संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
वधस्तंभावरील येशूचे शेवटचे सात उद्गारTHE SEVEN LAST WORDS डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश “नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हां तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले” (लुक 23:33). |
येशूचा शाररिक छळ भयंकर केला होता. याची सुरुवात चाबकाच्या फटक्यानी झाली ज्यामुळे मारल्यावर चामड्याचा तुकडा निघून पडे आणि त्याच्या पाठीवर खोलवर जखमा होत होत्या. अशाप्रकारच्या चाबकाच्या फटक्यामुळे कित्येकजण मरण पावले होते. पुढे जाऊन, त्यांनी त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घातला. त्या मुकुटाचे कुचीदार काटे त्याच्या मस्तकावरील त्वचेत घुसत होते आणि त्यामुळे रक्त त्याच्या चेह-यारुन भळाभळा वाहत खाली येत होते. त्यांनी त्याच्या चेह-यावर चपटाका मारल्या, त्याच्यावर थुंकले, आणि त्यांनी त्यांच्या हातानी त्याच्या गालावरील दाढी ओढली. त्यानंतर त्यांनी त्याला यरुशलेमेच्या भर रस्त्यावरुन त्याचा वधस्तंभ वाहून वधस्तंभी देण्याची जागा कालवरी, येथपर्यंत नेण्यास भाग पाडले. शेवटी, मोठे मोठे खिळे त्याच्या पायात आणि हाताच्या खालच्या बाजूला, हाताचा तळवा व मनगट जोडले जाते तेथे मारण्यात आले. अशा प्रकारे त्याला क्रुरपणे वधस्तंभावर खिळण्यात आले. पवित्रशास्त्र म्हणतेः
“ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकीत झाले [त्याचा चेहरा मनुष्याच्या चेह-यासारखा नव्हता, त्याचे स्वरुप मनुष्यजातीच्या स्वरुपासारखे नव्हते इतका तो विरुप होता]” (यशया 52:14).
हॉलीवुड अभिनेते त्यांच्या चित्रपटांतून येशूची भूमिका साकारतांना आपणांस पाहण्याची सवय झाली झाली आहे. ह्या चलचित्र सिनेमातून त्यातील खोलवरची भिषणतः व वधस्तंभावर खिळण्याची क्रुरता पुरेशा प्रमाणात दाखविली जात नाही. येशूने प्रत्यक्षात वधस्तंभावर जे दुःख सहन केले त्याप्रमाणात जे आपण चित्रपटांतून पाहतो ते कांहीच नाही. “पॅशन ऑफ क्राईस्ट” यामध्ये सुद्धा जे आपण पाहिले ते प्रत्यक्षात त्याच्याबरोबर घडले ते मुळीच तोडीचे नव्हते. त्याचे खरोखरचे दुःख भयंकर असे होते.
त्याच्या मस्तकावर खोलवर जखमा झालेल्या होत्या. त्याचा चेहरा व मानेवरुन रक्त वाहत होते. त्याच्या डोळे अक्षरशः सुजून झाकले गेले होते. त्याचे नाक मोडले होते तसेच त्याचा जबडा सुद्धा मोडला होता. त्याचे ओठ फाटून त्यातूनही रक्त वाहत होते. त्याला ओळखणे अक्षरशः खठीण झाले होते.
सेवकाचे जे दुःखसहनाचे भविष्य यशयाने अगोदरच सांगून ठेवले होते अगदी तसे घडलेले होते. “त्याचा चेहरा मनुष्याच्या चेह-यासारखा नव्हता, त्याचे स्वरुप मनुष्यजातीच्या स्वरुपासारखे नव्हते इतका तो विरुप होता” (यशया 52:14). त्याची होणारी निंदानालस्ती व त्याच्यावर थुंकले जाणे हे देखील संदेष्ट्याने सांगून ठेवले होते: “मी मारणा-यापुढे आपली पाठ केली, केस उपट- णा-यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू ह्यापासून मी आपले तोंड चुकवले नाही” (यशया 50:6).
हे आपल्याला वधस्तंभाकडे घेऊन येते. येशूला तेथे वधस्तंभी खिळण्यात आले, थेंबथेंब रक्त वाहत होते. ज्यावेळी त्याला वधस्तंभी खिळण्यात आले तेव्हां त्याने सात उद्गार काढले. येशूचे हे वधस्तंभावरील सात उद्गार त्यावर मी अधिक विचार करु इच्छितो.
+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +
आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.
+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +
I. पहिला उद्गार — क्षमेचा.
“नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हां तेथे त्यांनी त्याला व अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. तेव्हां येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही” (लुक 23:33-34).
ह्याच कारणास्तव येशू वधस्तंभावर गेला – आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी. तो येरुशलेमेला जाण्याच्या कितीतरी पूर्वी त्याला ठाऊक होते की तो मारला जाणार होता. नवीन करार शिकवितो की तो आपल्या पापांची खडणी भरण्यासाठी मुद्दामहून स्वतःला वधस्तंभावर खिळू द्यावे म्हणून गेला.
“कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले” (I पेत्र 3:18).
“शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापाबद्दल मरण पावला” (I करिंथ 15:3).
येशू वधस्तंभावर असताना, त्यांने प्रार्थना केली, “हे बापा, त्यांना क्षमा कर,” देवाने त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. प्रत्येक व्यक्ति जो येशूवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा झालेली आहे. त्याच्या मरणाने तुमच्या पापाबद्दल खंडणी भरलेली आहे. त्याच्या रक्ताने तुमचे पाप धुतले जाते.
II. दुसरा उद्गार – तारणाचा.
त्याच्या दोन्ही बाजूला एक एक असे, दोन चोरांना वधस्तंभावर खिळले होते.
“वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी [गुन्हेगाराने] एकाने त्याची निंदा करुन म्हटले, ‘तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव.’ परंतू दुस-याने त्याचा निषेध करु म्हटले, ‘तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत; परंतू ह्याने काही अयोग्य [चुकीचे] केले नाही.’ मग तो म्हणाला, ‘अहो, येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हां माझी आठवण करा. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील” (लुक 23:39-43).
दुस-याचे चोराचे जे बोल आहेत त्यात खूप मोठे प्रकटीकरण आहे. ते दर्शविते की
1. तारण हे बाप्तिस्मा किंवा मंडळीचा सभासद असल्याने मिळत नाही – त्या चोराने ह्या दोहोंपैकी काहीही केले नव्हते.
2. चांगले वाटल्याने तारण मिळत नाही – चोराला केवळ वाईट वाटत होते – त्याला वधस्तंभावर खिळलेला होते तसेच त्याला त्याच्या पापाची जाणीव झालेली होती.
3. पुढे येऊन किंवा तुमचे हात उंच करुन तारण मिळत नाही – त्याला वधस्तंभावर खिळून त्याच्या हातात व पायात सुद्धा खिळे मारलेले होते.
4. “तुम्ही येशूला अंतःकरणात बोलाविल्याने” तारण मिळत नाही. असे करण्यासाठी त्या चोराला कोणीतरी सांगितले असते तर तो अचंबित झाला असता!
5. “पाप्याची प्रार्थना म्हटल्याने” तारण मिळत नाही. चोराने ही प्रार्थना केली नाही. माझी आठवण करा केवळ त्याने असे म्हटले.
6. तुम्ही ज्या प्रकारे जगत आहां तो जीवनक्रम बदलून तारण मिळत नाही. हे करण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नव्हता.
ज्या पद्धतीने त्याचे तारण झाले तसेच तुमचे तारण झाले पाहिजेः
“प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल” (प्रेषित 16:31).
तुम्ही येशूवर पूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवा, म्हणजे तो तुमचे तारण त्याचे रक्त व नीतिमत्वाद्वारे करील.
III. तिसरा उद्गार – प्रेमाचा.
“येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीति होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पाहा, हा तुझा मुलगा! मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पाहा, ही तुझी आई! आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेऊन घेतले” (योहान 19:25-27).
येशूने आपल्या आईची काळजी घेण्यास योहानाला सांगितले. तुमचे तारण झाल्यानंतर ख्रिस्ती जीवनात करण्यासारखे असे भरपूर आहे. तुम्ही काळजी इतरांची घ्यायला हवी. ख्रिस्ताने आपल्या प्रिय आईला आपला शिष्य योहानाकडे सुपुर्द केले. त्याने तुम्ही काळजी घ्यावी म्हणून तुम्हांस स्थानिक मंडळीस सुपुर्द केले आहे. ख्रिस्ती जीवनात स्थानिक मंडळीवर प्रेम करणे व तिची योग्यप्रकारे काळजी घेतल्याशिवाय कोणीही तारण मिळवू शकत नाही. हेच ते सत्य आहे जे आपल्या पीढीने विसरलेले आहे.
“सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे” (प्रेषित 2:47).
IV. चौथा उद्गार – क्लेशाचा.
“मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारुन बोलला, एली, एली, लमा सबख्थनी? म्हणजे माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” (मत्तय 27:45-46).
येशूची ही क्लेशयुक्त आरोळी त्रैक्याची, तसेच देवत्वाची वास्तविकता दर्शवित आहे. देव जो पुत्र वधस्तंभावर आपल्या पापाची दाहकता सहन करीत होता, तेव्हां देव जो पिता त्याच्यापासून दूर गेलेला होता. पवित्रशास्त्र म्हणतेः
“कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्त आहे” (I तिमथी 2:5).
V. पाचवा उद्गार – दुःखसहनाचा.
“ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, मला तहान लागली आहे, असे म्हटले. तेथे आंब भरुन ठेवलेले एक भांडे होते; म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला” (योहान 19:28-29).
हे वचन हे दर्शविते की येशूने वधस्तंभावर जे महान दुःखसहन केले ते आपल्या पापांची खंडणी भरण्यासाठी केलेः
“खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला” (यशया 53:5).
VI. सहावा उद्गार – प्रायःश्चिताचा.
“येशूने आंब घेतल्यानंतर, पूर्ण झाले आहे, असे म्हटले” (योहान 19:30).
मी आतापर्यंत जे कांही बोललो ते एखाद्या कॅथलिक याजकानेही दिले असते. पण सहावा जो उद्गार आहे त्यावर प्रोटेस्टंटची सुधारणा लटकलेली आहे, तसेच बाप्टिस्टांचा विश्वास उत्तरोत्तर कमी होतोय. येशू म्हणाला, “पूर्ण झाले आहे.”
“पूर्ण झाले आहे” हा उद्गार येशूने उच्चारला तेव्हां तो व्यवस्थित होता का? कॅथलिक मंडळी म्हणते, “नव्हता.” ते म्हणतात की त्याला ताजातवाना असतांना अर्पिले पाहिजे होते, आणि प्रत्येक उपासनेत अर्पण केला गेला पाहिजे. पण पवित्रशास्त्र म्हणते की ते चुकीचे आहे.
“त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत” (इब्री 10:10).
“कारण पवित्र होणा-यांना त्यांने एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केले आहे” (इब्री 10:14).
“प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे य़ज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो. परंतू पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे” (इब्री 10:11-12).
वधस्तंभावर येशूने आपल्या सर्व पापांबद्दल प्रायश्चित केले, व एकदाच सर्वांकरिता मरण पावला.
येशूने सर्व खंडणी भरली,
मी माझे सर्वस्व त्याला दिले;
पापाने त्याचा किरमीजी रंगाचा दाग ठेवला,
त्याने बर्फासारखे शुभ्र असे धुतले.
(“येशूने सर्व खंडणी भरली”एल्विना एम. हॉल यांच्याद्वारा, 1820-1889).
VII. सातवा उद्गार – देवाला समर्पित होण्याचा.
“तेव्हां येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो! असे बोलून त्यांने प्राण सोडला” (लुक 23:46).
मरणापूर्वी येशूने आपल्या शेवटच्या उद्गारात देव जो बाप याला आपले संपूर्ण समर्पण केल्याचे दर्शविले आहे. जसे महान स्पर्जन निर्देशित करतात की, हा येशूचा सर्वात पहिला नोंदणीकृत शब्द प्रतिबिंबीत होतो आहे, “माझ्या पित्याच्या घरात असावे हे तुमच्या [ध्यानात] आले नाही काय?” (लुक 2:49). पहिल्यापासून ते शेवटपर्यंत, येशूने केवळ देवाच्या मर्जीप्रमाणे केले.
एक शताधिपती ज्याने त्याला वधस्तंभावर खिळले तो तेथे उभा राहून त्याचे हे सात उद्गार ऐकीत होता. शताधिपतीने पुष्कळांना वधस्तंभावर खिळलेले पाहिले होते, परंतू येशू जसा मरण पावला तसा कोणीही मरतांना त्यांने पाहिले नाही, तो त्याच्या शरीरातील-रक्त वाहून जातांना सुद्धा अद्भभूत असा उपदेश देतो आहे.
“तेव्हां जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करुन म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता” (लुक 23:47).
त्या शताधिपतीने येशू संबंधाने थोडा अधिक विचार केला, आणि मग तो म्हणाला,
“खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता”(मार्क 15:39).
तो देवाचा पुत्र आहे! तो मरणातून – जीवंत, शाररिकरित्या – पुनरुत्थित झाला आहे. तो स्वर्गात चढला. तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल” (प्रेषित 16:31).
असे कांही लोक आहेत की त्यांना वाटते फक्त देवावर विश्वास ठेवणे पुरेसे आहे. परंतू ते चुकीचे आहेत. देवावर केवळ विश्वास ठेऊन कोणाचेही तारण झाले नाही. येशू स्वतः म्हणाला, “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही” (योहान 14:6). डॉ. ए. डब्लू. टोझर म्हणाले, “येशू ख्रिस्त हात स्वर्गात जाण्याच्या अनेक मार्गापैकी एक मार्ग नव्हे, किंवा अनेक मार्गापैकी एक सर्वात चांगला मार्गही नव्हे; तर तो एकमेव मार्ग आहे” (दॅट इनक्रेडीबल ख्रिश्चन, पृष्ठ. 135). तुम्ही येशूवर विश्वास ठेवणार नाहीत, तर तुम्ही तारण गमावाल. तुम्ही किती “चांगले” असा, तुम्ही कितीदा तरी मंडळीला जात असा, किंवा पवित्रशास्त्र वाचीत असा, पण जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवणार नाही तर तुम्ही आपले तारण गमाविलेले आहांत. “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” येशू हा एकमेव मार्ग आहे ज्याच्या रक्ताने आपली पापे धुऊन शुद्ध होतात. आमेन.
जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.
ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.
उपदेशापूर्वी शास्त्रवाचन झालेः मार्क 15:24-34.
एकेरी गीत गायले: “ब्लेस्ड रिडीमर”
(अविस बर्जेसन ख्रिश्चनसेन यांच्याद्वारा, 1895-1985).
( “Blessed Redeemer” (Avis Burgeson Christiansen, 1895-1985).
रुपरेषा वधस्तंभावरील येशूचे शेवटचे सात उद्गार THE SEVEN LAST WORDS डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हां तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले” (लुक 23:33). (यशया 52:14; 50:6) I. पहिला उदगार – क्षमेचा, लुक 23:33-34; I पेत्र 3:18; II. दुसरा उद्गार – तारणाचा, लुक 23:39-43; प्रेषित 16:31. III. तिसरा उद्गार – प्रेमाचा, योहान 19:25-27; प्रेषित 2:47. IV. चौथा उद्गार – क्लेशाचा, मत्तय 27:45-46; I तिमथी 2:5. V. पाचवा उद्गार – दुःखसहनाचा, योहान 19:28-29; यशया 53:5. VI. सहावा उद्गार – प्रायःश्चिताचा, योहान19:30; इब्री 10:10; VII. सातवा उद्गार – देवाला समर्पित होण्याचा, लुक 23:46; |