Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




नवीन परिवर्तन झालेल्यांसाठी सात मुद्दे

SEVEN POINTS FOR NEW CONVERTS
(Marathi)

डॉ. आर.एल. ङायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्स बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
शनिवारी संध्याकाळी, 7ऑक्टोबर, 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Saturday Evening, October 7, 2017

“आणि शिष्यांची मनें स्थिरावून [खंबीर] त्यांनी त्यांना असा बोध केला की, विश्वासात टिकून राहा; कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते” (प्रेषित. 14:22).


ह्या वचनांसंबंधी द अप्लाईड न्यू टेस्टामेंट कमेंट्री म्हणते,

एकदाच एका ठिकाणी सुवार्ता प्रचार करणे पुरेसे नाही. नवीन विश्वासणा-यांना शिकविणे व त्यांना त्यांच्या विश्वासात स्थिर करणे सुद्धा गरजेचे आहे. आणि हेच पौल व बर्नबाने केले. देवाच्या राज्यात जाण्यास पुष्कळ संकटांना [दबाव, दु:ख] सामोरे जावे लागेल असा त्यांनी इशारा दिला.

प्रेषित पौल म्हणाला, “जर आपण धीराने [दु:ख] सोसतो, तर त्याच्याबरोबर राज्यहि करु” (II तिमथ्य 2:12). याचा अर्थ असा की ख्रिस्ताबरोबर त्याच्या राज्यात राज्य करण्यास ख-या समर्पित ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती जीवनाचा दबाव धीराने सहन करणे गरजेचे आहे . “ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्यांने माझ्याबरोबर दु:ख सोस” (II तिमथ्य 2: 3).

I. प्रथम, तुम्ही थोडे दु:ख सहन केले पाहिजे.

ती हीच गोष्ट प्रथम तुम्हांस माहित पाहिजे. स्वर्गात जाण्यास केवळ तारण होऊन चालणार नाही. तुमचे तारण झाल्यानंतर, “ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्यांने माझ्याबरोबर दु:ख सोस... जर आपण धीराने [दु:ख] सोसतो, तर त्याच्याबरोबर राज्यहि करु” (II तिमथ्य 2:3, 12). मी चीनी मंडळीत जाण्यापूर्वी मला हे शिकविले नाही. मला वाटले तुम्ही केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवला व स्वर्गात गेला. डॉ. तिमथी लीन यांनी मला शिकविले की ख्रिस्ताबरोबर त्याच्या राज्यात राज्य करण्यास मी विजयी ख्रिस्ती असलो पाहिजे, “जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्यें करीत राहतो ‘त्याला’ माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा ‘राष्ट्रांवरचा’ अधिकार मी देईन” (प्रकटी.2:26). मुस्लिम जगतातील व चीनमधील ख्रिस्ती लोकांना ठाऊक आहे की ख्रिस्ताबरोबर त्याच्या राज्यात राज्य करण्यास त्यांना दु:ख सहन करावे लागते. जसा की आपला आरंभीचा उतारा म्हणतो, “कारण आपल्याला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते” (प्रेषित14:22). ख्रिस्ताबरोबर त्याच्या आगामी राज्यात राज्य करण्यास त्यांना पुष्कळ छळातून (थियपीलीसचा - दबाव) जावे लागणार असे नवीन ख्रिस्ती लोकांना प्रेषित पौल शिकवित आहे. डॉ. वॅट्स यांचे प्रसिद्ध उपासनागीत गेली जवळजवळ तिनशे वर्षे शिकविले जातेय!

फुलांनी अच्छादलेल्या आरामदायी पलंगावरुन मला स्वर्गात न्यायला हवे,
त्याचवेळी इतर बक्षिसासाठी लढले, आणि रक्ताच्या समुद्रात वाहून गेले का?
मला राज्य करायचे आहे तर, मला लढले पाहिजे, प्रभू, माझे धैर्य वाढीव,
तुझ्या जगाच्या सौजन्याने, मी कष्ट सहन करीन, वेदना सहन करीन.
   (“एम आय अ सोल्जर ऑफ द क्रॉस?” डॉ. इस्साक वॅट्स, 1674-1748).

II. दुसरे, तुमच्याकडे पवित्रशास्त्र असले व ते वाचले पाहिजे.

“प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नातिशिक्षण ह्यांकरिता उपयोरी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा” (II तिमथ्य 3:16, 17).

तुम्हांला स्केफिल्ड स्टडी बायबल विकत घ्यावे लागेल यासाठी की आम्ही पृष्ठ क्रमांक सांगितल्यावर ते तुम्ही बघू शकाल. तुम्ही ह्या उपदेशाची छापील प्रत घरी न्यायला हवी जेमेकरुन तुम्ही ते घरी आठवडाभर वाचू शकाल. रेडिओ किंवा टी.व्ही. वरील प्रचारकांस ऐकू नका. त्यातील पुष्कळ खोटे शिक्षक आहेत. डॉ. जे. वरनॉन मॅकगी शिवाय दुस-या कोणास ऐकू नका. तुम्ही त्यांचा पवित्रशास्त्र अभ्यास रात्री किंवा दिवसा कधीहि संगणकावर www.ttb.org किंवा www.thrutheBible.org. या संकतस्थळावर ऐकू शकता. डॉ. मॅकगी हे 550 साउथ होप स्ट्रीट, येथे लॉसएंजिल्समध्ये, खुले द्वार असलेल्या मंडळीचे ब-याच – काळापासून पाळक आहेत. दररोज त्यांचे ऐकून मी पवित्रशास्त्र शिकलो. ते सध्याच्या काळातील दोष व ढोंगीपणा टाळतात. रेडिओ किंवा टी.व्ही. वरील ते एकमेव असे प्रचारक आहेत ज्यांच्यावर विश्वास ठेऊ शकतोफक्त एकमेव. डॉ. मॅकगी यांचे रेडिओवर एखादा उपदेश ऐकण्यापूर्वी किंवा नंतर गोंधळून गेलेले लोक आपल्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना तुमच्या संगणकावर ऐकणे अधिक उचित ठरेल (सर्व अइंग्रजी भाषेचा अनुवाद तुम्हांला www.ttb.org/global-reach/regions-languages येथे आढळेल).

पवित्रशास्त्र दररोज वाचा. “मी तुझ्याविरुद्ध पाप करु नये म्हणून मी आपल्या मनांत तुझे वचन जपून ठेविले आहे” (स्तोत्र 119:11).

III. तिसरे, तुम्ही सुट्टीवर असतांनाच्या शिवाय दुस-या मंडळीस जाऊ नका.

सध्या आपण मंडळ्यांमधून विश्वास सोडून देणे चालू असण्याच्या काळात राहत आहोत. त्यांच्यापासून दूर राहा.

“पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांस फसवितील; आणि अनीति वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीति थंडावेल” (मत्तय 24:11, 12).

आम्ही दुस-यां मंडळीची शिफारस करणार नाही. बॅप्टिस्ट मंडळ्यांत सुद्धा “चंगळवाद” आणि पाखंडीपणास बढावा दिला जातो.

IV. चौथे, दर रविवारी सकाळी व संध्याकाळी ह्या मंडळीत उपस्थित राहा. तसेच गुरुवारच्या प्रार्थना सभेस व दर आठवड्याच्या सुवार्तिक कामास हजर राहा.

V. पाचवे, पाळक व त्यांचे सहकारी पाळक यांची माहिती करुन घ्या.

तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना कधीहि फोन करु शकता. आणि प्रश्न विचारु शकता – किंवा येथे मंडळीत त्यांना भेटा.

“जे तुमचे अधिकारी होते ज्यानी तुम्हांला देवाचे वचन सांगितले‚ त्याची आठवण करा; त्याच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्याच्या विश्वासाचे अनुकरण करा” (इब्री 13:7).

“आपल्या अधिका-याच्या आज्ञेत राहाव त्याच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवाची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे‚ कन्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही” (इब्री 13: 17).

“जे तुमच्यावर अधिकारी आहेत” हा शब्द “तुमचे पुढारी” असा देखील अनुवादित करु शकत होते. द रिफॉर्मेशन स्टडी बायबल इब्री 13: 17 मध्ये असे म्हणते‚ “विश्वासू मंडळीचे पुढारी हे विश्वासू मेंढपाळ आहेत... पुढा-यांची (पाळकाची) काळजी ही खोलवर व खरी असते कारण त्यांना देवाने नेमलेले असते व त्याला त्यांना हिशेब द्यायचा असतो. त्यांच्या सेवेस अडखळण केले तर प्रत्येकांस भोगावे लागते.” डॉ. हायमर्स हे पाळक आहेत. त्यांना तुम्ही (818)352-0452 या क्रमांकावर फोन करु शकता. सहाय्यक पाळक डॉ. कागॅन आहेत त्यांना (323)735-3320 या क्रमांकावर फोन करु शकता.

VI. सहावे, आत्मे जिंकणे ही तुमच्या जीवनातील खंबीर प्राथमिकता करा.

लोकांना शुभवर्तमान ऐकण्यास आणण्यासाठी कष्ट घेतल्याशिवाय कोणी चांगला ख्रिस्ती होऊ शकत नाही. येशू म्हणाला, “माझे घर भरुन जावे म्हणून सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करुन घेऊन ये” (लुक 14:23).

VII. सातवे, एका लहान प्रार्थना गटामध्ये सामील व्हा.

तुमच्यासाठी कोणता गट चांगला हे पाहण्यासाठी डॉ. हायमर्स व डॉ. कागॅन यांना विचारा. तुमच्या प्रार्थना गटाबरोबर दर आठवडी भेटा.

“कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे” (मत्तय 18:20).

तुमचे अजूनहि तारण झाले नसेल तर, आम्ही विनंती करतो तुमच्या पापाबद्दल पश्चाताप करा व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. जेव्हां तुम्ही पश्चाताप करता व त्याच्यावर विश्वास ठेवता, त्याचे रक्त तुमच्या पापापासून तुम्हांला शुद्ध करिते.

“त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करिते” (I योहान 1:7).

कृपया तुमचे तारण झाले असेल तर तुमची साक्ष डॉ. कागॅन ह्यांना सांगा. त्यांचा फोन क्रमांक (323)735-3320 हा आहे.

आमेन.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी एकेरी गीत गायले: मि.बेंजामिन किनकैड ग्रीफ्थ:
“एम आय अ सोल्जर ऑफ द क्रॉस?” (डॉ. इस्साक वॅट्स यांच्याद्वारा,1674-1748).
“Am I a Soldier of the Cross?” (by Dr. Isaac Watts, 1674-1748).


रुपरेषा

नवीन परिवर्तन झालेल्यांसाठी सात मुद्दे

SEVEN POINTS FOR NEW CONVERTS

डॉ. आर.एल. ङायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा

“आणि शिष्यांची मनें स्थिरावून [खंबीर] त्यांनी त्यांना असा बोध केला की, विश्वासात टिकून राहा; कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते” (प्रेषित. 14:22).

(II तिमथ्य 2:12, 3)

I.     प्रथम, तुम्ही थोडे दु:ख सहन केले पाहिजे, II तिमथ्या 2:3, 12; प्रकटीकरण 2:26.

II.    दुसरे, तुमच्याकडे पवित्रशास्त्र असले व ते वाचले पाहिजे, II तिमथ्य 3:16, 17;
स्तोत्र 119:11.

III.   तिसरे, तुम्ही सुट्टीवर असतांनाच्या शिवाय दुस-या मंडळीस जाऊ नका,
मत्तय 24:11, 12.

IV.  चौथे, दर रविवारी सकाळी व संध्याकाळी ह्या मंडळीत उपस्थित राहा. तसेच गुरुवारच्या प्रार्थना सभेस व दर आठवड्याच्या सुवार्तिक कामास हजर राहा.

V.   पाचवे, पाळक व त्यांचे सहकारी पाळक यांची माहिती करुन घ्या, इब्री 13:7, 17.

VI.  सहावे, आत्मे जिंकणे ही तुमच्या जीवनातील खंबीर प्राथमिकता करा, लुक 14:23.

VII. सातवे, एका लहान प्रार्थना गटामध्ये सामील व्हा, मत्तय 18:20; I योहान 1:7.