संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
अंतराळात उचलले जाणे (उपदेश # 3 पवित्रशास्त्रातील भविष्यवाणीवर आधारीत) डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश “कारण, आज्ञाध्वनि आद्यदेवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असतां प्रभु स्वत: स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत पहिल्याने उठतील; नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारुढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहूं...” (I थेस्सल. 4:16-17). |
पवित्रशास्त्रातील हे किती अदभूत अभिवचन आहे! येशू पुन्हा येतोय! “येशू पुन्हा येतोय”, हे शब्द जेव्हां प्रत्येक ख्रिस्तीजन ऎकतील तेव्हा ते आनंदाने भरले पाहिजेत! पवित्रशास्त्रातील हा उतारा उघडा ठेवा.
कित्येक तास येशूला वधस्तंभावर खिळले होते. तो मोठ्याने आरोळी मारुन म्हणाला, “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो”(लुक 23:46). तो मरण पावला. त्यांनी त्याचा मृतदेह एका कबरेत ठेवला. त्यांना ती सीलबंद केली आणि रोमी सैन्यांस त्या कबरेवर पहारा देण्यास सांगितले.
तिस-या दिवशी तो मेलेल्यांतून उठला. परंतू तो जेव्हां शिष्यांस भेटला,
“पण ते घाबरुन भयभीत झाले होते आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले” (लुक 24:37).
त्यानंतर येशू त्यांना म्हणाला,
“माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भूताला नसते” (लुक 24:39).
त्याने त्यांना यरुसलेम नगराच्या बाहेर जैतूनाच्या पर्वताकडे घेऊन गेला. त्याने त्यांना संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करण्यास सांगितले.
“असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला; आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असतां ते आकाशाकडे निरखून पाहात होते, तेव्हां पाहा, शुभ्र वस्त्रें परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले; ते म्हणाले, अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहात उभे राहिला? हा जो येशू तुम्हांपासून वर घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशांत जातांना पाहिले, तसाच तो येईल” (प्रे. कृ. 1:9-11).
“हा तोच येशू” जो तुम्हांपासून वर “स्वर्गात” घेतला गेला आहे तो परत येणार. तो वर गेला! तो खाली येईल! तो पुन्हां येत आहे!
तो पुन्हां येत आहे, तो पुन्हां येत आहे,
मनुष्याने नाकारलेला, तोच येशू;
तो पुन्हां येत आहे, तो पुन्हां येत आहे,
सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने, तो पुन्हां येत आहे!
(“हि इज कमिंग अगेन” माबल जॉन्स्टन कँप यांच्या द्वारे, 1871-1937).
पवित्रशास्त्र आपणांस सांगते की तो दोन भागात, दोन टप्प्यात येईल. त्याच्या परत येण्याच्या दुस-या भागात तो पृथ्वीवर आपले एक हजार वर्षाचे राज्य स्थापित करण्यासाठी जैतूनाच्या डोंगरावर येईल. परंतू आपला हा उतारा त्याच्या परत येण्याच्या पहिल्या भागाविषयी सांगते. I थेस्सल. 4:16-17 ह्या आपल्या उता-याकडे पाहा. पवित्रशास्त्रातील ह्या घटनेविषयी उता-यातून तीन गोष्टी लक्षात घ्या.
I. प्रथम, प्रभू येशू पृथ्वीच्या वरील वातावरणात उतरणार.
I थेस्सल. 4:16 कडे ध्यान द्या.
“कारण, आज्ञाध्वनि आद्यदिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असतां प्रभु स्वत: ...” (I थेस्सल. 4:16).
ख्रिस्त “स्वत:” “स्वर्गातून” खाली उतरेल. तो पवित्र आत्मा नव्हे. खरेच, तो बिल्कुल पवित्र आत्मा नव्हे. तो “तोच येशू, जो वर... स्वर्गात घेतला [गेला] आहे” (प्रे. कृ. 1:11). हा “तोच येशू” स्वर्गातून खाली उतरणार.
“कारण, आज्ञाध्वनि आद्यदिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असतां प्रभु स्वत: ...” (I थेस्सल. 4:16).
पुनरुत्थित ख्रिस्त म्हणाला,
“मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भूताला नसते” (लुक 24:39).
तो पुन्हां येत आहे, तो पुन्हां येत आहे,
मनुष्याने नाकारलेला, तोच येशू;
तो पुन्हां येत आहे, तो पुन्हां येत आहे,
सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने, तो पुन्हां येत आहे!
(“हि इज कमिंग अगेन” माबल जॉन्स्टन कँप यांच्या द्वारे, 1871-1937).
योहान 14:3 मध्ये येशू म्हणाला,
“मी पुन्हां परत येईन” (योहान 14:3).
ह्या उता-यातून मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो की तो पृथ्वीवर येणार नाही. त्याचे पृथ्वीवर परत येणे ही संपूर्ण घटना अगदी वेगळी आहे, जी की नंतर घडणार आहे.परंतू मला तुमच्या लक्षात आणून द्यायचे आहे की आपल्या उता-यात तो पृथ्वीवर येणार नाही. वचन 17 कडे पाहा. उभे राहून वाचू.
“नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारुढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहूं.. .” (I थेस्सल. 4:17).
आपण खाली बसू शकता.
“वर उचलण्याच्या” वेळी ख्रिस्त अंतराळात येणार. तो पृथ्वीवर नंतर येणार. व्यवस्थित पवित्रशास्त्र वाचल्यावर ह्या दोन घटना भिन्न आहेत हे स्पष्ट होते. प्रभू येशू स्वर्गातून खाली उतरणार, पण तो पृथ्वीच्या वर “अंतराळात” थांबणार.” “राप्चर” ह्या शब्दाचा अर्थ आहे वाहून नेणे- आनंदाने झेलून धरणे! अंतराळात हवा नाही, हे दर्शविते की तो पृथ्वीच्या वर असलेल्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर थांबणार.
“नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर... प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारुढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहूं...” (I थेस्सल. 4:17).
II. दुसरे, ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते उठतील.
उता-यातील 16 वे वचन म्हणते,
“कारण, आज्ञाध्वनि आद्यदेवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असतां प्रभु स्वत: स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत पहिल्याने उठतील. ..” (I थेस्सल. 4:16).
आपण खाली बसू शकता. “ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत पहिल्याने उठतील.” डॉ. जे. वरनॉन मॅक् गी म्हणाले,
तो “आज्ञाध्वनि व तुतारीचा नाद” होत असता स्वर्गातून खाली उतरणार. तो आज्ञाध्वनि आहे. हा तोच आवाज आहे जो लाजारसच्या कबरेबाहेर उभा राहिला व म्हणाला, “लाजारसा, बाहेर ये” (जे. वरनॉन मॅक् गी, टीएच.डी.. थ्रु द बायबल, थॉमस नेल्सन पब्लिशर्स, 1983, आवृत्ती V, पृष्ठ. 398).
येशू लाजारसाच्या कबरेकडे आला व म्हणाला,
“येशूने म्हटले, धोंड काढा, त्या मृताची बहिण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरुन चार दिवस झाले आहेत. (योहान 11:39).
पण त्यांनी येशूची आदेश मानला. कबरेच्या तोंडावरची धोंड त्यांनी काढली. आणि येशू,
“असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारुन म्हटले, लाजारा, बाहेर ये. तेव्हां जो मेलेला होता तो बाहेर आला” (योहान11:43-44).
आणि अगदी हेच ख्रिस्त वर उचललेले जाण्याची वेळी करणार. तो मोठ्या ध्वनीने, आणि दिव्यदूताच्या तुतारीच्या, नादासह आज्ञा करणार (मॅक् गी, ibid.). लाजारसाच्या कबरेजवळ जसा ख्रिस्त मोठ्याने ओरडला, तसाच तो ओरडणार, “ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत पहिल्याने उठतील.” ख-या ख्रिस्ती लोकांची पार्थिव शरीरे कबरेतून बाहेर येतील आणि ख्रिस्ताला अंतराळात सामोरे जातील.
जेव्हां जॉन कागन लहान मुलगा होते त्यांना ठाऊक होते त्यांचे तारण झाले नव्हते – परंतू त्यांचे आई वडील पक्के ख्रिस्ती होते. जेव्हां मी वर उचललेले जाण्यासंबंधी बोललो तेव्हां त्यांना त्या रात्री काळजी वाटली. त्यांनी मला सांगितले ते अंथरुणातून बाहेर पडले आणि आपल्या आई वडीलांच्या झोपण्याच्या खोलीत हे पाहाण्यास गेले की जर त्यांचे वर उचललेले जाणे झाले आणि मला एकट्याला घरात सोडले नाही ना. ती चांगली भिती होती. आपण खाली राहणार नाही ना ही भिती चांगली आहे! तुम्ही येशूवर विश्वास ठेवा व तुमची भिती घालवा! पवित्रशास्त्र म्हणते,
“तुझे मृत जिवंत होतील, माझ्या (लोकांची) प्रेते उठतील, मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा; कारण तुझवरील दहिवर, हे प्रभातीचे दहिवर आहे; भूमि प्रेते बाहेर टाकील” (यशया 26: 19).
ईयोबाचे पुस्तक हे जुन्या करारातील सर्वात जुने पुस्तक आहे. हे मोशेने उत्पत्तीचे पुस्तक लिहण्या अगोदर लिहले आहे. ईयोब वर उचलले जाण्यासंबंधी बोलतो.
“ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली, तरी मी देवाला देहविरहित पाहीन; त्याला मी स्वत: पाहीन, अन्याचे नव्हे माझेच नेत्र त्याला पाहतील, [माझा अंतरात्मा] झुरत आहे” (ईयोब 19:26-27).
वर उचलले जाण्यासंबंधी प्रेषित पौलाने सुद्धा अगोदर सांगितले आहे. तो म्हणाला,
“क्षणात, निमिषांत, शेवटला कर्णा वाजेल तेव्हां; कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आपण बदलून जाऊ” (I करिंथ. 15:52).
आपला उतारा म्हणतो,
“ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत पहिल्याने उठतील” (I थेस्सल. 4:16).
आता, तुम्हांला आश्चर्य वाटेल जी शरीरे खूप वर्षे मृत झालेली, खरे विश्वासणारे जे 3,520 वर्षापूर्वी मेलेले आहेत जसे की ईयोब, उठतील. कसे काय हे घडेल? I करिंथ. 15:51 मध्ये पौल ह्यांस “एक रहस्य” म्हणतो, “मस्टेरिओन” मूळ ग्रीकमध्ये, असे कांही जे मानवी मन समजू शकत नाही असे. खरे तर, हे अद्भूत आहे. तुम्ही देवावर विश्वास ठेवता, नाही काय? ठिक आहे, पवित्रशास्त्राच्या एका टोकापासून ते दुस-या टोकापर्यंत आपणास सांगण्यात आले आहे की देव अद्भूत कार्ये करतो. आणि हे सुद्धा एक सर्वात मोठे अद्भूत आहे,
“ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत पहिल्याने उठतील” (I थेस्सल. 4:16).
हे सर्व योग्य आहे हे आपणास समजत नाही, तथापि हे खरे आहे.
“ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत [मेलेले ख्रिस्ती लोक] पहिल्याने उठतील” (I थेस्सल. 4:16).
III. तिसरे, जिवंत उरलेले ख्रिस्ती त्यांच्याबरोबर अंतराळात घेतले जातील.
17 व्या वचनाकडे पाहू.
“नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर... प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारुढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहूं...” (I थेस्सल. 4:17).
त्या समयी जे ख्रिस्ती लोक जिवंत असतील ते मेलेल्या ख्रिस्ती “लोकांबरोबर” “प्रभूला सामोरे होण्यासाठी” अंतराळात घेतले जातील. पहिल्याने, मेलेले ख्रिस्ती लोक “उठतील,” आणि नंतर, दुसरे, जे खरे ख्रिस्ती लोक जिवंत असतील प्रभूला सामोरे होण्यासाठी “अंतराळात घेतले जातील.” पवित्रशास्त्र आपणांस सांगते की हे सर्व घडणार आहे
“क्षणात, निमिषांत” (I करिंथ. 15:52).
डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हे सर्व घडणार आहे! मृतातून उठलेले ख्रिस्ती व जिवंत असलेले ख्रिस्ती, “प्रभूला सामोरे होण्यासाठी... अंतराळात घेतले जातील.” पवित्रशास्त्रात किती अद्भूत अभिवचन आपणांस दिले आहे! किती अद्भूत आशा ख्रिस्ती लोकांसाठी आहे!
हे, आनंदा, हे सुखा! मरणोन्मुख न होता आम्ही जाणार,
ना आजार, ना दु:ख, ना हताशा, ना रडणे.
वैभवाने मेघारुढ असे आपल्या प्रभूबरोबर जाणार,
तेव्हां येशू “आपल्या स्वकीयांचे” स्वागत करणार.
(“क्राईस्ट रिटर्न्थ” एच. एल. टर्नर यांच्या द्वारा, 1878).
डॉ. मॅक् गी म्हणाले, “कॉट अप” हा ग्रीक शब्द “हारपाझो” पासून अनुवादित केला आहे ज्याचा अर्थ “घाईने जमविणे, हिसकावून घेणे, वर उचलणे, किंवा वर अंतराळात उचलून घेऊन जाणे” असा आहे (ibid.,पृष्ठ.399).
मग डॉ. जे. वरनॉन मॅक् गी म्हणाले,
किती वैभवी, अद्भूत सांत्वना ही आहे! मृत शरीरे [ख्रिस्ती लोकांची] बाहेर येतील. आणि मग त्यासमयी जे जिवंत उरु त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे जाऊ. आणि सदा सर्वदा प्रभूबरोबर राहू. खरे तर, आपण तो जेव्हां आपले राज्य पृथ्वीवर स्थापन करील तेव्हां त्याच्या बरोबर परत पृथ्वीवर येऊ (ibid.).
जेव्हां ख्रिस्त आपणास स्वर्गात घेण्यासाठी अंतराळात परत येतो तेव्हां ते एक अद्भूत भविष्य प्रत्येक ख्रिस्ती लोकांची वाट पाहात आहे!
हे घडावे म्हणून तुम्ही तयार आहांत? तुम्ही तयारी केली? आता ज्यांचे तारण झाले आहे असेच फक्त अंतराळात प्रभूला भेटण्यास उचलले जाणार आहोत मग. तुमचे तारण झाले आहे काॽ तमच्या पापाची खंडणी भरण्यासाठी येशू वधस्तंभावर मरण पावला. तो मरणातून उठला आणि तुम्हांला शुद्ध करण्यासाठी, तुमची सर्व पापे धुण्यासाठी, तो त्याचे रक्त स्वर्गात घेऊन गेला. परंतू तुम्ही येशूला शरण गेले पाहिजे, आणि केवळ त्याच्यावरच विश्वास ठेवला पाहिजे. जर तुम्ही साधा विश्वास येशूवर ठेवला तर, तो त्याच्या रक्ताने तुमच्या सर्व पापांची शुद्धी करील, आणि तुमचे तारण होईल, मग,
“नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारुढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहूं” (I थेस्सल. 4:17).
तुम्ही आमच्याबरोबर गाऊ शकता,
हे, आनंदा, हे सुखा! मरणोन्मुख न होता आम्ही जाणार,
ना आजार, ना दु:ख, ना हताशा, ना रडणे.
वैभवाने मेघारुढ असे आपल्या प्रभूबरोबर जाणार,
तेव्हां येशू “आपल्या स्वकीयांचे” स्वागत करणार.
हो प्रभू येशू, किती काळ, किती काळ,
'आधी आम्ही आनंदाचे गीत गाऊ,
ख्रिस्त पुन्हा परत येत आहे! हालेलुया! पुन्हां
हालेलुया! आमेन. हालेलुया! आमेन.
(“क्राईस्ट रिटर्न्थ” एच. एल. टर्नर यांच्या द्वारा, 1878).
पुढच्या आठवडी शुभवर्तमान ऎकण्यासाठी, पुन्हां या मंडळीस येणार आहांत याची खातरी करा. येशू तुम्हांवर प्रेम करितो! त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याने वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताने तो तुमची पापे नाहिशी करील! आमेन!
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
उपदेशापूर्वी पवित्रशास्त्र वाचन मि. नोवा साँग यांनी केले : I करिंथ. 15:51-54.
उपदेशापूर्वी एकेरी गीत गायन मि. बेंजामिन किनकैड ग्रीफ्फीथ साँग यांनी केले :
“जीजस इज कमिंग अगेन” (जॉन डब्लु. पीटरसन द्वारा, 1921-2006).
“Jesus is Coming Again” (by John W. Peterson, 1921-2006).
रुपरेषा अंतराळात उचलले जाणे (उपदेश # 3 पवित्रशास्त्रातील भविष्यवाणीवर आधारीत) डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा “कारण, आज्ञाध्वनि आद्यदेवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असतां प्रभु स्वत: स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत पहिल्याने उठतील; नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारुढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहूं...” (I थेस्सल. 4:16-17). (लुक 24:37, 39; प्रे.कृ. 1:9-11)
I. प्रथम, प्रभू येशू पृथ्वीच्या वरील वातावरणात उतरणार,
II. दुसरे, ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते उठतील, I थेस्सल.4:16ब; III. तिसरे, जिवंत उरलेले ख्रिस्ती त्यांच्याबरोबर अंतराळात घेतले जातील, |