संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
सुवार्तिक उपदेश कसा तयार करावयाचा –
|
प्रेषिताने तिमथ्याला हे शब्द राजा निरोच्या छळाने पौल मारला जाण्याच्या थोडे अगोदर सांगितले. तिमथ्य हा पौलाचा शिष्य होता. सेवाकार्यासाठी पौलानेच त्याला प्रशिक्षण दिले होते. इफिस शहरात तिमथ्य पाळक झाला. तिमथ्याचे मुख्य काम हे एका पाळकाचे होते.
“सुवार्तिक फिलीप्प” (प्रे. कृ. 21:8) सारखी तिमथ्याची सेवा नव्हती. फिलीप्प हा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी गेला. फिलीप्प शोमरोनात गेला व तेथे ख्रिस्ताची घोषणा केली. (प्रे. कृ. 8:5). फिलीप्प वाळवंटात गेला आणि इथोपियाच्या षंडास ख्रिस्ताकडे आणले (प्रे. कृ. 8:26-39). नंतर फिलीप्पाने इतर नगरातहि सुवार्ता सांगितली (प्रे. कृ. 8:40). फिलीप्प सुवार्तिक म्हणून प्रवास करीत होता. तिमथ्य हा एका स्थानिक मंडळीचा पाळक होता.
“सुवार्तिकाचे काम कर” असे पौल तिमथ्याला का सांगत आहे? कारण प्रत्येक पाळकांस सुवार्तिकाचे काम करण्यास पाचारण आहे! “तुला [त्याची] सोपविलेली सेवा पूर्ण कर” असे पौल तिमथ्याला सांगत आहे (II तिमथ्य 4:5). त्याला सोपविलेली सेवा काय होती? सुवार्तिकाचे काम करताना! प्रत्येक पाळकांस सुवार्तिकाचे काम करण्यास पाचारण आहे! तुम्ही जर ते करीत नाही, तर देवाने जे तुम्हांस आज्ञापिले आहे ते तुम्ही करीत नाही!
प्रत्येक पाळक हा त्याच्या मंडळीत प्रचार करतो. हे त्याचे पाचारण आहे. आणि प्रत्येक पाळकाने त्याच्या मंडळीत सुवार्तिक प्रचार हा केलाच पाहिजे – आणि त्यांना वारंवार प्रचार करावा! तुम्ही शुभवर्तमान हे वर्षातून कधीतरी केवळ शब्बाथ शाळेवर सोडत असाल तर, तुम्ही विश्वासू प्रचारक नव्हेत. तुम्ही केवळ लोकांना शिक्षण देत आहांत तर, तुम्ही विश्वासू प्रचारक नव्हेत. केवळ पवित्रशास्त्राचे शिक्षण देणे हीच केवळ सेवा नव्हे. तर तुम्ही सुवार्तिकाचे काम केले पाहिजे. तुम्ही मंडळीत सुवार्तिक प्रचार हा केलाच पाहिजे, आणि तो नियमीत करावा.
सुवार्तिक प्रचाराचा उपदेश काय आहे? सुवार्तिक प्रचाराचा उपदेश हा थेट मंडळीत हरविलेल्या लोकांना उद्देशून असतो, जे प्रत्येक उपासनेत नेहमी असतात, त्यातील कांहीजण दर आठवड्याला येत असले तरी. संपूर्ण सुवार्तिक प्रचाराच्या उपदेशात ख्रिस्तामध्ये पाप व तारणाच्या सत्यासंबधी घोषणा केली जाते – ह्यासाठी की हरविलेले लोक ऐकतील, येशूवर विश्वास ठेवतील व तारण पावतील. सुवार्तिक प्रचाराचा उपदेश हा शास्त्रातील पुष्कळ वचनावरील विवरणात्मक उपदेश नसतो. प्रचार करण्यास एक किंवा दोन वचन घ्या. सुवार्तिक प्रचाराचा उपदेश हा जास्तीत जास्त एक किंवा दोन वचनाच्या सत्यावर प्रकाश टाकतो. पुष्कळ वचनाचे विवरण हे सुवार्तिक प्रचाराचा उपदेश नाही. स्पर्जनच्या सुवार्तिक प्रचाराचा उपदेशाचा अभ्यास करा. त्यातील एकही सध्या आपण ज्यांस “विवरणात्मक” उपदेश म्हणतो तो नाही. प्रेषितांच्या पुस्तकात एक सोडून सर्व उपदेश हे सुवार्तिक प्रचाराचे उपदेश आहेत. संपूर्ण प्रेषितांच्या पुस्तकात केवळ एकच “विवरणात्मक” उपदेश आहे! आपण सुवार्तिक प्रचाराचा उपदेश करतो तेव्हां प्रेषितांचे व स्पर्जनचे अनुकरण केले पाहिजे!
सुवार्तिक प्रचाराचा उपदेश करणारे खूप कमी पाळक आहेत. पुष्कळजण बिल्कुल प्रचार करीत नाहीत. आम्ही अमेरिकेत सुवार्तिक प्रचाराचा उपदेश क्वचितच ऐकतो. आणि इतर देशांमध्ये फारसे वेगळे नाही. पाळक त्यांच्या लोकांना पवित्रशास्त्र शिकवितात – किंवा आरोग्य, समृद्धी, आणि बरे कसे वाटेल ह्यांवर प्रचार करतात – कांहीहि परंतू ख्रिस्ताचे शुभवर्तमान! पवित्रशास्त्राचे पालन करीत नाहीत, जे म्हणते, “सुवार्तिकाचे काम कर.”
तुम्ही म्हणाल, “मी कसा काय सुवार्तिक प्रचाराच्या उपदेशाची तयारी करु? त्यासाठी मी काय कर?” त्याच संबंधी हा उपदेश आहे. सुवार्तिक उपदेश कसा प्रचार करायचा हे आज मी तुम्हांस सांगणार आहे.
सुवार्तिक प्रचाराचा उपदेश हा शुभवर्तमान केंद्रीत आहे. शुभवर्तमान उपदेश काय आहे? शुभवर्तमान सांगण्यास तुम्हांला अगोदर शुभवर्तमान ठाऊक असायला हवे. प्रेषित पौल म्हणतो,
“बंधूजनहो, जी सुवार्ता मी तुम्हांस सांगितली...शास्त्रप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिस-या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले” (I करिंथ 15:1, 3, 4).
पुन्हा, प्रेषित पौल म्हणतो,
“ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयांस जगांत आला”(I तिमथ्य 1:15).
सुवार्तिक उपदेशामध्ये दोन भाग आहेत. पहिला, मानवाच्या पापाची समस्या; आणि दुसरा, लोकांना त्यांच्या पापापासून वाचविण्यासाठी ख्रिस्ताने काय केले.
I. प्रथम, तुम्ही नियमशास्त्र सांगायला हवे – जे लोकांना त्यांच्या पापी ह्दयाविषयी सांगेल.
सुवार्तिक उपदेशाच्या पहिल्या भागात, तुम्ही नियमशास्त्र सांगायला हवे. एखाद्याने येशूवर का विश्वास ठेवावा? काय कारण आहे? येशू वधस्तंभावर का मेला? पुष्कळ उपदेशातून सांगितले जाते तुम्ही येशूवर विश्वास ठेवा म्हणजे तुमचे जीवन सुखकर, किंवा आनंदी, होईल किंवा प्रेम व मित्रत्व मिळेल. परंतू येशू वधस्तंभावर का मेला ते ह्यासाठी नव्हे! कांही उपदेशातून सांगितले जाते तुम्ही येशूवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही स्वर्गात जाल. तो स्वर्गात जाण्यास येशूची का गरज आहे हे सांगत नाही तर तो शुभवर्तमानाचा उपदेश नव्हे. पवित्रशास्त्र म्हणते, “ख्रिस्त आमच्या पापांसाठी मेला.” पवित्रशास्त्र म्हणते, “ख्रिस्त येशू ह्या जगांत पाप्यांना तारावयास आला.”
ते पापी नाहीत असे जर लोकांना वाटते तर, ते ख्रिस्ताकडे का येतील? ते येणार नाहीत! ते प्रार्थना करतील. ते त्यांचा हात उंच करतील. उपदेशाच्या शेवटी ते पुढे येतील. परंतू त्यांचे तारण होणार नाही! का? कारण त्याच्यात त्यांच्या तारणासाठी कांही नाही!
ते पापी आहेत हे तुम्ही लोकांना कसे सांगाल? त्यांना नियमशास्त्र सांगून. पवित्रशास्त्र म्हणते,
“नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते” (गलती 3:24).
नियमशास्त्र लोक पापी आहेत हे दर्शविते. त्यांना त्यांच्या ह्दयात पापाची जाणीव झाल्यावर, ते ख्रिस्ताकडे येऊ शकतात.
पुष्कळ पाळक नियमशास्त्र शिकविण्यास घाबरतात. लोक रागावतील म्हणून घाबरतात. “सुवार्तेमध्ये हीच मुख्य समस्या आहे” असे इआन एच. मुरे म्हणाले. जुना सुवार्ता प्रचार, त्यांच्या पुस्तकामध्ये (बॅनर ऑफ ट्रुथ, 2005; पृष्ठ 3 ते 37 वाचा), मुरे आपणास बरोबर सांगतात की आक्षेपाची भीति सध्या सुवार्तिक उपदेश एवढा निष्क्रीय होण्याचे मुख्य कारण आहे.
तुम्ही जे कांही कराल, वैयक्तिक पापांविषयी प्रचार करु नका. “हे करा. ते करु नका.” हे म्हणजे लोकांच्या ख-या, किंवा विशिष्ठ पापाविषयी बोलणे होय. परंतू पाप खोलवर जाते. ते आतून पापी आहेत. आदामापासून पीढीजात, त्यांचे पापी ह्दय आहे. त्यामुळेच दाविद म्हणतो, “पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हांचाच मी पातकी आहे” (स्तोत्र 51:5). त्यामुळेच पवित्रशास्त्र म्हणते, “ह्दय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगांनी ग्रस्त आहे” (यिर्मया17:9). आणि पवित्रशास्त्र म्हणते, “कारण देहस्वभावाचे [अपरिवर्तित मन] चिंतन हे देवाबरोबर वैर आहे” (रोम 8:7). त्यामुळे लोक वाईट गोष्टी करतात. ते जे कांही करतात ते जे आहेत त्यातून बाहेर येते. ख्रिस्त म्हणाला, “माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चो-या, खून... ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहे निघतात (मार्क 7:21, 23). ते जे कांही करतात ते जे आहेत त्यापेक्षा अधिक खोल. कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तरी, शेळी मेंढरामध्ये बदलू शकेल, परंतू तो त्याचे अंत:करण बदलू शकत नाही. ख्रिस्ती होण्यास लोकांना शिकवू शकत नाही. मी ह्या उपदेशात स्पष्ट केल्याप्रमाणे, त्यांनी प्रचार करावा. देव मानवी ह्दय व मानवी कृति ह्यांस दोष लावतो. पवित्रशास्त्र म्हणते, “सर्व पापवश आहेत” (रोम 3:9). परिवर्तनापूर्वी प्रत्येकजन पापाचे सामर्थ्य व दंडाच्या अधिन आहेत.
तुम्ही नियमशास्त्र शिकवावे कारण लोक त्यांची पापी अंत:करणे पाहतील व जाणतील. सध्या, प्रत्येकजन कोणत्यातरी प्रकारे ते पापी आहेत हे कबूल करतात. मी परिपूर्ण आहे असा कोणी दावा करणा-यांस कधीहि मी भेटलो नाही. एक मनुष्य प्रचारकास म्हणाला, “मी [पापी] आहे असे मी समजतो, परंतू तो मी नाही ज्यांस तुम्ही वाईट पापी म्हणून संबोधतता. मला वाटते, मी एक चांगला व्यक्ति आहे. मला माहित आहे की मी नेहमी चांगले करण्याचा प्रयत्न करतो.” तो मनुष्य तारणास तयार नव्हता! त्याचे तारण होण्यापूर्वी, तो एक “भयंकर” पापी आहे हे त्याला दिसायला हवे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या पापी ह्दयाबद्दल सांगितले पाहिजे.
परमेश्वराच्या नियमशास्त्राविना, लोक त्यांना ख्रिस्ताच्या सुवार्तेची गरज का आहे हे ते पाहणार नाहीत. त्यामुळे तुम्ही शुभवर्तमान सांगण्यापूर्वी तुम्ही नियमशास्त्र सांगितले पाहिजे. पवित्रशास्त्र म्हणते, “नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते” (गलती 3:24). बालरक्षकाप्रमाणे, लोकांना ख्रिस्ताची का गरज आहे हे नियमशास्त्र दाखविते. प्रथम नियमशास्त्र. मग शुभवर्तमान. ल्युथर काय म्हणाला ते अगदी बरोबर आहे. तुम्हांला सुवार्तिक उपदेश करावयाचा आहे तर तो जे कांही म्हणाला ते काळजीपूर्वक अभ्यासा. ल्युथर म्हणाले,
तुमचा पालट झाला आहे तर, त्याचा तुम्हांला [त्रास] व्हावा, हे आवश्यक आहे, तेच, तुमच्या जाणीवेच्या धोक्याची घंटा वाजेल व भीति वाटेल. मग, अशी स्थिती निर्माण झाल्यावर, तुम्ही तुमच्या कार्याने नव्हे तर देवाच्या कार्याने मिळालेली सांत्वना ग्रहण करा. त्याने त्याचा पुत्र येशू ह्यास भयंकर पाप्यांना देवाची दया सांगण्यास ह्या जगात पाठविले. हा परिवर्तनाचा मार्ग आहे. बाकी सर्व खोटे मार्ग आहेत (मार्टिन ल्युथर, टीएच.डी., ल्युथर काय म्हणतो, कॉनकॉर्डीया पब्लिशींग हाऊस, 1994, पुनर्मुद्रन, क्रं. 1014, पृष्ठ 343).
मी म्हटले, “तुम्ही नियमशास्त्र सांगितले पाहिजे म्हणजे लोक त्यांचे आंतरिक पाप पाहतील व समजतील.” मी म्हटले नाही की, “तुम्ही नरका संबंधी सांगावे.” होय, ख्रिस्त नरकासंबंधी बोलला. नरक हे वास्तव आहे. परंतू तुम्ही नरकासंबंधी प्रचार करताना सावध असावे. नरकास घाबरुन कोणाचे तारण होऊ शकत नाही. ते चांगला व्यक्ति बनण्याचा प्रयत्न करतील. ते खूप धार्मिक होतील. परंतू नरकास घाबरुन कोणाचेहि तारण झाले नाही. ख्रिस्त आपल्या पापासाठी मेला. नरक हा केवळ पापाचा परिणाम आहे. खरा समस्या पाप आहे, नरक नाही. नरकावरील संपूर्ण उपदेश लोकांचा पालट करु शकत नाही असे आपणांस आढळले. परंतू सुवार्तिक उपदेशाचा छोडासा भाग त्यांचे पाप उजागर करतो – केवळ वैयक्तिक पाप नाही, परंतू त्यांच्या अंत:करणाचे पाप सुद्धा.
लोकांना त्याचे पाप दाखविण्यासाठी, तुम्ही त्यांच्या पापी, बंडखोर अंत:करणाविरुद्ध बोलले पाहिजे. परंतू तेथेच शेवट करु नये. नियमशास्त्र कोणाचेहि तारण करत नाही. नियमशास्त्र केवळ त्यांच्या अंत:करणातील पाप दर्शविते. पवित्रशास्त्र म्हणते, “नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीहि मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही...नियमशास्त्राच्याद्वारे पापाची जाणीव होते” (रोम 3:20). पवित्रशास्त्र म्हणते की लोकांचे तारण “जे नियमशास्त्र करु शकत नाही” (रोम 8:3). फक्त ख्रिस्तच पाप्यांचे ह्दय बदलू शकतो. केवळ ख्रिस्ताचे रक्तच पाप धुवू शकते. आणि तो मला दुसरा मुद्दा मिळाला.
II. दुसरे, तुम्ही शुभवर्तमान प्रचार केला पाहिजे – जो लोकांना त्यांच्या पापापासून वाचविण्यास ख्रिस्ताने काय केले ते सांगतो.
तुमच्या सुवार्तिक उपदेशाच्या दुस-या भागात, तुम्ही शुभवर्तमान प्रचार केला पाहिजे. शुभवर्तमान प्रचार करणे म्हणजे चांगले कसे बनावे हे शिकविणे नव्हे. शुभवर्तमान म्हणजे मंडळी, किंवा स्वर्गासंबंधी संदेश नव्हे. शुभवर्तमान म्हणजे “शास्त्रानुसार ख्रिस्त तुमच्याआमच्या पापासाठी मरण पावला” (I करिंथ 15:3). शुभवर्तमान म्हणजे “ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगांत आला” (I तिमथ्य 1:15).
शुभवर्तमान हे नियमांचा संच नव्हे. शुभवर्तमान हे दर्शवितो की देव तुमच्यावर एवढी प्रीति करतो की त्यासाठी ख्रिस्त मरावयास आला. शुभवर्तमान हे नियमशास्त्राच्या बाहेर बनविले नाही. हे शुद्ध प्रेम व कृपा आहे. जसे की ल्युथर म्हणाले,
शुभवर्तमान... आम्ही काय करावे किंवा करु नये ह्याचा प्रचार करीत नाही. कशाची मागणी करत नाही परंतू आमचा नियमशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन राखतो, अगदी विरुद्ध करतो, आणि म्हणतो, ‘हेच ते आहे जे देवाने तुझ्यासाठी केले आहे; त्याने तुझ्यासाठी आपल्या पुत्रास देहरुपी केले, तुमच्यासाठी मरण सोसण्यास भाग पाडले’...शुभवर्तमान शिकविते की...देवाने आम्हांस काय दिले आहे, आणि काय दिले नाही...आम्ही देवासाठी काय करावे आणि काय द्यावे (“ख्रिस्ती लोकांनी मोशेला कसा मान द्यावा,” 1525).
ख्रिस्ताने जे वधस्तंभावर व रिकाम्या कबरेत केले त्याद्वारे शुभवर्तमान पाप्यांस नवे ह्दय, आणि पापाची क्षमा देऊ करते! व्यक्ति जो येशूवर विश्वास ठेवतो
“देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरुन प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित [पापाची खंडणी] होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले” (रोम 3:24, 25).
पवित्रशास्त्र म्हणते की “देव आपणांवरच्या स्वत:च्या प्रीतीचे [प्रमाण] हे देतो की, आपण पापी असतांनाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला... [आपण] त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविले गेलो” (रोम 5:8, 9). ख्रिस्त पाप्याच्या ऐवजी त्याच्या पापाची खंडणी भरण्यासाठी मरण पावला. जसे की यशया म्हणतो, “आम्हां सर्वाचे पाप परमेश्वराने त्याज [ख्रिस्त] वर लादले” (यशया 53:6). शुभवर्तमान हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मोफत पापाच्या क्षमेची कृपा आहे.
तुम्ही शुभवर्तमान सांगता तेव्हां, केवळ ख्रिस्ताचे मरण सांगू नका. ख्रिस्ताचे पुनरुत्थान सांगा! हाहि शुभवर्तमानाचा भाग आहे की ख्रिस्त “शास्त्राप्रमाणे तिस-या दिवशी त्याला उठविण्यात आले” (I करिंथ 15:4). ख्रिस्ताचे पुनरुत्थान गरजेचे आहे. पवित्रशास्त्र म्हणते, “ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ; तुम्ही अजून आपल्या पापांतच आहां” (I करिंथ 15: 17). ख्रिस्त त्याच्या कबरेत मृत राहिला नाही. पाप्यांना नवीन ह्दय देण्यासाठी तो मरणांतून पुनरुत्थित झाला (पाहा यहेज्केल 11:19; 36:26, 27).
केवळ ख्रिस्ताचे मरण सांगू नका. ख्रिस्ताचे रक्त सांगा! “त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे” लोकांचे तारण झाले हे लक्षात ठेवा (रोम 3:25). आपणांस “त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आले” (रोम 5:9). आणि पवित्रशास्त्र म्हणते, “रक्त ओतल्यावाचून पापक्षमा [क्षमा नाही] होत नाही” (इब्री 9:22). तारणासाठी ख्रिस्ताच्या रक्ताची गरज नाही, व आणि आता ख्रिस्ताचे रक्त नाही असे जेव्हां डॉ. जॉन मॅक्ऑर्थर सांगतात आणि पुष्कळ प्रचारक त्यांचे अनुकरण करतात तेव्हां मला त्याचे आश्चर्य वाटते. परंतू विश्वासू व चांगला पाळक ख्रिस्ताच्या रक्ताची घोषणा करतो! डॉ. मार्टिन लॉयड-जॉन बरोबर होते जेव्हां ते म्हणाले, “संजीवनाच्या काळात...[मंडळी] तिला रक्तात अभिमान वाटतो... एकमेव मार्ग ज्याने आपण सर्वात पवित्र [स्थानी] धैर्याने प्रवेश करतो, आणि तो म्हणजे येशूच्या रक्ताने” (संजीवन, क्रॉसवे बुक्स, 1992 आवृत्ती, पृष्ठ 48). रक्ताची घोषणा करा! रक्ताची घोषणा करा! “त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करिते” (I योहान 1:7).
शुभवर्तमान हे ख्रिस्तात देवाची मोफत कृपा देणगी आहे. पापी स्वत:ला चांगला करु शकत नाही. केवळ एकच गोष्ट आहे पापी करु शकतो. त्याने येशूवर विश्वास ठेवायला हवा. ख्रिस्ताविषयीचे सत्य तो फक्त त्याचे तारण करीत नाही ह्यावर विश्वास ठेऊन. त्याने स्वत: येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रेषित पौल फिलिप्पैच्या तुरुंग अधिका-यास म्हणाला, “प्रभू येशू ख्रिस्ता वर [ग्रीक इपी = च्यावर, च्यामध्ये] विश्वास ठेव, आणि तुझे तारण होईल” (प्रे.कृ. 16:31). पापी येशूवर विश्वास ठेवतो तर, त्याचे तारण होईल. आणि सर्व पाप्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. बाकी सर्वकांही येशू करील. नवीन जन्मात तो पाप्यांना नवीन ह्दय देतो (इफिस 2:5; योहान 3:6, 7) आणि तो त्याच्या रक्ताने पाप्याची सर्व पापे शुद्ध करतो (इब्री 9:14; प्रकटी. 1:5b; 5:9b). फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा, आता फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुमचे तारण करतो, तो तुमचे तारण करतो, आता तो तुमचे तारण करतो” (“फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा“ जॉन.एच. स्टॉकटन यांच्याद्वारा, 1813-1877).
तुमच्या उपदेशाच्या शेवटी, येशूवर विश्वास ठेवण्यास पाप्यांना पाचारण करा. त्यांच्याशी ज्या ठिकाणी खाजगीत बोलणार आहांत त्या ठिकाणी येण्याचे आमंत्रण द्या. ते तुमच्याशी बोलण्यास आले म्हणजे तुमचे काम संपले नाही. “पुढे येणे” म्हणजे येशूवर विश्वास ठेवण्यासारखे नव्हे. “हात उंचाविणे” किंवा “पाप्याची प्रार्थना” म्हणणे म्हणजे येशूवर विश्वास ठेवण्यासारखे नव्हे. येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे येशूवर विश्वास ठेवणे - त्याहून कांही नाही. त्यामुळे तुमच्या आमंत्रणास प्रतिसाद देण्या-या लोकांशी उपदेश संपल्यावर तुम्ही बोलणे गरजेचे आहे. आणि त्यांचेहि तुम्ही लक्षपूर्वक ऐकणे का गरजेचे आहे हे कळेल. त्यांचे ऐकण्याने त्यांच्या खोट्या समजुती तुम्हांला कळतील, व तुम्ही त्या सुधाराल. त्या प्रत्येकाशी तुम्ही व्यक्तीश: बोला आणि त्यांना ख्रिस्ताकडे आणण्यास तुमचे सर्वस्व द्या. परंतू तो दुस-या संदेशाचा विषय आहे. अंत:करणातील पाप व ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे क्षमा ह्यावर प्रचार करीत असतां देव तुम्हाला आशिवार्दित करो.
डॉ. आर. एल. हायमर्स ज्युनि. यांनी लिहलेला सुवार्तिक प्रचारावरील उपदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा. डॉ. हायमर्स हे गेली साठ वर्षे सुवार्तिक प्रचारावरील उपदेश करीत आहेत. त्यांचे सुवार्तिक प्रचारावरील उपदेश, “वॉश ऍन्ड बी क्लिन! – अ टायपॉलॉजी ऑफ कनव्हर्जन” वाचून तुम्ही पुष्कळ शिकाल. ते वाचण्यासाठी शिर्षकावर क्लिक करा. नियमशास्त्र व सुवार्तिक प्रचारावरील उपदेश कसा सांगावा हे तुम्हांला दाखविल.
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
रुपरेषा सुवार्तिक उपदेश कसा तयार करावयाचा – HOW TO PREPARE AN EVANGELISTIC SERMON – डॉ. सी.एल. कागॅन व डॉ. आर.एल. ङायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर” (II तिमथ्य 4:5). ( प्रे. कृ. 21:8; 8:5, 26-39, 40; I करिंथ 15:1, 3, 4; I तिमथ्य 1:15)
I. प्रथम, तुम्ही नियमशास्त्र सांगायला हवे – जो लोकांना त्यांच्या पापी ह्दयाविषयी सांगेल, गलती 3:24; स्तोत्र 51:5; यिर्मया 17:9; रोम 8:7; मार्क 7:21, 23;
II. दुसरे, तुम्ही शुभवर्तमान प्रचार केला पाहिजे – जो लोकांना त्यांच्या पापापासून वाचविण्यास ख्रिस्ताने काय केले ते सांगतो, I करिंथ 15:3; I तिमथ्य 1:15;
|