संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
पिलात आणि प्रोक्युलाPILATE AND PROCULA डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुले मला फार यातना झाल्या” (मत्तय 27:19). |
अंदाजाने, यु.एस. न्युज व वर्ल्ड रिपोर्ट आणि न्युजविक दोघेहि सांगतात की रोमन सुभेदार ज्याने ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्याचा आदेश दिला, त्या पंत पिलाताचे चित्रण पवित्रशास्त्रात चुकीचे केलेले आहे. न्युजविक म्हणते,
पिलात हा मानवी चित्र नाही असे [मेल] [ख्रिस्ताचा आवेश यामध्ये] गिब्सन वर्णन करतो. अलेक्झांड्रीयाच्या फिलो नुसार, “परिपूर्ण ताठर, हट्टी, आणि दुष्ट” असा स्वभाव होता, आणि जाणून घेतल्यावाचून त्रास देणारा म्हणून ओळखला जात होता (न्यूजविक, 16 फेब्रुवारी, 2014, पृष्ठ 48).
न्यूजविक पुढे असे म्हणते की, चार शुभवर्तनाचे लेखक हे ख्रिस्तीत्व श्रोत्यांना “आकर्षक करण्यास त्याला जितके व्यापक करता येईल तितके” करण्यासाठी ते आपल्या पद्धती बाहेर जाऊन त्यांनी रोमन सुभेदाराचे चित्रण चांगल्या रितीने केले आहे (ibid).
यु.एस. न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्ट म्हणतो,
पंत पिलाताचे गिब्सन (किंवा शुभवर्तमानाने) जे कांही सौम्य (मानवी), येशूला दंड करण्यास भर देणा-या महायाजकाच्या मतावर गोंधळलेला असे जे चित्रण केले आहे त्यापेक्षा तो अगदी भिन्न आहे. खरे तर, त्याला, पहिल्या-शतकातील इतिहासकार जोसेफस, परिपूर्ण कठोर म्हणून कुप्रसिद्ध, बंडखोरांपेक्षा अधिक क्रुसावर चढविण्यास अधिर असलेला अशा रितीने दर्शवितो (यु.एस. न्यूज व वर्ल्ड रिपोर्ट, 8 मार्च, 2004, पृष्ठ 42).
पवित्रशास्त्रावर विश्वास ठेवणारे म्हणून, टाईम, न्यूजविक, यु.एस. न्यूज व वर्ल्ड रिपोर्ट यावर भरवंसा ठेऊ नये असे शिकविले आहे, आणि विशेषत: धर्मनिरपेक्ष माध्यम जेव्हां ते ख्रिस्तीत्वावर टिप्पणी करतात. तेव्हां उदाहरणतः, चारी शुभर्तमानात नोंद केल्याप्रमाणे पिलाताने येशूवर केलेल्या कृतिमध्ये न्यूजविक सांगते त्याप्रमाणे फिलो शंका निर्माण करतो. थोडक्यात, न्यूजविकने चार शुभवर्तमानात नमुद केल्याप्रमाणे येशूच्या बाबतीत पिलात जी कृति करतो त्यात फिलो त्याला संभ्रमात टाकतो असे सांगितले. परतू फिलो हा येशू व पिलात यांच्यामध्ये जे घडले त्याचा साक्षीदार होता. फिलो हा इजिप्तमधील, अलेक्झांड्रीया जे यरुशलेम पासून शंभर मैल अंतरावर होते तेथे जन्मला व वाढला. त्याने पिलात किंवा येशूला कधीही पाहिले नव्हते! त्याने केवळ दुस-याच्या-ऐकलेल्या ज्ञानातून लिहले. इन्सायक्लोपिडिया ब्रिटानिया म्हणते की फिलोने “आपले सर्व जीवन अलेक्झांड्रीया येथे व्यतित केले होते” (इन्सायक्लोपिडिया ब्रिटानिया, 1946, आवृत्ती 17, पृष्ठ 757).
यु.एस. न्यूज व वर्ल्ड रिपोर्ट हे जोसेफसला इतिहासकार म्हणून सांगतात. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळल्यानंतर म्हणजे, इ.स. पूर्व 37 पर्यंत योसेफसचा जन्म देखील झाला नव्हता (इन्सायक्लोपिडिया ब्रिटानिया, आवृत्ती 13, पृष्ठ 153). फिलो हा इजिप्त मध्ये राहत होता. तो यरुशलेमला कधीही गेला नव्हता. योसेफस हा अजून जन्मला देखील नव्हता. चारी शुभवर्तमानामध्ये प्रेषितांनी त्यांचा प्रत्यक्ष दर्शनी म्हणून जो उल्लेख आहे ते अप्रामाणिक आहे. मत्तय हजर होता. जे घडले ते त्याने पाहिले. मार्क हजर होता. जे घडले ते त्याने पाहिले. योहान हजर होता. जे घडले ते त्याने पाहिले. पेत्र व इतर जे प्रत्यक्ष दर्शनी होते त्यानी जे पाहिले व सांगितले ते ऐकून लुकने लिहले. ते खरोखर तेथे होते. ते प्रत्यक्ष दर्शनी होते. फिलो हा शंभर मैल अंतरावर तेथे आफ्रिकेत राहत होता आणि जोसेफस अजून जन्माला यायचा होता!
दोन्ही न्यूजविक व यु.एस. न्यूज व वर्ल्ड रिपोर्ट हे प्रेषिताने जो प्रत्यक्ष दर्शनींचा अहवाल दिला तो ते नाकारतात, आणि जो अजून जन्माला आलाच नाही त्याची बाजू घेतात, आणि दुसरा माणूस जो शंभर मैल दूर, उत्तर आफ्रिकेत राहतो! मला ते पक्षपात केल्यासारखे वाटते! परंतू आपणांस शिकविण्यात आले आहे की धर्मनिरपेक्ष — ख्रिस्तीत्वा विरोधात ते पक्षपात करतात. ते दुस-या मोठ्या धर्माविरुद्ध अशाप्रकारे करीत नाहीत, परंतू ते प्रत्येक संधीमध्ये ख्रिस्तीत्व व पवित्रशास्त्रास झोडपण्याचे सोडत नाहीत. त्यांच्याकडून आपण अशीच अपेक्षा करतो. जसे की डेव्हीड लिंबाग म्हणाले,
नाताळ किंवा इस्टर सणांदरम्यान देशातील अग्रगण्य मासिके पवित्रशास्त्रीय ख्रिस्तीत्वाचा अपमानकारक गोष्टींचा प्रसार करतांना तुमच्या कधी लक्षात आले का? 1996 च्या पवित्र सप्ताहात स्तंभलेखक डॉन फेडर यांनी पाहिले की, न्यूजविक व यु.एस. न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्ट दोघानी ख्रिस्तीत्व खोटे असल्याच्या मुखपृष्ठ कथा लिहल्या (डेव्हिड लिंबाग, पर्स्युकेशन: हाऊ लिबरल्स आर वेजिंग वाग अगेन्स्ट ख्रिस्टीयानिटी, रिजनरी पब्लिशिंग, 2003, पृष्ठ 271).
पुष्कळ पुराणमतवादी लेखकांच्या लक्षात आले की कशाप्रकारे मुक्तवादी ठिकाणे ख्रिस्तीत्वाच्या विरोधात पक्षपात करीत आहेत.
पंत पिलातास नवीन करार पांढरे शुभ्र करीत नाही. पिलात हा कठोर रोमन सुभेदार होता हे सांगण्यास आम्हांला फिलो किंवा जोसेफसची गरज नाही. जेव्हां पिलाताने गालीलात पुष्कळ यहुद्यांचा वध केला त्या घटनेविषयी आपणांस लुक 13:1-2 सांगते. पवित्रशास्त्राचा सचित्र शब्दकोश आपणांस सांगतो की
यहुद्यांमध्ये पिलात कधीही ख्याती पावला नाही. तो त्याच्या धोरणाप्रमाणे चालण्याकरिता त्याचा धार्मिक विश्वास व कट्टरता यासंबंधाने असंवेदनशील वाटत होता. पण यहुद्यांनी त्याच्या राजवटीच्या विरोधात संताप व्यक्त केला, आपला कमकुवतपणा दाखवित, त्याने ब-याचदा माघार घेतली...पिलात हा तत्वशुन्यता मिळविणा-याचे असे उदाहरण आहे की जो आपला स्वार्थी हेतू पूर्ण करण्यासाठी जे कांही योग्य त्याचा त्याग करील. येशू हा निष्पाप आहे हे तो ओळखीत होता आणि येशूला निर्दोष म्हणून सोडून देऊन न्यायाची उंची वाढवावी तरी, आपले वैयक्तिक नुकसान करण्याऐवजी त्याला त्याने लोकांच्या मागणीनुसार लोकसमुदायाच्या स्वाधीन केले (हरबर्ट लॉकीयर, जेष्ट., संपादक, सचित्र पवित्रशास्त्राचा शब्दकोश, थॉमस नेल्सन, 1986, पृष्ठ 842).
मग, पंत पिलाताने येशूला वधस्तंभावर खिळविण्यास एवढे आढेवेढे का घेतले? मला वाटतं त्याची तीन मुख्य कारणे आहेत: राजकीय परिस्थीती, त्याच्या पत्नीची सुचना, व त्याचे दुबळे पद. पिलाताला हे माहित असायला हवे होते की लोकसमुदायाने आठवड्याच्या आरंभी येशूचे यरुशलेमेत स्वागत केले होते. त्यांनी आरोळी मारली,
“दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना’ परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित! उर्ध्वलोकी ‘होसान्ना’ तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा होय” (मत्तय 21:9-11).
हे सुभेदाराच्या लक्षात आले होते. तो अगोदर पासूनच येशूविषयी विचार करीत होता.
मग येशूने मंदिराचे शुद्धीकरण केले.
“नंतर येशू मंदिरात गेला. मंदिरात जे क्रयविक्रय करीत होते त्या सर्वाना त्याने बाहेर घालवून दिले; सराफांचे चौरंग व कबूतरे विकणा- -यांना बैठकी पालथ्या केल्या, आणि त्यास म्हटले, “माझ्या घरांस प्रार्थना घर म्हणतील असे लिहले आहे; परंतू तुम्ही ते लुटारुंची गुहा करीत आहां. मग आंधळे व लंगडे यांच्या त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले” (मत्तय 21:12-14).
पिलाताला सुद्धा, हे सर्वकांही ठाऊक होते.
जयोत्वाने यरुशलेमध्ये प्रवेश, मंदिराचे शुद्धीकरण, अलौकीक आरोग्य – एक सुभेदार म्हणून, पिलाताने ह्या सर्व गोष्टी ऐकलेल्या होत्या. त्यानंतर येशूला त्यांनी त्याच्याकडे आणले. त्याने येशूला प्रश्न विचारला,
“परंतू त्याने अकाहि आरोपाला त्याला कांही उत्तर दिले नाही; ह्याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले”(मत्तय 27:14).
दुसरे, त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठविला, चला उभे राहून मत्तय 27:19 मोठ्याने वाचूया,
“तो राजासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठविला की, त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या” (मत्तय 27:19).
आपण खाली बसू शकता.
प्राचिन परंपरेनुसार त्याची पत्नी ही यहुदी धर्मात परिवर्तन झालेली होती. स्वतःला कांही समज नसणारा तो एक आधुनिक मनुष्य होता. एक रोमन म्हणून तो पुष्कळ देव, आत्मे –चांगले किंवा वाईट असे दोन्ही, आणि श्लोक किंवा स्वप्न या सर्वांवर विश्वास ठेवत होता. शास्त्रलेखातील नोंदीनुसार, पिलात हा त्याच्या पत्नीच्या अगदी जवळचा होता. तिचे नाव क्लॉडिया प्रोक्युला असे होते. वास्तव हे आहे की तिने एक महत्वाची सुनावणी सुरु असतांना मध्येच निरोप पाठविला यावरुन त्यांची भावनिक जवळीकता दिसून येते.
त्यामुळे, ह्या वल्हांडणाच्या आठवड्यात हे अविश्वसनीय दृष्य पाहायला मिळाले. तुम्ही ख्रिस्ताचा जयोत्सावाने प्रवेश पाहिला, त्या सर्व लोकांबरोबर जे जयघोष करीत व टाळ्या वाजवित होते. त्यानंतर आपण मंदिराचे शुद्धीकरण पाहिले. मला वाटतं मेल गिब्सन हा बरोबर होता जेव्हां त्याने असे पिलात म्हणतांना पाहिले की, “तुम्ही नगरात ज्याचे जल्लोषाने स्वागत केले तो हा संदेष्टा नव्हे काय? तुम्ही मला ही मुर्खता स्पष्ट करु शकता काय? (न्यूजविक, 16 फेब्रुवारी, 2004, पृष्ठ पृष्ठ 49). ते खरे आहे की, ज्यांचे विचार अगदी पिलाताप्रमाणे आहेत ते त्याच्यासारखे असू शकतात.
त्यानंतर, त्याची पत्नी सुनावणीच्या दरम्यान निरोप पाठवून – येशूविषयी इशारा देताना आपण तिला पाहिले. त्या निरोपाचा अलौकीक सुगंध त्यावेळच्या अंधश्रद्धाळू रोमी लोकांना त्रासदायक ठरला असणार.
तिसरे, पिलात हा खूपच दुबळ्या पदावर होता. क्षमायाचना करणारा ली स्ट्रॉबेल म्हणतो की तो खालील प्रमाणे होता
ज्याप्रकारे ते रोमी पुढा-यांना चित्रित करतात त्यावरुन कशाप्रकारे कांही नगरे शुभवर्तमानाच्या अचूकतेसंबंधी प्रश्नचिन्ह उभारतात याची आठवण...होते. तसेच नवीन करार त्याचे चित्रण हे दोलायमान असलेला व येशूला शिक्षा देऊन यहुदी लोकांचा दबाव सहन करणार असे करते, इतर ऐतिहासिक लिखान त्याला हट्टी व कठोर असे चित्रीत करतात.
[पण डॉ. एडविन यामौची, एक विख्यात पुरातत्वशात्रज्ञ व पवित्रशास्त्र पंडीत, निर्देशित करतात की पौल माइर, त्यांचे 1968 चे पुस्तक पंतय पिलात] “...दर्शविते की त्याचा [पिलाताचा] रक्षक व आश्रयदाता हा सेजानस होता जो सत्तेतून 31 मध्ये पायउतार झाला कारण तो राजाविरुद्ध कट रचीत होता...या नुकसानीमुळे पिलाताचे पद हे इ.स 33 मध्ये दुबळे झाले...जेव्हां येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले. त्यामुळे पिलात हा नाखुश झाला असावा हे अगदी समजण्यासारखे आहे...याचा अर्थ असा की पवित्रशास्त्रीय वर्णन ...बरोबर आहे” (ली स्ट्रॉबेल, द केस फॉर क्राईस्ट, झोंडरवन, 1998, पृष्ठ 85).
ह्या तीन कारणांमुळे येशूला वधस्तंभी देण्यासंबंधी पिलात नाखुश वाटतो हे मला विचित्र वाटत नाही. कांही अंशी येशूकडे अलौकीक सामर्थ्य आहे असे निसंशयीपणे पिलाताच्या पूर्व-आधुनिक मनाला वाटते. पवित्रशास्त्र म्हणते की तो “अद्भूत महान” [खूप आश्चर्यकारक होता] यासाठी की येशूने त्याच्या कांही प्रश्नांची उत्तरे दिली होती. आणि, म्हणून, तो द्विधा मनस्थीतीत होता. तो त्याच्या पत्नीच्या विचित्र स्वप्नाविषयी विचार करीत होता. त्याचे ऐकून येशू म्हणाला,
“आपणाला वरुन अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता; म्हणून...” (योहान 19:11).
कसेतरी, त्याच्या अंधश्रद्धाळू, मूर्तीपूजक अंतःकरणाला, पिलाताला ठाऊक होते की तो अलौकीक — दैवी बाब हाताळत आहे. त्याच्या पत्नीचे शब्द त्याच्या मनात भिरभिरीत होते,
“त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या” (मत्तय 27:19).
पिलाताला त्याच्या पत्नीने पाठविलेला निरोप आपण अधिक जवळून पाहूया.
I. प्रथम, तो पापाविरुद्ध दिलेला इशारा होता.
ते देवाकडून आलेले स्वप्न होते. जुन्या करारात ब-याचदा स्वप्नाद्वारे देव लोकांशी बोलत असे. मिसरमध्ये फारोशी देव स्वप्नाद्वारे बोलला. नबुखद्नेसर राजाशी देव स्वप्नाद्वारे बोलला. योसेफबरोबर देव स्वप्नाद्वारे बोलला आणि त्याला सांगितले की हेरोद राजापासून सुटका व्हावी म्हणून बाळ येशूला घेऊन मिसरात जा. प्रोक्युलाचे स्वप्न हे तिला मानसिक त्रास देणारे होते. ती म्हणाली, “कारण...स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या” (मत्तय 27:19). ग्रीक शब्द “पास्को” पासून “यातना” हा शब्द अनुवादित झाला आहे. प्रेषित 1:3 मध्ये, तो “मरण सोसणे” असा अनुवादित केला आहे, जो ख्रिस्ताचे मरण संदर्भित करतो. पिलाताची पत्नी, प्रोक्युलाने तिच्या स्वप्नात कदाचित ख्रिस्ताचे भयंकर दुःखसहन पाहिलेले असावे. कदाचित तिने तिच्या पतीचे भयंकर भविष्य पाहिलेले असावे.
खरोखर तिचे स्वप्न हे पापाविरुद्ध एक इशारा आहे. आणि ते पिलाताच्या सद्सद्विवेक बुद्धि विषयी सुद्धा बोलते. प्रोक्युलाने त्याला सांगितले की येशू “नीतिमान मनुष्य,” धार्मिक मनुष्य आहे. पिलाताच्या सद्सद्विवेक बुद्धीने तिच्याशी सहमती दर्शविली. या संबंधाने त्याने जेव्हां हात धुतले तेव्हां त्याने येशूला “नीतिमान व्यक्ति” असे ख्रिस्ताचे वर्णन आपल्या पत्नीचाच पुनरुच्चार करुन केले (मत्तय 27:24). तसेच तो आपल्या पत्नीच्या शब्दाने प्रभावित झाला, तो हलला. त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीने त्याला एका बाजूला केले, आणि मनुष्याचे भय एका बाजूला.
त्यानंतर जमावाने आरडोरड केली,
“आपण याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही, जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला विरोध करतो? (योहान 19:12).
त्यामुळे त्याला रेषेवर ओढले गेले. डॉ. रेरी म्हणतात,
त्याने यहुदी रितीरिवाज मोडला किंवा ज्यावर त्याला अधिकारी नेमले [राज्यकर्ता] पूर्वीचा तिबेरिअस – तेथील परिस्थीती हाताळता आली नाही म्हणून रोमकडून आणखी एक अहवाल येऊ नये असे त्याला वाटत होते (चार्ल्स सी. रेरी, पीएच.डी., द रेरी स्टडी बायबल, मार्क 15:1 वरील टिपण्णी).
येशूच्या विरोधात...अधिका-यांनी राजकीय गुन्हा परत फिरविला, प्रांतीय सुभेदार (पिलाता सारखा) जो लहरी सारखा राजकर्ता (तिबेरिअस) यासाठी मोठा धोका होईल हे सुचवीत होता. इतर गोष्टीत रोमी पिलाताच्या कृति विरोधात अजूनहि अगोदरच विरोध दर्शवित होते जेथे तो त्यांच्या रुढीपरंपरेशी असंवेदनशील होता (ibid., योहान 19:12).
आणि अशाप्रकारे मनुष्यांच्या भयामुळे पिलाताने प्रोक्युलाचा इशारा अवमानला, त्याच्या स्वतःच्या सद्सद्विवेका विरोधात केला, आणि पाप केले. पवित्रशास्त्र म्हणते,
“मनुष्याची भीति पाशरुप होते” (नीतिसुत्रे 29:25).
येथे असे कांही लो आहेत जे येशूविषयी विचार कीरत आहेत. पिलातासारखे, त्याच्याविषयी तुम्हांला इशारा देण्यात आला आहे. तुम्ही पापापासून वळावे व ख्रिस्तावर विश्वास ठेवावा असे तुम्हांस सांगण्यात आले आहे. तुम्ही ते करणार काय? पिलाताप्रमाणे “आपले हात धुणे” व येशूपासून दूर जाणे हा मोठा मोह असेल. “कट्टरवादी” बनू नका म्हणून तुम्हांला लोक सांगतील. ते तुम्हांला ख्रिस्तापासून दूर घेऊन जातील. तुम्हा कोणत्या मार्गाने जाणार? तुम्ही येशूकडे येऊन तारण साधून घेणार काय? किंवा जे ख्रिस्तविरोधी आहेत अशांकडून मागे ओढले जाणार? पिलाताकडे जी संधी होती तीच संधी तुम्हांकडे आहे. पिलाताच्या पत्नीने इशारा दिला होता, तरी पण तो अडखळला – बराच काळ!
II. दुसरे, दिलेला इशारा जो नाकारण्यात आला.
येथे चूक करु नका. पिलाताने आपल्या पत्नीचा इशारा नाकारला. देवी सल्ला मानण्याऐवजी त्याने लोकांची मागणी मान्य केली. जॉन ट्रॅप म्हणतात, “हा पळपुटेपणा (भ्याडपणा) होता काय ज्यामुळे पिलात चुकला, आणि त्याला गोंधळलेले झाले, ज्यामुळे तो पुष्कळ-डोकी असलेल्या समुहाशी विरोधाभास करु शकला नाही?” (जॉन ट्रॅप, अ कॉमेंट्री ऑन द ओल्ड व नवीन टेस्टामेंट्स, ट्रान्सकी पब्लिकेशन्स, 1997 पुनर्मुद्रण, आवृत्ति V, पृष्ठ 271).
त्याने त्याच्या पत्नीचे का ऐकले नाही? स्वतःची-रुची व भ्याडपणामुळे. आपल्या पत्नीचे ऐकू तर आपण आपले सुभेदाराचे पद गमावू अशी भीति त्याला वाटली.
तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्याने तुम्ही कांहीतरी गमावणार आहांत का? हे शुभवर्तमानात चार वेळा नमुद करण्यात आले आहे की येशू म्हणाला,
“जो आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल” (मत्तय 16:25; मार्क 8:35; लुक 9:24; लुक 17:33).
मत्तय 16:25-26 आपल्या पवित्रशास्त्रातून काढा. उभे राहूया व मोठ्याने ती दोन वचने वाचूया. येशू म्हणाला,
“कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो, तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?” (मत्तय 16:25-26).
आपण खाली बसू शकता.
येशू म्हणाला की जर तुम्ही आपले जीवन जसे आहे तसे ऱाखू इच्छिता, तर तुम्ही आपल्या जीवनास मुकाल. तुम्ही सारे जग मिळविले आणि आपल्या जिवाचा नाश केला तर काय लाभ? पिलाताने चकीची निवड केली. त्याने आपली भूमिका ही सुभदाराची राखली – पुढील आणखी तीन वर्षे – पण आपल्या जिवाचा नाश केला.
जोसेफस शोमरोन्यांबरोबर झालेल्या रक्तपाती मुकाबल्याविषयी सांगतो, जो पिलाताचा वरिष्ठ, विटेलिअस, सिरियाचा सुभेदार होता. त्या विरुद्ध तक्रार नोंदविली. विटेलिअसले पिलाताला काढून टाकले व रोमच्या राजा समोर उभे राहण्यास आणि वागण्याविषयी उत्तर देण्यास सांगितले...एउसेबिअस अङवाल सांगतो की त्याला बंदीवासात पाठविले...गौल (फ्रान्सला) जेथे त्याने शेवटी आत्महत्या केली. (इलुस्ट्रेटेड डिक्शनरी ऑफ द बायबल, ibid.).
पिलाताने त्याच्या पत्नीच्या द्वारे दिलेला देवाचा इशारा नाकारला. पिलाताने सर्वकांही गमावले – त्याचा जीव सुद्धा. आपला येशू ज्याला ख्रिस्त म्हणतात त्याच्या तपासणीची अध्यक्षता त्याने केली होती म्हणून आपण त्याला ध्यानात ठेवतो! पिलाताच्या पत्नीने त्याला इशारा दिला होता –पण त्याने तिचा इशारा नाकारला.
III. तिसरे, तो असा इशारा होता ज्याचे परिणाम अनेक होते.
कर्मठ समालोचक जॉन ट्रॅप हे थिओफिलॅक्ट यांचे विधान सांगतात, ते म्हणाले, “ओपस प्रॉविडंटी डाइ; नॉन सोलवरेचर क्रिस्तुस, सेड अट सेरवरचर अक्झॉर,” — “देवाचे प्रामाणिक कार्य हे, ख्रिस्ताला वाचविणे हे नव्हते तर, तिच्या पतीची सेवा करणे हे होते” (जॉन ट्रॅप, अ कॉमेंट्री ऑन द ओल्ड व नवीन टेस्टामेंट्स, ट्रान्सकी पब्लिकेशन्स, 1997 पुनर्मुद्रण, आवृत्ति V, पृष्ठ 271). थिओफिलॅक्ट हा तज्ञ व संवेदनशील बाराव्या शतकातील ग्रीक पवित्रशास्त्राचा समालोचक होता. तो आपणास सांगतो की प्रोक्युलाचा इशारा हा ख्रिस्ताला वाचविण्यासाठी नव्हता, परंतू तिच्या पतीची सेवा करण्यासाठी होता. “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये” (मत्तय 27:19). त्या स्वप्नाच्या द्वारे देवाने तिच्या पतीची सेवा केली, पण त्याने आपल्या पत्नीचा इशारा नाकारला. कृपया प्रेषित 13:28-31 अघडा. उभे राहून ही वचनें मोठ्याने वाचूयां.
“आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलाताला विनंती केली. मग त्याच्याविषयी लिहलेले सर्वकांही पूर्ण करुन त्यांनी त्याला खांबावरुन खाली काढून कबरेमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले. त्याच्याबरोबर जे गालीलाहून यरुशलेमेत आले त्यांच्या दृष्टीस पुष्कळ दिवस पडत असे; ते आता लोकांना साक्षी आहेत” (प्रेषित. 13:28-31).
येशू जीवंत आहे. तो मरणातून पुन्हा उठला. पिलात मेला आहे. तो त्याच्या पत्नीची दैवी इशारा ऐकण्यास असमर्थ ठरला. त्याने आपला जीव गमावला — सर्वकाळाकरिता नरकात.
स्पर्जन म्हणाले की शेवटच्या न्यायकाळी प्रोक्युला उभी राहून आपला पती, पिलाताचा, धिक्कार करील. मत्तय 12:42 हे स्पर्जनच्या मनात असावे,
“दक्षिणेकडील राणी न्यायकाळी ह्या पीढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील;...” (मत्तय 12:42).
स्पर्जन म्हणाले,
शेवटच्या महान दिवसा विषयी नुसती कल्पना केली तरी आपणांस शांति मिळणार नाही, जेव्हां येशू आपल्या न्यायासनावर बसलेला असेल, आणि पिलात त्याच्या देहात केलेल्या कृत्यांच्या न्यायासाठी उभा राहिलेला असेल, तेथे त्याची हुशार पत्नी त्याचा धिक्कार करुन त्याच्या विरोधात साक्ष देणार. मला त्याची कल्पना आहे की अशाप्रकारच्या ब-याच प्रकरणांची दृष्यें तेथे असतील, तेथे जे आपल्यावर प्रेम करतात ते आपल्या विरोधात मोठा पुराव आणतील, जर आम्ही अजूनहि पापात असू. मला ठाऊक आहे त्याचा कसा परिणाम होणार जेव्हां माझी आई मी एक मुलगा म्हणून, तारणाचा मार्ग आपल्या मुला समोर ठेऊन, आम्हांला म्हणेल, “तुम्ही जर ख्रिस्ताचा नाकार कराल व नाश पावाल, तर तुझ्याविषयी मला आनंद होणार नाही आमि म्हणेल तू काय अडाणी होतास काय. नाही, पण तुझ्या धिक्काराविषयी मला आमेन म्हणायला लागणार.” मी ते सहन करु शकणार नाही! माझ्या धिक्काराविषयी माझी आई “आमेन” म्हणेल? आणि तरीही, पिलाताची पत्नी, याशिवाय काय करु शकेल? जेव्हां सगळ्यांना खरे बोलावे लागणार, काय ती म्हणेल की तिच्या पतीला प्रेमाने व प्रामाणिकपणे तिने इशारा दिलेला होता व तरीही त्याने तारणा-याला शत्रूंच्या हाती सोपून दिले?
अरेरे, माझ्या अदैवी श्रोत्यांनो, माझा जीव तुमच्यानंतर जातो. “मागे फिरा, मागे फिरा, का मरता आहां?” तारणा-याच्या विरोधात पाप का करता? तुम्ही तुचे तारण नाकारु शकणार नाही असे वरदान देव देतो, परंतू तुम्ही ख्रिस्ताकडे वळायला हवे आणि त्यात्यातील सार्वकालीक मुक्तता शोधायला हवी. “जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालीक जीवन मिळेल” (सा.एच. स्पर्जन, “पिलाताच्या पत्नीचे स्वप्न,” द मेट्रोपोलीटन टॅबरनिकल पुलपीठ, पीलग्रीम पब्लीकेशन्स, 1973 पुनर्मुद्रण, आवृत्ती 28, पृष्ठ 132).
येशू पिलाताच्या सभागृहात उभा आहे –
सर्वांकडून मित्रहीन, टाकलेला, विश्वासघात केलेला असाः
ऐका! अचानक बोलाविणे म्हणजे काय!
येशूबरोबर तुम्ही काय कराल?
येशूबरोबर तुम्ही काय कराल?
तुम्ही त्रयस्त राहू नका;
एकदिवशी तुमचे अंतःकरण विचारत राहील,
“माझ्याबरोबर तू काय करणार?”
(“येशूबरोबर तुम्ही काय कराल?”अल्बर्ट बी. सिम्पसन, 1843-1919).
जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.
(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.
ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.
उपदेशापूर्वी वचन वाचलेः मत्तय 27:15-24.
उपदेशापूर्वी एकेरी गीत गायले: “येशूबरोबर तुम्ही काय कराल?”
(अल्बर्ट बी. सिम्पसन यांच्याद्वारा, 1843-1919).
“What Will You Do With Jesus?” (Albert B. Simpson, 1843-1919).
रुपरेषा पिलात आणि प्रोक्युलाPILATE AND PROCULA डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा “तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुले मला फार यातना झाल्या” (मत्तय 27:19). (मत्तय 21:9-11, 12-14; 27:14; योहान 19:11) I. प्रथम, तो पापाविरुद्ध दिलेला इशारा होता, योहान 19:12;
II. दुसरे, दिलेला इशारा जो नाकारण्यात आला, मत्तय 16:25-26; III. तिसरे, तो असा इशारा होता ज्याचे परिणाम अनेक होते |