Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




जिवंत राहण्यासाठी संजीवन

REVIVAL FOR SURVIVAL
(Marathi)

डॉ. आर.एल. ङायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्स बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
गुरुवारी संध्याकळी, 31ऑगष्ट, 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Thursday Evening, August 31, 2017


कृपया उभे राहा व तुमच्या गीताच्या यादीतून गीत क्रमांक 19 “येथे प्रीति आहे, विशाल समुद्रासारखी.” गाऊया.

येथे प्रीति आहे, विशाल समुद्रासारखी, प्रेमळ दयाळूपणा पुरासारखा,
   जेव्हां जीवनाचा राजा, आमची खंडणी, त्याचे मौल्यवान रक्त सांडेल.
कोणाला त्याची प्रीति आठवत नाही? त्याची स्तुति कोण रोखू शकेल?
   तो ते विसरु शकत नाहीत, संपूर्ण स्वर्गीय सार्वकालीक दिवसांमध्ये.

वधस्तंभावर खिळलेल्या पर्वतावर, खोल व रुंद चिळकांड्या उडाल्या;
   देवाच्या दयेच्या पूरनियंत्रक दरवाजातून विशाल व कृपेची भरती आली.
शक्तीशाली नद्यांसारखी, कृपा व प्रीति, अविरत वरुन वाहतेय,
   आणि स्वर्गीय शांति व परिपूर्ण न्यायाने दुषित जगाचे प्रीतीने चुंबन घेतले.

तुझ्या प्रीतीचा स्विकार मला करु द्या, माझे सर्व दिवस, तुझ्यावर प्रीति करु दे;
   केवळ तुझे राज्य मला शोधू दे आणि माझे जीवन तुझे स्तवन होऊ दे;
केवळ तूंच माझे वैभव हो, जगातील कांहीहि मला दिसू नये,
   तूं मला धूतले व पवित्र केले, तूं स्वत:ने मला मुक्त केले.

तुझ्या जगात तुझ्या सत्याने तुझ्या आत्म्याने चालण्यास मला मार्गदर्शन कर;
   आणि तुझी कृपा माझी गरज भागविते, मी तुझ्यावर विश्वास ठेवताना, माझ्या प्रभो.
तुझ्या विपुलतेतून तुझी महान प्रीति आणि सामर्थ्याची ओतणी माझ्यावर करतोस,
   असंख्य, विपुल आणि अमर्याद, तुझ्यासाठी माझे ह्दय पिळवटते.
(“येथे प्रीति आहे, विशाल समुद्रासारखी” विलियम रीज यांच्याद्वारा,1802-1883).

आज रात्र येथे उपस्थितीत असलेल्या सर्वांनी देवाकडे प्रार्थना करा (ते प्रार्थना करतात). आता गीत क्रमांक 22, “भांडण संपलेले आहे” गाऊया.

हालेलुया! हालेलुया! हालेलुया!
भांडण संपलेले आहे, युद्ध झाले,
जीवनाचे युद्ध जिंकले आहे.
विजयाचे गीत सुरु झाले, हालेलुया!
हालेलुया! हालेलुया! हालेलुया!

मरणाच्या शक्तीने पराकाष्टा केली,
परंतू ख्रिस्ताने त्यांच्या सैन्यास नामोहरम केले;
मोठ्याने पवित्र विजयाचा जयघोष करा, हालेलुया!
हालेलुया! हालेलुया! हालेलुया!

दुख:चे तीन दिवस भुर्रकन निघून गेले;
तो मरणातून गौरवाने पुनरुत्थीत झाला;
सर्व गौरव आपल्या पुनरुत्थीत मस्तकाला! हालेलुया!
हालेलुया! हालेलुया! हालेलुया!

त्याने सताड उघड्या नरकाच्या दारांस बंद केले;
स्वर्गाच्या भव्य दरवाजाचे बार खाली पडले:
स्तूतीची गीते त्याचा विजय घोषित करतो, हालेलुया!
हालेलुया! हालेलुया! हालेलुया!

प्रभू, चाबकाच्या फटक्याने घायाळ तूं झालास,
मरणाच्या नांगीपासून तुझा सेवक मुक्त झाला,
यासाठी की आम्ही जगावे व तुला गीत गावे. हालेलुया!
हालेलुया! हालेलुया! हालेलुया!
   (“द स्ट्राईप इज ओव्हर,” फ्रान्सीस पोट्ट यांच्याद्वारा अनुवादित,1832-1909).

येशू ख्रिस्त आज रात्री गौरविला जावा म्हणून प्रार्थना करा (त प्रार्थना करतात). आता गीत क्रं. 23 गाऊया, “ॲन्ड कॅन इट बी?”

आणि ते असे असेल काय की तारकाच्या रक्तामध्ये रुचि मिळविल?
तो माझ्यासाठी मेला, त्याच्या दु:खास कोण कारणीभूत? माझ्यासाठी, त्याला कोणी मारले?
अद्भूत प्रीति! आणि ते असे असेल काय की तूं, माझा देव, माझ्यासाठी मरायला हवा का?
अद्भूत प्रीति! आणि ते असे असेल काय की तूं, माझा देव, माझ्यासाठी मरायला हवा का?

'हे सर्व रहस्य! अनंतकाळ मरण! कोण त्याची अदभूत रचना उलगडू शकेल?
प्रथम − जन्मलेले देवदूत दैवी प्रीतीच्या खोलीतून ध्वनी काढतात ते व्यर्थ!
'ही सर्व दया, पृथ्वी स्तवन करो; देवदूताचा विसर पडू देऊ नका.
अद्भूत प्रीति! आणि ते असे असेल काय की तूं, माझा देव, माझ्यासाठी मरायला हवा का?

त्याने पित्याचे वरील सिंहासन सोडले, केवढी मोफत, केवढी अगणित त्याची कृपा;
स्वत:ला त्यांने प्रीतीने रिक्त केले, आणि आदामाच्या असाहाय्य पीढीसाठी रक्त सांडले;
'ही सर्व दया, अफाट व मोफत; हे माझ्या देवा मला ती सापडली.
अद्भूत प्रीति! आणि ते असे असेल काय की तूं, माझा देव, माझ्यासाठी मरायला हवा का?

माझा बंदिस्त आत्मा बराच काळ पापात आणि निसर्गाच्या रात्रीत बांधलेला पडून आहे;
तुझ्या डोळ्यातून किरण जलद बाहेर पडतात, मी जागा झालो, अंधारकोठडी प्रकाशाने उजळली; माझे साखळदंड तुटले, माझा आत्मा मुक्त झाला; मी उठलो, पुढे गेलो, आणि तुझ्याकडे आलो.
अद्भूत प्रीति! आणि ते असे असेल काय की तूं, माझा देव, माझ्यासाठी मरायला हवा का?

आता दोष लागण्याची भीति नाही; येशू, आणि त्याच्यातील, ते सर्व माझे आहेत!
त्याच्यामध्ये जीवंत, माझे जिवंत मस्तक, आणि दैवी नीतिमत्वाची वस्त्रे घातलेला मी,
धैर्याने मी सिंहासनाजवळ जातो, आणि माझा स्वत:चा मुगुट येशूद्वारे मिळवितो.
अद्भूत प्रीति! आणि ते असे असेल काय की तूं, माझा देव, माझ्यासाठी मरायला हवा का?
(“ॲन्ड कॅन इट बी?” चार्लस् वेस्ली यांच्याद्वारा, 1707-1788).

आपण खाली बसू शकता. आपले जेष्ठ वडील, मि. बेन ग्रीफीथ, आपणांसाठी गाण्यास पुढे येतील.

आपण येथे आज रात्री प्रभू येशू ख्रिस्ताचे – केवळ त्याचेच स्तवन व गौरव करण्यास आलो आहोत! आपल्या पवित्रशास्त्रातून नीतिसुत्रे, अध्याय 14, व वचन 14 काढूया. स्कोफिल्ड स्टडी बायबल मध्ये ते पृष्ठ क्रं. 681 वर आहे. मी उतारा वाचताना कृपया पुन्हा उभे राहा.

“भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगितो” (नीतिसुत्रे14:14).

स्वत:स विचारा - “काय मी माझ्या कर्माचे फळ भोगतोय? काय माझे ह्दय थंडावले आहे? मी एकटा असतो तेव्हां प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतो, परंतू मला देवाची समक्षता जाणवत नाही.” ते तुम्ही आहांत? तुम्ही जेव्हां सुवार्तेसाठी जाता तेव्हां तेथे तुमच्या हाडांमध्ये अग्नि पेटतो जो तुम्हांस हरविलेला आत्मा शोधण्यास भाग पाडतो? सुवार्तेसाठी पूर्वी जितका जोश होता त्यापेक्षा आता कमी झाला काय? जेव्हां तुम्ही एखादा मोठ्याने प्रार्थना करताना ऐकता, त्याच्या प्रत्येक विनंतीस तुमचे ह्दय व ओठ “आमेन” म्हणते काय? तुम्ही असा विचार करता काय की तुम्ही प्रथम प्रार्थना करण्यास सुरु केली तशी चांगली नाही? किंवा तुम्ही असा विचार करता काय, “ते लवकरच पतन पावतील”? तुम्ही नवीन ख्रिस्ती लोकांमध्ये दोष पाहाता काय? तुम्ही असा विचार करता काय की तुम्ही प्रथम तारण पावाला तेव्हां जसे चांगले होता तसे ते नाहीत? सुवार्ता सांगताना तुमच्या चुकांचा विचार येतो, तुम्हांला असे वाटते का, “मी त्याची कधीहि कबुली देणार नाही. तुम्ही मला कधीहि ते कबुल करण्यास भाग पाडणार नाही”? नवीन एखादा व्यक्ति लक्ष देतो तेव्हां तुम्हांस आनंद होतो का? किंवा तुम्ही असा विचार करता काय की तुम्ही प्रथम तारण पावाला तेव्हां जसे चांगले होता तसे ते नाहीत? तुम्ही पहिल्यांदा तारण पावले तेव्हां जसे चांगले होता तसे आताहि आहांत का? तुमचे ह्दय थंड व रिक्त होते?

“भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगितो” (नीतिसुत्रे14:14).

तुमचे पहिल्यांदा तारण झाले तेव्हां तुम्ही परमेश्वरासाठी कांहीतरी केले असेल. त्यानंतर, तुम्ही म्हणाला, “येशूची सेवा करण्यास मला आवडते. त्यासाठी मी कधीहि कांही करु शकलो नाही.” ते तुम्ही म्हणू शकता का आणि आता ते महत्वाचे वाटते का? का तुम्ही माघारी फिरलेले ख्रिस्ती आहांत? मी केवळ तरुण लोकांशी बोलत नाही. मी “39”शी संबंधाने बोलतोय – मी जुन्या तसेच तरुण लोकांशी बोलतोय. मी हरविलेल्या तरुण लोकांशी बोलत नाहीये. मी जे तुम्ही बराच काळ तारण पावला आहांत त्यांच्याशी बोलतोय. तुम्ही तुमची पहिली प्रीति गमावली काय? तुम्ही तेवढेच प्रीतीने भरले आहात जेवढे पहिल्यांदा तारण झाले तेव्हां भरलेले होता? इफिसच्या ख्रिस्ती लोकांना येशू म्हणाला,

“तरी तू आपली पहिली प्रीति सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, म्हणून तू कोठून पतन पावलां आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करुन आपली पहिली कृत्यें कर” (प्रकटी. 2:4, 5).

जवळजवळ 60 वर्षे मी प्रचारकाचे काम करतोय. माझे ह्दय त्या 6 दशकांमध्ये भ्रांत झाले आहे. मी ह्या भ्रांतीच्या स्थितीतून कसा बाहेर येतो? ते ह्या प्रकारे होते. प्रथम मी आपल्याच वर्तनाचे फळ भोगीत आहे का हे समजून घेईन. त्याकरिता मी खेद करीन. मला दु:ख वाटेल. गोष्टी किती कठीण आहेत याविषयी तक्रार करीन. दुसरे, माझी पहिली प्रीति माझ्याठायी राहिली का ते बघेन. तिसरे, माझे किती पतन झाले आहे ते बघेन. माझ्या व येशूच्यामध्ये जे पाप आहे ते मी जाणून घेईन. मग मी माझ्या पापाची खंडणी भरण्यासाठी, वधस्तंभावर मरण पावलेल्या येशूची आठवण करीन. मी नव्याने पश्चाताप करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन. हे अगदी दुस-या परिवर्तनासारखे आहे. “फिल ऑल माय व्हिजन.” गाऊया.

तारका, मी प्रार्थना करतो, माझा संपूर्ण दृष्टांत भर,
   आज मला केवळ येशूला पाहू द्या;
दरीतून जात असलो तरी तूं चालवितोस,
   तुझी अक्षय महिमा मला झाकोळते.
तारणा-या देवा, माझा संपूर्ण दृष्टांत भर,
   तुझ्या महिमेने माझा आत्माहि प्रकाशीत होईल.
सर्व मी पाहतो, माझा संपूर्ण दृष्टांत भर
   तुझी पवित्र प्रतिमा माझ्यातू प्रतिबिंबीत होवो.
(“फिल ऑल माय व्हिजन.” अवीस बर्जेसन ख्रिस्टिएनसन, 1895-1985).

मी माझ्यासाठी करु शकत नाही असे मी करण्यास तुम्हाला सांगत नाही. जॉन कागॅन यांनी सुवार्तेसाठी समर्पित व्हावे म्हणून मी समुपदेशन केले. शेवटी ते करण्यास तयार झाले. मग मला कळले की ते माझ्यापेक्षा चांगले सुवार्तिक झाले. तरुणांची ताकद त्यांच्याकडे आहे, तसेच मी म्हातारा व शक्ती हरविलेला असा आहे. मी जॉनशी इर्षा करतो. एका रात्री त्याच्याजवळ कबुल करे पर्यंत मला ते छळत होते. मग मी ते तुमच्याजवळ कबुल केले. मग मी ठिक झालो व माझा आनंद मला परत मिळाला. मी जे केले ते तुम्ही आज ह्या रात्री करावे असे मी आवाहन करतो. मी ह्दयात खूप भ्रांत झालो होतो की तुम्ही पुन्हा प्रचार करु देणार नाही ना म्हणून मी भीत होतो. नंतर देवाने संजीवनाचा स्पर्श मंडळीस केला आणि मी पश्चाताप केला आणि त्याच्या मौल्यवान रक्ताने पुन्हां एकदा मला धुवावे म्हणून मी येशूकडे गेलो. 76 वर्षाचा मनुष्या ज्याने 60 वर्षे प्रचार केला, त्यांस पश्चातापाची गरज भासते, हे कांहीसे तुम्हांस विचित्र वाटते ना? नाही, हे विचित्र नाही. हे पुन्हां एकदा नवीनीकरण करणे व ह्दयात संजीवीत होणे होय. “पश्चाताप करा व पहिली कृत्यें करा” (प्रकटी. 2:5). परत परत पश्चाताप करा. परत येशूकडे या व त्याच्या रक्ताने पुन्हां पुन्हां शुद्ध व्हा! महान सुधारक लुथर म्हणाले, “आपले संपूर्ण जीवन हे स्थीर किंवा अखंड पश्चाताप आहे.” लुथर हे सतत पश्चाताप करीत होते आणि शुद्धतेसाठी येशूकडे येत होते. म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा असे केले पाहिजे.

माझा विश्वास आहे की याकोब 5:16 हे संजीवनासाठी उपयोगी आहे. ते म्हणते, “तेव्हां तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातकें एकमेकांजवळ कबूल करुन एकमेकांसाठी प्रार्थना करा...” “पातकें” ह्या शब्दाकडे लक्ष द्या. ग्रीक शब्द “पाराप्तोमा” असा आहे. डॉ. स्ट्रॉंग म्हणतात शब्दाचा मुख्य अर्थ “घसरण; चुक किंवा दोष, आणि इतर पातकें” असा होतो. आम्ही जे कबूल करावयास सांगितले ते मोठे पाप नाही परंतू आम्ही सांगितले आपली “घसरण” आमची “चुक किंवा दोष” एखाद्यावरील आपला राग, आपली अक्षमाशीलता, आपला द्वेष, प्रीतीची कमतरता, इतर पातकें जी आपल्या व देवाच्या मध्ये येतात.

केवळ देवाकडे आपली पातकें कबूल केल्याने आपल्या ह्दयास आरोग्य मिळते. काई पेरंग्जचा चेहरा प्रीति व काळजीने चमकत होता हे माझ्या लक्षात आले. तत्पूर्वी ते कडवट, रागीट दिसायचे. असे कसे घडले हे मी विचारले. त्यांनी मला सांगितले, “मिसेस शर्ली ली यांच्यावर पवित्र आत्म्याने कसे कार्य केले ते मी पाहिले. मला शांति व आनंद हवा होता अशी ती म्हणाली. पाळकसाहेब, मी तुमच्यावर क्रोधीत होते हे मी देवाजवळ कबूल केले. मग माझा स्वत:चा राग गेला आणि माझ्या मनात दुस-याविषयी शांति व काळजी आली.” अद्भूत! मी त्याला सांगितले की मी त्याच्यावर प्रेम करितो असे ते म्हणताना ऐकल्यानंतर त्याने मला मोठा आनंद झाला! त्यामुळेच पाप कबूली हे सर्व कांही आहे. दुस-यांस क्षमा करणे आणि देवाकडून नवीन शांति व आनंद मिळविणे होय! संजीवन हेच करते – तुम्ही आपली पातकें देवाजवळ कबूल करता तेव्हां तुम्हांस नवीन शांति व आनंद मिळतो.

परंतू देव आपल्यामधून फिरत असतो, तेव्हां थेट आपल्या बंधू किंवा बहिणीजवळ आपली पातकें कबूल केली पाहिजेत. तुम्ही आपली पातकें एकमेकांजवळ कबूल केली पाहिजेत. याकोब 5:16 तंतोतंत असे अनुवादित केले आहे की, “‘आपली पातकें एकमेकांजवळ कबूल करण्याचा व एकमेकांसाठी प्रार्थना करण्याचा आम्ही सराव करावा’ तसेच याचा अर्थ तुम्ही कबूल करण्यापूर्वी आजारी पडावे असा नव्हे” (आर. सी. एच. लेन्स्की). चीनमध्ये ते आपली पातकें एकमेकांजवळ कबूल करण्याचा सराव करतात आणि एकमेकांसाठी प्रार्थना करण्याचा सराव करतात. त्यामुळेच ते चीनमध्ये सातत्याने संजीवनामध्ये आहेत.

मी एका बंधूला सांगितले की मी तुला पुढे येण्याचे व प्रार्थना करण्यास बोलावितो, जसे की मी पूर्वी दोनदा केले. मी त्याला विचारले, “कोणीतरी येईल असा तू विचार करतोस काय?” कांही वेळासाठी त्याने विचार केला, आणि मग तो म्हणाला, “नाही. कोणीहि येणार नाही.” मी त्याला विचारले तूं का येणार नाहीस. तो म्हणाला की तुम्हांला वाटेल मंडळीमध्ये अधिक लोक यावेत म्हणून मला अधिक संजीवन हवे आहे. परंतू हे ते कारण नव्हे. स्वत:ला विचारा, अधिक लोक आलेत तर काय चांगले करायले हवे? ते आलेत तर आपण त्यांना कशी मदत करु? त्यांना आपण मैत्री, आनंद, आणि सखोल सहभागिता देऊ करु. पण तुमच्यात तुम्ही स्वत: आहांत? तुम्ही आहांत? किंवा केवळ प्रीतीविना कर्म करण्याचा धर्म तुमच्याकडे आहे का? तुम्ही एकमेकांवर प्रीति व एकमेकांची काळजी करीत नाही, नाही ना? तुमची सखोल मैत्री नाही, नाही ना? तुमच्याजवळ आनंद नाही, नाही ना? तुमची खोल सहभागिता नाही. नाही ना? तुमच्या ह्दयात नवीन लोकांविषयी खोल प्रीति नाही, नाही ना? प्रामाणिक बना, तुमच्यामध्ये येशूविषयी अधिक खोल प्रीति नाही, नाही ना? आमच्या मध्येच ह्या गोष्टी नसतील तर त्या दुस-यांस आपण कशा देऊ करु शकतो?

तुम्हांस मी तुमचे दोष व तुमची पातकें कबूल करण्यास सांगितले जेव्हां तुम्हांला वाटले, “ते मला करण्यास लाजीरवाणे वाटेल.” तुम्ही अगोदरच काम करीत आहांत – पुष्कळ काम! तुम्हांला अधिक काम नको ना. ती अधिक प्रीति आहे! ख्रिस्तासाठी अधिक प्रीति! एकमेकांसाठी अधिक प्रीति असेल तरच त्यांच्यासाठी अधिक प्रीति येईल!

प्रत्येक इच्छेने, माझा संपूर्ण दृष्टांत भर
तुझ्या गौरवासाठी; माझा जीव प्रेरित ठेव,
तुझ्या परिपूर्णतेसह, तुझ्या पवित्रतेसह,
   माझा मार्ग तुझ्या वरील प्रकाशाने उजळून टाक.
तारणा-या देवा, माझा संपूर्ण दृष्टांत भर,
   तुझ्या महिमेने माझा आत्माहि प्रकाशीत होईल.
सर्व मी पाहतो, माझा संपूर्ण दृष्टांत भर
   तुझी पवित्र प्रतिमा माझ्यात प्रतिबिंबीत होवो.

दुस-या रात्री मी गरीब सॅमसनचा विचार करीत होतो. पूर्ण चार अध्याय सॅमसनसाठी समर्पित आहेत. इब्री11:32 मध्ये तो तारण झालेल्यांचा यादीत आहे. त्याचे केव्हा तारण झाले? मला वाटते मरणापूर्वी कांही मिनिटे अगोदर शेवटी जोवर त्याने मदतीसाठी देवाकडे आरोळी मारली नाही तोवर त्याचे तारण झाले नव्हते. परंतू येशूने त्याला पवित्र पुरुष म्हटले आहे, “देवाचा नाजीर होईल” (शास्ते13:5). “परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करु लागला” (शास्ते13: 25).परंतू सॅमसन देवाप्रती पूर्ण अंत:करणाने प्रीति करण्यास अपयशी झाला. त्याच्या छोट्याशा जीवनात तो तुमच्याप्रमाणेच होता. त्याच्या शक्तीने, त्याच्या अपयशी सामर्थ्याने ख्रिस्ती जीवन जगेन असा त्याने विचार केला. परंतू तो जगू शकला नाही. तो पुन्हां पुन्हां झाला, तुमच्या व माझ्यासारखा. सरते शेवटी सैतानी शक्ति त्यांस घेऊन गेली व त्याचे डोळे काढले. “आणि त्याला तुरुंगात धान्य दळायला लावले” (शास्ते16:21).

अहो, बंधूनो व भगिनीनो, तुमच्यापैकी कांहीजण सॅमसन सारखे नाहीत का? तुम्हांस येशूने पाचारण केले आहे. भूतकाळात तुम्हासं देवासाठी महान कार्य करण्यास पवित्र आत्म्याने चालविले आहे. परंतू तुम्ही हळूहळू कडवट व दु:खी बनला. तुम्हा आता आनंदी नाही. तुम्हांस मंडळीसाठी खरे प्रेम नाही. तुम्हीं आंधळ्या डोळ्यांनी मंडळीत येता. तुमचा धर्म हा कंटाळवाणा, कष्टाचा विना आनंदाचा झाला आहे. कंटाळवाणा, गुलामाचे काम! तेच सर्व! तुम्ही गुलामासारखे मंडळीत येता. हे अगदीच कंटाळवाणे आहे. अघिक काळ तुम्हांस येथे राहू वाटत नाही. तुम्ही बिचा-या सॅमसन सारखे “तुरुंगात धान्य दळायला लागता”. त्याचा दुसरे कसा विचार करतात हे मला ठाऊक नाही, परंतू त्याच्या विषयी “तुरुंगात धान्य दळायला लावले”- त्याला काशाच्या बेड्यानी जखडले, त्याला फरफटत नेले, तासा मागून तास, त्याला धान्य दळावयाची चक्की ओढायला लावली हे वाचून मी अश्रू ढाळून रडलो.

आणि मला ठाऊक आहे तुमचा धर्म सुद्धा तसाच आहे, आणि कधीकधी माझे ह्दय सुद्धा रडते. तुम्हांला आनंद नाही. तुम्हांला प्रीति नाही. तुम्हांला आशा नाही. तुरुंगातील गुलामाप्रमाणे तुम्ही केवळ दळायला जाता. होय! तुमचा पैकी कांहीजणांना मंडळी हे तुरुंगासारखी आहे, तुरुंग जेथे तुम्ही सेवेच्याद्वारे दळत असता, जेथे तुम्ही दास्यत्वाच्या सुवार्तिक कामाद्वारे दळत असता. तुम्ही त्याची घृणा सुद्धा करता! परंतू कसे बाहेर पडायचे हे तुम्हांला ठाऊक नाही! तुम्हास आत्मिक साखळदंडाने बांधले आहे, कोणत्याहि आशेविना दळणे, दळणे, दळणे. कधी कधी तुम्ही सोडण्याचा विचार करता. मला माहित आहे तुमच्यापैकी कांहीजण करतात. परंतू तुम्ही सोडू शकत नाही. केवळ तुमचे मित्र तेथे आहेत. केवळ तुमचे नाते तेथे आहेत! अखंड दळण्यापासून, तिरस्करणीय कंटाऴवाणा आणि तुरुंगासारख्या वाटणा-या मंडळीतील कामापासून तुम्ही स्वत:स कसे सोडवाल? मला तुम्हांस मदत करावयाची आहे! देवाला माहित आहे मी ते करितो! त्यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे. प्रचारकाला, तुम्ही कसे ओळखिता? कारण आता ज्या ठिकाणी तुम्ही आहांत त्या ठिकाणी मीहि होतो! आता मी मंडळीत साखळदंडाने बांधलेला आहे, तेच दळणे, दळणे, ते तिरस्करणीय – परंतू सुटकेचा मार्ग सापडत नाही! सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे येशू! आपली पातकें कबूल करा? का करु नये? तुमची पातकें ही साखळदंड आहेत जी तुम्हांला बांधून टाकते! त्यातून तुम्ही बाहेर पडा! पस्चाताप करा आणि रक्ताने त्या शुद्ध व्हा, केवळ येशूच तुमचे साखळदंड तोडू शकतो आणि तुम्हांस मुक्त करु शकतो.

“तेव्हां तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातकें एकमेकांजवळ कबूल करुन एकमेकांसाठी प्रार्थना करा...” (याकोब 5:16).

तुम्ही तुमची भीति, तुमच्या शंका, तुमची पातकें, तुमचा राग, तुमचा कडवटपणा, तुमचा जळफळाट, कबूल करा. “तेव्हां तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातकें एकमेकांजवळ कबूल करा...” (याकोब 5:16). मिसेस यांनी हे केले! आणि येशूने त्यांना बरे केले. काई पेरंग यांनी केले, आणि येशूने त्यांना बरे केले. आता आता तेथे आशेचा किरण आहे. तुम्हांला वाटते, “हे खरे असेल काय?” होय! हे खरे आहे! प्रत्येकांनी, कोणासाठी तरी कृपया प्रार्थना करा की त्यांने आपली पातकें कबूल करावी व येशूच्या द्वारे निरोगी व्हावे (ते प्रार्थना करतात).

“येशू म्हणाला, ‘जे शोक करीत आहेत ते धन्य’ (मत्तय 5:4) ज्यांना मागे गेल्याचे जाणवते आणि त्याबद्दल जे रडतात हे त्यासंदर्भात आहे. ख्रिस्ती लोक ज्यांना संजीवनाची उत्कट इच्छा त्यांस पाप ही एक नेहमीचीच समस्या आहे, आणि जे जगाची गोष्टी पाहू शकत नाही ते संजीवन नेहमी अडखळत हाताळतात. संजीवनाची तयारी करण्यासाठी... संजीवन अंधा-या जागी प्रकाश फेकते, इव्हान रॉबर्टस् त्यांना आठवण करुन देतात की लोक तयार असणार नाहीत तोवर [पवित्र] आत्मा येणार नाही: ‘आपण [मंडळीच्या] वाईट भावना – सर्व मत्सर, द्वेष, गाठ व गैरसमजूत यावर मात केली पाहिजे. सर्व गुन्हांची क्षमा होत नाही तोवर [प्रार्थना करु नका]: तुम्हांस क्षमा करु वाटत नाही तर, नम्र व्हा, आणि क्षमेच्या आत्म्याची मागणी करा. ते तुम्हांस मिळेल मग’”...केवळ शुद्ध ख्रिस्ती देवाजवळ राहू शकतो (ब्रायन एच. एडवर्ड, रिवायव्हल, इव्हांजलीकल प्रेस, 2004, पृष्ठ 113)... “प्रत्येक मनुष्य प्रत्येकांस विसरतो. प्रत्येकजण देवासह समोरा समोर [जसे की त्यांनी त्यांचे पाप कबूल केले]...नमुद केलेल्या जवळजवळ प्रत्येक विशिष्ठ संजीवनासारखे [हे आहे]. पापाची खोल, त्रासदायक, नम्र जाणीव होत नाही तोवर संजीवन नाही” (ibid., पृष्ठ 116)... “सध्याचे आपली मंडळी अपवित्र आहे कारण ख्रिस्ती लोकांना पाप जाणवत नाही किंवा त्याची भिती वाटत नाही...ज्यांना संजीवनाची प्रतिक्षा आहे त्यांनी आपल्या अंत:करणाचे परिक्षण करण्यास आणि पवित्र देवासमोर राहण्यास सुरुवात करावी. आम्ही आपले पाप झाकतो आणि आता कबूल करीत नाही तर [आपल्यात संजीवन असणार नाही]... पवित्र परमेश्वर ख्रिस्ती लोकांना सर्वात लहानशा पापाची सुद्धा जाणीव करुन देतो... पवित्र परमेश्वराजवळ आपण आहोत ही ज्यांना समजते ते आपल्या व्यक्तीगत पापासंबधी जागरुक असतात... ही पापाची खोल जाणीव नेहमी क्षमाशीलतेच्या नवीन-सापडलेल्या स्वातंत्र्य व आनंदाच्या अनुभवात घेऊन जातो. खालीलप्रमाणे ‘उर बडवीत’ तारणाचा आनंद बाहेर येतो” (ibid., पृष्ठ 120).

त्या सभेमध्ये आस्थापूर्वक पालट झालेले सतरा तरुण लोक आपल्याकडे होते. त्या सभेमध्ये आपण स्पर्शाचे संजीवन अनुभवले. कमीत कमी सतरा तरुण लोक जागृत होते. ते जागृत व आस्थेवाईक तारण झालेले असे कोणासहि अपेक्षित नव्हते. त्यांची नावे मी जाहिर केली तरी, आमच्या मंडळीतील कोणासहि आनंद झाला नाही. तुम्ही आनंद का केला नाही? चीनमध्ये ते आनंदाने रडले असते! मग येथे का नाही?

सतरा तरुण लोक आस्थेवाईक तारण झाले परंतू तेथे आमच्यामध्ये आनंदाश्रू नाहीत, विल्कुल आनंद नाही. का? कारण “भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगितो (नीतिसुत्रे 14:14).

“तुझ्या लोकांनी तुझ्या ठायी हर्ष पावावा म्हणून तूं आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय? (स्तोत्र 85:6).

अश्रू गाळून जोवर आम्ही आमची पातकें कबूल करत नाही तोवर आम्ही अश्रू गाळून आनंद करु शकत नाही! हे चीनमध्ये घडत आहे. मग आपल्या मंडळीत का नाही? तुम्ही निरोगी व्हावे म्हणून, तुम्ही एकमेकांसमोर तुमची पातकें कबूल करण्यास, आणि एकमेकांसाठी प्रार्थना करण्यास घाबरता. लोक काय म्हणतील या भीतीने तुम्ही कबूल करण्याचे थांबविता. यशया म्हणाला, “...तूं मर्त्य मनुष्याला, तृणवत् मानवपुत्राला भितेस अशी तूं कोण?...परमेश्वर तुझा कर्ता याला तूं का विसरलीस?” (यशया 51:12, 13).

“हे देवा, माझी झडती घेऊन
माझे ह्दय जाण;
मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण;
आणि माझे ह्दय जाण;
मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण;
आणि माझ्या ठायी दुष्टपणाकडे कांही प्रवृत्ती असेल तर पाहा;
आणि मला सनातन मार्गाने चालीव.”
   (स्तोत्र 139:23, 24).

मला पाप करु देऊ नको, माझा संपूर्ण दृष्टांत भर
   सावली ज्यामध्ये तेजस्वीपणा झळाळतो.
केवळ तुझे धन्य मुख मला पाहू दे,
   तुझ्या अनंत कृपेत माझा जीव मेजवाऩी करतो.
दैवी तारका, माझा संपूर्ण दृष्टांत भर,
   तुझ्या गौरवात माझा आत्मा झळाळतो.
सर्वानी पाहावे म्हणून, माझा संपूर्ण दृष्टांत भर
   तुझी पवित्र प्रतिमा माझ्यात प्रतिबिंबीत होवो.
(“फिल ऑल माय व्हिजन.” अवीस बर्जेसन ख्रिस्टिएनसन, 1895-1985).

तुम्ही यापूर्वी आला नाही. तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही करु शकता, परंतू तुम्ही घाबरला. मिसेस चान यांनी मला सांगितले ती फोनवरुन भ्रांत झाली होती. मग मी रविवारी सकाळी तिच्याकडे पाहिले – आणि मिसेस चान यांनी माझ्याकडे पाहिले. तिला यायचे होते ते मी पाहिले. मी तिचा हात घेतला आणि मी म्हणाला “ये.” ती आली. ती यायला घाबरली होती. सर्वस्वी, ती डॉ. चानची पत्नी होती! जर तिने आपले पाप कबूल केले तर काय लोक काय म्हणतील? इतर काय म्हणतील ते सोडून द्या! आपण उभे राहून गीत गात असतांना या व गुडघ्यावर या आणि आपली पातकें कबूल करा. देव तुम्हांला जाणीव करु दे, आणि मग वधस्तंभावर सांडलेले रक्त शुद्ध करते.

मला पाप करु देऊ नको, माझा संपूर्ण दृष्टांत भर
   सावली ज्यामध्ये तेजस्वीपणा झळाळतो.
केवळ तुझे धन्य मुख मला पाहू दे,
   तुझ्या अनंत कृपेत माझा जीव मेजवाऩी करतो.
दैवी तारका, माझा संपूर्ण दृष्टांत भर,
   तुझ्या गौरवात माझा आत्मा झळाळतो.
सर्वानी पाहावे म्हणून, माझा संपूर्ण दृष्टांत भर
   तुझी पवित्र प्रतिमा माझ्यात प्रतिबिंबीत होवो.
(“फिल ऑल माय व्हिजन.” अवीस बर्जेसन ख्रिस्टिएनसन, 1895-1985).


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी एकेरी गीत गायले: मि.बेंजामिन किनकैड ग्रीफ्थ: “मोअर लव्ह टू दी” (एलिझाबेथ पी. प्रेंटीस यांच्याद्वारा 1818-1878).
“More Love to Thee” (by Elizabeth P. Prentiss, 1818-1878).