संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
पाप्यांकरिता भाकरीची मागणी करणे – एक नवीन विचार!ASKING BREAD FOR SINNERS – A NEW THOUGHT! डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश |
कांही मिनिटापूर्वी जॉन कागन यांनी लुक 11:513 हा शास्त्रभाग वाचला. परंतू तो तुम्ही परत वाचावा असे मला वाटते. हे स्कोपिल्ड स्टडी बायबल पृष्ठ क्रं. 1090 वर आहे. हा एका गरजवंत मित्राचा दाखला आहे. आज रात्री ह्या दाखल्यातून मी तुम्हांस कांही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे.
पहिली गोष्ट, ह्या दाखल्यामध्ये तीन व्यक्ति आहेत.
“मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा मला तीन भाकरी उसन्या दे; कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ कांही नाही” (लुक 11:5-6).
पहिला “मित्र” ज्याच्याजवळ पुष्कळ भाकरी आहेत. तो देव जो बाप आहे. तिसरा मित्र तो मनुष्य आहे जो भाकरीची मागणी करीत आहे. ज्याला भाकरीची गरज आहे, तो ख्रिस्ती आहे. तिसरा मित्र तो मनुष्य आहे जो ख्रिस्ती माणसाकडे आला आहे. तो हरविलेला आहे, ज्याचे तारण झालेले नाही. हा तोच मनुष्य आहे ज्यांस भाकरीची गरज आहे. तुम्ही आणि मी खरे ख्रिस्ती आहोत जे आपण, देव आणि हरविलेले आहेत अशांच्या मध्ये आहोत. ह्या दाखल्यामध्ये “भाकरी” म्हणजे काय आहेॽ आमच्यापैकी कांहीजन यापूर्वी भाकरी म्हणजे पवित्र आत्मा होय असे समजत. परंतू मला असे वाटते की हे चुकीचे आहे. खरेतर, हा पवित्र आत्मा प्रार्थनेचे उत्तर म्हणून दिलेला आहे, वचन 13 मध्ये,
“तुम्ही वाईट असतांहि तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विषेशकरुन पवित्र आत्मा देईलॽ” (लुक 11:13).
परंतू मला खातरी पटली की “भाकरी” म्हणजे पवित्र आत्मा नव्हे. लुक मधील ह्या दाखल्यावर डॉ. आर राईस विस्तृतपणे लिहतात (प्रार्थना: मागणी करणे आणि मिळविणे, स्वोअर्ड ऑफ द लॉर्ड, 1970, पृष्ठ. 70). “भाकरी,” च्या संबंधात डॉ. राईस म्हणतात तो ख्रिस्त आहे. “ती भाकरी तो स्वत: आहे.” (योहान 6:35). पूर्वी मी “भाकरी” म्हणजे पवित्र आत्मा समजायचो. परंतू मी चुकीचा होतो. ती भाकरी तो स्वत: ख्रिस्त आहे. नवीन करारामध्ये हे स्पष्ट आहे. जवळ जवळ संपूर्ण एक अध्याय येशू “जीवनाची भाकर” या संबंधात बोलतोय. योहानाच्या सहाव्या अध्यायात येशू काय म्हणतोय ते ऎका:
“कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय” (योहान 6:33).
“मीच जीवनाची भाकर आहे” (योहान 6:35).
“मीच ती जीवनाची भाकर आहे” (योहान 6:48).
“जिवंत भाकर मीच आहे” (योहान 6:51).
“जी भाकर मी देतो ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे” (योहान 6:51).
वेळो वेळी आपणांस सांगण्यात आले की येशू हा स्वत: “जीवनाची भाकर” आहे.
मग लुक 11:6 मध्ये ख्रिस्ती व्यक्ति, “माझा एक मित्र...माझ्याकडे आला आहे, आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ कांही नाही” असे का म्हणतो? कारण त्याला “जीवनाची भाकर” वाढावयास आपण दुर्बळ आहोत! आपल्या आत्मे जिंकण्यात आणि सुवार्ता प्रचारात, त्यांना “जीवनाची भाकर” देण्यास आपणांजवळ सामर्थ्य नाही! आपणांस शुभवर्तमान ठाऊक आहे, परंतू आपणांस वाटते की आमच्याजवळ सामर्थ्य नाही, म्हणून आपणांस समजते, “माझा एक मित्र...माझ्याकडे आला आहे, आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ कांही नाही” (लुक 11:6).
.माझी कबुली - “त्याला वाढावयास माझ्याजवळ कांही नाही” अशी आहे. त्यामुळेच एखाद्या बॅप्टीस्ट मंडळीस भेठ देतात तेव्हां सध्या पुष्कळ तरुणांना असे वाटते. त्यांना वाटते की मंडळी त्यांच्या गरजा पुरवित नाही. आपल्या ब-याच बॅप्टीस्ट मंडळ्या, त्यांच्याकडे “त्यांना वाढावयास कांही नाही परंतू कांही समकालीन गीते आहेत.” त्यांचा द्वेष मी कसा करु! ते सर्व आवाजासारखे आहेत! ते “आराधना गीते” आहेत – आणि त्यांच्यामध्ये पाप्याने येशूकरिता त्याच्या गरजेचा विचार करावा असे कांही नाही! त्याला वाढावयास माझ्याजवळ कांही नाही! कांही नाही! कांही नाही! कांही नाही परंतू केवळ थकवून सोडणारे “आराधना” गीत. त्याला वाढावयास माझ्याजवळ कांही नाही! कांही नाही! कांही नाही! कांही नाही परंतू केवळ धूळीप्रमाणे, निर्जीव, वचन आणि वचन असे पवित्रशास्त्राचे प्रदर्शन. कांही नाही परंतू केवळ मृतवत “आराधना” गीते आणि नीरस आणि कंटाळवाणा पवित्रशास्त्राचा अभ्यास. दुस-या रात्री तुम्ही ते ऎकले! त्यामुळे निरोगी, सामान्य तरुणास कांही मदत नाही. केवळ पौल राडर यांचे “अलायव्ह अगेन” हे पुनरुत्थानाचे गीत काय ती सजीव गोष्ट होती. आम्ही या अर्ध मेल्या उपासनेने इतके संमोहीत झालो होतो की चांगले गाण्यासाठी जागे राहावे म्हणून ओरडावे व घाम गाळावे लागे! यात आश्चर्य नाही की आमच्या मंडळ्या जगातील हरविलेल्या तरुणांस जिंकीत नाहीत! यात आश्चर्य नाही की 90% तरुण आपल्या मंडळ्यामधून अगोदरच आपण गमाविले आहेत. मी तरुण होतो तेव्हां जे कांही घडले त्यात आश्चर्य नाही. मला प्रोत्साहीत करील असे कांहीहि माझ्या मंडळीमध्या नव्हते. ते केवळ मृतवत आणि शुष्क आणि बुरसटलेले होते. माझ्यासाठी माझ्या जुन्या मंडळीमध्ये आव्हानात्मक असे कांही नव्हते. उपासने गणिक माझे मन अगदी रिक्त राही. माझे मन रिक्त राही कारण तेथे येशू नव्हता. मंडळीतील सर्व महिलांना खुष करण्यासाठी उपासनेचे आयोजन केले की काय असे मला वाटे. मला वाढण्यासाठी त्यांच्याजवळ कांही नव्हते! टी.व्ही. वरील चार्ल्स स्टॅनली, किंवा इंटरनेटवरील पौल चॅपेल यांच्यावर एक नजर टाका. त्यांचे पाप, त्यांचा एकाकीपणा, आणि त्यांचे सार्वकालीक स्थान यासाठी उत्तर म्हणून येशू ख्रिस्ताच्या पुढे उभे राहण्यास ते मृतवत, शुष्क, नीरस असे होते. “माझा मित्र त्याच्या प्रवासात माझ्याकडे येईल, आणि त्याला वाढण्यास माझ्याकडे कांही नाही!” मी रिक वॉरेनच्या मंडळीत होतो. मी दल्लास येथील पहिल्या बॅप्टीस्ट मंडळीत होतो. मी बीबीएफआय मंडळ्यांमधून होतो! ते एवढे गुंगीत होते की “त्यांच्याकडे वाढावयास कांही नाही” याची त्यांना जाणीव सुद्धा नव्हती.
वचन 9 व 10 मध्ये त्याचे उत्तर आहे.
“मी तुम्हांस सांगतो, मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल; ठोका म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो, आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईलॽ तुम्ही वाईट असताहि तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषकरुन पवित्र आत्मा देईलॽ” (लुक 11:9-13).
स्वर्गातून पिता “जो मागतो त्याला पवित्र आत्मा” देई पर्यंत तुम्ही शोधा, ठोका आणि मागा असे सांगून येशू दाखला संपवितो (लुक 11:13). मागत राहा (हाच तो ग्रीक अर्थ आहे). शोधत राहा! ठोकत राहा! मागत राहा!
तुम्ही पाहता की, उपासनेमध्ये पवित्र आत्मा असलाच पाहिजे. आपल्याजवळ पवित्र आत्मा किंवा येशू असलाच पाहिजे हे महत्वाचे नसणार – आणि येशू सुद्धा हजर नसणार! कोणाचेहि तारण होणार नाही! वचन 8 मध्ये तारणारा म्हणतो,
“मी तुम्हांस सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून देईल” (लुक 11:9).
KJV मध्ये ग्रीक शब्द “आग्रह” असा अनुवादित केला आहे ज्याचा अर्थ “निर्लज्ज आग्रह” असा होतो. आग्रह – म्हणजे आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी प्रत्येक उपासनेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. अरण्यातील “मान्ना” इस्त्राएल लोक जेव्हां दुस-या दिवशी ठेवीत तेव्हां तो सडून जाई. आजहि तसेच आहे. जर आम्ही प्रत्येक प्रार्थना सभा व प्रत्येक उपासनेमध्ये “निर्लज्ज आग्रह” धरणार नाही तर प्रार्थना सभा व उपासना “सडून” जाणार!
आम्ही येशूला उपासनेच्या बाहेर बंद करुन ठेवले आहे – प्रकटीकरणाच्या पुस्तकातील लवोदिकीयाच्या मंडळीप्रमाणे तो मंडळीच्या बाहेर बंद आहे. ती कोमट होती. अग्नी नाही! गडगडाट नाही! चैतन्यमय गीते नाहीत! सुवार्ताप्रचार नाही - केवळ मृतवत वचना-मागून-वचन असे पवित्रशास्त्राचे प्रदर्शन! तुम्हांस मृतवत विवरणात्मक उपदेशासाठी पवित्र आत्म्याची गरज नाही! विवरणात्मक उपदेश मेंदूशी बोलतो! सुवार्तिक उपदेश अंत:करणाशी! अंत:करणाशी! अंत:करणाशी बोलतो! “कारण जो अंत:करणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान् ठरतो” (रोम 10:10). अंत:करणाने-मेंदूने नव्हे! केवळ मनाने नव्हे! ख्रिस्त अंत:करणाशी बोलला पाहिजे नाहीतर कोणाचेहि तारण होणार नाही - किंवा कोणाचेहि संजीवन होणार नाही – कोणीहि जीवनाच्या भाकरीची चव चाखणार नाही! येशू आमच्या कोमट सुवार्तिक आणि बाप्टीस्ट उपासनेच्या बाहेर बंदिस्त आहे! बाहेर बंदिस्त! बाहेर बंदिस्त! बाहेर बंदिस्त! येशू म्हणतो, “पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठेकीत आहे” (प्रकटी. 3:20). मंडळीच्या बाहेर तो दार का ठोकीत आहे? कारण आम्ही त्याला दाराबाहेर बंदिस्त ठेवले आहे, त्यामुळे. आम्ही प्रत्येक उपासनेमध्ये पवित्र आत्मा उतरावा म्हणून प्रार्थना करीत नाही, तर असल्या उपासने येशू नसणार! पवित्र आत्म्याची समक्षता असते तेव्हांच येशूची सुद्धा येतो – आणि पवित्र आत्म्याची समक्षता तेव्हांच असते जेव्हां तो येण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो! तेव्हांच असते जेव्हां तो येण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो! तेव्हांच असते जेव्हां तो येण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो! कॅथलिक उपासने पेक्षा ब-याच आपल्या उपासना संजीवीत नसतात. तुम्ही ते पाहिले आहे. तुम्ही ते पाहिले आहे. खरे तर, कॅथलिक उपासने पेक्षा अधिक मृतवत आहे! तुम्हांला ठाऊक आहे मी योग्य आहे!
“कारण माझा एक मित्र...माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ कांही नाही” (लुक 11:6).
ती “भाकरी” काय आहे जी मध्यरात्री त्या मनुष्याने मागितली? जेव्हां त्याने त्याच्या शेजा-याचे दार ठोठावले त्याला काय हवे होते? भाकरी जी त्याला हवी होती, आणि भाकरी ज्याच्यासाठी दार ठोठावले, आणि भाकरी ज्याची मागणी केली तो येशू स्वत: होता. त्या पाप्यांच्या गरजेसाठी काय करायला हवे होते? 13 व्या वचनाच्या शेवटी, येशू म्हणाला, “तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषकरुन पवित्र आत्मा देईलॽ” (लुक11:13). स्कोफिल्ड टिप्पणीमध्ये कांही मुद्दे नाहीत. प्रार्थना योद्धे स्वत:साठी पवित्र आत्मा मागत नाहीत. तो आपला हरविलेला मित्र जोवर पवित्र आत्मा त्याचे ह्दय उघडत नाही आणि त्यांस येशूकडे आणत नाही तोवर तो कधीहि येशूवर विश्वास ठेवणार नाही त्याच्यासाठी तो प्रार्थना करीत आहे!
““कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ कांही नाही.”
खरेच, तुमच्या प्रार्थनेच्या उत्तरादाखल, देव पवित्र आत्मा देत नाही तर, हरविलेल्यां पाप्यांना देण्यासाठी तुमच्याकडे कांहीच नसणार! डॉ. जॉन आर. राईस खूप चांगले म्हणाले.
प्रार्थना करण्यासंबंधीच्या... धड्याच्या शेवटापर्यंत येशूने अचूक शब्द घातले नाहीत, पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करण्यास. ..शिष्यांना, ज्यानी खरेच संजीवन आणले, पाप्यांना खात्री पटविली आणि त्यांचे परिवर्तन केले त्यांना तो शिकवित होता, जो देवाच्या माणसाला ज्ञान आणि सामर्थ्य आणि पुढारीपण देतो! जेव्हां आम्ही पाप्याकरिता भाकरीची मागणी करितो, तेव्हां देवाच्या पवित्र आत्म्याची आपल्याला खरेच गरज... असते (राईस, ibid., पृष्ठ. 96).
जे अजून हरविलेले आहेत त्यांच्याशी मी बोलत आहे. दाखल्यामध्ये येशू ख्रिस्त भाकरी आहे. ज्या कशाचीहि तुम्हांस गरज आहे त्यापेक्षा जास्त प्रभू येशू ख्रिस्त आहे! जोवर पवित्र आत्मा आपल्या मंडळ्यामध्ये उतरुन येत नाही तोवर तुम्हांस तुमच्या पापाची जाणीव होणार नाही. येशू म्हणाला,
“तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खातरी करील” (योहान 16:8).
आम्ही प्रार्थना करितो की पवित्र आत्मा येऊन आपल्या सारख्या पाप्यांना अंत:करणातील भीषण पापाची जाणीव करुन द्यावी, तुमच्या कठीण अंत:करणातील खोल पापाची जाणीव करुन द्यावी. पवित्र आत्मा तुमच्यातील एकाहि पापाची जाणीव करुन देणार नाही तर तुम्हांस ख्रिस्ताची खरी गरज कधीहि पडणार नाही.
त्यामुळे, आम्ही सुद्धा देवाच्या आत्म्याने आमचे संपूर्ण तारण होण्यास ख्रिस्ताकडे घेऊन जाण्यास प्रार्थना करावी. कारण तारणारा म्हणाला,
“ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही” (योहान 6:44).
म्हणून, देवाच्या आत्म्याने आपणास येशूजवळ न्यावे म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे, कारण केवळ येशूच पापापासून व नरकापासून वाचवू शकतो.
आतपर्यंत तुम्ही फक्त शुभवर्तमान ऎकले आहे. आपल्या पापाच्या बद्दल खंडणी भरण्यासाठी येशू वधस्तंभावर मरण पावला हे तुम्ही ऎकले आहे. येशूचे रक्त तुमची सर्व पापे धुवून काढते आणि तुम्हांस देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरविते हे तुम्ही ऎकले आहे. येशू मृतातून पुन्हां उठला आहे हे तुम्ही ऎकले आहे. तो स्वर्गात जीवंत आहे, आणि तो तुमच्यासाठी मध्यस्ती करीत आहे हे तुम्ही ऎकले आहे. तुम्ही ही सत्ये ऎकली आहेत, परंतू तुम्ही तुमच्या जीवनांत त्याचा कधी अनुभव घेतला नाही. आणि तुम्ही केवळ रविवार मागून रविवार मंडळीत बसलात, त्याच्याविषयी पुन्हां पुन्हां केवळ ऎकत बसलात, तर तुम्ही ह्या सत्यांचा अनुभव कधीहि घेऊ शकणार नाही. कधी कधी ह्या सत्यांपेक्षा जास्त ऎकून तुमच्यात कांही बदल घडला नाही तर तुमचे तारण कधीहि होऊ शकत नाही!
तुम्ही पापी असल्याबद्दल पवित्र आत्मा येऊन तुम्हांस जाणीव करुन दिली पाहिजे. पवित्र आत्मा येऊन तुम्हांस येशूजवळ घेऊन गेला पाहिजे. पवित्र आत्मा येऊन तुमचा जीवंत येशू ख्रिस्ताबरोबरचा दैवी-मानवी असा सामना होऊ दिला पाहिजे. तुम्ही तारणा-यांकडे ओढले जाण्याचा चमत्कार होईल. तुम्ही नवी उत्पत्ती झाल्याचा चमत्कार होईल. आणि फक्त पवित्र आत्मा अशाप्रकारचा चमत्कार तुमच्या जीवनांत करु शकतो. तुमची आध्यात्मिक गरज भागविण्यास पवित्र आत्मा नाही, आपल्या उपासनेत पवित्र आत्मा नाही, तो जर नाही तर केवळ आम्ही असे म्हणू,
“कारण माझा एक मित्र...माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ कांही नाही” (लुक 11:6).
त्यामुळे तुमच्या तारणांसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यामुळे आम्ही सतत विचारतो. त्यामुळे आम्ही सतत शोधतो. त्यामुळे आम्ही सतत ठोठावितो – आणि आम्ही देव आकाश उघडत नाही व तुम्हांस बदलण्यास, पालटण्यास आणि सार्वकालीक जीवन देण्यास पवित्र आत्मा पाठवित नाही तोवर हे करणार! येशू म्हणाला की, “पित्याकडे जे मागतात त्यांना तो पवित्र आत्मा [देईल] देतो” (लुक11:13). आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र आत्मा येऊन तुम्हांस पापाची जाणीव करावी, आणि तुम्हांस परिवर्तनाचा अद्भूत अनुभव येण्यास तो तुम्हांस येशूजवळ घेऊन जावा! ख्रिस्त त्याच्या रक्ताने तुमची पापे धुवून टाकील. ख्रिस्त तुम्हांस त्याची धार्मिकतेची वस्त्रे घालील आणि तो तुम्हांस देवावर प्रेम व पापाचा द्वेष करण्याचे ह्दय देईल. तो तुमचे पाषाणमय ह्दय काढील आणि तो तुम्हांस मांसमय ह्दय देईल! “तुमच्यासाठी मी प्रार्थना करीत आहे.” समुहगीत गाऊया!
तुमच्यासाठी मी प्रार्थना करीत आहे, तुमच्यासाठी मी प्रार्थना करीत आहे,
तुमच्यासाठी मी प्रार्थना करीत आहे,
मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहे.
(“तुमच्यासाठी मी प्रार्थना करीत आहे” एस. ओ मॅले क्लोग द्वारा, 1837-1910).
पवित्र आत्म्यासाठी आम्ही काल रात्री प्रार्थना केली. सर्व निघून गेले व मी डॉ. कागन यांच्याबरोबर बसलो. मग टॉम शिया आली आणि तारण झाले होते – कारण पवित्र आत्म्याने खाली येऊन प्रार्थना केली! आमेन आणि आमेन!
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
उपदेशापूर्वी पवित्रशास्त्र वाचन मि. जॉन सॅम्युएल कागन यांनी केले : लुक 11:5-13.
उपदेशापूर्वी एकेरी गीत गायन मि. बेंजामिन किनकैड ग्रीफ्फीथ साँग यांनी केले :
“आय एम प्रेईंग फॉर यु” (एस. ओ मॅले क्लोग द्वारा, 1837-1910).
“I Am Praying For You” (by S. O’Malley Clough, 1837-1910).