संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
“कृपेची पद्धत” जॉर्ज व्हिटफिल्ड यांच्याद्वारा,
|
प्रस्तावना: जॉर्ज व्हिटफिल्ड हे इंग्लंडमधील ग्लुसेस्टर येथे 1714 मध्ये जन्मले होते. तो एका खानावळीच्या मालकाचा मुलगा होता. अशाप्रकारच्या वातावरणात लहानपणी त्यांच्यावर ख्रिस्तीपणाचा प्रभाव खूप कमी होता, परंतू शाळेत त्यांची असाधारण बुद्धीमत्ता होती. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले तेथे जॉन व चार्लस वेस्ली हे त्यांचे मित्र आणि त्यांच्या प्रार्थना व पवित्रशास्त्र अभ्यास गटामधील एक भाग बनले.
ते ऑक्सफर्ड विद्यापीठात असताना त्यांना परिवर्तनाचा अनुभव आला. त्या नंतर लगेचच त्यांना इंग्लंडच्या चर्चमध्ये दिक्षा झाली. नव्याने जन्मलेच पाहिजे यावरील त्यांच्या उपदेशामुळे मंडळ्या त्यांच्यासाठी दरवाजे बंद करु लागल्या, त्यांच्या धार्मिक पुढा-यांना राग येईल या भीतीने ऐहिक पाळक त्यांच्या नव्याने जन्मलेच पाहिजे यावरील त्यांच्या उपदेशाला घाबरु लागले. अशाप्रकारे, त्यांना मंडळीतून बाहेर पडावे लागले, मोकळ्या जागेत ते प्रचार करु लागले, त्यासाठी ते प्रसिद्ध झाले.
व्हिटफिल्ड 1738 मध्ये अमेरिकेत गेले आणि त्यांना तेथे अनाथ आश्रम भेटला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण अमेरिका वसाहत व ग्रेट ब्रिटनमध्ये प्रचार करीत व अनाथ लोकांसाठी देणग्या गोळा करीत प्रवास केला. त्यांनी स्पेन, हॉलंड, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड या देशांमधून प्रवास केला आणि अमेरिकेमध्ये प्रचार करण्यासाठी अटलांटिकमधून तेरा फे-या त्यांनी केल्या.
बेंजामिन फॅंकलीन, जॉनाथन एडवर्ड आणि जॉन वेस्ली यांचे ते जवळचे मित्र होते आणि मोकळ्या जागेत ते जसा प्रचार करायचे तसा, प्रचार करण्यासाठी त्यांनी जॉन वेस्ली यांचे मन वळविले. बेंजामिन फॅंकलीन यांनी सांगितले की व्हिटफिल्ड हे तीस हजार लोकांच्या समुहांशी बोलले. त्यांच्या मोकळ्या जागेतील सभांस नेहमी 25,000 वर श्रोते हजर असत. ते एकदा स्कॉटलंडमधील ग्लासगोवजवळ प्रचार करीत होते तेव्हां तेथे 100,000 वर लोक जमले होते – अशा काळात जेव्हां माइक्रोफोन नव्हता! त्या सभेत दहा हजार कथीत लोकांचा पालट झाला.
पुष्कळ इतिहासकारांनी त्यांना सर्वकाळचे महान इंग्रजी बोलणारे सुवार्तिक असे समजले. बिली ग्रॅहम हे जरी इलेक्ट्रॉनिक माइक्रोफोनच्या साहाय्याने अधिक लोकांशी बोलले असले तरी, व्हिटफिल्ड यांचा संस्कृतीवरील प्रभाव हा वादातीत मोठा आहे.
व्हिटफिल्ड हे पहिले महान प्रबोधनकार म्हणून त्यांचे मोठे आकडे आहेत, 18 व्या शतकाच्या मध्यातील मोठ्या संजीवनामुळे अमेरिकेचा चेहरामोहरा बदलून गेला. त्यांनी जेव्हां प्रचार केला तेव्हां आमच्या देशातील वसाहती संजीवनाने पेटून उठल्या. 1740 मध्ये न्यू इंग्लंडचा व्हिटफिल्ड यांनी सहा आठवड्याचा दौरा केला तेव्हां ह्या संजीवनाची अत्युच्य पातळी गाठली. केवळ पंचेचाळीस दिवसात दहा हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या एकशे पंच्याहत्तर सभामध्ये उपदेश दिले, आध्यात्मिक गोंगाटाने तो प्रदेश भरला, अमेरिकन ख्रिस्ती इतिहासातील हा सर्वात उल्लेखलीय कालखंड आहे.
त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी सन्मान मिळविला आणि संपूर्ण इंग्रजी – बोलणा-या जगताचा लक्ष वेधून घेतले. प्रिन्सेटोन विद्यापीठ, डार्टमाउथ कॉलेज, आणि पेन्नसिल्वनिया विद्यापीठ स्थापण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. अमेरिकन क्रांतीच्या सहा वर्षापूर्वी 1770 मध्ये, न्यूबरीपोर्ट, मसाच्युसेट येथील प्रचारानंतर ते लगेचच मरण पावले. जॉर्ज वॉशिंग्टन हे आमच्या देशाचे पितामह होते, परंतू जॉर्ज व्हिटफिल्ड हे आजोबा होते.
व्हिटफिल्ड यांनी खालील उपदेश आधुनिक इंग्रजीमध्ये दिला आहे. हा त्यांचा मूळ उपदेश आहे, परंतू आपल्या काळात समजण्यासाठी मी त्यात बदल केला आहे.
“शांतीचे नाव नसता शांति शांति असे म्हणून माझ्या लोकांचा घाय़ ते वरवर बरा करितात” (यिर्मया 6:14).
उपदेश: देशासाठी चांगला व विश्वासू सुवार्तिक देवाने पाठविणे हा सर्वात मोठा आशिर्वाद आहे. परंतू जे केवळ पैशासाठी मंडळ्या चालवितात अशा हरविलेले प्रचारक देशासाठी देवाने पाठविणे हा सर्वात मोठा शाप आहे. तरीहि प्रत्येक युगात खोटे प्रचारक असतात जे शांत करणारे उपदेश देतात. अशाप्रकारच्या पुष्कळ सेवा आहेत ज्या भ्रष्ट आहेत आणि लोकांना फसविण्यासाठी पवित्रशास्त्र बदलून सांगतात.
अशाचप्रकारची स्थिती यिर्मयाच्या काळात होती. आणि यिर्मया हा देवाचा विश्वासू आज्ञाधारक म्हणून त्याने त्यांचा विरोध केला. त्याने आपले मुख उघडले व ऐहिक प्रचारका विरुद्ध बोलला. तुम्ही त्याचे पुस्तक वाचले तर, यिर्मया पेक्षा खोट्या प्रचारकाविरोधात बोलणारा कोणी नाही हे कळून येईल. ह्या अध्यायात तो त्यांच्या विरोधात कठोरपणे बोलला जो आपल्या उता-यात आहे.
“शांतीचे नाव नसता शांति शांति असे म्हणून माझ्या लोकांचा घाय़ ते वरवर बरा करितात” (यिर्मया 6:14).
यिर्मया म्हणाला ते केवळ पैशासाठी प्रचार करतात. तेराव्या वचनात, यिर्मया म्हणाला,
“कारण लहानथोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत; संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात” (यिर्मया 6:13).
ते स्वार्थी आहेत व खोटा प्रचार करतात.
आपल्या उता-यात, यिर्मया एक मार्ग दाखवितो जो ते खोटा प्रचार करतात. संदेष्टा फसवा मार्ग दाखवितो ज्यात ते हरविलेले आत्मे हाताळतात:
“शांतीचे नाव नसता शांति शांति असे म्हणून माझ्या लोकांचा घाय़ ते वरवर बरा करितात” (यिर्मया 6:14).
येणा-या युद्धाविषयी लोकांना इशारा देण्यास देवाने यिर्मयास सांगितले. येणा-या युद्धामुळे - त्यांची घरे उध्वस्त होणार हे देवाला सांगावयाचे होते. (पहा यिर्मया 6:11-12).
यिर्मयाने घाबरणारा संदेश दिला. त्यामुळे पुष्कळ लोक घाबरायला आणि पश्चाताप करायला हवे होते. परंतू ऐहिक वृत्तीचे संदेष्ट्ये व याजकांनी चुकीचा दिलासा दिला. यिर्मया हा जंगली धर्मवेडा आहे असे ते म्हणाले. युद्ध होणार नाही असे ते म्हणाले. जेथे यिर्मया शांति नसणार असे सांगत होता, तेथे त्यांनी लोकांना शांति असणार असे सांगितले.
“शांतीचे नाव नसता शांति शांति असे म्हणून माझ्या लोकांचा घाय़ ते वरवर बरा करितात” (यिर्मया 6:14).
उता-यातील शब्द हे बाहेरील शांति संदर्भित करते. परंतू त्याचा पुढचा संदर्भ हा जीवासंबंधी आहे. माझा देखील विश्वास आहे की खोटे संदेष्ट्यें लोकांना त्यांचा नवा जन्म झाला नसला तरी, ते चांगले आहेत असे सांगतात. परिवर्तन न झालेल्या लोकांना असा प्रचार आवडतो. मानवी अंत:करण हे सर्वात दुष्ट व कपटी आहे. मानवी अंत:करण किती भयंकर आहे हे देवाला चांगले ठाऊक आहे.
खरेतर खरी शांति नसतांना, तुमच्यातील पुष्कळ देवासह आम्हांला शांति आहे असे म्हणतात! तुमच्यापैकी कित्येकजनांना वाटते की तुम्ही ख्रिस्ती आहात, परंतू तुम्ही नसता. तो सैतान आहे ज्याने तुम्हांस शांति दिली आहे. देवाने तुम्हांस “शांति” दिली नाही. ती शांति नव्हे जी मानवी समज दुस-याला देते. तुमच्या जवळ असलेली ती खोटी शांति आहे.
तुम्हास देवासह खरी शांति आहे किंवा नाही हे समजणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येकांस शांति हवी आहे. शांति असणे हा मोठा आशिवार्द आहे. म्हणून देवासह खरी शांति कशी मिळवावी हे मला तुम्हांस सांगावयाचे आहे. तुमच्या रक्तापासून मला मोकळे व्हायचे आहे. मला तुम्हांला देवाचे संपूर्ण मार्गदर्शन जाहिर करायचे आहे. तुमच्या बाबतीत काय घडले पाहिजे, आणि देवासह तुम्हांस शांति मिळण्यास तुमच्यात काय बदल झाला पाहिजे हे ह्या उता-यातून, तुम्हांला मला हे दाखवायचे आहे.
I. प्रथम, तुमच्याजवळ देवासह शांति हवी, तुम्ही देवाच्या नियमशास्त्राविरुद्ध केलेले पाप तुम्हांस जाणवलेले, आणि पापाबद्दल खेद होऊन रडलेले तुम्ही दिसले पाहिजे.
पवित्रशास्त्र सांगते, “जो जिवात्मा पाप करितो, तो मरेल” (यहेज्केल 18:4). देवाच्या नियमशास्त्रात लिहलेल्या सर्व गोष्टी जो सतत करीत नाही तो प्रत्येक व्यक्ति शापित आहे.
केवळ कांही गोष्टी नव्हे, तर तुम्ही सर्व गोष्टी केल्या पाहिजेत अन्यथा तुम्ही शापित आहांत:
“कारण शास्त्रात असे लिहले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहलेले आहे ते सर्व आचरण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे’” (गलती 3:10).
देवाचा कोणताहि नियम मोडणे, मग तो विचाराने, किंवा शब्दाने, किंवा कृतीने जरी असला तरी तो तुम्हांस सार्वकालिक दंडास पात्र करतो. आणि मग एखादा दुष्ट विचार, एखादा दुष्ट शब्द, एखादे दुष्कृत्य सुद्धा सार्वकालिक दंडास पात्र ठरविते, नरकापासून तुम्ही कसे वाचू शकता? तुमच्या अंत:करणात खरी शांति मिळण्यापूर्वी, देवाच्या नियमशास्त्राविरुद्ध केलेले पाप किती भयंकर आहे हे तुम्हांस दिसले पाहिजे.
आपल्या अंत:करणाचे परिक्षण करा. मला तुम्हांस एक गोष्ट विचारु द्या — तुमचे पाप आठवल्यानंतर तुम्हांस वेदना होतात अशी वेळ येते का? तुमच्या पापाचे ओझे तुम्हांस पेलवत नाही अशी वेळ येते का? तुम्ही खरोखर देवाच्या नियमशास्त्राविरुद्ध पाप केले आहे, त्यामुळे देवाचा क्रोध तुमच्यावर बरोबर आला आहे असे तुम्ही कधी पाहिले आहे का? तुमच्या पापाबद्दल अंत:करणातून तुम्ही कधी क्षमा मागितली का? “माझ्या पापाचे भयंकर ओझे मला पेलवत नाही,” तुम्ही असे कधी म्हणालात काय? अशाप्रकारचा अनुभव तुम्ही कधी घेतला काय? जर नाही, तर तुम्ही स्वत:स ख्रिस्ती म्हणवून घेऊ नका! तुम्ही म्हणत असाल देवासह तुम्हांस शांति आहे, परंतू तुम्हांस खरी शांति नाही. देव तुम्हांला जागृत करो! देव तुमचे परिवर्तन करो!
II. दुसरे, देवासह तुम्हांस शांति मिळण्यापूर्वी, पापाची खोल खातरी व्हायला हवी; तुमच्या पापी स्वभावाची, मनाच्या दुष्टपणाची खातरी झाली पाहिजे.
तुम्हांस तुमच्या वास्तविक पापाची खातरी झाली पाहिजे. त्याला तुम्ही थरथर कापले पाहिजे. परंतू पापाची खोलवर जाणीव झाली पाहिजे. देवाच्या नियमशास्त्राचा तुम्ही भंग केल्याची जाणीव व्हायला हवी. याहून अधिक, तुमच्या अंत:करणातील मूळचे, जन्मजात पाप जे तुम्हांस नरकात नेते, त्याची जाणीव व्हायला हवी.
विचारवंत अशा ब-याच लोकांना वाटते अशाप्रकारचे मूळचे कोणते पाप नाही. वारसाने आदामाच्या पापामुळे त्यांना नरकात पाठवून देव त्यांच्याशी अन्यायी वागतो असे त्यांना वाटते. ते म्हणतात आम्ही पापात जन्मलो नाही. ते म्हणतात नव्याने जन्म घेण्याची गरज नाही.तरीहि तुमच्या भोवतालच्या जगाकडे पाहा. देवाने मानवाला देऊ केलेला हा सुखलोक आहे का? नाही! जगातील सर्वकांही नियमबाह्य आहे! कारण मानवी वंशाबरोबर कांहीतरी चकीचे घडतेय. ते मूळचे पाप आहे ज्याने जगाला नष्ट केले.
कांही हरकत नाही कितीहि मोठ्याने नाकारा, जेव्हां तुम्ही जागे व्हाल, तेव्हां तुमच्या जीवनात दुष्ट अंत:करणातून आलेले पाप — मूळच्या पापाने विष बाधीत झालेले अंत:करण पाहाल.
अपरिवर्तित व्यक्ति जागी होईल तेव्हां त्याला आश्चर्य वाटू लागेल, “मी एवढा दुष्ट कसा झालो?” मग देवाचा आत्मा दाखवितो की त्याच्या स्वभावात चांगले कांहीच नाही. मग तो पाहतो की तो पूर्णत: पापी आहे. मग ती व्यक्ति शेवटी पाहते की त्याला दंड देणारा देव बरोबर आहे. जो भयंकर विष बाधीत आणि स्वभावत: बंडखोर आहे त्यामुळे देव दंडीत करणारा देव बरोबर आहे हे पाहतात, त्याच्या संपूर्ण जीवनात एखादे बाह्यत्कारी पाप केले नसले तरी.
तुम्ही हे कधी अनुभवले का? देवाने तुम्हांस दंडीत केले हे बरोबर आणि न्यायीपणाचे आहे — असे तुम्हांस कधी वाटले का? तुम्ही तुमच्या स्वभावामुळे क्रोधाचे मुल झाले आहात यासंबधाने तुम्ही सहमत आहात का? (इफिस 2:3).
खरेच तुम्ही नव्याने जन्मले आहात तर, हे तुम्हांस जाणवले का. तुम्हांस मूळ पापाचे ओझे कधी जाणवले नाही, तर तुम्ही स्वत:ला ख्रिस्ती म्हणवून घेऊ नका! खरे परिवर्तन झालेल्यांसाठी मूळ पाप हे मोठे ओझे आहे. ज्या व्यक्तीचा ख-या रितीने नवा जन्म झाला आहे त्याला त्याचे मूळ पाप आणि दुष्ट स्वभावाबद्दल खेद वाटतो. खरे परिवर्तन झालेला म्हणतो, “किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहातून कोण सोडवील?” (संद. रोम 7:24). हे ते आहे जे जागृत व्यक्तीस जास्त त्रासदायक होते — त्याचे आंतरिक पापी ह्दय. तुमच्या स्वभावातील आंतरिक पापाविषयी तुम्ही कधीच जागृत झाला नाही तर, तुमच्या अंत:करणात खरी शांति मिळण्याचा कोणताच मार्ग नाही.
III. तिसरे, देवासह तुम्हांस शांति मिळण्यापूर्वी, तुमच्या जीवनातील पाप, आणि स्वभावातील पाप यामुळे केवळ त्रास होऊन चालणार नाही, परंतू आपला सर्वोत्तम निर्णय, वचनबद्धता आणि तथाकथित “ख्रिस्ती जीवन” यातील पापाबद्दल सुद्धा त्रास झाला पाहिजे.
माझ्या मित्रा, तुझ्या धर्मात काय आहे जे देवाला आवडेल? तुझ्या स्वभावानेच तू अधार्मिक आणि अपरिवर्तित असा आहे. तुझ्या बाह्य पापामुळे तू दहापट नरकातील दंडास पात्र आहेस. तुमचा धार्मिक विश्वास तुम्हांस कसा हितकारक होईल? तुमचे परिवर्तन झाल्याखेरीज तुम्ही चांगल्या गोष्टी करु शकत नाही.
“जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करिता येत नाही” (रोम 8:8).
परिवर्तन न झालेल्या व्यक्तीस देवाच्या गौरवासाठी कांहीतरी करणे अशक्य आहे.
आपल्या परिवर्तनानंतर, सुद्धा आपण केवळ अंशत: नवीन आहोत. आंतरिक वसणारे पाप कायम आपल्यात आहे. अजूनहि आपल्या प्रत्येकाच्या कर्तव्यात भ्रष्टाचाराची भेसळ आहे. म्हणून, आपले परिवर्तन झाल्यानंतर, जर येशू आपणांस आपल्या “सत्कर्माने” स्विकार करील, तर आपले कर्म आपणांस दंडीत करणार. आपल्यात पाप, स्वार्थीपणा, आळस, नैतिक कमतरता असल्याखेरीज आपण प्रार्थनाहि करु शकत नाही. तुम्हा काय विचार करिता हे मला ठाऊक नाही, परंतू मी पाप केल्याशिवाय प्रार्थना करु शकत नाही. मी पाप केल्याशिवाय तुम्हाला प्रचार करु शकत नाही. पापाशिवाय मी कांहीहि करु शकत नाही. माझ्या पापास पश्चाताप करण्याची गरज आहे, आणि माझे अश्रू माझा उद्धारक, येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने धुतले पाहिजेत!
आपला सर्वोत्तम निश्चय, आपले सर्वोत्तम कर्तव्य, आपला सर्वोत्तम धर्म, आपला सर्वोत्तम निर्णय, हे केवळ पुष्कळ पाप असे आहे. आपले धार्मिक कर्तव्य हे संपूर्णत: पापमय असे आहे. तुमच्या अंत:करणात शांति येण्यापूर्वी केवळ तुमच्या मूळ पाप आणि बाह्या पाप याबद्दल आजारी असू नये तर, तुमचे स्वत:चे नीतिमत्व, कर्तव्ये आणि धार्मिकता याविषयी सुद्धा आजारी असले पाहिजे. तुमच्या स्वत:च्या — धार्मिकपणातून बाहेर येण्यापूर्वी तुम्हांस पापाची खोल जाणीव व्हायला हवी. तुम्ही स्वत:हून नीतिमत्व मिळवू शकत नाही, याची जाणीव तुम्हांस होत नाही, तोवर तुम्ही येशू ख्रिस्ताद्वारे तारले जात नाही. तुमचे अजूनहि परिवर्तन झालेले नाही.
कोणीतरी असे म्हणेल, “ठिक, मी या सर्वावर विश्वास ठेवतो.” परंतू “विश्वास धरणे” आणि “जाणवणे” यामध्ये मोठी तफावत आहे. तुम्हांस कधी येशूची कमतरता भासली का? तुम्ही स्वत: चांगुलपणा मिळवू शकत नाही म्हणून तुम्हांला ख्रिस्ताची गरज आहे हे जाणवले का? आणि तुम्ही म्हणता काय, “प्रभू, मी करु शकणा-या सर्वोत्तम धार्मिक कार्यासाठी तूं मला दंडीत करु शकतो.” याप्रमाणे तुम्ही स्वत:स बाहेर काढले नाही तर, तुम्हांस देवासह खरी शांति असणार नाही.
IV. चौथे, देवासह तुम्हांस शांति मिळण्यापूर्वी, असे एक विशिष्ट पाप आहे ज्याचा तुम्हांला भयंकर त्रास होतोय. आणि तरीहि मला भिती वाटते तुमच्यातील कांहीजण त्याचा विचार करतील. जगातील हे सर्वात दंडनीय पाप आहे, आणि तरीहि जग त्याला पाप समजत नाहीत. तुम्ही विचारा, “ते कोणते पाप आहे?” ते असे पाप आहे त्यासंबंधाने तुम्ही दोषी समजत नाही — आणि ते अविश्वासाचे पाप आहे.
तुम्हांस शांति मिळण्यापूर्वी, तुमच्या अंत:करणातील अविश्वासामुळे तुम्हांस त्रास व्हायला हवा, म्हणजे तुम्ही खरेपणाने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही.
मी अंत:करणपूर्वक आपणास आवाहन करितो. मला भिती वाटते की तुमचा येशू ख्रिस्तावरील विश्वास हा सैतानापेक्षा जास्त नाही. मला वाटते सैतान पवित्रशास्त्रावर तुमच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवतो. तो येशू ख्रिस्ताच्या देवत्वावर विश्वास ठेवतो. तो विश्वास ठेवतो व थरथर कापतो. जे स्वत:ला ख्रिस्ती म्हणवितात अशा हजारांपेक्षा जास्त थरथर कापतो.
तुम्हाला वाटते तुम्ही विश्वास ठेवता कारण तुम्ही पवित्रशास्त्रावर विश्वास ठेवता, किंवा तुम्ही मंडळीत जाता. ख्रिस्तातील ख-या विश्वासावाचून सुद्धा हे तुम्ही करु शकता. ख्रिस्तासारख्या व्यक्तीवर केवळ विश्वास ठेवल्याने तुमचे भले होणार नाही, त्यापेक्षा विश्वास ठेवण्यास कैसर किंवा अलेक्झान्डर द ग्रेट अशा व्यक्ति आहेत. पवित्रशास्त्र देवाचा शब्द आहे. आम्ही त्यासाठी आभार मानतो. परंतू तुम्ही विश्वास ठेऊ शकता, आणि तरीहि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही.
जर मी तुम्हांस विचारले की तुम्ही कधीपासून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहात, तुम्हांपैकी पुष्कळ म्हणतील आम्ही त्याच्यावर नेहमीच विश्वास ठेवतो. अजून कधीहि तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही याचा ठोस पुरावा तुम्ही देऊ शकणार नाही. जे ख-याने ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना ठाऊक आहे अशी वेळ येते तेव्हां ते विश्वास ठेवत नाही.
यावर मला अधिक बोलले पाहिजे, कारण हा सर्वात फसवा भ्रम आहे. त्यानी अगोदरच विश्वास ठेवला आहे असे त्यांना वाटते — पुष्कळजण यातच चालतात. एका माणसाने सांगितले की त्याने दहा आज्ञेच्या प्रमाणे त्याने आपल्या पापाची यादी केली, आणि मग पाळकाकडे आला व म्हणाला आम्हांला शांति का मिळत नाही. सेवकांने त्याच्या यादीकडे पाहिले व ते म्हणाले, “अरे! अविश्वासाचे पाप या यादीमध्ये मला दिसत नाही.” जो तुमचा विश्वास नाही त्या — तुमच्या अविश्वासाच्या पापाची जाणीव करणे हे देवाच्या आत्म्याचे कार्य आहे. पवित्र आत्म्यासंबंधी येशू ख्रिस्त म्हणाला:
“तो येऊन पापाविषयी...खातरी करील; ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत ह्यावरुन पापाविषयी” (योहान 16:8-9).
आता, माझ्या प्रिय मित्रानो, येशूवर तुमचा खरा विश्वास नाही हे देव तुम्हांस कधी दाखविल काय? विश्वासहीन कठीण अंत:करणासाठी तुम्ही कधी दु:ख केले आहे का? तुम्ही अशी कधी प्रार्थना केली काय, “प्रभू, ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास मला सहाय्य कर?” ख्रिस्ताकडे येण्याच्या तुमच्या असमर्थतची देवाने जाणीव करुन दिली काय, आणि ख्रिस्तातील विश्वासाकरिता तुम्हास कधी रडण्यास भाग पाडले काय? जर नाही, तर तुमच्या अंत:करणात शांति मिळणार नाही. मरण येणे व दुसरी संधी मिळण्यापूर्वी, देव तुम्हांस जागृत करो, आणि येशूवरील विश्वासाने तुम्हांला शांति लाभो.
V. पाचवे, देवासह तुम्हांस शांति मिळण्यापूर्वी, तुम्ही पूर्णत: ख्रिस्ताच्या नीतिमत्वावर विश्वास ठेवला पाहिजे.
केवळ तुम्हांस तुमचे खरे आणि मूळचे पाप, तुमच्या स्वत:च्या नीतिमत्वाचे पाप, आणि अविश्वासाचे पाप, यांची जाणीव होऊन चालणार नाही, परंतू प्रभू येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण नीतिमत्वतेवर विश्वास ठेवण्यास सक्षम झाले पाहिजे. तुम्ही ख्रिस्ताचे नीतिमत्व धरुन ठेवले पाहिजे. मग तुम्हांला शांति मिळेल. येशू म्हणाला:
“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन” (मत्तय 11:28).
दुस-या कोणाला नव्हे परंतू, जे कष्टी व ओझ्याने दबलेले आहेत त्या सर्वांना हे वचन उत्तेजन देते. तरीहि हे विसाव्याचे अभिवचन अशांसाठी आहे जे येशू ख्रिस्ताकडे येतात व विश्वास ठेवतात. देवासह तुम्हांस शांति मिळण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तुम्ही नीतिमान ठरविले पाहिजे. तुम्हांमध्ये स्वत: ख्रिस्त असला पाहिजे, यासाठी की त्याचे नीतिमत्व ते तुमचे नीतिमत्व बनावे.
माझ्या प्रिय मित्रानो, कधी तुम्ही ख्रिस्ताशी लग्न केले काय? कधी येशू ख्रिस्ताने स्वत:स तुम्हांला दिले काय? कधी तुम्ही जिवंत विश्वासाने ख्रिस्ताकडे आला काय? मी देवाकडे प्रार्थना करितो की ख्रिस्ताने यावे आणि तुमच्याशी शांति बोलावी. एक नव्याने जन्मलेले म्हणून तुम्ही हा अनुभव घ्यावा.
आता मी दुस-या जगाचे अदृष्य वास्तव सांगत आहे, आंतरिक ख्रिस्तीपणाची, पापी लोकांच्या अंत:करणातील देवाचे कार्याचे. आता मी तुमच्यासाठी असलेल्या महत्वाच्या गोष्टीविषयी बोलत आहे. याविषयी तुम्ही जागरुक असले पाहिजे. त्यात तुमच्या जीवाची काळजी आहे. तुमचे सार्वकालिक तारण ह्यावर अवलंबून आहे.
कदाचित तुम्हांला ख्रिस्ताविना शांति लाभेल. सैतान तुम्हाला नीद्रा व खोटी सुरक्षिता देईल. तुम्हांला नरकात पाठवेपर्यंत झोपेत ठेवील. तेथे तुम्ही जागे व्हाल, परंतू ते भयंकर असेल कारण तेथे तुम्ही अग्नीत असाल तेथून तुम्ही वाचण्यासाठी खूप उशीर झालेला असेल. नरकात जिभेची तृष्णा भागविण्यासाठी अनंतकाळ आरोळी माराल, परंतू तुम्हांस कोणीहि पाणी देणार नाही.
जोवर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये विसावा घेणार नाही तोवर तुम्हांला कदाचित विसावा मिऴणार नाही! पाप्यांना तारकाकडे आणणे हा माझा उद्देश आहे. देवाने तुम्हांस येशूकडे आणावे. तुम्ही पापी आहात आणि तुम्ही तुमच्या दुष्ट मार्गापासून दूर जाण्यास पवित्र आत्मा तुमचे मन वळवो. आमेन.
जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.
हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.
उपेशापूर्वी प्रार्थना केली: मि. नोहा साँग यानी केली.
उपेशापूर्वी एकेरी गीत गायले: मि.बेंजामिन किनकैड ग्रीफ्थ:
“ओ लॉर्ड, हाऊ विले एम आय” (जॉन न्यूटन, 1725-1807).
“O Lord, How Vile Am I” (by John Newton, 1725-1807).
रुपरेषा “कृपेची पद्धत” जॉर्ज व्हिटफिल्ड यांच्याद्वारा, “THE METHOD OF GRACE” BY GEORGE WHITEFIELD, डॉ. आर. एल. हायमर्स ज्युनि. यांच्या द्वारा लिखीत आणि “शांतीचे नाव नसता शांति शांति असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करितात” (यिर्मया 6:14). (यिर्मया 6:13) I. प्रथम, तुमच्याजवळ देवासह शांति हवी, तुम्ही देवाच्या नियमशास्त्राविरुद्ध केलेले पाप तुम्हांस जाणवलेले, आणि पापाबद्दल खेद होऊन रडलेले तुम्ही दिसले पाहिजे, यहेज्केल 18:4; गलती 3:10.
II. दुसरे, देवासह तुम्हांस शांति मिळण्यापूर्वी, पापाची खोल खातरी व्हायला हवी; तुमच्या पापी स्वभावाची, मनाच्या दुष्टपणाची खातरी झाली पाहिजे,
III. तिसरे, देवासह तुम्हांस शांति मिळण्यापूर्वी, तुमच्या जीवनातील पाप, आणि स्वभावातील पाप यामुळे केवळ त्रास होऊन चालणार नाही, परंतू आपला सर्वोत्तम निर्णय, वचनबद्धता आणि तथाकथित “ख्रिस्ती जीवन” यातील पापाबद्दल सुद्धा त्रास झाला पाहिजे, रोम 8:8. IV. चौथे, देवासह तुम्हांस शांति मिळण्यापूर्वी, असे एक विशिष्ट पाप आहे ज्याचा तुम्हांला भयंकर त्रास होतोय ते येशूवरील अविश्वासाचे पाप आहे, योहान 16:8,9. V. पाचवे, देवासह तुम्हांस शांति मिळण्यापूर्वी, तुम्ही पूर्णत: ख्रिस्ताच्या नीतिमत्वावर विश्वास ठेवला पाहिजे, मत्तय 11:28. |