधीपणा, सार्वकालिक दु:ख, न सांगता येणारा त्रास. जे सर्वकांही सोडण्यास आणि ख्रिस्ताला कवटाळण्यास अयशश्वी होतात अशा सर्वांसाठी हे वाट पाहते. हे करण्याची तो वाट पाहतांना, ख्रिस्त तुम्हांस तुमच्या पापापासून वाचवो. काहीही असो विश्वासाने ख्रिस्ताकडे या व त्याच्यावर विश्वास ठेवा — आणि तुमचे तारण होईल. दुसरा कोणताच मार्ग नाही. आमेन. जॉन कागॅन पुढे या व कोणीतरी येशूला आपले जीवन द्यावे म्हणून आम्हांस प्रार्थनेत चालवा. .
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यांनी गायले:
“अल्मोस्ट पर्सुएडेड” (फिलीप्प पी. ब्लीस यांच्या द्वारा, 1838-1876).
“Almost Persuaded” (by Philip P. Bliss, 1838-1876).