Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




संजीवनास पर्याय नाही!

REVIVAL IS NO OPTION!
(Marathi)

डॉ. आर.एल. ङायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्स बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 1 ऑक्टोबर, 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, October 1, 2017

“तरी तूं आपली पहिली प्रीति सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तूं कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करुन आपली पहिली कृत्यें कर; तूं पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन, आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरुन काढून टाकीन” (प्रकटीकरण 2:4, 5).


इफिस येथील मंडळी महान होती. ती चांगली मंडळी होती. ती मूळची मंडळी होती जिने खोट्या सिद्धांताचा तिरस्कार केला पण तिच्यात एक दोष होता. ही मंडळी आत्मसंतुष्ट झाली होती. इमारतीसाठी पैसे दिले जात होते. लोक चांगले करु लागले होते. त्यांच्याकडे पुष्कळ पैसा होता. त्यांना कशाचीहि कमतरता नव्हती. त्यांनी त्यांची पहिली प्रीति सोडली होती. त्यांने त्यांना पश्चातापास बोलाविले. परत फिरण्यास, आणि जी प्रीति व आवेश कांही वर्षे हरविलेला होता तो परत जाऊन शोधण्यास सांगितले होते. जर त्यांनी त्याचा नकार दिला तर, तर त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येईल असे येशूने सुचना दिली. मंडळी ही एका समई सारखी होती. ह्या अंधा-या जगात प्रकाश होता. तरीहि, ह्या मंडळीने पश्चाताप केला नाही तर, ख्रिस्त म्हणाला, “तूं पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन, आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरुन काढून टाकीन.” आणि नंतर ख्रिस्त म्हणाला, “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको” (प्रकटी. 2:7). परंतू मंडळीने पश्चाताप केला नाही आणि तारणास पुरेसे संजीवन अनुभवले नाही. राजा डोमिशिएनच्या अधिपत्याखाली पहिल्या शतकाच्या अंती, एके काळी महान असलेली मंडळी रोमच्या सैन्यांने नष्ट केली. दुसरी इमारत बांधली परंतू शेवटी संपूर्ण नगर मुस्लिमांनी नष्ट केली.

ते मला आपल्या मंडळीमध्ये अमंलात आणण्याची गरज आहे का? आरंभीच्या काळात, इफिस येथील मंडळी जीवन व प्रीतीने ओतप्रोत भरलेली होती. ती संजीवीत व प्रेमळ मंडळी होती. एके काळी जशी आपली मंडळी होती तशी ती होती. आपल्या मंडळीत फूट होती. परंतू त्यांच्यामध्ये समर्पण व कटिबद्धता यावरुन नेहमी फूट होती. जे लोक मंडळी सोडून गेले कारण त्यांना कधीहि गंभीर ख्रिस्ती व्हायचे नव्हते. दरवेळी मी त्यांना ख्रिस्तासाठीच्या प्रीतीकडे आणण्याचा प्रयत्न केला, परंतू तो समुह सोडून गेला. ते मंडळी सोडून गेले नाहीत कारण मी खोटा सिद्धांत शिकवित होतो. ते नेहमी सोडून जायचे कारण त्यांना संजीवन नको होते. त्यांना येशूचे शिष्य बनायचे नव्हते. रिचर्ड ऑलिवस हा मोठ्या फुटीस कारणीभूत आहे. तो म्हणाला की महान आज्ञा ही केवळ प्रेषितांसाठी होती, त्यामुळे इतर कोणी आत्में जिंकण्याची गरज नाही. त्याची ही पहिली तक्रार होती. त्याने अगदी खरोखर येशूचे वचन धिक्कारले, “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील” (मत्तय 6:33). देवाचे राज्य मिळविण्याऐवजी यश व संपत्ती मिळविण्यास झटा असे त्याने लोकांना सांगितले. लोकांनी त्यांचे जीवन आत्मे जिंकण्यास व प्रार्थनेस व्यातित करा असा मी प्रचार केला. तीनशे लोकांनी त्याचे अनुकरण केले. केवळ 15 मागे राहिले. आमचे लोक ख्रिस्त केंद्रीत राहिले व त्याच्या लोकांपेक्षा अधिक यशश्वी झाले! खूप अधिक! जवळजवळ आमची सर्व मुले पदवीधारक झाले. आमच्या मंडळीतील बरेच मूळ लोकांकडे घरे व सहकारी इमारती आहेत. त्याचे लोक चारी दिशांना विखुरले आहेत. आमच्यामध्ये खूप कमी घटस्फोट झाले आहेत. त्याचे लोक घटस्फोटाचीहि वाट पाहात नाहीत! त्यामुळे कोण चांगले म्हणून वर आले? खरयं, आम्ही ह्या इमारतींसाठी कष्ट घेतलेत. परंतू त्यामुळे आम्ही येशूचे खंबीर शिष्य बनलो. त्याचा लहानसा गट लगेचच नवीन-इंवजिलीकल दुबळा झाला. आम्ही येशूसाठी थोडेसे सोसले आणि आशिर्वादित झालो. ते जगाच्या व पैशाच्या मागे गेले आणि सैतानाकडून नष्ट झाले! येशू म्हणाला, “तुम्ही देवाची व धनाची चाकरी करु शकत नाही” (मत्तय 6:24). प्रभू बरोबर होता व ते चुकीचे होते! “आय हॅव डिसायडेड टू फॉलो जीजस.” हे गीत उभे राहून गाऊया!

येशूच्या मागे मी चालणार;
येशूच्या मागे मी चालणार;
येशूच्या मागे मी चालणार;
नाही फिरणार, नाही फिरणार.

वधस्तंभ माझ्या पुढे, जग माझ्या मागे.
वधस्तंभ माझ्या पुढे, जग माझ्या मागे.
वधस्तंभ माझ्या पुढे, जग माझ्या मागे.
नाही फिरणार, नाही फिरणार.
   (“आय हॅव डिसायडेड टू फॉलो जीजस,” हिंदूतून पालट झालेल्याचा गुणधर्म, 19 वे शतक).

आमेन! तुम्ही खाली बसू शकता.

परंतू इफिस येथील मंडळीस कांहीतरी भयंकर घडले होते. येशू त्यांना म्हणाला,

“तरी तू आपली पहिली प्रीति सोडला ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे” (प्रकटी. 2:4).

त्यांच्या पहिल्या प्रीतीतून “पडला” असे त्याने म्हटले नाही. तो म्हणाला तुम्ही पहिली प्रीति “सोडली” आहे.

“तरी तू आपली पहिली प्रीति सोडला ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे” (प्रकटी. 2:4).

डॉ. जॉन एफ. वॉलवुर्ड यानी कारण दिले. ते म्हणाले,

“इफिस येथील मंडळीची ही दुसरी पीढी होती.”

मला अधिक थांबण्याची गरज आहे? “आता मंडळी ही दुस-या पीढीची आहे.” हे विधान सर्वकांही बोलते! मग डॉ. वॉलवुर्ड म्हणाले, “ज्या देवाच्या पहिल्या प्रीतीने त्यांचे व्यक्तीमत्व घडविले ती पहिली पीढी नाही” (जॉन एफ. वालवुर्ड टीएच. डी., द रिवेलेशन ऑफ जीजस ख्राईस्ट, मुडी प्रेस, 1973, पृष्ठ 56).

तरुण लोकांनो, तुम्ही आपल्या मंडळाची दुसरी पीढी आहांत! तुम्ही “39” लोक ज्यांनी ह्या मंडळीची इमारत वाचविली. ती पहिली पीढी होती, तुम्ही नाही! डॉ. चान यांनी पहिल्या पीढीतील “39” लोकांनी कशाप्रकारे प्रीति व सेवा केली हे सांगितले. तो लहान वयाच्या मुलासारखा आला होता. तो म्हणाला,

जेव्हां मी येशूवर विश्वास ठेवला माझे जीवन कायमचे बदलले, त्याच्या रक्ताने माझे पाप शुद्ध झाले, आता मंडळी हे माझे दुसरे घर आहे! मी लगोलग माझे जीवन त्याच्या कामासाठी झोकून दिले. ख्रिस्ताचे शिष्य होणे, [ख्रिस्त] व मंडळीस प्रथम प्राधान्यक्रम देणे, स्वनकार करणे आणि आत्मे जिंकणे ह्याबाबतीत डॉ. हायमर्स सातत्याने प्रचार करीत होते. “द्विधा अवस्था” – नियमहीन “ख्रिस्ती” बनण्याच्या विरोधात त्यानी प्रचार केला. मला माहित होते की त्यांचा प्रचार सत्य होता. तो माझ्यासाठी होता!... आम्ही एकत्रिक प्रार्थना केली व गीत गायले. ह्या काळातील पुष्कळ आठवणी माझ्याकडे आहेत. एका आठवड्याचा आम्ही पुष्कळ वेळा प्रचार केला. आम्ही संपूर्ण सभागृह भरले. मी ज्युडी कागॅन, मेलीसा सॅंडर्स, आणि विनी येंग, जी नंतर माझी बायको झाली त्या सर्वांना आणले. युसीएलए कॅंपस मध्ये प्रचार करुन त्यांना आणण्यास देवाने मला सहाय्य केले... मिसेस हायमर्स [तरुण वयात] तिने आपले जीवन मंडळीच्या सेवेस दिले व कांही मागे ठेवले नाही. ती पहिल्यांदा आमच्या मंडळीत आली तेव्हां मी तिला ओळखीत होतो तेव्हां आम्ही दोघेहि तरुण होतो. त्यानंतर ती, आणि तिचे ख्रिस्तासाठी प्रेम आणि आत्मे जिंकण्याचा आवेश कायम होता... हायस्कूल मधून पदवी घेण्यापूर्वीच... ती आमच्या मंडळीत दोन माणसाचे काम ती करु लागली. आता ती केवळ चीनी तरुण व इतर आशियायी मुलींसाठी काम करतात...मी ओळखीत असलेल्या विरुद्ध संस्कृतीतील सेवकांपेक्षा परिणाम कारक आहे (सर्व विपरीत परिस्थीतीमध्ये).

एलिना खूप आजारी असायची, पण कधीहि प्रार्थना सभा किंवा बुधवार व गुरुवारचे फोन करणे- सुवार्ता ऐकण्यास लोकांना बोलाविणे चुकवित नसे. आणखी एक महान स्त्री मिसेस सलाझर. स्टिरॉईडवर ती मदर तेरेसा सारखी होती! ती एक बॅप्टिस्ट संत आहे!

इफिसच्या दुस-या पीढीने जसे केले तसे आमच्या मंडळीतील तरुण मंडळी आम्हांला खाली बघायला लावत नाहीत! तुम्ही आमच्या मंडळीचे भविष्य आहांत! कृपया – येशूसाठी आपली पहिली प्रीति सोडू नका!

आता, मग, प्रकटीकरण 2:3 कडे पाहा. ते स्कोफिल्ड बायबल मध्ये पृष्ठ क्रं. 1332 वर आहे.

“तुझ्या अंगी धीर आहे माझ्या नावांमुळे तूं दु:ख सोसले आहे आणि तूं खचून गेला नाहीस” (प्रकटी. 2:3).

आधुनिक भाषांतर अशाप्रकारे करतात, “माझ्या नावांसाठी तूं धीर धरलास, माझ्या नावांमुळे तूं दु:ख सोसलेस आणि तूं थकला नाहीस” (NIV). लक्षात घ्या ते भूतकाळात - कसे होते ते सांगितले आहे. तूं दु:ख सोसलेस, तूं थकला नाहीस. ते भूतकाळात कसे होते ह्याचे वर्णन आहे.

डॉ. वुडवर्ड म्हणाले, “आता मंडळी ही ख्रिस्तीपणाच्या दुस-या पीढीत आहे... देवाची प्रीति जी पहिल्या पीढीवर होती ती आता नाही. ह्दयातील थंडावा... आध्यात्मिक औदासिन्य [उत्साह नसणे] धोकादायकरित्या सुकुन गेला ज्यामुळे नंतर त्या महत्वाच्या [मंडळी] तील साक्ष नाहीशी झाली होती. अशाप्रकारे इतिहासात नेहमीच घडले आहे: पहिले आध्यात्मिक प्रीतीचा थंडावा, त्यानंतर देवाच्या प्रीतीचे रुपांतर जगातील ऐहिक गोष्टीमध्ये होणे… हे विश्वासातून मागे फिरणे व प्रभावी साक्ष संपल्यानंतर होते” (वुडवर्ड, ibid.).

मला समजाविण्यात आले की हे आपल्या मंडळीत घडत आहे. आपल्या मंडळीतील दुसरी पीढी ही आपल्या पहिल्या पीढीपेक्षा अत्यंत थंड व निरुत्साही अशी आहे. डॉ. चान, मि. ग्रीफिथ, डॉ. जुडी कागॅन, मिसेस. हायमर्स – 1970 मध्ये हे जे मूळ लोक आपल्या मंडळीत आले – ते संजीवीत, उत्साहाने भरलेले, प्रेम व खोल सहभागिता यामध्ये – आणि ख्रिस्तासाठी खंबीर समर्पण होते. दुस-या शब्दात, ते बरेच इफिस येथील पहिल्या पीढीतील ख्रिस्ती लोकांसारखे होते.

परंतू हा जोम व उत्साह मंडळीतील मुलांमध्ये घातला नाही – जी दुसरी पीढी म्हणून वाढत होती. दुसरी पीढीचे जीवन येथेच होते. ते चलबिचल झालेले होते. ते प्रार्थनेत येत होते, परंतू ते एकतर प्रार्थना करायचे नाहीत किंवा ते निरुत्साही प्रार्थना करीत. “देवाच्या प्रीतीने ज्या पहिल्या पीढीला घडविले ते त्यांच्या जीवनात नव्हते.” केवळ जॉन कागॅन उठला व तो पहिल्या पीढीसारखा होता. ह्याचे कारण होते त्याचे जीवन बदलणारे परिवर्तन झाले होते ज्यामुळे पहिल्या पीढीसारखे त्यांच्यात प्रेम व उत्साह होता. तरी ते चपळ व मूलत: पुढारी नव्हते तरी, ते इतर मंडळीतील थंड मुलांमध्ये मिसळले होते. त्यांच्या वयाच्या कांही मुलांनी मंडळी सोडली. बाकीचे थंड व थट्टा करणारे होते. त्यातील अजून कांहीजण तसेच आहेत. कधीकधी जॉन सुद्धा गोंधळून जातो, की का त्याची पीढी इतकी थंड व ऐहिक आहे.

येथवर मला कळाले की आपणांस संजीवनाची गरज आहे. दुस-या पीढीचे हे लोक जोवर बदलून जाऊन ख्रिस्तासह सामर्थ्यशाली परिवर्तन अनुभवत नाहीत तोवर ते आपली मंडळी राखू शकत नाहीत. परंतू दुस-या पीढीचे बरेच लोक बंडखोर व मंडळी सोडून गेले, किंवा ऐहिकतेमध्ये आहेत. कांहीजणा ख्रिस्ताला सोडल्यात जमा आहे. अजूनहि ते परिवर्तनास नकार देतात. त्यातील कांहीजणांना परिवर्तन हे खरे नाही असे वाटते. कांहीजण ख्रिस्त हा खरा होता ह्याचा आंतरिक पुरावा मागतात.

ते पूर्णत: पालट होत नाहीत किंवा मंडळी सोडत नाहीत तोवर एका एकास आपण धैर्याने तोंड दिले पाहिजे. सरते शेवटी, त्यांच्यातील पुष्काळांचा पालट झाला – जरी त्यांना पहिल्या पीढीसारखे होण्यास बराच त्रास झाला. त्यांना ते करण्यास “त्यांचे कोठून पतन झाले ते आठवावे लागले.” जॉन कागॅन प्रमाणे त्या “एकोणचाळीस”- त्यांचे आई वडील आणि जुन्या पीढीच्या विश्वासाशी त्यांना तुलना करावी लागली. दुसरे, त्यांना “पश्चाताप व पहिली कृत्यें” करावी लागली. त्यांना त्यांचे मन व अंत:करणात परिवर्तन करावे लागले. त्यांना मागे फिरुन आणि खरे परिवर्तन (पहिली कृत्यें) करावे लागले. देवाचे आभार त्यातील कांहीजणानी केले – जसे की एमी व अयोका, फिलिप्प व तिमथ्य, वेस्ली व नोहा – आणि इतर कांही.

त्यानंतर देवाने आमच्यात संजीवन पाठविण्यास सुरुवात केली! देवाचे आभार, शेवटी त्याचा आत्मा आमच्यात पाठविण्यास त्यांने आमच्यावर विश्वास ठेवला. मागील कांही महिन्यात 20 नवीन लोक आले व त्यांचे तारण झाले. हे नवीन तरुण विश्वासात येण्यास आम्ही अशाप्रकारच्या सभा नियमीत करु!

आता जॉन कागॅन म्हणाले की “संजीवन हे गोंधळाचा पुढील भाग आहे.” आमच्या मंडळीने संजीवनावर सतत भर दिला पाहिजे नाहीतर आम्ही आमच्या मंडळीत मूळच्या सभासदांसारखे उत्साही पालट झालेले पाहणार नाही. इफिसच्या मंडळीत ती गरज होती – आणि आज आपल्या मंडळीतहि. मी त्याला “जगण्यासाठी संजीवन” असे म्हणेन!

बंधू भगिनीनो, आम्ही आमची पापे कबूल करायला पाहिजेत आणि देवाची समक्षता अधिक संजीवनाच्या लाटे मागून लाट अशी आपल्यात यावी म्हणून प्रार्थना केली पाहिजे. ते करा! ते करा! ते करा! उभे राहा व गीत क्रं. 15 गा, “आय विल लिव्ह फॉर हिम.”

माझे जीवन, माझे प्रेम, तुझा देवाचा कोकरां जो माझ्यासाठी मरण पावला;
   माझ्या तारका आणि माझ्या देवा, मी कधीहि विश्वासू असू शकतो!
किती तृप्त माझे जीवन असेल, जो माझ्यासाठी मरण पावला त्याच्यासाठी मी जगेन!
   माझ्या तारका आणि माझ्या देवा, जो माझ्यासाठी मरण पावला त्याच्यासाठी मी जगेन!

मी आता तुझ्यावर विश्वास ठेवतो स्विकार कर, तूं मेलास कारण मी जगावे;
   माझ्या तारका आणि माझ्या देवा, आणि आता येथून पुढे मी तुझ्यावर विश्वास ठेवतो!
किती तृप्त माझे जीवन असेल, जो माझ्यासाठी मरण पावला त्याच्यासाठी मी जगेन!
   माझ्या तारका आणि माझ्या देवा, जो माझ्यासाठी मरण पावला त्याच्यासाठी मी जगेन!

माझ्या आत्म्याचे तारण व मला मुक्तता देण्यास, हे तूं जो कालवरीवरती मरण पावलास,
   माझ्या तारका आणि माझ्या देवा, मी माझे जीवन तुझ्यावर केंद्रीत करीन!
किती तृप्त माझे जीवन असेल, जो माझ्यासाठी मरण पावला त्याच्यासाठी मी जगेन!
   माझ्या तारका आणि माझ्या देवा, जो माझ्यासाठी मरण पावला त्याच्यासाठी मी जगेन!
(“आय विल लिव्ह फॉर हिम” राल्फ इ. हडसन यांच्याद्वारा, 1843-1901; पाळकानी बदल केलेला).

आता गीत क्रं. 19 गा, “येथे प्रीति आहे.”

समुद्रासारखी विशाल, पूरासारखी प्रेमळ दयाळू, येथे प्रीति आहे,
   जेव्हां जीवनाच्या राजकुमाराने, आमच्या खंडणीसाठी, आमच्यासाठी आपले मोलवान रक्त सांडले.
कोण त्याची प्रीति आठवणार नाही? कोण त्याच्या स्तूतीचे गीत थांबविणार?
   तो कधीहि विसरणार नाही, संपूर्ण स्वर्गीय सार्वकालीक दिवस.

वधस्तंभावर खिळण्याच्या डोंगरावर, खोल व रुंद झरे उघडले;
   देवाच्या पूरद्वारातून विशाल व कृपेचा पूर वाहिला.
कृपा व प्रीति, मोठ्या नद्यांसारखी, वरुन सतत ओतली,
   आणि स्वर्गीय शांति आणि परिपूर्ण न्यायाने ह्या दोषी जगाचे प्रेमाने चुंबन घेतले.

माझ्या संपूर्ण दिवसांमध्ये, मला तुझे प्रेम स्विकारु दे, तुझ्यावर प्रेम करु दे;
   मला केवळ तुझे राज्य शोधू दे, आणि माझे जीवन तुझे स्तवन होऊ दे;
माझे गौरव केवळ तूं असू दे, तुझ्याशिवाय कांही मला दिसू नये.
   तूं मला धुतले व शुद्ध केले, तूं स्वत: मला मुक्त केले.

तुझ्या ह्या जगांत तुझ्या आत्म्याने मला तुझ्या सत्यात चालविले;
आणि माझ्या प्रभू, जसा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तसे तुझी कृपा माझी गरज भागविते.
तुझ्या परिपूर्णतेने तुझे महान प्रेम आणि सामर्थ्याचा तूं वर्षाव करतोस,
मोजमापाशिवाय, पूर्ण व अमर्याद असे, माझे ह्दय तुझ्याकडे ओढले जाते.
(“हिअर इज लव्ह, वास्ट ऍज द ओशिएन” विलियम रीज यांच्याद्वारा, 1802-1883).

डॉ. चान, आम्हांला प्रार्थनेत व कृपेत चालवा.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी एकेरी गीत गायले: मि.बेंजामिन किनकैड ग्रीफ्थ:
“जीजस इज द स्वीटेस्ट नेम आय नो” (लीला लॉंग, 1924).
“Jesus is the Sweetest Name I Know” (by Lela Long, 1924).