संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
फटक्याचा मार, उपमर्द आणि थूंकणेTHE SCOURGING, SHAME AND SPITTING डॉ. आर. एल. हायमर्स, जुनि. यांच्या व्दारा लॉस एंजलिसच्या बॅप्टीस्ट टॅबरनॅकल येथे प्रसारीत झालेला उपदेश “मी मारणा−यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणा−यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6). |
षंढासारखे आम्ही विचारतो, “संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो,स्वत:विषयी किंवा दुस−या कोणाविषयी ॽ” (प्रेषित 8:34). 53व्या अध्याया नुसार, यशया येथे प्रभू येशू ख्रिस्ता विषयी बोलत आहे याविषयी शंका नाही. खचितच येशूने सुध्दा ह्या भविष्यवाणीचा उल्लेख येरुशलेमकडे वर जाताना शिष्यांबरोबर बोलताना केला व तो म्हणाला,
“तेव्हां त्याने बारा जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, पाहा, आपण वर येरूशलेमेस चाललो आहों, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांच्या द्वारे लिहण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत; म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील, आणि तो तिस−या दिवशी पुन्हा उठेल” (लुक 18:31−33).
येशूनेत्यांना सांगितले की परराष्ट्रीय त्याची कुचेष्टा, अपमान करतील, फटके मारतील, त्याचा जीव घेतील. आणि त्याने सांगितले की हे “संदेष्ट्याच्या द्वारे” पूर्वीच सांगितले आहे. म्हणून आपले विधान हे जो संदर्भ दिला त्यापैकी असायला हवा,
“मी मारणा−यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणा−यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).
नंतर आपण पाहतो की ती भविष्यवाणी खरी ठरली. पंत पिलात, रोमी सुभेदार, याने त्याला फटके मारले. त्यानंतर रोमी शिपायांनी त्यांस
“...आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याला घातला; आणि ते मुजरा करुन त्याला म्हणू लागले, हे यहुद्यांच्या राजा! तुझा जयजयकार असो. त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारले, ते त्याच्यावर थुंकले...” (मार्क 15:17-19)
त्यामुळे माझी खात्री पटली की आमचा मुक्तीदाता, नाझरेथकर येशूच होता, ज्याने भविष्यवाणीचे ते शब्द पूर्ण केले,
“मी मारणा−यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणा−यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).
जोसेफ हार्ट त्याचे असे वर्णन करतात,
पहा येशू कसा सहन करीत उभा आहे,
भीषण अशा स्थितीमध्ये अपमानीत होऊन!
पाप्यांनी सर्वसमर्थ हातांना बांधून ठेवले,
आणि त्यांच्या निर्माणकर्त्याच्या तोंडावर थुंकले.
काट्यांनी त्याचे मंदिर घायाळ व जखमी केले,
शरीराच्या अंगाअंगातून रुधीराच्या धारा वाहू लागल्या;
पाठीवर जाडसर चाबकाचे फटके मारले,
अनकुचीदार खिळ्यांनी त्याचे ह्दय भग्न झाले.
(“त्याचे दु:खसहन” जोसेफ हार्ट, द्वारा, 1712-1768; पाळकांनी पुर्नरचना केली).
(“His Passion” by Joseph Hart, 1712-1768; altered by the Pastor).
“मी मारणा−यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणा−यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).
आज या संध्याकाळी दु:खसहन करणारा तारक घेऊन येतोय. आणि पिलाताबरोबर मी म्हणतो, “हा मनुष्य पाहा” आपली अंत:करणे वळवा आणि त्याच्या दु:खाकडे पाहा. पाहा तो कोण आहे, किती सुंदर उदाहरण आहे, आणि नाश पावलेल्या पाप्यांना अनंतकाळच्या अग्नीपासून वाचविण्यासाठी किती मोठे काम त्याने केले आहे.
I. पहिले, त्याच्याकडे एक देहधारी देव म्हणून पाहा.
ह्या धरतीवर मानवी देहामध्ये देवाने अवतार घेऊन आम्हांमध्ये वस्ती केली. यशया 50:2 मध्ये म्हणतो, “मी आलो” देव जो पुत्र स्वर्गातून खाली “आला” आणि आम्हांमध्ये त्याने वस्ती केली.
“प्रारंभी शब्द होता¸ आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता... शब्द देही झाला, आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली, (आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव) असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते” (योहान 1:1¸14).
“तो देहाने प्रकट झाला” ( I तिमथ्य 3:16).
प्राचीन काळातील ख्रिस्ती लोक येशूला योग्य बोलावित होते, “देवांचा देव, प्रकाशाचा प्रकाश, ख-या देवांचा खरा देव, निर्मीत नव्हे एकुलता एक.”
ह्यावर विचार करा आणि तुम्हांस कळून येईल की हा माणसाच्या मनात असलेला सर्वात लक्षणीय सिध्दांत आहे. स्पर्जन म्हणाले,
हे साक्षांकित नसले तरी, अनंत असा देव सर्व कांही भरतो हे अद्भूत असे आहे ना, जो होता आणि जो आहे आणि जो येणार आहे, सर्व समर्थ, सर्वज्ञानी, आणि सर्वसाक्षी आहे, तो इतका नम्र झाला की त्याने आमची घाणेरडी वस्त्रे पांघरली. त्याने सर्वकांही निर्माण केले, आणि तरीहि त्याने स्वत:स मनुष्यप्राण्याच्या शरीरामध्ये येण्याचे ठरविले...आमच्या प्रभूचे मानवी रुप हा आभास... किंवा केवळ मनुष्याचा आकार नव्हता तर त्याचे खरोखरीचे मनुष्य रुप होते: सर्व शंकेपेक्षा “शब्द देही झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली.” “मला तपासा व पाहा. तो म्ह्णाला, आत्म्यास शरीर नसते आणि माझी तर तुम्ही हाडेहि पाहू शकता” (सी.एच्.स्पर्जन,“द ग्रेट मिस्ट्री ऑफ गडलीनेस,” द मेट्रोपोलीटन टॅबरनिकल पुलपीट, पीलग्रीम पब्लीकेशन, 1979 पुर्नमुद्रण, आवृत्ती 28, पृष्ठ 698).
मानवी देहामध्ये येशू देव होता, अभिभावीत संगमद्वारा, तो देवाचा अवतार होता. पवित्र त्रैक्यातील दुसरी व्यक्ती, शब्द देही झाला!
हा आपला मजकूर मानवी मनासाठी अंथाग असा आहे! ह्या मानवी देहामध्ये देव स्वत:स रिक्त व छळ करण्यास अनुमती देत आहे! हे मानवी कल्पनेच्या पलीकडचे असून स्वत: देव अवतारी म्हणतो,
“मी मारणा−यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणा−यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).
सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता, आणि ज्याच्यामध्ये सर्वकांही आहे, असा तो पापी मानवास पाठीवर कोडे मारु देत आहे आणि आपली दाढी ओढू देत आहे! येथे माझा देव क्षुद्र माणसाला त्याच्या तोंडावर मारु देत आहे! ते देवाच्या तोंडावर थुंकले!
पहा येशू कसा सहन करीत उभा आहे,
भीषण अशा स्थितीमध्ये अपमानीत होऊन!
पाप्यांनी सर्वसमर्थ हातांना बांधून ठेवले,
आणि त्यांच्या निर्माणकर्त्याच्या तोंडावर ते थुंकले.
(“त्याचे दु:खसहन” जोसेफ हार्ट, द्वारा)
(“His Passion” by Joseph Hart).
II. दुसरे, त्याच्याकडे आपणास एक कित्ता म्हणून पाहा.
“मी मारणा−यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणा−यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).
देवाचा एक सेवक म्हणून, येशूने आपल्या पाठीवर मारु दिले, केस उपटू दिले, त्यांच्या तोंडावर ते थुंकले. तो कोरहाप्रमाणे जमीनीत गाडू किंवा एलियाप्रमाणे भस्म करु शकला असता. परंतू तो “वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणा-यांपुढे गप्प राहणा-या मेंढराप्रमाणे गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडिले नाही” (यशया 53:7) असा गेला. आणि प्रेषित पेत्र म्हणाला,
“कारण ह्याचकरिता तुम्हांस पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दु:ख भोगले आणि तेणेकरुन तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे. त्.ने पाप केले नाही, आणि मुखात कपट आढळले नाही; त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दु:ख भोगीत असता त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणा-याकडे स्वत:ला सोपवून दिले” (I पेत्र 2:21-23).
आम्ही आमचे जीवन व पैसा देवाला द्यायला तयार असले पाहिजे, परंतू जेव्हां आम्हांस शीवीगाळ किंवा निंदा होते तेव्हां आम्हांस मागे ओढल्यासारखे होते. परंतू निंदा व्हावी अशी येशूची इच्छा होती आणि सर्वात पापी लोकाकडून खोटे ठरविले जात असतानाहि स्वत:चा बचाव केला नाही. जेव्हां आम्हांस आमचे मित्र व नातेवाईक ढोंगी म्हणतात, आणि ख्रिस्ती असलेने आम्हांस दुष्ट बोलतात तेव्हां आपण काय म्हणतो? आम्ही लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हां त्यांस वधस्तंभावर देण्यापूर्वी खोट्या साक्षीच्या द्वारे दोषी ठरविले जात असताहि तो काहीहि न बोलता “त्याने शांतता राखून ठेवली,” (मत्तय 26:63). जेव्हां पिलात त्यांस म्हणाला, “हे तुझ्याविरुध्द किती गोष्टीबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय? परंतू त्यांने एकाहि आरोपाला त्यांना कांही उत्तर दिले नाही; ह्याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले” (मत्तय 27:13-14).
हा धडा मी खूप कठीण परिस्थितीमध्ये शिकलो जेव्हां मी एका देव निंदा करणा-या सिनेमा “ख्रिस्ताची अंतिम परिक्षा”च्या विरोधात प्रदर्शन करुन येशू विश्वासाचे संरक्षण केले. मी यहुदी विरोधी व विश्वासघातकी आहे असा खोटा आरोप केला गेला. हे अगदी साफ खोटे होते. मी यहुदी लोक व इस्त्राएल राष्ट्रावर माझे अंत:करण व मनापासून प्रीति करतो, आणि नेहमी करीन. परंतू जेव्हां येशूविषयीच्या विश्वासाचे रक्षण करतांना जीवलग मित्र माझ्या विरोधात दोषारोप केला तेव्हां शांततेत त्रास सहन करण्यास शिकलो. गेल्या वीस वर्षामध्ये मी माझे रक्षण खूप कमी वेळेस केले आहे. केवळ नुकतेच मी आमच्या मंडळीची साक्ष राखण्यासाठी खोट्या आरोपाविरुध्द एक विधान केले. येशू म्हणाला,
“मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हां तुम्ही धन्य. त्या दिवशी आनंदीत होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांस असेच करीत असत.” (लुक 6:22-23).
कठीण परिस्थितीमध्ये तारणा-याचे हे शब्द मला खूप समाधान देतात. जग जेव्हां येशूमुळे तुमच्यावर दोषारोप करते तेव्हां लगेचच स्वत:चे रक्षण करायला हवे असे मला वाटत नाही. “ख्रिस्ताची अंतिम परिक्षा”च्या विरोधात प्रदर्शन करते वेळी एक मनुष्य जवळजवळ माझ्या तोंडावर थुंकला. मी पुष्कळ वार्ताहरांच्या कॅमे-यासमोर उभा होतो माझ्या तोंडावरुन थुंकी ओघळत होती. जशास तसे करु नये हे मी येशूकडून शिकलो, “उपमर्द व छिथू यापासून” त्याने आपले तोंड चुकविले नाही. त्यानंतर ह्या मनुष्यासाठी प्रेमाने वागण्याचा मी खूप प्रयत्न केला. परंतू बिचारा! नंतर त्याची हत्या झाली. मी जे दु:ख भोगले आणि त्याच्यासाठी व त्याच्या कुटुंबासाठी मी किती अश्रू ढाळले हे देवाला ठाऊक आहे.
आपल्या उता-यातील ऊपदेशामध्ये स्पर्जन म्हणाले, “मनुष्याने तुमचा द्वेष व धिक्कार केला तरी, तुम्ही नम्र, आणि नम्रच असले पाहिजे, कारण हा सार्वकालीक गौरवाकडे जाणारा मार्ग आहे. (“द शेम अॅन्ड स्पीटींग,” द मेट्रोपोलीटन टॅबरनिकल पुलपीट, पीलग्रीम पब्लीकेशन, 1972 पुर्नमुद्रण, आवृत्ती 25, पृष्ठ 431).
ह्या दुष्ट जगामध्ये येशूचे शिष्य म्हणून राहताना जेव्हां लोक तुमची निंदा करतील व तुमच्या विरुध्द बोलतील तेव्हां तुम्ही त्याचे उदाहरण ध्यानात घ्या. स्पर्जन म्हणाले,
काय तुम्ही वेदनेने व दु:खाने पिडीत आहात…ॽ येशूला हे सर्व ठाऊक आहे, कारण त्याने, “मारणा−यांपुढे आपली पाठ केली.” तुमची निंदा... होतेयॽ “उपमर्द व छिथू यापासून त्याने आपले तोंड चुकविले नाही.” तुम्हांस मुर्ख ठरविले जाते काय...ॽ विवेकशुन्य तुमच्या धार्मिकतेची टर उडवितात कायॽ येशू तुम्हाला सहानभूती दाखवू शकतो, कारण तुम्हांस ठाऊक आहे की किती दुष्टतेने ते त्याच्याशी वागले. तुमच्या ह्दयातून भेदून जाणा-या प्रत्येक तीव्र वेदनेमध्ये प्रभूला त्याच्या सहभागाची जाण आहे... (स्पर्जन, ibid).
पहा येशू कसा सहन करीत उभा आहे,
भीषण अशा स्थितीमध्ये अपमानीत होऊन!
पाप्यांनी सर्वसमर्थ हातांना बांधून ठेवले,
आणि त्यांच्या निर्माणकर्त्याच्या तोंडावर ते थुंकले.
III. तिसरे, त्याच्याकडे एक पाप्यांच्या ऎवजी बदली म्हणून पाहा.
“मी मारणा−यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणा−यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).
लक्षात ठेवा येशूने जे दु:ख भोगले ते त्याच्या पापाबद्दल नव्हते, कारण त्याच्याठायी पाप नव्हते.
“खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला; आम्हांस शांति देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यानी आम्हास आरोग्य प्राप्त झाले” (यशया 53:5).
यशया 53 मधील ही वचने स्पष्ट सांगतात की, त्याचे ठेचले जाणे, फटके खाणे, तसेच त्याचे मरणहि, पाप्यांना वाचविण्यासाठी आवश्यक होते. येशूने आमचे पाप स्वत:वर घेतले. आणि पवित्रशास्त्र सांगते की, देवाने “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्या करिता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे” (II करिंथ 5:21). जेव्हां येशूने दु:ख भोगले, ते आमच्या पापाबद्दल भोगले, त्यांच्या पापांचा मोबदला देण्यास, ह्यासाठी की आमचे तारण व्हावे. पाप हे शक्य असलेली सर्वात वाईट गोष्ट आहे. पाप मार खाण्याच्या लायकीचे आहे. पाप थुंकण्याच्या लायकीचे आहे, पाप वधस्तंभावर खिळण्याच्या लायकीचे आहे. आपले पाप येशूने आपणा स्वत:वर घेतलेने, त्याला मार खावा लागला. त्याच्यावर थुंकण्यात आले. त्याची छीथू झाली. पापाबद्दल देव काय विचार करतो, हे जाणून घ्यायचे असेल तर, त्याच्या पुत्राकडे पाहा, तुमच्या माझ्या पापाकरिता अर्पण करीत असताना त्याच्या पाठीवर फटके मारण्यात आले, दाढीचे केस ओढण्यात आले, शिपाई त्याच्या तोंडावर थुंकले. आपल्या पापाकरिता तुम्हांला व मला फटके मारण्यात आले, दाढीचे केस ओढण्यात आले, तोंडावर थुंकले तर वावगे होणार नाही. परंतू ज्याने आमचे पाप स्वत:वर घेतले तो देव जो पुत्र होता. येशू आमच्या जागी उभा राहिला, आणि “त्याला ठेचावे असे देवाच्या मर्जीस आले त्याने त्याला पीडिले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील” (यशया 53:10). मुळातच आपले पाप येशूच्यावर लादले असलेने, मोल चुकविण्यास वधस्तंभावर जाण्यापूर्वी त्याला अतीव वेदना आणि निंदा झाली.
हा उतारा काय सांगतो ते ध्यानात घ्या, “मी मारणा−यांपुढे आपली पाठ केली. ” येशूने स्वत:च्या इच्छेने मारणा−यांपुढे पाठ केली, केस उपटणा−यांपुढे गाल केले, आणि थुंकण्यास तोंड पुढे केले. स्वत:च्या इच्छेने वधस्तंभावर मरण्यास दिले. आपल्या पापाकरिता दुस-या कोणी त्याच्यावर बळजबरी केली नाही. त्याने हे स्वच्छेने केले. देवाचा पुत्र आपल्याकरिता, मोल देण्यास, आमच्या बदली, स्वच्छेने पाप झाला- यासाठी की देवाकडून आम्हांला क्षमा मिळावी आणि त्याच्या दृष्टीने आम्ही नीतिमान ठरविले जावे.
काय तुम्हांला हे ऎकून अद्भूत वाटत नाही? काय तुमच्या लक्षात आहे की देवाच्या पुत्रास मारले, व त्याचे केस उपटले, व त्याच्या तोंडावर थुंकले, आणि आश्चर्य, आदर व कौतुक असे कांही वाटले नाही? जो आकाशाला झाकतो तो स्वत: लाज व छीथू झाकू शकला नाही. ज्याने पर्वताची पठारे केली, त्यास माराने घायाळ होण्यापासून वाचविण्यासाठी आपली पाठ झाकता आली नाही. ज्याने पट्ट्याने सृष्टीला बांधून ठेवले त्यास साखळदंडाने बांधून ठेवले होते आणि ज्या मनुष्यास निर्माण केले त्याने त्याचे डोऴे बांधले होते. स्वर्गात देवदूत त्याच्या स्तूतीसाठी मोठ्याने संगीतासह गीत गातात, त्यास वधस्तंभावर खिळू शकतील काय? मला वाटते त्यामुळेच त्याच्या हाता पायातील खिळ्यांची खूण कायमची आहे, म्हणून जेव्हां आम्ही त्याला स्वर्गात पाहतो. तेव्हां आपल्या करिता काय केले हे विसरु शकत नाही. पापीजनांनी त्याच्या दाढीच्या केसाचे तुकडे केले, तोंडावर थुंकले आणि ते त्याच्या गालावर ओघळले त्यांची आठवण केल्याशिवाय कसे काय मी त्याचे आवडते गौरवी मुख पाहू शकतो!
पहा येशू कसा सहन करीत उभा आहे,
भीषण अशा स्थितीमध्ये अपमानीत होऊन!
पाप्यांनी सर्वसमर्थ हातांना बांधून ठेवले,
आणि त्यांच्या निर्माणकर्त्याच्या तोंडावर ते थुंकले.
त्याचा चेहरा! देवदूतावर का थुंकले नाहीत? एवढा सुंदर त्याचा चेहरा सोडून थुंकण्यास दुसरी जागा तुम्हास मिळाली नाही काय? त्याचा चेहरा! देवा आम्हांस मदत कर! त्याचा चेहरा! ते येशूच्या पवित्र चेह-यावर थुंकले! स्पर्जन म्हणाले, “मला असे वाटते की मनुष्यास कधीहि निर्माण केले नसते, किंवा असले भयंकर करण्यास जगू देण्याऎवजी त्यास... चिरनिद्रेमध्ये झोपविले असते” (ibid., पृष्ठ 428). देवा आम्हांस मदत कर! ते आपल्या मुक्तीदात्याच्या चेह-यावर थुंकले!
तुम्ही जर पापात हरविलेले आहात, तर मी तुम्हास विनंती करितो की आताच त्याच्यावर विश्वास ठेवा. जेव्हां तुम्ही विश्वास ठेवता तेव्हां तुमचे पाप नाहीसे होते, कारण जेव्हां तो वधस्तंभावर खिळला तेव्हां त्याने तुमचे सर्व अपराध आणि लांच्छन स्वत:वर घेतले. कारण येशूने - आपल्या पाठीवर, आपल्या गालावर, आपल्या चेह-यावर सर्व अपराध घेतल्याने, आणि त्याच्या हाता पायाला झालेल्या जखमामुळे, तुमचा दंड नाहीसा केला. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या सुटकेच्या प्रीतीने! तुमच्या पापासाठीचा दंड नाहीसा होतो, आणि तुमचे तारण होते, सर्व काळासाठी आणि सर्व सार्वकालीकतेसाठी तुम्ही नीतिमान ठरता. कृपया उभे राहा व गीत क्रं. 6 म्हणूया, “ओह, व्हाट् अ फाउंटेन!” डॉ. जॉन आर. राईस द्वारा.
आपणाकडे एक सर्व दृष्टीने वाईट प्रेम कथा आहे,
आम्ही सांगतो पाप्यांना क्षमा मिळू शकते.
मोफत क्षमा मिळावी म्हणून, येशूने दु:खसहन केले,
आणि कालवरीच्या झाडावर प्राय:श्चित केले.
अरे वा, कसा दयेचा झरा वाहतो आहे,
वधस्तंभावर खिळलेल्या तारणा-या मनुष्यापासून.
अमुल्य असे रक्त सांडले त्याने आमच्या उद्धारासाठी,
कृपा आणि क्षमा आमच्या सर्व पापापासून.
(“ओह, व्हाट् अ फाउंटेन!” डॉ. जॉन आर. राईस द्वारा, 1895-1980).
(“Oh, What a Fountain!” by Dr. John R. Rice, 1895-1980).
तुम्ही आज रात्री येशूवर विश्वास ठेवावा म्हणून प्रार्थना करतो. त्याचे रक्त तुमच्या सर्व पापापासून शुध्द करील. आता त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे सर्व काळासाठी, आणि सर्व सार्वकालीकतेसाठी तारण होईल.
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
उपदेशापूर्वी शास्त्रवाचन डॉ. क्रेगॉटन एल. चान यांच्याद्वारे: लुक 18:31-33.
उपदेशापूर्वी वैयक्तीक गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यानी गायले:
“लीड मी टू कॅलवरी” (द्वारा जेनी इव्हलिन हुसे, 1874-1958).
“Lead Me to Calvary” (by Jennie Evelyn Hussey, 1874-1958).
रुपरेषा फटक्याचा मार, उपमर्द आणि थूंकणे THE SCOURGING, SHAME AND SPITTING डॉ. आर. एल. हायमर्स, जुनि. यांच्या व्दारा “मी मारणा−यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणा−यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6). (प्रे.कृ. 8:34; लुक 18:31-33; मार्क 15:17:19)
I. पहिले, त्याच्याकडे एक देहधारी देव म्हणून पाहा, यशया 50:2;
II. दुसरे, त्याच्याकडे आपणास एक कित्ता म्हणून पाहा, यशया 53:7;
III. तिसरे, त्याच्याकडे एक पाप्यांच्या ऎवजी बदली म्हणून पाहा, |