संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
नोहावर कृपादृष्टी झाली! (उत्पत्ती पुस्तकावरील उपदेश क्रं. 19) डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश “मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तूं आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवांत चल; कारण मी पाहिले आहे की या पीढीत तूंच माझ्यापुढे नीतिमान आहेस” (उत्पत्ती 7:1). |
नोहा चांगला होता म्हणून त्याचे तारण झाले नाही. त्याचे तारण झाले कारण परमेश्वर म्हणाला, “या पीढीत तूंच नीतिमान आहेस”(उत्पत्ती 7:1). परमेश्वराने त्यास म्हणून नीतिमान पाहिले. का? उत्तर सोपे आहे. ते उत्पत्ती, अध्याय सहा, वचन आठ मध्ये दिले आहे. तुमच्या पवित्रशास्त्रातून उघडा.
“परंतू नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती” (उत्पत्ती 6:8).
नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. आणि परमेश्वर म्हणाला, “कारण मी पाहिले आहे की या पीढीत तूंच माझ्यापुढे नीतिमान आहेस” (उत्पत्ती 7:1).
हे मळात असलेल्या नीतिमत्वाविषयी बोलते. इब्री 11:7 सांगते की नोहा विश्वासाने नीतिमान ठरला:
“आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने...तारु तयार केले” (इब्री 11:7).
मला पुन्हा सांगावे लागेल, नोहा चांगला होता म्हणून त्याचे तारण झाले नाही, जरी तो पुष्कळ दृष्टीने चांगला मनुष्य होता. परंतू तो कांही परिपूर्ण मनुष्य नव्हता, जसे की पवित्रशास्त्र पणांस स्पष्ट सांगते की त्यांने महाजलप्रलया नंतर दारु प्यायली (संदर्भ उत्पत्ती 9:20-21). आपण नोहाला क्षमा करु शकतो. त्याला मोठ्या सत्वपरिक्षेतून जावे लागले, आणि कदाचित जलप्रलयासंबंधीचे भयंकर भीती आणि स्वप्न विसरण्यासाठी थोडीशी दारु प्यायली असेल. किंवा कदाचित त्याची चूकहि असेल, तसेच जलप्रलय होण्यापूर्वी पृथ्वीवर अशाप्रकारचे कुजवून तयार केलेले मद्य नव्हते, त्याच्यावर त्या दारुचा कांही परिणाम होईल हे ठाऊक नव्हते.
ह्या दोन्हीहि प्रकरणांमध्ये, नोहा हा परिपूर्ण मनुष्य होता असे चित्रण पवित्रशास्त्र करीत नाही. परंतू धर्म म्हणतो तो, “पापी असतांना नीतिमान ठरला.” तो परिपूर्ण नव्हता, परंतू ख्रिस्त देहधारणेपूर्वी तो देवाच्या दृष्टीने विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरला. नोहाचा ख्रिस्तावर विश्वास होता, जो देवाच्या कृपेने त्याला मिळाला होता (व. उत्पत्ती 6:8). जेव्हां नोहाने ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हां, देवाने ख्रिस्ताचे नीतिमत्व, त्यास दिले, किंवा त्याच्या ठायी गणले. या विषयावर पवित्रशास्त्र कांही तरी अद्भूत असे म्हणते. रोम, अध्याय चौथा, वचन पाच व सहा काय म्हणते ते ऐका.
“पण जो काम करीत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरविण्यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. त्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून गणितो त्याच्या धन्यतेचे वर्णन दाविदहि करतो” (रोम 4:5-6).
जेव्हां परमेश्वर नोहाला म्हणाला, “कारण मी पाहिले आहे की या पीढीत तूंच माझ्यापुढे नीतिमान आहेस” (उत्पत्ती 7:1), त्याने नोहाचे पाप पाहिले नाही असे तो म्हणत होता, कारण त्याच्या विश्वासाने ख्रिस्ताचे नीतिमत्व त्याच्या दप्तरी नोंदले. ते पुनर्रचनेचे पहिले घोषणापत्र — “सोला फाईड” — केवळ ख्रिस्ताद्वारे विश्वासाने तारण! नोहाचे तारण त्याच्या चांगुलपणामळे झाले. ख्रिस्ताच्या देहधारणेच्या पूर्वी विश्वासाने त्याचे तारण झाले!
आता तारु समजून घेऊया. हे तारु जहाज नव्हते. ते पाण्यावर चालू शकत नव्हते. ते केवळ दोन्ही बाजू निमुळती असलेली काळी पेटी होती. त्याला संपूर्ण काळे डांबर लावलेले होते. डॉ. मॅक गी तारुवर भाष्य करतो:
तारु संदर्भात पुष्कळ लोकांचे मत म्हणजे तारु हे लहान शब्बाथ शाळा अशाप्रकारे चित्रित केले गेले आहे जी एखाद्या लहान घरासारख्या दिसणा-या तारवा सारखे दिसते. ते, माझ्यासाठी, खूप हास्यास्पद तसेच विडंबन असे आहे. तारुचे खरेखुरे चित्र दाखविण्याऐवजी त्याचे व्यंगचित्र बनविले आहे.
सुरवातीला, तारु भलेमोठे बांधण्यासाठी सुचना दिल्या होत्या असे समजते. “तारुची लांबी ही तीनशे फूट असायला हवी.” क्युवीट म्हणजे अठरा इंच, हे तुम्हांस कल्पना देईल की तारु किती लांबीचे होते.
प्रश्न उद्भवतो की त्या काळात एवढा भला मोठा तारु कसा बांधला गेला असेल. माझ्या मित्रांनो, आपण अश्मयुगातील मनुष्यांच्या बाबतीत बोलत नाही. तर आपण एका खूप हुशार माणसाबद्दल बोलत आहोत. तुम्ही पाहाता, जी बुद्धीमत्ता सध्या दिसते ती नोहाच्या काळापासून आलेली आहे, आणि ते सुद्धा एका बुद्धीमान माणसाकरवी झालेले असणार.
नोहा हा पन्नास-फूट उंच उठणा-या लाटांना तोंड देणारे समुद्रात चालणारे जहाजे बनवित नव्हता. कांही काळाकरिता सजीव, प्राणी जीव आणि मनुष्य जीव राहण्यास एक ठिकाण बनवित होता— ना की वादळातून पाण्यावर जाण्यास, परंतू जलप्रलय संपेपर्यंत तरंगत राहण्यास बनविले होते. त्याच कारणाने, तारुमध्ये त्या कमतरता असतील ज्या समुद्रात चालणार-या जहाजात असतात, आणि त्यामुळे त्यात अधिक खोल्या करता आल्या (जे. वरनॉन मॅक गी, थ्रु द बायबल, थॉमस नेल्सन,1983, आवृत्ती I, पृष्ठ 39).
व्हीटकोंब आणि मॉरीस असे निर्देशित करतात की बाबेलोन मध्ये कुबीट (फूट) हा 19.8 इंचाचा व मिसर (इजिप्त) मध्ये कुबीट हा 20.65 इंचाचा होता. व्हीटकोंब आणि मॉरीस असे सांगतात की इब्रीमध्ये कुबीट हा 20.4 इंचाचा होता (जॉन सी. व्हीटकोंब आणि हेन्री एम. मॉरीस, द जेनेसीस फ्लड, प्रेसबिटेरिएन अँड रिफॉर्म्ड पब्लिशिंग कंपनी, 1993. पृष्ठ 10). त्यामुळे तारु पाचशे व तीनशे फूट लांबीचे बनवू शकला. क्विन्स मेरी, लॉस एंजिल्स जवळ, 1018 फूट लांब, जो तारुच्या लांबीच्या जवळ जवळ दुप्पट असा लांब मोठा समुद्र किनारा होता. क्विन्स मेरीचा बराचसा भाग हा इंजिने व इतर यंत्राने भरलेला होता. तारुमध्ये यांत्रिकी साधने नव्हती. ते संपूर्ण रिकामे होते, याचाच अर्थ तारुमध्ये मनुष्य व प्राण्यांना राहण्यास त्यामानाने पुष्कळ होती, किंवा ह्याहि पेक्षा असेल, क्विन्स मेरी पेक्षा अधिक — जी एक खूप मोठी नाव होती.
डॉ. व्हीटकोंब आणि डॉ. मॉरीस यांचे म्हणणे बरोबर आहे की एवढे प्रचंड तारुचे आकारमान जग-भर झालेल्या जलप्रलयाकडे निर्देशित करते:
एवढेच नाही अशा प्रकारचे प्रचंड आकाराचे तारु स्थानिक पूरासाठी अनावश्यक होते, परंतू मुळात तारुची आवश्यकता नव्हतीच! अशाप्रकारची नाव उभारण्याची प्रक्रिया, ज्यामध्ये शेकडो वर्षाची योजना आणि मोठी कसरत, तोहि स्थानिक पूरापासून वाचण्यासाठी, वर्णन करण्यास अवघड परंतू अगदी मुर्खपणाचे व अनावश्यक असे होते. देवाने संभाव्य धोक्याविषयी नोहाला इशारा जरी दिला असता, अशासाठी की तो पूरग्रस्त भाग सोडून इतर ठिकाणी गेला असता, जसे लोटाला सदोमावर आकाशातून अग्नी वर्षाव होण्यापूर्वी बाहेर घेतला तसे केले असते तरी खूप चांगले झाले असते. एवढेच नव्हे तर, मोठ्या संख्येने सर्व प्राणी, आणि तसेच पक्षी, अगदी सुलभरितीने दुसरीकडे हलवू शकले असते, तेहि तारुमध्ये एका ठिकाणी जमा न करता आणि एक वर्षभर सांभाळ न करता! संपूर्ण कथा ही मुर्खपणावर आधारित जर जलप्रलय हा केवळ पूर्वेजवळील कांही मर्यादित भागात केला असता (जॉन सी. व्हीटकोंब आणि हेन्री एम. मॉरीस, द जेनेसीस फ्लड, प्रेसबिटेरिएन अँड रिफॉर्म्ड पब्लिशिंग कंपनी, 1993. पृष्ठ 11).
तारु संबंधात पुष्कळ गोष्टी आहेत त्यामध्ये आजहि मनोरंजकता वाटते. आज रात्री मला वाटते की आम्ही ह्या तीन गोष्टीचा विचार करावा.
I. प्रथम, तारु म्हणते तारणासाठी तुम्ही ख्रिस्ता मध्ये असले पाहिजे.
आपला सुर्वातेचा उतरा आपणास सांगतो की
“तूं आपल्या सगळ्या कुटुंबासह तारुच्या आंत चल” (उत्पत्ती 7:1).
आता उत्पत्ती सात, वचन सोळा ऐका:
“देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एकएक नरमादी आंत गेली; मग परमेश्वराने त्याला आंत बंद केले” (उत्पत्ती 7:16).
आणि वचन सात म्हणते:
“हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुना यांस घेऊन तारुच्या आंत गेला” (उत्पत्ती 7:7).
नोहा व त्याच्या कुटुंबाने देवाने जे सांगितले ते केले (उत्पत्ती 7:1). ते तारुच्या आंत गेले. आणि तुम्ही ख्रिस्ताच्या आंत यायला हवे. पवित्रशास्त्र सांगते,
“जो त्याच्या [येशू] वर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही...” (योहान 3:18).
“वर” हा शब्द “इज” असा अनुवादित केला आहे. डॉ. झोढीएट्स यांच्यामते, त्याचा अर्थ “स्थळ किंवा वस्तू मध्ये जाण्याची प्राथमिक कल्पना.” तुम्ही येशू मध्ये विश्वासाने यायला हवे — वर स्वर्गात, देवाच्या उजव्या बाजूला. जसा नोहा तारु मध्ये आला, तसे तुम्हीहि ख्रिस्तामध्ये यायला हवे. “जो त्याच्या [मध्ये] विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही...” (योहान 3:18). ब-याचदा पवित्रशास्त्र जे “ख्रिस्तामध्ये” आहेत ते असे म्हणते. इथे दोन परिचित वचनें पाहा:
“म्हणून ख्रिस्त येशू मध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच...” (रोम 8:1).
“म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तो नवी उत्पत्ती आहे...” (II करिंथ 5:17).
पौल “जे ख्रिस्तामध्ये होते” त्यांच्याविषयी बोलतो (रोम 16:7).
तुम्ही ख्रिस्ता मध्ये आहांत काय? तुम्ही त्याच्यामध्ये विश्वासाने यायला हवे, जसा नोहा तारुमध्ये आला. येशू म्हणाला,
“मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आंत जाईल तर त्याला तारणप्राप्ति होईल” (योहान 10:9).
ते कसे स्पष्ट करावे हे मला माहित नाही, परंतू सेवेमध्ये सर्वात कठीण गोष्ट म्हणजे लोकांना साधे विचार सुद्धा समजण्यास उशीर लागतो: ख्रिस्ताकडे या. ख्रिस्तामध्ये या!
मला अशाप्रकारे सांगू द्या. समजा तुम्ही नोहाच्या काळात राहत आहांत आणि त्याच्याकडून जलप्रलय येणार यासंबंधी प्रचार ऐकला आहे. तो असे म्हणतांना ऐकले असेल की तुम्हांला वाचावयाचे असेल तर तुम्हांस तारुमध्ये यावे लागेल. “होय,” तुम्ही म्हणता, “हे खरे आहे. न्याय येत आहे. होय, हे खरे आहे, फक्त तारुच मला वाचवू शकतो. माझा त्यावर विश्वास आहे.” तुम्ही जलप्रलयातून वाचला असता काय? अर्थात नाही! खरे तर तुम्हांला जागे होण्याची गरज आहे आणि वाचण्यासाठी तारु मध्ये यायला हवे — फक्त विश्वास ठेवल्याने तुम्ही वाचणार नाही — परंतू त्या मध्ये जावे लागेल! आणि तेच मी तुम्हांस करायला सांगत आहे! मला ख्रिस्त वाचवू शकतो असा नुसता विश्वास ठेवीत तेथे बसू नका! विश्वासाने ख्रिस्तामध्ये या! येशू म्हणाला:
“जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही” (योहान 6:37).
होय, तारु म्हणते तुम्ही ख्रिस्तामध्ये यायला हवे.
II. दुसरे, तारु म्हणते तुम्ही ख्रिस्ताचे शरीर, मंडळीत यायला पाहिजे.
मला कळाले की माझ्याशी बरेच लोक असहमत असतील. सध्या बरेच स्थानिक मंडळीस गौण किंवा कमी लेखतात. परंतू ते चुकीचे आहेत. तारु हे फक्त ख्रिस्तासारखे नाही. परंतू ते स्थानिक नवीन कराराच्या मंडळीचा प्रकार किंवा चित्रण सुद्धा आहे.
आता, तुम्ही ख्रिस्तात कसे याल? पहिल्या करिंथच्या पत्रातील, अध्याय बारा, वचन सत्ताविस व अठ्ठाविस, म्हणते,
“तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहां. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे...”(I करिंथ 12:27-28).
आपण तेथे थांबू. “ख्रिस्ताचे शरीर” ही संज्ञा मंडळी, ख्रिस्तातील विश्वासणा-यांचा स्थानिक समुहास संदर्भित करते हे सत्य मी रुजवू इच्छितो. आता वचन तेरा ऐका:
“एक शरीर होण्यासाठी आपणां सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळालाआहे...” (I करिंथ 12:13).
स्थानिक मंडळीत तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने झाला आहे. कशाप्रकारे तुम्ही मंडळीचे खरे, जिवंत सदस्य बनता!
आता, ते कसे घडते ह्याची तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. तुमचे काम आहे येशूकडे येणे. जेव्हां तुम्ही येशूकडे येता, तेव्हां मंडळीत तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्मा आपोआप करतो!
कृपया उत्पत्ती, अध्याय सात, वचन सोळाकडे वळा. जेव्हां नोहा तारुमध्ये आला, पवित्रशास्त्र म्हणते, “मग परमेश्वराने त्याला आत बंद केले” (उत्पत्ती 7:16). हे आध्यात्मिकरित्या एका शरीरामध्ये देवाचा पवित्र आत्मा तुम्हांचा बाप्तिस्मा करुन तुम्हांस मंडळीत बंद करीत आहे! होय, तारु ख्रिस्ताबरोबरचा समेट व मंडळीबरोबरचा समेट ह्याविषयी बोलते. होय, तुम्ही देवाकडून ख्रिस्ताबरोबर व मंडळीबरोबर “आत बंद” होत नाही, तोवर, तुम्ही न्यायामध्ये नष्ट होणार. तुम्ही आत बंद” होताय मग तुम्ही सुरक्षित आहांत. ज्यांचा पालट झाला आहे त्यांना सार्वकालिक संरक्षण आहे ह्याविषयी ते बोलते. जे ख्रिस्ताचे ऐकतात ते कधीहि नाश होणार नाहीत!
III. तिसरे, तारु म्हणते तुम्ही अरुंद दरवाजाने प्रवेश केला पाहिजे.
नोहा तारुत कसा गेला? उत्पत्ती, अध्याय सहा, वचन सोऴाकडे वळा:
“...तारवाच्या एका बाजूस दार ठेव...” (उत्पत्ती 6:16).
येशू म्हणाला, “मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आंत जाईल तर त्याला तारणप्राप्ति होईल...(योहान 10:9). नोहा त्या दरवाजाने आंत गेला. तुम्ही ख्रिस्ताद्वारे तारणांत यायला हवे. येशू म्हणाला, “अरुंद [सरळ] दरवाजाने आंत जा” (मत्तय 7:13).
पुन्हां, ख्रिस्त म्हणाला:
“अरुंद दरवाजाने आंत जाण्याचा नेटाने यत्न करा; कारण मी तुम्हांस सांगतो, पुष्कळ लोक आंत जाण्यास पाहतील; त्यांना आंत जाता येणार नाही” (लुक 13:24).
असे सर्व नोहाच्या काळात घडले. उत्पत्ती, अध्याय सात, वचन चार ऐका. परमेश्वर म्हणाला:
“अजून सात दिवसाच अवकाश आहे...” (उत्पत्ती 7:4).
वचन दहा सुद्धा लक्षात घ्या:
“सात दिवसानंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले” (उत्पत्ती 7:10).
नोहा तारुत गेला. देवाने त्याला आंत बंद केले. दरवाजा बंद केला. सात दिवस संपले आणि कांहीहि घडले नाही. नंतर न्याय सुरु झाला. तारुमध्ये कोणांलाहि प्रवेश मिळाला नाही! खूप उशीर झाला हेता!
लोक असे ओरडत असलेले मी ऐकू शकतो, “मला आंत घ्या! मला आंत घ्या!” परंतू खूप उशीर झाला होता!
“अरुंद दरवाजाने आंत जाण्याचा नेटाने यत्न करा; कारण मी तुम्हांस सांगतो, पुष्कळ लोक आंत जाण्यास पाहतील; त्यांना आंत जाता येणार नाही” (लुक 13:24).
आता येशू ख्रिस्ताकडे आंत य़ा — अनंतकाळासाठी उशीर होण्यापूर्वी!
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
उपेशापूर्वी शास्त्रवाचन मि. नोहा साँग यांनी केले: उत्पत्ती 6:5-8.
उपेशापूर्वी एकेरी गीत मि. नोहा साँग यांनी गायले: “इफ यू लिंगर टू लाँग”
(डॉ.जॉन आर राईस, द्वारा, 1895-1980).
“If You Linger Too Long” (by Dr. John R. Rice, 1895-1980).
रुपरेषा नोहावर कृपादृष्टी झाली! (उत्पत्ती पुस्तकावरील उपदेश क्रं. 19) डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा “मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तूं आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवांत चल; कारण मी पाहिले आहे की या पीढीत तूंच माझ्यापुढे नीतिमान आहेस” (उत्पत्ती 7:1). (उत्पत्ती 6:8; इब्री 11:7; उत्पत्ती 9:20-21; रोम 4:5-6) I. प्रथम, तारु म्हणते तारणासाठी तुम्ही ख्रिस्ता मध्ये असले पाहिजे, II. दुसरे, तारु म्हणते तुम्ही ख्रिस्ताचे शरीर, मंडळीत यायला पाहिजे, III. तिसरे, तारु म्हणते तुम्ही अरुंद दरवाजाने प्रवेश केला पाहिजे, |