संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
येशूकडे पाहत असावेLOOKING UNTO JESUS डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश “आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे” (इब्री 12:2). |
हे वचन ख्रिस्ताची सुवार्ता स्पष्ट करते. खरे ख्रिस्ती काय विश्वास ठेवतात ह्याविषयी स्पष्ट विधान करणारे संपूर्ण पवित्रशास्त्रातील हे अगदी स्पष्ट वचन आहे असे मला वाटते.
आता, तुम्ही हा उपदेश खूप काळजीपूर्वक ऐकायला हवा, जसे की मी ह्या वचनाचा भाग घेतो आणि मी शक्य तितके तुम्हां काळजीपूर्वक समजवण्याचा प्रयत्न करतो. हा उतारा तुमचे अंत:करण उघडेल यासाठी की ख्रिस्ताचा प्रकाश त्याच्यावर पडेल, जेथे आता अंधकार व गोंधळ आहे.
एक व्यक्ती मंडळीला जाऊ शकते आणि तरीहि तेथे निबिड अंधकार असू शकतो. एक व्यक्ती भरपूर पवित्रशास्त्र शिकू शकते आणि तरीहि ते गोंधळलेली, आणि तो जे वाचतो त्या समजूतीत अंधकार असू शकतो. मी प्रचार करतांना देवाने स्वत: “तुमचे समजूतीचे अंतचक्षू उघडावेत” (इफिस1:18) ही माझी प्रार्थना आहे. केवळ ह्या वचनातील कांही सत्ये तुम्ही ग्रहण करु शकला तरच देव हे करील.
हा उतारा आपणांस तीन मूलभूत सत्यें देतो:
1. येशूने तुमच्यासाठी काय केले.
2. येशूने तुमच्यासाठी हे का केले.
3. तुम्ही ह्याचा लाभ कसा घ्याल.
I. प्रथम, येशूने तुमच्यासाठी काय केले.
“येशू ह्याच्याकडे पाहत असावे... त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला” (इब्री 12:2).
ग्रीक शब्द “सहन करणे” ह्याचा अर्थ “धीराने दु:खसहनांतून जाणे” (स्ट्रॉंग्ज.) असा आहे तुम्हांस तुमच्या पापाच्या दंडापासून वाचविण्यासाठी येशू धीराने मोठ्या दु:खाला व छळणूकीला सामोरा गेला. जसे की पूल लिहतो:
(ख्रिस्ताने) वधस्तंभ सहन केला, सर्व प्रकारच्या (भयंकर दु:खासहित), त्याच्या अंत:करणातील वेदना, छळल्यामुळे शरीरात झालेल्या वेदना, (मार), थुंकणे, काटे भोसकणे, फटक्याच्या माराने चामडी निघणे, हात व पायात खिळे (छीद्र) मारणे, सर्वप्रकारची दुष्टता मानवीय किंवा सैतानी द्वेष किंवा राग त्याच्यावर लादला; त्या थकव्याच्या ओझ्याने, तो खचला नाही की बेशुद्ध पडला नाही. जे (यशया 53 मध्ये)! विनम्रता व सकारात्मक मनोधैर्याने सामोरा गेला. (मॅथ्यू पूल, इब्री 12:2 वरील समालोचन).
त्यानंतर, सुद्धा, ख्रिस्त “त्याने लज्जा तुच्छ मानून” वधस्तंभावरील मरणाला सामोरा गेला (12:2). “तुच्छ मानने” म्हणजे “चा थोडाहि विचार न करणे” “चा खूप कमी विचार करणे” (वाइन्स). येशू ज्या दु:खसहनांमधून तो गेला त्यासंबंधी त्याने थोडाहि विचार केला नाही कारण तो तुमचे तारण आणि देवाचे गौरव यासंबंधी विचार करीत होता. “लज्जा तुच्छ मानने” येथे लज्जा म्हणजे “मानहानी” (स्ट्रॉंग्ज). पापाच्या दंडापासून तुम्हांला वाचविण्यासाठी येशूला मानहानी सहन करावी लागली. त्याने तुमच्या बदली मानहानी सहन केली, यासाठी की तुमची अंतिम न्यायासमयी मानहानी होऊ नये.
येशूची मारुन मानहानी केली. त्याच्या तोंडावर थुंकून व दाढी ओढून मानहानी केली. “त्याला वधस्तंभी खिळा! त्याला वधस्तंभी खिळा!” असे ओरडून क्रोधाविष्ट समुहाने, त्याची मानहानी केली. त्याचे कपडे आपसांत वाटून, आणि त्याला नग्न असे वधस्तंभावर खिळण्याने त्याची मानहानी केली.
तो अपमानीत, लज्जास्पद, तुमच्या बदल्यात झाला.
“ख्रिस्तानेहि पापाबद्द्ल म्हणजे नीतिमान... अनीतिमान लोकांकरिता, एकदा मरण सोसले”(1पेत्र 3:18).
“आम्हां सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादले”(यशया 53:6).
येशूने तुमच्या पापाबद्दल मिळावयाची शिक्षा आपणांवर घेतली. येशूला तुमच्या बदल्यात शिक्षा झाली होती.
येशू तुमच्या बदल्यात अपमानीत झाला होता. अंतिम न्यायसमयी तुम्ही केलेले प्रत्येक पातक देवाकडून वाचले जाईल. ते तुम्हांला सर्व जगासमोर अपमानीत करील. परंतू जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता आहां, तर तो तुमच्या बदल्यात अपमानीत झाला आहे. तुमच्या बदल्यात तो नग्न उभा राहिला आणि तुमच्या पापामुळे अपमानीत झाला, येशू तुमच्या बदल्यात नग्न उभा राहिला, वधस्तंभावर गेला - जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आहां!
पवित्रशास्त्र शिकविते की येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावर जाणे हे “आपल्या ऐवजी केलेले प्रायश्चित” होय! डॉ. पी. बी. फिट्झवॉटर म्हणतात:
त्याचे प्रायश्चित आपल्या ऐवजी केलेले होते, याचा अर्थ असा च्या ऐवजी, किंवा प्रतिविधीत्व करणे, दुसरे (ख्रिश्चन थियालॉजी, एर्डमन्, 1948, पृष्ठ 426).
इंग्रजी शब्द “विकारिअस” म्हणजे “एका व्यक्तीच्या जागी दुस-या व्यक्तीला समजणे” (वेबस्टर्स न्यू कॉलेजियेट डिक्शनरी, 1960).
आणि नेमके तेच येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी केले! “एका व्यक्तीच्या जागी (तुम्ही) दुस-या व्यक्तीला (ख्रिस्ताला) समजणे.” पापाकरिता तुम्हांस जी शिक्षा होणार होती ती त्याने घेतली.
पवित्रशास्त्र म्हणते:
“ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वत:वर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला”(इब्री 9:28).
“शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला” (I करिंथ 15:3).
तुमच्या पापाकरिता तुम्हांस जो दंड होणार होता तो ख्रिस्ताने भरला. त्याने किंमत मोजली.
माझे सावत्रवडिल एक कडक वयस्क सागरतज्ञ होते. एकदा त्यानी एका पोलीसाच्या पॅंटच्या पार्श्वभूमीवर लाथ घातली. त्यांनी त्यांना तुरुंगात टाकले. मध्यरात्री माज्या आईने एड गॅलिक जामीन देण्यासाठी फोन केला. एड तुरुंगात देले व त्यांनी जामीन भरला. मग माझ्या वडिलांना त्यांनी जाऊ दिले. तुरुंगात बाहेर निघाले, आणि त्यांनी एडना पाहिले, ते म्हणाले, “तुम्ही इथे काय करताॽ”
येशूने काय केले याची आठवण मला त्या गोष्टीने करुन दिली. नरकातील पापाच्या दंडापासून सोडविण्यासाठी त्याने माझा जामीन भरला. आम्ही वधस्तंभाकडे पाहतो व म्हणतो, “तुम्ही इथे काय करताॽ” त्याचे उत्तर आहे – देवाच्या नरकाच्या तुरुंगातून सुटण्यासाठी – तो तुमचा जामीन भरतो! येशूवर आताच विश्वास ठेवा!
II. दुसरे, येशूने तुमच्यासाठी हे का केले.
“जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता”(इब्री 12:2).
येशूने मुद्दामहून वधस्तंभावर गेला. कोणत्याहि क्षणी तो त्यातून सुटका करण्या समर्थ होता. परंतू त्याऐवजी त्याने, “वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे”(यशया 53:7). तो आमच्या पापाचा दंड भरण्यासाठी शांतपणे वधस्तंभावर का गेला? “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता” त्याने ते केले(इब्री 12:2).
प्रथम, तेथे स्वर्गात प्रवेश करण्यात आनंद होता. ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला तेव्हां त्याला ठाऊक होते की तो लगोलग स्वर्गात प्रवेश करणार होता. त्याच्या बाजूस मरणा-या चोरास त्याने सांगितले, “तूं आज माझ्याबरोबर सुखलोकांत असशील”(लुक 23:43).
मग, तो सुद्धा तुम्ही स्वर्गात प्रवेश केल्यावर तुम्हांला पाहून आनंदाची अपेक्षा करतो. परिवर्तन झालेल्या चोराला स्वर्गात पाहून येशूला किती आनंद झाला असेल! आणि तुम्हाला पाहून त्याला किती आनंद होईल.
काल मी कित्येक पुरुष येशूकडे आलेले पाहिले. त्यातील एक आता डिकनचा अध्यक्ष आहे. दुसरा एक पाळकाचा सहाय्यक आहे. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला, ज्यांना मी ख्रिस्ताकडे चाळीस वर्षापूर्वी आणले. अशाच प्रकारचा आनंद येशू स्वर्गात अनुभवू इच्छितो. आणि त्याचमुळे मुद्दामहून त्याने त्यांना वधस्तंभावर खिळू दिले—“पुष्कळ पुत्रांना गौरवात” आणण्यासाठी (इब्री 2:10).
त्याचमुळे येशू हा “आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा” असा दोन्हीहि आहे. तो आपल्यामध्ये विश्वास निर्माण करतो आणि आपणांस परिपूर्ण करतो आणि आपले संरक्षण करतो. ख्रिस्तामध्ये सर्वकांही तारण आहे!
III. तिसरे, तुम्ही ह्याचा लाभ कसा घ्याल.
“येशूकडे पाहत असावे...देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे” (इब्री 12:2).
प्रेषितांची कृत्यें पुस्तकात देवाच्या उजवीकडे बसलेल्या स्वर्गातील ख्रिस्ताच्या, उल्लेखाशिवाय क्वचितच उपदेश केला गेला आहे. मला असे कळून आले की आपण, आपल्या युगात, प्रेषितांनी जसे स्वर्गातील ख्रिस्ताचा प्रचार केला तसे आपणहि केला पहिजे. मी असा विचार करतो याचे कारण असे की:
1. ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे असे स्वर्गातील ख्रिस्ताचा प्रचार करणे म्हणजे ख्रिस्त व पिता हे दोन भिन्न – वेगळे – व्यक्ती आहेत हे स्फटिकासारखे स्पष्ट होते. सध्या पवित्रशास्त्रीय सिद्धांत अंधूक झालेला आहे. सध्या ह्या नाजूक घडीला कांहीहि न जाणता नैतिकतेसंबंधीचे पाखंडी पुष्कळ आहेत.
2. देव जो पिता आणि देव जो पुत्र त्रैक्यामध्ये भिन्न दिसत नाहीत तोवर समेट, प्रार्थना, आणि न्यायीपणाचा महान पवित्रशास्त्रीय सिद्धांत काल्पनिकरित्या नष्ट झालेला आहे. ख्रिस्ताचे मध्यस्तीचे काम स्वर्गातील ख्रिस्ताद्वारे नाटकीयरित्या स्पष्ट केले आहे.
3. स्वर्गातील ख्रिस्त गाजविल्याने खोट्या कल्पनेत राहणारे बरे झाले. जे लोक स्वर्गातील ख्रिस्ताकडे वळले ते सर्वप्रकारच्या खोट्या कल्पनेतून बाहेर आले.
कांही काळापूर्वी मी परुशी व जकातदार (लुक 18:9-14) वर एक चांगला उपदेश ऐकला. त्यांनी सर्वप्रकारच्या खोट्या कल्पना उघड केल्या, त्यांनी सांगितले की तारण हे “पाप्याची प्रार्थना” म्हटल्याने, पुढे येऊन, मंडळीला जाऊन, इ. ने मिळत नाही. मग तो म्हणाला, “तुम्ही येशूवर विश्वास ठेवायला पाहिजे.” मी विचार केला, “परिपूर्ण!” परंतू मग तो म्हणाला, “येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे तुम्ही विश्वास ठेवता आहां की तो तुमच्या पापाचा दंड भरण्यासाठी मरण पावला.” मला वाटते, “अरेरे, नाही! या सिद्धांताने येशूवर विश्वास ठेऊन, तो स्वत: विश्वासाने गोंधळलेला आहे.”
हरविलेल्या पाप्यांना वर – स्वर्गारोहन झालेला ख्रिस्त – स्वर्गामध्ये - देवाच्या उजवीकडे बसलेला - पाहायला लावून ह्या प्रचारकाने त्याचा उपदेश संपवला असता तर अधिक चांगला झाला असता!
“येशूकडे पाहत असावे...देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे” (इब्री 12:2).
ते कुठे पाहातील! ते कोणावर विश्वास ठेवतील! ते कसे तारले जातील!
“प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल”(प्रे.कृ.16:31).
पहा व जग, माझ्या बंधू, जग!
आता येशूकडे पहा व जग!
'हे त्याच्या वचनांत नमुद आहे, हालेलुया!
केवळ हेच तू कर “पहा व जग.”
(“लुक अँड लीव्ह” विलियम ए. ऑग्डेन द्वारा, 1841-1897).
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
उपेशापूर्वी शास्त्रवाचन मि. नोहा साँग यांनी केले: योहान 12:28-32.
उपेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रिफित यांनी गायले:
“लुक अँड लायव्ह” (विलियम ए. ऑग्डेन द्वारा, 1841-1897).
“Look and Live” (William A. Ogden, 1841-1897).
रुपरेषा येशूकडे पाहत असावे LOOKING UNTO JESUS डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा “आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे” (इब्री 12:2).
I. प्रथम, येशूने तुमच्यासाठी काय केले - “लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला,”
II. दुसरे, येशूने तुमच्यासाठी हे का केले - “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता,”
III. तिसरे, तुम्ही ह्याचा लाभ कसा घ्याल - “येशू ह्याच्याकडे पाहत असावे...
|