Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




तूं माझा त्याग का केला ॽ

WHY HAST THOU FORSAKEN ME?
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सायंकाळी, दि. 8 एप्रिल. 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Saturday Evening, April 8, 2017

“आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारुन बोलला, 'एली, एली, लमा सबखथनी,' म्हणजे 'माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केलाॽ” (मत्तय 27:46).


गेथशेमाने बागेतील प्रार्थनेतून येशू उठला. तेव्हां तो “सैनिकाची तुकडी व मुख्य याजक यांना सामोरा गेला.” ते “दिवे, मशाली व शस्त्रें घेऊन आले” (योहान 18:3). मग त्यांनी येशूला घेतले व मुख्य याजक याच्याकडे गेले (मत्तय 26:57). ईश्वरनिंदा केलेचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. मग ते त्याच्या तोंडावर थुंकले. त्यांनी बुक्क्या मारल्या. त्यांनी आपल्या हाताच्या पंजानी त्याला चपडाका मारल्या. त्यांनी त्याच्या दाढीचे केस ओढले (यशया 50:6).

मुख्य याजक व वडीलजनांनी त्याला मरणदंड द्यायचे ठरविले. रोमी राज्यपाल पिलात, याच्याकडे त्याला ते घेऊन गेले. पिलाताने त्याची चौकशी केली. मग पिलात लोकसमुदायास म्हणाला, “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे…ॽ” सर्व म्हणाले, “याला वधस्तंभावर खिळून टाका” (मत्तय 27:22). पिलाताने आपले हात धूवून म्हटले, “ ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे” (मत्तय 27:24). मग पिलाताने त्याला फटके मारुन वधस्तंभावर खिळण्याकरिता शिपायाच्या स्वाधीन केले. मग रोमी शिपायांनी येशूच्च्या रक्ताने माखलेल्या शरीरावर किरमिजी रंगाचा झगा परिधान केला. त्यांनी काट्यांचा मुकूट गुंफून त्याच्या डोक्यावर घातला. त्याच्या उजव्या हातात वेत दिला, “आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, हे यहुद्याच्या राजा, नमस्कार! असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा केली” (मत्तय 27:29). ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन त्याच्या मस्तकावर मारु लागले. मग थट्टा केल्यावर त्यांनी अंगातून झगा काढून त्याची वस्त्रें त्याच्या अंगात घातली. ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता घेऊन गेले.

त्याच्यासाठी सोन्याचा किंवा चांदीचा मुकूट नव्हता,
   त्याच्यासाठी धरण्यास हिरा देखील नव्हता;
पण अभिमान रक्ताने साखलेला चेहरा आणि सहन केलेल्या डागाचा,
   आणि पाप्यांनी त्यास मुकूट दिला व त्याने तो घातला.
कणखर वधस्तंभ त्याचे सिंहासन झाले,
   त्याचे तर राज्य फक्त ह्दयात होते;
त्याने त्याचे प्रेम किरमिजी लाल रंगात लिहले,
   आणि त्याच्या डोक्यावर काटे घालण्यात आले.
(“अ क्राऊन ऑफ थ्रोन्स” द्वारा इरा एफ. स्टॅनफिल, 1914-1993).

वधस्तंभी देण्याच्या स्थळापर्यंत येशूने आपला वधस्तंभ वाहून नेला. तो वधस्तंभाच्या वजनामुळे पुन्हां पुन्हां पडत होता. सरते शेवटी शिपायांनी शिमोन कुरणेकर नावाच्या मनुष्यास वधस्तंभ वाहून नेण्यास भाग पाडले. जेव्हां ते कालवरी म्हटलेल्या ठिकाणी आले तेव्हां त्यांनी त्यास पिण्यास आंब दिली, परंतू ती त्याने पिण्यास नकार दिला. शिपायांनी वधस्तंभावर ठेवून हाता पायात खिळे ठोकले. त्यांनी तो वधस्तंभ उभा केला. “नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करीत होते” (मत्तय 27:36).

त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला. त्यावर लिहले होते, “हा यहुद्यांचा राजा येशू आहे.” त्यावेळी त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारु सुध्दा, एक उजवीकडे व एक डावीकडे, असे वधस्तंभावर खिळले. आणि जवळून जाणारे येणारे 'डोकी डोलवित' त्याची अशी निंदा करीत होते की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणा-या, वधस्तंभावरुन खाली उतर” (मत्तय 27:40). मुख्य याजकानेहि त्याची थट्टा केली की, “त्याने दुस-यांना वाचविले; त्याला स्वत:ला वाचविता येत नाही; तो इस्त्राएलाचा राजा आहे; त्याने आता वधस्तंभावरुन खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू” (मत्तय 27:42).

त्याने हस्तीदंतासारख्या सिंहासनावर राज्य नाही केले,
   परंतू कालवरीच्या वधस्तंभावर मरण पत्करले;
पाप्यांकरिता सर्वकांही किंमत मोजून त्याने नुकसान स्विकारले,
   आणि त्याने राज्याचे वधस्तंभावरुन निरिक्षण केले.
एक कणखर वधस्तंभ त्याचे सिंहासन झाले,
   त्याचे तर राज्य फक्त ह्दयात होते;
त्याने त्याचे प्रेम किरमिजी लाल रंगात लिहले,
   आणि त्याच्या डोक्यावर काटे घालण्यात आले.

येशूला सकाळी नऊ वाजता वधस्तंभावर खिळण्यात आले. आणि बारा वाजल्यापासून ते दुपारी 3.00 वाजे पर्यंत संपूर्ण भूमीवर अंधार पडला. दुपारी 3.00 वाजता येशू मोठ्याने आरोळी मारुन म्हणाला, “'एली, एली, लमा सबखथनी,' म्हणजे 'माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केलाॽ” (मत्तय 27:46). “एक कणखर वधस्तंभ त्याचे सिंहासन झाले.” गीत गाऊया!

एक कणखर वधस्तंभ त्याचे सिंहासन झाले,
   त्याचे तर राज्य फक्त ह्दयात होते;
त्याने त्याचे प्रेम किरमिजी लाल रंगात लिहले,
   आणि त्याच्या डोक्यावर काटे घालण्यात आले.

येशू आरोळी मारुन म्हणाला, “माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केलाॽ” त्याची ही आरोळी तीन गोष्टी दर्शविते.

I. प्रथम, येशूची वधस्तंभावरील आरोळी ही जुन्या करारातील भविष्यवाणी पूर्ण करते.

स्तोत्र 22:1 मध्ये दाविद लिहतो,

“माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केलाॽ” (स्तोत्र 22:1).

येशूने मुद्दामहून हे वचन पूर्ण केले. येशूने वधस्तंभावर पूर्ण केले आहेत असे 15 मुद्दे आपणास स्तोत्र 22 देते. आरंभीच्या मंडळीतील कित्येक लेखक स्तोत्र 22 ला, “पाचवे शुभवर्तमान” असे संबोधतात. स्तोत्र 22:18 म्हणते, “ते माझी वस्त्रें आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टकितात.” आणि अगदी तेच शिपायांनी वधस्तंभाच्या पायथ्याशी केले. स्तोत्र 22:16 म्हणते, “त्यांनी माझे हातपाय विंधिले आहेत.” “विंधिले” करिता इब्री शब्द चा अर्थ “खणणे, छेद करणे, किंवा छीद्र करणे” असा होतो (जॉन गील). जख-या 12:10 म्हणते, “ज्या मला त्यांनी विंधिले त्या मजकडे पाहतील.” “विंधिले” करिता इब्री शब्द चा अर्थ “भोसकणे, छेद करणे, च्यातून घुसणे” (भक्कम) असा होतो. स्कोफिल्ड अभ्यासाचे पवित्रशास्त्र म्हणते,

स्तोत्र 22 हे मरणाचे वधस्तंभाद्वारे असलेले वर्णनात्मक चित्र आहे. सांध्याची (हात, मनगट, खांदा आणि ओटी पोटाची हाडे) हाडे (व.14); प्रचंड शाररिक छळामुळे मोठ्या प्रमाणात घाम आला (व.14); ह्दयाच्या हालचालीवर परिणाम झाला(व.14); सारी ताकद निघून गेली व खूप तहान लागली (व.15); हात व पाय खिळ्याने छेदले (व.16); अर्धनग्नतेमुळे नम्रतेला ठेच पोहंचली (व.17), या सर्वांमुळे अशाप्रकारचे मरण ओढावले. तेथील वातावरण असे होते की ज्यामुळे ख्रिस्ताचे वधस्तंभावरील जाणे परिपूर्ण झाले. वचन 1 मधील आर्त आरोळी (मत्तय 27:46); वचन 2 मधील प्रकाश व अंधाराचा कालावधी (मत्तय 27:45)... वचन 18 मध्ये मोठ्याप्रमाणात येतो (मत्तय 27:35), ही सर्व वचने येथे अगदी पूर्ण झालेली आहेत. जेव्हां त्याची आठवण येते तेव्हां ते वधस्तंभावर खिळणे हे यहुदी नसून, रोमी पध्दतीचे होते, हे ईश्वरप्रेरित असलेचा निर्वेध पुरावा आहे हे कळते. (द स्कोफिल्ड स्टडी बायबल; पृष्ठ .608; स्तोत्र 22 वरील टिप्पणी).

डॉ. हेनरी एम. मॉरिस म्हणाले,

स्तोत्र 22 हे देवाच्या पुत्राचे संदेष्ट्याने केलेले भविष्यातील वधस्तंभावर खिळण्याचे अद्भूत वर्णन आहे. हे स्तोत्र पूर्ण होण्याच्या 1000 वर्षे पूर्व लिहलेले होते आणि ख्रिस्ताचे दु:खसहन वर्णनात्मक चित्रीत केले हेते, खूप वर्षापूर्वी पासून वधस्तंभावर देण्याची ही पध्दत प्रचलीत होती... (हेनरी एम. मॉरिस, पीएच.डी., द डिफेंडर्स स्टडी बायबल, वर्ल्ड पब्लिशर्स, 1995 आवृत्ती, पृष्ठ. 608; स्तोत्र 22:1 वरील टिप्पणी).

डॉ. जॉन आर. राईस यांनी एका मागून एक येशूने वधस्तंभावर पूर्ण केलेल्या आहेत अशा जुन्या करारातील भविष्यवाण्या सांगितल्या आहेत. ते म्हणतात, “ह्या भविष्यवाण्यांची परिपूर्तता होणे म्हणजे अपघात असणे अशक्य आहे. अशाप्रकारे वचनांचा ईश्वरप्रेरितपणा आणि ख्रिस्ताचा दैवीपणा यासंबंधाचे पुरावे आपणांकडे पुष्कळ आहेत (लुक 24:25-27). केवळ मुर्खच विश्वास करावयाचा नाही. त्यामुळे देवाने ख्रिस्ताच्या [वधस्तंभावरील मरणांसंबंधीच्या] भविष्यवाणीवर भर दिला आहे... आपण पाहतो की हे देवाच्या योजनेचे ह्दय आहे” (जॉन आर. राईस, डी.डी., द बायबल गार्डन, स्वोअर्ड ऑफ द लॉर्ड पब्लिशर्स, 1982, पृष्ठ. 31).

II. दुसरे, येशूची वधस्तंभावरची आरोळी ही कांही अंशी नरकात यातना भोगणा-या पाप्याचे चित्र दर्शविते.

“माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केलाॽ” (मत्तय 27:46).

वधस्तंभावर असताना येशू नरकात गेला नाही. डॉ. फ्रेड्रीक के. प्राईस खोटा सिंध्दांत चुकीच्या पध्दतीने शिकवित. असे कोणतेहि वचन नाही जे सांगते की येशूने “नरकात आपल्या पापासाठी यातना सहन केल्या” जसे की डॉ. प्राईस म्हणाले.

तरीहि मी डॉ. जॉन आर. राईस यांच्याशी सहमत आहे की येशूची दु:खद आरोळी, “माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केलाॽ” नरकात यातना भोगणा-या पाप्याचे चित्र दर्शविते. डॉ. राईस म्हणाले,

आम्ही विश्वास ठेवतो की ख्रिस्ताचे वधस्तंभावरील दु:खसहन हे कांही अंशी नरकातील पाप्याच्या यातनेचे चित्र दर्शविते. वधस्तंभावर येशूने आरोळी मारुन म्हटले, “मला तहान लागली आहे” जशी नरकात श्रीमंत मनुष्याला तहान लागली तशी (लुक 16:24). “माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केलाॽ” अशी आरोळी श्रीमंत मनुष्य मारीत आहे अशी कल्पना तुम्ही करु शकत नाही काय? नरक वास्तवात आहे. पापामुळे भयंकर यातना, वास्तवातील शाररिक दु:खसहन... देवापासून विभक्तपणा या सर्वांस सामोरे जावे लागणारच. पापी नरकात सुध्दा आंधळे, दुष्ट राहतील, तेथेहि का? हा प्रश्न विचारतील (I करिंथ 2:14). यहुदा, दु:खीत पिडीत अंत:करणात, त्याला ठाऊक होते की त्याने निर्दोष रक्ताला धरुन दिले आहे (मत्तय 27:4), परंतू तो आपल्या पापापासून माघारी फिरला नाही (राईस, ibid., पृष्ठ. 31,32).

म्हणून, ख्रिस्ताची वधस्तंभावरील आरोळी ही कांही अंशी नरकातील पाप्याच्या आरोळीचे चित्र दर्शविते,

“माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केला?” (मत्तय 27:46).

जो नरकात जातो त्याला कसलीहि आशा नसते. तारण न झालेले लोक नरकात जातील तेव्हां त्याचे काय होईल हे येशूने सांगितले आहे. त्यांना तो म्हणेल,

“अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्यांचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालीक अग्नि सिध्द केला आहे त्यात जा” (मत्तय 25:41).

“नरकात म्हणजे न विझणा-या अग्नीत जावे” (मार्क 9:44).

“तो अधोलोकांत यातना भोगीत असताना, त्याने आपली दृष्टी वर केली” (लुक 16:23).

यातना भोगीत वधस्तंभावरील येशू पुढे आणि पुढे तारण न झालेल्या लोकांकरिता नरकात जाईल. ते “सार्वकालीक अग्नीत” कायमस्वरुपी यातना भोगतील (मत्तय 25:41). ते सतत आक्रोश करीत आहेत की, “माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केलाॽ” असे वाटते. होय, आम्ही विश्वास ठेवतो की ख्रिस्ताचे वधस्तंभावरील दु:खसहन हे कांही अंशी नरकातील पाप्याच्या यातनेचे चित्र दर्शविते. म्हणून आम्ही विनंती करितो की खूप उशीर होण्यापूर्वी, तुम्ही आताच येशूवर विश्वास ठेवा आणि पापापासून मुक्ति मिळवा.

आता हा उपदेश तुम्ही विसरलात तर तुमचे कधीहि तारण होणार नाही. मागील रविवारच्या रात्री सभा संपल्यानंतर जॉन कागन व मी एका मुलीला खडसावून सांगितले. दहा मिनिटा नंतर मी तिला सभागृहात हसताना व मजा करताना पाहिले. जोवर ती गंभीर होणार नाही तोवर तिच्या पापाच्या दंडापासून ती कधीहि सुटणार नाही. हा उपदेश ऎकून तुम्ही तुमच्या पापाबद्दल गंभीरपणे विचार करणार नाही तर तुमचे तारण होणार नाही. येशू भयंकर अशा यातनेतून का गेला? त्याने तुमच्या पापा करिता दंड देण्यासाठी हे केले. तुम्ही तुमच्या पापाबद्दल गंभीरपणे विचार करणार नाही तर येशूने क्षमा करावी असे तुम्हांस वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही येशूवर विश्वास ठेवीत नाही. तुम्ही हा अनुवादित उपदेश घरी वाचायला हवा. हा उपदेश वाचा आणि आज रात्री झोपी जाण्यापूर्वी विचार करा. आपल्या पापासंबंधी विचार करीत उद्या सकाळी मंडळीत या. असे जोवर तुम्ही करीत नाही तोवर येशू तुमचे तारण करणार नाही! तुम्हांस तुमच्या पापाची जाणीव झाली पाहिजे!

III. तिसरे, येशूची वधस्तंभावरची आरोळी ही तुमच्या पापाकरिता दंड देण्यासाठी तो मरण पावला हे दर्शविते.

“येशू मोठ्याने आरोळी मारुन बोलला, 'एली, एली, लमा सबखथनी,?' म्हणजे 'माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केलाॽ” (मत्तय 27:46).

ही आरोळी समजण्यास अवघड आहे. मला आठवते अभ्यासाच्या दिवसात लुथर सॅट, कांहीहि न खाता किंवा न हलता वाचीत, तारणा-याची आरोळी समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. सरतेशेवटी त्यांना कळून आले की पिता व पुत्र कसे काय विभक्त झाले हे मानवी रुपात समजू शकत नाही. त्रैक्यातील पहिला व्यक्ति दुस-या व्यक्तीला कसे काय सोडू शकतो? शेवटी त्यांनी प्रयत्न सोडून दिला, आणि आपली पत्नी व लेकरांबरोबर जेवावयास घरात गेले. तारणा-याच्या आरोळीचे रहस्य धार्मिक समालोचक जॉन ट्रॅप (1601-1669) यांनी सांगितले आहे. जॉन ट्रॅप म्हणाले, “जेव्हां मानव म्हणून, आरोळी मारतो, 'माझ्या देवा, माझ्या देवा, [तूं माझा त्याग का केला],' तेव्हां त्याने देव म्हणून, पश्चाताप करणा-या चोरास सुखलोक दिला” (जॉन ट्रॅप, अ कॉमेंट्री ऑन ओल्ड ऍंड न्यू टेस्टामेंट्स, ट्रान्स्की पब्लिकेशन्स, 1997 पुनर्मुद्रण, आवृत्ती V, पृष्ठ. 276; मत्तय 27:46 वरील टिप्पणी).

डॉ. आर. सी. एच्. लेन्स्की (1864-1936) म्हणाले, “मरणाच्या आकांताने तो आरोळी मारतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा पिता दिसत नाही, जगाचे पाप व त्याचे शाप म्हटलेले ते पुत्रावर लादले. येशूला देवाची तहान लागली होती, परंतू देवाने स्वत:स त्याच्यामधून काढून घेतले. पुत्राने पित्याला सोडले नाही, परंतू पित्याने पुत्रास [सोडले]. पुत्राने देवासाठी आरोळी मारली, आणि देवाने त्यास कोणतेहि उत्तर दिले नाही... आपण अशी आशा करतो की रहस्याच्या जवळ आलो आहो, जगाचे पाप व त्याच्या शापाने येशू झाकला आहे, आणि अशाप्रकारे येशूला पाहिले तेव्हां त्याने त्याच्यापासून आपले मुख वळविले. देवाच्या पुत्राने आपले पाप व त्याचे शाप सहन केले... त्यामुळे येशूने, 'माझ्या बापा' अशी नव्हे तर 'माझ्या देवा' अशी आरोळी मारली. परंतू अधिकारयुक्त ['माझ्या'] हे महत्वाचे आहे. देवाने त्याच्यापासून तोंड फिरवले व सोडले तरी, त्याने त्याला आरोळी मारली...त्याचा देव म्हणून...तो निर्दोष असा कोकरां होता तरी त्यास ताडण म्हणून पाप व शापाबद्दल त्याचे अर्पण केले” (आर. सी. एच्. लेन्स्की, पीएच्.डी., द इंटरनॅशनल ऑफ सेंट. मॅथ्यू गॉस्पल, ऑग्जबर्ग पब्लिशिंग हाऊस, 1964 आवृत्ती, पृष्ठ. 1119-1120).

डॉ. राईस म्हणाले, “चांगल्या प्रकारे, मग, येशूने जगाचे पाप आपल्यावर घेतले आणि एक पापी म्हणून दु:ख सहन केले” (राईस, ibid., पृष्ठ. 31). प्रेषित पौल म्हणाले,

“शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला” (I करिंथ 15:3).

प्रेषित पेत्र म्हणाले,

“त्याने स्वत: तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहां” (I पेत्र 2:24).

आपणांबद्दल येशू मरण पावला, आपल्या पापाबद्दल खंडणी देण्यासाठी, “आपणांसाठी शापित झाला” (गलती 3:13).

येशूने तुमच्यावर एवढी प्रीति केली की तुम्हांस तुमच्या पापापासून व नरकापासून वाचविण्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा व प्रीति करावी अशी त्याची प्रीति मागणी करते. डॉ. वॅट्स म्हणाले, “अद्भूत, दैवी प्रीति, माझा जीव, माझे जीवन, माझे सर्वस्व यांची मागणी करते.” येशूकडे वळा व त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुम्हांस पापाच्या दंडापासून वाचविल. वधस्तंभावरुन तुमच्यासाठी असलेली त्याची प्रीति तुम्ही कशी ऎकणार, आणि नंतर त्याच्याबद्दल विसरुन जाणार आणि एका मिनिटानंतर मुर्खासारखे हसणार काय? तुम्ही गंभीरपणे उपदेश ऎकून घेतल्याशिवाय तुमचे तारण कसे होईल? ख्रिस्ताची तुम्हांस गरज भासणार नाही तोवर तुमचे तारण होणार नाही. येशूशिवाय तुम्ही जगू शकत नाही अशी जोवर तुमची भावना होत नाही तोवर तुमचे तारण होणार नाही.

त्याने हस्तीदंतासारख्या सिंहासनावर राज्य नाही केले,
   परंतू कालवरीच्या वधस्तंभावर मरण पत्करले;
पाप्यांकरिता सर्वकांही किंमत मोजून त्याने नुकसान स्विकारले,
   आणि त्याने राज्याचे वधस्तंभावरुन निरिक्षण केले.
एक कणखर वधस्तंभ त्याचे सिंहासन झाले,
   त्याचे तर राज्य फक्त ह्दयात होते;
त्याने त्याचे प्रेम किरमिजी लाल रंगात लिहले,
   आणि त्याच्या डोक्यावर काटे घालण्यात आले.

तुम्ही येशूवर विश्वास ठेवा असे मी सांगतो. जेव्हां तुंम्ही विश्वास ठेवता तेव्हां तो तुमच्या पापाची क्षमा करितो आणि त्याने वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताने तो तुम्हांस शुद्ध करतो!


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी पवित्रशास्त्र वाचन मि. नोआ साँग यांनी केले : मार्क 15:29-34.
उपदेशापूर्वी एकेरी गीत गायन मि. बेंजामिन किनकैड ग्रीफ्फीथ साँग यांनी केले :
“ अ क्राऊन ऑफ थ्रोन्स” (इरा एफ. स्टॅनफिल द्वारा, 1914-1993).
“A Crown of Thorns” (by Ira F. Stanphill, 1914-1993).


रुपरेषा

तूं माझा त्याग का केला ॽ

WHY HAST THOU FORSAKEN ME?

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारुन बोलला, 'एली, एली, लमा सबखथनी,' म्हणजे 'माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केलाॽ”(मत्तय 27:46).

(योहान 18:3; मत्तय 26:57; यशया 50:6; मत्तय 27:22, 24, 29, 36,40,42)

I.   प्रथम, येशूची वधस्तंभावरील आरोळी ही जुन्या करारातील भविष्यवाणी पूर्ण
करते, स्तोत्र 22:1, 18, 16; जख-या 12:10.

II.  दुसरे, येशूची वधस्तंभावरची आरोळी ही कांही अंशी नरकात यातना भोगणा-या
पाप्याचे चित्र दर्शविते, लुक 16:24; I करिंथ 2:14; मत्तय 27:4;
मत्तय 25:41; मार्क 9:44; लुक 16:23.

III. तिसरे, येशूची वधस्तंभावरची आरोळी ही तुमच्या पापाकरिता दंड देण्यासाठी तो
मरण पावला हे दर्शविते, I करिंथ 15:3; I पेत्र 2:24; गलती 3:13.