Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




ख्रिस्ताच्या पुत्रत्वाचा पुरावा!

THE PROOF OF CHRIST’S SONSHIP!
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
शनिवारी सायंकाळी, दि. 15, एप्रिल. 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Saturday Evening, April 15, 2017

“त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दाविद वंशात जन्मला, व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित् ठरला”
(रोम 1:3-4).


डॉ. विल्बर एम. स्मिथ यांच्याविषयी त्यांच्या ख्रिस्ती साहित्याच्या प्रचंड ज्ञानाबद्दल, आणि त्यांच्या 1963 साली फुलर सेमीनरी सोडण्याविषयी मला खूर आदर आहे, जसे की ते पवित्रशास्त्राच्या अचूकते पासून फारकत घेतली आणि त्यांनी उदारमतवादाला कवटाळायला सुरुवात केली. (हेरॉल्ड लिंडसेल, पी.एचडी., द बॅटल फॉर बायबल, 1978 आवृत्ती, पृष्ठ. 110-112). डॉ. स्मिथ यांनी रोम 1:4 बद्दल एक सखोल प्रश्न विचारला की, “मला आश्चर्य वाटते की आपले महान प्रचारक ह्याच्यावर का प्रचार करीत नाहीत, किंवा ह्याच्यावरील विश्वासाची खात्री देणारा एखादा उपदेशहि प्रकाशित का करीत नाहीतॽ” (विल्बर एम. स्मिथ, डी.डी., देअरफोर, स्टँड, किट पब्लिशींग, 1981 आवृत्ती, पृष्ठ. 583). मला वाटतं याचे कारण गेल्या 125 वर्षामध्ये ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर अगदी नगन्य उपदेश दिले गेले, विशेषत: “निर्णय घेण्याच्या” उदयापासून. सी.जी. फिन्नेच्या काळापासून, मनुष्य, आणि मनुष्य काय करतो यांस समर्पित असलेल्या उपदेशांची वाढ झालेली दिसते. ह्या काळामध्ये, प्रचारकांनी देवाच्या गोष्टी पडद्याआड झाल्या आहेत अशी धारणा करुन घेतली व देवाकडे लक्ष दिले नाही. त्याऎवजी, त्यांनी मनुष्याच्या कार्यावर लक्ष दिले. अशाप्रकारे सुवार्तिक ख्रिस्तीपणा हा ईश्वर विज्ञानाऎवजी अधिक मानवविज्ञान केंद्रीत, ख्रिस्त विज्ञानाऎवजी अधिक मनोविज्ञान केंद्रीत, ख्रिस्त केंद्रीत ऎवजी मनुष्य-केंद्रीत झालेला आहे.

प्रेषितांच्या पुस्तकामध्ये नमुद केलेला, प्रत्येक उपदेश, हा ख्रिस्ताच्या पुनरुत्थान केंद्रीत आहे. प्रेषित ख्रिस्ताच्या पुनरुत्थानासंबंधी बोलल्याशिवाय प्रचार करु शकत नव्हते! त्यांनी गाजविलेल्या सुवार्तेमध्ये पुनरुत्थान ह्दयस्थानी होते. सध्या, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा, उल्लेख जरी केला तरी, त्याचा संबंध पुनरुत्थानच्या रविवारी जोडून गौण स्थान देतात. ह्याहि पेक्षा, सेवक सुद्धा ह्या सिद्धांतावर क्वचितच बोलतात.

ख्रिस्तविरहीत ख्रिस्तीपणा, ह्या पुस्तकामध्ये, डॉ. मायकेल हॉर्टन निर्देशित करतात की पुष्कळ सनातनी मंडऴ्यांमधून पुनरुत्थानाचा उपदेश हा ब-याचदा “येशूने त्याच्या पराजयावर कशी मात केली आणि आपणहि उदारमतवादीपणा [दर्शवित] सध्याच्या प्रचारकासारखे शुभवर्तमाना ऎवजी मनोविज्ञान, राजकारण, किंवा नैतिकता यावर बोलतो” (मायकेल हॉर्टन, पीएच.डी., ख्रिस्तविरहीत ख्रिस्तीपणा: द अल्टरनेटिव् गॉस्पल ऑफ द अमेरिकन चर्च, बेकर बुक्स, 2008,पृष्ठ.30). आश्चर्याची बाब अशी की, डॉ. आर. ए. टॉरी ज्यांचा मी आदर करितो त्यांचे प्रसिद्ध पुस्तक, हाऊ टू वर्क फॉर क्राईस्ट (फ्लेमिंग एच. रिवेल, एन.डी.) मध्ये ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर एकहि उपदेश नाही. डॉ. टॉरी यांनी प्रचारकासाठी 156 पानांची उपदेशाची रुपरेषा दिली आहे, परंतू त्यातील एकहि रुपरेषा पूर्णपणे येशूच्या पुनरुत्थानास समर्पित नाही! खरोखर, सध्याची परिस्थिती ह्याहूनहि बिकट आहे!

आधुनिक उपासना संग्रह बघितले तर ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर फक्त दहा गीते आढळतात. त्यातील एक 20 व्या शतकापूर्वी, दोन 18 व्या शतकात, तीन 19 व्या शतकात, एक 16 व्या शतकात, एक 17 व्या शतकात, एक 15 व्या शतकात, दोन 8 व्या शतकात लिहली गेली आहेत! पुनरुत्थानावर पौल राडर द्वारा लिहले गेलेले एकमेव चांगले गीत “अलायव्ह अगेन” विसाव्या शतकात लिहले, परंतू मला समजते तसे ते कुठल्याहि उपासना संग्रहात आढळत नाही. उभे राहून माझ्याबरोबर हे गीत गा!

तो मेला होता पण पुनरपि जीवित आहे,
   जो मेला होता पण पुनरपि जीवित आहे;
मृत्यूची मजबूत, बर्फाच्छीत तावडी तोडली,
   जो मेला होता पण पुनरपि जीवित आहे!
(“अलायव्ह अगेन” पौल राडर द्वारा, 1878-1938).

तुम्ही बसू शकता. तुम्ही मला P.O. Box 15308, Los Angeles CA 90015 ह्या पत्त्यावर लिहू शकता आणि पौल राडर यांच्या गीतांचे शब्द व संगीत यांची मागणी करु शकता. पुन्हां एकदा, मला असं वाटते की आधुनिक उपासना गीतसंग्रहामध्ये पुनरुत्थान दुर्लक्षित करणे हे दर्शविते की ह्या सर्व-महत्वाच्या विषयावर खूप काळापासून दुर्लक्ष झालेले आहे, फिन्नेच्या काळापासून. येशू,

“...तो मृताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित् ठरला” (रोम 1:4).

परंतू क्वचितच असे कोणी प्रचार करते, आणि आम्ही त्याच्याविषयी कधीहि गातहि नाही! पश्चिम जगतातील मंडळ्या ओस पडत आहेत व विश्वासापासून दूर जात आहेत याचे आश्चर्य मानायला नको! पुनरुत्थित ख्रिस्तावरील विश्वासाशिवाय संजीवन नाही, आणि जीवंत संदेश नाही − अर्धे अधिक शुभवर्तमान विसरले आहेत – मोठ्याप्रमाणात आपल्या उपदेशातून काढून टाकले आहेत! प्रभू आम्हांला साहाय्य कर!

मला असे आढळून आले की युरोप आणि अमेरिकेपेक्षा तिसरे जग पुनरुत्थित ख्रिस्तावर खूप अधिक भर देण्यास योग्य आहे. तेथे ख्रिस्तीपणा वाढत आहे याचे आश्चर्य नाही, परंतू येथे सगळे थंड आहे!

मी एका तिस-या जगतातील तरुणाशी ई मेलच्या माध्यमातून संवाद साधला. “मी ख्रिस्ती विश्वास सोडण्यासाठी [सोडावा म्हणून] होत असलेल्या माझ्या लहानपणातील भयंकर छळासंबंधी तो माझ्याशी बोलला. मी मदतीसाठी आक्रोश केला, पण कोणीहि मदतीला आले नाही, नाश होत असलेले पुष्कळ [ख्रिस्ती] पाहिले...लेकरांचा छळ होत [आहे] आणि त्यांना भारत, म्यानम्यार तील मनोरुग्णांच्या दवाखान्यामध्ये टाकले जात आहे, येशूला त्यांनी सोडून द्यावे म्हणून विद्यूत धक्का दिला जाई...आणि त्यामधून वाचलेला मी एक आहे.” जेव्हां हे वाचले तेव्हां मी रडलो. साधारणपणे लेकरं आणि माणसं अशाप्रकारे छळ होत असताना अमेरिकेत अथवा युरोप मध्ये तुंम्ही पाहिले का? ह्या तरुण माणसाने म्हटले त्याला व इतरांना पुनरुत्थित येशू भेटला. जेव्हां त्यांनी पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव घेतला तेव्हां त्यांना तो देवाचा पुत्र होता हे समजले. त्यानंतर विद्यूत धक्क्याचा कितीहि छळ किंवा मार येशूला सोडून देण्यास भाग पाडू शकला नाही. त्यांना ठाऊक होते की तो जीवंत होता — मृतातून पुन्हा उठला आहे! त्या छळाने त्यांना खरे ख्रिस्ती बनविले! आणि या आपल्या उता-यात प्रेषित पौल म्हणतो. येशू,

“...तो मृताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित् ठरला” (रोम 1:4).

गीत पुन्हा म्हणूया!

तो मेला होता पण पुनरपि जीवित आहे,
   जो मेला होता पण पुनरपि जीवित आहे;
मृत्यूची मजबूत, बर्फाच्छीत तावडी तोडली,
   जो मेला होता पण पुनरपि जीवित आहे!

ग्रीक शब्द “डिक्लेर्ड” असा अनुवादित केला आहे ज्याचा अर्थ “स्पष्ट निर्देशित करणे” किंवा “शिक्कामोर्तब करणे” असा होतो (भक्कम #3724) त्याच्या मृतातून पुनरुत्थित होण्याच्या द्वारे येशूला, देवाचा पुत्र म्हणून स्पष्ट निर्देशित, शिक्कामोर्तब केले आहे. 1599 चे द जेनेवा बायबल म्हणते, “प्रदर्शित केले आणि प्रकट केले” (रोम 1:4 वरील टिप्पणी #1). त्याच्या मृतातून पुनरुत्थित होण्याच्या द्वारे ख्रिस्ताला, देवाचा पुत्र म्हणून “प्रदर्शित केले किंवा प्रकट केले” होते,

“...तो मृताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित् ठरला” (रोम 1:4).

I. प्रथम, येशूला देवाचा पुत्र म्हणून कसे जाहिर केले.

प्राथमिकदृष्ट्या हे त्याच्या शिक्षणामुळे नाही. त्याने पुष्कळ अद्भूत गोष्टी शिकविल्या, ज्यात डोंगरावरील उपदेशहि आहे. परंतू त्याचे नुसते शिक्षण हे तो देवाचा पुत्र आहे हे सिद्ध करीत नाही. किंवा त्याचे चमत्कारहि नाही, किंवा त्याने तीन लोकांना मृतातून जीवित केले म्हणून नाही. जुन्या कराराच्या काळात एलिया संदेष्टेयाने एका मुलाला मृतातून जीवित केले आणि तो देवाचा पुत्र नव्हता (I राजे 17:17-24). अलिशाने सुद्धा एका मुलाला मृतातून जीवित केले होते (II राजे 4:32-37) परंतू तो देवाचा पुत्र नव्हता. मोशेने सुद्धा पुष्कळ चमत्कार केले, ज्यामध्ये तांबडा समुद्र दुभंगणे याचा समावेश आहे, परंतू तो देवाचा पुत्र नव्हता. केवळ एका चिन्हाने येशूला देवाचा पुत्र ठरविले व ते होते त्याच्या स्वत:च्या शरीरातून पुनरुत्थित होणे. येशूने स्वत: सांगितले की ह्या दुष्ट पीढीस केवळ पुनरुत्थानाचे चिन्ह देण्यात येते,

“त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतू योना संदेष्टा ह्याच्यावांचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा 'योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता' तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील” (मत्तय 12:39-40).

तो देवाचा पुत्र आहे असे मुख्य याजकाला सांगून येशूला देहांताची शिक्षा दिली (मत्तय 26:63-66). त्याला वधस्तंभावर खिळले आणि मुख्य याजकाने त्याची थट्टा केली, म्हणाला¸

“'तो देवावर भरवंसा ठेवितो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला' सोडवावे” (मत्तय 27:43).

त्याला मृतातून उठवून देवाने तो त्याचा पुत्र असलेबद्दल मान्यता दिली. येशूला,

“...तो मृताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित् ठरला” (रोम 1:4).

तिस-या दिवशी मृताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे त्याला उठवून देवाचा पुत्र म्हणून जाहिर केला! हे गीत गाऊया!

तो मेला होता पण पुनरपि जीवित आहे,
   जो मेला होता पण पुनरपि जीवित आहे;
मृत्यूची मजबूत, बर्फाच्छीत तावडी तोडली,
   जो मेला होता पण पुनरपि जीवित आहे!

II. दुसरे, येशूला देवाचा पुत्र म्हणून का जाहिर केले.

डॉ. चार्लस होज (1797-1878), प्रिन्सटन थिऑलॉजिकल सेमिनरी येथे बराच काळ नवीन कराराचे प्राध्यापक होते, ते म्हणाले,

जोवर ख्रिस्त मेलेल्यांतून उठला नाही तोवर त्याच्या पुत्रत्वाचा पुरावा पूर्ण होत नाही, किंवा शिष्यांना ते समजले हे पूर्ण होत नाही...त्याच्या मृतातून पुनरुत्थित होण्याच्या द्वारा तो देवाचा पुत्र आहे हे सिद्ध होते...[पवित्रशास्त्राच्या] [ब-याच] उता-यामध्ये ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे ख्रिस्ताने जे शिकविले त्या सत्याचा अंतिम पुरावा असे प्रदर्शित केले आहे, आणि त्याने जे दावे केले त्यांची मुदत होय...जसे की येशूने उघडपणे तो देवाचा पुत्र असलेचे जाहीर केले, मृतातून पुनरुत्थित होणे हे तो देवाचा पुत्र आहे असे जाहीर केले ह्या सत्याचे देवाकडून शिक्कामोर्तब होय. जर तो मरणाच्या अधीन राहिला असता तर, तो देवाचा पुत्र असलेचा दावा देवाने अमान्य [नाकारला] केला असता; परंतू आता तो मृतातून उठला असलेने, तो सर्वांसमोर मान्य करतो, व म्हणतो, तूं माझा पुत्र आहेस, हे आज मी जाहीर केले (डॉ. चार्लस होज, पीएच.डी., अ कॉमेंट्री ऑन रोमन्स, द बॅनर ऑफ ट्रुथ ट्रस्ट, 1997 आवृत्ती, पृष्ठ.20-21; रोम 1:4 वरील टिप्पणी).

अशाप्रकारे, ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे ह्याचा पुरावा त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे दिला गेला, आणि त्याने जे कांही शिकविले त्याची त्यामुळे पडताळणी सुद्धा झाली.

डॉ. विल्बर एम. स्मिथ म्हणाले ख्रिस्ताचे पुनरुत्थान

...ख्रिस्ताच्या विधानाची सत्यता, अवलंबनक्षमता याची खात्री देते. तो उठणार [असे त्याने सांगितले होते] त्याप्रमाणे कबरेतून [तो पुन्हा उठल्याने] आणि त्याचे सांगणे खरे ठरले, त्यानंतर मला असे वाटते की आपला प्रभू जे कांही बोलला ते सर्व खरे ठरणार...जेव्हां आपला प्रभू म्हणाला की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालीक जीवन मिळते, आणि जो कोणी त्याजवर विश्वास ठेवण्यास नकार देईल त्याला सार्वकालीक दंड देण्यात येईल, तो हे खरे बोलला...ख्रिस्ताचे पुनरुत्थान आपण कधीहि स्विकारीत नाही, आणि त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दाच्या सत्यतेवर शंका घेतो (स्मिथ. देअरफोर स्टँड, ibid., पृष्ठ. 418-419).

येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला,

“तेव्हां त्याने बारा जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, पाहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहों, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्याच्या द्वारे लिहण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत; म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटबंना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील, आणि तो तिस-या दिवशी पुन्हा उठेल” (लुक 18:31-33).

येशूने लुक 18:31-33 मध्ये जे भविष्य वर्तविले ते अगदी तंतोतंत खरे ठरले. त्याची कुचेष्टा करण्यात आली, फटके मारण्यात आले, त्याच्यावर थंकले, छीथू केली आणि वधस्तंभावर जीवे मारण्यात आले. परंतू वधस्तंभावर मारण्यात आल्यानंतर तिस-या दिवशी तो मरणातून पुन्हा उठला. स्वत:बद्दल केलेल्या भविष्यवाणीची परिपूर्तता झालेची खात्री तसेच तो जे कांही बोलला त्याचीहि परिपूर्तता झाली, याचे कारण

“...तो मृताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित् ठरला” (रोम 1:4).

“तो मेला होता पण पुनरपि जीवित आहे.” हे गाऊया!

तो मेला होता पण पुनरपि जीवित आहे,
   जो मेला होता पण पुनरपि जीवित आहे;
मृत्यूची मजबूत, बर्फाच्छीत तावडी तोडली,
   जो मेला होता पण पुनरपि जीवित आहे!

जसे त्याने सांगितले होते अगदी तसेच तो मरणातून पुन्हा उठला, त्यामुळे त्याने सांगितलेल्या सत्यासंबंधी सुद्धा आम्हास खात्री असली पाहिजे तो म्हणाला,

“...तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही” (मत्तय 18:3).

आम्ही ते शब्द खूप गंभीरपणे घेतले पाहिजेत कारण ते देवाच्या पुनरुत्थित पुत्राच्या मुखातून निघाले होते. तुमचा पालट झाला काय? तुमचा पालट झाला याची तुम्हांस खात्री आहे काय? देवाचा पुत्र म्हणाला तुमचा पालट झाल्याशिवाय “स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश” होणारच नाही. हो, तुम्ही तुमच्या परिवर्तनासंबंधी किती गंभीरपणे विचार करता आहात! तुमचे परिवर्तन झाले आहे याची तुम्ही किती काळजीपूर्वक खातरजमा करता आहात!

पुनरुत्थित देवाच्या पुत्राने सुद्धा म्हटले,

“मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावांचून पित्याकडे कोणी येत नाही” (योहान 14:6).

तो काय म्हणाला हे तुम्ही किती गंभीरपणे ऎकता! त्याच्याकडे यावे व तारण मिळवावे याची तुम्हांला किती चिंता आहे! तुमच्या मनातून अंधश्रद्धा आणि चुकीच्या धार्मिक कल्पना काढून टाकून देण्यास, आणि केवळ येशूवर अवलंबून राहण्यास तुम्हाला किती काळजी आहे—कारण तो म्हणाला, “माझ्याद्वारे, आल्यावांचून पित्याकडे कोणी येत नाही.”

पुन्हा, एकदा देवाचा पुत्र म्हणाला,

“जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही” (योहान 6:37).

हो, त्याच्यामध्ये “जाण्यास कसे प्रयत्न” करत आहात! (लुक 13:24). येशू परत येण्यासंबंधी तुम्ही किती काळजी पूर्वक आहात आणि तुमचे काय विचार आहेत. तो काय म्हणाला हे ध्यानात घ्या,

“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन”(मत्तय 11:28).

तुम्ही पुनरुत्थित देवाच्या पुत्राचे ऎकावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. तुम्ही त्याच्याकडे थेट यावे आणि त्याने वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताने तुमचे पाप धुतले जावे - आणि त्याच्या पुनरुत्थित जीवनाने तारले जावे म्हणून आम्ही प्रार्थना करीत आहोत. त्याचे तुम्ही ऎका! तो जे कांही बोलला त्याच्यावर विश्वास ठेवा! तुम्ही त्याच्याकडे थेट यावे आणि तारले जावे, जसे त्याने तुम्हांस करण्यास सांगितले— कारण,

“...तो मृताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित् ठरला” (रोम 1:4).

तो मेला होता पण पुनरपि जीवित आहे,
   जो मेला होता पण पुनरपि जीवित आहे;
मृत्यूची मजबूत, बर्फाच्छीत तावडी तोडली,
   जो मेला होता पण पुनरपि जीवित आहे!
(“अलायव्ह अगेन” पौल राडर द्वारा, 1878-1938).


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी पवित्रशास्त्र वाचन मि. नोआ साँग यांनी केले : लुक 18:31-33.
उपदेशापूर्वी एकेरी गीत गायन मि. बेंजामिन किनकैड ग्रीफ्फीथ साँग यांनी केले :
“ हेल, दाऊ वन्स-डिस्पाईज्ड जीजस” (जॉन बेकवेल द्वारा, 1721-1819).
“Hail, Thou Once-Despised Jesus!” (by John Bakewell, 1721-1819).


रुपरेषा

ख्रिस्ताच्या पुत्रत्वाचा पुरावा!

THE PROOF OF CHRIST’S SONSHIP!

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दाविद वंशात जन्मला, व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित् ठरला”
(रोम 1:3-4).

I.      प्रथम, येशूला देवाचा पुत्र म्हणून कसे जाहीर केले, I राजे 17:17-24;
II राजे 4:32-37; मत्तय 12:39-40; 26:63-66; 27:43.

II.    दुसरे, येशूला देवाचा पुत्र म्हणून का जाहीर केले, लुक 18:31-33; मत्तय 18:3; योहान 14:6; 6:37; लुक 13:24; मत्तय 11:28.