संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
परमेश्वराच्या कार्य आत्म्याचे कोमेजविण्याचेTHE WITHERING WORK OF GOD’S SPIRIT डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश |
यशया दोन होते असे आम्हांला मुक्त सेमीनरीमध्ये शिकविले जात होते. परंतू ते चुकीचे होते. पहिले 39 अध्याय हे लोकांचे पाप आणि पुढे होणा-या बंदीवासा संबंधाने बोलतात. परंतू 40 व्या अध्यायापासून ते शेवटापर्यंत, संदेष्टा त्यांच्या सुटके संबंधाने सांगतो. दुस-या अर्ध्या भागात ख्रिस्ताच्या दु:खसहनाच्या द्वारे मिळणा-या तारणासंबंधी बोलतोय.
“घोषणा कर, अशी वाणी ऐकू आली तेव्हां कोणीएक म्हणाला, काय घोषणा करू सर्व मानवजाति गवत आहे, तिची सर्व शोभा [सौंदर्य, NASV; त्याचे वैभव, NIV] वनांतल्या फुलांसारखी आहे गवत सुकते, फूल कोमेजते; कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत. गवत सुकते; फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.” (यशया 40:6-8).
“घोषणा कर, अशी वाणी ऐकू आली.” संदेष्ट्यास बोलणारी वाणी कोणाची होती? पाचव्या वचनात बोललेले ते “परमेश्वराचे मुख होते”. घोषणा करणे अथवा आरोळी मारणे यांस इब्री शब्द “कारा” (qara) असा शब्द आहे. त्याचा अर्थ “व्यक्तीस भेटावयास बोलाविणे -[सामोरे जाणे]” (भक्कम#7121). यशया 58:1 मध्ये सुद्धा हा तोच इब्री शब्द वापरलेला आहे.
“कंठरव कर, कसर करू नको; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांस त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्यांची पातकें विदित कर.” (यशया 58:1).
म्हणून बाप्तिस्मा करणा-या योहानाने अशी घोषणा केली. बाप्तिस्मा करणा-या योहानाने यशया 40:3 चा संदर्भ दिला. तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्या प्रमाणे, ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यांत ओरडणा-याची वाणी’मी आहे.” (योहान 1:23; यशया 40:3). बोओ (boao) हा ग्रीक शब्द योहान 1:23 मध्ये “ओरडणे”असा अनुवादीत केला आहे. त्याचा अर्थ “मोठ्याने ओरडणे…आरोळी मारणे”असा आहे. इब्री शब्द व ग्रीक शब्द “मोठ्याने आरोळी मार” (यशया 58:1) असे सांगतात. याचा अर्थ असा की, देवाचे मुख…जसे “ओरडते व आरोळी मारते”तसे प्रचारकाने जे हरविलेले व गोंधळलेले आहेत त्यांसाठी मोठ्याने बोलावे! प्रचारकाने देवाचे वचन ऐकणा-यांसाठी मोठ्याने सांगावे. खेदाची बाब अशी की, ही सध्याच्या प्रचाराची प्रसिद्ध पद्धत नाही. सध्याच्या प्रचारामध्ये पवित्रशास्त्रीय मूलभूत गोष्टींची अवज्ञा केली जाते. सध्याच्या आधुनिक सेवेत जसे पूर्वीचे करीत तसे “प्रचार सोडतात व शिक्षण देतात.” आधुनिक सेवेतील देवाची आज्ञा पाळीत नाहीत. परमेश्वर यशयाला म्हणाला, “कंठरवकर, कसर करू नको.” आधुनिक सेवक येशूचे अनुकरण करीत नाहीत. येशू “मंदिरात…ओरडला” (योहान 7:28), तसा किंवा योहान 7:37 मध्ये जसा तो “उभा राहून ओरडला”तसा किंवा पेंटाकॉस्टच्या दिवशी पेत्र ओरडला तसेहि करीत नाहीत. त्याने “आपला मोठा केला”आणि देवाने दिलेले शब्द त्याने मोठ्याने घोषित केले (प्रे.कृ. 2:14). डॉ. जॉन गील म्हणाले, “तो मोठ्याने म्हणाला, कदाचित त्याने मोठ्या लोकसमदायाकडून ऐकले असेल…तसेच त्याच्या आत्म्याचा व मनोधैयाचा आवेश आणि उत्साह दाखविण्यासाठी असेल, तो एक धैर्यवान मनुष्य होता.” (ऍन एक्स्पोझिशन ऑफ द न्यूटेस्टामेंट; प्रे.कृ. 2:14 वरील टिप्पणी). त्यामुळे, मला पुन्हा सांगू द्या, सध्याच्या पुळपीठवर देवाच्या मूलभूत आज्ञांची अवज्ञा होतेय, सुवार्ता प्रचारच्या पद्धतीत व शैलीमध्ये भयंकर अवज्ञा होतेय. प्रेषित पौलाने हे शेवटच्या काळातील विश्वास त्यागाचे चिन्ह असे दिले आहे. तो म्हणाला, “वचनाची घोषणा कर, … कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानाची खाज जिरावी (त्यांना त्यांच्या कानास गुदगुल्या कराव्या वाटतात, NASV) म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवितील, आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येर्इल.” (IIतिमथ्य 4:2, 3).आमच्या काळात सतत “शिकविणे” चालू असायचे, परंतू “सुवार्ता सांगणे” अगदी विसरलो होतो. आम्ही सर्व शिकविणे ऐकीत होतो-कोणतीहि गरज आणि आवेशा शिवाय “शिकविणे” चालू होते! सध्याच्या सेमीनरीमध्ये हे सर्व शिकले जाते! वचना मागून वचनाचे शिक्षण, अगदी धुळीच्या रूक्षपणासारखे! कोणीहि शुभवर्तमानाचा सामना करीत नाहीत आणि कोणीहि “शिक्षणा”मुळे आलेल्या झोपेने विचलीत होत नाहीत. शेळ्या ह्या मेंढ्या बनतील हे तुम्ही “शिकवू”शकत नाही! त्यांचा पापीपणा व आळशीपणा याच्या बाहेर जाऊन त्यांना सुवार्ता सांगितली पाहिजे! “वाणी म्हणाली, घोषणा कर” (यशया 40:6). ही शुभवर्तमान गाजविण्याची खरी शैली आहे! केवळ मृत अंत:करण आणि आळशी मनाच्यांना जागे करण्यास देवाने सुवार्तेचा वापर केला! आत्म्याला जागृत करणारी सुवार्ता हे करू शकते! ब्रायन एच. एडवर्ड म्हणाले, “संजीवनाच्या सुवार्तेमध्ये सामर्थ्य व अधिकार असते जे देवाचे वचन अंत:करणास व सद्सद्विवेकबुद्धीस हातोड्यासारखे आहे. आणि हेच सध्याच्या प्रचारामध्ये नसते. संजीवनामध्ये जे प्रचार करतात ते भयभीत व घार्इत असतात.” (रिवायवल! अपीपल सॅचुरेटेड वुर्इथ गॉड, इव्हांजिकल प्रेस, 1997 आवृत्ती, पृष्ठ.103). डॉ. लॉर्इड – जोन्स हे विसाव्या शतकातील एक महान प्रचारक होते. ते म्हणाले, “प्रचार म्हणजे काय? तर्काचा भडका!…र्इश्वर विज्ञानाचा भडका. आणि जे र्इश्वर विज्ञान पेटत नसते ते चुकीचे र्इश्वरविज्ञान होय…मी म्हणतो की जो मनुष्य आवेशा विना ह्या गोष्टीवर बोलतो त्यांस पुळपीठ वरून कांहीही करण्याचा अधिकार नाही; आणि त्या कोणास तेथे प्रवेश करण्यास देऊ नये.”(प्रीचींग अँड प्रीचर, पृष्ठ. 97).
मग यशया म्हणाला, “मी घोषणा काय करू?” (यशया 40:6). एका सेमीनरीच्या प्राध्यापकाने जे सांगितले ते त्या तरूण मनुष्याने मला सांगितले. त्याने सांगितले की सहा महिन्यासाठी लागणारे उपदेश अगोदरच तयार करून ठेवावेत. असे करण्यासंबंधाचा मी निक्षून निषेध केला! जो मनुष्य अशा प्रकारे करतो तो खरा, देवाकडून आलेला उपदेश देऊ शकत नाही! हे शक्य नाही! स्पर्जन हे सर्वकाळातील महान प्रचारक आहेत. त्यानी असे कधीहि केले नाही. खरा प्रचारकाने उपदेशाची मागणी देवाकडे करावी, आणि देवाने द्यावे म्हणून वाट पाहावी. “मी काय घोषणा करावी?”प्रचार करण्यास देवाने दिलेल्या उपदेशाची मी घोषणा करावी. हिटलर सारखा प्रचार करतो असे कोणी तरी मला म्हणाले. एका अर्थाने ते बरोबर आहे. हिटलरने खोटे अगदी आवेशाने सांगितले. आम्ही सुद्धा सत्य हे मोठ्या आवेशाने सांगायला हवे! केवळ आवेशी प्रचारकच माणसांना कृति करण्यास भाग पाडतो. पवित्रशास्त्र प्रदर्शन त्यांना झोप आणते! डॉ. लॉर्इड - जोन्स म्हणाले, “सध्याची प्रचार पद्धती माणसांचे तारण करू शकणार नाही. माणसांस कांही चल विचलीत करत नाही, परंतू कुठल्याहि बदला विना, ते जेथे असतात तसेच राहतात.” हे चुकीचे आहे! त्यांनी विचलीत व्हावे!
“घोषणा कर, अशी वाणी ऐकू आली तेव्हां कोणी एक म्हणाला, काय घोषणा करू? सर्व मानवजाति गवत आहे, तिची सर्व शोभा [सुंदरता] वनांतल्या फुलांसारखी आहे…गवत सुकते; फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.” (यशया 40:6, 8).
I. प्रथम, मी आपल्या अल्पायुष्य जीवनाबद्दल घोषणा केली पाहिजे.
“घोषणा कर, अशी वाणी ऐकू आली तेव्हां कोणी एक म्हणाला, काय घोषणा करू? सर्व मानवजाति गवत आहे, तिची सर्व शोभा [सुंदरता] वनांतल्या फुलांसारखी आहे…गवत सुकते; फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.” (यशया 40:6, 8).
जीवन लगेच संपणारे आहे. हे लवकरच घडते. तारूण्य हे अनंतकाळ आहे असे वाटते-परंतू ते लवकरच निघून जाते. मी माझे आत्मचरित्र लिहीत आहे. माझा मुलगा रॉबर्ट याने ते लिहण्यास सांगितले. कांही आठवड्यात मी शाहत्तर वर्षाचा होर्इन.अगदी कांही महिन्या पूर्वी मला तरूण असल्या सारखे वाटत होते! आणि असे तुम्हांला सुद्धा वाटत असेल! उन्हाळ्यात सूर्य बाहेर येतो. गवत सुकून तपकीरी होते. फुले कोमेजतात गळून पडतात. जीवन हे क्षणभंगूर, चंचल, तात्पुरते, थोडके आणि अल्प-जीवी असे आहे. प्रेषित याकोब असे म्हणतो. तो म्हणाला,
आणि धनवानाने... आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा; कारण तो ‘गवताच्या फुलासारखा’नाहीसा होर्इल. सूर्य तीव्रतेने उगवला व त्याने ‘गवत कोमेजविले. मग त्याचे फूल गळाले,आणि त्याच्या रूपाची शोभा गेली; ह्याप्रमाणे धनवान हि आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जार्इल.” (याकोब 1:10-11).
खूप कमी लोक ते पाहतात. ते वास्तव जाणून न घेता जगामध्ये पुढे जाण्यास काम व संधी काबीज करतात- ते समजतात त्यापेक्षा त्याचा शेवट होर्इल! मी पाहिलेल्या श्रीमंता पैकी सी.टी.स्टड (1860-1931) हे एक होते. त्यांच्याकडे वारशाने खूप श्रीमंती होती, परंतू ती त्यांनी देऊन टाकली व सुवार्तिक म्हणून चीनला निघून गेले - नंतर तेथून ते संकटात असताना ते आफ्रिकेच्या ह्दयस्थानी गेले. आणि ते सी.टी.स्टड होते जे म्हणाले,
केवळ एकच जीवन,
‘ते लगेच निघून जार्इल;
ख्रिस्तासाठी जे केले असेल
तेच केवळ राहिल.
मला असं वाटतं की प्रत्येक तरूणाने सी.टी. स्टड यांच्या विषयी वाचायला हवे, आणि त्यांच्यातील एकांने तरी त्यांना आपला आदर्श बनवावे! त्यांच्या कवितेतील सत्य समजू शकला तर हे शक्य आहे!
केवळ एकच जीवन,
‘ते लगेच निघून जार्इल;
ख्रिस्तासाठी जे केले असेल
तेच केवळ राहिल.
येशू म्हणाला,
“कारण मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जिवाची नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?” (मार्क 8:36, 37).
“घोषणा कर, अशी वाणी ऐकू आली तेव्हां कोणी एक म्हणाला, काय घोषणा करू? सर्व मानवजाति गवत आहे, तिची सर्व शोभा [सुंदरता] वनांतल्या फुलांसारखी आहे…गवत सुकते; फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.” (यशया 40:6,8).
त्यामुळे मी वारंवार जीवनाच्या अल्पायुष्याबद्दल प्रचार करतो! आणि तुम्ही आपल्या जीवनाच्या अल्पायुष्याबद्दल विचार करायला हवा. पवित्रशास्त्र म्हणते, “ह्या करिता आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हांला सुज्ञ अंत:करण प्राप्त होर्इल.” (स्तोत्र 90:12).
II. दुसरे, मला पवित्र आत्म्याच्या कोमेजविण्याच्या कार्यासाठी आरोळी मारली पाहिजे.
“विदर”ह्या शब्दाचा अर्थ कोमेजणे, शुष्क होणे, आणि त्याचा ताजेपणा निघून जाणे. यशया 40:7 म्हणते,
“गवत सुकते, फूल कोमेजते; कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत.” (यशया 40:7).
स्पर्जन म्हणाले, “परमेश्वराचा आत्मा, वा¹या सारखा आहे, तुमच्या आत्म्याच्या शेतावरून तो गेला पाहिजे, आणि [तुमची] सुंदरता कोमेजलेल्या फुलांसारखी व्हावी. त्याने [तुमच्या] पापाची जाणीव करून द्यावी…यासाठी की [तुम्ही] [तुमचे] पतित झालेला स्वभाव पाहावा जे स्वत:च भ्रष्ट आहे, आणि जे देहस्वरूपात आहे ते देवाला संतोषवित नाही.’ आम्ही आमच्या स्वाभाविक दैहिक जीवनासाठी देहांताची शिक्षा द्यावी असे [आपणास वाटले पाहिजे़]…रोग्यांस वैद्याची गरज असते…जागा झालेला पापी जेव्हां देवाजवळ दयेची याचना करतो, अद्भूतपणे तो, लगोलग शांति मिळण्याची अपेक्षा करण्याऐवजी, देवाच्या क्रोधाची जाणीव होऊन आपल्या आत्म्यास दीन करतो…यासाठी की जर तुम्ही अशुध्द गोष्टी करून पहिल्यांदा दु:खीत केले असेल तर आम्हांस सर्व पापापासून शुद्ध करणा-या [ख्रिस्ताच्या रक्ताचे] मोल कधीहि कळणार नाही.” (“आत्म्याचे कोमेजविण्याचे कार्य,” पृष्ठ| 375, 376).
ते पवित्र आत्म्याचे कोमेजविण्याचे कार्य होय| हे पवित्र आत्म्याचे कोमेजविण्याचे कार्य होय जे तुमच्या खोट्या आशा शुष्क करते, जे तुम्हांस तुमच्या अंत:करणातील मृतपणा दाखवितो, जो तुमच्या मनातील सर्व आशा कोमेजवितो, आणि जो तुम्हांस केवळ ख्रिस्तामधील खरी आशा दाखवितो, जो तुम्हांस पापापासून वाचविण्यासाठी तुमच्या बदली मरण पावला. जेव्हां पवित्र आत्मा तुमचा जीव “कोमेजवितो”, तेव्हां तुम्हांस दिसेल की तुम्ही ज्यास “चांगुलपणा”म्हणता त्या केवळ घाणेरड्या चिंध्या आहेत, म्हणजे तुम्ही देवास ग्रहनीय असे कांही एककेलेले नाही; जे कांही तुम्ही केले ते तुम्हांस न्याय व नरक यांपासून वाचवू शकत नाही.
त्यामुळे देव तुम्हांस चुकीचे रूपांतरण करू देतो. तुम्हांस शांति देण्यापूर्वी तो तुम्हांस चुकीचे रूपांतरण करू देतो. याचा अर्थ असा नव्हे की तो तुम्हांस सोडून देतो. कधी हि नाही! देव चुकीच्या रूपांतरणाचा उपयोग करतो. तुम्ही आरोळी मारावी म्हणून त्याचा तो उपयोग करतो, “सर्व मनुष्यजात गवत आहेत, आणि सर्व चांगुलपणा हा शेतातील फुलासारखा आहे.” तुम्ही करीत असलेल्या चुकीच्या आशा किंवा तुम्ही स्वत:स वाचविण्यासाठी सांगत असलेल्या गोष्टी, देव कोमेजवित आहे. जॉन न्यूटन म्हणाले,
मला वाटते माझ्यावर थोडी मर्जी व्हावी,
एकदा तरी त्याने माझ्या विनंतीस मान्यता द्यावी,
आणि त्याच्या प्रेमळ सामर्थ्याच्या बळावर माझ्या पापाचा
ताबा घ्या वाव मला विसावा द्यावा.
त्या ऐवजी तो, माझ्या अंत:करणात दडलेल्या
दुष्ट गोष्टींची जाणीव करून देतो;
आणि माझ्या जीवातील प्रत्येक अंगावर क्रोधीत
नरकाच्या सामर्थ्याने हल्ला करितो.
अयकोला विचारा ! डॉनीला विचारा! जॉन कॅगनला विचारा! मला विचारा! आम्ही सर्वजन देवाने आम्हांला विसावा द्यावा म्हणून आरोळी मारतो-परंतू त्या ऐवजी तो आम्हांस शीला नगान सारखी जाणीव करून देतो. ती म्हणाली, “मला माझी घृणा वाटते.” दुसरी मुलगी म्हणाली, “मी माझ्याविषयी खूप निराश आहे.” डॉ.कॅगन आणि मी तिला सांगितले की तुला याहून अधिक “निराशा” वाटली पाहिजे. शीला सारखी, तुला सुद्धा “घृणा”वाटली पाहिजे. जोवर तुला स्वत:ची अगदीच घृणा वाटणार नाही, तोवर तुला कोमेजलेपणाचा अनुभव येणार नाही, ज्याचा संपूर्ण पालट झाला आहे अशांमध्ये आंतरिक हरविलेपणा हा सामान्य आहे.
“कोमेजणे”हा शब्द खूप महत्वाचा आहे. तुम्ही काय समजून घ्यायला हवे, तुम्हांस काय होते हे तुम्हांला समजावयास हवे. शब्द “कोमेजणे”म्हणजे “लाजवाटणे…शुष्कहोणे (पाण्या प्रमाणे)…लाज वाटणे, खेद वाटणे, आणि “कोमेजून जाणे” (भक्कम # 300).
“गवत सुकते, फूल कोमेजते; कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत. ”(यशया 40:7).
हेच तुमच्या अंत:करणात व्हायला हवे. पवित्र आत्म्याने तुमचा आत्मविश्वास कोमेजविला व शुष्क केला पाहिजे. जोवर तुमच्या अंत:करणाचा ताजेपणा फुलासारखा कोमेजत नाही-जोवर तुमच्या भ्रष्ट स्वभावाचा तुम्हांस खेद व लाज वाटत नाही. जशी शीला तिच्या रूपांतरणाच्या पूर्वी म्हणाली, “मला माझी घृणा वाटते.” हे खरे रूपांतरण आहे.
“गवत सुकते, फूल कोमेजते; कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत. ”(यशया 40:7).
जेव्हां तुम्हांला स्वत:ची घृणा वाटेल, तेव्हां आम्ही तुम्हांला सांगतो की येशूवर विश्वास ठेवा. तो त्याच्या रक्ताने तुम्हांस तुमच्या पापापासून शुद्ध करील, आणि देवाच्या न्याया पासून तुम्हांस वाचविल.
महान सुवार्तिक जॉर्ज व्हिटफिल्ड म्हणाले, “येशूवर तुमचा विश्वास नाही हे देवाने तुम्हांस कधी दाखविले काय? ‘प्रभू, तुझ्यावर विसंबून राहण्यास साहाय्य कर’अशी तुम्ही कधी प्रार्थना केली काय? ख्रिस्ताकडे येण्याच्या तुमच्या दुर्बलतेची, देवाने तुम्हांस जाणीव केली काय, आणि ख्रिस्तामध्ये विश्वासासाठी प्रार्थनेत आक्रोश केला काय? केला नसेल तर, तुमच्या अंत:करणात शांति मिळणार नाही. देव तुम्हांस ख्र्रिस्तामध्ये चांगली शांति देवो, तुम्ही मरण्यापूर्वी आणि नंतर पुन्हां संधी नाही” (“कृपेची पद्धत”).तुमचे खरे रूपांतरण होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पापाशी जोरदार झगडणे अनुभवले पाहिजे. गेथशेमाने बागेत तुमचे पाप ख्रिस्तावर लादल्यावर त्याला जसे वाटले तसे तुम्हांला वाटले पाहिजे. आरोळी मारल्यावर त्याला जे वाटले ते तुम्हांला वाटले पाहिजे, “ ‘माझा जीव’मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’…हे माझ्या बापा, होर्इल, तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो” (मत्तय 26:38, 39).
कृपया उभे राहून गीत क्रं. 10 “हे पापी,तूं इकडे ये.” हे गाऊ या.
हे पापी, दीन व दबलेले, दुर्बळ व घायाळ, आजारी व पीडीत तूं इकडे ये;
संपूर्ण दया, प्रीति आणि सामर्थ्याने युक्त, येशू तुला वाचविण्यास उभा आहे:
तो समर्थ, तो समर्थ, त्याची इच्छा आहे, यात शंकानाही;
तो समर्थ, तो समर्थ, त्याची इच्छा आहे, यात शंका नाही.
हे थकलेले, ओझ्यानी वाकलेले, दु:खीत व पतन होऊन तुटलेले तूं इकडे ये;
चांगले होण्याची वाट पाहाल तर, तूं कधीहि येणार नाहीस:
धार्मिकांना नाही, धार्मिकांनाही, पाप्यांना येशू बोलावितो;
धार्मिकांना नाही, धार्मिकांना नाही, पाप्यांना येशू बोलावितो.
तारक पाहा, आता वर गेला आहे, त्याच्या रक्तास आर्जव करा;
त्याच्यावर संपूर्णपणे झोकून द्या, दुस-या विश्वासास थारा देऊ नका;
दुसरे कोणी नाही, दुसरे कोणी नाही, परंतू येशूच निराधार पाप्यांचे भले करू शकतो.
दुसरे कोणी नाही, दुसरे कोणी नाही, परंतू येशूच निराधार पाप्यांचे भले करू शकतो.
(“हे पापी,तूं इकडे ये.” द्वारा जोसेफ हार्ट,1712-1768; पाळकानी पुर्नरचना केली).
(“Come, Ye Sinners” by Joseph Hart, 1712-1768; altered by the Pastor).
रूपांतरण होऊ इच्छिणा-याचे शब्द ऐका. एका तरूण व्यक्तीची साक्ष पाहा.
मी स्वत:स वाचविण्याचा मार्ग शोधीत होतो. मी गर्वाने भरून गेलो होतो, एवढा गर्व की स्वत:स गर्विष्ट म्हणूनच सांगे. येशूवर विश्वास ठेवणार याविषयी देवाशी सुद्धा वाद घातला हे मला आठवते…मी पवित्रशास्त्र वाचायला सुरूवात केली, “सराव”व्हावा म्हणून दररोज प्रार्थना करी, मंडळीच्या कार्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेर्इ. परंतू मला आंतरिक शांति लाभली नाही. कुठेतरी खोलवर, मला माहित आहे मी अजून हरविलेला परंतू सामना करण्यास गर्विष्ट व भ्याड सुद्धा आहे. मी पापी आहे ह्या विचारापासून स्वत:स लपवित आहे. हा विचार दूर लोटण्यासाठी, स्वत:स विचलित होऊन देण्यासाठी हरेक गोष्ट मी केली. माझा विश्वास खरा ठरविण्यास, तसेच माझ्या पापी स्वभावापासून बरे वाटण्यासाठी मी कारणे शोधली. आणि मग देवाने आकाश उघडले व खाली संजीवन आणले, आणि पुन्हा एकदा, मला वाचविण्यास येशूची गरज आहे हे सांगण्यास माझा गर्व मोठा होता…याक्षणी, मी मानसिकरित्या खचून गेलो होता. मी काय करतो याने कांही फरक पडत नाही मी हे पाहायला सुरू केली, माझे पाप येशूवर विश्वास ठेवल्याने, माझे पाप स्वत: धार्मिक असल्याने, माझ्या पापापासून मी स्वत:स वाचवू शकत नाही. येशूवर विश्वास ठेवण्यासाठी मी स्वत:मध्ये धडपडत होतो परंतू माझा गर्व मला करू देत नव्हता…सर्व आशा मी सोडून दिली, मी माझ्यावर सोडून दिले. मला वाटले माझे सर्व पाप माझ्या विचारांवर, माझ्या सर्व जाणीवांवर लादले आहे. जीवंत असण्याने मला आजारी वाटू लागले. त्या क्षणाला, चमत्कार घडला,येशू माझ्याजवळ आला, आणि जीवनात पहिल्यांदा मी येशूवर विश्वास ठेवला. मी येशूकडे येण्याच्या प्रयत्न करीत होतो परंतू येत नव्हतो, माझे कधीहि तारण होणार नाही असे वाटत असताना माझ्याकडे येशू आला. जेव्हां येशू माझ्याकडे आला, तेव्हां त्याच्यावर विश्वास ठेवणे सोपे झाले…येशूने माझा स्विकार केला आणि मला त्याने त्याच्या रक्ताने धुतले…माझ्यातील सर्व चांगुलपणा हा येशूने माझे तारण केल्यामुळे आहे. मी जेव्हां येशूचा विचार करतो तेव्हां मला माझे अश्रू आवरत नाहीत, आनंदाचे अश्रू, त्याने जे माझ्यासाठी केले त्याच्या उपकाराचे अश्रू ते असतात. मी त्याच्या एवढी पुरेशी प्रीति करू शकत नाही, पुरेसा धव्यवाद देऊ शकत नाही. जे सर्वोत्तम ते सर्व म्हणजे, माझे जीवन मी येशूला, माझ्या तारकाला देऊ शकतो.
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
हे एकेरी गीत मि.बेंजमिन किनकैड गिफीथ यानी उपदेशापूवी गायले :
“कम, होलीस्पीरिट, हेवन्ली डव” (द्वारा आयजक वॅटस्, 1674-1748; चाल “ओ सेट ओपन अन टूमी”).
“Come, Holy Spirit, Heavenly Dove” (by Dr. Isaac Watts, 1674-1748; to the tune of “O Set Ye Open Unto Me”).
रुपरेषा परमेश्वराच्या आत्म्याचे कोमेजविण्याचे कार्य THE WITHERING WORK OF GOD’S SPIRIT डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि.यांच्याद्वारा “घोषणा कर, अशी वाणी ऐकू आली तेव्हां कोणी एक म्हणाला, काय घोषणा करू? सर्व मानवजाति गवत आहे, तिची सर्व शोभा वनांतल्या फुलांसारखी आहे; गवत सुकते, फूल कोमेजते; कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत. गवत सुकते; फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते” (यशया 40:6-8). (यशया 40:5; 58:1; 40:3; योहान1:23; योहान7:28,37; प्रे.कृ.2:14; II तिमथ्य4:2,3)
I. प्रथम, मी आपल्या अल्पायुष्याबद्दल घोषणा केली पाहिजे, यशया 40:6; II. दुसरे, मला पवित्र आत्म्याच्या कोमेजविण्याच्या कार्यासाठी आरोळी मारली पाहिजे, यशया 40:7; मत्तय 26:38, 39. |