संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
प्रार्थना कशी करावी व प्रार्थना सभा कशी आयोजित करावी(डॉ. तिमथी लीन यांचे शिक्षण, 1911-2009) डॉ. आर.एलङायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लिखीत व “तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हां त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” (लुक 18:8). |
डॉ. हायमर्स पुष्कळ वर्षे पाळक म्हणून सेवा, डॉ. तिमथी लीन (1911-2009), पवित्रशास्त्राचे मोठे विद्वान होते. त्यानी इब्री व तत्सम भाषेमध्ये पीएच.डी केली. ते 1950 मध्ये, बॉब जोन्स विद्यापिठाच्या पदवी शाळेमध्ये, सिस्टमॅटिक थियॉलॉजी, बिब्लीकल थियॉलॉजी, इब्री जुना करार, बिब्लीकल अरामिक, शास्त्रीय अरामिक, आणि पेशिता सिरिया. मग ते डॉ. जेम्स हडसन टेलर III यांच्या नंतर, चायना इव्हांजिलीकल सेमीनरीचे अध्यक्ष होते. ते एक न्यू अमेरिकन स्टॅन्डर्ड बायबल (NASB) मध्ये जुन्या कराराचे अनुवादक होते. डॉ. लीन हे डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांचे चोविस वर्षे पाळक होते. कोणताहि प्रश्न न करता डॉ. हायमर्स म्हणाले, ओळखीत असलेल्यांमध्ये डॉ. लीन हे एक सर्वात प्रभावशाली पाळक होते. डॉ. हायमर्स त्यांच्या मंडळीचे सभासद होते तेव्हां त्यांनी देवाने पाठविलेले संजीवन पाहिले ज्यात शेकडो लोकांचे तारण झाले व ते मंडळीत आले.
“तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हां त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” (लुक 18:8).
ब-याच कॉमेन्ट्रीज ह्या वचनाचा योग्य अर्थ लावत नाहीत. उदाहरणत:, एक प्रसिद्ध कॉमेन्ट्री म्हणते, “संपूर्ण पृथ्वीवर सामान्यत: स्थिती ही अविश्वासाची असेल.” परंतू ह्या उता-यात येशूला हे सांगावयाचे नाही. तो येथे सामान्यत: शेवटच्या विश्वास त्यागासंबंधी बोलत नाही, किंवा तो परत येणार त्यावेळी खरे ख्रिस्ती असतील का याविषयी विचारीत नाही. खरे तर, येशूने पेत्रासमोरच म्हटले,
“ह्या खडकावरमी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे कांहीच चालणार नाही” (मत्तय 16:18).
मत्तय 16:18 आपणास हे दर्शविते की, कितीहि खोल व भयंकर असा मोठा विश्वास त्याग असो, ख्रिस्त परत येईल तेव्हां तेथे पुष्कळ ख्रिस्ती आपले तारण राखतील. पुष्कळ ख्रिस्तीजणांचे वर उचलले जाणे होईल, विशेषत: चीन व तिस-या जगात, जेथे आता खरे संजीवन आहे.
“कारण, आज्ञाध्वनी आद्यदिव्यादूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असतां प्रभू स्वत: स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील; नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारुढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू” (I थेस्सल. 4:16-17).
महान संकटाच्या काळात सुद्धा मोठ्या लोकसमुदायाचे तारण होईल.
“कोणाला मोजता आला नाही असा, मोठालोकसमुदाय माझ्या दृष्टीस पडला” (प्रकटी. 7: 9).
“मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; ह्यांनी आपले झगे कोक-याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत” (प्रकटी. 7:14).
अशाप्रकारे, येशू तो येणार तेव्हां विश्वास नसणार याविषयी बोलत नाही, नव्हे तर तो म्हणतो,
“तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हां त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” (लुक 18:8).
I. प्रथम, प्रार्थना राखून ठेवण्याचे महत्व.
पुष्कळशा कॉमेन्ट्रीज ह्या चुकीच्या आहेत, परंतू डॉ. लीन यांनी ह्या उता-याचा खरा अर्थ अनुवादित केला आहे, डॉ. लीन म्हणाले,
पवित्रशास्त्रात “विश्वास” हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला आहे. त्याचा खरा अर्थ हा त्याचा संदर्भ तपासूनच सांगता येतो. ह्या उता-याच्या अगोदर एक दाखला दिला आहे, आम्ही सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये हे तो दर्शवितो [लुक 18:1-8a], तसेच त्या नंतरचा उतारा [लुक 18:9-14] हा परुशी व जकातदाराच्या प्रार्थनेचा दाखला आहे. अशाप्रकारे, ह्या वचनाचा [लुक 18:8] संदर्भ स्पष्ट निर्देशित करतो की “विश्वास” हा शब्द येथे प्रार्थनेतील विश्वास संदर्भित करतो. आणि आपल्या प्रभूचे वाक्य हे त्याच्या दुस-या आगमन समयी मंडळी आपला प्रार्थनेतील विश्वास गमावितील असे आहे. (तिमथी लीन, पीएच.डी., द सिक्रेट ऑफ चर्च ग्रोथ, लॉस एंजिल्स येथील पहिली चीनी बाप्टिस्ट मंडळी, 1992, पृष्ठ 94-95).
डॉ. लीन म्हणाले की लुक 18:1-8 मधील दाखल्यातील मुद्दा असा आहे की ख्रिस्ती लोकांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. वचन आठवे हे दर्शविते की शेवटच्या दिवसांत, ज्या दिवसांत आपण राहत आहोत त्यात ख्रिस्ती लोक प्रार्थनेतील विश्वास राखणार नाहीत. त्यामुळे आपण असे म्हणत ह्या उता-यावर प्रतिक्रिया देत आहोत,
“तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हां त्याला पृथ्वीवर विश्वास [प्रार्थनेतील विश्वास राखीत] आढळेल काय?” (लुक 18: 1, 8).
डॉ. लीन म्हणायचे,
मंडळीतील सध्याच्या प्रार्थना सभा ह्या खरेतर निर्जन झाल्या आहेत [किंवा प्रतिकात्मक एक किंवा दोन प्रार्थनेसह, मध्य–सप्ताहाच्या पवित्रशास्त्राभ्यासात रुपांतरीत झाल्या आहेत]. अशाप्रकारच्या स्थितीचा सामना करताना, मोठ्या संख्येने मंडळ्या याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताहेत आणि त्यांच्या स्वत:च्या आनंदाखातर ते उपभोग घेतात, [ब-याचदा] त्यांच्या प्रार्थना सभा पूर्णत: ते रद्द करतात. हे प्रभूचे दुसरे आगमन जवळ आल्याचे [एक] चिन्ह आहे! सध्या, पुष्कळसे मंडळ्यांचे सभासद हे त्यांच्या प्रभूपेक्षा दूरदर्शनची उपासना करतात...हे अगदी दुर्दैवी आहे!...शेवटच्या दिवसांतील मंडळ्या दर्शवितात...हे प्रार्थना सभेचे कमालीचे औदासीन्य [रस नसणे] आहे. (तिमथी लीन, पीएच.डी., ibid., पृष्ठ 95).
अशाप्रकारे लुक 18:8 हे ख्रिस्ताच्या दुस-या आगमनापूर्वीचे मंडळीतील प्रार्थनाहिनतेचे चिन्ह देते, ज्यात आपण राहत आहोत त्याचे चिन्ह, तारणासंबंधीच्या विश्वासाचा पूर्णत: अभाव नव्हे. दुस-या प्रभूच्या आगमनापूर्वीचे मंडळीतील प्रार्थनाहिनता हे चिन्ह आपण शेवटच्या काळात राहत आहोत याचे होय.
“तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हां त्याला पृथ्वीवर विश्वास [प्रार्थनेतील विश्वास राखीत] आढळेल काय?” (लुक 18: 8).
II. दुसरे, प्रार्थना सभेचे महत्व.
वैयक्तिक प्रार्थना ही, प्रार्थना सभेतील सामुहिक प्रार्थने एवढी अधिकार व सामर्थ्ययुक्त असत नाही असे डॉ. लीनहि दर्शवितात. ते म्हणाले,
लोक ब-याचदा म्हणतात की तुम्ही एकट्याने प्रार्थना केली किंवा समुहाने केली त्याने फरक पडत नाही, तसेच तुम्ही एकट्याने घरी प्रार्थना केली किंवा बंधू व भगिनीसोबत मंडळीत केली तरी कांही हरकत नाही. अशाप्रकारची विधाने हे स्वत:च्या आळशीपणाबद्दल स्व-सांत्वना असे होय, किंवा प्रार्थनेच्या सामर्थ्यास दुर्लक्षित केल्याचे लाघवी पण लबाड स्पष्टीकरण होय! या प्रार्थनेच्या संदर्भात आपला प्रभू काय म्हणतो ते पाहा:
“मी आणखी तुम्हांस खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे [मंडळी मध्ये] कोणत्याहि गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करितील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्याच्यासाठी केली जाईल, कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावांने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे” (मत्तय 18:19-20).
आपला प्रभू आपणास ठामपणे आठवण करुन देतो की केवळ एकट्याच्या प्रयत्नाने ह्या दैवी अधिकाराचा वापर कधीहि होऊ शकत नाही, तर संपूर्ण मंडळीच्या [द्वारे] केलेल्या सामुहिक प्रयत्नाने होऊ शकतो. दुस-या शब्दात, संपूर्ण मंडळी जेव्हां...एक चित्ताने [प्रार्थना] करतील तर...मंडळी प्रभावीपणे हा अधिकार त्यांच्याकडे [असेल]. तसेच, शेवटच्या काळातील मंडळी, हे सत्य पाहू शकणार नाहीत, किंवा देवाचे सामर्थ्य [मिळविण्याची] योग्य पद्धत आठवणार नाही. हे किती मोठे नुकसान आहे! मंडळीस स्वर्गातून अधिकार प्राप्त आहेत, परंतू त्याच्या व्यवस्थापनाचे ज्ञान नाही, तरीहि तळागाळातील लोकांना सोडविण्यास, आणि पुढे देवाच्या समक्षतेच्या वास्तवतेचा अनुभव घेण्यास, ती सैतानाचे कार्य बांधू इच्छिते. अरेरे, ते केले जाऊ शकत नाही! (तिमथी लीन, पीएच.डी., ibid., पृष्ठ 92-93).
म्हणून, डॉ. लीन यांनी प्रार्थनेतील विश्वास, आणि मंडळीची प्रार्थना सभा यांचे खरे महत्व शिकविलेले आहे.
III. तिसरे, “एक चित्ताने” प्रार्थना करण्याचे महत्व.
कृपया प्रे. कृ. 1:14, कडे वळा आणि ते मोठ्याने वाचा.
“हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यास तत्पर असत.” (प्रे. कृ. 1:14).
“हे सर्व एक चित्ताने प्रार्थना व विनंत्या करण्यास तत्पर असत...”
डॉ. लीन म्हणाले,
चीनी पवित्रशास्त्रात “एका चित्ताने” हा “एक अंत:करण व एक मन” असे अनुवादित केले जाते. त्यामुळे, प्रार्थना सभेत देवाची समक्षता मिळविण्यास, त्या सर्वानी केवळ प्रार्थनेच्या वास्तवाचे महत्व समजून चालणार नाही, तर त्यांनी ख-या इच्छेने...विनंत्या अर्पिण्यास [प्रार्थना सभेस] सुद्धा यायला हवे, आणि एका चित्ताने देवाकडे मध्यस्ती व आभार प्रदर्शन केले पाहिजे. मग प्रार्थना सभा यशस्वी होतील आणि दुस-या सेवा देखील यशस्वी होतील (तिमथी लीन, पीएच.डी., ibid., पृष्ठ 93-94).
एक जण पुढारीपण करताना “एका चित्ताने प्रार्थना करण्यास” आम्ही सर्वांनी “आमेन” म्हटले पाहिजे. आपण सर्व “आमेन” म्हणतो तेव्हां आपण “एका चित्ताने” प्रार्थना करतो.
तुम्ही डॉ. लीन यांचे प्रार्थनेतील विश्वास, मंडळीच्या प्रार्थना सभा, आणि ऐक्य, “एका चित्ताने प्रार्थना” करण्याचे महत्व ऐकले आहे. तरीहि तुमच्यातील आज रात्री कांहीजण आज रात्री आपल्या कोणत्याच प्रार्थना सभेस हजर राहत नाहीत. तुमचे आध्यात्मिक जीवन मरगळलेले आहे याचे आश्चर्य नाही! आज रात्री आज रात्री कोण आहे का जो म्हणेल, “पाळकसाहेब, आजपासून मी किमान एकातरी प्रार्थना सभेस हजर राहीन”? कृपया आपले नेत्र बंद करा. तुम्ही ते करु इच्छिता तर, त्यांनी आपला हात वर करा. प्रत्येकांनी प्रार्थना करा की हे वचन पाळण्यास देवाने त्यांना साहाय्य करावे! (सर्व प्रार्थना करतात).
तुमचे अजूनहि परिवर्तन झाले नसेल तर, मी तुम्हांला कळकळीची विनंती करतो की किमान शनिवार संध्याकाळच्या प्रार्थना सभेस हजर राहा. कृपया आपले नेत्र बंद करा. कोण म्हणेल, “होय, पाळकसाहेब, मी प्रत्येक शनिवार संध्याकाळच्या प्रार्थना सभेस यायला सुरुवात करतो”? कृपया त्यांनी आपला हात वर करा. प्रत्येकांनी प्रार्थना करा की हे वचन पाळण्यास देवाने त्यांना साहाय्य करावे! (सर्व प्रार्थना करतात).
तुमच्या पापाचा मोबदला देण्यास ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. तुमचे पाप धुण्यासाठी त्यांना आपले रक्त सांडले. तुमच्या पापाचे प्रायश्चित म्हणून, तो भयंकर अशा दु:खातून गेला, त्याला वधस्तंभावर खिळले. तो तिस-या दिवशी मरणातून उठला. तो देवाच्या उजव्या हाताला जिवंत आहे. तुम्ही ख्रिस्ताकडे या व तुम्ही तुमच्या पापापासून तारण मिळेल.
आज रात्री आम्हांमध्ये तारण न झालेला कोण आहे आणि आम्ही त्याच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करावी असे कोणाला वाटते काय? पुन्हां एकदा आपले नेत्र बंद करा. कृपया त्यांनी आपला हात वर करा. प्रत्येकांनी प्रार्थना करा की त्यांनी त्यांच्या पापासाठी पश्चाताप करावा आणि त्याच्या रक्ताने शुद्ध व्हावे म्हणून, ख्रिस्ताकडे यावे!
डॉ. चान, आज रात्री कोणाचे तरी तारणा व्हावे म्हणून कृपया प्रार्थनेत आम्हांला चालवा. खरे ख्रिस्ती होण्या संदर्भात जर तुम्हांला आमच्याशी बोलावयाचे असेल तर कृपया डॉ. कागॅन, जॉन कागॅन आणि नोहा सॉंग यांच्या मागे मागील सभागृहात जा. ते तुम्हांला एकांत स्थळी नेतील जेथे आम्ही तुमच्याशी बोलू व तुमच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करु.
डॉ. लीन यांचे आत्मचरित्र विकीपीडीयावर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यांनी गायले:
“दिस द ब्लेस्ड अवर ऑफ प्रेअर” (फॅनी जे. क्रॉसबी यांच्याद्वारा, 1820-1915).
“‘Tis the Blessed Hour of Prayer” (by Fanny J. Crosby, 1820-1915).
रुपरेषा प्रार्थना कशी करावी व प्रार्थना सभा कशी आयोजित करावी (डॉ. तिमथी लीन यांचे शिक्षण, 1911-2009)HOW TO PRAY AND HOW TO CONDUCT A PRAYER MEETING डॉ. आर.एल. ङायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लिखीत व “तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हां त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” (लुक 18:8). (मत्तय 16:18; I थेस्सल 4:16-17; प्रकटीकरण 7:9, 14) I. प्रथम, प्रार्थना राखून ठेवण्याचे महत्व, लुक 18:8. II. दुसरे, प्रार्थना सभेचे महत्व, मत्तय 18:19-20. III. तिसरे, “एक चित्ताने” प्रार्थना करण्याचे महत्व, प्रे. कृ. 1:14. |